आदिवासींचे काही फोटो

सध्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅपमुळे दिनकर मनवरांची एक कविता, एक ठरावीक ओळ, कवीवर गुन्हा दाखल करणं, त्यावरून फेसबुकवर नेहमीची धुळवड वगैरे गोष्टी वाचल्या. तक्रार दाखल केल्याची बातमी वाचली. तक्रार दाखल करणारे सगळे पुरुष आहेत. उगाच आपला विद्रटपणा.

माझ्या आजोळच्या गावाजवळ कातकरी वाडी आहे. साधारण १००-२०० लोकांची वस्ती. वाडीच्या विहिरीच्या शेजारच्या घरात पाहुणचार घेत असताना बसल्या जागी काही गोष्टी दिसत होत्या. चार पावलं चालून काढलेले फोटो. सगळे फोटो साडेतीन वर्षांपूर्वीचे. फोटोत फार पुरुष नाहीत, कारण आसपासच्या वाड्यांमध्ये क्रिकेटचे सामने सुरू होते. वाड्यांमधले बहुतेकसे पुरुष, मुलगे तिथे खेळत होते.

मोठ्या फोटोंसाठी फोटोवर क्लिक करा.

पोरी आणि एक पोरगा

कष्टकरी कातकरी

कष्टकरी कातकरी

लाकूडफाटा

खरेदी

पाणी शेंदणारी म्हातारी

स्मित

क्रिकेट
क्रिकेट स्पर्धा

शेती
शेती

संध्याकाळ
सायकल संध्याकाळ

मायलेक
मायलेक

जांभळे स्तन? रसायनांच्या वापरांमुळे?

फेअर अँड लव्हली

मूळ कवितेतलं "आक्षेपार्ह" ओळ असणारं कडवं -

काळं असावं पाणी कदाचित
पाथरवटानं फोडलेल्या फाडीसारखं राकट काळं
किंवा आदिवासी पोरीच्या स्तनासारखं जांभळं
किंवा पाणी हिरवं नसेल कशावरून?
(पाणी कसं अस्तं हे मला अजूनही कळू दिलेलं नाहीये)

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

फेसबुककृपेनं हे फोटो आज दिसले.

स्क्रीनशॉट

स्क्रीनशॉट

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

व्हॉटसॅप वरती वावर शून्याच्या आसपास, फेसबुकवर सुद्धा तेच त्यामुळे तसेच खरं तर बातम्या वाचत नसल्यामुळे मला ही बातमी आत्ता वाचायला मिळते आहे. पाटी कोरी असल्याने माझे मत मला नीट कळू शकते आहे. या जागी 'सीकेपी मुलीच्या' किंवा 'ब्राह्मण मुलीच्या' असा शब्द घातला असता तर मला निषेधार्ह वाटला असता. Sad मी माझ्या जातीला कवटाळत नसले तरी स्वत:ला तिच्याशी आयडेंटिफाय करते.

