पॅजिनेशन कंट्रोल जो आहे, त्यात एका वेळेस एकच पान मागेपुढे जाता येण्याची व्यवस्था आहे. चारपाच पाने पुढेमागे किंवा थेट शेवटच्या पानावर किंवा मधल्या कोठल्यातरी पानावरून थेट पहिल्या पानावर जाण्याची सोय नाही. माझ्या मते वापरकर्त्याच्या दृष्टिकोनातून ही UI अगदी तद्दन निरुपयोगी जरी नाही म्हणता आली (म्हटले, तर सोय आहे, अशा अर्थाने), तरी टाकाऊ आहे.
सध्या सदस्यांनी लिहिेलेले धागे बघायचे तर aisiakshare.com/user/{user_id}/authored या लिंकेवरून बघता येतील. उदाहरणार्थ, नबांचे धागे इथे दिसतील - https://aisiakshare.com/user/399/authored
ही लिंक सदस्यांच्या प्रोफाईलला कशी जोडायची हे शोधत आहे. ते जमलं की इथेच उपप्रतिसाद देईन.
सर्व गोष्टी रुळावर यायला वेळ लागेल हे साहजिक आहे. तूर्त जे दिसतेय ते खाली नोंदवतो.
१. कॉमेंट बॉक्स आधी आणि सब्जेक्ट नंतर असे दिसते आहे. ते तसेच अपेक्षित असेल तर प्रॉब्लेम नाही.
२. दिवाळी अंकावर क्लिक केल्यावर पेज नॉट फाऊंड असे येते आहे.
३.ऐसी लोगो इमेज दिसत नाही. तिथे ब्रोकन आयकॉन दिसतो आहे.
प्रतिसादांचे टाईम स्टँप बदलत नाहीयेत. जे एकदा दिसत होते तेच दिसत राहत आहेत. उदा मी दिलेला प्रतिसाद जो त्या वेळी 2 sec ago असा दिसत होता तो आता पाऊण एक तासानेसुद्धा 2 sec ago असाच दिसतो आहे. इतर सर्व प्रतिसादांचे टाईम stamps पण जे प्रथम पाहताना दिसले तेच static आहेत.
doesnt always work. BTW, how the heck you are writing in Marathi? Am stuck with English and do not see the earlier option to change keyboard (used to be in lower left)
अनेक नवीन त्रुटी दिसून येत आहेत आणि त्या अधिक क्रिटिकल आहेत.
1. आपण धाग्यावर कॉमेंट दिल्यावर आधीच्या न दिसणाऱ्या कॉमेंट्स तर दिसत आहेत पण तोच धागा आणखी एकदा बोर्डावर ॲड होतो आहे. उदा. सागरतळ या सोत्रींच्या धाग्यावर एकही कॉमेंट दिसत नव्हती. मी नवीन कॉमेंट केली आणि आधीच्या दोन दिसू लागल्या + ही नवीन तिसरी. पण बोर्डावर परत गेल्यावर त्याच धाग्याची एक कॉपी दोन कॉमेंट्सवाली आणि दुसरी कॉपी त्याच्या खाली तीन कॉमेंट्सवाली असे डबल डबल दिसू लागले आहे.
आपण धाग्यावर कॉमेंट दिल्यावर आधीच्या न दिसणाऱ्या कॉमेंट्स तर दिसत आहेत पण तोच धागा आणखी एकदा बोर्डावर ॲड होतो आहे.
हे behavior थोडे erratic आहे.
उदाहरणादाखल, त्या सविताजी गोविलकरजींच्या धाग्यावर मी प्रतिसाद दिला, तर तो धागा दोनदा दिसू लागण्याऐवजी गायब झाला! (थँक गॉड!) कदाचित, धाग्याला माझा हात लागला, की तो गायब होतो, अशी काही जादू असावी काय?
उलटपक्षी, (कोठल्यातरी) पानाच्या शेवटी असलेले काही धागे, कोणीही नवीन प्रतिसाद न देतासुद्धा, पुढल्या पानावर सुरुवातीला पुन्हा दिसत आहेत. (परंतु, हे अशा सर्वच धाग्यांबाबत होते, असेही नाही.)
होमपेजवर पूर्वी दिसायचे त्यातले करोना विशेष सोडल्यास कोणतेच टॅब्स दिसत नाहीयेत.
उभ्या पट्टीवर दिनवैशिष्ट्यच्या विरुद्ध बाजूस, पूर्वीचे दिवाळी अंक हायपरलिंक होते. शिवाय पूर्वीचे विशेषांकदेखील. ते दिसत नाहीत.
पण ती वापरून कमेंट प्रसिद्ध केल्यावर बरोबर क्रमाने दिसते आहे.
परमेश्वराची कृपा आहे!
(हे असे म्हणता येण्याकरिता तरी जगास परमेश्वराची गरज आहे. नास्तिकांनी कृपया नोंद घ्यावी. उगाच ‘यदृच्छेची कृपा!’ वगैरे (ओढूनताणून) म्हणण्यात काय हशील आहे? यदृच्छा कधी कृपा करते काय? उगाच काहीतरी आपले! निघालेत यदृच्छेपुढे नारळ फोडायला!)
डावीकडे जिथे ऐसीअक्षरे असं निळ्या पार्श्वभूमीवर लिहून येतं आहे, त्याशेजारी रोमनमध्ये 'होम' या शब्दाचं फिकट निळं, पुसट भूत दिसतं आहे. त्या भुतावर क्लिकही करता येतं आहे. क्लिक केलं तर आपण (चकवा लागल्यासारखे) त्याच ठिकाणी येतो आहोत. उजवीकडील बाजूला व्यवस्थित जिवंत होमही आहे.
एखाद्या धाग्यावर प्रतिसाद दिला असता तो धागा वर येत नाही. समजा, मी फाइट मारून पंचवीसतीस पानांमागील एखादा धागा शोधून जरी काढला, आणि त्यावर प्रतिसाद दिला, तरीसुद्धा तो धागा वर येत नाही. मग त्या धाग्यावर कोणी नवीन प्रतिसाद दिला, हे लोकांना कसे कळणार?
(वर गविंनी एका प्रतिसादात ही त्रुटी अगोदरच नोंदविलेली आहे, हे नंतर लक्षात आले.)
हे अपग्रेड आत्ताच का, तर ऐसी ड्रूपाल ७वर होतं. त्यासाठी PHP 7.xच्या पुढचं काही चालत नव्हतं. ड्रूपाल ७चा सपोर्ट ५ जानेवारी २०२५ला संपत आहे. PHP 7.x जुनं झालं. (मला PHP अजिबात येत नाही.) त्यामुळे ऐसी नव्या ड्रूपालवर आणणं भाग होतं. त्यातही ड्रूपाल ७ ते ८ हा फरक खूप मोठा आहे. मला दिसतं ते म्हणजे डेटाबेसची रचना पूर्णतया बदलली आहे. (सुदैवानं डेटाबेसात डोकावून बघण्यासाठी आणि बदल करण्यासाठी मला SQL व्यवस्थित येतं.)
मधल्या काळात ड्रूपाल ८ आणि ९ येऊन बादही झाले. सध्या ड्रूपाल १० आणि ११ सुरू आहेत. आता ऐसी ड्रूपाल १०वर आहे.
ऐसी AWSवर नाही. हा तपशील महत्त्वाचा अशासाठी की आपल्याला हवं ते PHP आणि ड्रूपाल वापरत राहण्यासाठी स्वतंत्ररीत्या AWSवर असल्यास काय हवं ते करता येईल. तशी सोय सध्या आपल्याला नाही. तर सेवादात्यांनी PHP 7.x आणि/किंवा ड्रूपाल ७चं काही चालू देणार नाही, असं ठरवलं तर आणखी गोंधळ झाला असता. त्यामुळे सुरुवातीला मुख्य, महत्त्वाच्या गोष्टी नव्या ऐसीवर आणू आणि बाकीचं हळूहळू आणता येईल, असं ठरवलं. या सगळ्यांत ड्रूपाल आणि PHP अजिबातच येत नाहीत, ही मुख्य अडचण आहे. पण ते असो.
