'ऐसीला विचारा ' : घरगुती व जनरल प्रश्न - भाग १

काही बाबतीत सल्ला हवा आहे. अगदि घरगुती वापरातील इएलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून ते अगदि नाव लावण्यापर्यंत.
इथे विचारण्यास संकोच वाटतो आहे. पण मदत मिळण्याची , निदान योग्य बाजूकडे अंगुलीनिर्देश होण्याची बरीच शक्यता वाटल्याने इथे धागा टाकतो आहे.
१. विवाहोत्तर मुलीने नाव आहे तसेच ठेवले, तर सरकारदरबारी कुठे अडचण येण्याची शक्यता आहे का? किंवा बँक, पासपोर्ट, व्हिसा ह्या ठिकाणी काही
त्रास होउ शकतो का?
एक काल्पनिक नावांनी उदाहरण घेउ. समजा, "अवनी महेश गणोरे " हिचं "नरेश सोपान आवळे" ह्याच्याशी लग्न झालं; तर आधीचं आहे तसच नाव तिला सुरु ठेवण्यास काय काय अडचणी आहेत?
पर्याय/शंका १:- विवाहापूर्वी आणि विवाहानंतरही अवनी महेश गणोरे हेच नाव ठेवायचं असल्यास खरं तर काही अडचण यावयास नको. पण परवा मी आणि माझी पत्नी
मतदारसंघातील नावनोंदणीच्या एका कामासाठी गेलो होतो. तिथे त्या व्यक्तीने तिचे नाव लिहून घेतले. विवाह प्रमाणपत्राकडे बघत मग पतीचे, म्हणजे माझे नाव लिहून घेतले. आणि अचानक
माझे first name तिचे middle name म्हणून लावले.
ती काहीतरी विचित्र केस होउ लागली. म्हणजे अवनी महेश गणोरे हिचे नाव अवनी नरेश गणोरे असे काय च्या काय लागले गेले.
"ते आहे तसेच ठेवायचे आहे" म्हटले तरी तेथील व्यक्ती ऐकेना.
आता ह्याबाबतीत कुणी सल्ला देइल का?
नाव जश्शाला तसं ठेवणं चूक आहे का? किंवा व्यवहारात काही अडचणी येउ शकतात का?
.
पर्याय/शंका २:- गणोरे - आवळे हे संयुक्त आडनाव लावायचं असेल तर मिडल नेम काय लावायची पद्धत आहे? पूर्वीचं "महेश" हेच मिडल नेम राहील की "नरेश" हे नाव लावायला लागेल? (खरं तर संयुक्त आडनावही लावायची इच्छा नाही; पण वेळ पदलीच, तर ठाउक असावे.)
.
.
पुढील शंका:-
घरात गीझर घ्यायचे घाटत आहे. कोणता बरा राहील? गीझर वापरण्याबाबत आपला अनुभव काय आहे?
गॅसवर चालणार्‍या गीझरपेक्षा विजेवर चालणारा गीझर बरा , सोयीचा असे वाटते.
कुटुंबाचा आकार लहान असेल, तर किती क्यापेसिटीचा गीझर पुरेसा ठरतो?
मुळात तो काहीतरी इन्स्टंत वाला अन् क्यापेसिटी वाला असे भेद आहेत ना त्यात? तर इन्स्टंट बरा की क्यापेसिटीवाला?
किती क्यापेसिटी neccessary and sufficient आहे लहान आकाराच्या कुटुंबात?
गीझरचा जीवनकाळ (लाइफ) व सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास कोणता ब्रॅण्ड बरा?
.
.
पुढील शंका :-
पुण्यात किम्वा पिंपरी चिंचवडात फिरत्या लायब्रर्‍या उपलब्ध आहेत का? त्यांचे नाव, पत्ते, संपर्क माहिती कुठून मिळेल?
.
.
पुढील शंका:-
पिंपरी चिंचवडात हिरो होण्डाची दुचाकी सर्व्हिसिंगला टाकण्यास चांगले ठिकाण ठाउक आहे का? एखाद्या चांगल्या , कुशल मेकॅनिकचा पत्ता देउ शकाल काय?
.
.
मंडळी, ह्या धाग्यावर थट्टा वगैरे करायला स्कोप दिसतो आहे. पण पुरेशी माहिती मिळण्यापूर्वी धागा भरकटावू नये ही विनंती.
"ह्या शंका इथे का टाकल्या" (गीझर, सर्व्हिसिंग वगैरे) हा प्रश्न उपस्थित होउ शकतो; पण जालावर उपलब्ध असलेली सर्वच माहिती खात्रीशीर वाटत नाही.
बाहेर paid articles, paid reviews असण्याची शक्यता असते. मराठी आंजावर ते नसते असे वाटते. म्हणून इथे ह्या शंका देत आहे.
इथे तुलनेने थोडाफार अंदाज असतो.

--मनोबा

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

तुम्ही योग्य ठिकाणी राहता असं दिसतं. पुण्याचे दिसता. मग नावं ठेवून घेण्यात अडचण का यावी ? असं नावात अडकून आपल्या गावाचं नाव घालवू नये ही नम्र विनंती. तुम्ही फिरत फिरत नावं ठेवण्यात तरबेज असलेल्या एव्हरग्रीन टेलर्स प्लाझात गेलात कि कामच झालं समजा. तसे आम्ही सल्ला देण्याचे शुल्क आकारतो, पण पहिलेच ग्राहक असल्याने खास सवलत !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

उणे गुणांकन द्या. फक्त कोण देतंय तेव्हढं कळू द्या.
धागा गंमतीत काढलाय असाच समज झाला होता. कंटाळा आला. कंपूतला प्रतिसादक असता तर विनोदी स्कोर मिळाला असता.

आय क्विट !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

धागा गंमतीत काढलेला नाही.
पुरेशी माहिती मिळाल्यावर मागाहून कट्ट्यावर, मित्रांमध्ये होते तशी थट्टामस्करी झाली तरी हरकत नाही.( हरकत असली तरी मनोबा करणार काय म्हणा.)
उणे श्रेणी वगैरे कुणी दिली कल्पना नाही. तुम्हाला शक्य असल्यास धाग्याच्या विषयाबद्दल माहिती द्यावी ही पेश्शल रिक्वेष्ट.
तो उणे श्रेणीचा मुद्दा थोड्यावेळा साठी सोडून देता का? ह्याची भरपाई म्हणून मी दुसर्‍या दोन तीन धाग्यांवर दिसेल
त्या तुमच्या प्रतिसादाला थेट "मार्मिक" म्हणून येउ का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

किरणराव, जाऊ द्या ना. काही लोक कमी स्पोर्ट असतात. शिवाय त्या निरर्थक शब्दाचे दोन अर्थ आहेत - १. कळला नाही. २. वाचू नका.
त्यात तुमच्या व्यक्तित्वावर काही भाष्य आहे असा अर्थ नका काढू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अरुण सर
रेकॉर्डच निगेटीव्ह झालंय इथलं. Biggrin जाऊ द्या, !
मनजी, ऑलरेडी खरड लिहीलिये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

तुमच्यावर खोडसाळ कंपूने केलेल्या अन्यायाची दखल घेऊन तुमचा मूळ प्रतिसाद एका श्रेणीने वर चढवत आहे.

माझ्या हातात इतकंच आहे. एकदा श्रेणी दिल्यावर त्याच प्रतिसादाला परत देता येत नाही, अन्यथा अजून एक वाढवली असती.

बाकी मनोबांचा पहिल्या प्रश्नाचा पुढचा भाग - (सीक्वेल)..

अवनी महेश गणोरे म्यारीड नरेश सोपान आवळे --> दोन्ही नावे लावण्याचा मार्ग --> सौ. अवनी नरेश गणोरे आवळे.

अनेकदा निसर्गनियम प्रबळ ठरत असल्याने त्यांना अपत्यप्राप्ती झाल्यानंतरः समजा तिने दोघांची (आईवडील.. कारण वडीलच श्रेष्ठ का?) नावे लावण्याचा आधुनिक पायंडा ठेवल्यास:

बागेश्री नरेश अवनी -- सॉरी.. बागेश्री अवनी नरेश गणोरे आवळे.

बागेश्री वयात येऊन यथावकाश एक "मयंक गायत्री मधुसूदन पटवर्धन सहस्रबुद्धे" नावाचा देखणा, सुस्थापित, पुरोगामी तरुण तिला भेटून त्या भेटीचे विवाहात रुपांतर झाले..

तेव्हा बागेश्री हिचे विवाहोत्तर नामांतर :

"बागेश्री अवनी नरेश मयंक गणोरे आवळे पटवर्धन सहस्रबुद्धे" असं होईल.

आजीआजोबांची नावं लावण्याची गरज नसल्याने ती टळली पण आडनावं??

