ही बातमी समजली का - भाग १९४
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
----
आधीच्या धाग्यात ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
पंप्र अनियनात
('न'बा, ते कदाचित बनियनातही असतील, पण आपल्याला माहीत नाही.)
FAA Installs 36,000-Foot-Tall Air Traffic Lights
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
उपयुक्त
हे विमानांसाठी फारच सोयीचे ठरेल, विशेषत: पाऊस-वादळ-ढग असताना जेव्हा खालच्या लोकांना विमान दिसू शकत नाही.
एक शंका - ढगांमुळे शत्रूला आपली विमाने दिसणार नाहीत- हे पटले, पण आपल्या वैमानिकांनाही (ढगांमुळेच) खालचे काही दिसणार नाही - मग "अचूक लक्ष्यभेद" (उर्फ सर्जिकल स्ट्राईक) कसा काय करता येईल?
'डोळ्यांनी बघून' हल्ला/मारा
'डोळ्यांनी बघून' हल्ला/मारा करणे १२००किमी/तासाने जाणाऱ्या विमानांतून शक्य नसणारच. जिपीएस आधारित लक्ष्य असणार.
खरच की. मार्मिक दिलेली आहे.
खरच की. मार्मिक दिलेली आहे.
यावरून आठवले (सवांतर)
लहान होतो आम्ही तेव्हा. बहुधा इयत्ता पहिलीत असू. बांग्लादेशचे युद्ध (१९७१चे भारत-पाकिस्तान युद्ध) नुकतेच पेटले होते. रेडियोवरून युद्धाच्या बातम्या येत असत, असे अंधुकसे आठवते. परंतु त्याहीपेक्षा, पुण्यात (आणि बहुधा मुंबईतसुद्धा - चूभूद्याघ्या.) रात्री अनेकदा वेळीअवेळी एअररेड वॉर्निंगचे भोंगे वाजू लागत. मग घरोघरी ब्लॅकाउट करावा लागे. बोले तो, घरातले सगळे दिवे बंद करून बसावे लागे. अशा वेळी घरात लावलेल्या मेणबत्त्यांचा प्रकाशसुद्धा चुकूनही बाहेरून दिसू नये म्हणून खिडक्यांच्या काचांना काळा कागद लावून ठेवलेला असे. (एकदा 'तुमच्या घरातल्या मेणबत्तीचा प्रकाश बाहेरून दिसतोय' म्हणून तंबी द्यायला एक सद्गृहस्थ दारी आले होते, असेही स्मरते. सदर सद्गृहस्थ बहुधा स्वयंसेवक असावेत, अशी आता शंका येते. परंतु ते असो.) मग अर्ध्यापाऊण तासानंतर सवडीने एकदा का 'ऑल क्लियर'चे भोंगे वाजले, की पुन्हा दिवे लावून आपापली कामे करायला मोकळे.
एकंदरीत कटकट असायची. त्यामुळे, पाकिस्तान्यांचा राग यायचा. वाटायचे, हे लेकाचे आपल्यावर बाँब टाकायला येतात काय, आपणही जाऊन यांच्यावर एखादा बाँब टाकून यावे. फक्त, बाँब टाकण्याच्या मोडस ऑपरंडीबद्दल किंचित घोळ होता. बोले तो, पाकिस्तानवर हवेतून बाँब टाकायचा, तर तेथे जायला नि वरून बाँब टाकायला किमानपक्षी एखादे विमान (आणि एखादा बाँब) एवढे साहित्य तरी लागेल, याची अंधुकशी कल्पना होती, परंतु आपली सेनादले ही सामुग्री आपल्याला उदार मनाने पुरवितील, असा विश्वास होता. पुढचा प्रश्न म्हणजे नॅव्हिगेशनचा - तेथे जायचे कसे? याची काय तजवीज केली होती, ते आता आठवत नाही, परंतु बहुधा निघण्यापूर्वी रस्ता विचारून घेऊ, असा काही प्लान असावा. सरतेशेवटी, तेथे पोहोचल्यावर (१) तेथे पोहोचलो, हे, आणि (२) बाँब नक्की कोठे टाकायचा, हे कसे समजणार? तर त्याला उपाय अतिशय सोपा होता. त्या भागात पोहोचल्यावर वरून रेल्वेस्टेशन शोधायचे, नि त्यावरची पाटी वाचायची. तेथे पिवळ्या रंगाच्या पाटीवर१ देवनागरीतून२ छानपैकी 'पा-कि-स्ता-न' असे स्टेशनाचे नाव लिहिलेले असेलच. ते वाचून खात्री झाली, की द्यायचा टाकून बाँब, नि काय! नि मग शांतपणे परत यायचे.