१. अपग्रेड करताना ड्रुपालचं मायग्रेशन स्क्रिप्ट जसंच्या तसं वापरता आलं नाही. सगळ्या प्रतिक्रिया इकडून तिकडे करायला ६ महिने लागले असते. (ही अतिशयोक्ती वाटेल, पण तसं नाही.) त्यामुळे सगळे धागे, सदस्यखाती आणि काही प्रतिक्रिया ड्रुपालचं मायग्रेशन मॉड्यूल वापरून हलवल्या. बहुसंख्य प्रतिसाद हलवण्यासाठी स्वतंत्र SQL script वापरलं. हे करताना कदाचित काही मजकूर गायब झाला असेल. तो शोधायचा प्रयत्न सुरू आहे. 'न'बांच्या नावानं काढलेला धागा मला ड्रूपाल ७च्या डेटाबेसात सहज मिळाला नाही. (शिवाय गेले दहाएक दिवस मी हेच काम करत असल्यामुळे लेखन म्हणून काय सुरू आहे, याकडेही माझं लक्ष नव्हतं.)
२. सध्या फक्त सर्व सदस्यखाती, धागे आणि प्रतिक्रिया नव्या ड्रूपालमध्ये आल्या आहेत. जे दुवे /node असे नव्हते, उदाहरणार्थ विशेषांकांची मुखपृष्ठं, अनुक्रमणिका, दिनवैशिष्ट्याची पानं, आणि काही views - सगळ्या प्रतिक्रिया, पॉप्युलर धागे वगैरे, हे आलेलं नाही. हे सगळं एकेक करून पुन्हा तयार करावं लागेल. आणि याला वेळ लागेल.
३. सध्या सगळं रंगरूप अगदी बेसिक आहे. ड्रूपालबरोबर जे आलं ते वापरलं आहे. तेही हळूहळू बदलेल. प्रतिक्रियांचा विषय खाली आणि मजकुराचा खोका वर असं का दिसतंय आणि ते बदलता येतं का, हे मी चटकन बघितलं, जमलं नाही.
४. Rich Text Format किंवा अक्षरं ठळक करणं, तिरपा ठसा वगैरे, यांची बटणं असणं गरजेचं आहे. धीरे धीरे मचल ए दिले बेकरार, कोई थक गयी हय ...
५. गमभनचं प्लगिन ऐसीवर चालवण्यासाठी ओंकार जोशी मदत करत आहे. तोही सध्या सुट्टीवर आहे, त्यामुळे त्यासाठी थोडा वेळ लागेल. मात्र त्याचे मनापासून आभार.
६. व्यनिंचा ब्याकप करण्यासाठी माझ्याकडे SQL/Python कोड तयार आहे. तो चालवायला मला वेळ लागणार नाही.
७. प्रतिसाद किती जुना आहे हे नवा प्रतिसाद येईस्तोवर धड समजत नाही. याचं कारण कदाचित नव्या ड्रूपालमध्ये ही आकडेमोड सतत करण्याजागी Pythonमध्ये FastAPI किंवा तत्सम काही असतं ते वापरत असावेत. म्हणजे थोडक्यात काय, तर नवी प्रतिक्रिया आली की प्रतिक्रियांच्या स्टॅटिस्टिक्सचं एक टेबल आहे - कुठल्या धाग्यावर किती प्रतिक्रिया, कुणाची शेवटी वगैरे - ते अपडेट होत असावं. हा माझा तर्क आहे. कोड वाचता येत नसल्यामुळे नक्की सांगू शकत नाही.
ही अशी रचना का केली असेल हे मला काहीसं समजतं; पण माझं आकलन अपूर्ण आहे. त्यामुळे ते मी नीट समजावून सांगू शकणार नाही. एक नक्की, कम्युनिटी वेबसाईट म्हणून ड्रूपालचा वापर खूप कमी असावा. कारण जवळजवळ २ लाख प्रतिक्रिया हलवण्यासाठी ६ महिने लागणारा कोड याचा अर्थ एवढ्या प्रतिक्रिया किंवा धागे असतील अशा विचारानं हा कोड लिहिलेला नाही.
--
तरीही ऐसीवर काय हवं, काय बदल अपेक्षित आहेत, हे नोंदवून ठेवा. सगळं काही करणं मला जमेल असं नाही. पण जमेल तितक्या गोष्टी लवकरात लवकर करण्याचा विचार आहे.
(दुर्दैवानं, आमच्याकडे रविवारी, ५ आणि ६ जानेवारीच्या मधल्या रात्री, मोसमात पहिल्यांदा शून्याच्या खाली तापमान जाणार आहे. त्यामुळे बाहेरची आवराआवरी करणं, आणि कढीलिंबाच्या ढीगभर पानांची वासलात लावणं अशी साटोपचंद्री कामंही माझ्या माथी आत्ताच आली आहेत.)
नवीन ड्रुपल बकवास आहे, ही तुमच्या नियंत्रणाबाहेरील गोष्ट आहे, हे समजू शकतो. तूर्तास फक्त
१. धाग्यावरील नवीन प्रतिसादांच्या संख्येचे बोर्डावर निदर्शन, आणि
२. नवीन प्रतिसादांचे धाग्यात निदर्शन
एवढ्या दोन गोष्टी जरी करता आल्या, तर संस्थळ किमान कामचलाऊ म्हणून वापरता येईल.
तेवढे जमल्यानंतर
३. प्रतिसादांचा वेगळा बोर्ड,
४. सदस्याच्या प्रोफाइलवर सदस्याचे पूर्वकर्तृत्व (सुरू केलेले/भाग घेतलेले धागे), तथा
५. सदस्याची प्रोफाइल शोधण्यासाठी काही मार्ग
एवढे जर केले, तर संस्थळ ८५-९०% वापरण्यायोग्य होईल.
सरतेशेवटी,
६. Who’s onlineमधील माहिती रियलटाइममध्ये अपडेट होताना दिसत नाही,
७. बोर्डावरील लेख (आणि/किंवा प्रतिसाद) यांची क्रमवारी (sort order) बदलण्याची कोणतीही तरतूद तूर्तास उपलब्ध नाही, तथा ८. पॅजिनेशन कंट्रोल हलाल पद्धतीने एकच पान मागेपुढे नेऊ शकतो(या अडचणीचे निवारण आता झालेले आहे. आभार.)
या अडचणींचे निवारण करता आल्यास ते केकावरचे आयसिंग१ ठरेल.
(आणि, हो, हे बोल्ड, आयटॅलिक्स, अंडरलाइन, सुपरस्क्रिप्ट, सब्सक्रिप्ट, इमेज टॅग वगैरेंसाठीचे एचटीएमएल टॅग हातांनी टाइप करावे लागण्याऐवजी, त्याकरिता बटणे उपलब्ध करून दिली असता आमची तळटीपांची तथा वेडीवाकडी चित्रे टाकण्याची सोय होईल. आणि, सर्वात महत्त्वाचे: हे मराठी संकेतस्थळ असल्याकारणाने, देवनागरीतून टंकण्याची काही सोय करून देणे आवश्यक आहे. अर्थात, आम्ही ९०%हून अधिक वेळा मोबाइलवरून, मोबाइलवरचा देवनागरी कळफलक वापरून टंकीत असल्याकारणाने, तूर्तास आमचे व्यक्तिशः फारसे बिघडत नाही; मात्र, विंडोज़ वापरणाऱ्यांचे अडू शकते.
