गलीबॉय - रॉबिनहूड विथ नवीन बूड

Gully Boy Still

पिच्चर सुरू होतो. ट्रेलर बघून मनात अपेक्षा दाटलेल्या असतात. कळकट कपड्यांतला मोईन(विजय वर्मा) मुंबईत फोर्टच्या एका गल्लीत विडी ओढत चालत असतो. मध्येच थबकून, शिट्टी वाजवून तो सलमान(नकुल सहदेव) आणि मुराद(रणवीर सिंग)ला बोलवतो. हे तिघे गाडीचोर आहेत हे पुढच्या संवादात कळतं. एका पेट्टात तिघे एक भारीतली गाडी चोरतात. मुरादला हे आवडत नसतं, आणि तो मर्जीविरुद्ध आलेला असतो. गाडीतलं म्युझिक बंद पडतं. टिपीकल बॉलीवुडी पंजाबी शब्दांतलं गाणं, मध्येच देशी रॅप. मुराद सणकून ते बंद करतो.
मोईन: "छोटेने बोला तेरेकू रॅप-बिप का भोत शौक है करके...?"
मुराद: "इसको रॅप बोल्तें है? खोटा खोटा रिमीक्स डालके पब्लिकको नचानेका? ये देख मेरी गाडी, ये देख मेरे जूते, मेरे कपडे, दारू, छोकरी-नकली शॉट साला!"
ह्या संवादावरून पुढे काय होणार आहे ह्याची झलक येते. गली बॉय ह्या एका पिच्चरने युवावर्गात देशी रॅपचं वेड आणलं. धारावीत जन्मलेल्या, सध्या सेलेब्रिटी असलेल्या व्हिव्हिअन 'डिव्हाईन' फर्नांडिस (सेक्रेड गेम्समधील 'काम २५' फेम) आणि नावेद 'नैझी' शेख ह्यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट. ह्या चित्रपटामुळे भारतीय नाही तरी कमीत कमी मुंबईकर रॅपर्सना सोन्याचे दिवस नाही ती परत प्रसिद्धीच्या झोतात मात्र नक्की आणलं. डिव्हाइन,एमिवे,100आरबीएच, एमसी तोडफोड इत्यादी नावे युवा वर्गाच्या ओठी रुळू लागली. ह्याच प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार होऊन अनेकांनी वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले जसे की एमिवेचे सध्याचे हिट गाणे- मचाएंगे.

बहोत समय बाद, लडकी पे गाना- गाडी या दारू नहीं दिखाना

आणि रफ्तारचं- कुर्बां हुआ

ये गाना गाडीओं के लिये नही, क्लब या पार्टीओं के लिये नही

इ. मुद्दा असा की एका चित्रपटामुळे बऱ्याच रियल, सरळ, कच्च्या गाण्यांची एक लाट आली खरी. सरासरी भारतीय प्रेक्षक जुन्या गाण्यांचे आचरट रिमिक्स किंवा नवीन गाण्यातले उर्दूप्रचुर बोजड शब्द ह्यांना कंटाळला होताच. झोया अख्तर ह्या अतिशय उत्तम दिग्दर्शिकेने आणलेला चित्रपट म्हणजे अपेक्षा अर्थातच ताणल्या गेल्या होत्या. संगीत वेगळं होतं. कच्चं, महाग वाद्ये वगैरे न वापरता, बीटबॉक्सिंग आणि मस्त तालात बांधलेले, जोरकस शब्द. पिच्चर पुढे सरकतो. आलिया भट्टची एन्ट्री होते. हिचं पात्र अफाट आहे. मुरादवर तिचं बराच काळ प्रेम आहे. मुरादला टेक्स्ट करणाऱ्या एका मुलीला ती धू धू धुते. नंतर तिची मस्त गोची करते. ह्या सगळ्याची पार्श्वभूमी म्हणजे, कळकट धारावीच्या गल्ल्या, मुंबईची गर्दी, घाण, खुराड्यांसारखी घरं ह्यांचं वास्तव, नीट दर्शन घडतं. गाणी सुरूच असतात.

