' झोपडपट्टी भाषा '

' झोपडपट्टी भाषा '
कालपर्यंत ' झोपडपट्टी भाषा ' म्हणून हिणवलेली आज बोलीभाषा कशी झाली यावर विचार झालाच पाहिजे . जी भाषा ऐकताना असभ्य ,असंस्कृत वाटते ती वापरताना तितकीशी छपरी का वाटत नाही ? कारण माणूस त्याच्या भाषेसह बदलत आहे . .

" अबे माXXXद दिखता नही क्या ?? " एक अलिशान गाडी पुढे जात असताना शिवी हासडून गेली .. वेळ असेल रात्री ९ च्या आसपासची . कयानीच्या स्वर्गीय मावा केक ची चव जिभेवर आहे तोपर्यंतच घर गाठायचे या इराद्याने तुलनेने मोकळ्या रस्त्यावरून सणकत निघालो होतो . एस . जी .एस मॉल समोर फोनवर बोलत थांबलो असताना , एक निराधार योजनेचाच आधार असलेला , परिस्थितीने गरीब आणि अकाली वृद्धत्वाची देणगी मिळालेला बाप्या माणूस बिडी फुकट शेजारून गेला . कदाचित आनंदी असावा . बिडीच्या धुरात आणि कैक दिवस न केलेल्या दाढीत मला हसू दिसत होते . मोडक्या हेंडलला लावलेली मळकी पिशवी चाचपत आणि त्या भल्या मोठ्या मॉल कडे कुत्सित नजरेने पहात पुढे सरकत होता . काहीतरी होते त्या पिशवीत . . खूप काहीतरी मौल्यवान , आनंद देणारे ! पण निराधार -गरिबांना आनंदी राहायचा आनंद मिळतो कोठे ? स्वनाच्या दुनियेत वावरत असताना तो पृथ्वीवरचा रस्ता मात्र थोडासा भरकटला . एखादा फूटच . पण तो फुट मागून येणाऱ्या बि. एम . डब्लू स अडथळा करण्यास पुरेसा होता . सणकत येत असलेली गाडी या अनपेक्षित आणि भिकार अडथळ्याने चिडली . " अबे माXXXद दिखता नही क्या ?? असे 'कट ' मारून जात म्हणाली . अंगात ताकद नसलेल्या निराधाराला तेवढा 'कट' पुरेसा होता . . पडला माXXXद . . त्याच्या पिशवीसह . . गाडीवानाने आनंदाने शेजारी दिलेली टाळी माझ्या नजरेने टिपली . .

" कशाला आई घालायची रस्त्यात ? भिकारXट साला " . . माझ्या शेजारी कमनीय बांध्याच्या तरुणीसोबत फुकत थांबलेल्या कोण्या पोट्ट्याने आपली प्रतिक्रिया न मागता देऊन टाकली . हसायचे फिदी फिदी आवाज घुमत राहिले . तो माXXXद आता चेष्टेचा विषय झाला होता . काही वेळाने तो स्वतःच उठला . पिशवी हुडकू लागला . काळ्या रंगाची ती carry bag पुरती फाटली होती . आतील जिलेबी आणि बालुशाही रस्त्यावरच्या मातीत मिसळली होती . कोणासाठी घेतली असेल त्याने ? घरी दोन -चार डोळे त्याची वाट बघत असतील ? अनेक दिवस उरवून आणि पुरवून खाण्यासाठी बा काय आणतो याची वाट पहात असतील ? हो . . कदाचित . . तो बा मातीने माती पुसत होता . कळकट शर्टाच्या कोपऱ्याने जिलेबी -बालुशाही वर लागलेली माती पुसत होता . आपल्या नशिबाला दुषणे देत होता . कोपऱ्याला आणि गुढघ्याला झालेल्या जखमा विसरून मातकट अन्न गुंडाळायला नवा कोरा कागद हुडकत होता . एकटा … एकाकी … समाजाची नजर चुकवत पण हसण्याला कान देत ! कोण मदत करणार त्याला ? आपल्यावर संस्कार आहेत न ? ' रस्त्यावर पडलेले न उचलण्याचे ' ! कदाचित एखादा सुटातला साहेब किंवा लो वेस्ट मधली तरुणी पडली असती तर उचलायची इच्छा नक्कीच झाली असती . कारण त्यात मोह , स्टेट्स , संस्कार आणि कदाचित वासनाही असतात . याला उचलून काय साध्य होणार ? हा तर साला ' माXXXद ' आहे . . .