यापैकी कोणतंही एक आडनाव पुढल्या पिढीत गाळणे म्हणजे मूळ तत्वाशी अन्याय होईल..

त्यामुळे

पुढे कधीतरी निश्चित येणारा शुभप्रसंग, पक्षी: बागेश्री अवनी नरेश मयंक गणोरे आवळे पटवर्धन सहस्रबुद्धे हिच्या कन्येचे लग्न जिच्याशी लावावयाचे त्या वरास पसंत करताना केवळ त्याच्या नावाच्या कमी लांबीला सर्वाधिक महत्व यावे.

यश मीरा जय पै जोशी असे सुटसुटीत नाव असलेल्यांचा भाव फार वधारेल असा अंदाज आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनोबा
तुमचा धागा मजेत काढलेला नाही तेव्हां तुमच्या प्रश्नाचं गंभीर उत्तर असं आहे.
जिथे तुम्हाला प्रॉब्लेम आलेला आहे तिथे तुम्ही मॅरेज सर्टिफिकेटची प्रत आणि कुठले नाव घालायचं याची लेखी तक्रार द्यायला हवी. हल्ली मॅरेज सर्टिफिकेटच्या फॉर्ममधे लग्नानंतरचं नाव काय असेल हे विचारलं जातं असं ऐकून आहे. खात्री करून घ्यावी. मॅरेज सर्टिफिकेटवर अशा पद्धतीने नाव नोंदवलेलं नसेल तर त्या ठिकाणच्या कारकूनाला काही करता येणार नाही. अशा वेळी तुम्हाला गॅझेटमधे पब्लिश करून किंवा प्रतिज्ञापत्राद्वारे नावाचा आग्रह धरता येईल.

@ गवि
तुम्ही आगगाडीसारखी नावं सुचवली आहेत ती प्रथा साऊथ मधे आहेच Wink
अवांतर : गुण वाढवून घेणे हा इश्यू नव्हता हे आपल्या चाणाक्ष नजरेत आलेच असेल, मनोबांच्या धाग्यावर यावर आणखी पोस्ट नको म्हणून थांबतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

या धाग्यावर माहितीपूर्ण प्रतिसाद आले तर मलाही उपयोग होईल. मी माझ्याकडे असलेली तुटपुंजी माहिती देते.
मी लग्न झाल्यावरही नाव बदललेलं नाही- नाव-वडिलांचं नाव-आडनाव असे संपूर्ण तसेच ठेवले आहे. हल्लीच नवर्‍याचा पासपोर्ट रीन्यू केला त्यात माझे संपूर्ण नाव घालून घेतले आहे- पासपोर्ट ऑफिसमध्ये त्यांना माझे जसे आहे तसे नाव चालले.त्यामुळे आता पुढे काही अडचण येऊ नये असे वाटते.
मला बँक ऑफ बरोडा मध्ये खाते उघडताना एका स्टाफने नाव बदललेलं नसल्याने 'मिसेस'च्या ऐवजी 'मिस (Miss)' असे पासबुकावर माझ्या नकळत छापून दिले...नाव बदललच पाहिजे असा फुकट सल्लाही दिला. मला फार वेळ नसल्याने तेव्हा मी वाद घालण्याच्या भानगडीत पडले नाही- अजून अडचण काहीच आलेली नाही त्यामुळे.
मला माझ्या ओळखीत असलेल्या अनेक स्त्रीया माहित आहेत ज्यांनी त्यांची नावे बदललेली नाहीत आणि त्यांनी मला सांगितले आहे की त्यांना कोणतेच अडथळे या कारणाने आले नाहीयेत.

पण कुणाला काही यामुळे कधी अडचण आली असल्यास जाणून घ्यायला आवडेल. विशेष करून प्रॉपर्टी, वडीलोपार्जित जमीन या संदर्भात मला थोडी शंका आहे. नात्यातल्या सर्वांनीच नावे बदललेली असल्याने यासंदर्भात कधी कळलेले नाही. मॅरेज सर्टीफिकेट असले की काही प्रश्न येऊ नये असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

[टीप: प्रतिसादाचे शीर्षक 'हा हा' असे असले, तरी प्रतिसाद अत्यंत गांभीर्यपूर्वक लिहिलेला आहे.]

माझ्या बायकोने लग्नानंतर बरीच वर्षे नाव बदललेले नव्हते. आणि वस्तुतः परिस्थिती तशीच राहिली असती, तरी काहीही बिघडले नसते.

मात्र, नागरिकीकरणाचे वेळी त्याच आवेदनात आपले नाव बदलण्याचा अर्ज करण्याचीही एक तरतूद आमचे येथे असते. (म्हणजे, लग्नामुळेच नव्हे, तर कोणीही कोणत्याही कारणासाठी किंवा कारणाविना बदलू शकतो/ते. उदा., मी माझे नाव केवळ हुक्की आली म्हणून अब्दुल नारायण डिसूझा असे तत्त्वतः बदलू शकतो. पूर्वी अमेरिकेत बहुधा युरोपातून येणार्‍या अनेक इमिग्रंटांना पुढे अमेरिकन नागरिकत्व घेताना आपले नाव बदलून ते आपले अमेरिकनत्व रिफ्लेक्ट करणारे व्हावे असे उगाचच - बहुधा इमोशनल कारणांसाठी - वाटायचे, आणि त्याकरिता, त्या परंपरेतून ही तरतूद आहे, असे कायसेसे ऐकलेले आहे. चूभूद्याघ्या. तर ते एक असो.) तर त्या तरतुदीचा उपयोग करून घ्यावा, अशी दुर्बुद्धी का कोण जाणे, झाली. (म्हणजे, माझे नाव बदलून 'अब्दुल नारायण डिसूझा' करण्याकरिता नव्हे. माझ्या पत्नीचे नाव ऑफिशियली मॅरीड नेममध्ये बदलण्याकरिता. म्हणजे, मला तशी दुर्बुद्धी होऊन मी पत्नीस तसे सुचविले - एमसीपी स्साला! - आणि माझ्या पत्नीनेही, का कोण जाणे, पण त्यास संमती दर्शविली.) आणि येथेच घातास सुरुवात झाली.

नागरिकीकरणाची परीक्षा उत्तीर्ण होऊन, इतर सोपस्कार पार पडून आता जज्जापुढे शपथविधी पार पडायचाच काय तो राहिला होता. आणि माशी शिंकली. तिथल्या कर्मचारिणीने नामांतराच्या प्रश्नास हात घातला. होणार नाही म्हणे. नाव बदलायचे असेल, तर त्याकरिता जज्जासमोर जावे लागेल. शपथविधीचा जज्ज वायला, आन् नामांतराचा वायला. नामांतराचा जज्ज आज आलेला नाही. बदलायचेच असेल नाव, तर तो दुसरा जज्ज असेल, त्या दिवशी परत यावे लागेल, नि मग त्यानंतर पुन्हा कधीतरी सवडीने शपथविधीसाठी यावे लागेल. बरे, कशासाठी पाहिजे नामांतर? म्यारीड नेमकरिता. ठीक आहे, या कारणाकरिता इथल्या इथे, जज्जासमोर न जाता मी तुझे फक्त आडनाव कागदोपत्री बदलून देऊ शकते. मधले नावही जर बदलायचे असेल, तर पुन्हा कधीतरी येऊन जज्जासमोर जावे लागेल. करता काय? बरे, मग अजिबात बदलू नको नाव, तर तेही करायला तयार नाही, की तसे सांगायचे सुचले नाही, ते आता नक्की आठवत नाही. तेव्हापासून माझ्या पत्नीचे नाव हे पासपोर्टासह येथील सर्व कागदपत्रांत नाव-वडिलांचेनाव-नवर्‍याचेआडनाव या फॉर्म्याटात आहे. नि पासपोर्टात तसे आहे म्हणून भारतीय व्हिशावर/ओसीआयवरही तसेच आहे. पुढे त्यानंतर कधीतरी भारतात गेले असता ओसीआय दाखवून प्यानकार्ड बनवून घेतले, म्हणून प्यानकार्डावरही तसेच आहे.

वस्तुतः, इथवरही फारसे काही बिघडण्यासारखे नव्हते. 'नावात काय आहे,' म्हणून सोडून देण्यासारखे होते. खरी गंमत पुढेच आहे.

