आयडेंटिटीच्या बंधनात...

जन्माला आलेल्या प्रत्येकाला (आवडणारे वा न आवडणारे) नाव/आडनाव असते; व त्या नावाने आपली ओळख करून दिली जात असते. परंतु काही महात्वाकांक्षी व्यक्तींना फक्त नाव/आडनाव यात समाधान मिळत नाही. म्हणून आपल्या नावापुढे/आडनावापुढे काही तरी हवे म्हणून ते आटापिटा करत असतात. उच्च शिक्षितांना तर नावाच्या पुढे लावण्यासाठी इंग्रजीतील सव्वीसपैकी सव्वीस मुळाक्षरही कमी पडतात. काहींना आपल्या घराण्याचा अभिमान असतो म्हणून त्याला अधोरेखित करतात. काहींना आपल्या धर्माबद्दलचा वा (जातीबद्दलचा) अभिमान झाकता येत नाही म्हणून काही चित्रविचित्र पद्धत वापरून आपली आयडेंटिटी व्यक्त करत असतात. आणि ही आयडेंटिटी एखाद्या लेबलसारखी वा उत्पादनाच्या ब्रँडिगसारखी सगळीकडे मिरवली जात असते.

याच आयडेंटिटीचे समूह रूपसुद्धा असू शकते. ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘गर्वसे कहो हम हिंदू है’, ‘इस्लाम खतरेमें’ ‘आवाज कुणाचा, अमक्या तमक्याचा’ या प्रकारच्या नारेबाजीतील समान धागा म्हणजे वैयक्तिकरित्या मी या समूहाशी जोडलेलो आहे याचे प्रकटीकरण असते. यात फक्त नारेबाजी नसते, तर त्यासंबंधातील काही ठळक चिन्हं बाळगण्याची प्रथा रूढ होत जाते. उदाः वारकरी गळ्यात माळ घालतात; नरेंद्र महाराजाचे शिष्यगण छातीवर बिल्ला लावतात; लिंगायत समुदाय कपाळावर भस्माच्या तीन पट्ट्या लावून मिरवत असतात. त्यांच्या या बाह्य चिन्हांमुळे त्यांचे लेबल पटकन ओळखता येते. आणि समूह आपल्याला एक लेबल चिकटवतो. या लेबलमुळे आपली काही इप्सीतं साध्य होण्याची शक्यता वाढते. आपण समूहाच्या छत्राखाली सुरक्षित आहोत ही भावना जाणवते. आणि समूह आपल्या अडी-अडचणीच्या प्रसंगात धावून येतो, याची जाणीव असते. एवढेच नव्हे तर या समूहाची चिन्हं वापरून आपणही कुणी तरी आहोत, आपणाकडे वाकड्या नजरेने बघू नका, वा दुर्लक्ष करू नका, हा संदेशही दिला जातो. गंमत म्हणजे ही समूह आयडेंटिटी उपयुक्त ठरेल की गोचीत आणेल हे त्या त्या वेळची परिस्थिती ठरवत असते. परंतु अशा प्रकारच्या आयडेंटिटीज वा लेबल्स आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला, आपल्यातील क्षमतेला, जाचक ठरू शकतात हे आपण लक्षात घेत नाही. या आयडेंटीटीज आपल्याला आपल्या अस्मितेची आठवण सतत करून देत असतात. मग ही अस्मिता भाषेची, प्रदेशाची, जातीची, उपजातीची, अशी कोणतीही असू शकते.

भोवतालच्या असुरक्षिततेतून मार्ग काढण्यासाठी या लेबलची ढाल म्हणून वापरता येते. एखाद्या समूहाला चिकटून राहण्याची व आपण त्या समूहाचे भाग आहोत हे जाहीर करण्यासाठी या लेबलचा वारेमाप उपयोग केला जातो. काही वेळा या ब्रँडिंगमुळे अडचणीत आलो तरी अडचणीत आलेल्यांचासुद्धा वेगळा गट तयार होतो आणि आपण एकटेच नाही ही भावना वाढते व अजून एक लेबल चिकटवून घेतले जाते. परंतु लेबल्स आपल्याला सुरक्षितता देते हा एक भ्रम आहे, याचीही जाणीव हवी.