खडा हूं कैसे मैं यहाँ पे अब ना पूछना, दर्द-ए-शायरीमें तुझको चाहिए सबूत क्या
शिखर ये सोच कर जुडा हूं मैं जमींसे, यकीन तुमको ना पर आगे आया मैं यकीन से...

इथे जरा वाटतं की हा पिच्चर वाटला त्याच्याहून वेगळा आहे. नेहमीच्या समाजवादी बोंबा इथे ऐकायला मिळणार नाहीत. मुरादला श्रीकांत राणे ऊर्फ शेर (सिद्धांत चतुर्वेदी) भेटतो आणि चित्रपट खऱ्या अर्थाने सुरू होतो.

शेर की ज़ुबानी सुन ये शहर की कहानी
यहाँ rap नही होता तेरे वहम को भगादी
लड़कियाँ ना गाड़ी अपनी अलग है आबादी
असल rap का ये जलवा तेरे आत्मा में जगादी

मुराद इझ हूक्ड. पुंडलिकाभेटी लोकल परब्रह्म. नोटिस द 'लडकियाँ ना गाडी'.
गोष्ट तशी पुढची प्रेडिक्टेबल आहे. किंबहुना दोन दिग्दर्शकांचं द्वंद्व मला दिसलं. मुरादच्या वडिलांनी नवी बायको आणलेली असते. तिला अम्मी म्हणावंसं मुरादला वाटत नाही. त्याला रॅपच करायचं असतं. त्यात मुरादचे वडील (विजय राज) चा पाय मोडतो आणि मुरादला त्यांची ड्रायव्हरची नोकरी पत्करावी लागते. मुरादचं इंग्रजी चांगलं आहे. त्याच्या हिंदीत प्रचंड मुंबईस्टाईल मराठी व्याकरण आणि शब्द घुसलेले आहेत पण त्याचं इंग्रजी मात्र व्यवस्थित आहे. हे कसं, त्याचं उत्तर नाही. पण, पण, पण... ह्यावेळी दूरी हे गाणं सुरू होतं.

कोई मुझको ये बताये
क्यूँ ये दूरी और मज़बूरी
इस दुनिया की क्या Story
किसके हाथ में इसकी डोरी
Right में Building आसमानो को छुरी
Left में बच्ची भूखी सड़को पे सोरी