सरकारी कर्मचारी हे थोड्याफार फरकाने जगात सर्वत्रच वायझेड क्याटेगरीतले असावेत. पण भारतात वायझेड/अतिशहाणे/आगाऊ असण्यासाठी वा इतरांस गृहीत धरण्यासाठी सरकारी कर्मचारी असण्याची पूर्वअट नसावी. ब्यांकेत खात्यावर नाव घालताना सामोर्‍या केलेल्या डॉक्युमेंटवरचे नाव जसे असेल, तसेच्या तसे ग्राह्य न धरता, ब्यांकम्यानेजरमंडळींनी खात्यावर नोंदवताना आपल्या 'अधिकारां'त त्यातील मधले नाव परस्पर बदलून ते नवर्‍याचे करून संस्कृती पडू दिली नाही. बरे, तीनचार ब्यांकांत खात्यावर नाव घालण्याची वेळ आली, म्हटल्यावर सगळ्याच म्यानेजरांनी तसे केले, अशातलाही भाग नाही. त्यामुळे काही ठिकाणी नाव असे, तर काही ठिकाणी तसे. प्यानकार्डावरील 'अधिकृत' नावाशी खात्याचे नाव जुळते आहे/नाही, काही विधीनिषेध नाही, कशाचा कशाला पत्ता नाही. संस्कृती टिकल्याशी कारण. दिव्यच प्रकार आहे सगळा. बरे, उपलब्ध असलेल्या थोड्या वेळात अनेकांकडून अनेक कामे करवून घ्यायची असली, तर कोणाकोणाशी हुज्जत घालत बसणार, हाही एक प्रश्नच. शिवाय, गिर्‍हाईक सोडून प्रत्येकजणच शहाणा. कसेही का होईना, काम होतेय म्हटल्यावर चूकभूल निस्तरण्याचे पुढेमागे कधीतरी कटकट झालीच, तर तेव्हाचे तेव्हा बघून घेऊ, म्हणून सोडून देण्यावाचून गत्यंतर नाही. त्यातल्या त्यात समाधानाची बाब एवढीच, की एकंदरीतच कोणाचाच पत्ता कोणालाही नसल्याने असल्या धडधडीत त्रुटींमधूनसुद्धा सहसा भानगडी निर्माण होत नाहीत. सब चलता है.

मॅरेज सर्टीफिकेट असले की काही प्रश्न येऊ नये असे वाटते.

हे खरे. पण त्यासाठी दरवेळी म्यारेज सर्टिफिकेट पुढे करणे हीदेखील एक कटकटच. शिवाय, भारतात आपल्याला देण्यात येणारी म्यारेजसर्टिफि़केटेही बहुतकरून खास फेडेबल शाईत बनविलेली असल्याकारणाने, भले लग्न टिको न टिको, सर्टिफिकेटे टिकत नाहीत. बरे, विवाहनोंदणी कार्यालयात जाऊन रि-इश्यू करवून घ्यावी म्हटले, तर 'इतक्या जुन्या नोंदी आम्ही ठेवत नाही; तुमच्याकडेच एखादे जुने सर्टिफिकेट असेल तर ते द्या, त्याची हिरव्या कागदावर झेरॉक्स काढून शिक्का मारून देतो,' असली उत्तरे मिळतात. (मु.पो. पुणे. इतरत्र याहून बरी परिस्थिती असल्यास कल्पना नाही.) आता काय करता?

मी लग्न झाल्यावरही नाव बदललेलं नाही- नाव-वडिलांचं नाव-आडनाव असे संपूर्ण तसेच ठेवले आहे. हल्लीच नवर्‍याचा पासपोर्ट रीन्यू केला त्यात माझे संपूर्ण नाव घालून घेतले आहे- पासपोर्ट ऑफिसमध्ये त्यांना माझे जसे आहे तसे नाव चालले.त्यामुळे आता पुढे काही अडचण येऊ नये असे वाटते.

पासपोर्ट ऑफिस / भारतीय कॉन्सुलेट वगैरे मंडळींना सहसा अडचण येत नाही. त्यांना हे बहुधा नित्याचे असावे. (अशा प्रकारे नवर्‍याच्या पासपोर्टात बायकोचे आणि बायकोच्या पासपोर्टात नवर्‍याचे नाव घालणे ही त्यांच्याकरिता रूटीन प्रोसीजर आहे.)

पण असे केल्याने सर्वत्र - विशेषतः भारतात - सर्व अडचणींचे निवारण होईल, अशी जर आपली समजूत असेल, तर मतभेद नोंदवू इच्छितो. (तसेही, पासपोर्टातील त्या नोंदीस इन लिउ ऑफ अ म्यारेज सर्टिफिकेट विवाहाचा पुरावा म्हणून कितीशी ग्राह्यता आहे - भारतात अथवा भारताबाहेर - याबद्दल साशंक आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गॅस गीझर किफायतशीर असतो. आणि मी गेली आठ वर्षांपासून गॅस गिझर वापरतो. त्याच्या आउटलेटला हॅण्ड शॉवर लावला आहे. गॅस गीझर कॉन्स्टंट तापमानाला पाणी देतो. त्यामुळे मिक्सरवगैरेची गरज नसते. शॉवर वापरून पाण्याची बचतसुद्ध होते.

सुरक्षेच्या दृष्टीने मात्र विजेचा गिझर चांगला. कारण विजेच्या गीझरचे तंत्रज्ञान आता चांगलेच प्रस्थापित आहे. गॅस गीझर नाही म्हटले तरी गेल्या दहा पंधरा वर्षातील आहेत.

महत्त्वाचे:
१. गॅस गिझरला सेपरेट सिलिंडर वापरणार असाल तर ठीक. पाइपिंग करणार असाल तर ते करण्याचे लायसन्स असलेल्याकडूनच करून घ्या. पुण्यात अजून बहुधा पाइप्ड गॅस नाही.
२. कोणी काही सल्ले दिले तरी गॅस गीझर बाथरूममध्ये बसवू नका. ऑक्सिजन डिप्लिशनमुळे आणि कार्बन मोनॉक्साइड + कार्बन डायोक्साइड मुळे जिवावरचा प्रसंग येऊ शकतो.

हल्ली बहुतेक सर्व गीझर (इलेक्ट्रिक तसेच गॅसचे) चायनामेडच असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

गॅस गिझर वापरायचा ठरला तर स्वतंत्र सिलेंडरच वापरला जाइल.
गीझरबाबत माझे प्राधान्य ह्या घडीला सोयीला आहेच; पण त्याहून अधिक सुरक्षेला आहे.
( बर्‍याच प्रयत्नानंतरही स्वभावातील टोकाची बेशिस्त अन वेंधळेपणा जात नाही.
त्यामुळे आपण कधी काय करुन बसू, एखादा नॉब वगैरे उधडा सोडू अशी धास्ती वाटते; म्हणून सुरक्षिततेवर अधिक लक्ष देतो.)
.
@ऋता तै:- थँक्स. तुमचा "मिस्/मिसेस" चा किस्सा झाला; त्याच धर्तीवर आमचाही किस्सा झाला. "नवरा कोण आहे?" असे समोरच्याने पत्नीला विचारले.
तिने माझे नाव साम्गताच; मग वडलांचे नाव नको म्हणून माझे नाव घालू लागला. तिच्या नावात मधले नाव माझे, आडनाव तिचे जुनेच असा विचित्र प्रकार होउ लागला.
आमच्याकडेही मागील पिढीतील सर्वांनीच नावे बदलली आहेत.
.
मला तर उलट प्रॉपर्टी, वडिलोपार्जित संपत्ती वगैरेत काही अडचण येइल वाटत नाही; लग्न प्रमाणपत्र असल्यामुळे.
त्या एखाद दोन वेळेसच करायच्या गोष्टी आहेत; त्यात हेलपाटे घालून काम मनासारखे करुन घेता येइल असा अंदाज.
पण ब्यांका, पासपोर्ट्,व्हिसा ह्या तुलनेने अधिक वेळेस करायला लागणार्‍या कामांत दरवेळी डोके लावत बसायला लागायची वेळ येउ नये म्हणून ही चौकशी.
.
अवांतर-
जसं पुरुषांना सरसकट "श्री" लावतात; तसच स्त्रियांना "श्रीमती" लावता येतं. म्हणजे स्त्री कुमारी, विवाहिता, घटस्फोटिता, विधवा काही असली तरी श्रीमती लावू शकते.
ह्या धर्तीवरची काही सोय आंग्ल भाषेत नाही काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

त्याच धर्तीवर आमचाही किस्सा झाला. "नवरा कोण आहे?" असे समोरच्याने पत्नीला विचारले.
तिने माझे नाव साम्गताच; मग वडलांचे नाव नको म्हणून माझे नाव घालू लागला. तिच्या नावात मधले नाव माझे, आडनाव तिचे जुनेच असा विचित्र प्रकार होउ लागला.
आमच्याकडेही मागील पिढीतील सर्वांनीच नावे बदलली आहेत.

मला तर उलट प्रॉपर्टी, वडिलोपार्जित संपत्ती वगैरेत काही अडचण येइल वाटत नाही; लग्न प्रमाणपत्र असल्यामुळे.
त्या एखाद दोन वेळेसच करायच्या गोष्टी आहेत; त्यात हेलपाटे घालून काम मनासारखे करुन घेता येइल असा अंदाज.
पण ब्यांका, पासपोर्ट्,व्हिसा ह्या तुलनेने अधिक वेळेस करायला लागणार्‍या कामांत दरवेळी डोके लावत बसायला लागायची वेळ येउ नये म्हणून ही चौकशी.
.

