दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२२
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२१ सप्टेंबर
जन्मदिवस : पक्का रस्ता बनवण्याचे तंत्र विकसित करणारे जॉन मॅकअॅडम (१७५६), पदार्थांना अतिथंड करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता हाईक अनेस (१८५३), उवांमुळे टायफस तापाचा प्रचार होतो हे सिद्ध करणारा नोबेलविजेता चार्लस निकोल (१८६६), लेखक एच. जी वेल्स (१८६६), पेंग्विन प्रकाशनाचा जनक अॅलन लेन (१९०२), गायिका नूरजहाँ (१९२६), संगीतकार, गायक पं. जितेंद्र अभिषेकी (१९३२), रहस्यकथालेखक स्टीफन किंग (१९४७), अभिनेता बिल मरे (१९५०), अभिनेता गुलशन ग्रोव्हर (१९५५), अभिनेत्री करीना कपूर (१९८०)
मृत्युदिवस : 'जंतरमंतर' बांधून घेणारा जयपूरचा राजा सवाई जयसिंह (१७४३), पिट्यूटरी ग्रंथीचे कार्य शोधणारा नोबेलविजेता बर्नार्डो हूसे (१९७१), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९८२), 'राजश्री प्रोडक्शन'चे जनक ताराचंद बडजात्या (१९९२), नाटककार, नाट्यदिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर (१९९९)
---
आंतरराष्ट्रीय शांतता दिन
स्वातंत्र्यदिन : माल्टा (१९६४), बेलीझ (१९८१), आर्मेनिया (१९९१)
१६८७ : गोवळकोंड्याचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात; कुतुबशाही संपुष्टात.
१९७७ : अण्वस्त्रबंदीकरारावर यू.एस., सोव्हिएत संघ आणि इतर तेरा देशांनी सह्या केल्या.
१९९५ : गणपतीच्या मूर्तीने दूध पिण्याचा "चमत्कार".
२००३ : गॅलेलेओ अंतराळयानाचा गुरूच्या वातावरणात प्रवेश; वातावरणाच्या दाबामुळे यान नष्ट.
दिवाळी अंक २०२२
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
सर्व जगच जर नष्ट झाले, तर…
…लेखाचे काय घेऊन बसलात?
(त्या निमित्ताने…)
काम लवकर पूर्ण होऊन संस्थळ जर आधीच सुरू झाले, तर त्यात तसदी नक्की कसली आणि नेमकी कोणाला?
कदाचित,
असे पाहिजे होते काय?
संस्थळ लवकर सुरू झालं तर
संस्थळ लवकर सुरू झालं तर खरडफळ्यावर हत्तीचा त्रास आणखी केसभर जास्त नाही होणार!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
व्याकरण चूक
संस्थळ हे संकेत स्थळ ह्याचा शॉर्ट फॉर्म आहे.
सं च्या पुढे पूर्ण विराम हे चिन्ह दिले जाणे गरजेचे आहे.
सर ...
हे मराठीतलं प्रमाणलेखन -
संकेतस्थळ हा मराठीत एकच शब्द आहे; दोन शब्द नाहीत. त्यामुळे संस्थळ हे लघुरूप खपून जायला हरकत नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
bear market predictions?
फारच मेटा!
मेटाचं नाव काढू नकोस! गूगलचा
मेटाचं नाव काढू नकोस! गूगलचा पापड मोडेल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मी उत्तर लिहिणार नाही, कारण
मी उत्तर लिहिणार नाही, कारण ते नष्ट होऊ शकतं.
अर्थात पाच बिलियन वर्षांनी आख्खी पृथ्वीच नष्ट होणारे, त्यामुळे तसा काही फरक पडत नाही.
तुम्ही काळ आहेत का?
तुम्ही काळ आहेत का? काळच ठरवेल असं म्हणालाय ना अस्वल! अस्वलावर विश्वास ठेवा!!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
‘काळ’ अॅज़ इन…
…‘खायला काळ, नि भुईला भार’मधले?
असतील ब्वॉ. कल्पना नाही.
आपला पास!
पाचशब्दांची महान गाथा
राजेश घासकडवी
आपले उत्तर फार काही सांगून गेले. देणार/ नाही देणार ह्यांचे सुपरपोझिशन!
