आयुष्याच्या वाटेवर..

आयुष्याच्या वाटेवर
अनेकजण भेटतात
काही विस्मृतीत
जातात ; तर
काही मनात घर
करतात..
आयुष्याच्या वाटेवर
अनेकजण भेटतात..

मनात घर करणारे
खोलवर रुजतात;
त्यांची साथ
हवीहवीशी वाटत
असताना मात्र
साथ सोडुनिया जातात.
आयुष्याच्या वाटेवर
अनेकजण भेटतात..

त्यांच्या परतण्याची
वाट पाहत असताना
डोळेही पाणावतात.
त्यांच्याही मनात
तेच असतं ;
सांगताना मात्र
कचरतात.
आयुष्याच्या वाटेवर
अनेकजण भेटतात..
त्यातले काहीजणच
मात्र मैत्रीला जागतात..

-दिप्ती भगत
(२१जून,२०१९)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वाक्य तोडून लिहिल्याने त्याचे काव्य होत नाही. जरा पद्याचा डौल आणण्याचा प्रयत्न करा ना !
उदा.,
भेटतात कितीकजण
आयुष्याच्या वाटेवर
काही जातात
विस्मृतीत तर
काही करतात
मनात घर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखिकेने खालील परिच्छेद वाचून पाहावा. वरचीच कविता फक्त एकापुढे एक लिहिली आहे.
आयुष्याच्या वाटेवर अनेकजण भेटतात. काही विस्मृतीत जातात ; तर काही मनात घर करतात. मनात घर करणारे खोलवर रुजतात; त्यांची साथ हवीहवीशी वाटत असताना मात्र साथ सोडुनिया जातात. त्यांच्या परतण्याची वाट पाहत असताना डोळेही पाणावतात. त्यांच्याही मनात तेच असतं ; सांगताना मात्र कचरतात. आयुष्याच्या वाटेवर अनेकजण भेटतात, त्यातले काहीजणच मात्र मैत्रीला जागतात.

दोन वाक्यांआड तीन टिंबे टाकून एकाखाली एक वाक्ये लिहली की कविता होईल का हा परिच्छेद?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

@ उज्ज्वला, नील आपल्या सुचनांसाठी मनापासुन धन्यवाद..

या कवितेचे तटस्थपणे वाचन करताना माझ्याकडुन कविता लिहिल्या गेल्या नसुन गद्य/परिच्छेद लिहिल्या गेले आहे. याची जाणीव कविता येथे पोस्ट करताना होती.. आणि लेखनात याआधी केलेल्या छोट्या-मोठ्या चुकांमधुन अजुनही शिकतीये.. चुका परत होणार नाहीत याची काळजी घेण्याचा प्रयत्न करतीये..
तरीही आपल्या मार्गदर्शनाकरीता पुनःश्च धन्यवाद! Smile
वाचकांचे आभार! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे जीवन सुंदर आहे.. Smile

व्यक्त व्हावंसं वाटणं आणि त्यासाठी व्यासपीठ उपलब्ध असणं हे चांगलंच.
पण आशय आणि अभिव्यक्ती या दोन्हींत भाबडेपणा नसावा आणि दुर्बोधताही.
त्यासाठी आधी उत्तम वाचा. आंतरजालावर कितीतरी कवींचे लेखन मिळेल.
आणि काव्यरचनेबाबत माधव जूलिअन यांचे छन्दोरचना
https://aisiakshare.com/fancy येथे उपलब्ध आहे.
शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवर्जुन लिंक देण्यासाठी थँक्स उज्ज्वला.. Smile
माझ्यापरिने शक्य तितके चांगले लिहिण्याचा प्रयत्न करेल..

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे जीवन सुंदर आहे.. Smile