‘पुस्तक परिचय आणि पुस्तक परीक्षण’

रंगमुद्रा - माधव वझे... ह्या पुस्तकाचा परिचय वाचून माझ्या एका मित्राने ‘पुस्तक परिचय आणि पुस्तक परीक्षण’ ह्यातील फरक स्पष्ट करण्यास सांगितले. त्याला जे सांगितले ते इथेही चर्चाविषयात द्यावेसे वाटले. मी एक वाचक आहे, साहित्याची रूढ अर्थाने अभ्यासक नाही.
मी लिहिले ते असे ---
"परिचय म्हणजे एक तोंडओळख... ह्या पुस्तकात काय आहे, बस्स! आणि परीक्षण म्हणजे त्या पुस्तकात जे आहे त्याविषयी मला काय वाटते? परिचयाने एक वाचक म्हणून माझे मनोरंजन झाले, मला नवीन माहिती मिळाली. परीक्षण करताना आपल्यातील अभ्यासक जागा असणे....
ह्या माहितीने भरीव असे माझ्या काय हाती आले? माझ्यात value addition झाली का? ही value addition नक्की काय आहे?
त्या कला-प्रकाराकडे बघण्याच्या माझ्या आकलनात काही बदल घडला का? त्या निमित्ताने माझ्या दृष्टीकोनात आणि एकंदरीत जीवनविषयक जाणीवांत काही फरक पडला का? ह्याचा उपयोग त्या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करताना होत असेल का?
थोडक्यात, मनात नव्याने प्रश्न निर्माण होत रहाणे, त्यांच्या उत्तरांच्या दिशेने आपली वाटचाल सुरू राहणे आणि ते यथार्थ शब्दांत व्यक्त करता येणे म्हणजे परीक्षण!
अन ह्यासाठी साहित्याचा अभ्यासक असणे गरजेचे नाही असे मला वाटते. आपण जर सजगतेने जगत असू तर परीक्षक होणे अवघड नाही!"

इथल्या वाचकांची मते जाणून घेण्यास आवडेल.

(चर्चाविषय मध्ये `साहित्यिक' असा पर्याय नसल्याने `सामाजिक' असा पर्याय निवडावा लागला.)

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

पुस्तकातील मर्यादा व बलस्थाने याचे तुलनात्मक व साक्षेपी विवेचन केले कि ते परिक्षण. जे विद्वान लोक करतात. परिचयात पुस्तकाचे अंतरंगाची तोंडओळख एवढाच भाग येतो. जे वाचक करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

खरं म्हणजे अनेक शब्द आपण समानार्थी असल्यागत वापरतो. हे कदाचित नवनवे शब्द वापरण्याच्या, शैलीत वैविध्य आणण्याच्या हौसेपायी होत असावं का? शब्दांच्या सूक्ष्म छटा ध्यानात घेतल्या की एकाच शब्दाला घेऊन बसावं लागेल का?

पुस्तक परिचय आणि पुस्तक परीक्षण - या शब्दांचा कधी आजवर विचारच केला नव्हता.
आता करते विचार Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुस्तक परिचय हा पुस्तकाविषयी माहिती देतो. परीक्षण मात्र केवळ त्या विशिष्ट पुस्तकाविषयीच नव्हे, तर पुस्तकविषयाबद्दलही भाष्य करतं. परिचय कुणीही लिहू शकतं. 'वाचक' हे एकमेव बिरुद त्यासाठी पुरेसं असतं. परीक्षण लिहिणारा पुस्तकविषयाबद्दल विशेष आस्था बाळगणारा आणि त्या विषयातला ज्ञानी असावा अशी अपेक्षा असते. उदाहरणार्थ, ज्याविषयी लिहायचं ते पुस्तक गेल्या तीस-चाळीस वर्षांतल्या दिल्लीतल्या एखाद्या मराठी राजकीय नेत्याचं चरित्र असेल, तर मला अशोक जैन यांचं परीक्षण वाचायला आवडेल, कारण त्यांचा त्या वातावरणाशी पत्रकार म्हणून जवळून संबंध आला होता. म्हणजे ते विश्व आणि ती माणसं त्यांना परिचित होती. दुसरं कारण म्हणजे अशोक जैन यांना त्याविषयी काहीतरी रोचक म्हणता येतं हे एरवीच्या त्यांच्या लिखाणातून आपल्याला दिसतं. त्या वर्तुळात वावरणारे अनेक जण असतील; गप्पांमध्ये सांगण्यासारखे किस्से किंवा गॉसिप त्यांच्याकडे असेल, पण त्यांना त्याविषयी त्याहून अधिक काही म्हणता येईलच असं नाही. पण जैन ते म्हणू शकतील असं वाटतं.

