पर्यावर्णीय शीतयुद्ध : धरण ते मेट्रो इत्यादि

पूर्वी युद्धाचा मुख्य उद्देश्य दुसर्‍या देशांवर नियंत्रण ठेवणे आणि त्यांच्या कडून अप्रत्यक्ष रूपेण चौथ वसूली करणे हो होता. आज युद्ध अत्यंत महागडा प्रकार आहे. फायदा कमी नुकसान जास्त आहे. आजच्या काळात शत्रू देशांच्या प्रगतिच्या मार्गात अडथळे उत्पन्न करून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान करणे, हा ही युद्धाचा एक प्रकार आहे. बिना एक ही गोळी चालविता फक्त काही कोटी खर्च करून शत्रू देशाचे हजारो कोटींचे नुकसान सहज केले जाते. त्यासाठी शत्रू देशातील स्वार्थी मीडिया, स्वार्थी राजनेता आणि तथाकथित सामाजिक संगठनांचा वापर केला जातो. काही कोटी फेकून दुसर्‍या देशात जनतेच्या हितांच्या प्रोजेक्टस विरुद्ध मोठे-मोठे आंदोलन उभे केले जातात.

या आर्थिक शीत युद्धात आजपर्यन्त आपल्या देशाला लाखो कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कोट्यवधी जनता आर्थिक प्रगति आणि रोजगार पासून वंचित राहिली. सरकारला ही शत्रू देशांच्या षड्यंत्राची माहीत असते. पण भारतासारख्या प्रजातांत्रिक देशातिल कमकुवत कायदे आणि त्यावर न्यायपालिकेची, कासवला ही लाजवेल अशी कार्य पद्धती, विकासाच्या प्रोजेक्ट्सवर न्याय व्यवस्थेकडून हिरवा कंदील मिळे पर्यन्त लाखो कोटींचे नुकसान देशाला होऊन गेलेले असते. अश्या व्यवस्थेत शत्रूच्या तालावर नाचणार्‍या तथाकथित सामाजिक संगठनांवर कठोर कारर्वाई करणे ही अशक्यच असते.

आज देश खाद्यान्न बाबतीत आत्मनिर्भर आहे. एवढेच काय तर आज अनेक देशांना मदत ही करत आहे. आपल्या देशात झालेल्या हरित क्रांति मागे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड इथे बांधण्यात आलेल्या धरणांचे आणि मैदानी भागात निर्मित कालव्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. तीन वर्षांपूर्वी टिहरी धरण बघायला गेलो होतो. धरण आतून दाखविण्यासाठी एक कर्मचारी सोबत दिला होता. (आतून धरण पाहण्याचे भाग्य फार कमी लोकांना मिळते) त्या कर्मचार्याचे गाव ही धरणात बुडाले होते आणि त्या बदल्यात त्याला नौकरी आणि परिवाराला घर ही मिळाले होते. धरणाचा विषय निघणे साहजिकच होते. तो म्हणाला ह्या प्रोजेक्टमध्ये अनेक अडथळे आल्याने धरणाचा खर्च ही अनेक पटीने वाढला. या धरणाला पांढरा हत्ती असे संबोधित केले जाते. माझ्या मनात माझे गाव, घरदार बुडण्याचे शल्य सदैव टोचत रहात होते. केदारनाथ घटना झाली. त्यावेळी या भागत भयंकर पाऊस सुरू होता. या धरणाने अब्जावधी लीटर पानी पोटात साठवून हरिद्वार पर्यन्त लाखों लोकांच्या प्राणांची रक्षा केली आणि हजारो कोटींच्या संपत्तीचे ही रक्षण केले. अप्रत्यक्ष रूपेण धरणावर झालेला संपूर्ण खर्च त्या तीन दिवसांत वसूल झाला. तो म्हणाला आज मला या धरणावर गर्व आहे. बोलता-बोलता तो सहज म्हणाला, आंदोलनकारी नेत्यांना आमच्या पुनर्वसन एवजी धरणाचे काम लांबविण्यात जास्त रस होता. अखेर उशिरा का होईना आम्हाला हे सत्य कळलेच. स्थानिक जनतेने आंदोलनकारी नेत्यांच्या विरोधाला न जुमानता सरकारची मदत स्वीकार केली. धरणाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा केला.

