Skip to main content

काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९

2 minutes

हो बराच वेळ गेला मध्ये कारण माझं लग्न झालं :)

लग्नाच्या सुट्टीतच हे काम कंटिन्यू करायचं ठरवलं पण हाय राम,
प्रोसेस सगळी ऑनलाईन झालीय आता :(
आधी जमवलेला फॉर्म वगैरे सगळं वाया गेलं.

शिवाय १० वर्षांचा रहिवासी दाखला चालणार नाही टॅक्सीसाठी १५ वर्षांचा दाखला लागतो.
ठीकाय वही सही.

पुनःश्च हरी ॐ

४ जानेवारी २०१९
तर आता १५ वर्षांचा डोमिसाईल दाखला:

बहुतेक हा नियम सरकारनी मुंबईच्या भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात म्हणून वगैरे केला असावा.

ठीक आहे काय ते कायद्यानी करा...

ते परीक्षेला आलेल्या बाहेरगावच्या लोकांना मारणं वगैरे माझ्या डोक्यात जातं.

शुद्ध गुंडगिरी आहे ती.

तर डोमिसाईलसाठी आधी कोर्ट फी स्टॅम्प घेतला.

ह्या वेळेस पाच रुपयांचा स्टॅम्प पाच रुपयांनाच घ्यायचा असं ठरवल्यामुळे अंधेरी कोर्टात गेलो.

अंधेरी पूर्वेच्या स्टेशन ब्रिजखालीच कोर्टाचा हा छान प्रशस्त हिरवा परिसर आहे,

हाही आज पहिल्यांदाच बघितला.

कोर्ट असल्यामुळे इकडेही थोडी लगबग होतीच पण सकाळी लवकर जायचा धडा शिकल्याने स्टॅम्प चटकन मिळाला.

मग पुन्हा अंधेरीच्या तहसीलदार ऑफीसात १५ वर्षांच्या दाखल्याचं ऍप्लिकेशन केलं

अजय पटेल हा तिकडचा क्लार्क फारच ऋजू + टेक-सॅव्ही + मदतीला तत्पर आहे.
त्याचा फीडबॅक आवर्जून वहीत लिहिला.

डोमिसाईल १५ दिवसांत घरी येईल आता.

काम पटकन झालं सुट्टीवर असल्याने उत्साह आणि वेळही होता.
शिवाय भवन्सवरून आर. टी. ओ. तसं जवळच.
एक जस्ट चक्कर टाकायला म्हणून आर. टी. ओ. त गेलो.

दोन तीन खिडक्यांवर उगाच घुटमळलो...

काय फायदा नाय झाला.

ही बॅजची नवीन ऑनलाईन प्रोसेस काय आहे कोणालाच नीट माहिती नव्हतं...

जाऊन दे धार मारून सरळ घरी जावं झालं...
बायको माहेरी असल्याचा चान्स घेऊन वीकडेतल्या सुट्टीतलं दुपारचं पॉर्न पदरात पाडून घ्यावं...
असा दांडेकरी विचार करून मी टॉयलेटमध्ये घुसलो.

आता हे टॉयलेट आर. टी. ओ. ऑफीसच्या दरवाजाच्या बरोब्बर समोर आहे.

कुठल्याही सरकारी ऑफीसची रचना साधारण अशीच असते.

सो आर. टी. ओ. च्या दर्शनी भागात मध्ये मोठं प्रवेशद्वार आणि डावी उजवीकडे रांगेत खिडक्या १० नंबर १३ नंबर वगैरे. जिकडे आपण रांगा लावतो.
(नंबर मध्ये काही लॉजिक नाहीये कुठलीही खिडकी कुठेही आहे :))

प्रवेशद्वारातून आत जाऊन डावीकडे वळलं की ह्या सगळ्या खिडक्यावाल्या हॉलचा दरवाजा लागतो.

आणि त्याच्या समोर टॉयलेट.

आता मजा अशी आहे की ऑफीसचे कर्मचारी ह्या दरवाज्यातूनच ये जा करतात.
हा दरवाजा सगळ्या कर्मचाऱ्यांच्या सीट्स (ज्या अर्थातच खिडकीमागे असतात) पासून खूप लांब आहे.

सो कोणी कर्मचारी कामानिमित्त बाहेर पडला की दरवाजाला चक्क कुलूप मारतो.

एजन्ट लोकांनी ऑफीसमध्ये घुसू नये म्हणून हा उपाय.

आत्ता ह्यानी सिस्टम लगेच काय सुपर स्वच्छ नाय होणार पण ठीक आहे ॲट लीस्ट दे आर ट्रायिंग!

मी त्या कुलपाकडे एक नजर टाकली आणि टॉयलेटमध्ये घुसणार...

इतक्यात कोणतरी एक पोरगा आला आणि त्यानं ते कुलूप उघडलं...

आता आत जाऊन तो कडी लावणार इतक्यात त्यानं पॅन्ट जरा घासल्यासारखी केली.

त्याला जोराची लागली होती.

कुलूप तसंच ठेवून तो समोरच्या टॉयलेटमध्ये घुसला.

मी इकडे तिकडे बघितलं आणि माझ्याही नकळत आत घुसलो...

क्रमश:

Node read time
2 minutes

ललित लेखनाचा प्रकार

अस्वल Wed, 11/03/2020 - 12:52

इतके छोटे भाग असल्याने प्रसंग + लिखाण ह्याची संगती लागणं कठीण जातं आहे.
मागल्या भागांच्या लिंका प्रत्येक पुढल्या भागात द्याल का ..

नील Wed, 11/03/2020 - 16:01

.