अर्थात, या गोष्टी बहुधा बऱ्याच नंतर कराव्या लागतील, हे समजू शकतो.)
——————————
१ मराठीत: वरणभातावरचे तूप? (कारण शेवटी आम्ही, इ. इ.)
अ. नवीन प्रतिसाद किती ते बोर्डावर दिसत आहे. त्या क्रमांकावर क्लिक करून प्रत्यक्ष नवीन प्रतिसाद उघडत नाहीये तर फक्त धागाच उघडतो आहे.
ब. सर्व नवीन आलेले शोधून आणि वाचून पुन्हा बोर्डावर परत आलो आणि अगदी रिफ्रेश जरी केले तरी ती नवीन प्रतिसादसंख्या तशीच राहते आहे. म्हणजे बहुधा सेशन लेव्हलला काहीतरी स्टोअर होऊन पुसले जात नसावे. त्यामुळे एकदाच सुरुवातीला एकूण काहीतरी नवीन प्रतिसाद कुठेतरी आला आहे इतकीच बातमी कळणे इतके साध्य झाले आहे.
त्या संख्येवर क्लिक केल्यास पहिला नवीन प्रतिसाद अँकर होणे आवश्यक.

मी आताच तिथे एक नवा प्रतिसाद आलेला पाहिला. त्या १ आकड्यावर क्लिक करता मला https://aisiakshare.com/node/9187#new ही लिंक ओपन झाली. त्यात तुमचाच हा वरचा प्रतिसाद अँकर झालेला होता. तुम्हाला असं दिसत नाहीए का?
The number of new responses to a thread does not update in real time. So, having visited a thread does not reset that number immediately, and when the thread is opened again, immediately, using the number of new responses link, it leads to the topmost response (as noted by GaVi).
आता तसेही होताना दिसत नाही. एकदा नवीन प्रतिसादांची संख्या बोर्डावर दिसली. तेव्हा क्लिक केल्यावर पहिला नवीन प्रतिसाद बहुधा लिंक झाला, आता आठवत नाही. पण तेव्हापासून कितीदाही आणि कितीही वेळाने येऊन बघितले तरी बोर्डावर तीच संख्या नवीन प्रतिसाद म्हणून फिक्स आहे आणि आता तिच्यावर क्लिक केले की धाग्याच्या शीर्षभागी लिंक जाते. नवीन प्रतिसादावर नाही. याचा नवीन प्रतिसाद बघायला काहीच उपयोग होत नसून एकेक प्रतिसाद पुन्हा वाचणे हाच तूर्त एकमेव उपाय आहे.
एक धागा ज्याची प्रतिसाद खोली (थ्रेड डेप्थ) १ आहे, म्हणजे उपप्रतिसाद देता येत नाहीत, आणि तो फक्त सदस्यांनाच बघता येईल (उदा चावडी, संपादकीय धागे वगैरे असावेत तसे) असा काढला की तोच खरडफळा बनू शकेल का?
खरडफळा या संकल्पनेच्या रूढ रुपात लेटेस्ट पोस्ट सर्वात वर दिसते आणि सर्व पोस्ट एकाच रूट लेव्हलला दिसतात. यात कोणाला उत्तर देताना quote करण्याचा ऑप्शन वापरता येतो. पण नॉर्मल धाग्याप्रमाणे थ्रेडेड केल्यास एकाखाली एक प्रतिसाद येतील, नवीन विषयावर आलेल्या नवीन पोस्ट पुढील पानावर जातील.
..आणि एखाद्या लोकप्रिय टॉपिकवर थ्रेड वाढत जाऊन तो उभा अरुंद होत गेला की बाकीच्या नवीन पोस्ट दुर्लक्षित होतील. ख फ हा पब्लिकला येता जाता काहीही मिश्र, misc मजकूर खरडण्यासाठी फळा अशी अपेक्षा असल्याने थ्रेड जनरली त्यात ठेवत नाहीत.
या धाग्याची वाचनं आत्ता फार कमी दिसतील, कारण ते मॉड्यूल आत्ताच सुरू केलं. तीच बाब 'विंडोजवर मराठी टायपिंग'च्या धाग्याची. यापुढे सगळा डेटा योग्य ठिकाणी दिसेल अशी आशा आहे.
या हिशेबाने, उद्या Fucking (उच्चारी: ‘फूकिंग’. अधिक माहिती येथे आणि येथे.) हे गावाचे नाव, झालेच तर तज्जन्य Fucking Hell हे बियरचे नाव, अगदीच विचित्र आहे, असे म्हणाल!
Probably not. I have done that quite often recently.
However, the new Wysiwyg editor has been observed to freeze occasionally. Not sure what the method in the madness is, but I have seen it happen sometimes when I paste a block of text (not necessarily Unicode Devanagari) and then play around with it. When that happens, the only way out appears to be to forget about whatever you were trying to type, then refresh the page and start typing again.
Wysiwyg Editor टाकला, हे चांगले झाले, परंतु, त्यात स्वतंत्र एचटीएमएल टाकण्याची अथवा एचटीएमएल स्वरूपात एडिट करण्याची सोय नाही. काही अतिरिक्त एचटीएमएल टाकावेसे वाटले (उदा., रंगविण्यासाठी, वगैरे), तर अशक्य आहे.
(टीप: Wysiwygचे स्पेलिंग सुधारले. अगोदर चुकून Wysiwig असे पडले होते.)
आणि खरं एक राहिलंच - मुळात ह्या मराठी म्हणवणार्या संस्थळावर हि त्रुटी राहिलीच कशी? हे लांच्छनास्पद आहे. अशाने आपणच मराठीची मानहानी करतोय. वगैरे वगैरे :-P :-P
ते चॉयसेस बघून मी ट्राय करायचं धाडस नाही केलं! स्पॅनिश कदाचित चाललं असतं पण नकोच. कि-बोर्डची भाषा बदलून मी असा काही एकदा गोत्यात आलोय की त्यानंतर अगदी अखेरचा पर्याय म्हणूनच तो प्रकार करतो.
सगळ्या विशेषांकांची मुखपृष्ठं परत आणायला थोडा वेळ लागेल. तोवर उजव्या बाजूला वर 'विशेषांक' अशी लिंक आहे. तिथे सगळ्या विशेषांकांमधलं सगळं लेखन दिसेल. त्यात सगळ्या अंकांचे फिल्टरही आहेत. हवा तो निवडा, 'अप्लाय'वर क्लिक करा. त्या-त्या अंकातले धागे दिसतील.
विशिष्ट सदस्यांचं लेखन आणि त्यांनी दिलेले प्रतिसाद कसे दाखवायचे यासाठी मी इंटरनेट वाचून 'रीसर्च' करत आहे.
लॉग इन न करता मला ऐसीचं पान जास्त चांगलं दिसतं आहे. उदा० वरच्या बाजूला उजवीकडे लॉग इन करून मला काहीच दिसत नाही. पण लॉग न न करता दिवाळी अंक २०२४, विशेषांक वगैरे दुवे दिसतात. लॉग इन न करता मी दिवाळी २०२४ संपादकीय उघडलं, तर त्याशेजारी मला "माझे लेखन" अशी एक हायपरलिंक लागली जी एका कोऱ्या पानाकडे घेऊन गेली.
कदाचित मला मध्यंतरी दिवाळी अंकाच्या निमित्तानं ॲडमिन पावर दिली होती त्यामुळे केवळ मलाच अशा वेगवेगळ्या अडचणी येताहेत का?
नव्या रचनेचे पान फार मोकळे मोकळे दिसत आहे. पानावर एका वेळेस खूप कमी ओळी दिसतयात आणि मोकळी जागा फार आहे पानावर. धाग्यांवर दोन ओळीत फार जास्त अंतर आहे. एकंदर layout अधिक dense आवडेल. एका वेळीस स्क्रीनवर जास्त ओळी दिसल्या तर चांगले.