पोएटिक लायसन्स असतोच. पण शिक्षणक्रमात वादग्रस्त (ठरु शकेल असे पोटेन्शिअल असणारी) कविता टाकायची की नाही हा विचार विद्यापीठाने करणे आवश्यक होते. जरी पश्चात्बुद्धी महाग असते व त्यावेळी विद्यापीठाला अंदाज आलेला नसेल तरी, आता तरी उडवा ती कविता.
_____
हिंसक कृती किंवा धमकावणे हे निषेधार्हच आहे परंतु प्रखर शब्दात (धमकी नाही) निषेध व्यक्त केला तर 'फ्रीडम ऑफ स्पीच' वाल्यांची हरकत असू नये.
____________
अजुन एक मुद्दा आहे तो वेगळा मांडते आहे कारण त्याचा विस्तार होउ शकतो. जातीच्या चौकटीत, २ प्रकारे ती कविता वाचता येइल, एक तर स्वत:ची जात त्या शब्दाच्या ठिकाणी घाला किंवा स्वत:ला त्या जातीत कल्पा. आतापर्यंतची जातीव्यवस्थेची उतरंड का भाजणी /व्यवस्था काहीही म्हणा, पण काही लोक हे त्यांच्या जाती-जमातीबद्दल संवेदनशील असूही शकतात. त्या ओळीचा विशेषत: मुलीबाळींच्या संदर्भात, त्यांनी अतिसंवेदनशीलतेमधुन लावलेला अन्वयार्थ मला कळू शकतो. पूर्णविराम.
अजुन एक, कविने ती कविता लिहावी की नाही हा मुद्दा नाहीच, विद्यापीठाने ती ठेवावी का हा मुद्दा आहे.
__________
अवांतर - आत्ताचे ग्रहमान एकंदर सर्वांकरता - There can be tense communications (बुध). We can become obsessed(प्लूटो) with getting our message across and for others to agree with our ideas. Mental(बुध) anxiety(प्लूटो) or troubles could manifest now. We should avoid attempts to force our opinions on others and strive to maintain an open mind. Compulsive(प्लुटो) thinking(बुध) is possible. On the other hand, this influence can suggest the ability to engage in deep, penetrating (प्लूटो)communication(बुध). Ideally, we learn more about our vulnerabilities through our reactions.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परंतु प्रखर शब्दात (धमकी नाही) निषेध व्यक्त केला तर 'फ्रीडम ऑफ स्पीच' वाल्यांची हरकत असू नये.

.
एकदम सहमत.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि मला वाटत होतं, मला कविता समजत नाहीत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एखाद्या सामाजिक संस्थळावरती दोन्ही बाजूंचे प्रातिनिधिक विचार व्यक्त होणेच आवश्यकच आहे की. ज्यांना कविता समजतात त्यांचे ही व ज्यांना समजत नाहीत त्यांचेसुद्धा.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळात आदिवासी हा शब्द जातीवाचक आहे का? असला तरीही कवितेच्या संदर्भात तो आणि इतर आक्षेपार्ह शब्दांचा उल्लेख कसा आला आहे हे पाहणे मला महत्त्वाचे वाटते. काही आदिवासी जमातींमध्ये स्तन झाकण्याची देखील पद्धत नसते. त्यांच्या संदर्भात हा शब्द अगदी नेहमीचा इतर शब्दांसारखा असू शकतो.

या जागी 'सीकेपी मुलीच्या' किंवा 'ब्राह्मण मुलीच्या' असा शब्द घातला असता तर मला निषेधार्ह वाटला असता.

तुम्ही ब्राह्मण/सीकेपी असे प्रमाण शब्द वापरलेत त्यामुळे कानाला खटकू शकते. पण तेच जर याच कवितेत 'बामनाच्या पोरीच्या स्तनासारखं गोरं' असा उल्लेख असता तर ते तितके खटकणारे वाटले असते का?

बाकी जो विरोध चालू आहे तो पाहता आणि त्यात सहभागी असणारी विद्यार्थी संघटना पाहता यामागे राजकीय शक्ती आहेत हे उघड आहे.

- ओंकार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओंकार, पॉइन्ट आहे. छान मुद्दा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साडेतीन वर्षांपूर्वीचे फोटो म्हणजे फार जुने नाहीत. फोटोंतल्या स्त्रिया विहिरीवरून पाणी भरून नेत आहेत. विहिरीला धड रहाट नाही. काही पोरांच्या पायांत चपला नाहीत. आणि जातीपाती-अस्मितांची लढाई करणं महत्त्वाचं आहे का?

ही कविता वगैरे मला जिथून आलं, या फोटोंत जी वाडी आहे, तिथूनच दोन दिवसांपूर्वी हे फॉरवर्डही आलं -

कृपया पोस्ट काळजीपूर्वक वाचून हालीचे हाल कमी व्हावेत म्हणून प्रयत्न करुयात...मराठीच्या पुस्तकात असलेल्या आणि राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्राप्त करणाऱ्या हालीच्या अडचणी सोडवूयात.