वस्तुतः, नाव बदलले/नाही बदलले, यावरून कायद्याच्या दृष्टीने काहीही फरक पडू नये. परंतु दीडशहाण्यांना तोंड द्यावे लागणार नाही, याची ग्यारंटी (विशेषतः भारतात) कोणीही देऊ शकत नाही.

कायदा आपल्या बाजूने आहे, याचा अर्थ त्याकरिता भांडावे लागणार नाही, असा नव्हे. अधिक काय वदावे?

जसं पुरुषांना सरसकट "श्री" लावतात; तसच स्त्रियांना "श्रीमती" लावता येतं. म्हणजे स्त्री कुमारी, विवाहिता, घटस्फोटिता, विधवा काही असली तरी श्रीमती लावू शकते.
ह्या धर्तीवरची काही सोय आंग्ल भाषेत नाही काय?

Ms. (उच्चारी 'मिज़') असाही एक प्रकार असतो. कोणत्याही स्त्रीस (इर्रेस्पेक्टिव ऑफ म्यारिटल स्टेटस) संबोधण्याकरिता तो वापरता येऊ शकतो. आणि ज्यांना आपली वैवाहिक स्थिती इतरांनी जाणावी अशी इच्छा नसते अथवा तशी गरज भासत नाही, अशा स्त्रिया तो आवर्जून वापरतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुण्यातील अन्य ठिकाणचे माहिती नाही. तूर्तास अस्मादिक राहतात त्या सोसैटीत मात्तर पैप्ड ग्यास आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काही सोसैट्यांमध्ये मध्यवर्ती सिलिंडर बँक द्वारा पैप्ड यलपीजी दिला जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मुलीचे नाव-
१. विवाहानंतर कोणाचे नाव बदलायची काही गरज नाही. म्हणजे एकाच नावाचे लोक एकाच कोर कुटुंबातले जास्त वाटतात पण आजकाल ती प्रथा मोडीत निघाली आहे. दुसरे म्हणजे कायदेशीर काहीच त्रास होत नाही. पासपोर्ट, रेशन्कार्ड, इ इ ला मधले किंवा आडनाव सेम असायची काही गरज नाही. हा माझा अनुभव आहे. नाव न बदलण्याचे एक-दोन तोटे आहेत. बायको जेव्हा स्वतःचे नाव मिसेस थिंगबाईजाम लिहिते (मिस लिहिणे चूक आहे कारण ती शादीशूदा आहे) तेव्हा मला ती कोण्या थिंगबाईजामाची बायको आहे असे वाटते (ती त्यांची कन्या आहे), जोश्यांची नाही. आणि कोठेही केवळ नावामुळे आम्ही नवरा बायको आहोत हे कळत नाही, आम्हाला ते स्पष्टपणे सांगावे लागते. पण हे तोटे काहीच नाहीत. बायकोचे नुसते नाव बदलायची भाषा केली तर बर्‍याच स्त्रीपुरुषसमतावाद्यांचे (खरं तर हे लोक अस्सल आतल्या गाठीचे स्त्रीश्रेष्ठतावादी असतात) बरेच बोलणे ऐकावे लागते. आयुष्यभर त्यांच्या नजरेत पडून राहावे लागते. म्हणून त्या फंदात न पडलेले बरे.

२. गिझर सतंतधार (अनुस्वार चुकला वाटतं) घेऊ नये. त्याचे तापमान ऋतुप्रमाणे बदलते. शिवाय बादलीतल्या पाण्याचे तापमान पाणी घालून काढून बदलता येते. तापमान सेट करता येणारे सतंतधार गिझर पाहिले नाहीत. शिवाय मुद्दाम स्फोट करायचा असला तर होऊ नये इतक्या सेफ्टी फिचर्स असाव्यात. ३/४ बादली इतकी क्षमता असावी. चांगल्या लोकल ब्रँडचा गिझर पैशास मूल्य असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बायको जेव्हा स्वतःचे नाव मिसेस थिंगबाईजाम लिहिते...

इंग्रजीतील 'थिंगमजिग' आणि 'थिंगमबॉब' या दोन शब्दप्रयोगांचा उगम काय असावा, याबद्दल बरेच दिवसांपासून कुतूहल भेडसावत होते; त्याबद्दल आज अचानक उलगडा झाला. नव्हे, या शब्दप्रयोगांचा उगम इंग्रजी अधिपत्याखालील मणिपूरमधील कोण्या सरकारी कचेरीत झाला असावा, याबद्दल खात्रीच पटली. त्याबद्दल मनःपूर्वक आभार.

(कल्पना करा. मणिपूरमधले एखादे बडे सरकारी कार्यालय आहे. 'थिंगबाईजाम' नामक कोणी सद्गृहस्थ तेथे जाऊन तेथील इंग्रज कारकुनास काही अर्ज सादर करतो. सरकारी कार्यालयांच्या नेहमीच्याच शिरस्त्यास अनुसरून, त्या अर्जावर थेट काही (अनुकूल किंवा प्रतिकूल, कशीही) कार्यवाही करण्याची त्या इंग्रज कारकुनास 'पावर नाय'. त्यामुळे तो कारकून तो अर्ज आपल्या वरिष्ठांकडे पुढे ढकलतो. यापुढे दोनपैकी एक गोष्ट घडू शकते. वरिष्ठ तो अर्ज त्यांच्या वरिष्ठांकडे ढकलू शकतात, किंवा मूळ कारकुनाकडे काही अधिकच्या पृच्छांसहित परत पाठवू शकतात. इन एनी केस, अर्ज बराच पुढेमागे ढकलला जातो, नि तो कारकून, त्याचे वरिष्ठ, झालेच तर त्या वरिष्ठांचे वरिष्ठ, या सर्व साखळीमध्ये त्या अर्जासंबंधात बरीच उलटसुलट पत्रापत्री होते. क्वचित्प्रसंगी, या साखळीतले कोणतेही दोन दुवे एकसमयावच्छेदेकरून एकाच ठिकाणी उपस्थित झाल्यास, त्यांच्यात या अर्जासंबंधात काही मौखिक चर्चाही होते.

आता, अर्जावर चर्चा अथवा पत्रापत्री होणार, म्हटले तर प्रत्येक वेळी संदर्भाकरिता (कोणाचा, कोठला अर्ज या संदर्भात) अर्जदाराच्या नावाचाही उल्लेख होणारच. त्यापुढे, समस्त चर्चेकरी इंग्रज असल्याकारणाने, त्यांतील प्रत्येक जण 'थिंगबाईजाम' या नावावर हमखास अडखळणार. मग पुढे काय होणार, याची कल्पना करावयास येथील प्रत्येकाची कल्पनाशक्ती समर्थ असावी.

सारांश, इंग्रजीत 'thingamajig' किंवा 'thingamabob' म्हणजे, 'something whose name you have forgotten or do not know'.)

(आणि हो, फालतू विनोदाबद्दल आगाऊ क्षमस्व!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थिंगमजिग हा शब्द फारा दिवसांपूर्वी कुठेशी वाचला होता तो या निमित्ताने पुन्हा दिसला. अर्थही आज पहिल्यांदाच कळला. धन्यवाद!

थिंगमजिग म्हणजेच पेस्तनजींचा "सूभ्रमन्नम" आहे तर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चोक्कस!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनोबा धाग्यासाठी धन्यवाद. बातमी, चित्रपट, पुस्तक साठी जसे धागे आहेत, तसाच लहानसहान सल्ल्यांसाठीपण एक धाग्यांची सिरीज हवी होती. मला पण बर्याचदा छोटेछोटे प्रश्न विचारायचे असतात. ते अशा सिरीजमधे विचारता येतील.
१. मला वाटत ज्या स्त्रियांना लग्नानंतर नाव बदलायच नाहीय त्यांनी ms नाव वडिलांचे नाव आडनाव असा पेटर्न ठेवावा. मेरीटल स्टेटस मेरीड आणि मग जिथे वडिलांचे/नवर्याचे नाव लागते तिथेपण काय द्यायचे ते एकदाच ठरवुन घ्यावे आणि सगळीकडे तेच फिक्स ठेवावे. लग्नानंतरही वडिलांचेच नाव देत राहिल्याने काही कॉम्लिकेशन येउ शकत का? काही ठिकाणी मेरीड स्टेटस असेल तर नवर्याचेच नाव हवे असते. का ते माहीत नाही. २. वीज गिझरने फार बील येत. गॅस गिझरला सेपरेट रेग्युलेटरपण लागतो का की फक्त सिलीँडर? परत बाथरुममधे न बसवणे, पाईपिँग वगैरे कटकट आहेच. हिटर आणि गिझरमधे काय फरक आहे? बादवे पावसाळा सोडल्यास दुपारी १ ते ४ फुकट गरम पाणी येत बरंका नळाला Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>गॅस गिझरला सेपरेट रेग्युलेटरपण लागतो का की फक्त सिलीँडर?

