टेस्ला आणि इलॉन मस्क - भाग 3.

विसाव्या शतकातली वाटचाल

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकन आणि युरोपीय रस्त्यांवर बिनघोड्यांच्या गाड्या धावायला सुरुवात झाली होती. आणि त्यावेळी गाड्या तेलावर चालवायच्या की इलेक्ट्रिसिटीवर चालवायच्या हा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नव्हता. बहुतांश इंजिनं तेलावर चालणारी होती. पण एडिसनसारख्या संशोधकांनी आपल्या इलेक्ट्रिसिटीवर चालणाऱ्या गाड्यांची जाहिरात केलेली होती. 1900 साली अमेरिकेत चालणाऱ्या गाड्यांपैकी 28 टक्के गाड्या इलेक्ट्रिक होत्या. एकदा चार्ज केल्यावर सुमारे 100 किलोमीटर जाणाऱ्या गाड्या अतिश्रीमंतांसाठी उपलब्ध होत्या. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांनी त्यांच्या सीक्रेट सर्व्हिस एजंट्सबरोबर वॉशिंग्टन डीसी भागात इलेक्ट्रिक गाड्यांनी प्रवास केल्याबद्दल विकीपीडियात उल्लेख आहे.

पण त्यानंतर पुढच्या काही दशकांत ज्या घटना घडल्या त्यामुळे इलेक्ट्रिक इंजिनाच्या गाड्या मागे पडल्या. एक म्हणजे रस्त्यांचं जाळं सुधारल्यामुळे एकदा पेट्रोल भरलं किंवा चार्ज केली की गाडी किती अंतर जाऊ शकते हे महत्त्वाचं ठरायला लागलं. या बाबतीत आंतर्ज्वलन ( internal combustion) इंजिनाच्या गाड्या सरस ठरायला लागल्या. त्यात टेक्ससमध्ये तेल सापडल्यावर तेलाच्या किमती घसरल्या. आणि तेलावर चालणाऱ्या गाड्या स्वस्त पडायला लागल्या. त्यात इंजिन स्टार्टरच्या शोधामुळे गाडी सुरू करण्यासाठी जी प्रचंड मोठी चावी मारायला लागायची तिची गरज पडेनाशी झाली. जुन्या काळच्या तेलावरच्या गाड्यांचा आवाज प्रचंड व्हायचा. तो आवाज कमी करणाऱ्या मफलर्सच्या शोधामुळेही त्या गाड्यांची किंमत वधारली. 1913 ला फोर्ड कंपनीने आपली मॉडेल टी गाडी बनवायला सुरुवात केली. गाडी बनवण्यासाठी लागणारी प्रक्रिया अतिशय सोपी केली. त्यासाठी कामगारांना दुप्पट पगार देऊ केला, आणि त्यांनाही गाड्या परवडतील इतक्या स्वस्त गाड्या तयार करायला सुरुवात केली. फोर्ड कंपनीच्या गाड्या आंतर्ज्वलन इंजिनावर आधारित होत्या. पेट्रोल भरणं सोपं, इलेक्ट्रिक चार्ज भरणं कठीण. एकदा पेट्रोल भरलं की गाडी दीडदोनशे मैल जाऊ शकते, पण चार्ज भरून जेमतेम शंभर मैल. त्यातही पेट्रोल स्वस्त इलेक्ट्रिसिटी महाग. या सगळ्यामुळे इलेक्ट्रिसिटीवर चालणाऱ्या गाड्या मागे पडल्या. त्यात 1930 साली जनरल मोटर्सच्या पुढाकारात आणि स्टॅंडर्ड ऑइल कंपनीच्या सहकार्याने एक नवीन कंपनी स्थापन करून तिने देशभरच्या ट्रॅम कंपन्या विकत घेतल्या. त्या व्यवस्थितपणे मोडून काढून त्यांच्या जागी जनरल मोटर्सच्या बस वापरायला सुरुवात केली.