त्या नंतर काहीच दिवसांनी 2019-20 डिसेंबर-जानेवारी मध्ये गुजरातची भटकंती केली. सरदार सरोवरच्या काठावर बांधलेल्या नर्मदा टेंट सिटीत दोन दिवस राहून तिथला परिसर बघितला. त्या परिसरात झालेला विकास डोळ्यांनी स्पष्ट दिसत होता. तिसर्‍या दिवशी अहमदाबादकडे निघताना रस्त्यात आरोग्यवन पाहिले. त्यावेळी त्याचे उद्घाटन झालेले नव्हते. दुपारची वेळ होती. तिथे ग्रामीण महिला सेल्फ हेल्प ग्रुप एक भोजनशाळा, तिथे काम करणार्‍या कर्मचारी आणि आमच्या सारख्या चुकून आलेल्या पर्यटकांसाठी सोयीसाठी, चालवीत होत्या. भोजन शाळेत पांढर्‍या मक्याची ताजी पोळी, वांग्याची भाजी, गुजराती कढी आणि छाज हा मेनू होता. घरी जेवल्या सारखे वाटले. तिथल्या महिलांशी बोलताना कळले आंदोलनकार्‍यांनी त्यांना मूर्ख बनविण्या पलीकडे काही एक केले नाही. त्यांच्या उद्देश्य फक्त धरणाचे काम थांबविणे होता. आता स्थानिकांना कामाच्या शोधात अहमदाबाद, सूरत, मुंबई जाण्याची गरज नाही. शेतकरी आता भाजी-पाला आणि दुग्ध व्यवसाय ही करू लागले आहेत. दोन्ही ठिकाणी आज आंदोलनकारी लोकांना स्थानिक जनता जवळ ही उभे करणार नाही.

सरदार सरोवर प्रोजेक्ट्सची काही माहिती. कालवे इत्यादी पूर्ण झाल्यावर गुजरातमधील 15 जिल्ह्यांतील 45 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार. धरणातून उत्पन्न वीज निर्मितीचा लाभ महाराष्ट्र, गुजरात आणि मध्ये प्रदेशला मिळत आहे आणि राजस्थानला पाणी. या शिवाय राजस्थानमध्ये २.४६ लाख हेक्टर, महाराष्ट्रात ७३ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. पंजाब, हरियाणा, प. उत्तर प्रदेश प्रमाणे इथले शेतकरी ही समृद्ध होतील आणि त्याच सोबत शेतकर्‍यांवर निर्भर असलेला इतर समाज ही. गुजरातच्या गावांत राहणार्‍या कोट्यवधी लोकांचे जीवनस्तर उन्नत होणार. या धरणाने गेल्या काही वर्षांतच 16000 कोटीहून जास्त कमाई केली आहे. पुढील काही वर्षांत धरण निर्मितीचा खर्च भरून निघेल. या शिवाय उद्योग, पर्यटन वाढल्याने मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणारच.

धरणाची निर्मिती उशिराने झाल्याने सरदार सरोवर प्रोजेक्ट्सचा खर्च 6400 कोटींहून वाढून 50000 कोटींच्यावर गेला.वर्ल्ड बँकचे स्वस्त कर्ज ही मिळाले नाही. प्रोजेक्ट्स पूर्ण व्हायला 40 वर्षांहून अधिक काळ लागला. हे धरण जर 20 एक वर्षांपूर्वी पूर्ण झाले असते तर शेती सोबत उद्योगांचा विकास तेंव्हाच झाला असता. तो हिशोब केला तर काही लाख कोटींचे नुकसान निश्चित देशाला झाले. माननीय मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री नसते तर कदाचित आज ही हा प्रोजेक्ट पूर्ण झाला नसता.