प्रतिसादांचा वेगळा बोर्ड झाला, हे चांगले झाले. फक्त, तो (chronological orderऐवजी) जर reverse chronological orderमध्ये करता आला, तर अधिक उपयुक्त ठरेल, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)
(प्रतिसादांचा बोर्ड रियलटाइममध्ये अपडेट होत नाही, ही वेगळी अडचण.)
जुन्या धाग्यांवरचे प्रतिसाद…
जुन्या धाग्यांवरचे प्रतिसाद दिसले नाहीत तर तिथे फक्त एक प्रतिसाद द्या. कुणीही प्रतिसाद दिल्यावर आधीचे प्रतिसाद दिसतील.
नवीन प्रतिसाद वेगळे असे…
नवीन प्रतिसाद वेगळे असे बोर्डावर दिसत नाहीयेत. एकूण प्रतिसादसंख्याच दिसते आहे.
बोर्डावरच कशाला…
…धाग्यावरसुद्धा, नवीन प्रतिसाद कोठले, नि जुने कोठले, हे जाणण्याची कोठलीच सुविधा उपलब्ध नाही.
चालायचेच.
पॅजिनेशन
पॅजिनेशन कंट्रोल जो आहे, त्यात एका वेळेस एकच पान मागेपुढे जाता येण्याची व्यवस्था आहे. चारपाच पाने पुढेमागे किंवा थेट शेवटच्या पानावर किंवा मधल्या कोठल्यातरी पानावरून थेट पहिल्या पानावर जाण्याची सोय नाही. माझ्या मते वापरकर्त्याच्या दृष्टिकोनातून ही UI अगदी तद्दन निरुपयोगी जरी नाही म्हणता आली (म्हटले, तर सोय आहे, अशा अर्थाने), तरी टाकाऊ आहे.
निरुपयोगी प्रोफाइल
सदस्याच्या प्रोफाइलवरून सदस्याच्या पूर्वीच्या उद्योगांकडे (जसे: सुरू केलेले/भाग घेतलेले धागे) जाण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध दिसत नाही.
काय उपयोग त्या प्रोफाइलचा?
सदस्य शोध?
किंबहुना, सदस्य (प्रोफाइल) शोधण्यासाठीही कोठलाच मार्ग उपलब्ध दिसत नाही. (चूभूद्याघ्या.)
खरडवही आणि व्य नि जाणे…
खरडवही आणि व्य नि जाणे अपेक्षित होते पण संपूर्ण खाते मेन्यूच दिसेनासा झाला आहे.
एस
त्या सगळ्या लिंका पुन्हा जागेवर कशा आणायच्या हे आता आधी शोधते. नाहीच तर नव्यानं तयार करते.
त्या सगळ्या लिंका पुन्हा…
त्या सगळ्या लिंका पुन्हा जागेवर कशा आणायच्या हे आता आधी शोधत्ये . नाहीच तर नव्यानं तयार करत्ये .
असं पाहिजे ना?. अपग्रेड नंतर हा बदल झालेला दिसतो. ;-))
सदस्यांनी लिहिलेले धागे
सध्या सदस्यांनी लिहिेलेले धागे बघायचे तर aisiakshare.com/user/{user_id}/authored या लिंकेवरून बघता येतील. उदाहरणार्थ, नबांचे धागे इथे दिसतील - https://aisiakshare.com/user/399/authored
ही लिंक सदस्यांच्या प्रोफाईलला कशी जोडायची हे शोधत आहे. ते जमलं की इथेच उपप्रतिसाद देईन.
काही धागे गायब?
काही जुने धागे गायब झाले आहेत काय?
उदाहरणादाखल, इतक्यात माझ्या नावावर चालू असलेला ‘दिनवैशिष्ट्यां’चा धागा कोठे दिसला नाही तो? (निदान पहिल्या चारपाच पानांत तरी दिसला नाही.)
एस. मी बहुतेक जुना स्नॅपशाॅट…
एस. मी बहुतेक जुना स्नॅपशाॅट वापरला. आता हातानं तो मजकूर इथे आणून सोडते.
पण…
…अलिकडचे इतर बहुतांश धागे तर दिसत आहेत. जुना स्नॅपशॉट हे कारण नसावे. There must be some other method to the madness.
काही नोंदी
सर्व गोष्टी रुळावर यायला वेळ लागेल हे साहजिक आहे. तूर्त जे दिसतेय ते खाली नोंदवतो.
१. कॉमेंट बॉक्स आधी आणि सब्जेक्ट नंतर असे दिसते आहे. ते तसेच अपेक्षित असेल तर प्रॉब्लेम नाही.
२. दिवाळी अंकावर क्लिक केल्यावर पेज नॉट फाऊंड असे येते आहे.
३.ऐसी लोगो इमेज दिसत नाही. तिथे ब्रोकन आयकॉन दिसतो आहे.
प्रतिसादांचे टाईम स्टँप बदलत…
प्रतिसादांचे टाईम स्टँप बदलत नाहीयेत. जे एकदा दिसत होते तेच दिसत राहत आहेत. उदा मी दिलेला प्रतिसाद जो त्या वेळी 2 sec ago असा दिसत होता तो आता पाऊण एक तासानेसुद्धा 2 sec ago असाच दिसतो आहे. इतर सर्व प्रतिसादांचे टाईम stamps पण जे प्रथम पाहताना दिसले तेच static आहेत.
ता क आपण नवीन प्रतिसाद दिला…
ता क
आपण नवीन प्रतिसाद दिला की मात्र हे स्टँपस् अपडेट होत आहेत असे वाटते.
doesnt always work. BTW, how…
doesnt always work. BTW, how the heck you are writing in Marathi? Am stuck with English and do not see the earlier option to change keyboard (used to be in lower left)
मोबाइल वापरा!
आयफोन/अँड्रॉइडवरील देवनागरी कळफलक वापरून लिहिता यावे.
विंडोज़वर तूर्तास याकरिता सोपी अशी एखादी सोय अस्तित्वात असल्याबद्दल ठाऊक नाही.
विंडोजवर मराठीत टायपिंग
सध्यापुरते हे पाहा : विंडोजवर मराठीत टायपिंग कसे करावे?
होय पाहीलं. अद्ययावत सूचना…
होय पाहीलं. अद्ययावत सूचना पोस्टल्या तिथे. पण केलं नाहीये - माझी पोस्ट पहा, ईथे परत साधुवाण्याची कथा देत नाही.
Who's online
Who's onlineमध्ये बाबा आदमच्या जमान्यात उपस्थित असलेल्या सदस्यांची यादी दिसत आहे.
अनेक नवीन त्रुटी दिसून येत…
अनेक नवीन त्रुटी दिसून येत आहेत आणि त्या अधिक क्रिटिकल आहेत.
1. आपण धाग्यावर कॉमेंट दिल्यावर आधीच्या न दिसणाऱ्या कॉमेंट्स तर दिसत आहेत पण तोच धागा आणखी एकदा बोर्डावर ॲड होतो आहे. उदा. सागरतळ या सोत्रींच्या धाग्यावर एकही कॉमेंट दिसत नव्हती. मी नवीन कॉमेंट केली आणि आधीच्या दोन दिसू लागल्या + ही नवीन तिसरी. पण बोर्डावर परत गेल्यावर त्याच धाग्याची एक कॉपी दोन कॉमेंट्सवाली आणि दुसरी कॉपी त्याच्या खाली तीन कॉमेंट्सवाली असे डबल डबल दिसू लागले आहे.
2. नवीन कॉमेंट दिली तरी धागा वर येत नाही.
…
हे behavior थोडे erratic आहे.
