कांदेपोहे

अनेक दिवस हे लिहावं असं वाटत होतं, कंटाळा तर होताच, पण इतकं खाजगी लिहावं की नाही असाही एक प्रश्न पडत होताच. पण काही मित्रमैत्रिणींच्या आग्रहास्तव आज लिहायला सुरूवात केलीये. या सगळ्यात काही गमतीजमतीचे अनुभव आहेत काही तिरस्कार करण्याजोगे, काही लाथाच मारून हकलून द्यावं अशी माणसं भेटली तर काहींना "(होप यू) गेट वेल 'सून' " असं म्हणावंसं वाटलं वगैरे. त्यातले हे काहीच अनुभव. आठवतील आणि जमेल तसं बाकीचेही लिहिनंच.
==========
माझ्या आणि माझ्या काही मित्रमैत्रिणींच्या बघाबघी कार्यक्रम आणि लग्न ठरवणे इत्यादी प्रकारातले हे फर्स्टहॅण्ड अनुभव...
१.
मी पुण्यातल्या एका मुलाला भेटायला गेले होते. म्हणजे आम्ही सारेच मी आईबाबा वगैरे. त्या मुलाला आधी बोलायला सवड नव्हती आणि त्यांना कुटुंबीयांसमवेत भेटायचं होतं म्हणूनही आम्ही गेलो. कोथरूडस्थित एका भल्याच मोठ्या आठ खोल्यांच्या प्रशस्त फ्लॅट मधे हा मुलगा आणि त्याचे आईवडील रहात होते. गेल्यागेल्या "आमची अमुक इतकी प्राॅपर्टी आहे, गावाकडं इतकी एकर शेती आहे, घर आहे शेतातही बंगला आहे. लक्ष्मीरोडवर वाडा होता तो पाडून आता तिथे एक मोठी अपार्टमेंट झालीये ती ही आमचीच आहे." इत्यादी वगैरे सांगून त्या मुलाच्या पूज्य पिताश्रींनी पकवलं आम्हाला. गेल्यापासून ती वृद्ध व्यक्ती फक्त माझ्याकडं आणि माझ्या आईकडंच पहात होती. मग मुलाची आई स्वतःच्या संपत्तीचं प्रदर्शन वगैरे करण्यात गुंगून गेली. मी कपाळाला हात लावून खिडकीतून बाहेर बघत बसले. या सगळ्यात मुलाचा पत्ताच नव्हता. नंतर तो आला. समोर बसला. एकच वाक्य साधारणपणे चार ते पाचवेळा बोलत होता तो. आणि बोलताना सतत पॅन्ट वर ओढत होता, मिस्टर धोंड सारखी. मला मि. धोंड आठवून हसायला आलं. तसं मी फिसकन् हसलेपण आणि आईनं ढोपर मारल्यावर गप्पही बसले. अजूनपर्यंत मी तोंड उघडलंच नव्हतं बडबड करायला. तशी इच्छाही नव्हती. नाईलाजानी आम्ही तिघेही तिथं अडकून पडल्यासारखे बसलो होतो. मग तो मुलगा घर दाखवायला म्हणून मला चल म्हणाला. त्यांच्या खिडकीतून भारी व्ह्यू होता. खूप मस्त झाडं बिडं होती. मला त्या वृद्ध व्यक्तीची सतत माझ्याकडं बघणारी स्कॅनिंग मशिन सारखी नजर खटकत होती आणि मी तोंड उघडून फाटदिशीन् काहीतरी बोलेन म्हणून घाबरून आई मला जा म्हणाली. मी गेले शा.मु.सारखी. तर काहीतरी बोलायचं म्हणून तो मुलगा मला आवड निवड विचारू लागला. आवड निवड म्हणजे खायला प्यायला काय आवडतंय ते. पहीलाच प्रश्न असला भारी होता. मुलगा म्हणे "तू काय पितेस?" माझ्या मनात आलेलं सांगावं सकाळी जागी झाल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी टल्लीच असते , फक्त आणि फक्त दारूच पिते, ती पण देशी संत्री मोसंबी वगैरे परत शा.मु.सारखं खरं खरं उत्तर दिलं. तर हे महाशय जे बोलले त्यानं मला हसू कंट्रोल करणं अवघड होऊन बसलं. हा मुलगा मी त्याला न विचारताच म्हणाला " मी रोऽऽज हाॅर्लिक्स पितो, हाॅर्लिक्स केसर बादाम." पाच दहा सेकंदांनी लाजत म्हणाला, "ताकद यायला पाहीजे ना आता, म्हणून." मला एकाचवेळी संमिश्र भावना म्हणजे कीळस, चीड, तिरस्कार, कीव, हसू इ. काय असतंय ते समजलं आणि हस्यानी विजय मिळवला. मी हसत तिथून बाहेर पडले आणि आईबाबांना आता बास म्हणून घेऊन गेले.
त्यानंतर न बोलता कुणालाही भेटणं टाळलं.

२.
एका मुलाला भेटण्याचा योग आला. प्रथमदर्शनी फार छान वाटला, बोलायला वगैरे. थोडे दिवस बोलल्यावर म्हणाला, "हे चित्रं काढणं तुला बंद करावं लागेल. चित्रकार/कलाकार लोकं सणकी असतात. पुढं जाऊन ते नशापाणी करतात. आणि तरीही तुला चित्रं काढायचीच असतील तर निसर्गचित्रं काढ, धबधबे, डोंगर, नारळाची झाडं असं. पण हे नको. हे नाहीच काढायचंस तू. तू वाचतेस ते लेखक पण चांगले नाहीत, जरा चांगलं वाचावं लागेल तुला." त्याक्षणी त्या मुलाला बाय म्हणणंच योग्य होतं, तेच केलं.

३.
एका मैत्रिणीचं लग्न ठरलं. साखरपुडा जवळ आला. तिचा होणारा नवरा कॅनडात होता. तिची होणारी सासू आणि सासूची बहीण एकेदिवशी तिच्या घरी आल्या. म्हणाल्या 'चल जरा खरेदीला जाऊयात, आवरून ये." ही अवरून त्यांच्यासोबत गेली. त्यांनी तिला बाजारात/मार्केटात/ दुकानात वगैरे न नेता गायनॅक. कडे नेलं तिची व्हर्जिनीटी टेस्ट करायला. ही संतापून बेभान झाली. तिनं त्या कॅनडास्थित होऊ घातलेल्या नवऱ्यामुलाला फोन केला आणि 'हा काय फालतूपणा चालला आहे' असं विचारलं. तो मुलगा म्हणे, " घे ना करून काय त्यात काय बिघडतंय?" त्या गायनॅक.कडेच तिने 'हे लग्न मोडलं' असं जाहीर करून टाकलं.