बा-ळ-बो-ध. आलेच लायनीवर. आत्तापर्यंत एक मस्त गोष्ट सुरू होती. पण बॉलीवूडी पोएटिक जस्टिस आवरण्याचा हव्यास मात्र कोणा दिग्दर्शकाला किंवा लेखकाला आवरता आला नाही. हे गाणं, मुराद जिचा ड्रायव्हर आहे त्या मुलीचा आणि मुरादचा वर्गविरोध वगैरे एकदम बटबटीतपणे मांडला जातो. मुराद छातीवर मूठ ठोकत म्हंणतो- अपना टाईम आएगा!
साधारण बॉलीवूड प्रेक्षकाला ह्यापुढचं सांगायची गरज नाही. मुराद, नास ह्या रॅपरचा फॅन असतो. हा बुवा पिच्चरचा प्रोड्युसर आहे. नंतर स्काय ऊर्फ श्वेता (कल्की कोचलिन) हिचं आगमन होतं. कहानीत एक्स्पेक्टेड ट्विस्ट येतो. आता त्याचं काय होतं हे पहाण्यासाठी पिक्चरच बघावा.
आता ह्यात मुक्तचिंतन कुठेय?
"अकेला इन्सान फिर गाडी तेरी चार क्यूं? घरमें है चार फिर रूम्स तेरे आठ क्यूं?" असं 'आझादी'गाण्यात थेट मांडणारा चित्रपट शेरच्या पन्नास तरी महागातल्या बुटांबद्दल सोयीस्कर मौन बाळगतो, त्याच्या 'रेबेल' प्रतिमेवर खपवून नेतो. खरंतर बॉलीवूडी सिनेमाच. झोया अख्तरचा झाला तरी इतकं निष्पक्ष तत्त्वचिंतन अपेक्षित नव्हतं म्हणा, असो. चित्रपटात ठिकठिकाणी गांजा विकणे, गरीब बिचाऱ्या जन्तेस पकडणे पण त्यांची हतबलता दाखवणे हे रॉबिनहूडी प्रकरण आहेच. वर्गकलहही बीभत्सपणे दाखवण्याऐवजी मुरादला स्कायच्या बाथरूममध्ये पावलांनी जागा मोजताना दाखवून सुंदर दाखवला आहे. पण ह्या सगळ्या नादात नायकाची निरागसता वारंवार दाखवून वीटपण तितकाच आणलेला आहे. एका टिपीकल, फ्रस्ट्रेटेड धारावीतल्या गरीब वस्तीतल्या माणसाचं आयुष्य चित्रित करताना अशा अनेक, प्राकृतिक स्वप्नं गिळून कधीतरी स्टेज गाजवायच्या अनेक रॅपर तरूणांचं दर्शन घडवण्यात सिनेमा अपयशी ठरतो. त्यांचं अपयश तितकं सरळ, थेट चित्रित करताना त्याचा बाजारूपणा आड येतो.
शेवटी प्रश्न उरतोच, हाव बरी की वाईट? जर तुम्हाला लेको तुमच्या धारावीतून बाहेर पडायचंय, पन्नास बूट घ्यायचेत, ड्रायव्हर बनायचं नाहीए तर जरा जास्त पैसे असलेल्यांनी ते केलं तर काय फरक पडतो? असो. हा विषय बराच मोठा आहे. चित्रपट मुख्यत्वेकरून पाहणाऱ्या मध्यमवर्गाला अजूनच अशा विस्थापित, 'गॉन केस' लोकांचा कळवळा आणण्यासाठी बरा आहे. गाण्यांतले शब्द चांगले असले तरी भावना बाळबोध आहे, आणि हेच वरवर न उमगणारं, तसं छानछान वाटणारं परंतु महत्त्वाचं असं चित्रपटाचं अपयश आहे.

हाँ मेरा भाई है तो नोटों की सरकार है ना
नोट से बनते अपने बेटों को ये स्टार हैं ना
कितने बेकार क्यूँ ये आपस में झंकार है ना
बाक़ी पूरा देश डूबे इनकी नैया पार है ना

