..तिथे ती भेटते
anant_yaatree
ढगांच्या आतले
विजेचे वेटोळे
सुटून मोकळे
डोंगरा भिडते...तिथे ती भेटते
निबिड रानात
पोपटी पानात
झुकून बघत
मोतिया थेंबात ... अस्फुट हासते
भणाण वाऱ्यात
लाटेच्या गाजेत
चांदीच्या वर्खात
किनारा शोधत ... गारूड टाकते
कश्या हो सुचतात तुम्हाला इत
कश्या हो सुचतात तुम्हाला इतक्या भारी उपमा? सॉलिडच आहे.