"स्वमग्नता" : काही विचार

गेल्या आठवड्यातली अमेरिकेतल्या कनेटिकट राज्यातील एका प्राथमिक शाळेत घडलेली दुर्घटना आपल्यापैकी बहुतेकांना माहिती असेलच. एका २० वर्षीय मुलाने न्यूटाऊन भागातील, सँडी हूक शाळेत घुसून, शाळेतील २६ मुलांची बंदुकीने निर्घृण हत्या केली. त्या आधी त्याने आपल्या आईची (जी या शाळेत शिक्षिका होती) राहत्या घरी हत्या केली. शाळेतील हत्याकांड संपल्यावर, त्याने स्वतःवरही गोळी झाडून घेतली. तो वाचला नाही. या घटनेचे पडसाद अमेरिकाभर उमटले. ही घटना घडल्यावर, या घटनेमागचा हेतू, शाळेची सुरक्षाव्यवस्था, घटनेचे इतर मुलांवर होणारे परिणाम, ज्या मुलाने हत्या केली (अ‍ॅडम), त्याचे व्यक्तिमत्व यांबद्द्ल निरनिराळ्या वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांच्या माध्यमांमधून चर्चा होऊ लागली. अ‍ॅडमच्या व्यक्तिमत्वाबद्द्ल अनेक चर्चा रंगल्या. तो एक लाजरा, कमी मिसळणारा मुलगा असल्याचे त्याला ओळखणार्‍या अनेकांनी सांगितले. काहीजणांच्या मते, तो एक स्वमग्न (Autistic) तर काहीजणांच्यामते तो एक Asperger syndrome ने पिडीत मुलगा होता. (वानगीदाखल हा एक लेख). त्या मुलाने आत्महत्या केल्यामुळे, आता त्याच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करण्याची, घटनेमागचा हेतू तपासण्याची आणि तो स्वमग्न होता का ते जाणून घेण्याची संधी उपलब्ध नाही, पण या निमित्ताने स्वमग्नतेकडे समाज कुठल्या नजरेने पाहतो हे लक्षात येईल.
एखादे मूल जरा लाजरे, एकलकोंडे, पठडीबाहेर वागणारे असेल, तर आपण फारसा विचार न करता, त्याच्यावर स्वमग्नतेचा शिक्का मारून मोकळे होतो. स्वमग्न व्यक्ती म्हणजेच मानसिक रुग्ण असल्याचे आरोप करायला आणि सामाजिक दुर्घटनांचे खापर त्यांच्यावर फोडायला मोकळे होतो. वास्तविक पाहता, हे दोन्ही विकार, त्यांची कारणे, या विकारांना बळी पडलेल्या व्यक्तींच्या वागण्याच्या पद्धती, मनोव्यापार वेगळे आहेत. माझ्या अनुभवावरून, पठडीबाहेर वागणार्‍या व्यक्ती आपल्याशी वेगळ्या पद्धतीने संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतात. (त्यांना इतरांशी संवाद साधण्यात रस नसतोच हा अजून एक गैरसमज.) सहसा हे प्रयत्न दुर्लक्षिले जातात आणि विसंवाद निर्माण होतो. स्वमग्नता = मानसिक विकार = दुर्घटना हे एक पूर्वग्रहदूषित समीकरण आहे.

अनेक वृत्तपत्रांनी लेखांमधे, It also says But for an autistic kid he did remarkably well.
किंवा "There is absolutely no evidence or any reliable research that suggests a linkage between autism and planned violence," the Autism Society said in a statement. "To imply or suggest that some linkage exists is wrong and is harmful to more than 1.5 million law-abiding, nonviolent and wonderful individuals who live with autism each day." असे सावधानतेचे इशारे छापलेले आहेत. पण भडक मथळ्यांपुढे ते फारसे लक्ष वेधून घेत नाहीत. ही दुर्घटना केवळ त्याच्या स्वमग्नतेमुळे किंवा Asperger syndrome मुळे घडली, अशा वृत्तपत्रांमधील मथळ्यांनी आणि मतप्रदर्शनांनी व्यथित झाले असतानाच माझ्या या मताशी सहमती दर्शवणारा एक लेख नुकताच वाचनात आला. या लेखात वर्णन केलेला ८ वर्षीय स्वमग्न मुलाचा किस्सा हृदयद्रावक आहे. जरूर वाचा.
http://www.nytimes.com/2012/12/18/opinion/dont-blame-autism-for-newtown....

