Lifeboat आणि Psycho

Lifeboat आणि Psycho! ही दोन्ही आल्फ्रेड हिचकॉकच्या चित्रपटांची नावे आहेत, हे तुमच्या लक्षात आलेच असेल. मी इतक्यातच हा Psycho चित्रपट पाहिल्यांदच पहिला. आणि त्यानंतर काही दिवसातच मी पुण्यात झालेल्या चित्रपट रसास्वाद शिबिरात जाऊन आलो होतो, आणि माझे brain-washing झाले होते! मी खरे तर आल्फ्रेड हिचकॉकचे हे दोनच सिनेमे पहिले आहेत. आल्फ्रेड हिचकॉक हा आपल्याला माहितीच आहे की रहस्य/भय चित्रपट बनवण्यात माहीर होता. त्यातही काहीतरी मानसशास्त्रीय दृष्टीने असतेच असते. हा ब्लॉग म्हणजे काही त्या दोन चित्रपटांची तुलना करणारा नाही, कारण दोघांची जातकुळी वेगळीच आहे. पण दोन्ही बद्दलचे माझे अनुभव कथन आहे.

Lifeboat हा सिनेमा मी खूप पूर्वी अमेरिकेत असताना पहिला होता. १९९५ चे साल. त्यावेळेस अजूनही विडियो कॅसेट आणून लोकं आणून घरी सिनेमे पाहत. त्यावेळेस विडियो कॅसेट भाड्याने देणाऱ्या Blockbuster सारख्या कंपन्या होत्या, आणि जोरात होत्या. शनिवारी, रविवारी असे मित्रांचे कोणाच्या तरी घरी अड्डे जमत, आणि असे सिनेमे पाहण्याचे कार्यक्रम, इतर गोष्टीबरोबर होत असत. त्या १९९५ मधील विकेंडला आम्ही तेच केले. Blockbuster मधून आम्ही Lifeboat हा आणि अजून एक The Last Detail नावाचा सिनेमा त्या रात्री आणला. सुरुवात Lifeboat पाहून केली. तर हा सिनेमा १९४४ मध्ये आलेला, अर्थातच श्वेतधवल चित्रपट. हा पहिल्यानंतर मला तरी असा हा सिनेमा एका नाटकासारखा वाटला होता. कथा काय तर समुद्रात जहाज बुडाल्यामुळे जहाजातील खलाशी/प्रवासी एका आपत्कालीन जीवरक्षक बोटीत जाऊन आपला जीव वाचवतात, पण जेव्हा विविध प्रकारची, विविध स्वभावाची माणसे एका छोट्याश्या बोटीत काही काळ एकत्र व्यतीत करतात, तेव्हा काय काय होते, ह्याचे चित्रण म्हणजे हा सिनेमा. विपरीत परिस्थितीत माणसे एकमेकांशी कसे वागतात, यांचे मानसशास्त्रीय विश्लेषण पाहायला मिळते. त्यातच परत दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी. वाचलेल्या माणसांमध्ये एक जर्मन देखील असतो, बाकीचे ब्रिटीश आणि अमेरिकन नागरिक असतात. हा काही हिचकॉकचा टिपिकल भयपट नाही, पण रहस्यपट नक्कीच आहे. तसे हे नाटक म्हणून देखील चालले असते, कारण यात बोटीत अडकलेल्या माणसांमधील संवाद, चर्चा, संशय, भय, ताणतणाव, पदोपदी मृत्यूचे भय या सर्वांचे काही काळात झालेले दर्शन आहे. चित्रपटात संगीत असे नाहीच, फक्त समुद्रातील लाटांचा, वाऱ्याचा आवाज, त्यामुळे एक वेगळा परिणाम होतो.