पुढे मोठे झाल्यावर आम्ही भारतीय वायुसेनेत दाखल झालो नाही. दे डोंट नो व्हॉट दे मिस्ड. देअर लॉस, नॉट माइन. असो चालायचेच.
..........
१, २ पाकिस्तानातल्या रेल्वेस्टेशनच्या नावाच्या पाट्या भारताप्रमाणे पिवळ्या रंगाच्या नसतात, तसेच, त्यांवर तूर्तास देवनागरीतून मजकूर लिहिण्याची प्रथा नाही, याची आम्हांस तेव्हा कल्पना नव्हती. अर्थात, प्राथमिक शाळेत असताना आम्ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असल्याकारणाने, जुजबी इंग्रजी आम्हांस तेव्हासुद्धा वाचता येत असेच, त्यामुळे अडचण अशी आली नसतीच. परंतु तरीही, वन वुड हॅव थॉट दॅट द पाकिस्तानीज़ वुड हॅव बीन दॅट मच ओब्लायजिंग. एक साधी पाटी देवनागरीतून टाकायला काय जाते त्यांना, कळत नाही. शिवसेनावाले याकडे लक्ष देतील काय? मराठी पायलट जेथे बाँब टाकायला जाणार, तेथे देवनागरीतून पाटी नको?
असो चालायचेच.
अवांतर
रोहिंग्टन मिस्त्रीची 'Such A Long Journey' नावाची, (शिंव्हाच्या छाव्याच्या छाव्याने काही काळ बॅन करवलेली कादंबरी) याच सुमारास मुंबईत घडते. त्यातला मध्यमवयीन पारशी कुटुंबप्रमुख १९६२ - १९६५ असं सारखं सारखं घर लाईटप्रूफ करून वैतागतो आणि लावलेले काळे कागद काढायच्या फंदातच पडत नाही (आणि परिणामी १९७१च्या युद्धातली एक कौटुंबिक कटकट टाळतो) - असं खास पारसी विक्षिप्त ढंगातलं चित्रण त्यात आहे, ते आठवलं.
सोप्पं आहे
एवढे कष्ट करण्या पेक्षा फक्त वरून आवाज द्यायचा ए अब्दुल, कि चार सहा लोक हा भाई जान म्हणून आवाज देतील तेव्हा टाकायचा बॉम्ब हाकानाका.
भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।
ग्रंपी कॅट
ग्रंपी कॅटची माॅडेल गेली. सात वर्षांची होती.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
भारतीय मांजरींच्या (
भारतीय मांजरींच्या ( बोक्यांचेही धरा) चेहऱ्यावर १) केविलवाणे, २)अगतिक, ३)सुस्ती आलीय हे भाव दिसतात.
मजूरीचे दर
कळव्यातील कामगारांच्या मजूरीचे दर समजले का ?
जर बाई पेंटर असेल तर दर काय ? ७०० की ५०० ?
बाप्याचा दर काय ?
लुव्र आणि इतर इमारतींचा
लुव्र आणि इतर इमारतींचा आकिटेक्ट १०२ वयाला काल गेला?
एक्झिट पोल्स
एक्झिट पोल्सच्या अंदाजांनुसार मोदीच येणार.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
एक्झिट पोल हा फार्स आहे
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
एक्झिट पोल हा फार्स आहे
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
एक्झिट पोल हा फार्स आहे
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
शांत व्हा
शांत व्हा, ढेरे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अहो, एक व्हिडो एम्बेड करयचा
अहो, एक व्हिडो एम्बेड करयचा प्रयत्न करत होतो. नाही जमलं.
पण मेन त्यातला मुद्दा असा की त्या नेल्सन का कायशाशा पोलवाल्या माणसाने असं सांगितलं
"फार जास्तं लोक भाजपाला मत दिलं असं म्हणत होते सो आम्ही आकडे थोडे अड्जस्ट केले आहेत."
अरे!?
"आमच्या मते लोक घाबरुन आम्ही भाजपला मत दिलं असं सांगत होते. त्यामुळे आम्ही आकडे थोडे ॲडजस्ट केले आहेत्"
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
दुवा
एंबेड होत नसेल तर दुवा द्या. लोक दुवा देतील.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हे घ्या. हा बघा व्हिडो.
हे घ्या. हा बघा व्हिडो.
https://twitter.com/AB_BJP/status/1130189856716419073
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
सगळे खवचट मी दिले आहेत हो
सगळे खवचट मी दिले आहेत हो ढेरे !!!