मेट्रो प्रोजेक्ट्स मोठ्या प्रमाणात वायु प्रदूषण कमी करतात. वीस वर्षांपूर्वी दिल्लीत बस आणि ऑटोने प्रवास करणार्‍या प्रवासींच्या डोळ्यांना खाज सुटणे, पाणी निघणे, खोकला येणे, उलट्या होणे, श्वास घेण्यास त्रास होणे इत्यादि सामान्य बाबी होत्या. आज जवळपास 400 किमी हून जास्त मेट्रो नेटवर्क मुळे हवेच्या प्रदूषण मुळे प्रवासींना होणारे त्रास बर्‍यापैकी कमी झाले आहे. मेट्रो नसती तर आजच्या घटकेला दिल्लीच्या प्रदूषणाची कल्पना करणेच अशक्य होते. याशिवाय मेट्रोने कापलेल्या झाडांपेक्षा दहा पट जास्त झाडे जगवून दिल्लीत हिरवळ वाढीला ही मदत केली आहे. मुंबईत आरे कारशेडच्या विरोध ही पर्यावरणच्या नावाने केला. ज्यांनी विरोध केला त्यांच्या उद्देश्य मेट्रोचे कामात बाधा उत्पन्न करणे होता. आता मेट्रो प्रोजेक्ट उशिराने पूर्ण होणार आणि बजेट ही दहा हजार कोटींपेक्षा जास्त वाढणार. प्रवासींना ही रस्त्याचे प्रदूषित पर्यावरण ही जास्त काळ सहन करावे लागणार. दुसर्‍या शब्दांत पर्यावरणाच्या नावाने मेट्रोचा विरोध करण्याचा उद्देश्य जवळपास पूर्ण ही झाला. आरे कारशेडचा विरोध करणारे खर्‍या अर्थाने पर्यावरण विरोधी होते. असेच जनहित याचिका टाकून दिल्लीच्या नव्या मेट्रो-IV मार्गांत अनेक अडथळे निर्माण केले गेले. नुकताच मेट्रो-IV प्रोजेक्टस बाबत न्यायालयाने सकारात्मक निकाल दिला आहे. भूतपूर्व मुख्यमंत्री शीला दीक्षितच्या काळात सर्व मेट्रो प्रोजेक्टस वेळेच्या आधी पूर्ण झाले होते. पण आज दिल्ली सरकार ही काही न काही कारण काढून समस्या निर्मित करत आहे. या सर्व कारणांमुळे प्रोजेक्ट्स पूर्ण होण्यास अनेक वर्ष उशीर होणार आणि प्रोजेक्ट कॉस्ट ही हजारो कोटींनी वाढणार. पर्यावरणाची हानी ही होणार, हे वेगळे.

आज तथाकथित पर्यावरणवादी जनहित याचिकांच्या माध्यमाने, मीडियाच्या मदतीने, विकासाचे अनेक प्रोजेक्ट्स थांबवून/ लंबित करून देशाला लाखों कोटींचे नुकसान पोहचवत आहे. व्होट बँक राजनीति करण्यासाठी अनेक राजनेता ही यात पोळी भाजतात आणि त्या भागातील जनतेचे नुकसान करतात.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ग्रीन रिफायनरी कशी असते पटाईत काका?
तुम्ही "माहुल गाव" सर्च करून बघा जरा ... तिथल्या लोकांच्या मुलाखती ऐका.

विरोधासाठी विरोध करू नये हे मान्य आहे, पण म्हणून नियम धाब्यावर बसवलेले अडाणप्रोजेक्ट कसे काय स्वीकारणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

अस्वलराव,
असले त्रासदायक नियम कॅन्सल करण्याची सुरुवात होऊन काही वर्षे झाली.
गेल्या आठवड्यातील गम्मत ही वाचा.
https://www.hindustantimes.com/india-news/indias-environment-ministry-st...
शोधण्याचा अजून एक मार्ग बंद करणेत आला आहे.
RTI खाली ही माहिती मिळणे म्हणजे..
असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखात दिलेली उदाहरणे धरण प्रकल्प (टिहरी, सरदार सरोवर) आणि मेट्रो रेल्वे प्रकल्प अशी दिसत आहेत. ते प्रकल्प झाल्यावर प्रगती आणि लोकांचा फायदा झाला असे लेखकाचे मत आणि निरीक्षण दिसत आहे.