जेव्हा इंटरनेट, युट्युब वगैरे गोष्टी आल्यापासून, Blockbuster ही कंपनी नामशेष झाली आहे असे वाटले होते मला. पण अजूनही काही स्टोर्स आहेत असे समजले.त्यांची एक स्लोगन असे, Be kind, rewind ती अजूनही मला आठवते. म्हणजे काय तर, सिनेमा पाहून झाल्यानंतर, विडियो कॅसेट परत rewind करून ग्राहकांनी परत द्यावी आणि सौजन्य दाखवावे, म्हणजे नंतर ती घेण्याऱ्या ग्राहकाला ती करावी लागू नये. काहीही असो, पण Blockbuster मुळे तयार एका जीवन पद्धतीचा लय झाला. Blockbusterच्या स्टोर मध्ये, शुकवारी संध्याकाळी जाऊन आपल्याला हव्या त्या विडियो कॅसेट्स घरी घेऊन येऊन पाहणे ही वेगळी मजा होती. आणि सोमवारी ऑफिसला जाता जाता Blockbusterच्या स्टोर मध्ये विडियो कॅसेट्स परत करण्यासाठी असलेल्या खिडकीत विडियो कॅसेट्स परत देणे, यात वेगळी मजा होती.

आता Psycho या चित्रपटाबद्दल. हा १९६० मधील चित्रपट, भयपट तर आहेच, रहस्य आहे, आणि मनोविकार झालेल्या व्यक्तीचे चित्रण आहे. अमेरिकेतील हमरस्त्यावरील मोटेल(motel) मध्ये एका स्त्रीचा खून होतो. त्यावर हा सिनेमा आहे. का होतो, कोण करतो ह्याचा उलगडा म्हणजे हा सिनेमा आहे. भयपटाचे सारे घटक यात आहे, काही सूचक प्रतिमा वापरल्या आहेत. खून करणाऱ्या व्यक्तीच्या दुभंग व्यक्तिमत्वाचे(schizophrenia) चित्रण येते. हा मनोविकार का त्या व्यक्तीला झाला असावा, याची चर्चा करणारे काही संवाद आहेत. सिनेमाच्या पहिल्या भागात, ती स्त्री पैसे चोरी करून दुसऱ्या गावी मोटारीतून जाते, आणि शेवटी एका मोटेलमध्ये रात्रीच्या मुक्कामासाठी येते. ती स्त्री काही सराईत चोर नाही. त्यामुळे तिचा मोटेलपर्यंतचा प्रवास आल्फ्रेड हिचकॉक ती कश्या भेदरलेल्या मनःस्थितीमध्ये करते हे दाखवतो. पोलीस दिसले की तिची कशी भंबेरी उडते, हे दाखवतो. त्यामुळे त्या स्त्रीची एक प्रकारची प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात निर्माण होते. त्याचा फायदा पुढे त्या स्त्रीचा खून झाल्यावार प्रेक्षकांच्या शंकेला वाव राहतो.

मी वर उल्लेख केलेल्या चित्रपट रसास्वाद शिबिराच्या अंतर्गत चित्रपट संकलन कसे होते याबद्दल एक सत्र होते. त्यात Psycho चा उल्लेख झाला. स्त्रीचा खून हा मोटेलमधील बाथरूममध्ये होतो असे दाखवले आहे. त्या २-३ मिनिटांच्या दृश्यासाठी आल्फ्रेड हिचकॉकने म्हणे ९० वेगवेगळे शॉट्स घेतले होते, आणि एडिटिंगच्या वेळेस त्याला हवे ते जोडून अंगावर काटा आणणारा दृश्यपरिणाम त्याने साधला. भयपट म्हणजे ध्वनी आलाच, आणि तोही येथे अतिशय छान वापरला गेला आहे. यात ज्या पद्धतीने मनोविकाराचे स्पष्टीकरण आले आहे, आणि एकूणच जे चित्र प्रेक्षकांसमोर येते, हे कितपत बरोबर आहे, यावर तज्ञांमध्ये मतभेद आहेत. मी मध्ये ह्या ब्लॉगवरच सिनेमा मधील मनोविकारांचे चित्रण यावरील एक मराठी लेख मी इंग्रजीत भाषांतरीत केला होता

आल्फ्रेड हिचकॉकच्या चित्रपटांचा, त्याचा चित्रपट रचनेच्या, कथन शैलीचा बराच अभ्यास झाला आहे. त्याच्या एका पुस्तकाचा उल्लेख शिबिरात झाला. त्याचे नाव Hitchcock on Hitchcock. आल्फ्रेड हिचकॉकचे अंतरंग जाणून घ्यायचे असेल तर ते पाहिले पाहिजे.