आज पासून गोबर मिट्टी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
आज पासून गोबर मिट्टी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे ! अशी स्वाक्षरी ठेवा मग
भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।
गोबर मिट्टी खायेंगे,
गोबर मिट्टी खायेंगे, पाकिस्तान को खतम करेंगे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
Reality Of Most Of Exit
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
अंबानींचे खटले
अनिल अंबानींनी कॉंग्रेसवर दाखल केलेले खटले निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याच्या एक दिवस आधी का मागे घेतले असतील?
Anil Ambani to withdraw ₹5000 crore worth defamation suits against Congress leaders, National Herald
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
ज्या पोराशी पंगा घेतला, तोच
ज्या पोराशी पंगा घेतला, तोच वर्गातला मॉनिटर झाला तर?
रिस्क नको. आधीच धाकल्या अंबानींच्या गंजीफ्राकात काय कमी भोकं आहेत की अजून एक परवडेल?
==================
भूतकाळातील आस्वल्य.
डिफेमेशन खटले कोणते किती
डिफेमेशन खटले कोणते किती निर्णायक झालेत झटपट? मोठमोठे कीसपाडणारे वकील पोसायचे. गंजीची भोकं वाढवायची? पण आताच का हा प्रश्न चक्रावणाराच.
लोकसभा निकाल
आतापर्यंत जे कल जाहीर झाले आहेत त्यानुसार जनमताचा कौल स्पष्टपणे 'फिर एक बार मोदी सरकार'कडे असल्याचे दिसत आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
नरेंद्र मोदींचे अभिनंदन!
मोदी विरोधकान्ना पुढ्ल्या ५ वर्शान्साठी शुभेच्छा! आरोग्य साम्भाळा.
थँक्स!
थँक्स!
- एक मोदी विरोधक.
- पण भाजपा विरोधक नाही
- पण काँग्रेस सपोर्टरही नाही
-पण रा.स्व.संघ विरोधक
असो. जिमला जाणारे उद्यापासून परत.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
थँक्स!
थँक्स!
- एक मोदी सपोर्टर.
- भाजपा सपोर्टर्
- फॅनॅटिझम विरोधक
- पण काँग्रेस सपोर्टरही नाही
-रा.स्व.संघ - न्युट्रल्
३ भारतिय, एव्हरेस्ट गिर्यारोहकांचा मृत्यु
https://www.yahoo.com/news/three-indian-climbers-die-crowded-slopes-moun...
नेपाळ सरकार प्रत्येक
नेपाळ सरकार प्रत्येक गिर्यारोहकाकडून अकरा हजार डॉ घेते, त्यांनी
एवढी परमिट्स(४००) कशी /का दिली? इतके लोक पहाटे दोन ते सकाळी सातपर्यंत जाऊ शकत नाहीत हे माहीत नाही?
Hindustan times ने दोन दिवस
Hindustan times ने दोन दिवस मतदानाचे बरेच तुलनात्मक वर्गीकरण करून दिले आहे.
इस्राएलकडून धडा?
लिबटार्ड लोकांनी विरोधी बाकांवर बसून आविग्डोर लिबरमनसारखं काही तरी केलं तर मजा येईल
Netanyahu Won the Election. Why Is Israel Doing It Over?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हे मस्त आहे, पण इथे नक्की
हे मस्त आहे, पण इथे नक्की कुणी काय करायचं ? (याबद्दल काही मार्गदर्शन ?)
मला वाटतं, की आपल्या इथे अजून हे होण्यास बराच वेळ आहे. डावे/लिबटार्ड हे आबालवृद्धाना जेन्यूइनली खल, वाईट वाटतात.
आणि उजवे 'तसे' नाहीत असे वाटते. उजव्यांपेक्षा डावे कमी वाईट किंवा दोघांमध्ये काहीही फरक नाही अशी जाण येण्यास अजून बराच वेळ आहे.
पूर्ण उजवे /डावे सरकार करणे
पूर्ण उजवे /डावे सरकार करणे निराळे, विचारसरणी ठेवणे निराळे. अति आदर्श स्थिती व्यवहारात अशक्य.
इव्हान गोलुनोव्ह
इव्हान गोलुनोव्ह : रशियन भयस्वप्न
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
आम 'आदमी' पार्टीचं कौतुक
दिल्ली मेट्रोत स्त्रियांना फुकट प्रवास करू देण्याबद्दल लोकमाध्यमांवर थोडी चर्चा वाचली. त्या संदर्भात एक 'विद्रट' दुवा वाचनात आला -
Actually Free Rides For Delhi Women Is A GREAT Idea. Data Backs It
'Why Loiter' नावाचं एक फेसबुक पान आहे; बायकांनी अपरात्री, भलत्या ठिकाणी उपस्थिती वाढवल्याशिवाय आम्हाला सुरक्षित वाटणार नाही, हे पानाच्या नावामागचं कारण.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
या विचारात प्रचंड तथ्य आहे.