४.
एका मैत्रिणीचं लग्नाचं बघत होते. ती पुण्यात एका मुलाला भेटायला गेली. त्याआधी जवळपास महीना दीडमहीना ते दोघं फोनवर, व्हाॅट्सअॅपवर वगैरे बोलत होते. भेट झाली. तिला तो आवडला. परत एकदा भेटूया म्हणाला तोच. ती बर म्हणाली. ती परत पुण्याला गेली रजा काढून. असं तिन चारवेळा ते भेटले. चारचार तास गप्पा मारल्या. पाचव्या वेळी भेटल्यावर तो मुलगा म्हणाला, "तसं सगळं ठीकच आहे, आता आपण इतके दिवस भेटतो आहोत, एकमेकांना ओळखतो आहोत, आपण पुढे जायला काहीच हरकत नाही, पण मी गे आहे, आपण लग्न करू पण मी नवरा म्हणून तुला 'ते' सुख नाही देऊ शकणार. पण मला बायको म्हणून तू आवडलीस. 'त्या' व्यतिरिक्त आपण एकत्र राहू आपापल्या कुटुंबांसाठी. तुला तर मी आवडलोच आहे त्यामुळं तसा तुला प्राॅब्लेम नसेलच." पुढे हे लग्न काही झालं नाही हे नक्कीच.

५.
एका मित्राचं लग्न ठरवणं सुरू होतं. त्याला वडील नाहीत. आई आहे फक्त आणि त्या काकू एकदम कूल वगैरे असतात तश्या आहेत. त्याने मुली बघण्यापूर्वीच सांगितलं होतं की "माझी आई सोबत राहणार. ती आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे, दिवसातले बारा तास तरी ती बाहेरच असते, पण रहाणार एकाच घरात." एक मुलगी आली होती याला बघायला. हा आवडण्यासारखा आहेच. तशी ती याच्या दिसण्यावर भाळली होती. मग मुलीचे आई वडील आणि मुलगी म्हणाले, "आम्हाला घरात कचरा आवडत नाही." याला वाटलं स्वच्छताप्रिय वगैरे दिसतायेत, चांगलंच आहे हे! पण हा समज तिसऱ्या सेकंदाला दूर झाला. मुलगी म्हणाली, "निरूपयोगी गोष्टी म्हणजे कचराच, म्हातारी माणसं पण निरूपयोगीच असतात, तुझी आई तसलीचे, ती बाई घरात नकोत आम्हाला. कचरा कचऱ्याच्या जागीच ठेवावा." त्यानं पुढे काय केलं हे सांगायची गरज नाही.

६.
एका मित्राचं लग्न ठरलं, लग्न झालं. हनिमूनला पॅरीस, स्विट्झर्लंड वगैरेला गेला. हनिमून वगैरे व्यवस्थित पार पडला आणि मुंबईहून परत येताना मुलगी तिच्या आधीच्या प्रियकरासोबत पळून गेली. नंतर यांना पोलिसांनी बराच त्रास दिला. मुलीच्या घरच्यांनी 'तुझ्यातच प्राॅब्लेम असणार' असंही म्हण्टलं याला. पण डायव्होर्स घेतेवेळी मुलगीनं कबूल केलं की युरोपला काय तिचा प्रियकर घेऊन जाऊ शकला नसता म्हणून हनिमून होईपर्यंत गप्प बसली ती आणि मग पळून गेली. मुलाचा यात काहीच दोष नाही वगैरे. या सगळ्यात त्याचं आर्थिक, मानसिक वगैरे नुकसान झालं ते वेगळंच आहे खरं.

~अवंती

(सोशल नेटवर्कींग अर्थात फेसबुकवर हे आधी पोस्ट केलेलं आहे.)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

मी किती माणसाबाहेर असते, याचा अंदाज आला. अद्भुत आणि चमत्कारिक आहे हे कांदेपोहे जग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

डायव्होर्स घेतेवेळी मुलगीनं कबूल केलं की युरोपला काय तिचा प्रियकर घेऊन जाऊ शकला नसता म्हणून हनिमून होईपर्यंत गप्प बसली ती आणि मग पळून गेली.

वॉव्.. ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्क्रांतीला अनुस‌रून‌च आहे म्ह‌णे हे व‌र्त‌न‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

किस्से डेंज‌र आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

किस्से लिहिण्याची शैली खुमासदार आहेच. पण एकंदर आपल्या नि आपल्यासारख्या परिस्थितीत असलेल्या इतरांच्या बद्दल समजुतीने आणि त्याचबरोबर प्रामाणिकपणे लिहिण्याबद्दल मी अभिनंदन करतो.

जगतानाच्या विसंगती गमतीजमती - आणि अर्थातच काही विषादयुक्त अनुभव - हे सर्व लिहिण्यात येणारच. पण स्वतःच्या आयुष्यातल्या गोष्टींकडेही त्रयस्थाच्या नजरेने पाहण्याकरता थोडी निराळी शक्ती लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

प्रामाणिकपणाबद्दल मलाही कौतुक वाटलं. पण समजुतदारपणा! कमॉन!! मुलीच्या जातीला काय करायचाय समजुतदारपणा! लोकांना जोखून नावं ठेवत केलेलं उद्दाम लेखनात ठासून विनोद भरता येतो. अवंती, हलकटपणा करून लिहून पाहा ना!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रत्यक्ष केलेले आणि बघितलेले हलकटपणेही लिहिणारे.
खेंगटी काढून मुलांना पळवून लावलंय तेही लिहिणारच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही अस्सेच आहोत

यू गो गर्ल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला बघायला एकदा मुलीकडचे लोक आले होते. आईने पोहे विकत आणले आणि ते मीच केले असं सांगितलं. तसा मला स्वयंपाक, शिवणटिपण, मोजे रफू करणं, रुखवताच मांडण्यीच्या वस्तू तयार करणं वगैरे सगळं येतं. कारण आईने मला शाळेत न घालता हेच शिकवत वाढवलं. पण ही मुलगी आगाऊच होती. किती शिकला आहेस विचारल्यावर मी 'तिसरीपर्यंत' असं पुरुषसुलभ लज्जेने सांगिचलं. त्यावर तिने तोंड वाकडं केलं. म्हणाली, 'मला नोकरी करणारा नवरा हवा' ते लग्न जुळलं नाही हे सांगायला नकोच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही सांगायचं ना, शिवण टिपण करून, फाॅल पिको करून, लोणची पापड विकून मी संसाराला हातभार लावेन, झालंच तर बटणांचे ससे, स्ट्राॅ पासून ताजमहाल, कापडी बाहुल्या, फीश वायरीचे पडदे करून त्याच्या ऑर्डरी घेईन वगैरे सांगायचं. चांगल्या घरी पडला असतात नाही काय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही अस्सेच आहोत

पण, गुर्जी, तुम्ही नौवारी घातलेली का सहावारी? अन पदर डोक्यावर घेतलेला का नाही? या गोष्टीही महत्त्वाच्या असतात म्हणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

पुरुषाच्या जातीला कशाला पाहिजे एवढं कापड! निळोबा, तुम्ही फार कपडे घालता म्हणून अजून एकटे असणार. हा आमचा जॉन त्याच्या स्वतःच्या नजरेतूनही पाहा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अहो, आमचे गुर्जी कल्चर्ड आहेत हो! म्हणून विचारलं. तुम्हाला अन तुमच्या टेक्सासला कल्चरच नाही त्यामुळे तुम्हाला ह्या भानगडी कळायच्या नाहीत हो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

तुमचा सुसंस्कृत गणपती पाहा; तो ही अर्धा उघडा असतो. पुरुषाच्या जातीनं अर्धनग्न राहणं हीच आपली परंपरा आणि संस्कृती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लग्न झालेले पुरष लोक उघडे वाघडे फिरतात. कारण एकदा लग्न झालं की काही फरक पडत नाही. (अस म्हणतात ब्वॉ!)