माXXXद . . कधीकाळी हा शब्द उच्चारला कि भांडणे व्हायची . . आपल्या आईचा भयंकर अपमान झाला आहे असे समजून दुध का कर्ज अदा व्हायचा पण आता तो काळ गेला . शब्द आणि अपशब्द यातील पडदा विकासाच्या आणि सुधारणेच्या नावाखाली आपणच फाडून काढला . आणि " बीप ' संस्कृतीचा उदय झाला . सध्या तरुणाईचे कार्यक्रम म्हणजे दर ४ शब्दानंतर बीप असे समीकरणच झाले आहे . आपण बडी ,डूड ,स्टड आणि जे काय असेल ते सिद्ध करण्यासाठी आपल्या तीर्थारुपांपासून ते अनोळखी व्यक्तीच्या मातुश्रीपर्यंत सर्वाना शाब्दिक अलंकार देणे हा आजचा ' ट्रेंड ' आहे . अंतरवस्त्रा पासून ते डोक्याला लावायच्या जेल ( तेल आता हद्दपार झाले न ) पर्यंत ब्रांड बघणारे आपल्या शब्दांचे स्टेट्स मात्र बघत नाहीत . बघायची त्यांना गरज वाटत नाही . संस्कार आणी नितीमत्ता हे शब्द आजी आजोबांसोबत वृद्धाश्रमात शेवटच्या घटका मोजत आहेत .. मिळवलेला पैसा -प्रतिष्ठा आणी बुडाखालची गाडी शिव्या द्यायचे शिकवत नाही पण शिव्या हासडायचा माज आणि अधिकार मात्र देते . आपल्या मनासारखा न वागणारा , कोणत्याही गोष्टीत आपल्यापेक्षा कमी असणारा प्रत्येक जण 'मा , बे " इत्यादी असतो . . शिकवणारा शिक्षक असो वा बौद्धिक घेणारा मित्र -मैत्रीण हे सगळे 'चू ' असतात . . आणी यात वावगे काहीच नसते ! २४ म्हणजे "आमच्या " वेळी म्हणायचं वय नाही पण खरच आमच्या वेळी 'शिंच्या ' म्हणल्या वरही गालावर ५ बोटांच्या टेटू उठायचा आणी तो बरेच दिवस टीकायचा सुद्धा . . पण आता तसे होत नाही आणी होणार सुद्धा नाही . . कारण आई -वडील मुले यात मैत्रीचे नाते असते म्हणे . . आणी मैत्रीत मा ,बे ,भो ,चू हे शब्द हॉट फेवरीट असतात . . खर न ? कोणी कोणते शब्द वापरावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न पण कालपर्यंत ' झोपडपट्टी भाषा ' म्हणून हिणवलेली आज बोलीभाषा कशी झाली यावर विचार झालाच पाहिजे . जी भाषा ऐकताना असभ्य ,असंस्कृत वाटते ती वापरताना तितकीशी छपरी का वाटत नाही ? कारण माणूस त्याच्या भाषेसह बदलत आहे . . . छत्रपती शिवाजी महाराज , स्वातंत्र्यवीर सावरकर यानंतर भाषाशुद्धी ची मोहीम हाती घेतलीच पाहिजे . कारण आपली भाषा हा आपल्या संस्कारांचा ,संस्कृतीचा आणी स्वत्वाचा आरसा असतो असे माझे मत आहे . त्याची वेळीच शुद्धी झाली पाहिजे .

असे अनेक माXXXद आपल्या भोवती जगत ,वावरत असतात . प्रचंड विश्वात जग आणी जगात आपली जागा हुडकत असतात . त्यांना ती मिळालेली नसते म्हणून आपल्या तीर्थरूपाना किंवा आपल्याला मिळालेली असते . पण लक्षात कोण घेतो ? म्यानर्स हे केवळ पंचतारांकित हॉटेलात , मिटिंग टेबलावर किंवा हातात मद्याचे प्याले घेऊन हा हु करताना जपायचे असतात . . रस्त्यावर कोण पाहतो मला ? माझा खरा 'रंग ' या फडतूस लोकांना दाखवला तर काय बिघडणार आहे ? याच मनोवृत्तीने आपल्यासह अनेक रस्त्यावर उतरतात आणी शाब्दिक अत्याचार सुटतात आणी स्टेट्स च्या नावाखाली मिरवतात . मी त्या मादरचोद कडे पाहत होतो . . प्रतिष्ठीतव्यक्तीने आपल्यावर विनाकारण मारलेला शिक्का आपल्या अश्रुनी पुसत पुढे सरकत होता . . आपल्या घराकडे . . वाट पाहणाऱ्या पोरांना मळकट जिलेबी -बालुशाही घालण्यासाठी !! असे किती माXXXX तुम्हाला भेटले ?