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

ऑटिज़मवर मात करण्यासाठी पालकान्ना प्रशि़क्षण देणारा 'Son-Rise' हा उत्तर अमेरिकेत उपलब्ध असलेला कार्यक्रम अतिशय यशस्वी होत आहे. या कार्यक्रमाच्या अनेक चित्रफिती उपलब्ध आहेत.
नोन्द घेण्याची बाब अशी की प्रशिक्षण हे पालकान्ना दिले जाते, स्वमग्न बालकान्ना नाही. यावरून अश्या मुलांशी वागताना आपल्या जाणीव/माहिती/ज्ञानाची कक्षाच अपुरी पडते हे ठळकपणे लक्षात येते.
माझ्या एका स्नेह्याच्या जुळ्यान्तील एका मुलात ऑटिज़मची लक्षणे दिसली. त्यान्नी ह्या कार्यक्रमात भाग घेतला. आज ३ वर्षांनन्तर त्याञ्च्या मुलातील अविश्वसनीय बदल आणि ते सर्व करताना स्नेह्याच्या एकूणच आयुष्याकडे बघण्याच्या दृष्टीकोनातील बदल हे त्याच्या 'Adi shall rise' या जालनिशीवर वाचावयास मिळतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमुक, आपल्या प्रतिसादातील माहितीपूर्ण दुवे पाहिले. आपल्यालाही प्रशिक्षणाची गरज आहे, हे समजण्याची पहिली महत्वाची पायरी ओलांडून आपले स्नेही डोळसपणे आपल्या पाल्याच्या विकासात सहभागी होत आहेत हे बघून आनंद झाला. अनेकदा, आपल्या पाल्याला आवश्यक त्या सेवा पुरवल्या जात आहेत ना ते बघणे एवढेच आपले कर्तव्य आहे असे पालक समजतात. इतर कोणापेक्षाही पालक आपल्या मुलांबरोबर सर्वाधिक वेळ घालवतात, त्यांच्या अनेक सवयी आपल्या चांगल्या परिचयाच्या असतात अशावेळी जर पालकांची साथ मिळाली, तर मुलांमधे बदल घडून येणे सहजसाध्य होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऑटिझमच्या बाबत काही ऐकीव माहिती वगळली, तर काहिच माहिती नाही त्यामुळे या चर्चेत भर घालता येणार नाही. मात्र ही चर्चा आणि चेर्चेतील/प्रतिसादांतील दुवे रोचक आहे.
धाग्यावर लक्ष ठेऊन आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

या आणि अशा इतर घटनांबाबत प्रश्न पडला आहे. हे लोक फक्त स्वमग्न किंवा अन्य काही मानसिक विकारांना बळी पडलेले असतात का अन्य काही कारणंही त्यात असतात? या अशा घटना अमेरिकेत वर्षातून दोन-तीन वेळा घडत असतील आणि दरवर्षी हजारो स्वमग्न मुलं जन्माला येत असतील. मुळातच ही मुलं दुष्ट, हिंस्त्र होती आणि त्यात त्यांना मानसिक विकार असणे, बंदूका सहज उपलब्ध असणे असे अन्य घटक त्यात येतात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गुन्हा झाला की ताबडतोब सुरू होते. कारण अशा टोकाच्या, हादरवून टाकणाऱ्या घटनेची छाननी करणं, ती का घडली याबाबत काहीतरी नीटनेटकं उत्तर शोधण्याची गरज असते. बऱ्याच वेळा कुठचं तरी 'लेबल' शोधलं जातं. मग त्या लेबलधारकांना हिणवणं ते ठार मारण्यापर्यंत गोष्टी होतात. गांधींच्या हत्येनंतर ब्राह्मण समाज आणि इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीख समाज असाच पिडला गेला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरील लेखातला दुवा आता बदललेला आहे. तो लेख आता इथे वाचायला मिळेल.