अरे, अनेक बेरोजगार तरूण पडलेयत इथे. बांद्रा लिंकरोड वर वाकड्यातिकड्या बाईक चालवणारे. तरीही तुझ्या बापाचं तंगडं मोडल्यावर त्याने तुलाच नोकरी दिली ना? हा प्रति-बाळबोधविचार डोक्यात आल्याशिवाय राहत नाही. हाव म्हटली तर आहे, म्हटली तर वाढणारी गरज आहे. मोस्लेचा पिरॅमिड अनंत आहे. अपयश हे पचवून उभे राहिलेले अनेक रॅपर ह्यात दिसतात. बरेच दिवस ह्या जगात असलेले, स्ट्रगलिंग. शेर तर प्रथितयश 'एमसी' आहे. तरीही त्यांना मात्र कोणत्याही स्पर्धेत फार यश नाही मिळत, जे नायकाला मिळतं. इथेही सिनेमा बाजारू होतो. अर्थात, मुराद पहिले हरून, काहीतरी आयोजकांना भावनिक अपील वगैरे करून परत आला असता तर सिनेमा जास्त बॉलिवूडी झाला असता हेही तितकंच खरं. नायक कुठल्याच उच्चभ्रू जमातीत फिरत नाही, कॉलेजमध्ये फार मिसळताना दिसत नाही, रॅप वगैरे तर आत्ताआत्ताहेच करू लागतो तरीही त्याचं इंग्लिश बरंच बरं असतं. त्याची राहणी स्वच्छ, आत्मविश्वासपूर्ण असते. खरंतर मोईनची भूमिका विजय वर्माने झकास वठवली आहे. टिपीकल धारावीतला, गांजाचा धंदा करणारा कळकट माणूस म्हणून तो पटतो. रणबीरची कायम क्लीन शेव्ह्ड, ट्रिम्ड दाढी आणि स्वच्छ कपडे खटकतातच. ह्या गोष्टींचं उत्तर चित्रपटात नाही. आलियाने उत्तम अभिनय केला आहे हे मान्य केलंच पाहिजे. कल्कीला काहीशी तिचीच भूमिका वठवायची कामगिरी असल्याने, तसंच अमृता सुभाषला तिचीच शोषित पीडित विवाहितेची भूमिका मिळालेली आहे, आणि ती तिने बरी केली आहे. मूलभूत विचारांत वगैरे चित्रपट गंडतो. तोच तो वर्षानुवर्षांचा बॉलीवूडी रॉबिनहूडीपणा तरूणाईला आवडेलशा भाषेत मांडला इतकीच त्याची खोली आहे.
हे सगळं करताना 'अपना टाईम आएगा'चे टीशर्ट विकणे, भिंतीभिंतींवर त्याचे सिलहाऊट रंगवणे इत्यादी बाजारूपणा केलेला आहेच. शिवाय बहुतांश युवावर्गाला भिडेल अशी, संस्कृतप्रचुर (रादर, नॉर्मल) हिंदीतली गाणी, जोरकस पकड घेणारा ताल इत्यादी जमेच्या बाजू आहेतच. तरीही, हा चित्रपट एक अनुभव ह्याअर्थी सुरेख ठरतो!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

प्रतिक्रिया

वा!
लिहित राहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झोया अख्तरचे मागचे चित्रपट पाहून तिचा पुढला चित्रपट विमानातली-बॅचलर पार्टी-नाच वगैरे असेल असं वाटलेलं.
त्यामुळे मला तरी "गलीबॉय" झोयाचा आहे हे बघून फार आनंद झाला. (तिचा लक बाय चान्स आवडला होता.)
---
मला चित्रपटात सर्वात जास्त सपोर्टिंग लोकं आवडली. मोटार मॅकेनिक/चोर असलेला विजय वर्मा, एम.सी. शेर, विजय मौर्य, विजय राज वगैरे सॉलेड आवडले.
किती विजय आहेत ह्या चित्रपटात!
विजय मौर्य ह्या माणसावर माझा जीव आहे. त्याला "पाच" मधे बघून सॅल्यूट केला होता. नंतर तो विशेष दिसला नाही, त्याने मराठी चित्रपटांतही नशीब आजमावलं.
आता गली बॉयचे डायलॉग त्याचे आहेत.
विजय राजला विशेष भावखाऊ भूमिका नाही- पण तो मस्त काम करून गेला आहे. किंवा नसेलही. माझा बायस आहे ह्या दोन अभिनेत्यांसाठी.

कल्की शॉट आहे. सोडून द्या. सुभाषद्वयीही ठीकच. अलिया भटचं पात्र मस्त आहे.
रणवीर थोडा हैदराबादी स्टाईल बोलतो का? असं वाटलं. पण धारावीतल्या मुस्लिम मुंबैकराचं हिंदी मी आधी कधी ऐकलं नाही. तेव्हा ऑथेंटीक असेलही.