प्रत्यक्ष मुलाखत - हाली बरफ
जि. प. शाळा - कुकांबे
केंद्र - बिरवाडी.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••

काम नाही अन् राहायला घर नाही..!!!

परवड-राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या हाली बरफची अवस्था.

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या लहानग्या बहिणीला बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून सहीसलामत वाचवणा-या हाली बरफ या मुलीला भारत सरकारने २०१२/२०१३ मध्ये वीर बापू गायधनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. माञ शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या रणरागिणीला सध्या स्थलांतरिचे जीवन जगावे लागत आहे. ठोस रोजगार नाही अनं राहायला घर नाही, अशीच तिची परवड सुरु आहे.
शौर्यविजेत्या शहापूरच्या हाली बरफचा इतिहास आदर्श शालेय वयातच राज्यातल्या विद्यार्थ्यांमध्ये पेरला जावा, म्हणून इयत्ता चौथीच्या अभ्यासात 'धाडसी हाली' हा पाठ समाविष्ट करण्यात आला आहे.
आज माझ्या विद्यार्थ्यांना हाली बरफचा पाठ शिकवायचा होता. हाली बरफ आमच्या शाळेच्या अगदी जवळच एक ते दीड कि. मी वर रहाते. मग काय? हाली बरफला आलो शाळेत घेऊन. प्रत्यक्ष हाली बरफ समोर असल्यामुळे विद्यार्थ्यांना सदर पाठ जिवंत पणाचा अनुभव देऊन गेला. मुलांनी विविध प्रश्न व पाठातील प्रश्न विचारुन प्रत्यक्ष मुलाखत घेतली. तिच्या धाडसाचे शिक्षकांनी तोंडभरून कौतुक केले. शाळेने तिच्या कुटुंबांसाठी किराणा भरुन दिला आणि आर्थिक मदत केली.
शेवटी मुलांचा निरोप घेताना सर्व मुलांना हालींने सांगितले की, आलेल्या कोणत्याही संकटाला हिंमतीने सामोरे जा. घाबरु नका.
'धाडसी हाली' पाठ जिवंत झाला पण तिचा अठराविश्व दारिद्र्याशी चाललेला संघर्ष ऐकून मन हेलावले गेले. पती आणि तीन मुलांसह हाली अगदी हालाखीचे जिवन जगत आहे. राहायला तर घर नाहीच पण रेशन दुकानातून रेशन घ्यायला साधी शिधापञिका पण नाही. वेळप्रसंगी या शौर्यविजेतीला विट्टभट्टीवर मोलमजुरी करावी लागत आहे. इतकेच नव्हे तर उपासमारिलाही सामोरे जावे लागत आहे.

मायबाप सरकार ऐकतोय ना...?
=========================
जि. प. शाळा कुकांबे
केंद्र - बिरवाडी
(शब्दांकन- राजेंद्र लांडगे पाटील-प्राथमिक शिक्षक शहापूर तालुका)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हेलावलो! माहितीबद्दल thank you.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आम्ही मजकूराशी सहमत असूच असे नाही.
कितीही संतापजनक असलं तरी लेखकाच्या लिहिण्याच्या विकल्पाला आमचा फुल्ल पाठींबा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखकाच्या लिहिण्याच्या विकल्पाला आमचा फुल्ल पाठींबा.

सेम हिअर!
पण मग विद्यापीठाने ती कविता अभ्यासक्रमात ठेवण्याचा विकल्प असला तरी विवेकाने, तो राबवू नये कारण सामाजिक असंतोष उद्भवु शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या एवढ्या प्रतिसादापुरतं प्रताधिकाराचं नाव टाकत्ये. मला व्हॉट्सॅपवर जेवढी कविता पाठवली गेली ती ही -

पाणी कसं अस्तं?

