मारी बिस्किटांचा केक (बिस्किटं शिळी असणं आवश्यक)

Cake
परवा मारीचा पुडा आणला तर मे महिन्यातला निघाला. बिस्किटं मऊ पडलेली. कावळा येतो रोज खिडकीत, पण त्याला तरी किती देणार. मग आयुष्यात प्रथमच केकचा घाट घातला.
बिस्किटं मिक्सरला बारीक करून घेतली. १० बिस्किटं होती. त्यात एक अंड फोडून घातलं. ३ चमचे तेल घातलं. अर्धा चमचा इनो घातलं. १ चमचा कोको पावडर घातली. २ चमचे पिठीसाखर घातली, आणखी १ चमचा चालली असती असं खाल्ल्यानंतर वाटलं. सगळं फेटून घेतलं. चाटून पाहिलं मस्त लागत होतं त्यामुळे केक फसला/बसला तरी चालणार होतं.
एकीकडे अलमीनची कढई तापायला ठेवली, त्यात कूकरची खालची जाळी असते ती ठेवली. एका स्टीलच्या वाडग्यात तूप लावून घेऊन कणिक घालून ती पसरवून घेतली, जेणेकरून केक चिकटून बसणार नाही. मिश्रण त्यात ओतलं आणि तो वाडगा कढईत ठेवला. वर एक झाकण ठेवलं, त्याला स्वयंपाकघरातला नॅपकिन गुंडाळला होता म्हणजे झाकणाच्या आतली वाफ केकवर पडणार नाही. माध्यम आचेवर १२ ते १५ मिनिटांत केक तयार झाला होता. मस्त फुगला होता, चवही छान.
फक्त तो नॅपकिन पातळ असल्याने कढईच्या कडेने, जिथे तो कढईला चिकटलेला होता, तिथून जळाला नि त्याचा गोलाकार तुकडा कापल्यासारखा निघून आला हातात. 

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मला तसला जळकट, खरपुडी झालेला केकचा भाग आवडतो.

आणि एक - देव तारी तिला कोण मारी ... केक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आवो मारी साथे अने केक खावो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This too shall pass!

पाया पडते, माफी मागते, पण गुजरातीत नका बोलू! लगेच माझं ठाण्यातलं बालपण आणि मुंबईत न राहणं उघडं पडतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खूपखूप पूर्वी, ब्लॅक-अँड-व्हाइटच्या जमान्यात नि मुंबई दूरदर्शन हे दिल्लीपासून स्वतंत्र असताना (किंबहुना, 'नॅशनल नेटवर्क'चे सावट देशभरातल्या दूरदर्शन केंद्रांवर पडलेले नसताना), मुंबई दूरदर्शन केंद्र (वरळी, बँड १ चॅनेल ४) तथा पुणे सहक्षेपण केंद्र (सिंहगड, बँड ३ चॅनेल ५) यांवर 'आवो मारी साथे' या नावाचा पारशी-गुजरातीतला एक अत्यंत लोकप्रिय असा कॉमेडी कार्यक्रम सादर होत असे. आदी मर्झबान नावाचा एक गृहस्थ तो सादर करीत असे. मला वाटते त्याचा संदर्भ असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवाय संताकुकडी हा अगदी ओपनिंग प्रोग्राम.

बाकी मारी बिस्किटे मऊ हवीत म्हणून ती शिळी करणे हे दमट मुंबईकर, ठाणेकर आणि कोंकणवसियांसाठी समजण्यास अंमळ कठीण आहे.

पुडा उघडून वीसेक मिनिटे हवेत उघडा ठेवला की ताबडतोब कार्यभाग साध्य होईल.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो, तोच संदर्भ आहे. निव्वळ मारी शब्द आहे म्हणून!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This too shall pass!

Avo मारी sathe

हो..

नबा म्हणतात त्या काळात साठे बिस्कीट कंपनीदेखील अस्तित्वात होती.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...ती मारी बिस्किटे बनवीत नसे.

(गेऽली बिचारी!)

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि त्यांच्या ग्लुको बिस्किटांची चव पार्लेच्या बिस्किटांपेक्षा थोडीशी कडवट वाटायची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांचे एक अंडाकृती जॅम क्रीम बिस्कीट असायचे. वरच्या भागात मध्यभागी खड्डा आणि त्यात लाल जॅम, साखरपेरणी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्रॅकजॅक व मोनॅको मस्त होती. त्यातली गोल व खारट कोणती? आय थिंक क्रॅकजॅक. त्यांपेक्षा मोनॅको आवडत.
बाकी थिन क्रीम वेफर्स तर फार आवडायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...साठ्यांची नव्हेत. ती पार्लेची.