अशा प्रकारच्या आयडेंटिटी आपल्याला एका गटात बंदिस्त करतात. व यातून सुटका नाही याची जाणीवही करून देतात. दोनेक शब्दाचे हे लेबल्स असले तरी त्यांना गाळल्यास आपण गटांगळ्या खात आहेत की काय असे वाटू लागते. ज्या प्रकारे इमाने इतबारे आयुष्यभर नौकरी करणाऱ्यांना निवृत्तीनंतरचे आयुष्य नीरस वाटू लागते किवा मुलं मोठी होऊन वेगळे राहू लागल्यानंतर आईला एका मोठ्या पोकळीचा सामना करावा लागतो त्याच प्रकारे आपले लेबल्स गाळल्यास आयुष्य सुने सुने वाटत असावे. म्हणूनच आपण कायम लेबल्सला चिकटून असतो.

ही आयडेंटिटी काही वेळा आपल्या मुक्त विचारांना बंधनकारक ठरते. एका विशिष्ट आयडेंटिटीत अडकून घेतल्यानंतर आपल्या विचारातील लवचिकता हळू हळू कमी होऊ लागते. आपण त्यातले नाही असे म्हणताना जीभ चाचरते. तुमच्या क्षमतेवर मर्यादा पडतात. व आपण आपले व्यक्तिमत्व आंदण दिल्यासारखे त्या समूहाला समर्पित करतो. समूहाच्या विरोधात भूमिका घेता येत नाही आणि सहजासहजी लेबलही बदलता येत नाही. आणि एकदा तुम्हाला चिकटलेले लेबल लोक विसरत नाहीत हेही लक्षात घ्यायला हवे.

आयडेंटिटीत फसणे हा एक संकुचित दृष्टिकोन आहे याची जाणीव झाल्यानंतर लेबल नको असे वाटू लागते. म्हणून अशा प्रकारच्या लेबलला आपला विरोध असतो. खरे पाहता आपल्याला लेबल्स आवडतात; परंतु ते इतरानी दिलेले आवडत नाही. इतर कुणीही न दिल्यास आपणच स्वतःला एखाद्या समूहाशी वा वैचारिक गटाशी जोडून घेतो व त्या समूहाचे लेबल घेवून मिरवत असतो. कारण तेथे एक बिरादरी प्रस्थापित होत असते. आपण एखाद्या गटाशी जोडलेलोही आहोत व आपण वैयक्तिकरित्या स्वतंत्रपणे निर्णयही घेऊ शकतो, अशी ही मानसिकता असते. परंतु यात विरोधाभास आहे हे चटकन लक्षात येत नाही.

आपल्याला अनिर्बँध व्यक्तीस्वातंत्र्यही हवे व समाजाशी जवळीकही हवे, ही एक द्विधा मनस्थितीचे लक्षण आहे. वास्तवाशी सामना करण्यासाठी काही विशिष्ट मर्यादेतच राहून या दोन्ही गोष्टी साध्य करता येवू शकतात. त्यामुळे लेबल्सच्या फंदात न पडता आपण आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देऊ शकतो. मुळात लेबल्स तुमची (खरी) ओळखच करून देत नाहीत. व हे लेबल्स तुमच्यापुरतेच अर्थपूर्ण असल्यास ती इतरांना निरर्थक वाटू लागतात. कारण भाषा ही समाजातील इतराशी संवाद करण्यासाठी असते, स्वतःच्यापुरते नसते.

सर्वात खेदकारक गोष्ट म्हणजे आपल्या आयडेंटिटीचा वापर राजकारणात करणे हा असेल. आपण आपल्या आयडेंटिटीला उंच चढवण्यासाठी इतर आयडेंटिटीना कमी लेखतो. खरे पाहता त्यांनीसुद्धा आपली आयडेंटिटी टिकविण्यासाठी समूहाशी जोडून घेतलेले असतात. त्यामुळे आपण इतर आयडेंटिटींची टिंगल टवाळी न करता आदराने वागवायला हवे. म्हणूनच आयडेंटिटीची एका मर्यादा असते व आपणही ती मर्यादेतच ठेवायला हवे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

खूप खूप आवडला तुमचा लेख. जवळपास सगळ्या निरीक्षणांशी सहमत.

परंतु लेबल्स आपल्याला सुरक्षितता देते हा एक भ्रम आहे, याचीही जाणीव हवी.