पाणी हा शब्द
मला कसाही उच्चारायची मुभा नाहीये
मी ऐकू शकत नाही पाण्याचा आवाज
की चालून जाऊ शकत नाही पाण्याच्या पायरीवरून

पाणी कसं अस्तं आकाशासारखं निळंशार
किंवा अंगठा छाटल्यावर उडालेल्या
रक्ताच्या चिळकांडीसारखं लालसर
पाणी कसं अस्तं स्वच्छ पातळ की निर्मळ?

काळं असावं पाणी कदाचित
पाथरवटानं फोडलेल्या फाडीसारखं राकट काळं
किंवा आदिवासी पोरीच्या स्तनासारखं जांभळं
किंवा पाणी हिरवं नसेल कशावरून?
(पाणी कसं अस्तं हे मला अजूनही कळू दिलेलं नाहीये)

जे तुंबवून ठेवलेलं अस्तं तळ्यात ते पाणी अस्तं?
पोहऱ्यानं पाणी उपसून घेतलं तर विहिरीतलं पाणी विटतं?
पाणी धारदार वाहतं झुळझुळतं मंजुळ गातं ते पाणी अस्तं?
गढूळ, सडकं, दूषित, शेवाळलेलं, गटारातलं, मोरीतलं
या पाण्यावरचे निर्बंध अजूनही उठविले गेले नाहीत काय?
पाणी ढगातून बरसतं तेच फक्त पाणी अस्तं?
नि दंगली घडवतं ते पाणी नस्तं?

पाणी पावसातून गळतं जमिनीवर
बर्फ वितळल्यावर पसरतं पठारांवर
नदीला पूर आल्यावर वेढून घेतं गावं
.
.
.

ही बातमी: Mumbai University pulls down poem from TYBA Marathi syllabus

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शाळाकॉलेजात संस्कृत वाचनात आल्यामुळे स्त्रियांच्या अंगप्रत्यंगांची वर्णने वाचायची सवय आहे.

वरच्या लेखनावरून पूर्वी वाचलेला 'विश्वगुणादर्शचम्पू' ह्या काव्यातला श्लोक आठवला. तो येणेप्रमाणे -

नान्ध्रीपयोधर इवातितरां प्रकाशो नो गुर्जरीस्तन इवातिततरां निगूढ:|
अर्थो गिरामपिहित: पिहितश्च किञ्चित्सौभाग्यमेति मरहट्टवधूकुचाभ: ||
आन्ध्र स्त्रीच्या स्तनासारखा संपूर्ण उघडा नाही आणि गुर्जरस्त्रीच्या स्तनासारखा पूर्णत: झाकलेला नाही असा, मराठी स्त्रीच्या स्तनासारखा, वाणीचा अर्थ थोडा झाकलेला आणि थोडा स्पष्ट असला तर शोभून दिसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुपट्टे को आगे से दोहरा न ओढ़ो
नुमूदार चीज़ें छुपाने से हासिल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाणीबद्दल (वाचा) खूप छान श्लोक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटोतील बाळसेदार बाळ अतिशय गोड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फेस्बुकावरच्या पोष्टीत 'आदिवासी स्त्रियांचे फोटू' असं लिहून टिचकीभक्ष्य केल्याबद्दल संपादकांचा णीशेद.
फोटो बरे आहेत. एसेलारने काढलेले फोटू चांगलेच दिसतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