P.S. खरे तर उपरोल्लिखित शिबिराला ऐसिकर असलेले 'चिंतातूर जंतू' देखील वक्ते म्हणून आले होते. तेव्हा त्यांची प्रत्यक्ष भेट झाली, ओळख झाली, तरी सुद्धा चित्रपटांबद्दल येथे लिहिण्याचे धारिष्ट्य करतो आहे, चू.भू. द्यावी घ्यावी!

अजून एक P.S: ह्या P.S. ला काहीतरी शब्द आहे मराठीत, आठवत नाहीये. कोणाला माहिती आहे का?

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ता.क. = ताजा कलम.(फारसी : चूभूद्याघ्या)
लेखी पत्रव्यवहाराच्या जमान्यात हे "ताक" मराठी पत्रांच्या शेवटी बऱ्याचदा असायचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोब्बर! धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

P.S. ला जाता जाता पण म्हणता येइल की

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

हिचकॅाकचे सिनेमे माझे वडील पाहायचे. एकूण बावन होते म्हणतात. मी दोन तीन पाहिले परंतू एकाच छापाचे१ वाटले किंवा फार उत्सुकता वाटली नव्हती.
*१अगाथा क्रिस्तिच्या कथाही अशाच वाटल्या.

चिंजंचे भाषण कोणत्या मुद्द्यांवर होते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

P.S. ला आपणच बनवूया अस्सल मराठी काहितरी.
बर्मगठिवतो,बर्मगठिवुका, बर्मगफुनठिवतो हे मोबाइल फोनवर बोलणारे बोलतात. जुन्या फोनचा रिसिवर ठेवून फोन बंद करणे यांच्या मोबाइललाही लागू आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा तो प्रसंग -

संकलनाविषयी बोलताना हे कदाचित सांगितलं गेलं असेल - त्या काळच्या अमेरिकन सेन्साॅरशिपशी हिचकाॅक एक उंदीर-मांजराचा खेळ खेळला होता. उदा. ह्या दृश्यात सुरा शरीराला स्पर्श करताना मी दाखवला नाही असा दावा हिचकाॅकनं केला. संकलन असं केलं होतं की हा स्पर्श होताना कळू नये. तरीही आपला मेंदू तसं अर्थनिर्णयन करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अरे हो का..इंटरेस्टिंग!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

एकूणच सेन्सॅारशिपची कात्री कशी बोथट होत गेली हा एक दिवाळी अंकाचा विषय होऊ शकतो.
दादा कोंडके विरुद्ध विजया(?) वाड अशी मॅच होत असे ते वाचून हसायला येते. कित्येक वाक्यांवर वाडबाईंचा आक्षेप आणि ते क्रियापद/शब्द मराठीत त्या प्रसंगी कसा योग्य आहे ते दादा पटवून देत म्हणे. सगळाच द्व्यर्थी मामला.
हिचकॅाक म्हणे नटी/नायिकेला फार चांगल्या प्रकारे वागवायचा असं वाचलेलं. नटीचा बाथरुम सीन - हे महाशय नटीकडे बघारचे नाहीत. वरती बसून क्यामेरामनला सांगायचे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिचकॅाक म्हणे नटी/नायिकेला फार चांगल्या प्रकारे वागवायचा असं वाचलेलं. नटीचा बाथरुम सीन - हे महाशय नटीकडे बघारचे नाहीत. वरती बसून क्यामेरामनला सांगायचे!
..... 'एचबीओ' आणि 'बीबीसी'ची संयुक्त निर्मिती असलेला 'The Girl' चित्रपट पाहा, इतकेच सांगेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ट्राली निस्ती गार गार गार फिरवलीय का काय त्यात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हिचकॅाक म्हणे नटी/नायिकेला फार चांगल्या प्रकारे वागवायचा असं वाचलेलं.