गणपतीच्या लग्नाच्या आधीच्या उघड्या सेल्फ्या वगैरे आहेत का दाखवा पाहू?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

तुम्ही लग्नापूर्वी गुर्जींनी सहा/नऊ वार नेसण्याबद्दल विचारलं होतंत! असं कसं हो गोलपोस्ट बदलता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ल‌ आणी न‌ म‌धे गोंध‌ळ‌ क‌रु नका!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मी चांगला अठरा वारी टेल असलेला कोट घातला होता. दोन नोकर ठेवले होते तो घोळ उचलून धरायला. त्यांच्याही टेला नऊ वारी असल्यामुळे त्यांच्या मागे प्रत्येकी एक. आमच्या घरचा थाट माहीत नाही तुम्हाला.... आणि मुलीला म्हणे नोकरी करणारा नवरा हवा होता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तरीच! तुमचंच बघून चोपडांच्या प्रियंकेनी तो तसला शेपूटवाला गाला गाऊन का काय घातलेला असणार. की ती मुलगी प्रियंकाच होती?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही अस्सेच आहोत

च्यायचा, वार्षिक उत्त्पन्न कपड्यावरच खर्च होणार असेल तर लग्न करायचं म्हणजे रॉयल फॅमिलीत असल्याशिवाय पर्याय नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

शादी डॉट कॉम जमान्यात काही बदल झालेत का नाहीत हे आजच्या तरूण पिढीकडून* ऐकायला आवडेल.

*(मार्केटमधील हो!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

शैली छान आहे. अगदी खरे किस्से वाटण्यासारखं लिहिलंय.
अजून लिहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Liberalism is a mental disorder

हो ना. आणि तुमचा खरा आयडी असल्या सारखं हँडल घेण्याचा प्रयत्नही स्तुत्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

थॅन्क्यु हां तुमालापण...ः)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Liberalism is a mental disorder

पण डायव्होर्स घेतेवेळी मुलगीनं कबूल केलं की युरोपला काय तिचा प्रियकर घेऊन जाऊ शकला नसता म्हणून हनिमून होईपर्यंत गप्प बसली ती आणि मग पळून गेली.

मान ग‌ये.

माझं यात एक नेहमीचं निरीक्षण आहे ज्याचं मला मनापासून हसू येतं. ते म्हणजे मुलींचे लोकेशन प्रिफरन्सेस. खास करून अनुरूप नावाच्या एका संस्थळावर. आधी असतं ते पुणे. मग मुंबई आणि मग मात्र अधेमधे कुठेही न थांबता डायरेक्ट यूएस , युके , जर्मनी आणि इतर युरोपीय देश यांची लिस्ट असते. पुणे-मुंबई सोडून कुठेही जाण्याची इच्छा नसणाऱ्या(याची कारण ठरलेली असतात- माझ्या करियरचं काय, आईवडील एकटे पडतील, मला बाकी ठिकाणची हवा सोसत नाही, भीती वाटते, कधी शहर सोडून गेले नाही त्यामुळे सवय नाही) मुलींना यूएस युके म्हटलं की मात्र उकळ्याच उकळ्या फुटतात. आधी राग यायचा आता हसू येतं. मला वाटतं अशा मुलींना लग्न हे करियर वाटत असावं

काही मुली विचित्र वागतात. अक्षरशः विचित्र. एक जण आईवडिलांनी "तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोला" असं म्हटल्यावर , एकटी बोलणार नाही भाऊ सोबत हवा असा हट्ट धरून बसली. शेवटी नाईलाजानं भावाला आमच्या शेजारी बसावं (बसवावं )लागलं.

एकीच्या वडिलांनी मला आधी तुम्ही बोलून घ्या म्हणून तिचा मोबाईल नंबर दिला. एकदा फोनवर बोलून मी तिला व्हाट्सअपवर मेसेज करायला सुरु केले. तर तिने सरळसरळ मला बोलायला वेळ नाही बिझी आहे नंतर बोलू म्हणून मला कटवलं. आणि नंतर चक्क मला व्हाट्सएपवर ब्लॉक केलं. इकडे तिचे वडील आम्हाला फोन करतायत की कधी भेटूया म्हणून आणि इकडे ही बया माझ्याशी बोलेना पण. शेवटी तिची पुणे सोडून जाण्याची इच्छा नाही हे समजलं. पण तोंड उघडून सांगण्याऐवजी ब्लॉक करायची काय गरज हे कळलं नाही.

अशाच एका सतत इग्नोर करणाऱ्या पोरीला सहन न होऊन मी प्रचंड झापलेलं.

एकीने मला मोदी आवडतात का विचारलेलं. मी नाही म्हणालो तर तिने डोळे विस्फारत "का नाही आवडत ?" असं पुन्हा विचारलं. आणि ते कसे चांगले आहेत याची सविस्तर माहिती दिली जी मला पटली नाही. तरीही मी "जाऊदे राजकीय विचार आणि नाती या दोन वेगळ्या गोष्टी आहेत" असा डायलॉग मारून विषय बदलला . पण घरी गेल्यावर "मुलगा निगेटिव्ह विचारांचा आहे" असा निकाल दिलाच तिने. वरून "मी घरी पोचलो" हे व्हाट्सअपवर सांगूनही "कॉल का नाही केला" अशी तक्रार केली. आणि बऱ्याच जजमेंटल टिपण्या केल्या (हे तिच्या आईनेच आमच्या घरच्यांना फोन करून सांगितले .वरून, "तरीही ती लग्नाला तयार आहे" असं म्हणून उदारता दाखवली ). अर्थात मी होय म्हणायचा तो सव्वाल ही पैदा नही होता.

एकजण भेटली .आवडली . तिला पण आवडलेलो मी असं तिच्या घरच्यांनी सांगितलं. एकदोनदा फोनवर बोललो. आणि अचानक तिने फोन करून "सॉरी , मी पुणे सोडू नाही शकत आणि मला मुंबई सुरक्षित नाही वाटत त्याचप्रमाणे माझ्या गावापासून(ती मूळची पुण्याची नव्हतीच , तिथे नोकरीला होती ) मुंबई खूप लांब आहे ते मला कन्विनिएंट पडणार नाही. " असं सांगितलं.

सध्या इथेच थांबतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजकारण्यांमुळे बनबनायी बात बिगडते. एकजण होता त्याच्याशी बोलताना संघी मोभक्त इ. पकाऊ असतात असं वगैरे बोलणं झालं होतं त्याने नंतर वाट्टेल ते बोलायला सुरुवात केली मग "तुम्ही आता निघायचं बघा" म्हणावं लागलंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही अस्सेच आहोत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही अस्सेच आहोत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही अस्सेच आहोत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही अस्सेच आहोत

कितीवेळा ते क‌स्सेच‌ आहोत‌ ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ऐसी गंडलंय, मला प्रतिसाद डकवताना त्रुटी आलं आणि प्रतिसाद दिसलाच नाही, आणि नुसतंच टायटल दिसतंय आता. ऐसी गंडलंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही अस्सेच आहोत

browser गंडला असेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न‌शीब ऐसी स्व‌त्: म्ह‌ण‌लं नाही "आम्ही अस्सेच आहोत्"
.
त‌संही ते म्ह‌णाय‌ची ग‌र‌ज न‌स‌तेच म्ह‌णा. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ट्ठो ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कळतात हो असली बोलणी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किस्से आव‌ड‌ले.