त्यानंतर 1950 च्या दशकात अमेरिकन सरकारचं धोरणही महाप्रचंड रस्तेबांधणीकडे वळलं. दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास ताजा असल्यामुळे रणगाड्यांचा ताफा एका ठिकाणाहून दुसरीकडे नेता येण्याजोगे महारस्ते बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी रेल्वेसारख्या सार्वजनिक वाहतुकीचं प्रारूप डावलून कारवर आधारित वैयक्तिक प्रवासाचं प्रारूप स्वीकारलं गेलं. या निर्णयामागे अर्थातच बड्या तीन कंपन्यांचं - जीएम, फोर्ड, क्रायस्लर - लॉबिइंग कारणीभूत आहे असं मानलं जातं.

त्याकाळपासून ते आजतागायत अमेरिकन संस्कृतीवर 'कार' या संकल्पनेचं वर्चस्व राहिलेलं आहे. महायुद्धानंतरच्या दशकात अमेरिकेत आर्थिक वाढ प्रचंड जोरात झाली. इतर महासत्तांना - इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, रशिया - युद्धाचा प्रचंड फटका बसला होता. अमेरिकेने काही सैनिक गमावले, पण त्यांच्या देशाला व तिथल्या उद्योगांना फारशी तोशीस पडलेली नव्हती. किंबहुना युद्धात सरकारने केलेल्या गुंतवणुकीमुळे तेजीच होती. या युद्धग्रस्त सत्तांना उत्पादनं पुरवायला अमेरिका हा एकच देश समृद्ध आणि सबल होता. त्यामुळे अर्थातच त्यांच्या मालाला मागणी होती, आणि त्यातून आलेली सुबत्ता बऱ्याच जनतेपर्यंत पोचली. शहरात काम आणि उपनगरांत बगीचा असलेलं घर हे अमेरिकन स्वप्न अनेकांसाठी प्राप्य झालं. आणि शहर ते उपनगर प्रवासाची गरज कार आणि रस्त्यांनी भागवली.

या भरभराटीमध्ये सत्तरच्या दशकात अडथळा आला. टेक्ससमध्ये सापडलेलं तेल संपण्याची लक्षणं दिसायला लागली. मात्र अमेरिकन गाड्यांची आणि त्यांच्या मालकांची तेलाची मागणी वाढतच होती. घरचं संपलं तर बाहेरून मागवा, आपल्याकडे आहे पैसा, ही भूमिका होती. पण सत्तरच्या दशकात मध्यपूर्वेतल्या तेल पुरवठा करणाऱ्या देशांनी आपली ओपेक ही संस्था स्थापन करून कोणी कोणाला किती भावाने तेल विकायचं यावर मर्यादा आणल्या. थोडक्यात 'आमच्याकडे तेल आहे, तुम्हाला गरज आहे, तेव्हा आम्ही सगळे तेलवाले देश मिळून तुम्हाला किती भावाने द्यायचं हे ठरवू' असं त्यांनी म्हटलं. आणि तेलाच्या प्रत्येक बॅरलमागे मोठ्या प्रमाणात नफा वसूल करायला सुरुवात केली. त्याच सुमाराला जगभराच्या आर्थिक वातावरणात 'स्टॅग्ल्फेशन' निर्माण झालेलं होतं. आर्थिक व्यवस्थेत तुमची इकॉनॉमी जोराने वाढत असेल तर भरपूर नोकऱ्या, सगळ्यांना पैसा आणि किमतींत वाढ - इन्फ्लेशन होणार. याउलट इकॉनॉमी जर घटत असेल तर मालाला उचल नाही, त्यामुळे कंपन्या तोट्यात, त्यामुळे कमी नोकऱ्या, मोठ्या प्रमाणावर बेकारी. ही दोन वेगवेगळी चित्रं आलटून पालटून दिसतात. दोन्हींचे फायदे आणि तोटे असतात. मात्र सत्तरीच्या दशकात या दोन्हीचे तोटेच फक्त दिसत होते. मोठ्या प्रमाणावर किंमतवाढ आणि नोकऱ्यांमध्ये घट हे एकत्र आलेलं होतं. त्याजोडीला आलेल्या तेलाच्या किमतीतल्या वाढीमुळे अमेरिकन सरकारने आपला तेलावरचं अवलंबन कमी करण्यासाठी अनेक निर्णय घेतले. त्यातून पुढच्या काही दशकांत प्रत्येक कंपनीने अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या आपल्या गाड्यांची सरासरी एफिशियन्सी किंवा माइल्स पर गॅलन किती असावेत यावर बंधनं घातली गेली. सत्तरीच्या दशकांत विकल्या जाणाऱ्या गाड्या या गॅलनला 12-15 मैल (लीटरला 5-7 किमी) द्यायच्या. आताच्या गाड्या सर्रास त्याच्या दुप्पट मायलेज देतात.