या विचारात प्रचंड तथ्य आहे. रात्री अपरात्री आजूबाजूला एखादी बाई दिसली तरी धीर येतो.
+१
सध्या उन्हाळ्याच्या दिवसांत बस, ट्रेन, ऑफिसात शेजारी कोणी बसणार असेलच तर ती बाईच असावी, अशी अनुभवांती इच्छा असते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हं इथे खेटाखेटी होत नसल्याने
हं इथे खेटाखेटी होत नसल्याने मला फरक पडत नाही बाई की बुवा. पण जे कोणी असेल त्यांनी डिओड/पर्फ्युम वापरलेला व किमान आंघोळ तरी करुन असावे अशी इच्छा असते.
होय
कोणाला धीर येतो तर कोणाला जोर !
सुपारी सुब्रमण्यन?
https://thewire.in/macro/india-gdp-growth-arvind-subramanian
https://theprint.in/economy/rbi-to-the-rescue-modi-govt-eyes-banks-rs-9-6-trillion-surplus-to-beat-economy-blues/250245/
सुब्रमण्यन यांनी सुपारी घेतली की इतके दिवस मोदी सरकार खोटं बोलत होतं जीडीपी ग्रोथबद्दल?
पहिल्या माध्यमस्वातंत्र्य-संघर्षांची कहाणी
भारतातल्या, किंबहुना आशियातल्या पहिल्या वृत्तपत्राची आणि त्याच्या अवलिया संस्थापक-पत्रकाराची कहाणी सांगणारे हे पुस्तक माध्यमस्वातंत्र्याच्या दडपणुकीपासून पहिले वृत्तपत्र आणि त्याचा कर्ताही कसे सुटले नाहीत, हेही दाखवून देते..
निखिल बेल्लारीकर (बॅटमन)
लेख आवडला...
प्रकाटाआ
दोन वेळा प्रकाशित झाल्याने प्रतिसाद काढून टाकण्यात आला.
नीतीअनीतीच्या बाता
२०२३ पर्यंत सगळ्या तीनचाकी विजेवर चालायला हव्यात आणि २०२५पर्यंत १५०सीसीच्या किंवा कमी क्षमतेच्या दुचाकीही, असं नीती आयोग सांगतोय.
India wants to speed up its transition to electric vehicles – so fast that chaos is inevitable
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
ई नॅनो
दिलेल्या लिंकच्या पेजवर गेलो अन टाटाने नॅनो बंद करायला नको होती असे उगीच वाटले. इलेक्ट्रिक कार म्हनून बॅटरी मोटर बसवून खपवता आली असती. इलेक्ट्रिक कारला योग्य असे डिझाईन होते.
गब्बर सिंग हवे होते इथे.....
गब्बर सिंग हवे होते इथे.....
प्ल्यानिंग कमिशन बंद केल्याबद्दल खूप आनंदात होते. का तर म्हणे सेंट्रल प्लॅनिंग नसायला पाहिजे. कोणी काय करावं ते सेंट्रली ठरवू नये.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
कोण किती उजवे किती डावे?
अमेरिकन राजकीय पक्षांच्या धोरणांमधून एकेक गोष्टीचं विश्लेषण करत करत काढलेले निष्कर्ष :
What Happened to America’s Political Center of Gravity?
अंततः निष्कर्ष फार आश्चर्यकारक नाहीत, पण असं विश्लेषण रोचक आहे. भारतीय पक्षांच्या बाबतीत कुणी तरी हे करायला हवं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
काँग्रेसला ढेरेशास्त्री आणि
काँग्रेसला ढेरेशास्त्री आणि गब्बरसिंग डावे समजतात. पण डावे मात्र त्यांना भांडवलदारांचा पक्ष समजतात.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
काँग्रेस डावी तर...
ज्या न्यायानं काँग्रेस डावी ठरेल त्या न्यायानं भाजपही ठरावी.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
नेहरु, ईंदिरा होतेच डावे.
नेहरु, ईंदिरा होतेच डावे. लेफ्ट ऑफ सेंतर नक्की होते. डावे मात्र त्यांना भांडवलदारांचा पक्ष समजणारच. कारण् कम्युनिस्त पार्ट्यांनाही (भाकपा/माकपा) बुर्झ्वा समजणारे लोकही जनेयुत आहेत असं वाचलेलं.