मुलींना यूएस युके म्हटलं की मात्र उकळ्याच उकळ्या फुटतात. आधी राग यायचा आता हसू येतं. मला वाटतं अशा मुलींना लग्न हे करियर वाटत असावं

गैर काही वाट‌त‌ नाही म‌ला. अशा मुलिंनी म‌ग‌ ज‌र‌ त‌सा मुल‌गा भेट‌ला नाही त‌र अविवाहीत र‌हाव‌ं किंवा पुढे फ‌क्त‌ ढ‌क‌लाढक‌ल‌ त‌ड‌जोड क‌रुन इत‌र‌ कोणाला त्रास देऊ न‌ये.
बाकी मुल‌गा म‌न‌मिळाऊ ह‌वा, निर्व्य‌स‌नी ह‌वा व‌गैरे अपेक्षांत आणि या अपेक्षेत क्वालिटेटिव्ह फ‌र‌क वाट‌त‌ नाहीये म‌ला. अस‌ल्यास क‌सा तो प‌ट‌वुन द्याल‌ का अष्ह्टेक‌र‌?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी मुल‌गा म‌न‌मिळाऊ ह‌वा, निर्व्य‌स‌नी ह‌वा व‌गैरे अपेक्षांत आणि या अपेक्षेत क्वालिटेटिव्ह फ‌र‌क वाट‌त‌ नाहीये म‌ला.

निर्व्यसनी वगैरे डिफॉल्ट अपेक्षा आहेत. अमेरिका/इंग्लंड वगैरे अपेक्षा "लालसा" या सदराखाली येतात. (अर्थात इथे असे अझ्युम केले आहे की मुलगी स्वतः परदेशात ऑलरेडी नाही / किंवा तिचे ऑलरेडी स्वतःच्या दमावर परदेशात जाण्याचे प्लॅन्स नाहीत.
) अशा अपेक्षा एक्सप्लिसिटली तरी बोलून दाखवू नयेत असे मला वाटते. कारण यातूनच लग्न करियर/व्यवसाय वगैरे आहे असे लोकांना वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुली जशी कर्तबगार, पैसेवाल्या मुलाची अपेक्षा धरतात, तशा मुलांच्या अजिबातच काही भौतिक अपेक्षा नसण्याचं मला जामच कौतुक वाटतं. पैसे वगैरे सोडाच, मुलींचा चेहरा, आकार-उकारही न बघता सरळ मुलगी आवडून घेतात.

असं लग्नाळू मुलांसारखं संतपद मला अजूनही गाठता येत नाही. चारचौघांत, गंमतीनं "लौयू" म्हणण्याआधी मी चिकित्सा करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

असे किस्से दोन्हीकडे असायचेच.

मी काही पोरी बिरी पहात नव्हतो, पण कोणीतरी आत्याबित्याने आगाऊपणा करून एका पोरीच्या आईला माझा फोन नं दिला. मला इकडे काहीही कल्पना नसताना एक दिवशी फोन. मुलगी अमेरिकेत असते, आई सद्ध्या तिकडे आलेली होती वगैरे. आमची मुलगी एम एस झाली आहे आणि आता नोकरी करताना एमबीए आणि पीहेचडी दोन्ही करणार आहे वगैरे माहिती मला दिल्यावर मी नम्रपणे मी काही तिच्यासाठी क्वालिफाईड नाही म्हणून सांगून फोन ठेवला. ( नंतर मीच फोनवर आगाऊपणा केला असे आमच्या आत्याला वगैरे सागण्यात आले, कमाल आहे च्यायला.) असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मी नम्रपणे मी काही तिच्यासाठी क्वालिफाईड नाही म्हणून सांगून फोन ठेवला.

ROFL ROFL हाहाहा म‌ग‌ हा चाव‌ट‌प‌णाच आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मी नम्रपणे मी काही तिच्यासाठी क्वालिफाईड नाही म्हणून सांगून फोन ठेवला.


म‌स्त‌.

( नंतर मीच फोनवर आगाऊपणा केला असे आमच्या आत्याला वगैरे सागण्यात आले, कमाल आहे च्यायला.) असो.


Are you surprised? ख‌ऱ्याची दुनिया नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुलींचे लोकेशन प्रिफरन्सेस. खास करून अनुरूप नावाच्या एका संस्थळावर. आधी असतं ते पुणे. मग मुंबई आणि मग मात्र अधेमधे कुठेही न थांबता डायरेक्ट यूएस , युके , जर्मनी आणि इतर युरोपीय देश यांची लिस्ट असते.

अगदी अगदी! मी काय म्हणतो - या सगळ्या लोकेशन्सच्या आवडीनिवडी लिहायची गरजच काय? कोणाकडूनपण इंटरेस्ट आल्यावर केस-बाय-केस बेसिस वर ठरवायचे की पुढे जायचे की नाही. आधीच आपले पत्ते उघड करून कशाला दाखवायचे? बरं अशा मुलीचे याच शहरातलय मुलांशी लग्न होईल असे पण नाही.

(बाय द वे - बऱ्याच मुलींची प्रोफाईल्स आई-बाबाच भरतात.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो असं नसतं. वधुवरसूचकमंडळवाल्या मावशीकाकू हा फ्याक्टर विसरू नका. ववसुमंची यशस्विता इन्व्हेंटरी टर्नओव्हरवरून ठरवतात. ("अहो, आमच्या यझ विवाहजुळवणीसंस्थेत नाव नोंदवा, चार महिन्यांत लग्न! मी सांगते काय करायचं ते!")

मग एक बलाढ्य फॉर्म भरवून घेतात. त्यात अपेक्षा वगैरे साधे कॉलम तर असतातच, पण प्रसंगी 'मोबाईलचा ब्रँड कुठला आहे' वगैरे वरकरणी-निरुपद्रवी-आतून-खोचक असे प्रश्नही असतात. मग तो ड्राफ्ट बघून ववसुमंमाका म्हणतात, "अगं, प्रोफाईलमध्ये अमेरिका यूके इ० लिही. हल्ली सगळं सर्चवर असतं. तुझी प्रोफाईल कशी उठून दिसली पाहिजे!"

हे असं अनेक बाबतींत होतं. प्रस्तुत मुला/मुलीचा 'स्वतःला विक्रीची वस्तू करणार नाही' हा बाणा असलाच तरी 'Am I losing a bargain here?' हा तुळशीबागी विचार हावी होतो, आणि असे प्रोफाईल जन्माला येतात.