अदिती,
अशा घटनांमागे असणारी बदल्याची भावना, मानसिक विकार किंवा आपले नैराश्य हिंस्त्र पद्धतीने व्यक्त करण्याची गरज स्वमग्न मुलांमधे नसते. स्वमग्न मुलांना जग जसे दिसते, तसेच त्यांच्यापुरते खरे असते. इतरांसारखे खोटे दांभिक वागणे त्यांना जमत नाही. शब्दांच्या छुप्या अर्थछटा तसेच सामाजिक संकेत त्यांना समजत नाहीत. या घटना योजण्यासाठी लागणारा हिशोबीपणा त्यांच्याकडे नसतो. छोटेसेच उदाहरण द्यायचे तर, "लाडू हळूच घेताना आवाज होईल का" असा विचार करून दबक्या पावलांनी डब्यातला लाडू घेऊन, डबा जागच्याजागी ठेवून, आई उठायच्या आत लाडू संपवून, तोंड घुवून अभ्यासाला बसणे येवढा विचार स्वमग्न मुलाकरता ओव्हरवेल्मिंग (कुवतीबाहेर?) आहे. आई झोपलेली असताना लाडू घेऊन (कावेबाजपणे नव्हे, तर भूक लागली म्हणून) ते मूल तिच्याच शेजारी बसून खायला लागेल.
एखाद्या व्यक्तीने, "कशी आहेस?" असा औपचारीक प्रश्न केला असता, "बरी आहे." असे अपेक्षीत उत्तर न देता, एखादी स्वमग्न व्यक्ती खरंच त्या दिवशी सकाळपासून घडलेल्या घटनांचा पाढा वाचायला लागेल. अनेक स्वमग्न व्यक्तींनी, आपल्या हातून गोंधळ होऊ नये, म्हणून वेगवेगळ्या प्रसंगी वापरायच्या सामाजिक संकेतांची यादी बरोबर बाळगत असल्याचे कबूल केले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यात भर घालण्यासारखे माझ्याकडे काही नाही पण चर्चा वाचते आहे आणि नवीन माहिती मिळते आहे. माझ्या मुलीच्या शाळेत 'विषेश गरजा' (special needs) असलेली मुले इतर सामान्य मुलांबरोबर शिकतात. तिच्या वीस मुलांच्या छोट्या वर्गात एक ऑटिस्टिक, एक aspergers syndrome आणि एक down's syndrome (मराठी ?) असलेली मुले आहेत. विशेष गरजा असलेल्या मुलांकडे लक्ष द्यायला एक सहकारी शिक्षिका आहे पण सर्व मुले एकत्रितपणे शिकतात. ह्या वातावरणाचा स्वमग्न मुलांना फायदा होतो का? सर्व मुले एकत्रितपणे शिकल्याने समाजाचा, खास करून नवीन पीढीचा अशा मुलांकडे अधिक सहजपणे पहाण्याला आणि नैसर्गिकपणे स्विकारायला उपयोग होतो का? ़जाणकारांना याविषयी काय वाटते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या वातावरणाचा स्वमग्न मुलांना फायदा होतो का? सर्व मुले एकत्रितपणे शिकल्याने समाजाचा, खास करून नवीन पीढीचा अशा मुलांकडे अधिक सहजपणे पहाण्याला आणि नैसर्गिकपणे स्विकारायला उपयोग होतो का?

होय. तसा फायदा होणे अपेक्षित आहे. तो होणं न होणं बर्‍याच इतर घटकांवर (विशेष गरजा असणारं मुल आणि इतर मुलं यांची मानसिक स्थिती, वर्गातला कोलाहल, शिक्षक, नेमून दिलेलं काम इत्यादी) अवलंबून असतं. स्वमग्न मुलांच्या वर्गात पठडीतले वागणारे उदाहरण(रोल मॉडेल) नसते. त्यामुळे इतर वर्गातल्या मुलांशी मिसळून, त्यांचे निरिक्षण करून ही मुले बरेच काही शिकू शकतात. आपल्यापेक्षा वेगळं वागणार्‍या (काही वेळा दिसणार्‍याही) व्यक्तीशी मैत्री करणे, लहान वयात अधिक शक्य असते. जसजसे मोठे होतो, तसतसे पठडीच्या वागण्यातले असणारे फायदे आपल्याला दिसू लागतात. संख्येने कमी असणार्‍या आणि आपल्या मदतीवर अवलंबून असणार्‍या (आणि कमी 'कळणार्‍या' ?) व्यक्तींना मदत करणे, हा आपला मोठेपणा आहे, असा साक्षात्कार होतो!

इतर मुलांनाही स्वमग्न मुलांकडून शिकण्यासारखे बरेच काही असते. अनेकदा ही मुले वस्तूंचा, घटनांचा क्रम लावण्यात हुषार असतात (अनेकजण पझल्स सोडवण्यात वाकबगार असतात). त्यांच्या आवडीचे काम करताना अत्यंत केंद्रित असतात. त्यांची स्मरणशक्ती उत्तम असते (विशेषतः आकड्यांच्या बाबतीत). त्यांची सर्वायवल स्किल्स आणि समस्यापूर्ती करण्याचे कौशल्य वाखाणण्याजोगे असते. अनेकांना लय/तालाचे उत्तम भान असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0