प्राचीन ज्ञानाचे पुनरुत्थान (डिजिटलीकरण) आणि प्रकाशन - पतंजलिचे महत्वपूर्ण योगदान

भारताची संस्कृती हजारो वर्ष जुनी आहे. हजारो वर्षांत इथे निर्मित झालेले ज्ञान मौखिक आणि लिखित परंपरेत सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न विद्वानांनी सतत केले. अधिकांश लिखित ज्ञान ताडपत्र इत्यादीवर पुस्तक स्वरुपात सुरक्षित ठेवले. विदेशी आक्रांतानी आपले ज्ञान नष्ट करण्याचा पुरजोर प्रयत्न केला. लाखो पुस्तके जाळून नष्ट केली. तरीही कालप्रवाहात लाखो ताडपत्री पाण्डूलिपी निश्चित जिवंत राहल्या असतील. देशाला स्वतंत्रता मिळाली. पण आपले दुर्भाग्य गुलामी मानसिकता असलेल्या काळ्या साहेबांचे राज्य भारतात आले. आपल्या प्राचीन ज्ञानाविषयी त्यांच्या मनात आदर कमीच. विदेशी आक्रांतान्पासून आपले ज्ञान काही प्रमाणात वाचले पण काळ तर सर्वच नष्ट करणारा असतो. जीर्णशीर्ण पाण्डूलिपी किती काळ जिवंत राहणार. आपल्या सरकारी तंत्राने हि भारताचे प्राचीन ज्ञान सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न केले आहे. पण सरकारी तंत्राचीहि 'दिनभर चलेअढाई कोस' वाली गत असते.

आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात डिजिटल स्वरूपात प्राचीन ज्ञान सुरक्षित केले जाऊ शकते. पण ते करणे अचाट मेहनतीचे कार्य आहे. पाण्डूलिपी कुणापाशी आहेत त्याची माहिती मिळविणे. त्यांच्या पर्यंत कसे पोहचायचे. त्यांची परवानगी घेऊन, त्या जीर्णशीर्ण ताडपत्री पुस्तकांना दुरुस्त करणे. त्यासाठी भाषा विशेषज्ञ आणि दुरुस्ती कार्य करणाऱ्या तकनिकी लोकांची गरज. त्यानंतर पांडूलिपींचे डिजिटलीकरण करणे आणि शेवटी त्यांना सुरक्षित ठेवणे. ज्यांनी परत मागितली त्यांना परत करणे. दुर्लभ आणि मूल्यवान ग्रंथांचे प्रकाशत करून प्राचीन ज्ञान जनतेसमोर आणणे, इत्यादी. ह्या सर्व कार्यांत हजारो लोकांच्या अचाट मेहनत शिवाय, वेळ आणि धनाचीहि गरज लागते. शिवाय गुलाम मानसिकता असलेले सरकारी तंत्र किंवा जनताहि तुमच्या कार्याचा गौरव करणार नाही. मीडियाही तुमच्या कार्याची माहिती जनतेला देणार नाही. तरीही एका व्यक्तीने हे कार्य करण्याचा विडा उचलला. पतंजली आपल्या नफ्याचा ७० टक्के रिसर्च वर खर्च करते. शेकडो कोटींचा पीआरआईचा खर्च त्यातून भागतो.

चित्र२ स्वामी रामदेवांनी कार्य हातात घेतले आणि मोठ्या प्रमाणावर हे कार्य करण्याचा निश्चय केला. आचार्य बाळकृष्णच्या नेतृत्वाखाली पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट, पतंजली युनिव्हर्सिटी सहित या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था या कार्यात गुंतल्या. कुणालाही आश्चर्य वाटेल एवढे अचाट कार्य ६० हजारच्यावर पाण्डूलिपी ज्यात ५० हजारांच्यार ताडपत्री स्वरूपातले ग्रंथ, तब्बल १९ विषय - अलंकार शास्त्र, आयुर्वेद, ब्राम्हण ग्रंथ, दर्शन, धार्मिक ग्रंथ, ज्योतिष, काव्य, कोश, मंत्र, नीती ग्रंथ, पाकशास्त्र, पुराण, संस्कृत-साहीत्य, स्त्रोत्र, तंत्र, उपनिषद, वेद, व्रत, व्याकरण इत्यादी. १४ भाषा- देवनागरी, शारदा, श्री, गुरुमुखी, फारसी, संस्कृत, उर्दू, बंगाली, मल्याळी, मराठी, नेपाली, ओडीया,तमिळ तेलगु. २६ लाखांहून जास्त पाने.

चित्र ३आता विचार करा या अफाट कार्यासाठी हजारो लोकांशी/ संस्थांशी संपर्क करावा लागला असेल. अनेक भाषाविदांची मदत घ्यावी लागली. या पवित्र कार्यासाठी अधिकांशी विद्वानांनी कसले हि मानधन घेतले नाही. पण त्यांच्या येण्याजाण्याचा आणि राहण्याचा खर्च तर होताच. शिवाय पगारी कर्मचार्यांची फौजहि.