(अरेंग मॅरेग हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर खेळला जाणारा prisoner's dilemma चा खेळ आहे. त्यात अशा - इंक्लुडिंग धागोल्लेखित - गमती होणार!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मुलांचेही प्रोफाईल्स आईबाप नाहीतर अजून कोणी हितचितंक(!) भरतात. त्या अनुरुपवर 'इन्ट्रेस्ट शो' करणे प्रकार असतो. एकदा एका मुलाचा इन्ट्रेस्ट आला, फोन केला त्या दिलेल्या नंबरवर तर तो फोन नं. होता त्याचा स्वतःचा (तसंच असणं अपेक्षित असतं) मुलगा म्हणाला "हो का? काही कल्पना नाही आईनं शो केला असणार इन्ट्रेस्ट, किंवा मग वहिनीनं केला असेल. मला काही यातलं माहीत नाही हो." आमच्याइकडं हसावं की काय करावं असल्यांना तेच कळेना.
ताईसाठी आलेल्या एका मुलाची आई म्हणाली होती," परस्पर काहीतरी करतो आणि आम्हाला सांगत नाही, आम्हाला काही किंमत आहे की नाही? मग हे असे फोन आले की आम्ही सरळच सांगतो यंदा आमच्याकडं कर्तव्य नाही, परस्पर मुलिंना संपर्क साधतो म्हणजे काय?" हे ऐकून मी बेकार हसले होते आणि त्या मुलाची भयंकरच दया आली होती मला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही अस्सेच आहोत

" परस्पर काहीतरी करतो आणि आम्हाला सांगत नाही, आम्हाला काही किंमत आहे की नाही? मग हे असे फोन आले की आम्ही सरळच सांगतो यंदा आमच्याकडं कर्तव्य नाही, परस्पर मुलिंना संपर्क साधतो म्हणजे काय?"

लोल‌च‌ लोल‌

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुलींचे लोकेशन प्रिफरन्सेस.

इत‌क‌च क‌शाला? मुंबईत वेस्ट‌र्न रेल्वे साईड‌च्या मुलींना सेन्ट्र‌ल रेल्वे साईड‌चा मुल‌गा न‌को अस‌तो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेंट्र‌ल‌ला मेन‌ली काम‌गार‌ लोक‌ राह‌तात‌ असा स‌म‌ज‌ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

शेंट्र‌ल‌ला केव‌ळ काम‌गार‌ र‌हातात‌, अशी भाब‌डी स‌म‌जूत‌ न‌स‌ते, ल‌ग्नाळु मुलीची. प‌ण, शेंट्र‌ल‌व‌र‌ प्र‌वास‌ क‌र‌ताना जास्त हाल‌ होतात, त‌सेच‌, ठाण्याच्या पुढे र‌हाय‌चे न‌शिबी आले, त‌र रेल्वेला प‌र्यायी ब‌स वा टॅक्सीची सोय न‌स‌ते, हेही विचारांत घेत‌ले जाते. शिवाय‌, ठाण्यापासून ती एम‌एशइबी मान‌गुटीव‌र‌ ब‌स‌ते, हा ही एक पाईंट अस‌तो.
एम‌एश‌ईबी = मंडे टू सॅट‌र‌डे ईलेक्ट्रिसिटी बंद‌ !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>ठाण्यापासून ती एम‌एशइबी मान‌गुटीव‌र‌ ब‌स‌ते, हा ही एक पाईंट अस‌तो.

ती त‌र‌ मिरा-भाय‌ंद‌र‌लाही अस‌ते. प‌ण‌ तिक‌डे मुली जातात‌ प‌ण‌ (एमेसीबी न‌स‌लेल्या) विक्रोळीला जात‌ नाहीत‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ऐसीवर ह्याशटॅग चालवायचाय काय या वाक्याने

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बय्राच मुलांना आयांनी हॅर्लिक्स देऊन वाढवलेलं असतं आणि लग्नाअगोदर कांदेपोह्यावर चढवतात तेव्हा असे किस्से घडतात.
या कार्यक्रमाला जाताना मुलींनी रिकाम्या हाताने जाऊ नये. काही उपयुक्त भेटवस्तू न्याव्यात. पट्टेवाली प्यांटसाठी पट्टे, हॅार्लिक्स पिण्यासाठी मग, डिंगडांग बेल,मम्माज बॅाइ लिहिलेला टी शर्ट वगैरे.
बाकी हे मुलगे बिनलग्नाचे राहिलेले दिसत नाहीत.
nothing is unfit,only misfit in the world.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुलांना हॉर्लिक्स त‌र मुलींना "आयॅम द प्रिन्सेस‌, बिच‌!" चे बाळ‌क‌डू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बाळ‌क‌डू व‌गैरे न‌स‌त‌ं.
इत‌र‌ पुरुषांनी च‌ढ‌वुन ठेव‌लेल‌ं अस‌त‌ं. फेस‌बुक‌व‌र यांनि नुस‌त‌ं ह‌म्म्ह्म्म केल‌ं त‌री, प्र‌तिसादांचा /लाइक्स चा पाऊस पाडुन्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इत‌र कुठ‌ल्याही गोष्टीप्र‌माणे याची सुरुवात‌ही घ‌रात‌नंच‌ होते. विशेष‌त: बाप लोक्स स‌र्व‌ ऐक‌तात‌ त्यामुळे असे होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आम्हाला त‌र व‌डिलांनीही फ‌ट‌के दिले आणि आईनीही मुले प‌हाण्याच्या काळात सुच‌विले - स्व‌त:चा चेह‌रा आधी आर‌शात प‌हाय‌चा.
म‌ग‌ इन्व्हिझिब‌ल क्राऊन डोक्याव‌र येणार क‌सा?
जो तो ज‌मिनीव‌र‌ पाय‌ घ‌ट्ट नाहीत‌, त‌र ज‌मिनीत‌च गाडाय‌च्या प्र‌य‌त्नात्.
______
आईचा मुलीव‌र‌ फार प्र‌भाव‌ अस‌तो हे ख‌रे आहे. व‌डिलांचा क‌मी अस‌तो. एनीवे सांगाय‌चा मुद्दा हा की ज्या मुली आत्म‌विश्वासी थोड्या च‌ढ‌व‌लेल्याच अस‌तात त्यांचा हेवा वाट‌तो.
______
ग‌रीब‌ आहे म्ह‌णुन कौतुक‌. च्याय‌ला त्यापेxआ २ थोबाडित का नाही लाव‌त्? ग‌रीब‌ अस‌ण‌ं हा काय स‌द्गुण झाला? इत‌रांना सोईस्क‌र‌ प‌ण त्या व्य‌क्तीला शाप अस‌तो तो. जाने दो! बेट‌र ल‌क नेक्स्ट ....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"आम्हाला घरात कचरा आवडत नाही" असं म्ह‌ण‌णारे ख‌र‌ंच‌ आहेत‌? की लिहाय‌च‌ं म्ह‌णून‌ लिह‌ल‌ंय‌?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

क‌दाचित अग‌दी त्या श‌ब्दात न‌सेल सांगीत‌ल‌ं प‌ण वृत्तीतून दिस‌ल‌ं असेल्.
कार‌ण कोणी इत‌क‌ं टोकाच‌ं स्प‌ष्ट बोलेल असे वाट‌त‌ नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असंच बोललं गेलं. हा किस्सा मित्रानं सांगितलेला आहे. मी स्वतः पाहीलेला एक या सारखाच किस्सा आहे, दादाला एक मुलगी बघायला आली होती ती म्हणाली होती ,'तुझे आईवडील मला असे फोटोतच आवडतील प्रत्यक्षात नव्हे' इथं फोटो म्हणजे भिंतीवर लावलेला कै. वाला फोटो हे म्हणणं होतं वारलेल्या आज्जी आजोबांच्या फोटोकडं बोट करून म्हणाली होती ती.
बाकी काहीही असलं तरी या सगळ्यातला काॅन्फिडन्स जबरी आवडण्यासारखाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही अस्सेच आहोत