नव्वदीच्या दशकात पुन्हा एकदा अमेरिकेत सुबत्तेचा पूर आला. सेमिकंडक्टर आणि त्यातून येणारी मोबाइल/इंटरनेट क्रांती त्याच्या मुळाशी होती. त्याच सुमाराला पेट्रोलच्या किमतीही प्रचंड उतरलेल्या होत्या. त्यामुळे लोकांनी पुन्हा 'गॅस गझलर्स' किंवा पेट्रोल पिणाऱ्या महाकाय एसयुव्ही घ्यायला सुरुवात केली. इंधनाची बचत करण्यापेक्षा आपल्या गाडीचा आकार, एकंदरीत ऐसपैसपणा आणि आराम स्वीकारण्याकडे लोकांचा कल होता. 2001 आणि 2008 साली आलेल्या आर्थिक मंदीमुळे यात प्रचंड फरक पडला.

यादरम्यान इलेक्ट्रिक इंजिनांचं काय चालू होतं? थोडक्यात उत्तर असं की फारशी प्रगती नव्हती. एका चार्जवर किती मैल जाऊ शकते, चार्ज करायला किती वेळ लागतो, आणि जर लांबचा प्रवास करायचा असेल तर वाटेत चार्ज करण्याची सोय काय - या प्रश्नांना पुरेसं चांगलं उत्तर नव्हतं. बॅटऱ्या जड असायच्या, त्यामुळे जास्त मैल जाणारी गाडी तयार करायची तर ती जास्त जड होणार - त्यामुळे ती कमी मैल जाणार. तसंच ती चार्ज करायला आपल्या घरची वीज पुरेल का, हीदेखील मर्यादा होती. त्यामुळे जेमतेम शंभर-सव्वाशे मैल जाऊ शकणाऱ्या गाड्या तयार होत्या. मात्र सामान्य माणसासाठी त्या फारशा उपयुक्त नव्हत्या. शहरांच्या बसेससाठी किंवा काही डिलिव्हरी कंपन्यांच्या फ्लीटसाठी वगैरेच हा पर्याय उपयुक्त होता. काही शहरांनी, राज्यांनी हा उपाय अवलंबलाही. पण एकंदरीत वाहतुकीच्या दृष्टीने हा केवळ एक दशांश, शतांश टक्क्यांचा मामला होता.

मात्र विसाव्या शतकाच्या शेवटाला आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातील गोष्टी बदलायला लागल्या. एकतर 2001 साली अमेरिकेवर हल्ला झाला, आणि त्याच सुमाराला मार्केट कोसळून मंदी आली. त्याच सुमाराला तेलाच्या किमती आकाशाला भिडल्या होत्या. आणि पर्यावरणाबाबतचा विचार 'निव्वळ प्रदूषण' पासून बदलून 'कार्बन डायॉक्साइडपोटी होणारं ग्लोबल वॉर्मिंग' इथपर्यंत आलेला होता. यातून टेस्लाने इलेक्ट्रिक गाड्या तयार करण्यासाठी परिस्थिती कशी निर्माण झाली, त्यातून काय निष्पन्न झालं हे पुढच्या भागात पाहू.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

बॅट्ऱ्यांची डेन्सटी किती आहे? शंभर किमी जाणारी पावर साठवणारी बॅट्री किती जड आणि मोठी आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बॆटरीबाबत एक स्वतंत्र लेख येईलच, पण थोडक्यात उत्तर देतो. टेस्लाच्या गाड्यांमध्ये सध्या ज्या लिथियम आयन बॆटरी वापरल्या जातात त्यांचं वजन सुमारे 300 ते 500 किलोच्या आसपास असतं. मध्यम आकाराची गाडी त्यावर साधारण 200 ते 300 मैल जाते. साधारण हिशोब किलोला दोन किलोमीटर. जसजशी तांत्रिक प्रगती होत जाईल तसतसे हे आकडे सुधारतील, पढच्या पाचेक वर्षांत सुमारे दीडपट ते दुप्पट. तसंच किंमतही पुढच्या काही वर्षांत साधारण निम्मी होईल असा अंदाज आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इन्व्हर्टरमध्ये वापरल्या जाणाऱ्या लेड ॲसिड बॅटऱ्या साधारण १५० ॲम्पिअर-अवर क्षमतेच्या असतात. त्याउलट स्मार्टफोनमध्ये हल्ली सर्रास ४ ॲम्पिअर अवर क्षमतेच्या बॅटऱ्या असतात. लेड ॲसिड बॅटरीची क्षमता स्मार्टफोन बॅटरीच्या केवळ ३७.५ पट असते पण आकार मात्र खूपच जास्त असतो.

