काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३१ जानेवारी २०१७

बदललेला ऍड्रेसवालं लायसन्स घरी आलं.
स्पायडी ताडदेवच्या सॊनीकडून वांद्र्याच्या मार्व्हलकडे आला.
होमकमींग :)
ललित लेखनाचा प्रकार
+१
+१
आणि ३१ जानेवारी २०१७ इत्यादि या जर त्या घटनाक्रमाच्या प्रत्यक्षातल्या तारखा असतील तर तो घटनाक्रम बऱ्यापैकी भूतकाळातला अर्थात मागे पडलेला (किमान या घटना) असला पाहिजे. अशा वेळी एखादाच दोन ओळींचा अपडेट आजचा म्हणून देणं यात रसभंग होऊ शकतो.
अर्थात हा पूर्ण एक साहित्य फॉरमॅटचा प्रयोग असेल तर मग पुढे बघत रहावं हे बरं.
याला प्रघात आहे!
अर्थात हा पूर्ण एक साहित्य फॉरमॅटचा प्रयोग असेल तर मग पुढे बघत रहावं हे बरं.
जॉर्ज मिकॅश (George Mikes) या ब्रिटिश (जन्माने हंगेरियन) लेखकाच्या How to be an Alien१ नावाच्या पुस्तकात, एका नव्याकोऱ्या इमिग्रंटाच्या दृष्टिकोनातून त्याला दिसलेले इंग्लंड, इंग्रज, आणि एकंदरच त्यांची जीवनपद्धती, यांवर त्याने 'खास आपल्या शैलीत'२ टिप्पणी केलेली आहे.
प्रस्तुत पुस्तकातील Sex नामक प्रकरण, लेखकाने
Continental people have sex life; the English have hot-water bottles.
अशा एका वाक्यात गुंडाळलेले आहे.
सांगण्याचा मतलब, हा साहित्यफॉर्मॅट यापूर्वी इतिहासात यशस्वीरीत्या वापरला गेलेला आहे; त्यात नावीन्यपूर्ण असे काहीही नाही. आणि, तो प्रभावीसुद्धा होऊ शकतो.
(मात्र, मटीरियल तितक्या दमाचे पाहिजे.)
इत्यलम्|
--------------------
१ पुस्तकाची छापील प्रत (सेकंडहँड कॉपी) विक्रीस येथे उपलब्ध आहे. पुस्तक ज्या How to be a Brit नामक ट्रिलॉजीतील१अ पहिले पुस्तक आहे, त्या ट्रिलॉजीची किंडल आवृत्ती येथे विक्रीस उपलब्ध आहे.
१अ ट्रिलॉजीत How to be an Alien (1946), How to be Inimitable (1960), तथा How to be Decadent (1977) अशी तीन पुस्तके आहेत.
२ नाही तर मग कोणाच्या शैलीत टिप्पणी करावी म्हणे त्याने? व.पु. काळ्यांच्या, प्रवीण दवण्यांच्या, की गुलशन नंदा यांच्या? नि काय म्हणून?
मग डायरीच्या पानातली जरा
मग डायरीच्या पानातली जरा चारपाच पाने एका लेखात टाका ना.
आम्ही जमेल तेवढा श्वास रोखून उत्कंठा वाढवून वाचू यावर विश्वास ठेवा.
पुण्यातल्या एका चौकापेक्षा इथे जास्ती लोक नसतात पण टाईम्स स्कवेअरमध्ये उभे आहोत असा आव आणूच. ( खवचट होतंय पण समझा करो. )
फर्स्ट हँड रिपोर्ट आवडतात हो आम्हाला. त्यासाठीच इथे येतो.
लेख हरवला काय? एकच ओळ दिसतेय.
लेख हरवला काय? एकच ओळ दिसतेय. तेवढ्यात पहिलं भाडं मिळालं का?