ह्याच्याशी थोडंसं असहमत. समान लेबल्सवालेच त्या लेबलच्या विरुद्ध असणाऱ्या गोष्टींविरुद्ध एक होतात. त्यात त्यांना सुरक्षितता कितपत मिळते हा वादाचा मुद्दा आहे, पण त्यांच्या विरुद्ध लेबलवाल्यांना जास्त असुरक्षित नक्कीच वाटतं, हेच काय ते समाधान त्यांना मिळतं.
अगदी ह्याच धर्तीवर मी 'सॅक्रोसँक्ट' लिहीलं होतं. ह्यात मी ही लेबल्स 'सॅक्रोसँक्ट'असली विवेकबुद्धीला कसं कुंपण पडतं हे मांडायचा प्रयत्न केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

लेख अतिशय आवडला .
>>>> .. आयडेंटिटीची एका मर्यादा असते व आपणही ती मर्यादेतच ठेवायला हवे. <<<<.
हे तर अतिशय खरे पण अवघड काम आहे .

>>>> आपल्याला अनिर्बँध व्यक्तीस्वातंत्र्यही हवे व समाजाशी जवळीकही हवे,...

... आयडेंटिटीत फसणे हा एक संकुचित दृष्टिकोन आहे याची जाणीव झाल्यानंतर लेबल नको असे वाटू लागते. म्हणून अशा प्रकारच्या लेबलला आपला विरोध असतो.<<< ...

अतिशय सहमत .. लेबल ला विरोधच नाही तर लेबल चे ओझे ( स्वतःचे स्वतःला , कोणी लेबल लावले म्हणून नाही )सुद्धा होऊ शकते हा अनुभव .. वैयक्तिक नास्तिकतेच्या बाबतीत

या मानसिक द्वंद्वात बऱ्याच वेळा वैचारिक समतावादि , उदारमतवादी , लिबरल लोकांची गोची होत असावी का ?

पारंपरिक विचार करणाऱ्या , धार्मिक, कोणा बाबांचे अनुयायी वगैरे लोकांना ( जे एका लेवल ला विनम्र , लीन असावेत) हे सोपे जात असावे असे वाटते का ?

यात बरोबर चूक वगैरे मुद्द्यात जात नाहीये .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयडेंटीटी ही एक सोय आहे.

परंतु लेबल्स आपल्याला सुरक्षितता देते हा एक भ्रम आहे, याचीही जाणीव हवी.

असहमत. ती एक भावना आहे.

लेखाचा सूर कशाला पाहिजे ती आयडेंटीटी फियडेंटीटी असा वाटला.
ही आयडेंटिटी काही वेळा आपल्या मुक्त विचारांना बंधनकारक ठरते. एका विशिष्ट आयडेंटिटीत अडकून घेतल्यानंतर आपल्या विचारातील लवचिकता हळू हळू कमी होऊ लागते. आपण त्यातले नाही असे म्हणताना जीभ चाचरते. तुमच्या क्षमतेवर मर्यादा पडतात. व आपण आपले व्यक्तिमत्व आंदण दिल्यासारखे त्या समूहाला समर्पित करतो. समूहाच्या विरोधात भूमिका घेता येत नाही आणि सहजासहजी लेबलही बदलता येत नाही. आणि एकदा तुम्हाला चिकटलेले लेबल लोक विसरत नाहीत हेही लक्षात घ्यायला हवे.