पण लेड ॲसिड बॅटरी २० ॲम्पिअरचा करंट सहज देऊ शकते. तशी स्मार्टफोनमधली लिथिअम बॅटरी देऊ शकत नाही. परंतु बऱ्याच लिथिअम बॅटऱ्या समांतर जोडून हा प्रश्न सोडवता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

संक्ल्पना म्हणून योग्य आहे पण प्रत्यक्षात एवढं सोपं नाही ते. दोन्ही ठिकाणाच्या ड्यूटी सायकल्स आणि बॅटरीकडून असणऱ्या अपेक्षा वेगळ्या आहेत. त्यात पुन: चार्जिंग-डिस्चार्जिंग करंट्स, बॅटरीचं तापमान वगैरे ढीगभर गोष्टी बघाव्या लागतात. पूर्ण बॅटरीची लाईफ सायकल बघावी लागते. तुम्ही टेस्लाच्या बॅटरीची कूलिंग सिस्टीम बघा. इंजिनाला लागत नाही एवढं कूलिंग बॅटरी पॅकला लागतं. कारण इंजिनाचं तापमान वाढलं तर फार फार तर इंजिन सीझ होऊन बंद पडतं. बॅटरीचं तापमान एका मर्यादेबाहेर गेलं तर बॅटरीचा स्फोट होऊ शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तम लेख. पार्श्वभूमी मस्त मांडलेली आहे. पुढील भागाच्या प्रतीक्षेत. खास घासकडवी टच अर्थात आकडेवारी तिचा विशेष इंतजार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जगातला पहिला इलेक्ट्रिफाइड रस्ता
हे मला आज w.a.वर प्राप्त झालं. पण बातमीची तारीख 12 एप्रिल 2018 दिसतेय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

URL डकलीच नाही ! मी नेटवर शोधून टाकली होती. (insert keli hoti)
https://www.theguardian.com/environment/2018/apr/12/worlds-first-electri...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त लेखमाला गुरुजी,
येऊ द्या जोरात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्कबद्दल फारसं बरं मत नाही. परंतु लेखमाला चांगली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखमाला आवडते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुढला भाग येऊ द्या!

--
टेस्लावरून आठवलं- सध्या "सलील परुळेकर" अशा मराठमोळ्या नावाच्या व्यक्तीला टेस्लामधे झोल केल्याबद्दल अटक झाली असं कळलं. पैशाची अफरातफर करणारा (आणि नावावरून तरी म.म.व. ) मराठी माणूस म्हणून खरं तर त्याचा सत्कार केला पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण होटा ईंडस्ट्रीअलवाले गप्प कसे बसले? की त्यानाही समहाऊ पेमेंट केलं गेलं?
पण येस, सत्कार हवाच - "अवध्या बत्तीसाव्या वर्षी ही कामगिरी करून दाखवणारा उदयोन्मुख तरूण ..." वगैरे वगैरे!!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

होटावाले अर्थातच गप बसले नसणार, त्यामुळेच हे बाहेर आलं. आपल्याच सहकार्याने होटाबरोबर मोठं कॉन्ट्रॅक्ट होईल आणि त्यामुळे ते अशी 'छोटी बाब' सोडून देतील असा परुळेकरांचा अंदाज असावा. पण होटावाल्यांनी परुळेकरांना भीक घातली नसावी.

_____

कंपन्यांतला भ्रष्ट्राचारअसाच चालतो. फार क्वचित वेळा काळा पैसा प्रत्यक्ष काळा - बॅगांत भरलेली कॅश वगैरे - असतो. याहीपेक्षा सोफिस्टिकेटेड पद्धती असतात. सूत्रच शोधायचं झालं तर 'unjust enrichment' हे लावता येईल.

