Skip to main content

काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ मार्च २०१७

2 minutes

तर आता ट्रान्सपोर्ट लायसन्स:

बेसिकली ट्रान्सपोर्ट लायसन्स असेल तरच तुम्ही टूरिस्ट (पिवळी नंबर प्लेट) गाडी चालवू शकता.

टॅक्सीसाठी हे नेसेसरी असलं तरी सफिशियंट नसतं. त्यासाठी तुम्हाला बॅजही लागतो.

पण ह्या लायसन्सवर तुम्ही ओला-उबर चालवूच शकता.

आता ह्याची प्रोसेस थोडी ग्रे आहे.

हे लायसन्स तुम्हाला ड्रायव्हिंग स्कूलमार्फतच काढावं लागतं.

(असं मला सांगण्यात आलं.)

मग एका शुक्रवारी ड्रायव्हिंग स्कूलचे हुसेनभाई छान गोल टोपीत नमाज वगैरे पढून सुरमा वगैरे लावून मला आर. टी. ओ. ला घेऊन गेले आणि मी ड्रायव्हिंगची टेस्ट दिली.

गेली पाच वर्षं गाडी चालवत असल्याने त्याचा काही प्रश्न नव्हताच.

सो मी आरामात टेस्ट दिली आणि तहान लागली म्हणून लिंबूपाणी प्यायला गेलो.

तेवढ्यात हुसेनभाई मला शोधत आरडाओरडा करत आले.

"अरे भाय तुमको जाने किसने बोला चलो जल्दी वापस."

माझी जरा फाटलीच... च्यायला आता काय?

परत आम्ही त्या आर. टी. ओ. च्या मैदानात गेलो.

हुसेन भाईनी मला खस्सकन खेचलं आणि बोलले, "जाओ बैठो!

मला काही कळेना... परत टेस्ट?

पण समोर कुठलीच कार नव्हती...

...

...

...

एक रिक्षा उभी होती फक्त.

हुसेनभाईंनी मला ढकललं आणि त्या रिक्षावाल्यानी मला रिक्षात ओढलं.

ड्रायव्हिंग सीटवर!

त्यानंच रिक्षा चालू केली हॅण्डल मला दिलं.

मग युवर्स ट्रूलीनी रिक्षाचा एक राउंड मारला.

तसं सोपंच होतं पण रिक्षाचा टर्न मारताना मात्र भारी जोर काढायला लागतो.

आत्ता मला कळलं ते रिक्षावाले असं पादायच्या तयारीत असल्यासारखे एक कुल्ला सरकवून का बसतात ते.

एकंदरीत मला काही कळायच्या आधीच माझी रिक्षाची पण टेस्ट देऊन झाली.

हे म्हणजे कोळणीनी पापलेट पिशवीत टाकताना दोस्तीखात्यात चार मांदेलीसुद्धा टाकावीत तसं काहीसं :)

खर्च:

१००० रुपये.

Node read time
2 minutes

ललित लेखनाचा प्रकार

गवि Wed, 26/02/2020 - 12:19

चटकदार आहे पण फ्रिक्वेन्सी पाहता अगदीच तुटक होतंय. विरस होतोय. केवळ अगदी लहान क्वांटम असल्याने. रोज नियमित पुढचा भाग असता तरी लहान कंटेंटचं काही वाटलं नसतं. एपिसोड कंटेंट आणि मधली गॅप यांचं किमान काही गुणोत्तर पाहिजे.