या पर्टीक्युलर प्रकल्पांत कोणते नियम धाब्यावर बसवले गेले होते का याची स्पेसिफिक माहिती उपयुक्त ठरेल. यापैकी किती प्रकल्प विद्यमान सरकारने सुरू केले आणि पूर्ण केले ते देखील महत्त्वाचे ठरेल. विरोधासाठी विरोध करू नये हे अगदी मान्य याला पूर्ण पाठिंबा.

बाकी माहुल किंवा अन्य जागी असलेले प्रदूषण इश्युज आभासी आहेत असे मुळीच नव्हे.

सरदार सरोवर, मेट्रो प्रकल्प यांना होणारा विरोध दीर्घकालीन फायदे आणि व्याप्ती पाहता योग्य होता / आहे का? विरोध पर्यावरणासाठी रास्त की जमीन धारकांचे पुनर्वसन अधिक त्वरेने व्हावे यासाठी जास्त.. वगैरे यावर मत अधिक relevant ठरावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रोजेक्टस जमीन संपादन, पर्यावरण आणि फॉरेस्ट क्लियरेन्स मिळाल्यानंतर सुरू होतात. अधिकान्श वेळा प्रोजेक्टचे कार्य 20 ते 25 टक्के झाल्यानंतर जनहित याचिका दाखल करून काम थांबविले जाते. (दिल्ली मेट्रो सहित अधिकान्श प्रोजेक्टस मध्ये हेच होते). प्रोजेक्टस उशिरा पूर्ण होतात. मुंबई मेट्रो याचे ज्वलंत उदाहरण आहे. बाकी राजनेता कोणत्याही पक्षाचे असो व्होट बँक राजनीति करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विद्यमान सत्ताधाऱ्यांसाठी विवेक पटाईतकाका हे आदर्श नागरिक आहेत.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एन्रॉन प्रकल्पाला भाजपाने केलेला विरोध राष्ट्रविरोधी होता की कसे ते पटाईत काकाच सांगू शकतील.

युती सरकार सत्तेत आल्यावर गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखालील कमिटीने प्रकल्प अरबी समुद्रात बुडवण्याच्या शिफारशीसाठी दिलेल्या अहवालातील उद्धृत......

The Sub-Committee is of the view that the real environmental issue is whether such a huge power project should be located in such an unpolluted part of Maharashtra and whether there is any other part of the State where it could have been located. Also whether a project of lesser size could help the preservation of the environment better was not gone into. It is evident from the environmental assessment that marine life and plants may have to face problems if adequate care is not taken.

जे दाभोळच्या बारक्याश्या वीज प्रकल्पाला लागू होते such a huge power project should be located in such an unpolluted part of Maharashtra ते रिफायनरीला लागू नाही का?