ह्या विश्वात काहीही नष्ट होत नसते. ते केवळ वरवरचे रूप बदलते. कारण "वासांसि जीर्णानि... इत्यादि.
अस्वल > नाही नष्ट होणार. ही हेमिंग्वे वर मात करणारी केवळ पाचशब्दांची महान गाथा कथा मी कॉपी पेस्ट करून आणि आईनस्टाईनच्या अविचल फ्रेम मध्ये सजवून माझ्या दिवाणखाण्यात लावत आहे.
जे आज आहे ते उद्या नसणार,
जे आज आहे ते उद्या नसणार, त्याची काळजी कशाला. पूर्वी मी आपल्या असाहित्याची प्रिंट घेऊन ठेवायचो. पण सहा सात वर्षांपासून बंद केले. सकाळी डोळे उघडल्यावर जिवंत आहे म्हणून भगवंताला धन्यवाद देतो. व्यक्त अव्यक्तच्या स्वरूपात काळचक्र फिरत राहणारच.
कंटेक्ष्ट
राजे हो,
मला एवढंच म्हणायचं होतं की अपग्रेडचं काम झाल्यावर हे लेखन राहिल की जाईल?
==================
भूतकाळातील आस्वल्य.
?
काय फरक पडतो?
अपग्रेडची पद्धत
सर्वांत आधी. अपग्रेडचं काम मी करत नसून, ड्रूपालबद्दल माहिती असणारा गजानन करत आहे.
ड्रूपाल ७ ते ड्रूपाल ९ असं हे अपग्रेड करण्याची गरज आहे. ह्यात ड्रूपालनं डेटाबेसची रचनाच (schema) बऱ्यापैकी बदलली आहे. तो बदल घडवण्यासाठी स्क्रिप्ट्स दिलेली आहेत.
इथे नोटिस लावल्यानंतर डेटाबेस त्यानं त्याच्या लॅपटॉपवर डाऊनलोड केला. तिथेच ती स्क्रिप्ट्स चालवून डेटाबेस मायग्रेशन सुरू केलं. (ते गेल्या विकेण्डला चाललं नाही; बऱ्याच गोष्टी अडल्या.) ह्या प्रकारातच सगळ्यात जास्त वेळ मोडतो; काही अडचणी न येता काम झालं तरीही किमान ५-७ तास लागतात ह्या प्रकाराला.
ते मायग्रेशन जर चाललं तर तेव्हा डाऊनलोड केलेला डेटाबेस - स्नॅपशॉट वापरलं जाणार. म्हणून मधल्या वेळात जे काही लिहिलं जाईल ते येईलच याची खात्री नाही. तरीही किडे असतीलच तर एक मायग्रेशन चालल्यानंतर हातानं दोन-चार धागे आणि प्रतिसाद तिकडे हलवता येतीलच.
हे काम पूर्ण झाल्यावर ऐसीवर सबडोमेनवर ड्रूपाल ९ चढवून तिथे हा डेटाबेस वापरणार. तिथे सगळं चाललं की मुख्य ऐसीवर. यात काही काळ ऐसी बंद ठेवावं लागेल. पीएचपीचं व्हर्जन वरचं वापरणं वगैरे प्रकार असल्यामुळे सबडोमेनवर ड्रूपाल ९ वापरतानाही मुख्य साईट बंद करावी लागेल.
हे सगळं काम किचकट, वेळखाऊ आहेच; शिवाय गेल्या विकेण्डला बघितलं तसं चालेलच असं नाही. तेव्हा असा टाईमपास करून गजाननची करमणूक करायला हरकत नाही.
पुन्हा (बहुतेक येत्या विकेण्डला) हे करताना हीच प्रक्रिया. म्हणजे तशीच नोटिस, आणि तेव्हा डेटाबेसचा स्नॅपशॉट घेऊन हेच काम होईल. मधल्या काळात केलेलं लेखन अपग्रेडमध्ये येईल.
आणखी काही शंका असतील तर जरूर विचारा. पण टाईमपास करायला विसरू नका.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
??
गजानन बोले तो नक्की कोण?
(‘ऐसी’च्या संदर्भात पहिल्यांदाच ऐकतो आहे हे नाव, म्हणून चौकशी. सहज कुतूहल म्हणून. अधिक काही नाही.)
डबलघोडावाला नाही.
हा गजानन.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.