----
रॅप गाणीही आवडली मला - खोटं कशाला बोलू? त्या आधी कधी हिंदी रॅप ऐकलं नव्हतं. त्यामुळे "असली हिपहॉप से मिलाए हिंदुस्तान को" पासून अगदी "काम भारी भारी काम .. लेलो जानकारी" वगैरे प्रकार खच्चून आवडले.
त्यातली काही गाणी ओरिजिनल पाहिली तेव्हा जास्त आवडली. म्हणजे "मेरी गली मे" ची कोरिओग्राफी चित्रपटात भारी आहे, पण ओरिजिनल यू ट्यूब गाणं जास्त आवडलं.
"जिंगोस्तान झिंदाबाद"ही त्याच्या यू ट्यूब व्हिडिओमुळे आवडलं जाम. चित्रपटात काही पार्श्वभूमीच कळत नाही गाण्याची.
-----

ते सोशल मेसेज वगैरे थोडं वरवरचं वाटलं - पण गाण्यामधे लिहिलेल्या ओळी दर वेळी स्वानुभव असेलच असं नाही. धारावीसारख्या भागातून आलेल्या मुलाने लिहिलेली गाणी म्ह्णून त्यांना मार्केटिंग पोटेन्शिअल हवंच, त्यासाठी थोडी सामाजिक वगैरे फोडणी गरजेची वाटली असावी.
निव्वळ हा सापळा टाळून जर का "आहे तसंच" दाखवलं तर मग मुरादच्या पात्राबद्दल प्रेक्षकांना सहानुभूती वाटली नसती.

असो.
झोया-रॅपर्स ह्यांनी मिळून वेगळा चित्रपट काढल्याबद्दल त्यांचं अभिनंदन.
भोत हार्ड. कुड हॅव बीन हार्डर Smile

तळटीप - ट्यानोबा, बरं केलंत लिहिलंत हे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टॅनोबांच्या लेखामुळे अवसान आलं आणि गलीबॉय पाहिला.
आलियाचं पात्र मला जर स्टिरिओटिपीकल वाटलं. आजकाल पुरुषी दंगा घालणाऱ्या मुलींची पात्रे दाखवायची फॅशन आहे त्याच पठडीतलं वाटलं.
~
माझी एक एक्स मैत्रिण होती. सिगरेटी फुंकून कूल राहणारी, पुरुषांच्या चपला कम्फर्टेबल असतात म्हणून मुद्दाम घालणारी, भयानक दारू रिचवणारी, बॉबकट ठेवणारी, ढगळ ट्राउझर्स घालणारी, मांजरांसाठी ऑब्सेस्ड असणारी. (अवांतर: अशा मुलींच्यात शक्यतो हार्मोनल बॅलन्स बिघडतात आणि त्यांचा मातृत्वचा दाबून टाकलेला/गेलेला भाव मांजरं पाळण्यात उफाळून येतो असं मला वाटतं.) तिला पुरुष सुद्धा आवडायचे. सेरेब्रो-चॅटमध्ये तासनतास व्यतीत करणारी ही मैत्रिण काही स्त्रीसुलभ भावना मुद्दाम हायलाईट करत असे. त्यामुळे ती काही गोष्टी आवर्जून करे. फियर्सली प्रेम करणे, अतिशय छोट्या गोष्टींचे मोठे इश्युज करणे, प्रसंगी हिंसक वागणे अशा गोष्टी. काही स्त्रिया आपल्या प्रियकरांच्या दुसऱ्या भानगडी सटली हाताळून त्या भानगडींचा परस्पर काटा काढण्यात नैसर्गिकरित्या पटाईत असतात. उपरोक्त लाऊड पुरुषी मुली ह्या गोष्टी तेवढ्या चातुर्याने हाताळू शकत नाहीत तेव्हा त्यांच्या मधल्या ह्या इनसिक्युरिटीज एकदम उसळून व्यक्त होतात. बहुतेकदा अशा लाऊड असण्याचा त्या मिथ्या दंभही मिरवतात. (मला ह्या कोणत्याही गोष्टींची काहीही अडचण नाही.)
~
असा दिखावू आवाजी पुरुषीपणा हिरवीनीला देऊन तिला बोल्ड दाखवण्याची फॅशन आहे. आलियाचं पात्र हा त्यातलाच एक प्रकार आहे. खरेतर आलियाने हे पात्र उत्तम रंगवलं आहे. त्याबद्दल तिचे अभिनंदन. पात्र म्हणून तिचा स्त्रैण आक्रमकपणा मला जास्त भावला असता.
~
संगीत आणि रॅपबद्दल मी टॅनोबांशी पूर्णपणे सहमत आहे.
~
शुटिंगसाठी पब्लिक ग्राउंड वगैरेच्या भिंती विचित्रपणे दिखाऊ रंगवण्याची काय गरज असते हे मला कळत नाही. छायाचित्रणाचा पोत मला अजिबात आवडला नाही.
~
हा निश्चितच एक उत्तम व्यावसायिक चित्रपट आहे. चित्रपटाच्या मार्केटिंग आणि प्रमोशन टीमचं अभिनंदन, त्यांनी जराशा वेगळ्या वाटा चोखाळल्या.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