राईट ऑफ सेंटर म्हणता येतील अशी दोन सरकारं होती. राव आणि वाजपेयी. भारताच्या गेली दोन दशकं झालेली आर्थिक प्रगती या दोघांमुळे आहे. पण हे दोघेही पुन्हा निवडुन येऊ शकले नाहीत हे सुचक आणि सॅड आहे. मोदीही लेफ्ट ऑफ सेंटर ( पण कॉण्ग्ग्रेसपेक्ष कमी ) आहेत.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
बाबौ , ढेरे मोदींना ' डावे'
बाबौ , ढेरे मोदींना ' डावे' म्हणत आहेत . कुठे फेडाल हे ?
तुमच्या अमित मालवीय , शेफाली ताई किंवा अर्णबला हे कळलं तर काय होईल तुमचं.
ढेरे जपून...
आणि तौलिन सिंगला पण
आणि तौलिन सिंगला पण
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
गुरुत्वमध्य
दोन पायांवर सारखेच वजन टाकून उभं राहिलं, तर माणसाचा गुरुत्वमध्य मधे रहातो की लेफ्ट ऑफ द सेंटर ?
अश्लील (?)!
.
समितीवर नेमणूक याकडे सर्व
समितीवर नेमणूक याकडे सर्व रिटायर व्हायला आलेल्या अधिकाऱ्यांच्या कुटुबाचं लक्ष/लक्ष्य असतं असं म्हटलं तर?
मग आणखी काही वर्षं मज्जा.
ऐकावे ते नवलच.
गे पेन्ग्विन्स
https://www.cnn.com/2019/06/27/europe/london-zoo-pride-gay-penguins-trnd...
रोचक बातमी आहे. लंडनच्या प्राणीसंग्रहालयात रॉनी आणि रेगी नावाचे २ गे पेन्ग्विन्स आहेत, ज्यांनी एक वाळीत टाकलेलं, अंड दत्तक घेउन, त्या पिल्लाचा सांभाळही केला म्हणे एकत्र. आणि मग पिल्लू मोठे वगैरे झाले. अजुनही हे दोघे त्यांच्या घरट्यात एकमेकांना बिलगुन वगैरे बसतात, म्हणजे एका सामान्य जोडीसम प्रेम व्यक्त करतात.
नाही यात नवीन नाही काही. ते
नाही यात नवीन नाही काही. ते एम्परर पेनग्विन असतात त्यांना ही हुक्की बाळ वाढवायची असतेच. फिल्म आहेच यावर.
ओह्ह्ह!!! वात्सल्य भावना.
ओह्ह्ह!!! वात्सल्य भावना.
बर्फ पडतांनाच अंडी उबवण्याचा
बर्फ पडतांनाच अंडी उबवण्याचा काळ असतो. अंडं पायांतच वर पिसांंत धरतात आलटून पालटून. ते हँडोवर करताना थोडावेळ बर्फावर राहिल्यास अंडं मरतं. मग ते दोघे असह्य होऊन दुसर्याचं अंडं पळवतात. त्या भांडणात तेही अंडं खाली राहतं. ती तासाभराची फिल्म आहे कुठे Nat Geo किंवा कुठे.
होय पाहीली आहे ती फिल्म
होय पाहीली आहे ती फिल्म
दलाई लामाने नवीन शोध ट्विटरवर
दलाई लामाने नवीन शोध ट्विटरवर टाकलाय तो वाचला का?
जर्मनीत राजकीय हत्या
राजकीय विरोधातून कट्टर उजव्या विचारसरणीच्या माणसानं हत्या करणं केवळ भारतातच नाही -
A Political Murder and Far-Right Terrorism: Germany’s New Hateful Reality
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
?
अमेरिकेतल्या गोळीबारांना तुम्ही कट्टर उजव्यांचा दहशतवाद समजत नाही का? पल्स नाईटक्लब, भारतीय माणसाला इराणी समजून गोळी घालून मारणं वगैरे दहशतवाद समजला जात नाही का?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मॅनहोल व मॅनपॉवर
https://www.yahoo.com/news/berkeley-bans-gendered-words-manhole-19540536...
लिंगाधारीत शब्द - मॅनपॉवर , मॅनहोल हे बाद होणार आहेत त्याऐवजी मेन्टेनन्स होल शब्द येणार आहे.
मॅनपॉवरला मेंटेनन्स पॉवर,
मॅनपॉवरला मेंटेनन्स पॉवर, मॅन्युअलला मेंटेनन्सुअल, मॅन्युअरला मेंटेनन्सुअर असं ना?
बहुतेक. मी वाचली नाही ती
बहुतेक. मी वाचली नाही ती बातमी. फक्त लिंकवली
रोचक आहे मॅनकाइंड आणि वुमनकाइंड
१- मॅनकाइंड ला दुसरा शब्द उपलब्ध आहे. पण अखिल मानवजाती ला संबोधण्यासाठी मॅनकाइंड च वापरला जातो व खाली ऑक्सफर्ड मध्ये पण असे अर्थ दिलेले आहेत. म्हणजे अखिल मानवजात म्हणायचे असेल तर वुमनकाइंड असा शब्द वापरत नाही व त्या अर्थात ह्युमन स्पेसीज असा अर्थ पण दिलेला नाही.
mankind n. 1 human species. 2 male people.
womankind n. (also womenkind) women in general.