फेसबुकवर डोकावुन आले. खरच तिकडे ॲलिस इन वंडरलँड पेक्षाही अद्भुत धुळवड चालते असे लक्षात आले. इथे, या संवेदनशील विषयावर सगळेजण (ऑलमोस्ट) संदिग्ध बोलतात किंवा मूग गिळून गप्प बसतात की काय असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Free speech हे सगळीकडे धोकादायक बनत चाललेले आहे.
जॉर्डन पीटरसन ने सुद्धा ह्याविरोधी आघाडी उघडलेली आहे.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक मुद्दा असा होता (जो की माझ्याही ताबडतोब लxआत आला होता) तो म्हणजे वरती अदितीने लिहील्याप्रमाणे पेटिशन मांडणारे सर्व पुरुष आहेत. अर्थात स्त्रियांचा उपयोग करुन घेतला गेलेला आहे आणि 'या आमच्या स्त्रिया, आमची मालमत्ता' असे एकंदर अविर्भाव आहे.
पण मला असे वाटले की - हे तर नाकारु शकत नाही ना की अजुनही समाजात आई-नबहीणीच्या नावाने शिव्या दिल्या जातात. म्हणजे स्त्रियांनाच टार्गेट केले जाते. ही वस्तुस्थिती आहे. कितीही कडवट असली तरी ती बदलत नाही.
_________
कविच्या अभिव्यक्तीबद्दल मला एकही अवाक्षरही विरोध करायचा नाही. 'कवि मनवर आम्ही तुमच्या बरोबर आहोत' वगैरे नारेही द्यायचे नाहीत कारण बरोबर असायला मूळात विरोध नाहीच. मुद्दा विद्यापीठाने लावावी का एवढाच आहे/होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण मला असे वाटले की - हे तर नाकारु शकत नाही ना की अजुनही समाजात आई-नबहीणीच्या नावाने शिव्या दिल्या जातात. म्हणजे स्त्रियांनाच टार्गेट केले जाते. ही वस्तुस्थिती आहे. कितीही कडवट असली तरी ती बदलत नाही.

.
बघ हां. प्रतिवाद करतो.
.
आईबहीणीच्या नावाने शिव्या दिल्या जातात व पुरुषांना त्यां झोंबतात व पुरुष त्याचा अर्थ स्वत:चा अपमान झाला असा काढतात. A man's honor, respect is invested in a woman. Anything that disparages the man's woman pains him and makes him respond. ...... why do you not want that ?
.
.
-------------
.
आता तू लगेच म्हणणार की - A man's honor, respect is invested in a woman - gets extended to "man owns the woman".
.
पण त्याचाही प्रतिवाद करतो -
.
If a Pakistani terrorist attacks an Indian citizen - the Indian army considers that as a challenge to them and their capability. And the Indian army responds with violent force. Does that mean the Indian Army owns Indian Citizen ?
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेच पुरुष ज्यांचा मान सन्मान स्त्रीशी निगडित असतो ते स्वस्त्री/स्वस्त्रियांना फार आपुलकीने वागवत असतील असे नाही ना गब्बर. म्हणजे यांना डरकाळ्या फोडायला आई-बहीण-बायकोची एक्स्क्युज पुरते पण त्याच आई-बहीण-बायकोला खाजगीत प्रतिष्ठा दिली जात नाही. वर असे पुरुष स्वत: आई-बहीणीवरुन शिव्या देणारच नाहीत याची गॅरंटी काय? म्हणजे इन जनरल स्त्रियांविषयी अनास्थाच असते, फक्त आमच्या आईबहीणी हे आमचे राखीव कुरण आहे असाच अविर्भाव असतो. तिथे मालमत्ताधिकारशाहीच येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घागर घेतलेल्या बाईचा फोटो आवडला, किंचित डेस्कटॊपी वाटला तरीही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण चोली के पीछे क्या है वर अशीच धुळवड झाली होती का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

या संदर्भात ही बातमी.

मथळा: राज्याला भयमुक्त करा; २५० साहित्यिकांचे सीएमना पत्र

लीड (मराठी?- ): ‘कवी दिनकर मनवर यांच्या कवितेचा चुकीचा अर्थ लावून तथाकथित आदिवासी संघटना व विद्यार्थी संघटना यांनी हेतूपुरस्पर माजवलेला वादंग तसेच मनवर यांना अर्वाच्य भाषेत दिलेल्या अश्लाघ्य धमक्या, त्यांच्या विरोधातली दलित अत्याचारविरोधी कायद्याचे हत्यार वापरून कारवाईची मागणी हे प्रकार अत्यंत चिंतनीय आणि धोकादायक वाटतात,’ अशा शब्दांत राज्यातील सुमारे अडीचशे लेखक, कवी व पत्रकार यांनी या प्रकाराकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