शक्य आहे, पण बायकांकडे आकर्षित होणाऱ्या प्रेक्षकाला जमेल तितकं चाळवणं आणि त्यासाठी सेन्साॅरला होईल तितकं वळवणं तोसुद्धा (कोंडक्यांसारखं नसलं तरी) नक्कीच करत होता. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तुम्ही जर नवे हिचकॉक चाहते असाल तर ही हिचकॉकची एक और मजा.

आपल्या दिग्दर्शित चित्रपटांमध्ये तो एकदाच कोठेतरी दिसत असे. पात्र म्हणून तो काहीच करत नसे पण एकदा तो कोठेतरी गर्दीतील माणूस, रेस्टॉरंटमध्ये बसलेल्यांपैकी एक अशा नगण्य व्यक्तीच्या रूपात दिसत असे. त्याला spot करणे हा त्याच्या फॅन्सचा चाळा असे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो बरोबर आहे...मी कुठेतरी वाचले होते की लाईफबोट सिनेमात त्याला जागा नव्हती आणि प्रसंग ही त्याला सापडला नाही, म्हणीन त्याचे चित्र असलेले एक वर्तमानपत्र त्याने बोटीत ठेवले होते, आणि त्यावर एका दृश्यात फोकस टाकला होता, जेणे करून प्रेक्षकांना त्याचे दर्शन व्हावे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

आपले सुभाष घई देखील असे अपिअरंस मारत असतात त्यांच्या सिनेमात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हिचकॉकच्या मॅकगफीन (एखादी गोष्ट अश्या पद्धतीने समोर आणायची की त्यावर संशयाची सुई जावी, परंतु त्या गोष्टीला शेवटी काही महत्त्व नसावं.) बद्दल देखील वाचल्याचं आठवतंय.
त्याच्या बहुसंख्य चित्रपटांमध्ये वापरलेले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

हो! परिक्षणात असं लिहायचे अन प्रेक्षक बारीक लक्ष ठेवत आणि शोधत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठाण्यात, ८० च्या दशकात इंग्रजी चित्रपट पाहण्याचे एकमेव ठिकाण होते, ते म्हणजे प्रताप टॉकीज. तिथेच पाहिलेला डायल एम फॉर मर्डर हा माझा हिचकॉकचा पहिला चित्रपट. त्यानंतर वर्टिगो आणि मॅन हू न्यू टू मच देखिल (बहुधा) तिथेच पाहिले. सायको मात्र बऱ्याच नंतर DVD विकत घेऊन घरीच पाहिला. DVD अद्याप संग्रही असावी. शोधायला पाहिजे. सायकोची ती सुप्रसिद्ध बाथरूम युनिवर्सल स्टुडियोत पाहिल्याचे आठवतय.

लाइफबोट बद्द्लमात्र आताच पहिल्यांचा वाचले. पहायला पाहिजे एकदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काहीही असो, पण Blockbuster मुळे तयार एका जीवन पद्धतीचा लय झाला. Blockbusterच्या स्टोर मध्ये, शुकवारी संध्याकाळी जाऊन आपल्याला हव्या त्या विडियो कॅसेट्स घरी घेऊन येऊन पाहणे ही वेगळी मजा होती. आणि सोमवारी ऑफिसला जाता जाता Blockbusterच्या स्टोर मध्ये विडियो कॅसेट्स परत करण्यासाठी असलेल्या खिडकीत विडियो कॅसेट्स परत देणे, यात वेगळी मजा होती.

सहमत.

नव्वदीच्या दशकात अमेरिकेत ब्लॉकबस्टरचे पेव फुटले होते. कित्येक वीकांत, मित्रमंडळीसमवेत (अधिक बडवायझर, करोना इत्यादी) मजेत घालवले होते!