डिजिटलीकरण नंतरची पुढची प्रक्रिया म्हणजे पुस्तकांचे प्रकाशन. इथेहि समस्या होती. एक-एक पुस्तकाच्या अनेक पाण्डूलिपी आणि पाठभेद. विद्वानांच्या मदतीने प्रामाणिक प्रती तैयार करून एव्हढ्या कमी कालावधीत अनेक प्राचीन ग्रंथ प्रकाशित केले. डिजिटलीकरण नंतरची पुढची प्रक्रिया म्हणजे पुस्तकांचे प्रकाशन. त्यांची नावे- सिद्धसार - संहिता (रविगुप्त- विरचित), योगशत्तम (अमितप्रभ्यम् - विरचित), योगशास्त्र-वैद्यवल्लभ (रुपनयन - विरचित), आयुर्वेद-महोदधी/ सुषेण-निघन्टु (सुषेण वैद्य- विरचित), भोजनकह्तुलम् (रघुनाथ सुरी -विरचित), अजीर्णमर्त मंजरी (काशिनाथ-विरचित), रुचिवधु- गल्- रत्नमाला (परप्रणव - विरचित), हरमेखला (मधुक-विरचित), योगरत्न समुच्चय (चंद्रात- विरचित), वैद्यशतश्लोकी (अवधान सरस्वती- विरचित), चंद्र निघन्टु/ मदनादी-निघन्टु (चंद्रनंदन-विरचित), हृद्यदीपक-निघन्टु (भोपदेव विरचित), राज- निघन्टु/ सोढलनिघन्टु (सोढल विरचित), मदनपाल -निघन्टु (नृप मदनपाल-विरचित), वैद्य प्रसारकम् (वैद्य गदाधर-विरचित ).
चित्र ४

हे कार्य सतत चालणारे कार्य आहे. काळात विस्मृत झालेले ज्ञान विज्ञानाची पुस्तक रुपी रत्ने एका महाऋषीच्या प्रयत्नाने पुन्हा प्रगट होणार आहेत. आपण त्यांच्या कार्याचा गौरव तर करीत नाही. पण इथल्या आसुरी प्रवृत्ती मात्र पूर्ण शक्तीने त्यांच्यावर प्रहार करीत आहे. या काळात आपले काय कर्तव्य आहे, हे आपल्याला कळले पाहिजे. असो.

खालील लिंकच्या आधारावर हा लेख आहे.

https://www.patanjaliresearchinstitute.com/ayurvedic_manuscripts.php#

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (3 votes)

प्रतिक्रिया

विहिरीत राहणार्या ... समुद्राचा परिचय देण्याचा प्रयत्न.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ3

पहावे ते नवलच! तुम्ही पतंजलीचे प्रवक्ते वगैरे आहात का? असाल, तर ठीकच. पण प्रसिद्धीसाठी “ऐसी” चे व्यासपीठ वापरण्याने पतंजलीचा कितपत फायदा (ज्यातले ७०% संशोधनात जातात) होईल याबद्दल मला शंका आहे. बाकी चालूद्या.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

प्रसिद्धीसाठी “ऐसी” चे व्यासपीठ वापरण्याने पतंजलीचा कितपत फायदा (ज्यातले ७०% संशोधनात जातात) होईल याबद्दल मला शंका आहे.

मी काही पतंजलीचा प्रवक्ता नाही आहे. एक निवृत्त क्लास -I अधिकारी आहे. प्राचीन ज्ञानाचे संरक्षण, करून पतंजलीला कुठला हि नफा होणार नाही पण कित्येक कोटी खर्च होतात.. कारण या आधारावर कोणी वस्तू विकत घेत नाही. ( बाकी आपले हर्बल फोर्मुले विदेशी संस्थांनी पेटेंट करून ठेवले आहे, भविष्यात आयुर्वेदिक औषधी / हर्बल उत्पाद निर्यात करणार्या भारतीय कंपन्याना अवश्य फायदा होईल) पतंजली non-profit कंपनी आहे, १०० टक्के नफा अनुसंधान- आयुर्वेदिक औषधी, योगावर अनुसंधान, प्राचीन ज्ञानाचे संरक्षण, कृषी अनुसंधान, कृषी प्रशिक्षण, गायींवर अनुसंधान, समाज सेवी संस्थांना मदत शिक्षण अनेक शाळा, देशात किमान ३० हजारहून जास्त योग शाळा सकाळी पतंजलीचे योग शिक्षक घेतात. बाकी एकदा त्यांची वेब साईट बघून घ्या. वरील कार्याने कुठल्याही कंपनीचा काही एक फायदा होत नाही. जर होत असता तर पूर्वीच अनेकांनी हे कार्य केले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ2

पतंजली कंपनीची वेबसाइट हा त्यांच्या कामाबद्दलचा विश्वासार्ह संदर्भस्रोत कसा असू शकेल?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

तुम्ही स्वत: जाऊन बघू शकता. बाकी वर उल्लेखित ५०० ते १००० वर्षाहून जास्त जुनी पाण्डूलिपी प्रकाशित पुस्तके दिव्य प्रकाशनच्या वेब साईट वर जाऊन विकत घ्या. विश्वास होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

विहीरीत रहाणाऱ्यांनी, समुद्राला आमच्या एवढी खोलीच नाही, असे म्हणण्याचा हा प्रयत्न वाटतो. एवढे ज्ञान
जर पतंजली कडे असेल तर, अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या फॉर्म्युलेशन्सची कॉपी करण्याची वेळ त्यांच्यावर का यावी ?