सेपरेट सिलिंडर लावला तर सेपरेट रेग्युलेटर पण लागतोच. [सेपरेट रेग्युलेटर मिळवणे ही मोठीच अडचण होऊ शकते].

>>परत बाथरुममधे न बसवणे, पाईपिँग वगैरे कटकट आहेच.

(एकाच सिलिंडरमधून दोन्हीसाठी-शेगडी व गीझर) पाइपिंग केल्यास दुसरा रेग्युलेटर लागणार नाही.

>>हिटर आणि गिझरमधे काय फरक आहे?

काही नाही.

>>बादवे पावसाळा सोडल्यास दुपारी १ ते ४ फुकट गरम पाणी येत बरंका नळाला

हा हा हा. म्हणून पुणेकर दुपारी जेवणाचे निमित्त सांगून ऑफिसातून घरी जातात काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हल्ली घरटी एकाहून अधिक रेग्युलेटर देत नाहित म्हणे.
ज्यांनी आधीच घेउन ठेवले आहे, त्यांनीही स्वतःहून ते परत ग्यास कंपन्यात जमा करावे असे फर्मान निघाल्याचे ऐकले आहे.
तस्मात्, मला नवा रेग्युलेटर मिळणे दुरापास्त दिसते.
अर्थात त्यातही जिगाड शक्य दिसतोच. आपल्या शेजार्‍याकडे आपण भाडेकरु म्हणून रहात असल्याचे दाखवायचे.
अजून एका ग्यास साठी अप्लाय करायचे. आणि त्या पत्त्यावर खुशाल एक कनेक्शन घेउन टाकायचे असा एक जुगाड स्टाइल वर्क अराउंड शक्य दिसतो.
पण माझ्याच्याने हे सगळे करवेल असे वाटत नाही.
दुसर्‍या संस्थळावर एकाने सौर गीझरचा पर्याय सुचवलाय.
पण त्यासाठी एकरकमी मोठी रक्कम द्यावी लागणार; ती लिक्विड कॅश हाताशी नाही; गुंतून/अडकून पडली आहे.(असती तरी ती मी इकडे वळवली असतीच असे सांगता येत नाही.)
सौर आणि वीज्-ग्यास वाले ह्याच्या प्रारंभिक खर्चात फारच मोठी तफावत दिसते.
वीज्-ग्यास वाले माझ्या माहिती प्रमाणे दोन अडीच हजारापासून सुरु होतात.
तर सौर गीझर तीस हजारपासून पुढे! तब्बल दहा पटीचा फरक. (च्यायला इतके पैसे हाताशी असले तर आधी मी इतर प्राधान्याच्या गोष्टींवर खर्च नाही का करणार.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सौर आणि वीज्-ग्यास वाले ह्याच्या प्रारंभिक खर्चात फारच मोठी तफावत दिसते.

होय. मी सौर आणि पर्यायी म्हणून ग्यास (पावसाळ्यात वगैरे) वापरतो. पाण्याच्या पायपाचे दोन नॉब फिरवले की सौर ते ग्यास आणि उलट असे करता येते.

सौरासाठी सात वर्षांपूर्वी पंचवीस हजार मोजले होते. पण त्यानंतर एक छदामही नाही! उर्जेला आणि निगराणीलादेखिल!!

ग्यासचा खर्च MGL च्या बिलात समाविष्ट होऊनच येतो खेरीज निगराणीसाठी काही रक्कम जातेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो गेल्यावर्षी सगळ्यांना एकपेक्षा जास्त रेग्युलेटर सरेँडर करावा लागलेला. ५किलोचे सिलेँडर पेट्रोल पंपवरुन मिळणार होते मार्केट रेटने. ते आहे का पुण्यात कुठे? तिथुन मिळेल का रेग्युलेटर की फक्त सिलेँडर?
शेजार्याचे भाडेकरुपेक्षा एक HP चा एक भारत चा करता येतोय का बघ. माझ्या माहितीनुसार तेही अशक्य आहे. देशभक्त कनेक्शन नावाचा एकप्रकार आहे. त्यात सिलेँडर अनुदानवर पाणी सोडलेल असत. तो मिळतोय का बघ सारख्याच नाव आणि पत्त्यावर. कै नै झालं तर मला व्यनि कर Wink
सौर बंगलावाल्यांसाठी ठीकय अपार्टमेँट वाल्यांसाठी कटकट होइल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असं कै नै. दोघातिघांनी मिळून घेतलं तर काही टेन्शन नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सरकारी गॅसवर सबसिडी असते. मार्केटरेट वाले चालणार असतील तर सुपरगॅस किंवा काब्सनचे घेता येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

५किलोचे सिलेँडर पेट्रोल पंपवरुन मिळणार होते मार्केट रेटने. ते आहे का पुण्यात कुठे?
पिंपरी चिंचवड , वाकड, पिंपळे सौदागर पासून ते थेट कोथरुड आणि दगडूशेठ - पेठांपर्यंत सर्वत्र ५ किलोचे सेंटर्स आहेत. पण ते कै च्या कै भावाने विकतात.
स्टीलची भांडी चाम्दीच्या बहवानं घेतल्यासारखं वाटतं त्यातून कुठूनही घेताना.
.
तिथे रेग्युलेटर मिळत नाही ह्याची खात्री आहे.
.
तिथुन मिळेल का रेग्युलेटर की फक्त सिलेँडर?
शेजार्याचे भाडेकरुपेक्षा एक HP चा एक भारत चा करता येतोय का बघ. माझ्या माहितीनुसार तेही अशक्य आहे.
तो प्रयत्न कधीचाच करुन झाला. वैध मार्गानं ते अशक्य आहे.
.
देशभक्त कनेक्शन नावाचा एकप्रकार आहे. त्यात सिलेँडर अनुदानवर पाणी सोडलेल असत.
देशभक्त कुठाय ठाउक नाही.
रिलायन्स सुद्धा विनाअनुदान तत्वावर मिळतो. पण पूर्वीचा सर्व्हिसचा अनुभव खूपच चांगला आहे.
रिलायन्स नक्कीच घेता येइल असे वाटते.
.
कै नै झालं तर मला व्यनि कर
सौर बंगलावाल्यांसाठी ठीकय अपार्टमेँट वाल्यांसाठी कटकट होइल.

२४ तारखेला मीटिंग आहे. बघुया मंडळी काय म्हणतात ते.
(आजवर बिल्डरकडे होतं देखभाल्-दुरुस्ती. आत्ता कुठे सोसायटी बनलीये अधिकृत रित्या. त्याहिशेबाने पहिलीच मीटिंग म्हणता यावी.
पण....
जाउ दे. उगाच कुणाबद्दल वाईट बोलू नये.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

असं कै नै. दोघातिघांनी मिळून घेतलं तर काही टेन्शन नाही. >> मला नाही वाटत फक्त २ ३ जणांसाठी हे करायला सोसायटी परवानगी देइल. सर्वजण तयार व्हायला हवे. ते फार अवघड वाटतय.

सरकारी गॅसवर सबसिडी असते. मार्केटरेट वाले चालणार असतील तर सुपरगॅस किंवा काब्सनचे घेता येतील. >> मला वाटत HP, भारत वगैरेकडुनच ही देशभक्त योजना चालु झालीय. गेल्यावर्षीपासुनच. सरकारी अनुदानावरच पाणी सोडायच. नवीन कनेक्शनसाठी किँवा सिलेँडरसाठी वेटिँग वगैरे काही नाही त्यात. indane.co.in/initiatives-new.php इथे दिसली ही माहिती Reactivation of Multiple connections Detected
and Blocked Permitted for conversion to Domestic subsidized
category only after KYC / de-duplication norms are satisfied.
Such connections can now be additionally converted to Non-subsidized NDEC rate connection with no KYC formalities KYC formalities and de-duplication required to re-commence subsidized cylinder entitlement.