-अंकुर रविकांत देशपांडे

http://spaandaan.blogspot.in/2013/04/blog-post_20.html

***PUBLISHED HERE WITH PRIOR PERMISSION OF THE AUTHOR.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (2 votes)

हम्म. चांगलं लिहीलय.
मला वाटतं भारद्वाज, कश्यप, देल्ही बेली वगैरेमुळे या शब्दांचा वापर/कुल कोशंट वाढला आहे.
शिव्यांना अगदी तहे-दिल-से आक्षेप नाही... पण पैसा, स्टेटस, एसी गाड्या वगैरेमुळे आलेला माजोर्डेपणा/नीबर कातडी थोडी कमी कॉमन असली असती तर बरं झालं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगले लेखन.
(अ. जिलबी सांडण्याच्या एमोशनल अत्याचाराच्या आणि ब. शिव्या देण्याच्या वर्णनाखेरीजही चालू शकेल).

@अस्मिता

>>पण पैसा, स्टेटस, एसी गाड्या वगैरेमुळे आलेला माजोर्डेपणा/नीबर कातडी थोडी कमी कॉमन असली असती तर बरं झालं असतं.

या गोष्टी माझ्याकडे आहेत कारण माझी लायकी आहे आणि त्या भिकार्‍याकडे नाहीत कारण त्याची लायकी नाही अशी शिकवण नव्या अर्थव्यवस्थेने दिली आहे.
बाकी असा माजोर्डेपणा अल्टोवाल्याकडे/बाइक वाल्याकडेसुद्धा असतो. बीएमडब्ल्यू होती म्हणजे तर.....हॅ हॅ हॅ.

ता. क. १. अंकुररावांनी जिलबी आणि बालूशाही नवीन विकत घेऊन दिली का?
ता. क. २. अंकुररावांनी तसलीच शिवी त्या बीएमडब्ल्यूवाल्याला का दिली नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

Biggrin ता. क. १. माझ्याही डोक्यात आलेला, फक्त अंकुररावांऐवजी स्वतःसाठी... उत्तर बरचसं नकारार्थीच आलं. मग जाउदे, आपण एटलिस्ट कोणाचं नुकसानतरी नै करत, अशी स्वतःचीच समजुत घालुन घेतली Smile
ता. क. २. सुचवल्याबद्दल धन्यवाद. बघु कधी जमलं तर वापरेन Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत,

लेखावरुन नक्की आक्षेप भाषेबद्दल आहे की वर्तनाबद्दल हे समजत नाही.

आई-बहिणींवरुन शिव्या घालताना म्हातार्‍यांची/माणसांची मनापासून मदत करणारे अनेक पाहिले आहेत, ते पाहिल्यावर बहुदा भाषेवरचे संस्कार महत्त्वाचे की माणुसकीचे संस्कार महत्त्वाचे अशा द्विधा मन:स्थिति लेखक सापडू शकतो.

पण अंकूरने काय केले हे लिहले असते तर उगाच स्वतःचा गौरव केला वगैरे आरोप पण झालाच असता, न लिहिता मदत केली असल्यास जास्त बरं आहे.

बाकी माज हा पुर्वापार चालत आलेला मनुष्य-स्वभावाचा भाग आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हातार्‍यांची/माणसांची मनापासून मदत

प्रतिसादास बूच लागेल. परंतू, मराठीत म्हातार्‍यांना, माणसांना मदत 'करतात'. माणसांची मदत? 'घेतात'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मैने उसकी मदद की = मी त्याची ('त्याला' नव्हे) मदत केली. चित्रपटाला खूप दर्शक (प्रेक्षक) जमले होते असे संवाददात्याने (बातमीदाराने) सांगितले इ.इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठीत म्हातार्‍यांना, माणसांना मदत 'करतात'. माणसांची मदत? 'घेतात'

सुधारणेच्या मदतीसाठी धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ताकाचे भांडे अन भांडे फुटणे क्र. १.
तिथे २०-२५ रुपयांची जिलेबी/बालूशाही विकत घेऊन दिली असती तर "ऑथरच्या प्रायोर पर्मिशन"ने इथे जिलबी पाडता आली नसती.

ताकाचे भांडे अन भांडे फुटणे क्र. २.
बीएमडब्ल्यूवाला गाडी थांबवून खाली उतरला असता, तर टंकनवीरांच्या दंडाचा घेर उघडा पडला असता, असेही असू शकते..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

' झोपडपट्टी भाषा ' म्हणून हिणवलेली आज बोलीभाषा कशी झाली यावर विचार झालाच पाहिजे
काल भाषा सोवळी होती हे ठीक पण परवा("काल"च्या काल किंवा day before yesterday) ती तशीच सोवळी होती का?(नसावी,; माझे आजोबा आणि माझ्या आज्या ह्यांच्या प्रगाढ डिक्शनरीवरून तरी तसे वाटत नाही. बोलीभाषा तशीच होती हो.) तुम्हाला पु लं चे "रावसाहेब " ठाउक आहेत का?
.
श्री ज जोशींच्या एका कादंबरीत १९५० च्या दशकात पूजेला बसलेला कोकणस्थ ब्राम्हण " अरे दुर्वा कुठे आहेत शिंदळीच्यांनो? आता काय माझी झाटं वाहू गजाननाला?" असे भर घरात, आबाल वृद्धांसमोर वैतागून (हातात पूजेचे ताम्हन व इतरत्र पूजेचे/सणाचे सात्त्विक वातावरण असताना) पण सवयीने बोलताना दिसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