सहमत आहे.
आपल्याच प्रतिमेमधे आपण इतके गुरफटत जातो की कधी कधी गुदमरायला होत.आत्मपरिक्षण करुन तुम्हाला तुमच्या भूमिकेत काही छोटे मोठे बदल करावेसे वाटले तर तुम्हाला दुतोंडी ढोंगी गद्दार अशा दूषणांना सामोरे जावे लागते. कुठल्याही कल्ट मधे एखादा जर असा विचार करु लागला तर बूर्झ्वा बूर्झ्वा असे म्हणून त्याला कळापाबाहेर फेकले जाते.कट्टरतेत कमी पडला म्हणून कच्च मडकं आहे,कुंपणावरचे असे हिणवले जाते.
मी या समाजधुरीण कट्टर लोकांना प्रश्न विचारतो कि विज्ञान तंत्रज्ञान बदलते आहे समाज बदलतो आहे मग तुम्हाला तुमच्यात बदल करावासा वाटत नसेल तर तुमच्यात व दगडात फरक काय?
काही झाल तरी भूमिकेला चिकटून राहणे म्हणजे तत्वनिष्ठ असणे मग भले जग बदलल तरी चालेल असे असेल तर तुमच्यात व सनातन्यात फरक काय राहिला?
एखादा राजकीय पक्ष, संघटना, कल्ट, बिरादरी वगैरे यात तुम्ही जरा काही वेगळे बोललात की तुम्ही नेमके कोणाच्या बाजूचे? असा प्रश्न तुम्हाला त्या समूहातून प्रत्यक्श अप्रत्यक्षपणे विचारला जातो. अशा या आपण आणि ते या कृष्ण धवल द्वैतात विचार करणार्‍या लोकांना मधाला ग्रे एरिया दिसत नाही. किंवा असही म्हणता येईल कि त्यांना रंगीत दिसत नाही फक्त कृष्ण धवल दिसते. समूह विचार वर्तनाच्या उन्मादात त्यांचा मेंदु स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता गमावून बसतो. गल्लत गफलत गहजब या राजीव सान्यांच्या पुस्तकात अशा अनेक सामाजिक दृष्टीकोनांचा विचार केलेला आहे. त्यावर भाष्यही केले आहे. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

लेबलंच जास्त महत्त्वाची झाली आहेत.
लेबलं चिकटणं आणि लादली जाणं हा मोठा वैताग आहे. म्हणजे एखादा माणूस काय सांगतोय हे बघण्यापेक्षा त्याचं लेबल काय आहे ते बघून पटकन हा "आपला की शत्रू" ते ठरवता येतं.
ज्याला विरोध करायचाय त्याला एखादं लेबल चिकटवून टाकायचं. (मोदीभक्त/प्रेस्टिट्यूट असं काहीही) की मग पुढचं काम सोपं होतं.
----

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संपूर्ण लेखाशी असहमत.

मानव ही आयडेंटिटी आहे का ? की सजीव प्राणी ही आयडेंटिटी आहे ? मानव ही आयडेंटिटी नसेल तर फक्त मानवांना मतदानाचा अधिकार का असावा ? सर्वसमावेशक मतप्रणाली द्वारे श्वान, मार्जार, शुक, काक यांना मतदानाचा अधिकार असावा का ? ( राजकारणात आयडेंटिटी आणू नये असं तुम्ही ध्वनित केलेलं आहे म्हणून मतदानाचा प्रश्न उपस्थित केला.)

आयडेंटिटी वरील आपला भर हा जर अनिष्ट असेल तर डायव्हर्सिटी वरील भर सुद्धा अनिष्टच म्हणावा लागेल नैका ? आफ्टरऑल आयडेंटिटी असेल तरच् डायव्हर्सिटी असेल. आयडेंटिटी नसेल तर युनिफॉर्मिटी असेल.

------------

काही झाल तरी भूमिकेला चिकटून राहणे म्हणजे तत्वनिष्ठ असणे मग भले जग बदलल तरी चालेल असे असेल तर तुमच्यात व सनातन्यात फरक काय राहिला?

जग बदलले म्हंजे कोण बदलले ? फक्त सनातनी सोडून सगळे बदलले म्हंजे जग बदलले का ? व जर सनातनी बहुसंख्य असतील आणि बदलणारे अल्पसंख्य असतील तर जग बदलले असं म्हणता येईल ?

सनातनी तुमच्या सर्वसमावेशक मतप्रणालीमधे बसत नाहीत ? का बरं ?

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

संपूर्ण प्रतिक्रियेशी असहमत.
मानव ही आयडेंटीटी आहे. सजीव प्राणी हीसुद्धा. तुम्हाला हवं तर तुम्ही साबणाच्या वडीलासुद्धा मतदानाचा अधिकार देऊ शकता. मला तर वाटतं द्यावाच.
डायव्हर्सिटीचा मुद्दा मस्त आहे. पण गंमत म्हणून.
-----
जग बदललं नाही असं तुम्हाला वाटतं का? सनातनी बदलले नाहीत असं का वाटलं?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मानव ही आयडेंटीटी आहे. सजीव प्राणी हीसुद्धा.

हे मला सुद्धा मान्य आहे. व आवडले.

मग मानव या आयडेंटिटीचा मुद्दा बनवूनच प्रजातंत्र स्थापन झाले ना ? की इतर सजीव प्राणी ही आयडेंटीटी सुद्धा त्यात अंतर्भूत केली गेली ?