अशी उदाहरणं वाचली की 'काळा पैसा प्रकाशात आणण्यासाठी नोटाबंदी' ही किती चुल्ली कल्पना होती हे लक्षात येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आमच्या ओळखीच्या एकांनी स्वत:च्या व्यवसायाच्या नावे कार घेतली आणि ती एका कंपनीच्या अधिकाऱ्याला वापरावयास दिली. प्रत्यक्षात त्या अधिकाऱ्याला ७ ते ८ लाख रु लाच देण्यात आली आहे. पण काहीही कॅश दिली गेलेली नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ममवच आहे म्हणे. माझ्या एका मित्राचा ब्याचमेट होता एमएस करताना असं कळलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

भारीच की! बाकी त्याला काय व्हायची ती शिक्षा होईलच, परंतु या निमित्ताने ममव लोकांमध्येही दम आहे हे बघायला मिळाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

...शेजारच्या घरातल्या जिजाक्कांच्याच पोटी व्हावा, म्हणतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणजे शारजात सचिननं मारलेल्या सिक्सला नुसती दादही द्यायची नाही म्हणता?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण, स्वतः सिक्स मारणे (वा मारता येणे) आवश्यक जरी नसले, तरी (चुकून मारलीच किंवा मारता आलीच, तर) मारण्याचे वावडे तर नाही ना तुम्हाला? मग खुशाल द्या की दाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फाउल.

फ्रॉड आणि शिवाजी यांचा संबंध जोडून तुम्ही अगोदरच फाउल केला आहे तेव्हा इत्यलम.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मालिकेबाबत उत्कंठा आहे. हा तिसरा भाग येऊन तीन महिने होऊन गेले. पुढल्या 'दुरुस्त' भागांच्या प्रतीक्षेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहाहा 'दुरुस्त' Smile देर आये ....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुणी टेस्लात पैसे गुंतवलेले का? या वर्षी टेस्लाने खूपच लांब उडी मारली.

लक्झरी/सेमी लक्झरी सिडान कॅटेगरी मधल्या मॉडेल ३ चे एक वर्ष वापरून झाल्यावर लोकांनी जे रिव्हू टाकलेत यूट्युबर ते पाहून जबरदस्त डिस्रप्शन आहे. खास करून ऑटोड्राईव्ह मोड एक मस्त फिचर आहे. टेस्लाची प्राईझींग स्ट्रेटेजी पण चतुर बनिया टाईप आहे. दरवेळेला ऑटोड्राईव्ह मोडचे १००० डॉलर वाढवत नेत आहेत. तरीपण त्या फिचर सहीत / टॅक्स बेनेफीट पहाता जबरदस्त टक्कर आहे.

पिकअप ट्रक कॅटेगरीत टेस्ला खूप मार खातो. म्हणजे मला बिलकूल नाही आवडला. हार्डकोअर फोर्ड ट्रक लव्हर सहजा सहजी ब्रँड चेंज करतील असे वाटले नाही तरी पण १७७ हजार आउटस्टँडींग डिलेव्हरीज आहेत.

टेस्ला आता जवळपास ४०० बिलिअन डॉलर्स व्हॅल्यूएशनवर पोहोचली आहे. जे टोयाटा, फोर्ड, जीएम, फॉक्सवॅगन, मर्क (डायम्लर), ऑडी, होंडा, हुंडाई या सगळ्यांपेक्षा जास्त आहे. जणू मार्केट आता हे फॅक्टर इन करत आहे या सगळ्यांचे मार्केट शेअर टेस्ला खात जाणार आहे.

डिलेव्हरी ट्रक बद्धल अजून काही जास्त माहिती नाही. निकोलाच्या फ्रॉड (वा गडबडी) नंतर टेस्लाला टक्कर देणारे कुणी आहे असे वाटत नाही.