"श्री ज जोशींच्या एका कादंबरीत १९५० च्या दशकात पूजेला बसलेला कोकणस्थ ब्राम्हण " अरे दुर्वा कुठे आहेत शिंदळीच्यांनो? आता काय माझी झाटं वाहू गजाननाला?" असे भर घरात, आबाल वृद्धांसमोर वैतागून (हातात पूजेचे ताम्हन व इतरत्र पूजेचे/सणाचे सात्त्विक वातावरण असताना) पण सवयीने बोलताना दिसतो."

मी हे पेंडशांच्या "तुंबाडचे खोत" मधे अगदी पहिल्या प्रकरणामधेच वाचल्याचं आठवतं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

अजून थोडी अनावश्यक आणि शाणपट्टी दुरुस्ती: "दुर्वा कुठं झवायला गेल्या? आता देवाच्या डोक्यावर काय माझी झ्याटं वाहू का?" असे वाचल्याचे आठवतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पण दुर्वांप्रमाणे तीन काड्या असलेल्या मिळणं किती अवघड आहे हे एका कोकणस्थाला माहित असू नये म्हणजे कमाल झाली! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

'बोलण्यातली भाषा' हा या लेखाचा मथळा असल्यामुळे त्यावर माझा अनुभव आणि मत देत आहे. मी लहानपणापासून आतापर्यंत ज्या ज्या लोकांच्या सहवासात रहात आलो आहे त्यांचा विचार केल्यास पूर्वीच्या पिढीमधील भाषा नक्कीच जास्त शिवराळ होती. आता होळीच्या दिवशीसुद्धा फारशा जहाल लिंवा घाणेरड्या शिव्या ऐकायला मिळत नाहीत. पुढील पिढीमधील मुले कधी तरी 'ओ शि..', 'ब्लडी' वगैरे एवढेच म्हणत्तात. मध्यम वर्गीय किंवा उच्चवर्गीय मराठी लोकांच्या तोंडी 'मा... भै... ' या शिव्या मी तरी क्वचितच ऐकल्या आहेत. 'च्यायला', 'मायला' हे शब्द मात्र गाडीच्या इंजिनाप्रमाणे प्रत्येक वाक्याला लावणारे अत्यंत सज्जन आणि सुसंस्कृत गृहस्थ सुद्धा भेटत आले आहेत. त्या शिव्या आहेत असे कोणालाच वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाषा जहाल झाली आहे असं प्रत्येक पिढीत वाटत असावं, कारण वापरात असलेले टोकेरी शब्द वापरून वापरून गुळगुळीत होतात. मग ते टोचत नाहीत. नवीन, आधी फारसे न वापरलेले शब्द टोचतात.

माजोर्डेपणा हा भाषेच्या पलिकडचा असतो. तोही वाढत चालला आहे असं वाटतं खरं. पण माझ्या मते तो कमी झालेला आहे. शंभर वर्षांपूर्वी अनेक लोकं इतर अनेकांना 'ए म्हारड्या लांब हो' असं बिनदिक्कतपणे म्हणत. लेखातलं उदाहरण एकमेकांना माहित नसलेल्या माणसांचं आहे. वर्षानुवर्षांच्या ओळखीच्या माणसांना हक्काने पाणी नाकारणं हा माजोर्डेपणा आता तितका दिसत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही माजोर्डी प्रवृत्ती निंदाकरण्यालायक आहे हे खरं.. पण ते आताच आलंय किंवा उदारीकरणातून आलंय किंवा पाश्चात्यांकडून आलंय हे पटत नाही.
आजच्याच राज्यसभेतील बलात्कारावरील चर्चेत जावेद अख्तर यांचं म्हणणं मोठं रोचक होतं. ते म्हणाले "की हे जर पाश्चात्यांकडून किंवा उदारीकरणामुळे वगैरे होत असेल तर या व्यवस्था आपल्याहून कित्येक आधी अंगिकारणार्‍या देशांत याचं प्रमाण भयावह दिसायला हवं होतं. पण ते तसं नाही. कारण यामागचं मूळ कारण या व्यवस्था नसून आपलीच मानसिकता आहे."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सहमत आहे. मुळात शिवी आणि वागणूक यांचा परस्परसंबंध असा काही विशेष नसतोच, त्यामुळे अमुक एका पद्धतीच्या वागणुकीबद्दल बोलताना शिव्यांची कॉजल लिंक लावणे अप्रस्तुत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उलट अतिसभ्य भाषेत केलेले अपमान जास्त खतरनाक वाटतात कारण ते थंड डोक्याने केलेले असतात. शिव्या देणारा कमी धोकादायक वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते खतरनाक वाटण्याबद्दल सहमत एकदम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेखन ठीक पण ते भाषाशुद्धीकरण अगदीच बाळबोध आहे.