उदाहरणादाखल, त्या सविताजी गोविलकरजींच्या धाग्यावर मी प्रतिसाद दिला, तर तो धागा दोनदा दिसू लागण्याऐवजी गायब झाला! (थँक गॉड!) कदाचित, धाग्याला माझा हात लागला, की तो गायब होतो, अशी काही जादू असावी काय?
उलटपक्षी, (कोठल्यातरी) पानाच्या शेवटी असलेले काही धागे, कोणीही नवीन प्रतिसाद न देतासुद्धा, पुढल्या पानावर सुरुवातीला पुन्हा दिसत आहेत. (परंतु, हे अशा सर्वच धाग्यांबाबत होते, असेही नाही.)
…
परंतु, असे म्हणावे, तर, ‘संस्थळाच्या अपग्रेडबद्दल.’ या धाग्यावर मी नवीन प्रतिसाद दिला असता, तो धागा गायब न होता दोनदोनदा दिसू लागला. Consistency नाही!
सदरा
धाग्याच्या सदरानुसार वेगवेगळी ट्रीटमेंट?
(हा सदरा त्या सदरात पडला.)?
हम्म्म्म्…
तसे असू शकेल.
अपडेट
सविताजी गोविलकरजींचा धागा आता पुन्हा (आणि दोनदोनदा!) दिसू लागला आहे.
‘ऐसी’ व्यवस्थापन दुष्ट आहे!
.
होमपेजवर पूर्वी दिसायचे त्यातले करोना विशेष सोडल्यास कोणतेच टॅब्स दिसत नाहीयेत.
उभ्या पट्टीवर दिनवैशिष्ट्यच्या विरुद्ध बाजूस, पूर्वीचे दिवाळी अंक हायपरलिंक होते. शिवाय पूर्वीचे विशेषांकदेखील. ते दिसत नाहीत.
सब्जेक्ट लिहायची खिडकी मुख्य मजकुराच्या खाली आली आहे.
पण ती वापरून कमेंट प्रसिद्ध केल्यावर बरोबर क्रमाने दिसते आहे.
!
परमेश्वराची कृपा आहे!
(हे असे म्हणता येण्याकरिता तरी जगास परमेश्वराची गरज आहे. नास्तिकांनी कृपया नोंद घ्यावी. उगाच ‘यदृच्छेची कृपा!’ वगैरे (ओढूनताणून) म्हणण्यात काय हशील आहे? यदृच्छा कधी कृपा करते काय? उगाच काहीतरी आपले! निघालेत यदृच्छेपुढे नारळ फोडायला!)
होमभूत
डावीकडे जिथे ऐसीअक्षरे असं निळ्या पार्श्वभूमीवर लिहून येतं आहे, त्याशेजारी रोमनमध्ये 'होम' या शब्दाचं फिकट निळं, पुसट भूत दिसतं आहे. त्या भुतावर क्लिकही करता येतं आहे. क्लिक केलं तर आपण (चकवा लागल्यासारखे) त्याच ठिकाणी येतो आहोत. उजवीकडील बाजूला व्यवस्थित जिवंत होमही आहे.
फलाट?
हे कोठल्या फलाटावर होत आहे?
आयफोनवर असे होताना दिसले नाही.
लॅपटॉप+फायरफॉक्स
फोनवरून दिसत नाही पण लॅपटॉप+फायरफॉक्स या कॉम्बिनेशनमध्ये दिसतं आहे.
अपग्रेडेड ऐसी फोनवरून अधिक चांगलं दिसत आहे.
मला अँड्रॉईड, लिनक्स आणि…
मला अँड्रॉईड, लिनक्स आणि आयफोन तिन्हींवरून भूत दिसत आहे. ती बहुतेक लोगो लावण्याची जागा आहे.
तळागाळातील धाग्यांच्या (जीर्ण)उद्धाराबाबत
एखाद्या धाग्यावर प्रतिसाद दिला असता तो धागा वर येत नाही. समजा, मी फाइट मारून पंचवीसतीस पानांमागील एखादा धागा शोधून जरी काढला, आणि त्यावर प्रतिसाद दिला, तरीसुद्धा तो धागा वर येत नाही. मग त्या धाग्यावर कोणी नवीन प्रतिसाद दिला, हे लोकांना कसे कळणार?
(वर गविंनी एका प्रतिसादात ही त्रुटी अगोदरच नोंदविलेली आहे, हे नंतर लक्षात आले.)
प्रकाशनाची वेळ
यादीमध्ये प्रकाशनाची/अखेरच्या प्रतिसादाची वेळ दिसत नाही. झालेच तर, sort order बदलता येण्याची सोय नाही.
विशेषांकाच्या लिंका
आमच्या सदस्यनामाशी नामसाधर्म्य असलेल्या विशेषांकाची लिंक (व इतरही विशेषांकाच्या लिंका) गायब झाली आहे.
काही तपशील
हे अपग्रेड आत्ताच का, तर ऐसी ड्रूपाल ७वर होतं. त्यासाठी PHP 7.xच्या पुढचं काही चालत नव्हतं. ड्रूपाल ७चा सपोर्ट ५ जानेवारी २०२५ला संपत आहे. PHP 7.x जुनं झालं. (मला PHP अजिबात येत नाही.) त्यामुळे ऐसी नव्या ड्रूपालवर आणणं भाग होतं. त्यातही ड्रूपाल ७ ते ८ हा फरक खूप मोठा आहे. मला दिसतं ते म्हणजे डेटाबेसची रचना पूर्णतया बदलली आहे. (सुदैवानं डेटाबेसात डोकावून बघण्यासाठी आणि बदल करण्यासाठी मला SQL व्यवस्थित येतं.)
मधल्या काळात ड्रूपाल ८ आणि ९ येऊन बादही झाले. सध्या ड्रूपाल १० आणि ११ सुरू आहेत. आता ऐसी ड्रूपाल १०वर आहे.
ऐसी AWSवर नाही. हा तपशील महत्त्वाचा अशासाठी की आपल्याला हवं ते PHP आणि ड्रूपाल वापरत राहण्यासाठी स्वतंत्ररीत्या AWSवर असल्यास काय हवं ते करता येईल. तशी सोय सध्या आपल्याला नाही. तर सेवादात्यांनी PHP 7.x आणि/किंवा ड्रूपाल ७चं काही चालू देणार नाही, असं ठरवलं तर आणखी गोंधळ झाला असता. त्यामुळे सुरुवातीला मुख्य, महत्त्वाच्या गोष्टी नव्या ऐसीवर आणू आणि बाकीचं हळूहळू आणता येईल, असं ठरवलं. या सगळ्यांत ड्रूपाल आणि PHP अजिबातच येत नाहीत, ही मुख्य अडचण आहे. पण ते असो.
१. अपग्रेड करताना ड्रुपालचं मायग्रेशन स्क्रिप्ट जसंच्या तसं वापरता आलं नाही. सगळ्या प्रतिक्रिया इकडून तिकडे करायला ६ महिने लागले असते. (ही अतिशयोक्ती वाटेल, पण तसं नाही.) त्यामुळे सगळे धागे, सदस्यखाती आणि काही प्रतिक्रिया ड्रुपालचं मायग्रेशन मॉड्यूल वापरून हलवल्या. बहुसंख्य प्रतिसाद हलवण्यासाठी स्वतंत्र SQL script वापरलं. हे करताना कदाचित काही मजकूर गायब झाला असेल. तो शोधायचा प्रयत्न सुरू आहे. 'न'बांच्या नावानं काढलेला धागा मला ड्रूपाल ७च्या डेटाबेसात सहज मिळाला नाही. (शिवाय गेले दहाएक दिवस मी हेच काम करत असल्यामुळे लेखन म्हणून काय सुरू आहे, याकडेही माझं लक्ष नव्हतं.)
