पुन्हा 'शिवनाथ एक्सप्रेस' पुन्हा कूपे नंबर - एस-९...

शिवनाथ एक्सप्रेस...बिलासपुर ते नागपुर...

एस-९

याचं काही नातं जुडलेलं दिसतंय...आषाढी एकादशीच्या दिवशीचा अनुभव मी दिला होता...सप्टेंबर महिन्यात पुन्हा अनुभव आला...

दर महिन्यात मुलीला घेऊन नागपुरला जावं लागतं...यावेळी जातांना आमचं गोंडवाना एक्सप्रेसनी रिझर्वेशन होतं...सकाळी 5.50 ची गाडी...12.30ला नागपुरला पोचून सरळ डॉक्टर जवळ जायचं...त्याने दुपारची दोनची वेळ दिली होती...स्टेशनावर पोचलो तर ट्रेन तीन तास लेट होती...

स्टेशनापासून घर लांब आहे...परत येणं जिवावर आलं...

मेल 7 वाजता येतेय...त्यात काही सोय होईल तर बघावं म्हणून विचारपूस केली...तर सांगितल्या गेलं की गाडी बदलायची असल्यास हे रिजर्वेशन विसरून जा...हे कैंसल करावं लागेल...मेल मधे बर्थ मिळेलच याची शाश्वती नाही...पण ट्रेनवाल्या टीटीईला भेटून घ्या...त्याप्रमाणे मेलच्या टीटीईला भेटलो...त्याला सांगितलं की डॉक्टरची एपाइंटमेंट आहे, म्हणून मेलनी जाणं गरजेचं आहे...तर तो म्हणाला बर्थ मिळून जाईल, चार्ज द्यावा लागेल...मी तयार होतो...जनरलचं तिकीट घेतलं...आणि त्याने सांगितलेल्या कोच मधे जाऊन बसलो...ट्रेन सुटल्यावर त्याने साइड लोअर एक बर्थ दिली...दिवसाचा प्रवास होता...निभावून गेलं...अडीचला नागपुरला पोचलो...थेट दवाखान्यात गेलो...डॉक्टर भेटले...

तिकीट कैंसल केलं...पण त्याचे पैसे लगेच परत मिळाले नाहीत...कारण ट्रेन डेस्टीनेशन स्टेशनापासून सुटली नव्हती म्हणून कम्प्यूटरवर चार्ट अपडेट झाला नव्हता...काउंटर वरील बाई म्हणाल्या तुम्ही तिकीट सोडून द्या...पैसे नंतर माझ्याकडून घेऊन जाल...तिने तिकीटच्या मागे माझा मोबाइल नंबर लिहून घेतला. त्या प्रमाणे बिलासपुरला परत आल्यावर मी बुकिंग काऊंटरवरुन पैसे परत घेतले.

परततांना नागपूरला स्वावलंबीनगरच्या मावसभावाच्या घरापासून यावेळेस आम्ही टैक्सी केली होती...नागपुर मेन स्टेशनचा ओवरब्रिज पार करतांना धो-धो पाऊस सुरू झाला...इतवारी स्टेशनाच्या दारात टैक्सी थांबवली...तिथून प्लेटफार्मच्या शेडपर्यंतची ती पन्नास पावलं जातांना सुद्धा आम्ही तिघं भिजून गेलो...प्लेटफार्मवर पाय ठेवायला जागा नव्हती...कारण सगळे यात्री पावसाचं पाणी चुकवायला शेडखाली उभे होते...

ट्रेन यायची होती....परत एस-9 पर्यंत रेस केली कारण पाऊस पडतच होता...आम्ही एस-9 च्या इंडीकेटर जवळ पोचलो आणि ट्रेन आली... आम्ही गाडीत चढलो आणि पाउस थांबला.

या वेळी देखील एस-9 मधे मिडिल आणि अपर बर्थ होती. कूपे पैक होता...टीटीईशी बोललो की आमची मिडिल आणि अपर बर्थ आहे...दुसरी कडे लोअर बर्थ मिळेल कां...आधी तर त्याने नकार दिला...ऐसा नहीं होता...आपस में एडजेस्ट कीजिए...मेरे पास दो बर्थ थी, मैंने अभी एलॉट कर दीं...वैसे एक बार एस-5 वाले टीटीई से मिल लीजिए...त्याच्या जवळ गेलो...प्राब्लम सांगितली...त्याने विचारलं किसे जाना है...मी म्हणालो मी, माझी बायको आणि लहान मुलगी...त्याने एक मिनट विचार केला...चार्ट बघितला आणि म्हणाला बर्थ नंबर 1 और 4 पर बैठ जाइए...आम्ही परत कोच बदलला...आणि स्थानापन्न झालो...बर्थवर चादर टाकताव मैडम आडव्या झाल्या...ते थेट सकाळी साडे पाचला रायपुरला उठल्या...(दिवसभरच्या प्रवासात झालेल्या श्रमांमुळे आणि त्यातल्यात्यात त्या पावसात भिजल्यामुळे असेल कदाचित...त्या खूपच दमून गेल्या होत्या...)

...आणि बिलासपुरपर्यंत त्या सहा बर्थ मधे आम्ही तिघंच होतो...

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

म्हणजे नक्की काय अपेक्षित होतं आणि काय झालं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रवास व्यवस्थित झाला...जायचा आणि परत यायचा...

आषाढी पावलीचा पुन्हा प्रत्यय आला...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

... भारतीय रेल्वेने पुष्कळांचा प्रवास व्यवस्थित होतो. जायचा. आणि परत यायचासुद्धा.

त्यात नक्की काय विशेष?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतवारी स्टेशनाच्या दारात ओलावाल्याने कैब थांबवली...तिथून प्लेटफार्मच्या शेडपर्यंतची ती पन्नास पावलं जातांना सुद्धा आम्ही तिघं भिजून गेलो

म्हणजे, ओला नक्की कोण? कॅबवाला, की तुम्ही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख कळला नाही.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि आषाढी पावली...हा पूर्वीचा लेख वाचला होता कां...

हा त्याचाच दुसरा भाग आहे...परतीच्या प्रवासात परत एकदा एस-9 मधे मिडिल आणि अपर बर्थ होती...पण प्रवास पुन्हां एस-5 मधल्या ज्या बर्थ वर झाला त्या 6 मध्रून उरलेल्या 4 बर्थ रिकाम्या होत्या...

या योगाबद्दल लिहिलंय...की दोन्हीं वेळेस मला चांगले टीटीई मिळाले...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग