दिवाळीत आजोळी जाण्याबद्दल (क्लिकबेट शीर्षक)

"काय राव, वीस करन्सी होतात नेहमी. तीस कसले मागताय? मी काय प्लूटोवरून आलोय काय?"

पायलटच्या हातावर वीस करन्सी ठेवत रामराव उतरले आणि सहकुटुंब सहपरिवार एससी स्टॅन्डकडे चालू लागले.

"नेपच्यून सहाशे, नेपच्यून सहाशे!" अशी हाळी एकजण देत होता.

"बाबा, तिकीट घेऊया ना?" वत्सला म्हणाली.

रामराव काही बोलायच्या आतच मनोहर म्हणाला, "एहेहे! तिकिटं अधिकृत तिकिटखिडकीतूनच घ्यायची हेही माहीत नाही तुला! आणि म्हणे व्ह.फा.ला बसतेय."

"तू गप रे चोंबड्या!" वत्सला फुरंगटून म्हणाली.

"नका रे भांडू सारखे. मामा काय म्हणेल अशा भांडकुदळ भाचरांना बघून?" यमुनाकाकूंनी भांडण थांबवले.

योग्य तिकिटखिडकी शोधून रामरावांनी पृच्छा केली, "नेपच्यूनसाठी पुढची स्पेसक्राफ्ट किती वाजता आहे?"

"सहा वाजताची अमेरिकानो आहे. पण फ्रेंच गयाना डेपोत सर्व्हिसिंग चालू आहे म्हणे. उशीर होऊ शकेल."

"आणि युरोस्टार?"

"ती सातची आहे. एकदम टायमावर सुटणार. ईएसए मेन्टेनन्स करतेच तसा!" खिडकीतला यंत्रमानव अभिमानाने म्हणाला.

"बरं. मधे किती थांबे घेणार युरोस्टार?"

"बैकानूरला फक्त पिकअप पाॅईंट आहे. मग नाश्ता वगैरेसाठी सेरेस लघुग्रहावर स्टाॅप, आणि मग थेट नेपच्यून."

"ठीक आहे. दोन पूर्ण आणि दोन अर्धी तिकीटं द्या."

"कन्येचं वय बारा पूर्ण नाहीये ना?" विचारत यंत्रमानवाने तिकिटं फाडली.

"बाबा मला डिहायड्रेटेड चाॅकलेट बार हवा!" मनोहरने हट्ट केला.

"मिडलस्कुलात जाणार म्हणे, आणि हट्ट पोरांसारखे!" वत्सलेने मघासचं उट्टं फेडायची संधी दवडली नाही.

"पुरे पुरे. हे दोनदोन करन्सी घ्या आणि हवं ते विकत घ्या," रामराव म्हणाले. मुलं भांडण विसरून उड्या मारत दुकानाकडे पळाली.

रामरावांनी ट्रंक आणि यमुनाकाकूंनी वळकटी उचलली आणि दोघे बाजूच्या बाकावर जाऊन बसले. यमुनाकाकूंनी आपलं विणकाम सुरू केलं. नेपच्यूनच्या एससीची वेळ येईस्तोवर विरंगुळा म्हणून रामरावांनी एका पोऱ्याकडून "अॅन्ड्रोमिडा टाईम्स" विकत घेतला आणि शब्दकोडं सोडवायला सुरूवात केली.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

(क्लिकबेट शीर्षक)

शीर्षक नव्हे. लेखकाचे नाव क्लिकबेट आहे.

त्यात पुन्हा दिवाळी. त्याहूनही वर दिवाळी अंक.

(हे म्हणजे, 'आधीच मर्कट...', तशातली गत झाली.)

सांगण्याचा मतलब, पुढे काय वाढून ठेवलेले आहे, याबद्दल पूर्ण कल्पनेनिशी (आणि अपेक्षेने) क्लिक केल्यामुळे आश्चर्य वाटले नाही. काहीसा अपेक्षाभंग मात्र झाला.

बोले तो, लेखातल्या कालविसंगती (ॲनाक्रॉनिझम्स. अंतराळयुग आणि व्हफा, नेपच्यूनचा प्रवास आणि ट्रंक-वळकटी, वगैरे.) क्लासिक देवदत्तियन आहेत. तसेच, काल-प्रोजेक्शन्ससुद्धा. (अंतराळयुगातल्या त्या अंत'रिक्षा'वाल्याच्या हातावर वीस करन्श्या टिकविताना 'काय प्लूटोवरून आलो समजलात काय?' हा प्रश्न साहजिक आहे.)

मात्र, या खेपेस हात आखडता घेतलात.

असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शीर्षक नव्हे. लेखकाचे नाव क्लिकबेट आहे.

मी हेच म्हणणार होते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लहानपणी दिवाळीला गावला जाताना शेम तु शेम प्रसंग घडायचा. फरक एवढाच आम्ही प्लूटो अलिबागचे होतो. आणि कोणी त्या गोष्टीतून अपमान केलं तर वडील समोरच्याची कॉलर पकडायचे. आणिअॅन्ड्रोमिडा टाईम्स" मुंबई चौफेर (ज्याचं एक पूर्ण पान भरून शब्दकोडे असायचं) ते घेऊन timepass करायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0