पिंपरी चिंचवड , वाकड, पिंपळे सौदागर पासून ते थेट कोथरुड आणि दगडूशेठ - पेठांपर्यंत सर्वत्र ५ किलोचे सेंटर्स आहेत. . . तिथे रेग्युलेटर मिळत नाही ह्याची खात्री आहे. . >> च्च च्च तू ते २कि ५कि चे इलिगल कनेक्शन म्हणतोय. ते नाही म्हणतय मी. आता काही महीन्यांपुर्वी ५कि चे लिगल सिलेँडर पेट्रोल पंपावरुन मिळतील अशी बातमी आलेली.... पुण्यात नाही चालु झालय हे m.thehindu.com/business/Industry/sale-of-5kg-lpg-cylinders-allowed-at-petrol-pumps/article5314186.ece

२४ तारखेला मीटिंग आहे. आजवर बिल्डरकडे होतं देखभाल्-दुरुस्ती. आत्ता कुठे सोसायटी बनलीये अधिकृत रित्या. त्याहिशेबाने पहिलीपण.... जाउ दे. उगाच कुणाबद्दल वाईट बोलू नये.) >> चायला लवकर बनली की रे तुमची सोसायटी. आमची बनायला ५वर्ष लागली. अजुन कंवेयंस डीड झालच नाहीय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणून पुणेकर दुपारी जेवणाचे निमित्त सांगून ऑफिसातून घरी जातात काय

फुक्कटच्या गरम पाण्याने आंघोळ. नंतर शिक्रण्-पोळीचे सुग्रास जेवण (सणासुदीला मटारची उसळ वैग्रे) मग वामकुक्षी आवश्यकच!

मज्जा आहे बॉ Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या प्रतिसादाला म्हायतीपूर्ण श्रेणी कोण दिली याची म्हायती जरा द्या बॉ कुणीतरी.

(शिक्रण-हेटर, नुकताच रूममेटमुळे आईस्क्रीम-शिक्रण हे वायझेड आणि अभद्र काँबो खायला लागल्यामुळे अंतर्बाह्य हादरून गेलेला प्रंतु मटार उसळप्रेमी) बॅटमॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या वेळी मी नाही दिली. शप्पथ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी खवचट दिलेली त्याची कोणीतरी माहितीपुर्ण करुन टाकली ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आईस्क्रीम-शिक्रण - अगदीच वाईट लागू नये... बनाना स्प्लिट नामक एक डेझर्ट असते ना? हे पहा

(जालावरून साभार)

हां... घरगुती शिकरण+ आईस्क्रिम दिसताना कितपत आकर्षक दिसेल ते माहित नाही. आणि अर्थात आईस्क्रिम चा फ्लेवर केळ्याबरोबर जाणारा असावा.. व्हॅनिला, मँगो, सिताफळ,लिची मला आवडेल. स्ट्रॉबेरी, चॉक्लेट कदाचित चांगले लागणार नाही तितके.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

काय की बॉ. दिसणे खास नसले तरी चालेल ओ. सीख कबाब तरी दिसताना कुठे मोठा साजरा दिसतो? पण चवीबद्दल सांगतोय. कुठलाही फ्लेवर मला व्यक्तिशः नाय आवडणार केळ्याबरोबर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ठ्ठोsss

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

का हो पुणेकरांना टोले हाणताय उगाच Biggrin
लांब केस धुवायला एक एक तास गिझर चालु ठेवणारे लोक पाहिलेत म्हणुन सांगितल फुकट गरम पाण्याबाबत. शेवटी पैसे आपलेच जातात ना. अजुन काही आयड्या वॉशिँग मशिनचा ड्रायर फक्त पावसाळ्यात वापरायचा, फ्रिजचा नॉब मिनीममवर ठेवायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या केसमधेही बायकोने नाव बदललेले नाही. त्याची अजूनपर्यंत तरी काही विशेष अडचण आली नाही. जिथे लोक घोळ घालायची शक्यता असते तिथे आम्ही स्वतःहून नाव बदललेले नाही असे सांगतो, शिवाय सोबत मॅरेज सर्टीफिकेटची कॉपी ठेवतो. मागच्या वर्षी पासपोर्ट रिन्यु करताना बायकोचे नाव त्यात घातल्याने घोळ अजूनच कमी होतील असे वाटते.

गंमत म्हणजे एक्-दोन ठिकाणी बायकोच्या अडनावा मागे मिस्टर लाऊन मला संबोधण्यात आले. त्यावेळेपासून मीसुद्धा स्वतःला मि.'बायकोचे अडनाव' असे बर्‍याचदा म्हणतो Wink

ऑफिसमधल्या कलीगचा घटस्फोट झाल्यावर तिला प्रत्येक ठिकाणी तिचे नाव पुर्ववत करावे लागले. त्याचा तिला बराच त्रास झाला त्यावेळी तिने नाव परत कधीही न बदलण्याचा निर्णय घेतेला.

अवांतर - नाव बदलण्याचा विषय निघाल्यावर प्रिन्सेस कॉन्सुएला बनॅनाहॅमक आठवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

भारतात नाव बदलणं कायद्याने बंधनकारक नाही. अर्थात हे कागदावर. प्रत्यक्षात लग्न लागताना एकीकडे मुलीची आई (त्या लग्नात मी मुलाकडून गेले होते) यांच्यापासून ते लग्नानंतर बँकेतले कारकून, गाडीतले सहप्रवासी, भावाची मावससासू, असे लोक कोणीही ताप देऊ शकतात. तो सहन करण्याची तयारी असली की झालं. (सहन न करून सांगणार कोणाला?, असा काही प्रश्न नाही. जिकडे तिकडे चोहीकडे, बऱ्याच मुली-बायका विषय निघाला की, किंवा स्वतःच विषय काढून त्रागा व्यक्त करतात. तुम्हीही बँडवॅगनमधे सामील होऊ शकता.)

अवांतर - आमच्या ओळखीच्या एका जोडप्याने आपापली, बारशापासून असणारी नावं तशीच ठेवली आहेत. भारतात त्यांनी मुलगी दत्तक घेतली. मुलगी आता टीनेजर आहे. नावं न बदलण्यामुळे गोष्टी अडल्या नाहीत. घरी पूर्वी मि.'बायकोचे अडनाव' असेही फोन यायचे; पण आता सवय झाली किंवा लोकांना माहीत झालं. माझ्या माहितीत हे एक जोडपं. असे बरेच लोक असतील.

---

'रसिक' दुकानाचं फिरतं ग्रंथालय तुमच्या भागात येतं का ते पहा. खडकीमधे ते लोक येत असत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नातेवाइक - परिचित ह्यांचा शंख आपण न आवडणारे बरेच आवाज (जवळच मोठ्याने वाजलेली कुकरची शिट्टी, रेल्वेचा भोंगा, कॉलनीतले गणपती- नवरात्र्-दिवाळीतले धत्तड तत्त्ड आवाज)
सोडून देतो तसेच सोडून द्यावेत हे उत्तम.
किंवा फार तर आपणच त्यांच्यात सामील होउन "हली जमाना वाईट आहे. काय काय कसली ही थेरं/फ्याडं आली आहेत. " असे म्हणत खुश्शाल त्यांच्यात सामील व्हावे.
फार तर " एकदा वेळ मिळाला की नाव बदलायचेच आहे" हे ही जाहिर करुन मोकळे व्हावे.
.
बाकी ,मला व्यावहारिक गोष्टी जसे की ब्यांक , मतदार नोंदणी वगैरेंबाबत थोडी चिंता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

किंवा फार तर आपणच त्यांच्यात सामील होउन "हली जमाना वाईट आहे. काय काय कसली ही थेरं/फ्याडं आली आहेत. " असे म्हणत खुश्शाल त्यांच्यात सामील व्हावे.

आता बहुदा वेळ येऊ नये. पण पुढच्या वेळेस प्रयोग करून बघेन.

बाकी ,मला व्यावहारिक गोष्टी जसे की ब्यांक , मतदार नोंदणी वगैरेंबाबत थोडी चिंता आहे.

ब्यांकेत काहीही प्रश्न आला नाही. बँक कारकूनाला सांगावं लागलं; तिने भूत बघितल्यासारखा चेहेरा केला (ज्याची मला लहानपणापासून सवय आहे.) आणि पासबुकात खाडाखोड करून दिली.
मतदार नोंदणी ... लग्न, बिनलग्न. नाव बदललं, न बदललं ... सगळ्यासाठीच शुभेच्छा. आमच्या मयत पालकांची नावं मतदारयादीतून काढताना थोडी कटकट झाली; तीनदा सांगावं लागलं. आमची भावंडांची नावं मात्र सहज चढली. मी अजून तिथलं नाव काढलेलं नाही. सगळी कागदपत्रं आणि जनगणना, रेशन कार्ड सगळं जुन्याच पत्त्यावर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आमच्या ओळखीच्या एका जोडप्याने आपापली, बारशापासून असणारी नावं तशीच ठेवली आहेत.

माझ्याबद्दल इतकी माहीती कशी हो तुम्हास ? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गीझर बद्दल -
तुम्ही बकेट बाथ घेणार का शॉवर यावर कॅपॅसिटी ठरवावी लागेल. शॉवर ने गरम पाणी हवे असेल तर १५ लिटर चा घ्या, त्याशिवाय शॉवरला आवश्यक ते प्रेशर निर्माण होत नाही. अगदी मनसोक्त न्हात बसणारी मंडळी नसतील तर एक्दा पूर्ण तापवलेले १५ लिटर पाणी दोघांच्या आंघोळीला पुरते (बादलीने करत असाल तर तीन).