२
मॅन अवर हा एक शब्द पण विचारात घ्यावा
काम फक्त पुरुष च करतो करु शकतो वगैरे असे काही असावे
डुप्रकाटाआ
Homo sapiens (Latin: "wise person") is the binomial nomenclature (also known as the scientific name) for the only extant human species. Modern humans are the subspecies Homo sapiens sapiens, which differentiates them from what has been argued to be their direct ancestor, Homo sapiens idaltu.
Anatomically modern humans evolved from archaic humans in the Middle Paleolithic, about 200,000 years ago. The emergence of anatomically modern human marks the dawn of the subspecies Homo sapiens sapiens, i.e. the subspecies of Homo sapiens that includes all modern humans.
So, the scientific name or the binomial nomenclature is Homo sapiens, however the full name is Homo sapiens sapiens.
sapienskind or hosapienskind हे शब्द mankind या शब्दाचा पर्याय म्हणून कसे वाटतात ? जमेल का ? म्हणजे थोडं उच्चारायला अजुन सोपं फोनेटीकली स्वीट सिंपल कसं करता येइल हे ही बघितल पाहीजे.
आपण सध्याचे मानव संदर्भात ही एक कोरा वर चांगली माहीती मिळाली.
उत्तम
मनुष्यानं काही करण्याला manually हा शब्द वापरणं मी टाळते. त्या जागी by hand म्हणते. यंत्राला काम करायला सांगणं सगळ्यात सोयीचं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
दुरुस्ती
मेंटेनन्सुष्यानं.
गंमत म्हणजे, manuallyचा शब्दशः अर्थ by hand असाच आहे. त्याचा 'मनुष्या'शी काहीही संबंध नाही.
(लॅटिनमध्ये manus म्हणजे हात. manualची व्युत्पत्ती manusपासून आहे; manपासून नव्हे.)
हो ना! पण कुणाला "hi man,
हो ना! पण कुणाला "hi man, come man, go man" बोलण्याची सवय असेल तर? मुलींनाही संबोधतात. (( दादर पोतृगिज चर्च भागातले लोक ))
डेटा का डेटम
मी ज्या जगात वावरते तिथे "data are ..." म्हटलं की लोक माझं इंग्लिश सुधारायला जातात. तिथे कुठे लोकांना आणखी त्रास द्यायचा!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
इंग्लिश ( किंवा दुसरी कोणती
इंग्लिश ( किंवा दुसरी कोणती भाषा) सुधारायला जातात कारण तुम्ही ९८% बरोबर असता. ३०-४०% वाल्यांना नाही करत. ५-१०% तोडकी मोडकी भाषा बोलली की कौतुक होते.
उदा crowd IS angry,mad वगैरे.
People WANT to visit this place.
पण आपणही ती गर्दी म्हणतो.
पण आपणही ती गर्दी म्हणतो. अनेक गर्दी झाल्या म्हणत नाही. प
People WANT to visit this place. - यात काय चूक आहे?
एवढं सोपं असतं तर ...
मूळ शब्द आहे, डेटम. एकवचनी. त्याचं अनेकवचन डेटा. म्हणजे इंग्लिशच्या नियमांनुसार 'डेटा आर ...' म्हणलं पाहिजे. माझ्या आजूबाजूच्या इंग्लिश मातृभाषिकांना हे माहीत असतंच असं नाही. माझी मातृभाषा इंग्लिश नाही, हे त्यांना माहीत असतं. मग ते मी चुकीचं बोलत आहे असं समजून सुधारायला जातात. मात्र इंग्लिश भाषेची गंमत ह्या सुधारायला जाणाऱ्यांना माहीत नसतं.
त्यात हे 'सुधारक' लोक गोरे पुरुष असले की त्याला आणखी गमतीशीर रंग येतात... त्यामुळे ह्या लोकांसमोर बोलताना कधीही, चुकूनही सामान्य व्यक्ती म्हणजे पुरुष असू शकते, असं म्हणण्याची सोय मला उरत नाही. टिकून राहायचं असेल तर खवचटपणाशिवाय पर्याय राहत नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
जौद्याहो!
'डेटा' एकवचनी काय, मीसुद्धा अनेकदा वापरतो. त्यामागचे तथ्य माहीत असूनसुद्धा. (आणि इंग्रजी माझी मातृभाषा नसूनसुद्धा.) माझे होते, तेथे गोऱ्यांची काय कथा?