प्रकल्प व्हावा. पण त्याला (किंवा सरकारच्या कोणत्याही कृतीला) होणारा विरोध हा "देशद्रोह" म्हणून लेबलिंग करण्याची सध्याच्या सरकारची खोड फार वाईट आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एनरोन प्रोजेक्ट एक षडयंत्र होते. त्याकाळात कोळस्यावर आधारित वीज निर्मितीचे 2500 MW वीज केंद्राची लागत जास्तीस्जास्त 5000 कोटी आली असती. माझे अनेक मित्र त्याकाळी सेंट्रल electricity अथॉरिटी मध्ये होते. पण या प्रोजेक्टची लागत 35000 कोटीहून जास्त होती. त्यामुळे हा प्रोजेक्ट आर्थिक कारणाने व्यवहारीक नव्हता. त्याच कारणाने एनरोन प्रोजेक्ट सोडून पळून गेली. महाराष्ट्राला 70 हजार ते लाख कोटींचे नुकसान झाले. याहून अधिक टिप्पणी नाही. बारसू प्रोजेक्ट ही लागतच्या दृष्टीने अव्यवहारीक असेल तर त्याचा विरोध व्हायला पाहिजे. इतर करणांमुळे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विकास म्हणजे काय?
प्रोजेक्ट च खर्च विलंब झाला म्हणूनच वाढला?
की प्रतेक नेत्या पासून प्रतेक अधिकरण्याच्या दलाली मुळे वाढला.
हे पण स्पष्ट करा.
पर्यावरणाची हानी करून झालेला प्रोजेक्ट हा देशाचा फायदा करत नाही उलट खूप मोठे नुकसान करतो.
पर्यावरण ची हानी कागदी पैसे देवून भरून निघत नाही.
त्या मुळे पर्यावरण ची कमीत कमी हानी हेच तत्व हुशार देश ठेवतात.
जिथे पर्यटन वाढू शकते तिथे रासायनिक प्रोजेक्ट कशासाठी.
जिथे बागायती शेती आहे तिथे शेती वर आधारित च उद्योग आहेत.
धूर ओकणारे रासायनिक उद्योग नकोत.
सरकार जागा च चुकीची निवडते.
उद्योग चुकीचे निवडते.
राजस्थान मध्ये विशाल वाळवंट आहे तिथे सर्व रासायनिक उद्योग टाका ना.
पण हे शहरात ते उद्योग उभारणार.
बागायती शेती नष्ट करून तिथे भलतेच नुकसान करणारे उद्योग निवडणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जिथे दलाली असते तिथे प्रोजेक्टस लवकर होतात. गुरुग्राम आणि नोयेडा याचे उदाहरण आहे. तथाकथित पर्यावरण योद्धे जनहित याचिका टाकतात. . त्यांच्या उद्देश्य फक्त देशाला नुकसान पोहचविणे असते. मेट्रो प्रोजेक्टस शहरातून जातात. तिथे फारच कमी झाले कापली जातात. झाडे लावली नाही तरीही ते पर्‍यावरण सुधारण्यात मदत करतात. तरीही जनहित याचिका टाकून काम थांबवून पर्‍यावरणाचे नुकसान केले जाते. आरे कारशेडचे बघा. त्याचा विरोध झाला दहापटा जास्त झाडे लाऊन ही. दुसरी कडे संजय गांधी वनक्षेत्रांत गेल्या 40 वर्षांत जंगल तोड करून हजारो घरांची निर्मिती झाली. एका ही पर्‍यावरणवादी ने तो प्रश्न कधीच उचलून धरला नाही. कारण तुम्हीच सांगा. उद्योगपती कधीच चुकीची जागा निवडत नाही. तो सोयीची जागा निवडतो. आज राजस्थान मध्ये सर्वात जास्त सोलर विद्युत केंद्र उभारले जात आहे. कारण तिथे जास्त दिवस सूर्यचा उजेड असतो. जाम नगर रिफायनरी परिसरात आंब्याचा सर्वात मोठा फार्म आहे.. तिथले आंबे विदेशांत निर्यात होतात. बागायती शेती नष्ट झाली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

ह्या असल्या पोस्ट बुध्दी हिन अंध भक्त लोकांनाच पटत असतात.
इथे अंध भक्त नाहीत.
रिफायनरी म्हणजे प्रदूषण होणारच
ते पण दीर्घ काळ पृथ्वी च्या वातावरणावर परिणाम करणारे.
जे पुढे जीव घेणे होतेच होते.
रिफायनरी नी मुळे प्रदूषण होत नाही ह्या वर फक्त अंध भक्त च विश्वास ठेवतील.
कोणतेही fossile fule चे ज्वलन झाले की प्रदूषण होतेच.
ते न होण्या इतके तंत्र कोणाकडेच नाही.
इथे जास्त फेका फेकी करत जावू नका.
ऊर्जा गरज आहे हे खरे आहे.
पण कमी प्रदूषण करणाऱ्या ऊर्जा निर्मिती ची आपल्याला गरज आहे .
ह्या वर बोला