शिव्या वापरल्यामुळे 'कूल पॉईंट्स' मिळतात हे सरसकटीकरणही फार पटत नाही. भडकून शिव्या घालणार्‍यांन फार कूल पॉईंट्स मिळतात असं दिसत नाही. पण सरसकट शिवीगाळ करणार्‍या लोकांच्या तोंडात शिव्या मस्त वाटतात. माजापायी केलेलं कोणतंही वर्तन तिरस्करणीयच वाटतं. (तरीही माजुर्डी मांजराची जमात तिच्या माजोरीपणामुळेच मला फार आवडते.)

कालपर्यंत ' झोपडपट्टी भाषा ' म्हणून हिणवलेली आज बोलीभाषा कशी झाली यावर विचार झालाच पाहिजे . जी भाषा ऐकताना असभ्य ,असंस्कृत वाटते ती वापरताना तितकीशी छपरी का वाटत नाही ?

<आशिष नंदी मोड ऑन> हे दुर्लक्षित घटकांचं सबलीकरण आणि पर्यायाने समाजाचं लोकशाहीकरण आहे. <आशिष नंदी मोड ऑफ>

मी १५-१६ वर्षांची असताना मोठ्या भावाने मला मराठीतल्या स्टँडर्ड म, भ शिव्यांचे अर्थ शिकवले. चुकीच्या ठिकाणी चुकीच्या शिव्या देऊ नयेत म्हणून! त्यापुढे मला प्रश्न पडला म्हणजे समजा एखाद्याने आपल्यावर खोटा आरोप केला तर आपण कशाला भडकायचं? म्हणजे समजा कोणी एखाद्या पुरुषाला भेंच्योत, मादरचोत म्हणाला/म्हणाली तरीही आपण न केलेल्या (असं गृहीत धरते आहे.) कृत्याबद्दल का शरम कशाला वाटली पाहिजे? (एखाद्या मुलीला कोणी आई-बहिणीवरून शिव्या दिल्याचं मी तरी पाहिलेलं नाही. मलाच एकदा देऊन झाल्या होत्या, पण "त्या शिव्या मला देऊन काय फायदा?" असा प्रश्न विचारल्यावर शिव्या देणाराही हसायला लागला.)

सायबाच्या देशात गेल्यावर सायबाची स्लँग काही प्रमाणात शिकले. आपण च्यायला, आयला, भोसडीच्या म्हणत मातोश्रींचा उद्धार करतो. सायबाच्या देशात bollocks चा उद्धार होतो. माझ्यातल्या कट्टर फेमिनिस्टाला मातोश्रींच्या जागी पुरुषाच्या शरीराच्या भागांचा उद्धार झाल्याचा आनंद बहुदा झाला होता. तेव्हाच्या घरमित्रांनी अतिशय प्रेमाने त्यांच्या तोंडात असणार्‍या शिव्यांचे अर्थ, सोदाहरण शिकवले होते.

शिव्यांचा विषय निघाला की बरेचदा लोकं "तुम्ही घरी, आई, वडील, मोठ्यांसमोर अशी भाषा वापरता का" असा प्रश्न विचारतात. अशा प्रश्नांमागे काय विचार असतो कोण जाणे! "काही गोष्टी एकांतातच करायच्या त्या तुम्ही आई-वडील सोडाच लहान लोकांसमोर करता का?" असा प्रतिप्रश्न मला हटकून पडतो. (अतीव आनंद किंवा वैतागापोटी मी बरेचदा "fuckin'ell" असं प्रतिक्षिप्त क्रियेने म्हणते. अगदी मोठ्या लोकांसमोरही अशी भाषा वापरून झालेली आहे; त्यांनी काही विशेष वेगळं घडल्यासारखी प्रतिक्रिया दाखवलेली नाही.) सकाळी उठून जी क्रिया करण्याची फार घाई असते, ती सऽगळे लोक करतात. पण मग ते बंद दाराआडच कशाला करायला पाहिजे? ते पण करा की आई-वडलांसमोर! मित्रमंडळातच होतात अश्या सगळ्या तारूण्यसुलभ (किंवा पुढे लैंगिकतासुलभ) गप्पासुद्धा आई-वडलांसमोर किती लोक मारतात? अगदी सभ्य शब्दातही कोण आपल्या जन्मदात्यांसमोर एखादी मुलगी किंवा एखादा पुरुष माल असल्याच्या गप्पा मारतं? वेगवेगळ्या लोकांसमोर आपलं वर्तन वेगवेगळं असतंच. असणारच. मग आई-वडीलांसमोर जे घडत नाही, करत नाही ते सगळं वाईट किंवा पापच का समजायचं?