२. सध्या फक्त सर्व सदस्यखाती, धागे आणि प्रतिक्रिया नव्या ड्रूपालमध्ये आल्या आहेत. जे दुवे /node असे नव्हते, उदाहरणार्थ विशेषांकांची मुखपृष्ठं, अनुक्रमणिका, दिनवैशिष्ट्याची पानं, आणि काही views - सगळ्या प्रतिक्रिया, पॉप्युलर धागे वगैरे, हे आलेलं नाही. हे सगळं एकेक करून पुन्हा तयार करावं लागेल. आणि याला वेळ लागेल.
३. सध्या सगळं रंगरूप अगदी बेसिक आहे. ड्रूपालबरोबर जे आलं ते वापरलं आहे. तेही हळूहळू बदलेल. प्रतिक्रियांचा विषय खाली आणि मजकुराचा खोका वर असं का दिसतंय आणि ते बदलता येतं का, हे मी चटकन बघितलं, जमलं नाही.
४. Rich Text Format किंवा अक्षरं ठळक करणं, तिरपा ठसा वगैरे, यांची बटणं असणं गरजेचं आहे. धीरे धीरे मचल ए दिले बेकरार, कोई थक गयी हय ...
५. गमभनचं प्लगिन ऐसीवर चालवण्यासाठी ओंकार जोशी मदत करत आहे. तोही सध्या सुट्टीवर आहे, त्यामुळे त्यासाठी थोडा वेळ लागेल. मात्र त्याचे मनापासून आभार.
६. व्यनिंचा ब्याकप करण्यासाठी माझ्याकडे SQL/Python कोड तयार आहे. तो चालवायला मला वेळ लागणार नाही.
७. प्रतिसाद किती जुना आहे हे नवा प्रतिसाद येईस्तोवर धड समजत नाही. याचं कारण कदाचित नव्या ड्रूपालमध्ये ही आकडेमोड सतत करण्याजागी Pythonमध्ये FastAPI किंवा तत्सम काही असतं ते वापरत असावेत. म्हणजे थोडक्यात काय, तर नवी प्रतिक्रिया आली की प्रतिक्रियांच्या स्टॅटिस्टिक्सचं एक टेबल आहे - कुठल्या धाग्यावर किती प्रतिक्रिया, कुणाची शेवटी वगैरे - ते अपडेट होत असावं. हा माझा तर्क आहे. कोड वाचता येत नसल्यामुळे नक्की सांगू शकत नाही.
ही अशी रचना का केली असेल हे मला काहीसं समजतं; पण माझं आकलन अपूर्ण आहे. त्यामुळे ते मी नीट समजावून सांगू शकणार नाही. एक नक्की, कम्युनिटी वेबसाईट म्हणून ड्रूपालचा वापर खूप कमी असावा. कारण जवळजवळ २ लाख प्रतिक्रिया हलवण्यासाठी ६ महिने लागणारा कोड याचा अर्थ एवढ्या प्रतिक्रिया किंवा धागे असतील अशा विचारानं हा कोड लिहिलेला नाही.
--
तरीही ऐसीवर काय हवं, काय बदल अपेक्षित आहेत, हे नोंदवून ठेवा. सगळं काही करणं मला जमेल असं नाही. पण जमेल तितक्या गोष्टी लवकरात लवकर करण्याचा विचार आहे.
(दुर्दैवानं, आमच्याकडे रविवारी, ५ आणि ६ जानेवारीच्या मधल्या रात्री, मोसमात पहिल्यांदा शून्याच्या खाली तापमान जाणार आहे. त्यामुळे बाहेरची आवराआवरी करणं, आणि कढीलिंबाच्या ढीगभर पानांची वासलात लावणं अशी साटोपचंद्री कामंही माझ्या माथी आत्ताच आली आहेत.)
एकेक करून जमेल तसे इतके मोठे…
एकेक करून जमेल तसे इतके मोठे काम करत आहात याबद्दल कौतुक. काही बदल ऑलरेडी केलेले दिसत आहेत (पेजेस पुढे सरकवण्यासाठी अधिक ऑप्शन्स, डबल धागे गायब वगैरे)
.
डबल धागे उडालेले नाहीत; फक्त काही पाने पुढे ढकलले गेले आहेत.
पॅजिनेशन कंट्रोल मात्र आता सुधारला आहे. अभिनंदन.
ठीक
नवीन ड्रुपल बकवास आहे, ही तुमच्या नियंत्रणाबाहेरील गोष्ट आहे, हे समजू शकतो. तूर्तास फक्त
१. धाग्यावरील नवीन प्रतिसादांच्या संख्येचे बोर्डावर निदर्शन, आणि
२. नवीन प्रतिसादांचे धाग्यात निदर्शन
एवढ्या दोन गोष्टी जरी करता आल्या, तर संस्थळ किमान कामचलाऊ म्हणून वापरता येईल.
तेवढे जमल्यानंतर
३. प्रतिसादांचा वेगळा बोर्ड,
४. सदस्याच्या प्रोफाइलवर सदस्याचे पूर्वकर्तृत्व (सुरू केलेले/भाग घेतलेले धागे), तथा
५. सदस्याची प्रोफाइल शोधण्यासाठी काही मार्ग
एवढे जर केले, तर संस्थळ ८५-९०% वापरण्यायोग्य होईल.
सरतेशेवटी,
६. Who’s onlineमधील माहिती रियलटाइममध्ये अपडेट होताना दिसत नाही,
७. बोर्डावरील लेख (आणि/किंवा प्रतिसाद) यांची क्रमवारी (sort order) बदलण्याची कोणतीही तरतूद तूर्तास उपलब्ध नाही, तथा
८. पॅजिनेशन कंट्रोल हलाल पद्धतीने एकच पान मागेपुढे नेऊ शकतो(या अडचणीचे निवारण आता झालेले आहे. आभार.)या अडचणींचे निवारण करता आल्यास ते केकावरचे आयसिंग१ ठरेल.
(आणि, हो, हे बोल्ड, आयटॅलिक्स, अंडरलाइन, सुपरस्क्रिप्ट, सब्सक्रिप्ट, इमेज टॅग वगैरेंसाठीचे एचटीएमएल टॅग हातांनी टाइप करावे लागण्याऐवजी, त्याकरिता बटणे उपलब्ध करून दिली असता आमची तळटीपांची तथा वेडीवाकडी चित्रे टाकण्याची सोय होईल. आणि, सर्वात महत्त्वाचे: हे मराठी संकेतस्थळ असल्याकारणाने, देवनागरीतून टंकण्याची काही सोय करून देणे आवश्यक आहे. अर्थात, आम्ही ९०%हून अधिक वेळा मोबाइलवरून, मोबाइलवरचा देवनागरी कळफलक वापरून टंकीत असल्याकारणाने, तूर्तास आमचे व्यक्तिशः फारसे बिघडत नाही; मात्र, विंडोज़ वापरणाऱ्यांचे अडू शकते.
अर्थात, या गोष्टी बहुधा बऱ्याच नंतर कराव्या लागतील, हे समजू शकतो.)
——————————
१ मराठीत: वरणभातावरचे तूप? (कारण शेवटी आम्ही, इ. इ.)
परफेक्ट अग्रक्रम. हेच…
परफेक्ट अग्रक्रम. हेच म्हणणार होतो. नवीन प्रतिसाद कळणे आणि धागा वर येणे इतके झाले तरी सर्वात बेसिक उपयोग सुरू होईल.
१. धाग्यावरील नवीन…
या दोन गोष्टी देण्याचा प्रयत्न केला आहे. जमलंय का ते सांगा.
अ. नवीन प्रतिसाद किती ते…
अ. नवीन प्रतिसाद किती ते बोर्डावर दिसत आहे. त्या क्रमांकावर क्लिक करून प्रत्यक्ष नवीन प्रतिसाद उघडत नाहीये तर फक्त धागाच उघडतो आहे.