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पर्यावरण हित वादी देशभक्त नसतात असे तारे तोडणारे च खरे तर देशाचे दुष्मन असतात.
भावी पिढी ला स्वच्छ हवामान,शुध्द पाणी, सकस अन्न .
देणे ही खरी तर आताच्या पिढीची जबाबदारी आहे.
कागदी पैसे, धातू ची नानी ही सर्व मामाव निर्मित आहेत त्याची किंमत पर्यावरण समोर झीरो पण नाही minus madhye आहे.
पर्यावरण वाल्यांना त्याची जाणीव आहे.
विकास करा (विकास किती हवा आहे थांबा आता, खूप झाला विकास आता विकास मुळे अनर्थ होईल)
पण पर्यावरण ला बिलकुल हानी झाली नाही पाहिजे.
स्थानिक लोकांच्या संस्कृती वर आक्रमण नाही झाले पाहिजे.
एकाच ठिकाणी करोडो लोक जमली नाही पाहिजेत.
मुंबई सारखी शहर पण आता देशाची लोकसंख्या सांभाळण्यास असमर्थ ठरतील अशी अवस्था भारतात आहे.
थोडे तरी डोक वापरा स्वार्थ सोडा.
विकास ची विकृत व्याख्या बदला

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

,२० वे शतक आणि २१ वय शतकातील पूर्वार्ध .
ह्या काळात असलेली मानवी पिढी ह्यांचं कधी पुढे इतिहास लिहला जाईल तेव्हा ह्या काळाचा उल्लेख .
मानवी इतिहासात काळाकुट्ट काळ म्हणून उल्लेख केला जाईल.
नवीन शोध लागत गेले शारीरिक सुख मिळत गेले.
पण त्या साठी जी आपण ऊर्जा वापरत आहोत त्याचे परिणाम काय होतील ह्याचा बिलकुल विचार नाही केला.
जेव्हा श्वसन ना मधून घातक घटक शरीरात जावू लागले .
अन्न ,पाणी सर्व घातक घटकांचे परिणाम होवू लागले तरी शारीरिक सुखाची ओढ कायम राहिली.
आणि २१, व्यां शतकाचा उत्तरार्ध आणि २२, व्ह शतकाचे आगमन ह्या पिढीतील लोकांना अनेक समस्या निर्माण झाल्या
आरोग्य ची पूर्ण वाट लागलीच
पृथ्वीचे वातावरण जे सुसह्य आणि अतिशय सुखद होते त्याची वाट लागली.
त्याला जबाबदार
वरील २० आणि २१ मधील च मानवी पिढी च जबाबदार असेल.
ऊर्जा निर्मित करताना पृथ्वी चया वातावरण वर काय विपरीत परिणाम होत आहे .
अन्न आणि पाणी ह्यांच्या सोर्स वर काय विपरीत परिणाम होत आहे
निसर्गाचे पर्यावरण चक्र त्या विपरीत परिणाम वर काय उपाय करत आहे ..
त्या निसर्गाच्या क्षमतेचा अंत बिंदू काय आहे
ह्याचा अभ्यास आपण केलाच नाही
योग्य अभ्यास करून उपाय केलेच नाहीत..
आणि पुढील पिढी ला दूषित,गरम, जीव सृष्टी साठी बिलकुल लायक नसणारी पृथ्वी म्हणजे माणसाचे एकमेव घर .आपण त्यांना सपूर्त केले..
पुढची पिढी .
पूर्वजांचे सर्व पुतळे ,खुणा,त्यांनी निर्माण केलेल्या वास्तू , यंत्र,
सर्व नष्ट करून त्या वर विष्टा नक्कीच करणार आहेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पर्यावर्ण हा नवा वर्ण काढला आहे का ब्रह्मज्ञानी राज्यकर्त्यांनी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0