पण मग मला तुकाराम आठवतात. तुकोबाच्या रचनांमधे भरपूर 'अपशब्द' आहेत. "भले त्याची देऊ गांडाची लंगोटी" असं म्हणणारे तुकाराम "कासेची लंगोटी" म्हणत सोवळे करणारे आपण कोण? सगळं असं तुपाळ, थबथबीत करण्यामागचा उद्देश आणि तर्क काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सकाळी उठून जी क्रिया करण्याची फार घाई असते, ती सऽगळे लोक करतात. पण मग ते बंद दाराआडच कशाला करायला पाहिजे? ते पण करा की आई-वडलांसमोर! मित्रमंडळातच होतात अश्या सगळ्या तारूण्यसुलभ (किंवा पुढे लैंगिकतासुलभ) गप्पासुद्धा आई-वडलांसमोर किती लोक मारतात? अगदी सभ्य शब्दातही कोण आपल्या जन्मदात्यांसमोर एखादी मुलगी किंवा एखादा पुरुष माल असल्याच्या गप्पा मारतं? वेगवेगळ्या लोकांसमोर आपलं वर्तन वेगवेगळं असतंच. असणारच. मग आई-वडीलांसमोर जे घडत नाही, करत नाही ते सगळं वाईट किंवा पापच का समजायचं?

चि.सौ.कां. दगडीचा शरीरसंबंध चि. धोंडो यांचेशी करण्याचे योजिले आहे, असे जुन्या काळी लिहित तसे लग्नपत्रिकेत लिहिले,
म्हणून मांडवातच...?

नै म्हंजे ते मघा उपक्रमावर एथिक्स बद्दल लिवून आलोय ते आठवलं मनात..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

नाही, अपेक्षाच नाही. म्हणूनच आई-वडलांसमोर जे करत नाही ते सगळं वाईट, अग्राह्य, पाप असं थोडीच असतं! तसं असेलच तर आई-वडीलच मुळात पापी ठरतात. मग एका पाप्याने दुसर्‍याला का घाबरावं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

साधारण ४०-५०च्या दशकात ज्या पद्धतीची अश्रूढाळी कथानकं पाडली जायची त्या पद्धतीचं कथानक. म्हणजे काय?
- एका माणसानं दुसऱ्याला शिवी दिली ह्यातून पुरेसं नाट्य निर्माण होत नाही. त्यामुळे शिवी देणारा श्रीमंत आणि शिवी खाणारा गरीबच दाखवायचा. वर फोडणीला कमनीय बांध्याची तरुणी. आता तिचा आणि तिच्या बांध्याच्या कमनीयतेचा ह्यात काय संबंध? पण नाहीतर आमची कमनीय बांध्याच्या पोरींची हाव, आणि त्या ज्यांना मिळतात तसल्या फाकडू पोरांविषयीची असूया कशी बरं व्यक्त होणार? बरं, ह्याला जरा आक्षेप घेतला तर लगेच तुम्ही भांडवलवादी किंवा नीतिमत्ता फाट्यावर मारणारे वगैरे ठरता.
- नुसती शिवी पुरेशी हृदयद्रावक नाही (काय करता? शिव्या फारच क‍ॅज्युअली घेतात नं आजकाल लोक!) त्यामुळे कारच्या धक्क्यानं तो माणूस रस्त्यात कोसळायला हवाच.
- शिवीचा त्रास होऊ शकतो, तसा बिडीच्या धुराचासुद्धा त्रास होऊ शकतो. पण आम्हाला हट्टीकट्टी गरिबी आणि वाईट श्रीमंती दाखवायची आहे त्यामुळे बिडी ओढणारा गरीब खपवून घ्या, पण कमनीय पोरीबरोबरचा फाकडू पोट्ट्या सिगरेट फुकतो ते मात्र आवर्जून सांगा.
- पिशवीत जे मौल्यवान, आनंद देणारे आहे ते देशी दारूची क्वार्टरसुद्धा असू शकते, किंवा तिखटजाळ मटण-भाकरीसुद्धा. पण मग मध्यमवर्गाची हळहळयुक्त वाहवा कशी मिळणार? त्यामुळे मग त्यात जिलबी-बालुशाहीसारखे तुपट थबथबीत पदार्थच असायला लागतात.
- सध्याच्या तरुणाईच्या शिव्या देण्याला शिव्या देणं हा तर अशा 'मुक्तपीठ'छाप लिखाणाचा आपद्धर्मच असतो. खरं तर ह्यांच्या आजी-आजोबांच्या पिढीनं ज्या अत्र्यांना डोक्यावर घेतलं होतं त्यांची भाषा कधी वाचल्ये का? आणि ह्यांच्या आई-वडिलांच्या पिढीनं ठाकऱ्यांना हिंदुहृदयसम्राट केलं त्यांचं 'पादरे पावटे'छाप लिखाण? शिवाय, ज्यांच्या पणज्या-खापरपणज्या केशवपन करून अंधारात जगल्या आणि खपल्या त्यांच्या तोंडी उगीच 'संस्कार आणी नितीमत्ता हे शब्द आजी आजोबांसोबत वृद्धाश्रमात शेवटच्या घटका मोजत आहेत' वगैरे शोभत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बाकी प्रतिसाद मार्मिक वगैरे ठीकच, पण 'मुक्तपीठ'छाप लिखाण या शब्दप्रयोगाकरता विशेष टाळ्या... ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