अशा गल्लीगल किती टक्के असतील?
नीलो, निरीक्षणं झकास.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शीर्षक: ट्यानोबा, बरं केलंत लिहिलत ते .
आता बघेन म्हणतो.
बाकी बाबा सहगलच्या पुढे गाडी गेली हे उत्तमच झालं म्हणायचं.
आणि जावेद अख्तर किंवा /आणि त्यांच्या प्रथम पत्नी यांनी मुलांवर बरे संस्कार केलेले दिसतात. ( आधी रॉक आणि आता रॅप)
असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

लिहिणार नव्हतो; पण राहवत नाही म्हणून लिहितो.
टोलेजंग बिल्डींगच्या समोर गरीब वस्ती पाहून प्रश्न पडणे; केवळ जन्म कुठे घेतला त्यामुळे संधी नाकारल्या जाताहेत हे पाहून अस्वस्थ होणे; पडेल ते काम करतानाच मोठं होण्याची स्वप्नं पाहणे; त्यासाठी मेहनत करणे; केवळ श्रीमंत घरात जन्मलेल्या प्रिव्हिलेज्ड मिड्यॉकर मंडळींची हुर्यो उडवणे व “अपना टाईम आयेगा” म्हणणे ह्यात लेखकाला समाजवाद कुठे दिसला? कोणत्याही प्रसंगात मुराद सरकारी कुबड्यांसाठी भीक मागताना दाखवला नाहीय. उलट अत्यंत महत्त्वाची नोकरी प्रचंड दबावाखाली सोडून हवं ते करण्याची रिस्क घेण्याची कॅपिटॅलिस्ट प्रवृत्तीच दाखवतो.
जन्मजात प्रिव्हिलेज्ड लोकांविरूद्धचा असंतोष गाण्यातून व ग्राफिटीतून प्रकट केला म्हणजे लगेच तो समाजवाद होत नाही भाऊ. त्याला हवंय ते तो मिळवायला झटतोय. ठरवलं तर काहीही करू शकतो हे फक्त वस्तीवाल्यांना दाखवतोय. रॉबिनहूड वगैरे काही नाही.
कदाचित मिड्यॉकर सुप्रिमसिस्ट संस्कृतीत, गरीबांनी गरिबीशी लढतानाही हूं की चूं न करता नम्रतेने सत्ताधाऱ्यांचे पाय चाटून पदरात काहीतरी पाडून घेणे, ह्याला भांडवलवाद म्हणत असावेत.

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

केवळ जन्म कुठे घेतला त्यामुळे संधी नाकारल्या जाताहेत

तुमचं तसं खरं आहे, पण चित्रपटात असं कुठेही आलेलं नाही, ना माझ्या लेखात. खरंतर कामवाले/भंगारवाले इ. पेक्षा 'ड्रायव्हर' म्हणजे बरीच भरवशाची नोकरी धारावीतल्या मुसलमानांना, एक चांगलंच श्रीमंत कुटुंब देतं ह्यातच खूप काही आलं.

एमिनेमच्या काही ओळी सांगतो, ज्यातून मला काय म्हणायचं ते आधीच ठळकपणे मांडता येईल.

