व्हॉट्सअँप

"अग मला वाटलं तू बिझी असशील म्हणून मी तुला फोन केला नाही" अनघा नेत्राला म्हणाली.
नेत्रा: असं कस वाटलं तुला ?
अनघा: असच, काही कारण नाहीए.
नेत्रा: मी तुला कधी फोन करत नाही का?
अनघा: करतेस की
नेत्रा: मग मी कधी तुला कॉल बॅक केला नाही का? कॉल बॅक चा तर प्रश्न च नाही.. कारण तू मला कधी फोन करत च नाहीस
अनघा: हो पण तू करतेस ना.. मग मला करावा लागत नाही
नेत्रा: एक मेसेज तरी करायचा... विचारायचं तरी बिझी आहेस का? असं फक्त वाटून नाही घ्यायचं... तेही आपल्या सोयी प्रमाणे

अनघा:
अग तू चीड चीड का करतीये? तीन च तर महिने झाले आपल्याला बोलून ...
नेत्रा : तेच.. तीन च नाही... तीन महिने खूप असतात. नेहमी मी लक्षात ठेऊन दार १०-१५ दिवसाला मी फोन करायचे. या वेळी मी ठरवलं, थांबायचं. वाट पाहायची. बघायचं कोणाला स्वतःहून आठवण येते का. माझ्या पण काही अपेक्षा आहेत. मी पण एक माणूस आहे.
अनघा: बरोबर आहे तुझं.. पण मला खर च वाटलं कि तू बिझी असशील.

नेत्रा: असं वाटू कस शकत??? म्हणजे हवेत.. स्वतःच काहीतरी विचार करायचा.. आणि स्वतःच काही तरी ठरवायचे... आणि हो तो आपल्या सगळ्या कझिन्स चा व्हॉट्सअँप ग्रुप का सोडला?
अनघा: अग ,मी गुड मॉर्निंग पाठवलं होत त्याला रसिका ने रिप्लाय नाही केला.
नेत्रा: अग बाई हा पोरकट पण सोड... व्हॉट्सअँप म्हणजे आयुष्य नव्हे. लहान मुलांसारखं व्हॉट्सअँप मेसेज ला रिप्लाय केला नाही म्हणून नाराज व्हायच हा पोर खेळ आहे. तेव्हा का नाही नाही विचार केलास रसिका बिझी असेल म्हणून?
अनघा: मी हे खूप वेळा पाहिलंय. सगळे तुला रिप्लाय करतात. मला बऱ्याचदा नाही करत कोणी
नेत्रा: मला करतात कारण मी सगळ्यांशी कॉन्टॅक्ट ठेवायचा प्रयत्न करते. दुसऱ्यांनी मला नेहमी फोन मेसेज करावा अशी अपेक्षा करत नाही. कोणी व्हॉट्सअँप वर रिप्लाय नाही केला... तर मी परत मेसेज करून कारण जाणून घ्यायचा प्रयत्न करते. विचार करण्यात आणि मला वाटत म्हणून एखादी गोष्ट तशीच असेल यात मी वेळ वाया घालवत नाही.

अनघा
: मला पटतंय तू काय बोलतीयेस ते... पण हल्ली व्हॉट्सअँप मुळे मी नेहमी फोन वर कोणाचा तरी मेसेज येईल का याची वाट बघत बसते. खूप वेळ वाया घालवते फोनवर. कोणाचा मेसेज आला नाही तर उदास होते.

नेत्रा: हे बघ नाती जपायची तर त्याला दोन्ही बाजूंनी प्रयत्न करावे लागतात. एका हाताने टाळी वाजत नाही. जरा आजू बाजूला नजर टाक. आठव तुझ्या जवळची लोक.. बहिणी.. भाऊ.. वाहिनी.. नणंद... कधी केला होतास फोन किंवा मेसेज त्यांना? कधी प्रेमाने त्यांच्या साठी काही भेट वस्तू आणली आहे? आणि गिफ्ट हे महाग असावं असं नसतं हं .. त्या मागच्या भावना महत्वाच्या असतात. तुझी बहीण म्हणून सांगते... मी दहावीत असल्या पासून तुला दरवर्षी वाढदिवसाला काही ना काही गिफ्ट देते. गेल्या दहा वर्षात तू मला काहीही दिलेलं नाहीयेस. मी मागितलं हि नाही.. अपेक्षा हि ठेवली नाही.. पण कुठेतरी माझ्या मनात ते राहील.. मी आज बोलून दाखवलं.. मला माफ कर... इतके वर्ष ठेवलेला संयम आज सुटला... पण खर सांगते.. कंटाळा आलाय मला या सगळ्याचा.. वर्षानु वर्ष नाती जपत आलीये आणि संख्या बहिणी चा फोन हि येत नाही... वाईट वाटणार नाही का? तूच सांग मला??

अनघा: मनमोकळे पणा ने बोलत जा ग.. चुकलं माझं.. करत जाईन मी फोन.. आणि तुलाच नाही सगळ्यांशी कॉन्टॅक्ट ठेवायचा प्रयत्न करिन. कामापुरता मामा स्वभाव सोडून देईन. मला माफ कर. आणि माझे डोळे उघडल्या बद्दल थँक यू .
नेत्रा: बघू किती फरक पडतोय.. आणि हो व्हॉट्सअँप ला खूप सिरिअसली घेऊ नका मॅडम.. फक्त एक अँप आहे ते. व्हॉट्सअँप नव्हते तेव्हा मजेत आयुष्य जगात होतीस ना? आज हि तसेच जग. आनंदी रहा . बाय.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

असं असतंय होय? फारच कठीण झालंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनघा,
इट इज ओके. काही फोनबिन करू नकोस.
उगाच काय च्यायला?
जगात असे लोक असतात ज्यांना जास्त बोलायला आवडत नाही- हे मराठी साहित्याला मान्य नाहीये का?
घरी रहावं, उत्तम खावं प्यावं मित्रांना भेटावं, चित्रपट पहावे, भटकावं, काय वाट्टेल ते करावं. उगाच फोनबिन करून अपडेट द्यायला काय दुसरं काम नाही का?
असो. सत्यामधला चंदर म्हणतो तसं - ऐश करने का. मस्त मे रेहने का. छोकरे-छोकरी को भी लाने का.

टीप - ते कझिन्सचा व्हॉट्सॅप ग्रूप सोडलास ते एक बेष्ट केलंस. लगे रहो.

- अस्वल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0