नवीन सहत्रक मात्र नेटफ्लिक्सचे होते. विडियो कॅसेटचा जमाना जाऊन डिस्क आल्या आणि ह्या डिस्क पोस्टाने घरपोच पोचववणारी नेट्फ्लिक्स लोकांना जास्त आवडू लागली. आता घरोघरी इंटरनेट आल्यावर तर चित्रपट आणि मालिका थेट ऑनलाइन पाहण्याची देखिल सोय भारतासहित अनेक देशात उपलब्ध झाली.

काळाची पाऊले ओळखणारी नेटफ्लिक्स आजही जोरात आहे. आणि ते न ओळखणाऱ्या ब्लॉकबस्टरची 'कोडॅक' झाली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो ना! गेले ते दिवस!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

उपरोल्लेखित दोन्ही चित्रपट पाहिले नाहीत पण त्यातील "सायको" बद्दल थोडफार वाचले आहे.
हिचकॉक चे मी "रिबेका" आणि " द मॅन हू न्यू टु मच" हे दोन चित्रपट पाहिलेत.
त्यात मला जाणवलेले वैशिष्ट्य म्हणजे.. प्रत्यक्ष हिंसा, अथवा कसलाही अतिरेक - रडारड, आरडाओरडा इ न दाखविता, दहशतीचे जे वातावरण निर्माण केलेय-- त्याला तोड नाही.
रिबेका मधे प्रत्यक्ष ती व्यक्ती फारशी न दाखवता, नुसत्या बोलण्यातून/प्रसंगातून तिचे व्यक्तीमत्व साकारले आहे. आणि पूर्ण चित्रपटात तिच्या अस्तित्वाचा अनुच्चारीत तणाव सतत जाणवत राहतो.
"द मॅन ---- " मधे देखिल प्रत्यक्ष हिंसा न दाखवता देखिल ती दिसत राहते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

बरोबर आहे...सेन्सॉर कारण होते का त्यावेळेस, माहीत नाही...पण एकूण त्याला हवा तो परिणाम होतो हे मात्र खरे..प्रतिक्रियेबद्दल सर्वांचे आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

लेख आवडला.
हिचकॉकचे सायको, रिअर विंडो, नोटरईस, रबेका, सस्पिशन वगैरे पाहिले आहेत. बाकीचे वेळ मिळेल तेव्हा पाहणार आहे.

हिचकॅाक म्हणे नटी/नायिकेला फार चांगल्या प्रकारे वागवायचा असं वाचलेलं. >> हे वाचून आश्चर्य वाटलं कारण मी नेमकं उलटं वाचलंय. nudity, sexual harassment बद्दल माहित नाही पण त्याला हवा तसाच अभिनय, expressions मिळावे म्हणून तो बरंच manipulation करायचा. एकंदरच त्याच्यासोबत काम करणं अवघड होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विकांताला व्हर्टिगो पहिला. अतिशय आवडला.

रिलीज झाला तेव्हा प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनी याला नाकारले होते हे वाचून आश्चर्य वाटलं.
खाजगी गुप्तहेर, सुंदर स्त्रीचा पाठलाग, ती घरं, रस्ते, पार्श्वसंगीत वगैरेमुळे असेल कदाचित पण सारखा चायनाटाऊन आठवत होता.

मँडलीनच्या गेटपमधली किम नोवाक फारच आवडली. अगदी रिअर विंडोमधल्या ग्रेस केलीपेक्षादेखील. मला वाटतं आतापर्यंत मी जे हिचकॉकचे चित्रपट पाहिलेत त्यातली हि माझी सगळ्यात आवडती असेल!
पण ज्युडीच्या गेटपमधे अगदीच काहीतरी दिसते Sad केसांचा रंग, केशरचना, कपडे आणि (बहुतेक सगळ्यात महत्वाचे कारण) वजन यामुळे इतका फरक पडावा :O

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0