ब. सर्व नवीन आलेले शोधून आणि वाचून पुन्हा बोर्डावर परत आलो आणि अगदी रिफ्रेश जरी केले तरी ती नवीन प्रतिसादसंख्या तशीच राहते आहे. म्हणजे बहुधा सेशन लेव्हलला काहीतरी स्टोअर होऊन पुसले जात नसावे. त्यामुळे एकदाच सुरुवातीला एकूण काहीतरी नवीन प्रतिसाद कुठेतरी आला आहे इतकीच बातमी कळणे इतके साध्य झाले आहे.
त्या संख्येवर क्लिक केल्यास पहिला नवीन प्रतिसाद अँकर होणे आवश्यक.
आं?
मी आताच तिथे एक नवा प्रतिसाद आलेला पाहिला. त्या १ आकड्यावर क्लिक करता मला https://aisiakshare.com/node/9187#new ही लिंक ओपन झाली. त्यात तुमचाच हा वरचा प्रतिसाद अँकर झालेला होता. तुम्हाला असं दिसत नाहीए का?
आता बरोबर अँकर झाला. …
आता बरोबर अँकर झाला. धन्यवाद. तो मुद्दा सॉल्व झालेला दिसतो.
Works the first time...
It seems to work the first time. It does not appear to reset immediately, though. (E&OE.)
प्रयत्न
हे दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. नीट चालते का पाहा.
Does not update in real time
The number of new responses to a thread does not update in real time. So, having visited a thread does not reset that number immediately, and when the thread is opened again, immediately, using the number of new responses link, it leads to the topmost response (as noted by GaVi).
आता तसेही होताना दिसत नाही. …
आता तसेही होताना दिसत नाही. एकदा नवीन प्रतिसादांची संख्या बोर्डावर दिसली. तेव्हा क्लिक केल्यावर पहिला नवीन प्रतिसाद बहुधा लिंक झाला, आता आठवत नाही. पण तेव्हापासून कितीदाही आणि कितीही वेळाने येऊन बघितले तरी बोर्डावर तीच संख्या नवीन प्रतिसाद म्हणून फिक्स आहे आणि आता तिच्यावर क्लिक केले की धाग्याच्या शीर्षभागी लिंक जाते. नवीन प्रतिसादावर नाही. याचा नवीन प्रतिसाद बघायला काहीच उपयोग होत नसून एकेक प्रतिसाद पुन्हा वाचणे हाच तूर्त एकमेव उपाय आहे.
एक धागा ज्याची प्रतिसाद खोली…
एक धागा ज्याची प्रतिसाद खोली (थ्रेड डेप्थ) १ आहे, म्हणजे उपप्रतिसाद देता येत नाहीत, आणि तो फक्त सदस्यांनाच बघता येईल (उदा चावडी, संपादकीय धागे वगैरे असावेत तसे) असा काढला की तोच खरडफळा बनू शकेल का?
मुळात नवीन व्हर्जनमध्ये तसा काढता येईल का ?
If at all this is possible...
Why should the thread depth be restricted to 1?
ख फ वर उप प्रतिसाद केले तर…
ख फ वर उप प्रतिसाद केले तर उभे होत जातील
?
समजा थ्रेडेड आले, तर काय बिघडते?
खरडफळा या संकल्पनेच्या रूढ…
खरडफळा या संकल्पनेच्या रूढ रुपात लेटेस्ट पोस्ट सर्वात वर दिसते आणि सर्व पोस्ट एकाच रूट लेव्हलला दिसतात. यात कोणाला उत्तर देताना quote करण्याचा ऑप्शन वापरता येतो. पण नॉर्मल धाग्याप्रमाणे थ्रेडेड केल्यास एकाखाली एक प्रतिसाद येतील, नवीन विषयावर आलेल्या नवीन पोस्ट पुढील पानावर जातील.
..आणि एखाद्या लोकप्रिय टॉपिकवर थ्रेड वाढत जाऊन तो उभा अरुंद होत गेला की बाकीच्या नवीन पोस्ट दुर्लक्षित होतील. ख फ हा पब्लिकला येता जाता काहीही मिश्र, misc मजकूर खरडण्यासाठी फळा अशी अपेक्षा असल्याने थ्रेड जनरली त्यात ठेवत नाहीत.
.
देवदत्तचे धागे
गायब आहेतवर आणले.या धाग्याची वाचनं आत्ता फार…
या धाग्याची वाचनं आत्ता फार कमी दिसतील, कारण ते मॉड्यूल आत्ताच सुरू केलं. तीच बाब 'विंडोजवर मराठी टायपिंग'च्या धाग्याची. यापुढे सगळा डेटा योग्य ठिकाणी दिसेल अशी आशा आहे.
वाचनसंख्या?
कोठे दिसते?
हो, लफडं हय!
मला ऐसीच्या आयडीनं दिसत्ये, पण माझ्या अदिती आयडीनं दिसत नाहीये. हे आत्ता लक्षात आलं. ते सगळ्यांना कसं दाखवता येईल ते पाहत आहे.
अरे वाह! सब्जेक्ट खिडकी वर आली! ब्राव्हो!
.
पुन्हा, परमेश्वराची कृपा!
– (नास्तिक परमेश्वर) 'न'वी बाजू.
(No subject)
पण आता खालची कमेंट दिसत नाहीये!!
?
मला असे काहीही होत नाहीये.
विषय
प्रतिसाद.
हो. सब्जेक्ट विंडो आता प्रतिसाद बॉक्सच्या वर आली.
याहीपेक्षा सोईचं म्हणजे ती…
याहीपेक्षा सोईचं म्हणजे ती भरायचे कष्ट घावे लागत नाहीयेत - कॉमेंट फिल्डमधेल पहीले काही शब्द आपोआप सब्जेक्ट फिल्डमधे भरले जातायत - भई व्वा!!
आता मी लॅपटॉपवर आहे
मागच्या विषयाच्या खालची कमेंट दिसत नाहीये. :(
मागच्या विषयाच्या खालची कमेंट दिसत नाहीये. माझी कमेंट करण्याची पावर फोन आणि लॅपटॉप दोन्हींवरून गेलेली आहे.
क्रोम
.
माझे लेख मला दिसत/ संपादित करता येत नाहीयेत
नमस्कार
My account मध्ये गेल्यावर पूर्वी जी आपण लिहिलेल्या लेखांची लिस्ट/ लिंक दिसायच्या त्या आता दिसत नाहीयेय.
धन्यवाद!
फारच विस्कळीत दिसतय. ओळीं…
फारच विस्कळीत दिसतय. ओळीं मधील अंतर (Spacing) जास्त झाले आहे ?
काहींच समजत नाही.
सगळीच गडबड आहे
धीर धरा
सर्व (बोले तो, जितपत शक्य आहे, तितके सर्व) सुरळीत व्हायला थोडा (बराच?) वेळ लागणार आहे, असे दिसते एकंदरीत.
(या संदर्भात व्यवस्थापनाच्या हातात फार काही असावे, असे वाटत नाही. नवीन ड्रुपल भिकार आहे, त्याला कोण काय करणार?)
थोडा धीर धरा. हेही दिवस जातील.
(Guess who’s talking!)
माय अकाउंट दिसत नाही. हा…
माय अकाउंट दिसत नाही.
हा प्रतिसाद आधी आला असेल तर रद्द समजा.
१२३ चेक
...
'माइक टेस्टिंग माइक टेस्टिंग' असे म्हणण्याची प्रथा सामान्यतः आहे.
(मराठी ना तुम्ही?)
कोण माईक?
टेस्टिंग हे आडनाव अगदीच विचित्र आहे. हा इसम विल हंटिंगचा लांबचा नातेवाईक असणार.
(ठळक ठसा करायचं काही कारण नाही. बटण चालतंय का ते बघत होते.)