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या फॉर्म्युलेशन्सची कॉपी करण्याची वेळ त्यांच्यावर का यावी ?

तुम्ही केलेल्या प्रतिसादाचा आधार काय? पतंजलीचे सर्व उत्पाद नवीन असल्याने हा प्रश्न उद्भवतच नाही. सकाळी आपण मंजन करतो ते सर्व जडी-बुटी आधारित आहे, एवढेच काय शेविंग क्रीम हि हिरवे tag वाली आहे. साबण (हळदी , एलोविरा, पंचगव्य, मोगरा, चंदन कडू लिंब, खोबरे तेल आधारित, मुलतानी मिट्टी आधारित ) बहुतेक विदेशी कंपन्या विकत नाही. रासायनिक फिनायाल च्या जागी पतंजली गोनायल (गो मूत्र, कडू लिंब आणि निलगीरि तेल), भांड्यांचे डीश वाश ( राख, कडू लिंब आणि लिब इत्यादी ) विदेशी कंपनी विकत नाही. दुधी, गिलोय, आवळा, एलोविरा, ब्राह्मी, बेल, गुलाब इत्यादी ज्यूस हि विदेशी कंपन्या विकत नाही.... अधिक लिहित नाही लिस्ट मोठी होईल.

विहिरी बाबत म्हणेल तर इथे अधिकांश वाचक बिना तथ्य तपासता टिप्पणी करतात. बहुतेक कुणालाही अधिक जाणून घेण्याची इछाच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

मंजन, शेविंग क्रीम, साबण, फिनाइल, डिशवॉश, झालेच तर ती कसलीकसली तेले नि ते कसलेकसले रस, हे सर्व माझ्या माहितीप्रमाणे 'फॉर्म्युलेशन्स' या सदरात मोडत नाही. (चूभूद्याघ्या.)

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विहीरीत रहाणाऱ्यांनी, समुद्राला आमच्या एवढी खोलीच नाही

त्यांना त्यांच्या 'समुद्रा'त गटांगळ्या खाऊन बुडून मरण्याचे स्वातंत्र्य (अर्थातच) आहे.

आम्ही आमच्या विहिरीत (डबक्यात म्हणा, हवे तर!) सुखी - आणि सुरक्षित! - आहोत.

असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विहिरीत राहणार्या ... समुद्राचा परिचय देण्याचा प्रयत्न.

आजच हाच लेख 'मिसळपाव' या संस्थळावर प्रकाशित झाल्याचे दिसत आहे. येथील विहिरीत राहणाऱ्या बेडकांचे प्रबोधन करून झाल्यावर आता तेथील विहिरीत राहणाऱ्या बेडकांना समुद्राचा परिचय करून देण्याचा तो प्रयत्न समजावा काय?

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पतंजली आपल्या नफ्याचा ७० टक्के रिसर्च वर खर्च करते.

नफ्याच्या सत्तर टक्के! अबब..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पतंजली आपल्या नफ्याचा ७० टक्के रिसर्च वर खर्च करते.

ही माहिती मोलाची आहे. याचा स्रोत काय आहे?

शेकडो कोटींचा पीआरआईचा खर्च त्यातून भागतो.

पीआरआई म्हणजे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

शेकडो कोटींचा पीआरआईचा खर्च त्यातून भागतो.

पीआरआई म्हणजे काय?

पतंजलि रिसर्च इन्स्टिट्यूट, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

पतंजली आपल्या नफ्याचा ७० टक्के रिसर्च वर खर्च करते.

ही माहिती मोलाची आहे. याचा स्रोत काय आहे?

ते तर झालेच. परंतु, त्याहीपेक्षा, नक्की कशाचा रिसर्च?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पीआरआई म्हणजे काय?

पीआर म्हणजे पब्लिक रिलेशन्स. त्यामुळे ती पतंजलीच्या जनसंपर्क विभागाची ग्रामदेवता असणार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी3
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

Colgate मध्ये मीठ आहे,कोळसा आहे अशा जाहिराती विदेशी कंपन्यांा नी केल्या की मीठ आणि कोळसा ह्याचे महत्व लगेच पटत.
कोणत्याच शंका येत नाहीत.
साबण मध्ये हळद आहे,चंदन आहे,घायाळ आहे त्वचा smooth होईल असे विदेशी लोकांनी सांगितले की पटते .पण भारतीय लोकांनी सांगितले की सर्व शंका येतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

अनेक मान्यताप्राप्त शास्त्रज्ञांनी एखादी बाब पूर्ण तपासून न घेण्याआधी तिच्यावर विश्वास न ठेवणं, आणि तिची शास्त्रशुद्ध चाचणी झाली की तिच्यावर विश्वास ठेवणं ह्यात चुकलं काय? टिपीकल देशी मंडळींचा हा पेटंट (न)युक्तीवाद असतो. आता दुर्दैवाने देशी तज्ज्ञ तितके विश्वासू नाहीत, ह्याला काय करणार?