या नव्या घडामोडींची दखल घेत ही लेखमाला अजून वाढवता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

PE : 1138.00 I-m so happy

अचानक सगळ्यांना वाटू लागलं की कोरोनोत्तर जगात स्पर्शविहीन गोष्टींना खूपच म्हणजे खूपच महत्त्व येईल. म्हणजे डिलिव्हरी ड्रोन करतील, स्वयंचलित गाड्या म्हणजे अगदी हव्याच हव्या. (गाड्या विद्युतउर्जेवर चालतात की पाण्यावर याला तितकं महत्त्व नसावं, पण प्राधान्य अर्थातच विद्युत उर्जेला.) disruption तर आहे पण एकाच कंपनीला अवाजवी महत्व देण्याइतपत नसावं. या disruption मध्ये electric वाहनांचा आणि electric +autonomous वाहनांचा वाटा किती असेल याचं तारतम्य दिसत नाही.
त्यामुळे १७ मार्चनंतर ही जी प्रचंड उडी आहे ती खालील घटकांवर अवलंबून आहे -
१. अनाठायी भीती
२. सतत आदळणाऱ्या न पचवता येणाऱ्या उलट सुलट डिजिटल माहितीने, डिस्काउंट इन्वेस्टर्सना दिलेला 'विश्लेषणशक्तीचा' खोटा आत्मविश्वास (हे जरा बिटकॉइन च्या वळणावर गेलंय)
३. उबर सारख्या कंपन्यांवर आलेलं गंडांतर
४. स्वदेशी उत्पादनांचा आग्रह
५. कुवेरासम अनेक माध्यमांतून us stocks मध्ये थेट गुंतवणूक करता येणे.
जग जसं जसं पूर्वपदावर येईल तसं २१ मध्ये हे valuation कमी होईल असं वाटतं. ही लीप तात्कालिक असली तरी तिच्या गाभ्यात एक ऑरगॅनिक लीप आहे. ती बरीचशी मार्च-पूर्वीची असावी. १११ च्या आसपास असावी. बघा तिथंपर्यंत शॉर्ट करता आलं तर. Smile

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

माझे जजमेंट थोडे वेगळे आहे. टेस्लाचे जे काही स्पर्धक आहेत लक्झरी सिडान-पिकअप ट्रक-ते डिलेव्हरी ट्रकमधले.. (अमेरिकेतले, युरोपातले आणि जापानमधले) त्या सगळ्यांचे एकंदर मूल्य जवळ जवळ +१.५ ट्रिलिअन डॉलर्स आहे. जे जगभरचे ऑटोकारचे मार्केट आहे ते फार वेगाने ग्रो होण्याची शक्यता नाही टेस्ला नवीन मार्केट क्रिएट करत नाही आहे ते फक्त ह्या सगळ्यांचे मार्केट शेअर खाणार आहे हे नक्की ते किती वेगाने आणि किती खाणार यावर स्टॉकची वाटचाल राहील. त्यामुळे अ‍ॅपल, अ‍ॅमेझॉन सारखी टेस्ला ट्रीलिअन डॉलर लागलीच टच करेल असे वाटत नाही (४०० बिलिअन डॉलर्स वरून, पण मी त्यांच्या सोलर पॅनल आणि इतर उद्योगातले कमर्शिअल पोटेंशल धरत नाही आहे. त्यात पण अ‍पॉर्च्युनिटी असेल तर माझा अंदाज चूकीचा असेल...)

येत्या ५ वर्षात टेस्लाने या सगळ्या सेगमेंट मध्ये ४०-५०% मार्केट शेअर काबीज केले (जसे भारतात मारुती डॉमिनेटींग प्लेअर आहे तसे) तर टेस्ला ४०० बिलिअन वरून ७००-८०० बिलिअन डॉलर्सवर सहज पोहोचू शकते. पण हे सगळे येत्याकाळातल्या ट्रेंडवर आहे. टेस्लाची लोकप्रियता/खरेदी किती वाढते आहे, त्यांची प्रॉडक्शन कॅपॅसिटी कशी वाढते आहे. मार्जिन सुधारते आहे की नाही इ. वर अवलंबून आहे. पण समजा टेस्लाच्या स्पर्धकांनी तोडीस तोड प्रॉडक्ट (स्वयंचलित इलेक्ट्रीक मोटार - जे मेन डिस्रप्शन आहे) लवकरात लवकर बाजारात आणले वा लोकांना स्वयंचलित गाडीचे अप्रूप वाटले नाही वा टेस्ला गाड्यांची मागणी अपेक्षेपेक्षा कमी राहिली (येत्या ५ वर्षात टेस्ला अपेक्षेपेक्षा कमी मार्केट शेअर काबिज करू शकेल अशी शक्यता -कन्सेसस-बळावत गेली) तर कदाचित टेस्लाच्या गतीला खिळ बसेल आणि मूल्य हळूहळू कमी-कमी होत जाईल.