मी पाच वर्षांपूर्वी रॅकॉल्ड चा १५ लिटर घेतला अंदाजे ५००० रू ला. एक्दा घर बदलल्यामुळे त्याची परत नवीन ठिकाणी जोडणी करून घ्यावी लागली. आज्तागायत तरी काहीच प्रश्न आलेला नाही. त्यात टेम्परेचर कंट्रोल ( जास्त वेळ चालू राहिल्यास ठराविक तापमानाला पोचल्यावर आपोआप बंद होतो), अँन्टी - व्हॅक्युम चेक(गीझर ला पाणी पुरवठा करणार्‍या नळाचे पाणी गेले तर गरम पाणी सोडणारा नळ सुद्धा बंद होतो) आहे.आमच्याकडे किमान दोनदा (कधी कधी तीनदा) पूर्ण १५ मिटर तापवले जाते. वीज बिलात अंदाजे २५० रू तरी वाढ होत असावी असा अंदाज आहे (खात्री नाही कारण त्याच दरम्यान बरीच उपकरणे घरात आणली सो नक्की कोण किती वीज खातेय ते ठरवता येत नाही)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

बकेट वापरतो. एक बादली पाणी स्नानास पुरवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बकेट वापरणार्यांना ३०० ४०० रु मिळणारा रॉड पर्याय आहे. पण तो वेँधळ्यांसाठी नाही. आणि परत लहान, सरपटणारी मुलं वगैरे असल्यास रिस्की आहे. इलेक्ट्रिक उपकरणांच वेटेज बघायच. १००० वेट म्हणजे एक युनिट. मला वाटत गिझर ३००० चा असतो. एक तास वापरला की ३ युनिट. सध्या एक युनिट दर ६रु आहे बहुतेक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टो तर घरी पडलेलाच आहे. पण तो अज्ब्बा वापरायचा नाही असं ठरवलय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

नाव न बदलण्यात कुठलीही कायदेशीर अडचण येत नाही. नावामागे Ms लावलं की मिस का मिसेस हाही प्रश्न संपतो.
कागदपत्रांमधे पहिलं आणि शेवटचं नाव/आडनाव गरजेचं असतं. मधलं नाव नसलं तरी चालतं. तेव्हा फक्त नाव आणि आडनाव लिहायचं म्हणजे मधे वडील की नवरा असा प्रश्न येत नाही. तसंही महाराष्ट्राबाहेर मधे वडील्/नवरा असं नाव येत नाही, तेव्हा तेही काहीकाहीवेळा गोंधळात पडतात की ते आडनाव आहे/जोडनाव आहे की आणखी कसं

खरी अडचण असते ते बर्‍याच लोकांच्या मनोवृत्तीत. टेबलापल्याडचा माणूस बरेचदा उत्साहाने नवर्‍याचं आडनाव लावायचा, तसे सल्ले द्यायचा वगैरे जीवतोड प्रयत्न करतो. ते शांतपणे ऐकून घेऊन कायद्यावर बोट ठेवून कामं करून घ्यावी लागतात. शिवाय घरीदारीही काही उत्साही नातेवाईक नापसंती दाखवून कचकच करू शकतात. या क्षुल्लक गोष्टी सोडल्या तर नाव न बदलणं अतिशय सुखाचं असतं. कुठ्ल्याही आधीच्या कागदपत्रांवरची नावं बदलून घ्यावी लागत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाव जश्शाला तसं ठेवणं चूक आहे का? किंवा व्यवहारात काही अडचणी येउ शकतात का?

चूक नाही, काहीच फरक पडत नाही, पुण्यात रहाणार्‍याला तर शष्प फरक पडत नाही(पडु नये), पण नाव बदलावं का हा मात्र वैयक्तिक प्रश्न आहे.

घरात गीझर घ्यायचे घाटत आहे. कोणता बरा राहील? गीझर वापरण्याबाबत आपला अनुभव काय आहे?

थत्ते म्हणतात त्याप्रमाणे गेले ८-१० वर्षे गॅस गिझरच वापरतो, पण ऑक्सिजन डिप्लिशनमुळे आणि कार्बन मोनॉक्साइड + कार्बन डायोक्साइड मुळे जिवावरचा प्रसंग आल्याचे आमच्या शेजारीच दोन वेळा घडले आहे त्यामुळे वापरण्याबाबत पर्टिक्युलर असाल तरच वापरा, अन्यथा विजेचा हिटर उत्तम, फक्त विज-बील जास्त येते.

@थत्ते - <<पुण्यात अजून बहुधा पाइप्ड गॅस नाही.>> हल्ली नव्या सोसायट्यांमधे ती सोय असते, त्यामुळे पुण्यात नसला तरी बिल्डींगमधे नक्कीच आहे. Tongue

पुण्यात किम्वा पिंपरी चिंचवडात फिरत्या लायब्रर्‍या उपलब्ध आहेत का? त्यांचे नाव, पत्ते, संपर्क माहिती कुठून मिळेल?

पुणे मराठी ग्रंथालयाच्या शाखा(बहुदा फिरत्या शाखा) आहेत/होत्या, त्या पिंपरीला आहेत का ह्याबद्दल माहिती नाही, ग्रंथालयात सविस्तर माहिती मिळेल, अन्यथा ऑनलाईन लायब्रर्‍या घरपोच उत्तम पुस्तक सेवा माफक दरात पुरवतात(पिंपरीमधेपण), त्यांची माहिती तुर्तास नाही, नंतर प्रतिसादात डकवतो.

पिंपरी चिंचवडात हिरो होण्डाची दुचाकी सर्व्हिसिंगला टाकण्यास चांगले ठिकाण ठाउक आहे का? एखाद्या चांगल्या , कुशल मेकॅनिकचा पत्ता देउ शकाल काय?

आयड्या नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तर भारतात मिडलनेम हे नसते किंवा असलेच तर बापाचे नाव नसते. माझे मिडल नेम भास्करराव आहे. किती तरी मित्रांना वाटते अरुण चंद जोशी, अरुण कुमार जोशी, अरुण लाल जोशी, अरुण रंजन जोशी अशी सहज मिडलनामे न वापरता मी इतके काँप्लिकेटेड भास्करराव सारखे मिडलनेम का वापरतो.

शिवाय भारताचे पासपोर्ट चे नाव लिहायचे नियम आणि आमच्या खानदानाचे मिडलनेम लिहायचे नियम मॅच होतच नाहीत. उदा. (माझे नाव - अरुण भास्करराव जोशी.) मी लिहितो ते वडीलांचे नाव - भास्करराव भगवंतराव जोशी.
वडिलांचे स्वतःचे ते स्वतः लिहितात तसे नाव - भास्कर भगवंतराव जोशी. याच्यात राव नाही. त्यांच्या कागदोपत्री हे नाव आणि माझ्या कागदोपत्री वरचे नाव. बोंबला. घोळच घोळ.

म्हणून मी आमच्या सुपुत्राचे नाव दोन अक्षरीच लिहिले - ईशान्य जोशी.
(इंजिनिअरिंगला, इ, महाराष्ट्रात (सीओइपीत) अ‍ॅडमिशन झाले तर रॅगिंगच्या वेळी 'माझे नाव 'कुमार ईशान्य अरुणराव जोशी' आहे' हे चड्डीसलाम करत कसे सांगायचे हे त्याला शिकवले तर काम संपले.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

१०वीत असताना जेव्हा परिक्षेचा फॉर्म भरत होतो त्यावेळी आमच्या शिक्षकांनी सगळ्यांना वडीलांच्या नावापुढे 'राव' न लावण्यास सांगीतले. 'राव' हे आपण रिस्पेक्ट खातर लिहितो, ते आमंत्रण पत्रीकेवर ठिक दिसते, पण ऑफिशियली फक्त नावच लिहावे असं सांगितलं. त्यामुळे ह्या 'राव' प्रकरणाचा जनरली होतो तसा त्रास कधी झाला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

शीओईपीत आता र्‍यागिङ्ग नसते-विदर्भवाल्यांची ग्यारंटी नाही. बाकी भौतेक सबरीजन्समध्ये ते आमच्या वेळेपासूनच बंद झाले. याला कारण आमचे उत्साही कोल्लापूरकर ब्याचमेट्स. शीनियरलाच मारले, काय करतील बिचारे. त्यात परत अँटी र्‍यागिंग लॉ आल्यापासून भौतेकांची हवा टाईट झालेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गॅस गिझरसाठी अनुदानित सिलिंडर वापरणं अलौड नाहीये असं कुठेतरी वाचलं होतं. कमर्शियल वापरावा असा नियम आहे म्हणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