अवांतर: न-गणिती लोकांनाही माहित असतो असा सुप्रसिद्ध रिमान हायपोथेसिस एका कुमार ईश्वरन नावाच्या गणितीने अलिकडेच सिद्ध केल्याचा दावा केला. ते बरंच वाईट लिहीलेलं आहे, आणि यथावकाश फोलही ठरलं. पण नॉन-नम्बर थिअरीस्ट देशी गणितींनी म्हणे हे पीअर-रिव्ह्यू केलेलेही आहे. ते वाचतानाच लाजल्यासारखं झालं.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

अनेक मान्यताप्राप्त शास्त्रज्ञांनी एखादी बाब पूर्ण तपासून न घेण्याआधी तिच्यावर विश्वास न ठेवणं, आणि तिची शास्त्रशुद्ध चाचणी झाली की तिच्यावर विश्वास ठेवणं ह्यात चुकलं काय?
तुमचे म्हणणे १०० टक्के बरोबर आहे. आयुर्वेदिक औषधांत वापरणाऱ्या वनस्पती इत्यादी कश्या कार्य करतात हे तपासल्या शिवाय आयुर्वेदिक औषधांना लोक प्रामाणिक औषधीचा दर्जा देणार नाही. म्हणूनच पतंजलीने शेकडो कोटी खर्च करून देशातील सर्वात उन्नत अनुसंधान केंद्र उघडले. त्या केंद्राचे उद्घाटन आपल्या पंत प्रधानाने केले होते. या प्रयोगशाळेत सेल लेवल ते अनिमल लेवल पर्यंत चाचणीच्या सुविधा आहेत. आज ५०० हून जास्त scientist तिथे कार्य करतात (कोरोना काळात तिथे एकालाही करोना झाला नाही). जागतिक दर्जाच्या मेडिकल जर्नल मध्ये त्यांचे अनुसंधान प्रकाशित होतात. तुम्ही स्वत; तपासू शकतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

>>>>त्या केंद्राचे उद्घाटन आपल्या पंत प्रधानाने केले होते

अरे बापरे, आमच्या ऋषितुल्य विश्वगुरू नेत्याचा उल्लेख असा एकेरी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट3
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पांडूलिपी म्हणजे नक्की कोणती लिपी म्हणे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांना बहुधा manuscript म्हणायचे असावे, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

(नाही, मी श्री. विवेक पटाईत यांचा प्रवक्ता नाही. Ugh!)

('पाण्डुलिपी'च का, याबद्दल कल्पना नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोबर. पांडुलीपी म्हणजे मन्युस्क्रिप्ट

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

COVID १९, ni जगातील सर्व संशोधक विज्ञान वादी आंधळे लोकांना जोरात झटका दिला आहे.
COVID १९ ची सुरुवात आणि आज पर्यंत .
Covid १९, विषयी.
भांडवलदार प्रस्तुत संशोधक,भारतातील ढोंगी
विज्ञानवादी
(खऱ्या आयुष्यात अश्व युगात राहणारे) फक्त ह्यांच्या मध्ये एक मत आहे. ह्यांची सर्व मत चुकीची
ठरवली आहेत. तोंडावरच पडलें आहेत सर्व.
सर्वांचे अंदाज १००% चुकीचे निघाले आहेत.
संशोधक सांगणार ,भारतातील विज्ञांन वादी त्यांची शेपटी पकडणार .
आणि त्यांच्या सर्व अंदाज ची corona virus वाट लावणार.
हेच बघत आलो आहे.
Love you corona.
तुझ्या मुळे सुधारित कोण हे माहीत पडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ1

(खऱ्या आयुष्यात अश्व युगात राहणारे)

अश्वयुग म्हणजे नक्की कोणते?

नाही म्हणजे, आम्ही बुवा ऐकले होते, की पूर्वीच्या काळी जगात फक्त कुत्रा आणि घोडा हे दोनच प्राणी होते. तो जमाना काय?

----------

हे 'अश्व' या शब्दावरून लक्षात येते. 'श्व' म्हणजे कुत्रा, आणि जो 'श्व' नव्हे, तो 'अश्व'.१अ

१अ इदं न मम| ही कोटी बहुधा कोल्हटकरांची असावी, राजवाड्यांच्या व्युत्पत्त्यांच्या विडंबनार्थ. (चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


भांडवलदार प्रस्तुत संशोधक,भारतातील ढोंगी
विज्ञानवादी
(खऱ्या आयुष्यात अश्व युगात राहणारे) फक्त ह्यांच्या मध्ये एक मत आहे. ह्यांची सर्व मत चुकीची
ठरवली आहेत. तोंडावरच पडलें आहेत सर्व.
सर्वांचे अंदाज १००% चुकीचे निघाले आहेत.

म्हणजे कुठले अंदाज चुकीचे निघाले ते तरी सांगा.

आणि तुमच्या मते सध्या उपल्ब्ध असलेले उपचार किंवा वॅक्सीन न घेता आयुर्वेदीक औषधे घ्यावीत का लोकांनी?
काही आयुर्वेदीक औषधे खरोखरीच परिणामकारक असतात यात काही संशय नाही. परंतु सद्य परिस्थितीत साथीच्या रोगावर अशी कुठली औषधे उपलब्ध आहेत?
खात्रीची माहिती असेल तर इथे द्यावी ही विनंती. इतरांना त्याचा फायदाच होईल.