जर फक्त् मानव या आयडेंटिटीचा मुद्दा बनवूनच (व इतर प्राण्यांची आयडेंटीटी वगळून्) प्रजातंत्र स्थापन झाले असेल तर आयडेंटीटी हा मुद्दा राजकारणात आला नाही असं कसं म्हणता येईल ?

आता मानव ही आयडेंटीटी मानून केलेले प्रजातांत्रिक् राजकारण पुढे चालू ठेवले तर त्यात धार्मिक, भौगोलिक, भाषिक आयडेंटीटी बद्दल चर्चा होऊ शकते. चर्चा ही की अशा प्रकारच्या धार्मिक, भौगोलिक, भाषिक आयडेंटीटीज योग्य की अयोग्य ? व त्यांचा राजकारणातील उल्लेख अयोग्य की योग्य ?

पुढे....................

भारताच्या संविधानाचे पहिले वाक्य -

1. (1) India, that is Bharat, shall be a Union of States.

ह्यात आयडेंटीटी हा प्रकार् आहे की नाही ?

ह्या भूभागाला भारत किंवा इंडिया का म्हंटले जावे ? भारत ही आयडेंटीटी आहे की नाही ?? Bharat या शब्दामधे ६ अक्षरे आहेत. ती नुसतीच एकाशेजारी एक अक्षरे ठेवलेली आहेत की त्यांना काही विशिष्ठ अर्थ आहे ?? व तो अर्थ हा आयडेंटीटी नसेल तर दुसरे काय आहे ?

----

तुम्ही असहमत का व कसे आहाते सांगायला विसरू नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचा कंटेक्स्ट काय आहे? पृथ्वी, सूर्यमाला की मग विश्व ?
समजा पृथ्वी असेल तर मानव हा सगळ्यात मोठा बुद्धीमत्तेचा परीघ असेल. त्यात चिंपांझी/ डॉल्फिन/ हत्ती थोडेफार जवळपास पोचतील. पण त्यांना मतदानाचा हक्क मागण्याएवढे ते बुद्धिमान आहेत का? नाही.
उलट स्त्रियांना (मानव असून) हा हक्क नव्हता तो त्यांनी मिळवला. उद्या जर सगळ्या डॉल्फिन्सनी एकत्र मोर्चा काढून मतदानाचा हक्क मागितला आणि तो त्यांना द्यावा लागला तर मग आपण हा आयडेंटीटीचा विचार करताना जरूर डॉल्फिन्सचा विचार करायला हवा.

मानव ह्या आयडेंटीटीत लहान/स्त्रिया/गुलाम/परदेशी/आदिवासी अशा अनेक छोट्या परीघातल्या सब-आयडेंटिटी असणारच आहेत. निव्वळ एक आयडेंटीटी असणं हे सामान्य आहे, त्यातून तुम्ही सुटू शकत नाही. उदा. निळा रंग आवडणारे लोक.
-------------------
पण सगळ्या आयडेंटीटीच्या शक्यता लेखाला लागू पडत नाहीत, त्यात तुम्ही दिलेली उदाहरणं येतात (मानव आणि इतर प्राणी वगैरे) असं मला वाटलं म्हणून असहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचा कंटेक्स्ट काय आहे? पृथ्वी, सूर्यमाला की मग विश्व ?

ऑ ??

माझा कंटेक्स्ट अत्यंत स्पष्ट आहे. भारत. भारत ही आयडेंटीटी आहे की नाही ?

----

द्या जर सगळ्या डॉल्फिन्सनी एकत्र मोर्चा काढून मतदानाचा हक्क मागितला आणि तो त्यांना द्यावा लागला तर मग आपण हा आयडेंटीटीचा विचार करताना जरूर डॉल्फिन्सचा विचार करायला हवा.

धन्यवाद.

-----

मानव ह्या आयडेंटीटीत लहान/स्त्रिया/गुलाम/परदेशी/आदिवासी अशा अनेक छोट्या परीघातल्या सब-आयडेंटिटी असणारच आहेत. निव्वळ एक आयडेंटीटी असणं हे सामान्य आहे, त्यातून तुम्ही सुटू शकत नाही.

अगदी बरोब्बर.

माझा मुद्दा मान्य केल्याबद्दल धन्यवाद.