बाकी बलीवर्दनेत्रभञ्जक आहेच, पण

सध्याच्या तरुणाईच्या शिव्या देण्याला शिव्या देणं हा तर अशा 'मुक्तपीठ'छाप लिखाणाचा आपद्धर्मच असतो.

यासाठी विशेष टाळ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आपले मुद्दे एकाहून एक वरचढ सरस आहेत, पटण्याजोगे, ग्राह्यही आहेत. परंतु तरीही, असल्या कथा का खपून जातात, हेही लक्षात घेण्याजोगे आहे.

प्रस्तुत कथा ही पूर्णतया कपोलकल्पित असणे सहज शक्य आहे. किंबहुना, ती इतकी साचेबद्ध, छापातली आहे, की काही अजेंडा दामटण्यासाठी ती लिहिलेली असणे, किंवा लिहवूनही घेतलेली असणे, कमिशन्ड असणे, हीदेखील शक्यता नाकारता येत नाही.

मात्र, दुर्दैवाने, 'आपल्या हिंदुस्थानात' या कथेतल्यासारखी घटना plausible आहे, शक्य कोटीतली आहे; किंबहुना कदाचित इतकी सामान्य असावी, की 'कुत्र्यास माणूस चावला, तरच ती वार्ता' या न्यायाने त्यात विशेष उल्लेखनीय असेही काही नसावे, ही बाबदेखील दुर्लक्षणीय नसावी.

(बाकी, 'आपल्या हिंदुस्थाना'स सिंगलौट करण्याबद्दल. वस्तुतः या गोष्टीमागील मानसिकता, श्रीमंतीचा - विशेष करून नवश्रीमंतीचा - माज, वगैरे बाबी तशा जागतिक, अखिलमानवी असाव्यात, हे खरे आहे. परंतु त्यांच्या इतक्या बिनदिक्कत अंमलबजावणीस इतरत्र कायद्यासारख्या - किंवा कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीसारख्या - काही छोट्या अडचणी - निदान अजूनपर्यंत तरी - बहुधा आड येत असाव्यात, हेदेखील तितकेच खरे आहे. नाही म्हणायला, 'आमच्या'कडची उजवी मंडळी अमेरिकेस तिसर्‍या जगातील एखाद्या देशाच्या पातळीवर शक्य तितक्या लवकर आणून सोडण्यासाठी कसून प्रयत्न करीत आहेत, हा भाग अलाहिदा, परंतु तो मुद्दा येथे काहीसा अवांतर ठरावा. आणि तसेही, 'आपल्या हिंदुस्थाना'त, या कथेत दिलेल्यासारख्या घटनांमागे श्रीमंतीचा माज हाच फ्याक्टर दर वेळेस असावा लागतो, असेही नाही. म्हणजे, माज असावा लागतो, परंतु तो श्रीमंतीचाच असणे आवश्यक नाही. प्रस्तुत कथेत बीएमडब्ल्यूवाल्याऐवजी एखादा पीएमटीवाला (नवीन नामकरण पीएमपीएमएल की कायसेसे), रिक्षावाला किंवा ट्रकवालाही सहज खपून गेला असता. हा श्रीमंत वर्ग खासा नव्हे. किंबहुना, पुण्यातल्या पीएमटी/ट्रक/रिक्षावाल्यापुढे आमचा एखादा 'रेडनेक' शंभरदा ओवाळून फेकून द्यावा. तुलनेने फारच शामळू लोक. पण ते एक असो. फार कशाला, पुण्यातला एखादा सायकलवालाही सहज चालला असता.)

तर सांगण्याचा मुद्दा, प्रस्तुत कथा ही छापातली आणि काल्पनिक असेलही. परंतु एखाद्या टिपिकल मध्यमवर्गीयास कथाकर्माशी (कर्म = object. अर्थात, द्वितीया विभक्ती लागू होणारे पात्र.) अनुरूप होण्यास - आयडेंटिफाय करण्यास - भाग पाडण्यासाठी, कथाकर्माच्या बुटात स्वतःस उभे करवण्यासाठी, त्याच्या ठिकाणी स्वतःस कल्पावयास लावण्यासाठी आवश्यक असा मसाला या कथेत आहे. आणि म्हणूनच, असली कथा खपून जाऊ शकते.