नुक्तच वाचनात आलय की दुसऱ्या लाटेत प्राणवायू अभावी दगावलेल्यांची संख्या शून्य आहे म्हणे.. ऐकावे ते नवलच .
कदाचित शून्याच्या आधीचा आकडा छापायचा चुकून राहून गेला असेल.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

त्यांनी लिहिलेले इतक्या गंभीरपणे घ्यायचे नसते.

(नाही म्हणायला, अधूनमधून मार्मिक प्रतिसादसुद्धा देतात, नाही असे नाही. म्हणजे, बंद पडलेले घड्याळसुद्धा दिवसातून दोनदा बरोबर वेळ दाखविते, त्याप्रमाणे. असो चालायचेच.)

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

COVID ची साथ सुरू झाल्या पासून आज पर्यंत .
तज्ञ मंडळी नी व्यक्त केलेले अंदाज आणि covid नी दाखवलेले खरे स्वरूप ह्या मध्ये नक्कीच खूप अंतर आहे
स्टेप wise तज्ञ मंडळीचे इशारे आणि ग्राउंड रिॲलिटी हे तपासा .
लसी बद्द्ल पण काय काय सांगितले गेले होते.
पण ब्रिटन मध्ये ज्यांनी लस घेतली तेच जास्त स्वर्ग वासी झालेत.आताच्या लाटे मध्ये.
हे खोटे आहे असे कोणी सिद्ध करावे आणि नंतर orgument करावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“ब्रिटन मध्ये ज्यांनी लस घेतली तेच जास्त स्वर्ग वासी झालेत.आताच्या लाटे मध्ये. हे खोटे आहे असे कोणी सिद्ध करावे आणि नंतर orgument करावी.”

मी इंग्लंडचा नागरिक आहे. तुमचे वरील orgument भंकस आणि साफ चुकीचे आहे. इतके खोटे, अविश्वसनीय orgument काहीही विदा न देतां करायचे, आणि वर ते खोटे आहे हे सिद्ध करण्याचे आव्हान इतरांना द्यायचे?

  • ‌मार्मिक4
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

कृपया हे पाहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नंतर orgument करावी.

तुम्ही बायेनीचान्स बंगाली (आणि/किंवा बांग्लादेशी) आहात काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण ब्रिटन मध्ये ज्यांनी लस घेतली तेच जास्त स्वर्ग वासी झालेत.आताच्या लाटे मध्ये.
हे खोटे आहे असे कोणी सिद्ध करावे आणि नंतर orgument करावी.

Why Vaccinated People Are Getting ‘Breakthrough’ Infections

breakthrough infections — those occurring in vaccinated people — are still relatively uncommon, experts said, and those that cause serious illness, hospitalization or death even more so. More than 97 percent of people hospitalized for Covid-19 are unvaccinated.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

https://www.livemint.com/science/health/most-covid-deaths-in-england-now...
मेलेल्या लोकात वयस्कर लोक जास्त होती हे कारण देवून लसीकरण विषयी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला गेला आहे
लसी मुळे वयस्कर लोकांना संरक्षण मिळणार नाही हे लसीकरण करण्या अगोदर का नाही सर्व मीडिया मध्ये रोज सांगितले गेले.
हा प्रश्न शेवटी उपस्थित होतोच ना

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक2
  • पकाऊ0

>>>>>मी काही पतंजलीचा प्रवक्ता नाही आहे. एक निवृत्त क्लास -I अधिकारी आहे.

ऐला म्हणजे "सत्तर वर्षात काहीच झालं नाही" याला जबाबदार असणाऱ्या हजारोंपैकी आपण एक आहात तर.

  • ‌मार्मिक5
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट2
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पटाईत काकांनी पतंजलीचा प्रवक्ता नसूनही हे लिहिले असेल तर म्याटर अजून गंभीर होत आहे असं नाही का वाटत ?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(अवतरणे माझी.)

बोले तो, मला जर 'पतंजली'ने (किंवा आणखी कोणीही) पैसे दिले असते, तरीसुद्धा मी असली 'प्रचारक'गिरी केली नसती. आणि हे पैसे न घेताच...

'स्वयंसेवक' ('राष्ट्रीय' ऑर अदरवाइज़), 'प्रचारक' वगैरे मंडळी (आणि 'ॲम्वे'वाले!) रेमीडोकी (मराठीत: वायझेड) असतात, याबद्दल थोडीबहुत कल्पना होतीच. हा खरवसाचा पुरावा (मराठीत: proof of the pudding) समजावा काय?

(वैयक्तिकात शिरू इच्छीत नाही, आणि पटाईतकाकांच्या व्यक्तिगत जीवनाशी मला तसेही देणेघेणे नाही. परंतु, त्यांनी आयुष्यभर अविवाहित राहून स्वत:ला (या) 'कार्या'ला वाहून घेतले, असे जरी उद्या कोणी मला सांगितले, तरी मला यत्किंचितही आश्चर्य वाटणार नाही. असो.)

अर्थात, पटाईतकाकांच्या (अभि)व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर आहेच.

असो चालायचेच.

(तुमच्या मूळ प्रश्नाचे (थोडक्यात) उत्तर: हो, मामला गंभीर आहे.)