माझा मुद्दा संपला.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वत: लावलेली लेबलं म्हणजे आयडेंटिटी की दुसऱ्यांनी लादलेली सुद्धा ? उदाहरणार्थ, 'फडतूस' हे लेबल धरावे का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उदाः वारकरी गळ्यात माळ घालतात; नरेंद्र महाराजाचे शिष्यगण छातीवर बिल्ला लावतात; लिंगायत समुदाय कपाळावर भस्माच्या तीन पट्ट्या लावून मिरवत असतात. त्यांच्या या बाह्य चिन्हांमुळे त्यांचे लेबल पटकन ओळखता येते.

आयटी कर्मचारी गळ्यात पट्टे घालतात. लष्करी अधिकारी चित्रविचित्र टोप्या घालतात. शास्त्रद्न्य दाढ्या वाढवतात, केस विंचरत नाहीत. सी ई ओ ज टाय सूट घालतात. तरुण पोरी फाटक्या जीन्स घालतात. शाळेत गणवेश घालतात. मॉडेल्स मादक कपडे घालतात (वा घालत नाहीत.). रिपोर्टर्स कॅमेरे मिरवतात. सरकारी अधिकारी एक हेळसांडजनक भाव चेहऱ्यावर ठेऊन असतात.

परंतु अशा प्रकारच्या आयडेंटिटीज वा लेबल्स आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला, आपल्यातील क्षमतेला, जाचक ठरू शकतात हे आपण लक्षात घेत नाही.

बहुतेक धार्मिक आयडेंटीटीज तुम्हाला तुमच्या मनुष्य असल्याचं भान ठेवायला मदत करतात. मात्र आधुनिक आयडेंटीटीज तुम्हाला जनावर बनवतात. अमेरिकेत बसून सगळ्या जगाचा नाश करतील इतके अणुबाँब बनवणं हे आधुनिक आयडेंटीटीमुळं सहज साध्य आहे. राजे आपसांत युद्ध करत म्हणत सगळ्या लोकशाह्यांतील युद्धे इग्नोरणे देखिल "अशा प्रकारच्या" आधुनिक आयडेंटीटीजनी संभव आहे.

त्याच प्रकारे आपले लेबल्स गाळल्यास आयुष्य सुने सुने वाटत असावे. म्हणूनच आपण कायम लेबल्सला चिकटून असतो.

प्रत्येक लेबलला एक मतितार्थ असतो. म्हणून तर ते नसण्याची कल्पना करता येत नाही.

आपल्याला अनिर्बँध व्यक्तीस्वातंत्र्यही हवे

असं फक्त निर्बुद्ध मदोन्मत्त पुरोगाम्यांना वाटतं. सामान्य माणसाला व्यवस्थेच्या नियमांची बंधनं पाळायला आवडतं.

मुळात लेबल्स तुमची (खरी) ओळखच करून देत नाहीत.

लेबल्स हीच आपली खरी ओळख असते.मी भारतीय नसतो तर ज्या तुकड्यावर जन्मलो असतो तिथला म्हणवलो असतो. जगात लेबलवैविध्य आहे, त्यातल्या माझ्या लेबलांबद्दल मला प्रेम असलं पाहिजे. आणि लोकांना गोष्टींची "ओळख" असते. माझीच आई सर्वात सूंदर असं कोणी म्हणत नाही, माझीच आई सर्वात प्रेमळ आई असं वाटतं. अस्मितांपलिकडे भानच नसतं इ इ जावईशोध आहे.

सर्वात खेदकारक गोष्ट म्हणजे आपल्या आयडेंटिटीचा वापर राजकारणात करणे हा असेल

ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य कशाला मिळवलं? ह्या आयडेंटीटी नको म्हटल्यामुळे "इस्लामी" पाक झाला आणि "आयडेंटीटीहिन" भारत झाला. अरे भाई, हमारी पहचान ही भूलोगे तो इन्साफ क्या दिलाओगे?

आपण इतर आयडेंटिटींची टिंगल टवाळी न करता आदराने वागवायला हवे. म्हणूनच आयडेंटिटीची एका मर्यादा असते व आपणही ती मर्यादेतच ठेवायला हवे.