गोल आणि खारट बोले तो मोनॅको. क्रॅकजॅक बोले तो खारटगोड. (क्रॅकजॅकचा आकार आठवत नाही. मला बिलकुल आवडत नसल्याकारणाने त्याकडे कधी लक्ष दिले नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्रॅकजॅक इतकं वाईट बिस्कीट दुसरं नसेल. खरं तर ग्लुकोजलाही हा मन मिळायला हवाय माझ्या दृष्टीने. एक वेळ काड्यापेटीतली काडी चहात बुडवून खाईन पण ग्लुकोज किंवा क्रॅकजॅक नाही 

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This too shall pass!

दूधात बुडवुन ग्लुकोज मस्त लागतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपलं भांडण होईल अशानं! मला क्रॅकजॅक आवडायची!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

jimjam! आता ओरिजिनल नाही मिळत. 

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This too shall pass!

मला तसला जळकट, खरपुडी झालेला केकचा भाग आवडतो.

आणि एक - देव तारी तिला कोण मारी ... केक!

आणि केकता क्कपूरचे क्काय? ती आवडते क्का?

(तीसुद्धा तसलीच जळकट, खरपुडी झालेली आहे, असे म्हणता येईल. (चूभूद्याघ्या.))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कावळा येतो रोज खिडकीत, पण त्याला तरी किती देणार.

म्हणजे, ज्याला कावळासुद्धा शिवत नाही... आपले, तोंड लावत नाही, अश्या मारी बिस्किटांचा केक होतो वाटते तुमच्याकडे!

(असो चालायचेच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ताजी पोळी लागते त्याला, मीच लाडावून ठेवलाय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This too shall pass!

कावळ्याइतका रुबाबदार पक्षी दुसरा नसावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी,
काक
आणि
केक
यांच्यातील हा परस्परसंबंध (की कार्यकारणभाव?) हृद्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'न'बांचं अक्षरही रुबाबदार आहे हो बाकी, कावळ्यासारखंच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अगदी माझ्या मनातलं बोललात... ज्याला कावळासुद्धा शिवत नाही... त्याला तुम्ही ...... शिव शिव शिव !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कावळे भयानक चुझी असतात. मी मुंबईत एक मस्त लठ्ठ गाभोळी आणली होती. तेव्हा मला कशी करायची माहीत नसल्यान, हळद घालून उकडली. नंतर कळेचना कशी करायची, म्हणुन खिडकीत कावळ्याकरता ठेवली. तर एक कावळा आला पाहून चक्क नाक मुरडून उडून गेला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...अत्यंत रुबाबदार, खानदानी पक्षी!

(आणि एक नंबरचा टग्या!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा. मला कावळा मनापासून आवडतो. अतिशय हुषार व गोंड्स हावभाव असतात. Smile डोक्यावरचे केस फुलतात लाडात आले की. तेच हिरमुसले की इवलेसे होउन जाते डोके, केस चपटे होतात. उजवीकडचा कावळा बघा. फोटोत, आत्ता चांगल्या मूडमध्ये आहे.
https://junehunterimages.files.wordpress.com/2018/06/crow-or-raven.jpg?w=676

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गविंनी एका लेखात त्यांच्या लहानपणची आठवण लिहिली होती. एक बाई त्यांना कायम मारी बिस्किटंच द्यायच्या, चुकून सुद्धा ग्लुकोज बिस्किटे ऑफर करायच्या नाहीत वगैरे वगैरे! त्याची आठवण झाली.
मलाही ती पूर्वीची आरारुट पासून बनवलेली निस्तेज आणि चवहीन मारी आवडायची नाहीत. पुढे ब्रिटानियाला आमची नाराजी कळली असावी. म्हणून त्यांनी मारीगोल्ड ही बऱ्या चवीची बिस्किटं बाजारात आणली. तरीही ग्लुकोज वा नानकटाई पुढे ती नावडतीच राहिली.
तर नावडतीचा केक तरी आम्हांस का आवडावा ? वयानुसार, पुन्हा एकदा आमच्या आवडी निवडी तीव्र झाल्या आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चा - मारी वेळेला उपयोगी ठरणारा (all purpose) पर्यााय वाटतो मला.

सकाळ असेल तर नाश्ता
दुपार असेल तर मधल्या वेळेचे खाणे
रात्री उशीरा सप्पर म्हणून सुद्धा चालते.

ही केक ची idea अम्मळ वेगळीच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

>>>>ती पूर्वीची आरारुट पासून बनवलेली निस्तेज आणि चवहीन मारी आवडायची नाहीत.>>>> तो बेचवपणाच खासियत होती. मला भयानक आवडायची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>>ती पूर्वीची आरारुट पासून बनवलेली निस्तेज आणि चवहीन मारी आवडायची नाहीत.>>>> तो बेचवपणाच खासियत होती. मला भयानक आवडायची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0