Skip to main content

..तिथे ती भेटते

ढगांच्या आतले
विजेचे वेटोळे
सुटून मोकळे
डोंगरा भिडते...तिथे ती भेटते

निबिड रानात
पोपटी पानात
झुकून बघत
मोतिया थेंबात ... अस्फुट हासते

भणाण वाऱ्यात
लाटेच्या गाजेत
चांदीच्या वर्खात
किनारा शोधत ... गारूड टाकते

भांबड Wed, 05/07/2017 - 23:06

ती भेटून, अस्फुट हसून गारुड टाकते

१४टॅन Thu, 06/07/2017 - 09:34

डोंग‌र, त्याव‌र‌ची वीज, प‌हिल्या पाव‌सानंत‌र‌चं जंग‌ल, स‌मुद्र, त्याची गाज, स‌ग‌ळं झ‌र‌झ‌र कॅलिडोस्कोपसार‌खं तुफान वेगाने डोळ्यास‌मोरुन जाय‌ला लाव‌णारी क‌विता आहे तुम‌ची. हे, हे लेख‌न शोध‌त अस‌तो मी. हेच्च ते.

अनु राव Fri, 07/07/2017 - 13:38

मेथीच्या दाण्यात‌,
फाय‌ब‌र‌च्या जाळ्यात‌,
त‌ब्येत‌ खुल‌ते ,
भुकेच्या पानात‌ ती तिथे भेटते.

anant_yaatree Fri, 07/07/2017 - 14:09

लैन-बाय-लैन इडंबन लिवा की. तेवढाच टैमपास