विधानाच्या स्पिरिटशी १००% सहमत. हे शिकवणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र आयडेंटीटीज मधे दर्जात्मक फरक असतो, म्हणून काही टोले पडणार. शिवाय समाजाची नितिमत्ता आणि अभ्यासपूर्णता कमी जास्त होऊ शकते. म्हणून सगळ्या आयडेंटीटीजना सुद्न्यांनी गोंजारलेलं बरं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अस्मितांपलिकडे भानच नसतं इ इ जावईशोध आहे.

शॉल्लेट हां अजो.

-----

असं फक्त निर्बुद्ध मदोन्मत्त पुरोगाम्यांना वाटतं. सामान्य माणसाला व्यवस्थेच्या नियमांची बंधनं पाळायला आवडतं.

काहीसा असहमत.

अध्यात्मवादी/धर्मवादी मंड्ळींचा सुद्धा "स्वातंत्र्य म्हंजे स्वैराचार नव्हे" चा जप चाललेला असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"I am proud to be in this country which allows me to feel proud of my religion. I feel proud to be a Sikh by birth and by choice. People must feel proud of their religion, region and ethnicity. And this is what the Constitution is all about," he said. Justice Khehar, who belongs to a family of freedom fighters, was born in Kenya as his forefather had migrated there during British rule but they returned back to India after Independence.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुद्धा असं म्हणतात की व्यक्तीला स्वत:च्या धर्माचा, प्रांताचा व वंशाचा/जातीचा (एथ्निसिटी चे काहीही भाषांतर करा) अभिमान असावा.

संभाव्य प्रतिवाद ... नेहमीचेच घिसेपिटे.....

(१) त्यांना हे म्हणायचं नसावं अन ते म्हणायचं नसावं ....
(२) हो पण अभिमानाचा अर्थ हा नव्हे की दुसऱ्याला तुच्छ ...
(३) अभिमान व अस्मिता यात फरक आहे....
(४) स्वत:च्या अभिमाना पायी दुसऱ्याला त्रास देणं.....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

कुठे ते गोऱ्यांचे प्रबुद्ध जज आणि कुठे हे थर्ड वर्ल्ड मधले सरकारी बुजगावणे, नै का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुम्ही फोनवर सुद्धा दोन्ही बाजूंनी स्वत:च बोलता का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही बुद्धिबळ खेळताना डबल्स खेळता का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संभाव्य प्रतिसाद.. नेहेमीचाच घिसापिटा विषयबदल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही तरी कुठे मूळ मुद्द्याबद्दल बोललात ? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जर काही म्हणत असतील तर ते किमान दखलपात्र तरी आहे. ते सोडून - फोन वर बोलण्यासारखा फुटकळ विनोद करताय !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेवटी मुर्ती नी सिक्काला घालवलेच.
मला बरे वाटले कारण मला त्याची ड्रेसींग स्टाइल पसंत नव्हती ( कॉलरलेस टीशर्ट आणि त्यावर जॅकेट )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूर्तींनी त्यांची घाणेरडी इगॅलिटेरियन एथिक्स मधे आणली असतील. टॉप म्यानेजमेंट ने पगार कमी घ्यावा व नफा कर्मचाऱ्यांमधे वाटावा वगैरे.
रेव्हेन्यु, ऑपरेटिंग इन्कम, नेट इन्कम व डायल्युटेड इपिएस हे सगळे चांगल्यापैकि सुधारलेले आहेत सिक्का यांच्या कार्यकालात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूर्तींनी त्यांची घाणेरडी इगॅलिटेरियन एथिक्स मधे आणली असतील. टॉप म्यानेजमेंट ने पगार कमी घ्यावा व नफा कर्मचाऱ्यांमधे वाटावा वगैरे

काहीतरीच गब्बु तुझे. मूर्तीना पुन्हा प्रवेश करायचा आहे इंफीमधे बाकी काही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

a

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ह्म्म्म बात मे दम है !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयडेंटिटी (स्व) नसेल तर पार एकमेकांत मिसळुन तर जाऊच, पण एकाच साच्याचे बनु. शाळेत कसा गणवेश असतो तसे. - यु-नि-फॉ-र्म!
वैविध्यात मजा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका साच्याचे नसणे म्हणजे समता नसणे. म्हणजेच विषमता असणे. विषमतेला काळी छटा आहे म्हणून तुम्ही लगेच वैविध्य म्हणता काय? बघा बघा राजकारण म्हणतात ते हेच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/