तेव्हा सोडून द्या; त्यांना क्षमा करा. कां की, ते काय करतात, ते त्यांचे त्यांनाच कळत नाही.
आमेन.
(अतिअवांतर: 'संकष्टी पावावे' म्हणणारे अनेक मराठीजन मला ठाऊक आहेत. चालायचेच.)
पापिलवार
पापिलवार पद्धत म्हणून 'डेटा इज' असं माझ्याही तोंडी कधीमधी येतं. तसं म्हणण्याबद्दल आक्षेप नाहीच; पण 'डेटा आर ...' हे सुधारणं गमतीशीर होतं. त्यातही इतर विषयांतून पीएचड्या वगैरे करून आलेले विद्रट लोक 'डेटा आर...' सुधरायला जात नाहीत, असं माझं सांगोवांगी निरीक्षण.
फडके कोशानुसार 'म्हणणे' हा मूळ धातू, त्याची रूपं 'म्हण*' होतात. म्हणलं हे प्रमाणरूप, म्हटलं ही बोलीभाषा म्हणता येईल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
People WANT to visit this
'परंतू' यात चूक नाही राहिलं.
ठराविक गटनावे ठराविक पद्धतीनेच चालतात त्यात्या भाषेत.
1)The Data in the card is corrupted.
2) Data in all the three cards ARE corrupted.
हे दोन्ही बरोबर आहे . विचारून पाहा.
एकुणात मॅन्युअल या शब्दातला
एकुणात मॅन्युअल या शब्दातला मॅन पुरुष नाही (पक्षी- ते पुरुषप्रधान संस्कृतीतून आलेलं नाही) या मुद्द्याला यशस्वी बगल मिळाली आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
नेहमीप्रमाणे
मुद्द्याला तुम्ही चारीमुंड्या चीत केलेलं आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
किंचित दुरुस्ती
म्हटलं पाहिजे.
बाकी चालू द्या.
womxn?
womanच्या जागी womyn किंवा womxn हे शब्द वापरतेस का?
नाही
सर्वसामान्य व्यक्ती ही स्त्रीच असते आणि पुरुष असणं क्वीअरपणा, अशी वाक्यरचना असते. बुटकेपणा, पिळदार स्नायू नसणं, पुरुषांना आवडतं तसं दिसण्यासाठी कष्ट घेणं पकाऊ, इत्यादी.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
womanच्या जागी womyn किंवा
त्यापेक्षा फक्त wo ठेवलं तर? घाण पुरतीच उपटून निपटून काढावी ना.
...
... पण घाणीत हात घालायला, केरवारे, धुणीभांडी करायला नोकर पाहिजेत ना!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हो ना. पण त्यांना वहाणेखाली
हो ना. पण त्यांना वहाणेखाली ठेवावं. आपल्या समस्त ज्ञातीच्या नावात कशाला गुंफायचं?
Wo च बरं पडेल. विचार व्हावा.
(अवांतर)
मागे एक 'Pati Patni aur Wo' की कायशाशा नावाचा पिच्चर आला होता. त्याचा काही...
पुन्हा पतीच प्रथम.. ? यू टू
पुन्हा पतीच प्रथम.. ? यू टू नबा?
आधी नावात "patni, wo aur pati" किंवा "patni, wo aur nothing" असा बदल करा, मग पुढे बोलू.
पिच्चर १९७०ज़मधला होता
सुरुवात हळूहळूच करायला पाहिजे ना? ते काय ते,
बेबी ष्टेप्सबेबी गर्ल ष्टेप्स की काय ते म्हणतात ते.Woने अशा तऱ्हेने चंचुप्रवेश केल्यावर मग हळूहळू पतीचे उच्चाटन करायला हरकत नसावी.
(हं, आजमितीस जर अशा नावांचा पिच्चर कोणी काढला, तर मग निषेधाचा विचार करता येईल.)
..........
patni आणि wo एकत्र आल्यावर मग त्यातून nothingच पैदा होणार. एवढ्या शिंपल facts of life तुमच्यासारख्या झंटलमन लोकान्ला...
wo की woe?
wo की woe?
Woo
Patni, Woh and Woo ठेवावे. पतीला हद्दपारच करावे. इंग्रजीत लिहितानाही मॅन शब्दातला M कॅपिटल काढण्यास बंदी करावी.
M कॅपिटल काढण्यास बंदी करावी
मी नाही त्यांतली!
असा पुरुषी विचार करायला मी नाही त्यांतली!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हॉर्सपावर मेअरपावर?
हॉर्सपावर मेअरपावर?