==========

"If they don't have bread, let them eat cake!"चा मराठी तर्जुमा "चटणीभाकरी मिळत नसेल, तर शिरापुरी खा!" असा करणाऱ्या (पाठ्यपुस्तकी) मराठी अनुवादकांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून हे भाषांतर केलेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पटाइत काकांनी आपले लेखन ललित या कॅटेगरीत टाकले आहे त्यामुळे सदस्यांनी उगाच फार लोड घेऊ नये.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सदस्यांनी उगाच फार लोड घेऊ नये.

..आणि लोडात येऊ नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ई, आबा!! So bad that it's good!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गल्ली चुकलेल्या वाटसरुवर, त्या गल्लीतली सगळी कुत्री एकाच वेळी भुंकु लागतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट2
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गल्ली चुकलेला वाटसरू कुणाला बोलता ओ ?
हा तर परिवर्तनाचा वाटसरू .
विदेशी मानसिक गुलामगिरीतून देशातील अज्ञ जनतेला देशभक्तीच्या मार्गाला लावणाऱ्या त्या हरियाणातील महाराजयोग्याने मार्गदर्शीत केलेल्या पवित्र वाटेवरून चालणारा परिवर्तनाचा वाटसरू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>हरियाणातील महाराजयोग्याने

दुसरा शब्द चुकून वेगळाच वाचला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

इथे कुणी कीन्सच्या अर्थशास्त्राचे चाहते आहेत का? त्यांना तरी पतंजलीचं थौर्य समजायला हरकत नाही. नफ्याच्या ७०% पैसा 'संशोधना'वर खर्च करतात म्हणे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्यांची तुलना फार्फार्तर दुर्वास ऋषींशी करता येईल. कारण दुर्वास आक्रस्ताळे होते. परंतु ते खोटे बोलत असल्याची किंवा स्त्रीवेषात पळून गेले असल्याची माझ्या माहितीत तरी नोंद नाही.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

विषयावर टिप्पणी करा. द्वेष प्रगट करून अज्ञान दाखविण्यात अर्थ नाही. बाकी स्वामी रामदेव कधीच असत्य बोलत नाही. त्याची त्यांना गरज हि नाही. जे काही बोलतात ते तर्क आणि प्रमाणावर आधारित असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी6
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी स्वामी रामदेव कधीच असत्य बोलत नाही.

इतक्या आदरणीय व्यक्तिमत्वाला एकेरीत संबोधण्याचा जाहीर निषेध!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बाकी स्वामी रामदेव कधीच असत्य बोलत नाही. त्याची त्यांना गरज हि नाही. जे काही बोलतात ते तर्क आणि प्रमाणावर आधारित असतात.

मागितली माफी बाबाने.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतात असलेल्या पारंपरिक ज्ञान वर अधिक संशोधन करून त्या मध्ये वाढ करण्याचे काम पतंजली करत आहे असे लेखकाचे मत असावे.
पतंजली ह्या शब्दावर आडून राहण्याचे कारण नाही.
भारतात अनेक विषयात लोकांच्या रोज च्या अनुभवातून काही ज्ञान परंपरे नी आज पर्यंत आलेले आहे.
त्याची सांगड आताच्या आधुनिक विज्ञाना शी घालणे आवशकय आहे.
आणि त्या साठी पतंजली कार्य करत आहे हेच लेखकाला सांगायचे आहे.
त्या मध्ये आक्षेप घेण्यासारखे काही नाही.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

सर्व प्रतिसाद वाचले. मजा आली. एका मित्राला दाखविले त्याचे हसून हसून पोट दुखले. पतंजली एवजी जर दुसर्या अन्य संस्थेने कोट्यावधीची सरकारी मदत घेऊन १००० एक manuscripts दुरुस्त करून डिजिटल करून दोन तीन प्रकाशित केल्या असत्या. त्या बाबत माहिती दिली असती तर अनेकांनी उत्तम प्रतिसाद दिले असते. बाकी अधिकांश प्रतिसाद देणार्यांनी आपली विद्वता प्रगट केली. त्यांच्या ज्ञानात अशीच भर टाकत राहणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ5

मागच्याच आठवड्यात आमच्या जवळच्या 'पटेल ब्रदर्स'मध्ये हे पाहिले:

Coronil Kit at Patel Bros., Suwanee, GA

('दुनिया झुकती है...')

('A fool and his money...')

असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला ते 'अणू तेल' फारच आवडलंय! 'अनु तेल'सुद्धा आवडलं असतं, पण 'अणू(चं) तेल' जास्तच आवडलंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'अणू(चं) तेल' जास्तच आवडलंय.

(रामदेव)प्रयत्ने अणुचे कण रगडिता...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

>>>'अनु तेल'सुद्धा आवडलं असतं,

अनु राव कुठे गेल्या?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पटाईत काकांना प्रश्न आहे. या फोटोत वरच्या बाजूस "५० ते ८० टक्के लोकांमध्ये अमूक-ढमुक जीवनसत्त्वे इत्यादिंची कमतरता असते" असे जे लिहिलेले असते तो पाश्चात्य फार्मा कंपन्यांचा आपली औषधे खपवण्यासाठी चाललेला खोटा प्रचार असतो ना? मग हे रामदेव बाबा पण त्या प्रचाराला बळी पडलेत की तेही त्या कार्टेलचा भाग आहेत?

.