- ओंकार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला/इतर डोंगरभटक्यांना नेहमीच भेटतात आदिवासी. पण फोटो काढू शकत नाही. किंवा खूप संपर्क करता येत नाही.
लोकांचं जीवन आतून आणि बाहेरून जाणून घ्यायचं असेल तर स्त्री असणे गरजेचं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिनकर मनवर यांचे निवेदन

मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात लागलेल्या माझ्या “दृश्य नसलेल्या दृश्यात” या कवितासंग्रहातील “पाणी कसं अस्तं” या कवितेत पाण्याच्या रंगांसाठी वेगवेगळ्या प्रतिमांचा उपयोग केलेला आहे. त्यातील एका प्रतिमेमुळे एका समाजगटाच्या भावना दुखावल्या गेल्याचे निदर्शनास आले आहे. त्याविषयी मी कवी या नात्याने निःसंदिग्धपणे स्पष्ट करू इच्छितो की ती विशिष्ट ओळ लिहिताना तसेच लिहिण्याआधी आणि लिहिल्यानंतरही माझ्या मनात कुणाच्याही भावनांशी खेळण्याचा किंवा कोणत्याही स्त्रीवर्गाची अवहेलना करण्याचा कोणताही हेतू नव्हता व नाही.

मी स्वतः आणि माझ्या कवितेचा आवाजही कायम नाही रे वर्गाच्या, शोषितांच्या, पिडितांच्या बाजूने व्यक्त होणारा आहे. समाजातल्या सर्व विषमतांविषयी बोलण्याचे आणि बंधुभावयुक्त अशा व्यापक मानवतेचे स्वप्न पाहाण्याचे एक माध्यम म्हणून मी कवितेकडे पाहातो. त्यामुळे आपल्या लिखाणातील एखाद्या ओळीमुळे आपलीच माणसे दुखावली जावीत याचा मलाही खूप त्रास होत आहे. कवी म्हणून माझी ही भावना आपण समजून घ्याल अशी मी प्रार्थना करतो.

“पाणी कसं असतं” या कवितेबाबत मी नम्रपणे हे सांगू इच्छितो की येथे 'पाणी' ह्या प्रतिमेचा वापर जगण्याच्या वेदनांविषयी आहे. शोषणाने नियंत्रित केलेल्या व्यवस्थेवर भाष्य करताना पाणी प्रतिमेचा वर्णनात्मक, उपमा, प्रतिक म्हणून वापर केलेला आहे. एका ओळीत “अंगठा छाटल्यावर उडालेल्या रक्ताच्या चिळकांडीसारखं लाल पाणी” हे महाभारतातल्या आदिवासी नायकाची – एकलव्याची आठवण करून देण्यासाठी योजलेले आहे. “आदिवासी पोरीच्या स्तनांसारखं जांभळं पाणी” या ओळीत आदिवासी समाजाचं निर्मळ, निष्पाप, निष्कपट आणि नैसर्गिक आणि शोषणाचे निर्बंध नाकारणारं मुक्त जगणं याचं प्रतिक म्हणून वापरलेलं आहे. पाणी कसं असावं याचे अंदाज या कवितेत बांधले आहेत आणि या अंदाज बांधण्याचाच एक भाग म्हणून, कल्पना करण्याचा भाग म्हणून, ही ओळ आलेली आहे. इथे स्तन हे सृजनाचे प्रतिक आणि जांभळा रंग हा पहाडी कणखरपणा, खणखणीत अव्वल दर्जाची निर्मळता याचे प्रतिक म्हणून मनात आलेले आहेत. यातून कोणत्याही प्रकारची लैंगिकता, किंवा भावना चाळवण्याची, अवहेलनेची-उपमर्दाची कृती किंवा लैंगिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक आदी कोणत्याही गैरवर्तन/दुर्वतनाचे सूचन दुरान्वयानेही झालेले नाही. मात्र दुर्दैवाने या कवितेचे अर्थनिर्णयन अस्मितेच्या राजकारणातून झाल्याने पूर्णपणे चुकीच्या दिशेने गेले आहे.