प्रियंका गांधी - उद्दामतेला दिलेले आव्हान् !
प्रियंका गांधी यांनी ज्या
सभ्यतेने
संयमाने
सुजाणपणाने
संवेदनशीलतेने
सोनभद्र प्रकरणात योगी सरकारच्या विरोधात जी भुमिका घेतली ती अत्यंत
स्तुत्य्
अनुकरणीय
अशी आहे
याच रीतीने जर प्रियंका गांधी काम करत राहील्या तर त्यांच्यात भारतीय राजकारणाला एक नविन दिशा देण्याची क्षमता आहे.
?
काय घडले?
जरा आणिबाणीवरही बोलावं. ते
जरा आणिबाणीवरही बोलावं. ते टाळतात.
जमिनीच्या वादांत दोन गटात
जमिनीच्या वादांत दोन गटात मारामारी होऊन वीसबावीस खून झाले आणि इकडे {भाजप} सरकारचे लक्ष नाहिये.
नवीन दिशा देण्याची क्षमता आहे
नवीन दिशा देण्याची क्षमता आहे.>>> हो, पण द्रव्य नसेल तर त्या दिशेने निर्वाचीत सांसद जात नाहीत.
सर्वेक्षण
पारंपरिक सर्वेक्षणांचं भारतीय निवडणुकांसंदर्भात काय होईल - ह्याबद्दल 'लोकरंग'मध्ये आलेला माझा लेख. (दुवा)
ह्या लेखातले काही मुद्दे सुचवण्याबद्दल नंदनचे आभार.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
लेख वाचला.
लेख वाचला.
१)गुगलची पोहोच किती यांवर सर्व ट्रेन्डसचा डोलारा उभा आहे.
२) गुगलला कुणी विचारलेच नाही तर ते आरशांत दिसणार नाही.
३) भटकंती दरम्यान एक आर्मि अधिकारी भेटला वाराणसीचा. सध्या पुण्यात पोस्टिंग आहे. " बालाकोट प्रकरण मोदीने बरोबर पोहोचवले. देशाचे संरक्षण हा मुद्दा फार पटला सामान्यांना. "
४) थोडक्यात एखादा मुद्दा आणि सर्वेक्षण यामध्ये तफावत पडू शकते.
तत्त्वतः काहीही होऊ शकतं.
'लोकरंग'मधल्याच ह्या दुसऱ्या लेखातून गूगलमधून किती माहिती मिळू शकते आणि ती किती विश्वासार्ह आहे, ह्याचे शब्दशः आकडे मिळतील.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
१)गुगलची पोहोच किती यांवर
तूर्तास मुक्काम पॅरीस येथे एका Airbnb अपार्टमेन्ट्मध्ये. कालचीच गोष्ट. दुसऱ्या दिवशीच्या न्याहरीसाठी अंडी-दूध फारशी नाहीत हे दिवसभराच्या भटकंतीत लक्षात आले नाही. संध्याकाळी पाहिले तर इमारतीखालील किराणा दुकान बंद होते (रविवारी बरीच दुकाने बंद असतात). गूगल मॅपवर शोध घेतला असता, सर्वात जवळचे, उघडे असणारे किराणा दुकान दीड मैलावर असल्याचे कळले. जायची तयारी केली तो दारातच अपार्टमेंटचा मालक भेटला. त्याने आतील गल्लीतून गेल्यास दहा मिनिटात एक तूर्की किराणा दुकान असल्याचे शुभ्-वर्तमान दिले. जे गूगलबाबाला ठाउक़ नव्हते!
आतला माल
आणि कदाचित दुकानात काम करणारे तुर्की फ्रेंच सरकारला ठाऊक नसतील
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
ज्यांना काहीच माहीत नाही
ज्यांना काहीच माहीत नाही त्यांना थोडाफार अंदाज नक्कीच मिळेल.
----
एखाद्या समारंभास किती पाहुणे येतील हे समजण्यासाठी काही शोध असतात का?
पुस्तक मंडळाने शेवटी उबंटु
पुस्तक मंडळाने शेवटी उबंटु ओपन सोर्सला आपलं म्हटलं. मासॉफ्टचं तिकिट कापलं. बरेच पैसे वाचणारेत.
MSCIT कोर्सचेही बारा वाजणार.
MSCIT कोर्सचेही बारा वाजणार.
तुमच्या man चा मुद्दा वर
तुमच्या man चा मुद्दा वर काढायला परत वाव आहे. शिगरेटी फक्त पुरुषांंनीच ओढायच्या असा भारतियांनी नियम/समज करून घेतल्याने ट्विटरवर प्रियांका ट्रोलवर.
((कोळणीच्या विड्या माफ. कोयताच बसेल डोक्यात.))