चित्र न दिसल्यास चित्राची लिंक : https://drive.google.com/file/d/1BIx9xZ3b3JvOYMmSZVYGQyL4QWeRuQMD/view?u...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

Supreme Court tells Baba Ramdev it will impose ₹1 crore costs per false claim in Patanjali Ayurved ads

जाहिरातींमधून खोटेनाटे दावे करणाऱ्या पतंजलीला सर्वोच्च न्यायालयानं चांगलंच फटकारलं आहे. यामुळे पतंजली बुडून त्यामुळे भारतीयांचं आरोग्य जरा सुधारेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बुडत नाही पतंजली. पुढोल पाच की दहा वर्षात एक लाख कोटी turn over करणारेत त्याचा. दररोज एक कोटी दंड केला तरीही काही फरक पडणार नाही.
शिवाय अनेक (बहुधा)बिनपगारी रिटायर्ड ज्येष्ठ नागरिक त्याचा खोटा प्रचार रेटून रेटून करायला रिकामे बसलेच आहेत.
शिवाय एका विशिष्ट राष्ट्रीय महाशक्तीला निधी देतातच ते , ज्यामुळे पतंजली प्रमोटर एकदा जाहीर बोलले होते की "वो क्या, उनका बाप भी मुझे अरेस्ट नही कर सकता."
तात्पर्य : हा दंड करून काहीही होणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवाय, एक ढूँढो, हज़ार मिलते हैं, हाही भाग आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“तुमची औषधं सर्वोत्तम हा दावा कशाच्या आधारे करत आहात?” सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीला सुनावले खडे बोल!
https://www.loksatta.com/desh-videsh/supreme-court-issues-contempt-notic...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही आधुनिक एलोपथ्य ची संघटना आहे .
ती आयुर्वेद,नैसर्गिक उपचार, आणि बाकी पारंपरिक ज्ञान वर आधारित उपचार पद्धतीला विरोध करते हा फक्त व्यावसायिक कारणाने च केला जातो .
Alopathy मध्ये पण अनेक दोष आहेत.
रोग होवूच नये.
आणि .
रोग वर उपचार हे दीन प्रकार आहेत.
रोग होवूच नयेत ह्या वर alopathy बिलकूल संशोधन करत नाही.
ते पण व्यावसायिक फायद्याचा विचार करूनच
रोग झाल्यावर ह्यांचे उपचार चालू होतात.
पण बाकी पारंपरिक शाखा रोग होवू च नये ह्याचा विचार करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाळाला ट्रिपल पोलिओ डोस कशासाठी दिले जातात?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पतंजलीची सर्व औषधी अनुसंधान सेल लेवल अनिमल लेवल इत्यादी, आधारित आहे. त्यामुळें त्यांचे भ्रामक नाही. कोर्ट पाशी कुठलाही पुरावा नाही की त्यांचे दावे भ्रामक आहे. त्यांच्या निर्णयात असा कोणता ही दाखला नाही.

पण १९५४ चा कायदा आहे. याच अधारा वर कोर्टाने प्राथमिक आदेश दिला आहे।
बाकी मेडिकल माफिया शक्तिशाली आहे. निर्णय काहीही झाला तरी ज्याला रोगांपासून मुक्ती पाहिजे तो पतंजली औषधी घेतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ1

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हाताऱ्या माणसांचे असे थेट थोबाड फोडू नये गालिव्हर जी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

कोर्ट पाशी कुठलाही पुरावा नाही की त्यांचे दावे भ्रामक आहे

काका, तुम्हाला बर्डन ऑफ प्रूफ (पुरावे देण्याची जबाबदारी) याविषयी काय ठाऊक आहे?

जर पतंजली आपल्या औषधांच्या परिणामांबाबत काही दावे करीत असेल तर, ते दावे योग्य आहेत हे सिद्ध करण्याची जबाबदारी पतंजलीवरच आहे.

हे दावे फसवे वा भ्रामक आहेत हे सिद्ध करण्याची जबाबदारी कोर्टावर नाही!

पतंजली आपले स्वत:चे दावे सिद्ध करू शकली नाही, हे सत्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरं सांगू का काका... तुमच्या कंमेंट्स वाचल्यावर अॅनिमल फार्ममधला बॉक्सर आठवतो.... तो नेहमी म्हणत असतो:
Napoleon is always right आणि I will work harder

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जौद्याहो!

कां की, ते तसले ‘मकॉलेप्रणीत’ विदेशी संदर्भ काकांना नाही समजायचे.

सबब, सोडून द्या.

उगाच सूकरेषुमौक्तिकक्षेपणम् काय कामाचे?

——————————

असे म्हणण्याची ‘त्यांच्या’त पद्धत असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतर जुने आयुर्वेदिक औषध निर्माते काय करतात?