बाकी भारतातल्या रिटेलच काय पण इन्स्टीट्यूशनल इन्व्हेस्टर्सची (जे काही यूस मार्केट रिप्रेझेंट करणारे म्युच्युअल फंड आहेत) यूएस स्टॉक प्राईज दीर्घ काळ इन्फ्लुअन्स करण्याइतपत क्षमता नसावी असे वाटते.
------------------------------
[Edit]
खूप मोठ्या लाँग ड्राईव्ह साठी भरपूर चॅलेंजेस आहेत, खास करून चार्जिंग पॉईंट्सचे, स्पीड लिमिटचे. ऑटो ड्राईव्ह मोडमध्ये पण लिमिटेशन्स आहेत. भारतात राहून टेस्लाची लोकप्रियता गेस करणे थोडे कठीणच आहे. बघू टेस्ला कशी वाटचाल करते ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सध्या सर्वच उद्योगांचा प्रलंबित पोपट झाला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"हू किल्ड ईलेक्ट्रिक कार" हा माहितिपट आठवला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही शेअर केलेली लिंक छोटी आहे. मुळ माहितीपट मोठा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

🙏

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी कुठेतरी असं वाचलंय की जगातले बहुतांशी लिथियम चे साठे चीन च्या अधिपत्याखाली आहेत / चीन मधे आहेत . हे खरे का?

तसं असेल तर अवघडंच आहे. चीन कोरोनाच्या मदतीने नाही तर लिथीयम्च्या मदतीने जगावर कब्जा करु शकेल . किंवा जगाला चीनवर अवलंबुन रहावं लागेल. आज आपण मिडल ईस्ट राष्ट्रांच्या वर अवलंबुन आहोत. उद्या चीन वर !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही. लिथियमचे सगळ्यात मोठे साठे अनुक्रमे चाईल आणि ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियाचे लिथियमचे उत्पादन सध्या सगळ्यात जास्त आहे.

चीनमध्ये रेअर अर्थ मॅग्नेटिक मटेरियलचे (NdFeB4) साठे सगळ्यात जास्त आहेत. हा पदार्थ वापरुन खूप जास्त शक्तिशाली लोहचुंबक बनवता येतात. अशी लोहचुंबके वापरून लहान आकारात (High power density, kW/m^3 ), तुलनेने हलक्या आणि कमीत कमी विद्युत प्रवाह वापरून जास्तीत जास्त चलनशक्ती निर्माण करता येणाऱ्या (High efficiency) इलेक्ट्रिक मोटर्स बनवता येतात. यामुळे गाडीची रेंज वाढण्यात मदत होते. चीनचे वर्चस्व इथे आहे. गेल्या काही वर्षांत चीनने रेअर अर्थ मटेरियलचा पुरवठा आणि किमतीसुद्धा कृत्रिमरीत्या नियंत्रणात ठेवल्या आहेत आणि वाढवतही नेल्या आहेत. गेल्या १-२ वर्षांत भारतात राजस्थानमध्येही अशा पदार्थांचे साठे सापडले आहेत, पण चीनच्या तुलनेने ते साठे काहीच नाहीत. त्यामुळे जगात सर्वत्र रेअर अर्थ मटेरियल न वापरता अधिकाधिक लहान आणि एफिशियंट मोटर्स कशा बनवता येतील यावर जोरात संशोधन चालू आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लिथियमचे सगळ्यात मोठे साठे अनुक्रमे चाईल आणि ऑस्ट्रेलियामध्ये आहेत.

चिली (इंग्रजीत) किंवा चिले (स्पॅनिशात).

बाकी चालू द्या.

धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Albemarle Corporation, which has been a star on the New York Stock Exchange for much of the past five years, has a 49% stake in the world's biggest hard-rock lithium mine at Greenbushes in Western Australia with China's Tianqi Lithium holding a 51% stake.
आता अजुनही बाकी कंपन्या असतील पण त्यांचेबद्दल माहिती का्ढावी लागेल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यांनाही रेअर अर्थ मेटल्स लागतात ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0