'तुझे आईवडील मला असे फोटोतच आवडतील प्रत्यक्षात नव्हे' इथं फोटो म्हणजे भिंतीवर लावलेला कै. वाला फोटो हे म्हणणं होतं

माजुर्डेप‌णा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हॉर्लिक्सच्या मुलीची आणि क‌च‌ऱ्याची क‌हाणी ख‌री वाट‌त नाहीत्.
ड‌स्ट‌बीन व‌गैरे क‌था मुक्त‌पिठ व‌गैरे आलेल्या आहेत्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाॅर्लिक्स किस्सा माझ्या स्वतःच्या बाबतीत घडलाय हो, अजूनही त्या घरात गेलात तर असलंच काहीतरी ऐकायला मिळेल हे पैजेवर सांगू शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही अस्सेच आहोत

हाॅर्लिक्स किस्सा माझ्या स्वतःच्या बाबतीत घडलाय हो

म‌ग ध‌न्य‌ आहेत ती लोक्... अश्या मुलांना ल‌ग्न क‌राय‌ला उभे का क‌र‌तात लोक्?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाॅर्लिक्सचा किस्सा ख‌रा मान‌ला त‌री त्यात वाईट काय आहे? मुलाने हाॅर्लिक्स पिऊ न‌ये काय? आणि स‌म‌जा तो पितो आणि अग‌दी लाज‌त लाज‌त बोल‌ला त‌री ते पुरेसे कार‌ण आहे का त्य‌ला न‌कार द्याय‌ला? असो, प‌संद अप‌नी अप‌नी, ख‌याल अप‌ना अप‌ना.
बादवे, इत‌के नाकाने कांदे सोलून झाले त‌र शेवटी ल‌ग्न झाले का तुम‌चे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाॅर्लिक्सचा किस्सा ख‌रा मान‌ला त‌री त्यात वाईट काय आहे? मुलाने हाॅर्लिक्स पिऊ न‌ये काय?

हॉर्लिक्स पिण्यात per se काही गैर नसेलही, परंतु त्यामागचे कारण जे तो (लाजतलाजत) सांगतोय, ते वाचलेत काय?

आणि तसेही,

आणि स‌म‌जा तो पितो आणि अग‌दी लाज‌त लाज‌त बोल‌ला त‌री ते पुरेसे कार‌ण आहे का त्य‌ला न‌कार द्याय‌ला?

नकाराकरिता काय वाट्टेल ते कारण पुरेसे ठरावे. किंबहुना कारणाचीही आवश्यकता नसावी. हा एंटायटलमेंटचा प्रश्न नाही, नि अफर्मेटिव अॅक्शनचा तर नाहीच नाही. कोणत्याही कारणासाठी किंवा कारणाविना नकाराचा अधिकार उभयपक्षी खचितच आहे.

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे किस्से भ‌न्नाट आहेत. म‌ला त्यात जाण‌व‌णारा एक स‌मान धागा म्ह‌ण‌जे आधुनिकतेक‌ड‌चा भार‌ताचा प्र‌वास हा किती गोंध‌ळाचा आहे हे दिस‌त‌ं.

नेमाड्यांच्या चांग‌देव‌ च‌तुष्ट्यात मुलीला पाहाय‌ला जाण्याचा एक ह‌ताश क‌र‌णारा किस्सा आहे. वाच‌ला न‌सेल त‌र ज‌रूर वाचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अगदी हेच आठवलं. बाकी अदितीसारखंच आपण किती माणसांबाहेर जगतो ते जाणवून अत्यंत आनंद वाटला हेही खरंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

தநுஷ்

>>अदितीसारखंच आपण किती माणसांबाहेर जगतो ते जाणवून अत्यंत आनंद वाटला हेही खरंच.<<

माझ्याही म‌नात अग‌दी हेच आलं होतं.
- आताप‌र्य‌ंत‌च्या आयुष्यात मुल‌गी किंवा मुल‌गा 'ब‌घण्याचा' कार्य‌क्र‌म एक‌दाही न‌ केलेला जंतू

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

"बिन बघणार्यांचा "धागा चालू करावा संपादक महोदय . ( धागा रोचक होणार याबाबतीत संदेह नाही . म्हणजे बिन बघून वाले दोन चार पण प्रतिसाद शंभरी पार )
ता . क . सुरुवात श्री शरद करू शकतील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी माणसाबाहेर जगते, त्यातही आता भारताबाहेर असते.

सध्या एक नवीन मैत्रीण(!) मिळाली आहे. आमच्या कोर्सची ती टीचिंग असिस्टंट आहे. मैत्रीण असा तिचा उल्लेख करण्याइतपत अजून जवळीक नाही; पण 'पुरुषप्रधान' किंवा पुरुषांची बहुसंख्या असलेल्या जगात वावरणाऱ्या आम्ही दुर्मीळ स्त्रिया आहोत. दोघीही फटकळ छापाच्या आगाऊ बायका! त्यामुळे आमचं पहिल्या दिवसापासूनच चांगलं जमतंय.

ही अॅनी अमेरिकी, गोरी, तरीही माझ्यापेक्षा बुटकी आणि बारीक; आणि जगाचे गमतीशीर अनुभव असणारी आहे. एके काळी कोळशाच्या खाणीत इंजिनियर म्हणून काम करायची; रोज राख, कोळशानं माखून घरी जायची. आता डेटा-सायन्स शिकवते. तिच्याबद्दल (तिला सांगूनच) लिहावं इतपत निराळं आयुष्य जगणारी आणि विचार असणारी, ती वाटते. आम्ही पहिल्यांदा चकाट्या पिटल्या तेव्हा एक पार्टी सुरू होती. एकमेकींशी किंचाळत बोलायला लागत होतं. त्या गोंधळात टिपेचा आवाज लावून ती मला सांगत होती, "मला योग्य असा पुरुषच सापडत नाही. माझ्या बोलण्याची तऱ्हा ही अशी*! त्यातून माझ्या अंगात चिकार रग आहे. माझ्याकडे चिकार ऊर्जा आहे, लैंगिकही. ते झेपणारा आणि माझ्याशी बौद्धीक पातळीवर कनेक्ट होणारा पुरुष मला सापडतच नाही."

स्वतःची इतपत ओळख असलेली आणि त्याबद्दल अजिबात अपोलेजेटिक नसलेली अॅनी मला पहिल्या संवादापासूनच आवडली. आज आमची लंच डेट आहे. तेव्हा स्टे ट्यून्ड.

अशा जगात, अशा माणसांबरोबर वावरत असताना अवंतीला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भेटलेली माणसं बघून मला माणसाबाहेर असण्याची जाणीव तीव्रतेनं झाली.