म्हणजे, परीक्षण करताना १) संदर्भचौकट पक्की हवी, २) दिलेल्या द्रव्याचं (मटीरिअल*) पृथक्करण करून त्यात डावंउजवं करता यायला हवं आणि ३) परीक्षण वाचणारा माणूस पुस्तक वाचावं की वाचू नये याचा निर्णय करू शकेल इतपत सामग्री त्यात असावी. म्हणजे निव्वळ 'मला हे आवडलं' किंवा 'हे जमलेलं नाही' असे शेरे नकोत, तर त्यांना ठोस मुद्द्यांचा आधार हवा. 'पुस्तक वाचू नये' असा परीक्षणवाचकाचा अखेर निर्णय झाला तरी हरकत नाही; पण परीक्षणामुळे त्या पुस्तकाविषयीच्या किंवा लेखकाविषयीच्या किंवा पुस्तकविषयाविषयीच्या वाचकाच्या दृष्टीत काही भर पडली तर ते उत्तम.

(* - म्हणजे इथे पुस्तक. पण हे मुद्दे पुस्तकासारखेच सिनेमा किंवा इतर गोष्टींनादेखील लागू होतील.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हेच लिहायला आलो होतो. परीक्षणात तौलनिक मुद्देही येऊ शकतात. म्हणजेच, त्या पुस्तकविषयाबाबत आधी आलेल्या पुस्तकांतील लेखनाचा मुद्दाही असू शकतो. रादर, असला पाहिजे. थोडक्यात, अशा तुलनेतून परीक्षणविषय असलेल्या पुस्तकाचे संदर्भमूल्यही ठरवता आले पाहिजे. हे एक प्रकारे पुस्तकाच्या खरेदीसाठीचे सल्ला-मार्गदर्शनही होऊ शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्कि व्याख्या माहित नाहि. माझ्यापुरती मी तयार केलेली व्याख्या अशी आहे:

परिक्षण म्हणजे एखाद्या कलाकृतीची वेगगेवळ्या कसोट्यांवर परिक्षा करता हाती काय लागले त्याचा लेखाजोखा, तर परिचय म्हणजे ज्या व्यक्तीने त्या कलाकृतीचा अस्वाद घेतलेला नाहि त्या व्यक्तीला त्या कलाकृतीची करून देण्यात आलेली ओळख.

परिक्षण करताना टार्गेट वाचक हा साधारणतः त्या किंवा तत्सम कलाकृतीचा आस्वाद घेतलेला असतो तर परिचय त्या उलट नव्या आस्वादकांना आवाहन करणारा करतो.

(इंजिनियरिंगच्या सवयीने एक उदा देऊन उत्तर मोठे अक्रत आहे Wink
एखादे हॉटेल कुठे आहे, तिथे कशा प्रकारचे पदार्थ मिळतात, तिथे खाण्यासारखे काय आहे, वातावरण कसे आहे वगैरे ओळख करून देणे हा परिचय झाला. तेथील वातावरणाची, पदार्थांच्या चवीची, एकूणच सर्विसची काहि कसोट्यांवर केलेल्या परिक्षेतून काय माहिती मिळाली हे मांडणे म्हणजे परिक्षण

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'परिचय' पुस्तकाबद्दल माहिती सांगू शकेल पण 'परीक्षण' किंवा 'समिक्षा' - साहित्यिक समिक्षा व त्यापलिकडे पुस्तकाचा तत्कालीन समाजजिवनाशी असलेला आंतरसंबंध उलगडून दाखवण्याचा प्रयत्न असू शकेल, बटाट्याची चाळ ही तात्कालिन समाजाशी/+राजकारणाशी कशाप्रकारे संबंधित आहे हे सांगणारे 'परीक्षण' असते, त्यातून लेखकाच्या भुमिकेच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो व तोच उद्देश योग्य वाटतो.

स्टॉटहार्ड केस बद्दल वाचतानाच परिचय/परीक्षण/समिक्षेबद्दल विस्तृतपणे वाचले, त्यानिमित्ताने ह्या धाग्यावरचे प्रतिसाद अधिक बोलके असतील अशी अपेक्षा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0