अमुक तमुक ग्रंथाप्रमाणे(चरक, आ.सा.सं, वगैरे) केलेले औषध एवढेच लिहितात. ज्याला घ्यायचे तो घेतो.
किंवा मूळ सिद्ध औषधांच्या औषधींच्या प्रमाणात थोडा बदल करून नवीन नावाने विकतात. अथवा त्यांचे वैद्य त्याच औषधांची शिफारस करतात. थोडक्यात सांगायचे तर कुणीही नवीन शोध लावत नाही.
पतंजलीला मार्केटिंगची पडली आहे घाई. एखादे वाक्य किंवा दावा पकडून विरोधक तुटुन पडतात. थोड्या दिवसांनी त्या औषधांचा खप वाढू लागला की आपल्या प्रॉडक्ट मध्ये 'हेसुद्धा' आहे छापून धंदा मिळवतात. सर्वच लबाड आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पतांजली ला होत असलेला विरॊध हा बरोबर आहे असें म्हणतो

कारण अल्ल्युपाथी हे औषध चांगले आणि स्वस्त असते

आयुर्वैदीक हे औषध खूप महाग असते, मी खूप जास्त वापरून पाहिले नाही

पण सरकारी दवाखान्यात आयुर्वैदीक औषध मिळत नाही म्हणून लोक वापरात नाहीत

म्हणून सगळे लोक अल्ल्युपाथी औषध घेतात त्यात त्यांचं काय चुकलं आहे ?

पतांजली ही रामदेव बाबाची कंपनी आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॅन्सर,मधुमेह,किडनी चे आजार, heart विषयी समस्या, lungs चे आजार,विषाणू जन्य आजार,जिवाणू जन्य आजार .
ह्या वर आयुर्वेदात उपचार आहेत असा कोण दावा करत असेल तर.
ती औषध नक्की कशा प्रकारे हे आजार बरे करतात ह्याची शास्त्र शुध्द तपासणी केल्याची पद्धत आणि माहिती जाहीर केलीच पाहिजे.
. ती माहिती सत्य आहे की असत्य आहे ह्याची समीक्षा मग कोणी पण करेल.

पतंजली नी जे दावे केले आहेत त्याच्या समर्थनात काय माहिती जोडली आहे आणि ती माहिती आज च्या आधुनिक मेडिकल शास्त्र नुसार खरी ठरली पाहिजे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिल्लीतले प्रतिष्ठीत लोक आजारी पडल्यावर थेट आयुर्वेद संस्थानाच्या रुग्णालयात जाऊन बरे होऊ लागले की तिढा सुटेल. महाजनो येन गत: स पंथ: ।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसे होण्याऐवजी, एम्समध्ये, झालेच तर सरकारी दवाखान्यांतून वगैरे अॅलोपथीची मॉडर्न मेडिसीनची औषधे/उपाययोजना बंद होऊन फक्त आयुर्वेदाची उपाययोजना सक्तीची होण्याची शक्यता अधिक. (__ है, तो साला कुछ भी मुमकिन है!)

(तुमची ‘महाजन’ मंडळी वगैरे पैसे खर्चून हवी तशी उपाययोजना खाजगीमध्ये तशीही करून घेतीलच. त्यांना अजिबात धक्का पोहोचणार नाही.)

ज्या दिवशी तुमचा ‘महामानव’ स्वतः आजारी पडल्यावर बाकी सर्व उपाययोजना नाकारून फक्त आयुर्वेदिक उपाययोजनांचा आग्रह नव्हे हट्ट धरेल, त्या दिवशी सगळे खरे मानेन मी. तोवर हे ‘आयुष’ वगैरे लोकांच्या जिवाशी पोरखेळ आहे.

असो; चलता है, हिंदुस्तान है।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोबर.
उदाहरण घालून दिल्यावर विश्वास वाढत जाईल. पूर्वी इथे लढाया होत होत्याच. काही सैनिक घायाळ होत होते. त्यांची शुश्रुषा कशी केली, किती बरे झाले, काय उपचार केले, किती दिवसांत किती गुण आला हे सर्व {संस्कृत} ग्रंथांत फक्त नोंदी केल्या असत्या तरी उपयोग झाला असता. इतर आजारांचे ही असेच वर्णन असायला हवे होते. यासाठी सामान्य निरीक्षकांची भूमिका महत्त्वाची होती. आता जो प्रचार केला जातो आहे त्यापेक्षा कृती हवी आहे. ( आयुर्वेदाचा प्रचार करणाऱ्या बालाजी तांबे यांनी ती संधी घालवली होती. त्यांची कारणं माहीत नाहीत पण तसं केलं नाही. एक वेगळाच संदेश पसरतो ना.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

औषधोपचार .. मग तो आयुर्वेदिक, होमिओपॅथी, अधुनिक वैद्यकशास्त्र किंवा अन्य कुठलेही असोत, ते माणसाच्या आयुष्याशी निगडित आहेत. त्याबद्दल दिशाभूल करणे किंवा गैरसमज पसरवून फायदा करून घेणे निषेधार्यच आहे.

अगदी नजिकच्या काळात माझ्या माहितीतील दोन,तीन केसेस अशा झाल्या आहेत, की हट्टाने अधुनिक वैद्यकीय उपचार नाकारले. ते घेत असलेल्या उपचारांचा परिणाम होईना म्हणून शेवटी निरूपायाने अधुनिक औषधोपचार स्वीकारले परंतु तोवर बराच उशीर झालेला होता.

माणसाच्या जीवाशी कुणी खेळ करू नये. आणि कुणी करीत असल्यास त्यास सर्वांनी विरोध करावा कारण न जाणो त्या अपसमजाचे परिणाम कदाचित आपल्या घरापर्यंत येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||