*तिचं बोलणं ऐकायची सवय करावी लागते; हिंग किंवा कॉफीसारखी अक्वायर्ड टेस्ट आहे. त्याचं वर्णन करायला शब्द शोधावे लागतील किंवा तयार करावे लागतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्यातून माझ्या अंगात चिकार रग आहे. माझ्याकडे चिकार ऊर्जा आहे, लैंगिकही. ते झेपणारा आणि माझ्याशी बौद्धीक पातळीवर कनेक्ट होणारा पुरुष मला सापडतच नाही."

बाप‌ रे!! म‌न‌ं जुळ‌ल्याशिवाय क‌से हे लोक श‌रीराने एक‌रुप‌ हो ऊ श‌क‌तात्? झेपाझेपी फ‌क्त श‌रीरांची न‌सून म‌नांची अस‌ते.
____
अरे नाही नाही. ती म्हणालीये की बौद्धिक‌ पात‌ळिव‌र‌ Smile शी इज क‌रेक्ट!! माय‌ बॅड्.
Intelligence is so so very sexy & it will always be in vogue (fashion). Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्या गरज फक्त शारीरिक असताना हे लोक मनाबिनाची भानगड मध्ये कशाला आणतात! शिवाय, उद्या मन बदलणार; मग काय आयुष्यभर वाट बघत बसणार का!

किंबहुना, ती असा विचार करते आणि जाहीररीत्या बोलून दाखवते, म्हणूनच ती मला वेगळी आणि मैत्री करण्यालायक वाटते. एरवी यॉनटाक्यूलर लोक चिकार असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ओके ग‌र‌ज‌ फ‌क्त शारीरीक‌ अस‌ते. नाइस्. श‌क्य आहे. काही लोकांबाब‌त तेही श‌क्य‌ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भोचकपणा ऑन

"लंच डेट कसंकाय पार पडलं? "

भोचकपणा ऑफ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही अस्सेच आहोत

हॉट डॉग खाल्ला नसणार हे खात्रीने सांगू शकतो.

(प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी डी नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

तुम्हां दोन नतद्रष्टांची नजर लागली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

थोड्याफार मिळालेल्या माहितीच्या आधारे कांदापोहे (= / कॅाफी पिझ्झा ) कार्यक्रम करावा लागतो प्रेमविवाह नसल्यास. एक विनोदी एपिसोड आपल्याला धरून घडणार आहे हे धरूनच जायचं असतं. अंदाजे शंभरात एक प्रेमविवाह,एक अविवावाहित धरल्यास उरलेल्या ९८पैकी नव्वद कांदेपोहे कार्यक्रम व्यवस्थित होत असावेत. फक्त पसंत न पडल्याने विवाह होत नसावेत. चारचार टक्के मासलेवाइक/चीड आणणारे धरायला हरकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किती दिव‌सांनी "मास‌लेवाईक्" श‌ब्द‌ ऐक‌ला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झकास‌. हे प्र‌कार‌ ख‌त‌र‌नाक‌ आहेत‌.. साग्र‌स‌ंगीत‌ कांदेपोहे प्र‌कार‌ क‌धी अनुभ‌व‌ले नाहीत. आता वाट‌त‌ंय उल‌टी सुल‌टी उत्त‌र‌ं द्याय‌ला ह्यापेक्षा चांग‌ला प्र‌स‌ंग‌ साप‌ड‌णार‌ नाही.
====
अवांत‌र‌ - एकूण‌ ल‌ग्न‌ हा विष‌य‌ म‌राठी लोकांम‌धे एक‌द‌म हिट‌ आहे Smile
इत‌क‌या मालिका, चित्र‌प‌ट‌, नाट‌क‌ं स‌ग‌ळ्यात‌ ल‌ग्न‌ विष‌य‌क‌ काही ना काही अस‌त‌ंच‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवांत‌र‌ - एकूण‌ ल‌ग्न‌ हा विष‌य‌ म‌राठी लोकांम‌धे एक‌द‌म हिट‌ आहे Smile

जगात सगळीकडेच असावा. हॉलिवूडपासून गल्ली थेटरांपर्यंत हा विषय हाताळला जातोच. अर्थात इतके लोक लग्न करत असल्याने सगळ्यांचा इंटरेस्ट असणारच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

ते ख‌र‌ं हो,
प‌ण‌ - म‌राठी मालिका घ्या - ल‌ग्न‌ हा घाऊक‌ विष‌य‌. एका ल‌ग्नाची एन्'थ‌ गोष्ट, शिवाय‌ डेलीसोप्स‌म‌धेही चालूच‌.
चित्र‌प‌टात‌ गेली काही व‌र्ष‌ म‌ंग‌लाष्ट‌क‌ं व‌न्स‌मोअर‌, कॉफी आणि स‌टर‌फ‌ट‌र‌, मु.पु,मु२, अस‌ले प्र‌कार‌ फ‌क्त‌ ल‌ग्न‌ विक‌तायेत‌.

आज‌काल‌ पौग‌ंडाव‌स्थेत‌ल्या (क‌स‌ला घ‌टिया श‌ब्द‌ आहे हा.) पोरापोरींची प्रेम‌ं जास्त‌ विक‌ली जातायेत‌ म्ह‌णा, सो दिव‌स‌ ब‌द‌ल‌त‌ असावेत‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जगात सगळीकडेच असावा. हॉलिवूडपासून गल्ली थेटरांपर्यंत हा विषय हाताळला जातोच. अर्थात इतके लोक लग्न करत असल्याने सगळ्यांचा इंटरेस्ट असणारच.

हे लॉजिक (बोले तो हा कार्यकारणभाव) काही पटले नाही ब्वॉ. कारण मग तसेच बघितले तर जगात लग्न करणाऱ्या माणसांपेक्षा हगणाऱ्या लोकांचे प्रमाण निश्चितच अधिक असावे. (बोले तो, लग्न न करणारे लोक असतात, अधूनमधून दिसतातसुद्धा. पण जगात न हगणारा एक जरी माणूस कोणी कधी पाहिला असेल, तर त्याने तो आपल्याला दाखवावा - आपले च्यालेंज आहे! याचाच अर्थ, हगणारे लोक हा लग्न करणाऱ्या लोकांचा सुपरसेट आहे; अर्थात, ल.क.मां.पेक्षा ह.लों.चे प्र. अधिक आहे. क्यू. ई.डी.) पण मग व्हेऽऽऽअर इज़ द इंटरेष्ट??? कधी हॉलीवूडपासून ते गल्ली थेटरांपर्यंत हगणे हा विषय हाताळण्यासाठी अहमहमिका लागलेली पाहिली आहेत? का नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला हगण्यात इंटरेस्ट आहे? बहुतेक लोक हगणे ही एक शारीरिक क्रिया आहे या पद्धतीने हगतात. आवडीणे पाणी पिणारे लोक जसे विरळाच असतील तसे आवडीने हगणारे पण विरळाच असतील. मला तरी हगण्यात (स्वत:च्या वा इतरांच्या) विशेष इंटरेस्ट नाही. तुम्हाला असल्यास तुम्हीच संशोधन करून तुमच्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. या कार्याकरता शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

माझ्या अनुभ‌वाबाहेरील‌ आणि म‌जेदार‌ विषय‌.