व्यवस्थेने धर्म आणि संस्कृतीच्या आडोशाने भूमी,जंगल, हवा,पाणी या निसर्गदत्त देणग्यांवर सत्ता प्रस्तापित केली आहे. परिणामतः 'पाणी' या निसर्गदत्त घटकापासून एका मोठ्या समूहाला वंचित ठेवण्यात आले आहे. हा आशय ह्या कवितेचा प्रधान आशय आहे. राहिला प्रश्न प्रस्तृत ओळीचा तर या ओळीत पाण्याची जी मंगलमय रूप आहेत त्यात आकाशासारखं निळंशार, पाथरवटाच्या श्रमासारखं काळंभोर, तर 'आदिवासी पोरीच्या स्तनांसारखं जांभळं' असं म्हणताना या ओळीतील प्रतिमा लक्षात घेणे गरजेचे आहे. 'आदिवासी' हा संबोध मी येथील मूळचे रहिवाशी या अर्थाने वापरला आहे. जात वा जातीवाचक अर्थाने वापरला असता तर तो गौंड , भिल्ल, ठाकर या सारख्या संबोंधनांनी सूचित केला असता. इथे 'आदिवासी स्री' ही या विश्वाची आदिमाया आहे व तिचे स्तन हे डोंगर आहेत. या स्तनातून म्हणजे डोंगरातून प्रवाहित होणारे पाणी हे जीवणदायीच आहे. निळ्या आकाशाखालील काळ्या डोंगराचा हा रंग जांभळाच आहे. परिणामतः हा आदिमायेच्या स्तनाचाच रंग आहे असे मला अभिप्रेत आहे. ही आदिवासी स्री जात संबोधातून विचारात घेतली जात असल्याने या ओळीचा वा कवितेचा चूकीचा अर्थ लावण्यात येत आहे जो कवी म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणून अपेक्षित नाही.

पाणी या आशयसूत्राला धरून मी आणखीही काही कविता लिहील्या असून त्यांचा संबंधही शोषणमुक्त संस्कृतीच्या शोधाशी आहे. या सर्व कविता एकमेकींच्या संदर्भात वाचायच्या आहेत. ज्यांनी कविता शिकवायची आणि समाजाला समजावून सांगायची त्यांनीच जर गैरसमजाच्या आहारी जाउन तिचा गैर अर्थ लावला तर ते फारच खेदकारक आणि वैषम्य वाटणारे ठरेल.

माझ्या 'दृश्य नसलेल्या दृश्यात' या संग्रहातील 'पाणी कसं अस्तं' या कवितेतील एका ओळीमुळे माझ्या बांधवाच्या आणि भगिनींना मानसिक क्लेष झाला. माझा काही हेतू नसताना या सर्वांच्या भावना दुखावल्या गेल्यात याचे मला अतिशय दुःख झाले. मी मनापासून माफी मागतो.

अभ्यासक्रमातून या कवितासंग्रहातील ती विशिष्ट कविता वगळलेली आहे. माझी विद्यापिठाला विनंती आहे की, माझा हा कवितासंग्रह अभ्यासक्रमातून वगळावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मांडणी थेट आहे. प्रत्यक्ष कविने आपल्या कवितेविषयी लिहीलेलं आहे तेव्हा अर्थ तर नि:संदिग्ध प्रकट झालेला आहे. निवेदन प्रांजळ तसेच थेट आहे. आतासुद्धा कोणी भावना दुखावुन घेत बसलं तर त्यांच्याकडे संपूर्ण दोष जाइल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0