Nobody asked for life to deal us
With these bullshit hands we're dealt
We gotta take these cards ourselves
Flip them, don't expect no help, now I could have either just
Sat on my ass and pissed and moaned
But take this situation in which I'm placed in
And get up and get my own,

केवळ श्रीमंत घरात जन्मलेल्या प्रिव्हिलेज्ड मिड्यॉकर मंडळींची हुर्यो उडवणे व “अपना टाईम आयेगा” म्हणणे ह्यात लेखकाला समाजवाद कुठे दिसला?

मी असं कुठेही म्हटलेलं नाहीए. थोडक्यात माझा मुद्दा इतकाच आहे, की 'बिल्डींग आसमानों को छू रही, बच्ची सडकोंपर भूखी रो रही" हे प्राचीन समाजवादी बाळबोध स्टेटमेंट आहे. हे रॉबिनहूडी नाही काय? तुम्ही जे लिहीलंय त्यातलं एकही वाक्य माझ्या लिखाणातून प्रतीत होत नाही. किंबहुना मुरादच्या पात्राचा मला अभिमानच वाटतो. 'मायसेल्फ कमिंग फ्रॉम व्हिलेज(धारावी) एरीआ' वगैरे एरवी टाळ्याखेचू वाक्यं लिहीलेली नाहीत ह्याचं मला कौतुकच वाटलंय.

माझा आक्षेप आहे तो स्वघोषित विचारवंतांना.

जन्मजात प्रिव्हिलेज्ड लोकांविरूद्धचा असंतोष गाण्यातून व ग्राफिटीतून प्रकट केला म्हणजे लगेच तो समाजवाद होत नाही भाऊ.

मग काय होतो म्हणे? (वरच्या गाण्यात, त्या ग्राफिटीत, त्या बाथरूमची लांबी मोजणे सीनमध्ये इ.) जरा ढोबळरीत्या हाच संदेश आहे ना, की ह्यांना 'सरासरी' केलं पाहिजे? हे एखाद्या समाजवाद्याचं 'डिल्यूजन ऑफ ग्रँड्यर' आहे की नाही? आपलं नशिब खराब आहे हे समजून त्याच्याशी संघर्ष करणे हे जर पटत असेल तर ते ज्यांचं चांगलं आहे त्यांच्याबद्दल असंतोष का वाटावा? तसंच मग ह्यांना 'भिकारचोट धारावीतली घाण' वगैरे कोणी म्हटलं की ह्याचाही उदोउदो 'ज.प्रि.लो.'नी केला, तर तो नैतिकच नव्हे काय?
ग्राफिटीपण तेच अजून. त्या मॉडेल्सच्या हातात बर्गर रंगवणे वगैरे जुनं आणि म्हणूनच बाळबोध झालंय आता. लोक आजकाल हे स्वखुषीने करतात. (ह्याच लॉजिकने तर बालकलाकार निषिद्ध असले पाहिजेत. त्यांच्या बॅनर्सवर 'एज्युकेट मी' वगैरे रंगवलं पाहिजे असो.)
सत्ताधाऱ्यांचे पाय चाटून... वगैरे फिल्मी वाक्यांचा प्रतिवाद करण्यात मला इंटरेस्ट नाही. मुराद त्याच्या हिशोबाने बरोबर ती नोकरी करतो, आणि जिथे त्याच्या कलेवर गदा येते ती सामाजिकदृष्ट्या वरचढ असली तरीही सरळ सोडतो ह्याबद्दल त्याचा अभिमानच वाटतो. मात्र रॅपर्सचं गंडकं (रॉबिनहूडी, समाजवादी इ.) लॉजिक चित्रपटाने अधोरेखित न करता स्वत:चं मांडायला हवं होतं. ते मांडलंही जातं, म्हणून मला हा चित्रपट सुरेख अनुभव वाटतो.

मुसलमानांमधलं बहुपत्नीकत्व, सामाजिक संकुचित वृत्ती ह्यावर जी टीका केली आहे त्याबद्दलही कौतुकच. तरीही, फक्त लेखनकौशल्यदृष्ट्या लक बाय चान्स वरचढ ठरतो. आहे ते असं आहे. मी स्पष्ट लिहीलंय की दोन दिग्दर्शकांचं द्वंद्व मला दिसलं. एक टिपीकल बॉलीवूडी, एक नवमतवादी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ए बुल्ल्या, तुला विचारलं का कोणी?

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मग काय होतो म्हणे? (वरच्या गाण्यात, त्या ग्राफिटीत, त्या बाथरूमची लांबी मोजणे सीनमध्ये इ.) जरा ढोबळरीत्या हाच संदेश आहे ना, की ह्यांना 'सरासरी' केलं पाहिजे? हे एखाद्या समाजवाद्याचं 'डिल्यूजन ऑफ ग्रँड्यर' आहे की नाही? आपलं नशिब खराब आहे हे समजून त्याच्याशी संघर्ष करणे हे जर पटत असेल तर ते ज्यांचं चांगलं आहे त्यांच्याबद्दल असंतोष का वाटावा? तसंच मग ह्यांना 'भिकारचोट धारावीतली घाण' वगैरे कोणी म्हटलं की ह्याचाही उदोउदो 'ज.प्रि.लो.'नी केला, तर तो नैतिकच नव्हे काय?
ग्राफिटीपण तेच अजून. त्या मॉडेल्सच्या हातात बर्गर रंगवणे वगैरे जुनं आणि म्हणूनच बाळबोध झालंय आता. लोक आजकाल हे स्वखुषीने करतात. (ह्याच लॉजिकने तर बालकलाकार निषिद्ध असले पाहिजेत. त्यांच्या बॅनर्सवर 'एज्युकेट मी' वगैरे रंगवलं पाहिजे असो.)
सत्ताधाऱ्यांचे पाय चाटून... वगैरे फिल्मी वाक्यांचा प्रतिवाद करण्यात मला इंटरेस्ट नाही. मुराद त्याच्या हिशोबाने बरोबर ती नोकरी करतो, आणि जिथे त्याच्या कलेवर गदा येते ती सामाजिकदृष्ट्या वरचढ असली तरीही सरळ सोडतो ह्याबद्दल त्याचा अभिमानच वाटतो. मात्र रॅपर्सचं गंडकं (रॉबिनहूडी, समाजवादी इ.) लॉजिक चित्रपटाने अधोरेखित न करता स्वत:चं मांडायला हवं होतं. ते मांडलंही जातं, म्हणून मला हा चित्रपट सुरेख अनुभव वाटतो.

मुसलमानांमधलं बहुपत्नीकत्व, सामाजिक संकुचित वृत्ती ह्यावर जी टीका केली आहे त्याबद्दलही कौतुकच. तरीही, फक्त लेखनकौशल्यदृष्ट्या लक बाय चान्स वरचढ ठरतो. आहे ते असं आहे. मी स्पष्ट लिहीलंय की दोन दिग्दर्शकांचं द्वंद्व मला दिसलं. एक टिपीकल बॉलीवूडी, एक नवमतवादी.

इतकं असतंय व्हय त्याच्यामगं?
आमचं काय? असलं काही समीक्षणात वाचलं की पिक्चर बघायचा सोडा, जगण्यातलाच इंटरेस्ट निघून जातो.
क्षमस्व.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हेही म्हटलंय आधीच. वाट्टं ते लिहीलं. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ए बुल्ल्या, तुला विचारलं का कोणी?

दमदार मतं आवडली, १४टॅन.
समिक्षेमुळे चर्चा होतेय. दणदणीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हॉटेलमध्ये पडक्या भिंती मुद्दाम ठेवणे/रंगवणे , चाळीतले सीन रंगवणे यातून काय समाजवाद साध्य होतो किंवा पुळका? का नुसताच कलेला वाव?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0