सत्तरऐशीच्या दशकांपर्यंतचे, विशेषतः 'अँग्री यंग म्यान'छाप, चित्रपट म्हणूनच तर खपत नसत काय? अर्थात, तेथे टार्गेट आड्यन्स हा केवळ - किंवा मुख्यत्वेकरूनही - मध्यमवर्गीय नव्हता, हा भाग वेगळा. पण बॉलीवूडवाल्यांचा हिशेबच वेगळा. भल्या मोठ्या ग्राहकवर्गास स्वस्तात विकून खूप मोठा फायदा होतो, हे बॉलीवूडवाल्यांकडून शिकावे. मराठी माणसास नेमके हेच कळले नाही. आता हेच पहा ना,

पिशवीत जे मौल्यवान, आनंद देणारे आहे ते देशी दारूची क्वार्टरसुद्धा असू शकते, किंवा तिखटजाळ मटण-भाकरीसुद्धा. पण मग मध्यमवर्गाची हळहळयुक्त वाहवा कशी मिळणार? त्यामुळे मग त्यात जिलबी-बालुशाहीसारखे तुपट थबथबीत पदार्थच असायला लागतात.

मध्यमवर्गीयांची वाहवा मिळवून कितीसा फायदा होणार आहे? एक तर तिथून फक्त वाहवा मिळते, पैसे मिळत नाहीत. शिवाय, 'मध्यमवर्गीय' म्हणजे बोलूनचालून असे किती? साडेतीन टक्के?

('मध्यमवर्गीय' म्हणजे 'साडेतीन टक्के' - किंवा केवळ 'साडेतीन टक्के' - नव्हेत, याची मला पूर्ण कल्पना आहे. पण हे समीकरण - स्टीरियोटाइप म्हणा ना - खपून जाते. 'साडेतीन टक्क्यां'त न मोडणार्‍या मध्यमवर्गीयांस (आणि मध्यमवर्गीयांत न मोडणार्‍या 'साडेतीन टक्क्यां'स) अपमानकारक असले, तरीही. आपोआप माना डोलावणारे पुष्कळ भेटतात. तेव्हा खपते आहे, म्हटल्यावर का न खपवून घ्या?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिव्या देण्याचा प्रादुर्भाव वाढला आहे किंवा कमी झाला आहे काय ? सांगता येणं कठीण आहे. "मला शिव्या देणार्‍यांचे अधिकाधिक अनुभव येत आहेत" या विधानाचा अर्थ "शिवी देण्याचं समाजातलं प्रमाण वाढलेलं आहे" असा काढता येणं मला कठीण वाटतं.

एकंदर लेख शिव्यांबद्दल कमी आणि वाढत्या वर्गीय दरीबद्दल असावा असं वाटलं. आणि वर्गीय विसंवाद अधोरेखित करण्याकरता काहीतरी मेलोड्रमॅटिक चित्रण करण्यात आलेलं आहे असं वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

चिंतातुर जंतू आणि 'न'वी बाजू यांनी एकेका प्रतिसादातच तीन धाग्यांचा मुद्देमाल संपवल्याचं दुर्दैवाने नमूद करावंसं वाटतंय. एखादा सिंधी, गुजराथी असता तर त्याने एवढ्या मुद्देमालावर दोन-चार पिक्चरच काढले असते. निदान कोणी भडकमकर मास्तर* असते तर करियर गायडन्सचे धागेही काढले असते. मराठी माणूस मागे पडतो तो असा.

*हे संदर्भः
भंगडा पॉप आर्टिस्ट व्हा ...
नाट्यसमीक्षक व्हा ...
इव्हेंट मॆनेजर व्हा
वसुली एजंट व्हा ...
बुवा / स्वामी / महाराज व्हा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख आणि प्रतिसाद आवडले.

मी हि काहि (सुशिक्षित ?) लोकांच्या वागण्या बोलण्यानी चक्रावुन गेलो आहे ! ( माझा अनुभव हा केवळ गेल्या एक दिड वर्षातला आणि तो हि फक्त पुण्यातला आहे.)
एक पट्कन जाणवलेली गोष्ट म्हणजे ... मुलं आणि मुली साध्या सुध्या वाक्यात सुद्धा फ* आणि शि* हे "फोर लेटर वर्ड्स" बेमालुम रित्या वापरतात. हे शब्द वापरण्या मागे "आपण मॉड आहोत" हे दाखवण्याचा एक प्रयत्न दिसुन येतो. काहि लहान मुली सुध्दा अजाण पणानी हा शब्द वापरताना ऐकले आहे ! ऑफिस / प्रोफेशनल संभाषणां मधे हि हे मी बघितलं आहे !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे
भले तरी सोडू कासेची लंगोटी ,नाठाळाच्या माथी हाणू काठी
http://veedeeda.blogspot.in/