ऐशा रसां ऐसे रसिक...


ऐसी अक्षरेचे सदस्य जे जे उत्तम त्याचा आस्वाद घेत असतात आणि त्या माहितीची देवाण-घेवाण ते इथे करत असतात :


ही बातमी समजली का?

करोना विशेष

उदरभरण नोहे!

सध्या काय वाचताय?

अलीकडे काय पाह्यलंत?

सध्या काय ऐकताय?

छोटेमोठे प्रश्न

दिनविशेष

गीतांजली

चित्र

त्या वर्षी या महिन्यात

निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)

भाग १ | भाग २
ह्यापुढचा लेख म्हणजे सावरकरांवरचा मृत्युलेख असावा. पुस्तकात त्याच्या प्रथम प्रकाशनाची तारीख १९६३ दिली आहे, पण त्यात सावरकरांच्या मृत्यूचा (१९६६) उल्लेख आहे. सावरकरांना अभिप्रेत असलेलं समाजाचं आधुनिकीकरण किंवा प्रत्येकाला पोटभर अन्नाची आणि अंगभर वस्त्राची हमी देणारा समाजवाद कुरुंदकरांना आवडतो, हे साहजिक आहे. त्याशिवाय, कुरुंदकर सावरकरांना 'सशस्त्र क्रांतीचे महान योजक' म्हणतात. 'सशस्त्र क्रांती भारतात शक्य होती का, हा प्रश्न बाजूला ठेवला तर क्रांतीची पहिली व्यवहार्य, सुसूत्र व अखिल भारतीय पातळीची योजना सावरकरांनी प्रगल्भपणे रचली', असं ते म्हणतात. 'देशावरील प्रेमामुळे सावरकर अधिक उत्कट, भाबडे व आततायी झाले नाहीत; ते अधिक शांत, व्यवहारी व व्यापक झाले' असंही ते म्हणतात.

दिवाळी अंक २०२३