अर्थात‌ मांस‌बाजारात‌ (meat market म‌ध्ये) वेड‌ग‌ळ‌ किंवा अप‌मानास्प‌द‌ प्र‌स‌ंग‌ अतिसामान्य‌ अस‌तात‌. प‌ण‌ रोज‌ म‌रे त्याला कोण‌ र‌डे? म्ह‌णून‌ अनुभ‌वांचे त‌प‌शील‌ पुरेसे र‌ंज‌क‌ आणि विक्षिप्त राहात‌ नाहीत‌ Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकेश‌न‌ प्रेफ‌र‌न्स‌ अस‌ण‌ऱ्या मुलींविषयी एक‌ कुतुह‌ल‌ आहे.
आज‌ मुलाला सम‌जा मुंब‌ईत‌ एका कार‌खान्यात‌ नोक‌री आहे. आणि मुलीलाही मुंब‌ईत‌च एका कार‌खान्यात‌ नोक‌री आहे. ल‌ग्न‌ झाल्याव‌र‌ मुलीचे क‌रिअर‌ व्य‌व‌स्थित‌ चालू राह‌णार आहे. म्ह‌णून‌ त्या मुलीने (इत‌र‌ स‌र्व‌ बाबी जुळ‌तात‌ म्ह‌णून‌) त्या मुलाशी ल‌ग्न‌ केले आहे. प‌र‌ंतु हे असेच‌ राह‌णार‌ आहे हा कॉन्फिड‌न्स‌ त्या मुलीला कोण‌त्या जोराव‌र‌ वाट‌तो आहे?

१. ल‌ग्नान‌ंत‌र‌ तीन‌ चार‌ व‌र्षांनी त्या मुलाच्या क‌ंप‌नीने मुंब‌ईत‌ला कार‌खाना ब‌ंद‌ क‌रून‌ वापी किंवा उत्त‌राख‌ंडात‌ कार‌खाना उघ‌ड‌ला आणि मुलाला तिक‌डे ट्रान्स‌फ‌र‌ केले त‌र‌ ही मुल‌गी घ‌ट‌स्फोट‌ देणार‌ का? की मुलगा एक‌टाच‌ उत्त‌राख‌ंडास‌ जाऊन‌ राह‌णार‌? (मुंब‌ईत‌लाच‌* मुल‌गा ह‌वा अशी अपेक्षा अस‌णाऱ्या मुलीने हा विचार‌ क‌राय‌ला ह‌वा की न‌को?)

२. मुलाचा कार‌खाना सुखेनैव‌ मुंब‌ईत‌च‌ चालू आहे. प‌र‌ंतु मुल‌गी ज्या कार‌खान्यात‌ काम‌ क‌र‌ते तो कार‌खाना ब‌ंद‌ होऊन‌ वापीला/उत्त‌राख‌ंडात‌ गेला त‌र‌ मुल‌गी एक‌टीच व‌गैरे.........

३. मुलीचा कार‌खानाच‌ नाही त‌र‌ तिची क‌ंप‌नीच‌ ब‌ंद‌ प‌ड‌ली आणि तिची नोक‌रीच‌ गेली त‌र‌ मुलाने तिला घ‌ट‌स्फोट‌ द्यावा का?

*मुंब‌ई ऐव‌जी पुणे घ्या; टेल्को भोस‌री ->> साण‌ंद‌ असे उदाह‌र‌ण‌ घ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

प‌र‌ंतु हे असेच‌ राह‌णार‌ आहे हा कॉन्फिड‌न्स‌ त्या मुलीला कोण‌त्या जोराव‌र‌ वाट‌तो आहे?

तुम्हाला ऐसी चा स‌र्व्ह‌र उद्या चालु आहे ह्याचा कॉन्फिड‌न्स‌ कोण‌त्या जोराव‌र वाट‌तो? त‌सा वाट‌त न‌सेल त‌र आज प्र‌तिसाद का टाक‌ता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसीव‌र‌ प्र‌तिसाद‌ टाक‌णे हा आयुष्यात‌ला म‌ह‌त्त्वाचा निर्ण‌य‌ न‌स‌तो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

>>प‌र‌ंतु हे असेच‌ राह‌णार‌ आहे हा कॉन्फिड‌न्स‌ त्या मुलीला कोण‌त्या जोराव‌र‌ वाट‌तो आहे?<<

आज‌काल हा कॉन्फिड‌न्स‌ अजिबात‌ न‌स‌तो. मुंब‌ई-पुण्याला प्राधान्य‌क्र‌म‌ मिळ‌ण्यामागे हाच‌ विचार‌ अस‌तो की स‌म‌जा एक नोक‌री गेली त‌र तिथेच‌ दुस‌री मिळ‌ण्याची श‌क्य‌ता अधिक‌ अस‌ते. बाकी, आपाप‌ल्या क‌रिअर‌ / आयुष्यात‌ल्या प्राधान्य‌क्र‌मांमुळे दोघांत भौगोलिक‌ अंत‌र‌ प‌ड‌लं म्ह‌णून घ‌ट‌स्फोट‌ घेत‌ला अशी एकाहून अधिक उदाह‌र‌णं माहीत आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

"फक्त मराठी लोकांत --- "

का? सगळ्यांत आहे तह्रेवाइकपणा.
एक रशियन गोष्टही आठवते आहे. ( बहुतेक xxवस्कि असणार.) फार चांगली होती. शेती करणाय्रांत मुलगी /सून ही कामाला गडी म्हणूनच बघतात. चीनमधली 'गुड अर्थ ' कादंबरी.

ववसुमंमाकाकू बद्दल खरं आहे. अनुभवाचे बोल असतात त्यांचे. ( दुसरे एक अनुभवी म्हणजे वृद्धाश्रमांच्या संचालिका )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किस्से भारीच‌ आहेत‌. ती युरोप‌ची टूर‌ क‌रुन‌ घेण्याची आय‌डिया आव‌ड‌ली. स‌र्व‌ प्र‌तिसाद‌ही आव‌ड‌ले. मी ऐक‌लेल्या संवादांची भ‌र‌ घाल‌तो.
मुल‌गी: काय‌ वाच‌ता ?
मुल‌गा: जेम्स हॅड‌ली चेस‌!
मुल‌गी: ई ssssss ई! (अंगाव‌र‌ झुर‌ळ‌ च‌ढ‌ल्याव‌र‌ ज्या आकांताने ओर‌ड‌तात‌ , त्या आवाजात‌)

मुल‌गी: ल‌ग्नानंत‌र‌ अमेरिकेला न‌क्की जाणार‌ का ?
मुल‌गा: जाईन‌ही. प‌ण न‌क्की सांग‌ता येणार‌ नाही.
मुल‌गी: न‌क्की असेल‌ त‌र‌च‌. नाहीत‌र‌ राहू दे.

मुल‌गा: स्व‌यंपाक क‌र‌ता येतो का ?
मुल‌गी: होssssss, येतो ना, प‌ण माझ्या एक‌टीचाच‌.
मुल‌गा: म्ह‌ण‌जे ?
मुल‌गी: म्ह‌ण‌जे, मी इत‌रांचा क‌र‌णार‌ नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ति०राव हल्ली असले संवाद होत नसावेत॥ कारण अगोदर फोनवरच या उत्तरांचं निराकरण झालेलं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने