लग्न..एक लोक कथा..

लग्न..एक लोक कथा..
एकाचे लग्न परगावातील मुली बरोबर ठरले....
व-हाड मुलीच्या गावाला निघणार असते..घरात लगबग चालू असते..
घरात म्हातारी आज्जी असते..लग्नाच्या धामधुमीत तिच्या कडे कोण लक्ष देणार? त्यांतून परमुलुख..त्या मुळे आज्जी ला तुला प्रवास झेपणार नाही..वय झाले असे सांगून घरी ठेवण्याचे ठरते..
घरात एक किशोर वयीन नात असते तिचे आज्जी वर खूपं प्रेम असते..
तिच्या सारे लक्षात येते..ती आज्जी ला पोत्यात लपवते .व व-हाडा संगे बरोबर घेते...
व-हाड वेशी पर्यंत येते...मुलीकडचे लोक्स स्वागता साठी /सिमांत पूजांना साठी हजर असतात.....
नवरा देवाला मेव्हण्या असतात व त्या खूपं नटखट व चतुर असतात....
व त्या मुलाकडच्या व-हाडी मंडळींना म्हणतात..आपले स्वागत आहे पण आमची एक अट आहे..आमच्या गावात बरेच लग्नाचे आड आहेत..तुमच्या गावात पण लग्नाळू विहिरी आहेत..तेव्हा आमच्या गावातल्या आडा शी तुमच्या गावच्या विहिरी बरोबर लग्न लावून द्या ..व गावात सन्मानाने प्रवेश करा..
ही चमत्कारिक अट ऐकून मुला कडची मंडळी भांबावून जातात..काय करावे त्यांना उमजत नाही
मात्र मुली कडची मंडळी त्यांची मजा बघत हसत असतात..
हे पाहताच नात हळूच आजी कडे जाते व तिला सारा प्रकार सांगते..आज्जी ऐकते व नातेस कान मंत्र देते..
नात समोर येते अन मुली कडच्या मंडळीस सांगते..
आम्हाला टूम ची अट मान्य आहे..मात्र प्रथे प्रमाणे आपल्या गावच्या आडाना आपण आमच्या गावच्या वेशी पर्यंत वाजत गाजत आणा..आम्ही आमच्या गावच्या विहिरी चे लग्न आपल्या गावा च्या आडा बरोबर लावुन देऊ...
हे ऐकताच मुली कडची मंडळी हार मानतात..व मनोमन उमजतात मुला कडची मंडळी पण तुल्यबळ आहेत व मुलाचे सन्मानाने अंगात स्वागत होते..
मुला कडची मंडळी नाती च्या बुद्धी चे कौतुक करतात.तेव्हा हे सारे आज्जी न सांगितले असे सांगते..
सारे जण आज्जी ला नाती ने आणले या बद्दल नाती वर खूश होतात..
चातुर्य..व्यवहार ज्ञान हे अनेक उन्हाळे पावसाळे सोसल्यावर येते...वय व अनुभवा ची ती देणगी असते

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथा वाचून अकबर आणि बिरबलाच्या गोष्टीची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मजेशीर आहे. बालकथा म्हणुन छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वऱ्हाड शब्द , व-हाड असा लिहिल्याने खूप करमणुक झाली. नातीने आज्जीला व- हाडांसंगे घेतल्याचं पटलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हल्ली अकुंच्या कथांमध्ये कोणाच्या अनावृत शरीरावर चुंबनांचा वर्षाव नाही, कोणाच्या मेंदूवर - नाहीतर आणखी कोठेकोठे - पुरळ नाही... काही मजा नाही राहिली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0