हे लेखन नष्ट होईल काय?
काळच ठरवेल.
होउन जाउ दे.
(त्या निमित्ताने…)
अपग्रेडच्या कामासाठी भावेप्र शुक्रवार (७ ऑक्टोबर) संध्याकाळपासून ते रविवार (९ ऑक्टोबर) संध्याकाळपर्यंत ऐसी अक्षरे अनुपलब्ध असेल. काम लवकर पूर्ण झाल्यास संस्थळ आधीच सुरू होईल. तसदीबद्दल क्षमस्व.
काम लवकर पूर्ण होऊन संस्थळ जर आधीच सुरू झाले, तर त्यात तसदी नक्की कसली आणि नेमकी कोणाला?
कदाचित,
अपग्रेडच्या कामासाठी भावेप्र शुक्रवार (७ ऑक्टोबर) संध्याकाळपासून ते रविवार (९ ऑक्टोबर) संध्याकाळपर्यंत ऐसी अक्षरे अनुपलब्ध असेल. तसदीबद्दल क्षमस्व.
काम लवकर पूर्ण झाल्यास संस्थळ आधीच सुरू होईल.
असे पाहिजे होते काय?
पाचशब्दांची महान गाथा
राजेश घासकडवी
आपले उत्तर फार काही सांगून गेले. देणार/ नाही देणार ह्यांचे सुपरपोझिशन!
ह्या विश्वात काहीही नष्ट होत नसते. ते केवळ वरवरचे रूप बदलते. कारण "वासांसि जीर्णानि... इत्यादि.
अस्वल > नाही नष्ट होणार. ही हेमिंग्वे वर मात करणारी केवळ पाचशब्दांची महान गाथा कथा मी कॉपी पेस्ट करून आणि आईनस्टाईनच्या अविचल फ्रेम मध्ये सजवून माझ्या दिवाणखाण्यात लावत आहे.
अपग्रेडची पद्धत
सर्वांत आधी. अपग्रेडचं काम मी करत नसून, ड्रूपालबद्दल माहिती असणारा गजानन करत आहे.
ड्रूपाल ७ ते ड्रूपाल ९ असं हे अपग्रेड करण्याची गरज आहे. ह्यात ड्रूपालनं डेटाबेसची रचनाच (schema) बऱ्यापैकी बदलली आहे. तो बदल घडवण्यासाठी स्क्रिप्ट्स दिलेली आहेत.
इथे नोटिस लावल्यानंतर डेटाबेस त्यानं त्याच्या लॅपटॉपवर डाऊनलोड केला. तिथेच ती स्क्रिप्ट्स चालवून डेटाबेस मायग्रेशन सुरू केलं. (ते गेल्या विकेण्डला चाललं नाही; बऱ्याच गोष्टी अडल्या.) ह्या प्रकारातच सगळ्यात जास्त वेळ मोडतो; काही अडचणी न येता काम झालं तरीही किमान ५-७ तास लागतात ह्या प्रकाराला.
ते मायग्रेशन जर चाललं तर तेव्हा डाऊनलोड केलेला डेटाबेस - स्नॅपशॉट वापरलं जाणार. म्हणून मधल्या वेळात जे काही लिहिलं जाईल ते येईलच याची खात्री नाही. तरीही किडे असतीलच तर एक मायग्रेशन चालल्यानंतर हातानं दोन-चार धागे आणि प्रतिसाद तिकडे हलवता येतीलच.
हे काम पूर्ण झाल्यावर ऐसीवर सबडोमेनवर ड्रूपाल ९ चढवून तिथे हा डेटाबेस वापरणार. तिथे सगळं चाललं की मुख्य ऐसीवर. यात काही काळ ऐसी बंद ठेवावं लागेल. पीएचपीचं व्हर्जन वरचं वापरणं वगैरे प्रकार असल्यामुळे सबडोमेनवर ड्रूपाल ९ वापरतानाही मुख्य साईट बंद करावी लागेल.
हे सगळं काम किचकट, वेळखाऊ आहेच; शिवाय गेल्या विकेण्डला बघितलं तसं चालेलच असं नाही. तेव्हा असा टाईमपास करून गजाननची करमणूक करायला हरकत नाही.
पुन्हा (बहुतेक येत्या विकेण्डला) हे करताना हीच प्रक्रिया. म्हणजे तशीच नोटिस, आणि तेव्हा डेटाबेसचा स्नॅपशॉट घेऊन हेच काम होईल. मधल्या काळात केलेलं लेखन अपग्रेडमध्ये येईल.
आणखी काही शंका असतील तर जरूर विचारा. पण टाईमपास करायला विसरू नका.
सर्व जगच जर नष्ट झाले, तर…
…लेखाचे काय घेऊन बसलात?