विचित्र?
या हिशेबाने, उद्या Fucking (उच्चारी: ‘फूकिंग’. अधिक माहिती येथे आणि येथे.) हे गावाचे नाव, झालेच तर तज्जन्य Fucking Hell हे बियरचे नाव, अगदीच विचित्र आहे, असे म्हणाल!
(हो, तुमचा काय भरवसा?)
शनिवार आहे.
शनिवार मारुतीचा दिवस असतो. तसंही आठवड्यातल्या कुठल्याही दिवशी बियरला कुठलाही भाव देणं आमच्यात समाजमान्य नाही! ;-)
Instead of making wisecracks...
Why don't you help me?
Yay!
The comment works now. Was copy-pasted unicode Devnagri the problem?
आता हे दिसतंय का ते बघूया.
आता हे दिसतंय का ते बघूया.
Was copy-pasted unicode…
Probably not. I have done that quite often recently.
However, the new Wysiwyg editor has been observed to freeze occasionally. Not sure what the method in the madness is, but I have seen it happen sometimes when I paste a block of text (not necessarily Unicode Devanagari) and then play around with it. When that happens, the only way out appears to be to forget about whatever you were trying to type, then refresh the page and start typing again.
Hope that helps.
?
What am I supposed to do?
——————————
What am I supposed to do?
What am I supposed to do?
What am I supposed to do?
——————————
I, therefore, do that which I usually do best. Which is, to make wisecracks.
——————————
In any case, what is it that I am supposed to help you with?
प्रतिसाद दिसत नाहीत
प्रतिसाद दिसत नाहीत
नवीन प्रतिसाद
जर कुठल्याही जुन्या धाग्यावरचे प्रतिसाद दिसत नसतील तर तिथे नवीन प्रतिक्रिया लिहा. सगळ्यांनाच जुन्या प्रतिक्रिया दिसायला लागतील.
Wysiwyg Editor
Wysiwyg Editor टाकला, हे चांगले झाले, परंतु, त्यात स्वतंत्र एचटीएमएल टाकण्याची अथवा एचटीएमएल स्वरूपात एडिट करण्याची सोय नाही. काही अतिरिक्त एचटीएमएल टाकावेसे वाटले (उदा., रंगविण्यासाठी, वगैरे), तर अशक्य आहे.
(टीप: Wysiwygचे स्पेलिंग सुधारले. अगोदर चुकून Wysiwig असे पडले होते.)
सध्यापुरतं...
सध्यापुरतं कुठल्याही वर्ड प्रोसेसरमधून चोप्य-पस्ते केलंत तर ते चालेल, अशी आशा आहे. मला तपासायला जमलेलं नाही. तेवढं जमल्यास बघाल का?
रंगकामासाठी बटणं उपलब्ध दिसली नाहीत. यादीमध्ये हे लिहून ठेवते. इतर बऱ्याच महत्त्वाच्या त्रुटी बाकी आहेत, त्यावर काम केल्यावर हेही तपासेन.
ऐसीचे नवे रूप आवडले नाही.
ऐसीचे नवे रूप आवडले नाही.
नवं रूप आवडलं नाही की त्यात…
नवं रूप आवडलं नाही की त्यात बर्याचश्या त्रुटी आहेत त्या डाचताहेत?
ईथे (लिंकमधल्या स्क्रिनशॉटात…
ईथे (लिंकमधल्या स्क्रिनशॉटात पहा) 'मराठी' हा पर्याय उपलब्ध करून देता येईल का?
https://i.postimg.cc/W1w4CQxt/sshot-aisi-editor-option.png
आणि खरं एक राहिलंच - मुळात ह्या मराठी म्हणवणार्या संस्थळावर हि त्रुटी राहिलीच कशी? हे लांच्छनास्पद आहे. अशाने आपणच मराठीची मानहानी करतोय. वगैरे वगैरे :-P :-P
.
That so-called "language" option does not appear to do a thing.
होच का?🙄 ते चॉयसेस बघून मी…
होच का?🙄
ते चॉयसेस बघून मी ट्राय करायचं धाडस नाही केलं! स्पॅनिश कदाचित चाललं असतं पण नकोच. कि-बोर्डची भाषा बदलून मी असा काही एकदा गोत्यात आलोय की त्यानंतर अगदी अखेरचा पर्याय म्हणूनच तो प्रकार करतो.
होय!
ती भाषा बहुतेक आपसूक भाषांतराची सोय वगैरे म्हणून आहे. टंकनसोयीशी तिचा सुतराम काही संबंध नाही. म्हणून ते बटण काढून टाकत आहे.
शिवाय माझ्या आकलनानुसार जरा जास्त वापरली जाणारी बटणं डावीकडे आणली आहेत.
आला शुक्रवार!
प्यार्टी लवकर सुरू झालेली दिसते! (बघते.)
सगळे विशेषांक
सगळ्या विशेषांकांची मुखपृष्ठं परत आणायला थोडा वेळ लागेल. तोवर उजव्या बाजूला वर 'विशेषांक' अशी लिंक आहे. तिथे सगळ्या विशेषांकांमधलं सगळं लेखन दिसेल. त्यात सगळ्या अंकांचे फिल्टरही आहेत. हवा तो निवडा, 'अप्लाय'वर क्लिक करा. त्या-त्या अंकातले धागे दिसतील.
विशिष्ट सदस्यांचं लेखन आणि त्यांनी दिलेले प्रतिसाद कसे दाखवायचे यासाठी मी इंटरनेट वाचून 'रीसर्च' करत आहे.
ऐसी
ऐसीच्या नवीन रुपामुळे चाचपडतो आहे, त्यामुळे भलतीकडे हात लागुन, आणखीनच घोटाळे होत आहेत. तूर्तास वाचनमात्रच राहावे हे उत्तम!
अजून काही निरीक्षणं
लॉग इन न करता मला ऐसीचं पान जास्त चांगलं दिसतं आहे.
उदा० वरच्या बाजूला उजवीकडे लॉग इन करून मला काहीच दिसत नाही. पण लॉग न न करता दिवाळी अंक २०२४, विशेषांक वगैरे दुवे दिसतात.
लॉग इन न करता मी दिवाळी २०२४ संपादकीय उघडलं, तर त्याशेजारी मला "माझे लेखन" अशी एक हायपरलिंक लागली जी एका कोऱ्या पानाकडे घेऊन गेली.
कदाचित मला मध्यंतरी दिवाळी अंकाच्या निमित्तानं ॲडमिन पावर दिली होती त्यामुळे केवळ मलाच अशा वेगवेगळ्या अडचणी येताहेत का?
less dense
नव्या रचनेचे पान फार मोकळे मोकळे दिसत आहे. पानावर एका वेळेस खूप कमी ओळी दिसतयात आणि मोकळी जागा फार आहे पानावर. धाग्यांवर दोन ओळीत फार जास्त अंतर आहे. एकंदर layout अधिक dense आवडेल. एका वेळीस स्क्रीनवर जास्त ओळी दिसल्या तर चांगले.
प्रतिसादांचा बोर्ड
प्रतिसादांचा वेगळा बोर्ड झाला, हे चांगले झाले. फक्त, तो (chronological orderऐवजी) जर reverse chronological orderमध्ये करता आला, तर अधिक उपयुक्त ठरेल, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)
(प्रतिसादांचा बोर्ड रियलटाइममध्ये अपडेट होत नाही, ही वेगळी अडचण.)आता पाहा
हे आता झाले आहे.
माझे लिखाण
माझे लेखन मध्ये इतरांचे लिखाण दिसते आहे.
आता पाहा
आता इथे चेक करून पाहा.
शेवटचे थोडे धागे वर आणायला…
शेवटचे थोडे धागे वर आणायला ही कॉमेंट टंकतोय.