>>गॅस गिझरसाठी अनुदानित सिलिंडर वापरणं अलौड नाहीये असं कुठेतरी वाचलं होतं. कमर्शियल वापरावा असा नियम आहे म्हणे.<<
अनुदानित वापरता येणार नाही(पुर्ण पैसे द्यावे लागतील), पण कमर्शिअल गॅस घरगुती कारणासाठी कसा वापरणार? अधिक माहिती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'हे कारण देउन अधीकचा रेग्युलेटर मिळणार नाही' असा नियम असेल. एकाच रेग्युलेटरमधुन पाइपिँग केलं तर चालायला हव. शेगडीवर पाणी तापवलं की चालतच ना :-P. ९ अनुदानीत सिलीँडर मी कशासाठीही वापरु शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असे काही असू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माझ्या बायकोने नाव बदलले नाही. माझ्या पासपोर्टात तिचे नाव नाही. कोणताही ताप झालेला नाहीय.
मला आणि तिला माझे नाव आवडत नव्हते म्हणून मी माझे नाव बदलले. तिच्या पासपोर्टात माझे जुनेच नाव आहे. कोणताही ताप झालेला नाहीय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या पासपोर्टात तिचे नाव नाही

म्हणजे पासपोर्ट लग्ना आधिचा असावा. आता जेव्हा रिन्यु करायची वेळ येईल तेव्हा फॉर्ममधे मॅरिटल स्टेटस मॅरीड म्हणून टाकल्यावर बायकोचे नाव टाकावेच लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

सर्वांचे मनःपूर्वक आभार.
ऐसी संपादकांना विनंती :- जमल्यास अशा धाग्याम्चीही मालिका सुरु करावी.( ही बातमी वाचलित का, हे पाहिलत का, पुस्तक वाचल्म का वगैरे मालिकांसारखं.)
मला बर्‍याच वेळी चौकशी करायचं काम पडतं. इतरांनाही पडत असेल तर ती मालिका कामला येइल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हो, अगदी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

स्त्री अथवा पुरूष दोघांनाही लग्नानंटर नाव बदलणे गरजेचे नाही. तो त्या व्यक्तीचा ऐच्छिक मामला आहे.
मात्र नाव बदलायचे आहे की नाही हे अपत्याचे बर्थ सर्टिफिकेट बनवायच्या आत नक्की करा. कारण एकदा त्यावर आईच व वडिलांचे नाव आले की मग नाव बदलणे कठीण होत जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बदलायचे नाही असेच ठरले आहे. फक्त काही व्यावहारिक किंवा कायदेशीर अडचण येउ नये ह्यासाठीच ही चौकशी.
उद्या मी गचकलो तर निदान इन्शुरन्सची रक्कम घेताना काही त्रास होउ नये.
ती होणार नाही*, असेच दिसते.
.
मी गचकलो नाही, तर (निदान इन्शुरन्स बाबतीत तरी) त्रास नाहिच.
मी गचकलो तरी म्यारेज सर्टिफिकेट काम भागेल असे दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हे पत्नीचे झाले.. तुमचे नावही बदलायचा विचार असल्यास त्या आधीच करा. (सिरीयसली सांगतोय. माझ्या ओळखीतल्या एकाला आडनाव बदलायची हुक्की बरीच 'उशीरा' आली त्यानंतर आजतागायत तो कोणत्या ना कोणत्या कचेरीत कस्ले कस्ले अर्ज घेऊन फिरताना दिसतो असे ऐकू येते ;))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझेही नाव बदलणे नको.
मी काही युटी आय ब्यांकेसारखा बदनाम झालेलो नाही; की माझे नाव अ‍ॅक्सिस ब्यांक करावे Wink
(हिटलर च्या चुलत नातेवाईकांनी आडनावे बदललीत म्हणे. आमच्यात असं कुणी ज्यामुळे नाव बदलायला लागेल अस्म भयंकर कृत्य केलेलं नाही. त्यामुळे तीही शक्यता गेली.)
थोडक्यात; आहे त्या नावात कम्फर्टेबल आहे; बहुतांश व्यक्ती असतात्;तसाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अवांतरः हिटलरच्या चुलत नातेवाईकांनी आडनाव बदलले नसून हिटलरच्या आजोबाने स्वतःचे वय ८२ च्या आसपास असताना वेइत्रा नामक गावात तीन साक्षीदारांसमोर शिकलग्रुबेर हे आडनाव बदलून हिटलर असे ठेवले. तेच त्याच्या बापाने - अ‍ॅलॉइसने कायम ठेवले. शिकलग्रुबेर हे आडनाव म्हणे तेव्हाच्या जर्मनीत गावंढळ समजले जायचे.

अतिअवांतरः बाळ सामंतांनी आपल्या हिटलरचरित्रात अजून एक मुद्दा उपस्थित केलाय. ते स्वतःचंच मत मांडत होते की दुसर्‍या कुणाचं मत सांगत होते ते आता विसरलो. एनीवेज़ मुद्दा असा की आडनाव बदललं नसतं तर हेल हिटलर च्या ऐवजी हेल शिकलग्रुबेर म्हणताना कसंसंच वाटलं असतं वगैरे वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी आजोबांबद्दल बोलत नाहीये.
आपल्याकडे काही गटांत हिटलर आणि फासिस्टांचं गौरवीकरण सुरु असताना खुद्द जर्मनीत हिटलरशी संबंधित लोकही स्वतःची ओळख लपवू पाहतात.असे विधान करु इच्छिनारय एका अभ्यस्त माणसाचा लेख वाचला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

थँक्स फॉर द क्ल्यारिफिकेशन. हिटलरचे काका वैग्रेंनी बदललं असेलच. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गुगलिंग केल्यावर हे भेटलं. मी म्हणत असलेला लेख ह्याच संदर्भात होता:-

But Hitler had an Irish nephew: William Patrick Hitler. Born in Liverpool, he was the son of Adolf's half-brother Alois Jr. As William's tyrannical Uncle seized power he moved to Germany to welch off of his famous relation. Adolf and the boy never got along and William tried to blackmail the dictator into giving him more money and power. He eventually escaped Germany and went to America where he enlisted in the U.S. Navy to help defeat his now hated uncle.

And William Patrick had 4 sons! So the Hitler bloodline is still around...sort of. William Patrick changed his name to Stuart-Houston and lived in New York. He died in 1987.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माहितीकरिता आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आधार कार्डाची भानगड नक्की काय आहे?
सुप्रीम कोर्टानं सब्सिडी सिलिंडारांसाठी आधार क्रमांकाची सक्ती नाही असा निकाल देउन महिन्याहून अधिक काळ लोटला असेल.
पण माझे गॅस वितरक आधार क्रमांक मागू लागलेत.
मला आधार क्रमांक आणि त्याची सॉफ्ट कॉपी नुकतीच मिलाली नेटवरून .
पण अजून कुठल्याच ब्यांक अकाउंटशी मी ते संलग्न केले नाही. तर ते मला बजार भावानं शिलिंडर घे म्हणताहेत.
नक्की घोळ काय आहे?
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध नाहिये का हे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कोण रे भारत पेट्रोलीअम? रतन का? करुन टाक संलग्न एका अकाउंटशी. मी पण केलय, पण त्यानंतर सिलीँडर नाही घेतला अजुन. अनुदान मिळाले तर छानच आहे. नाही मिळाले तर आपण 'देशभक्त' आहोत असे समजायचे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वितरक बदलूनही उपयोग नाही.
मला शक्यतो आधार कार्डाशी काही संलग्न करायचे नाहिये; निदान ब्यांक खाते तरी.
अगदि नाइलाजच झाल तर गोष्ट वेगळी.
आणी सुप्रीम कोर्टाचं म्हणणं ही मंडळी असं उडवून लावू शकतात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पगार, लोन वगैरे ज्या बँकेत आहे ते करु नको लिँक. कमी बेलन्सच SBI/BOM असं फक्त अनुदानासाठीच एक अकाउंट ठेव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

का?
.
anybody there?
लोन अकाउंट वाले खाते किम्वा पगार खाते का संलग्न करु नये?
.
किम्वा नक्की कोणते संलग्न केलेले बरे राहिल?
काही अनुभव्/सल्ला/तर्क?
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

>> लोन अकाउंट वाले खाते किम्वा पगार खाते का संलग्न करु नये?
.
किम्वा नक्की कोणते संलग्न केलेले बरे राहिल? <<

सरकारला खात्याविषयी तपशील कळले की काही तरी घोटाळा होण्याची आणि तुमचे पैसे गडप होण्याची शक्यता वाढते; म्हणून ज्या खात्यात फारसे पैसे नसतील असं खातं संलग्न करा असा ह्यामागचा तर्क बहुधा असणार. पण खरं तर पॅन कार्ड संलग्न केलेल्या सगळ्या खात्यांची सरकारला माहिती असतेच. किंबहुना सगळ्याच बँक खात्यांची सरकारला माहिती असते. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मग ठीकय!
शून्य ब्यालन्स वालं पाचवं अकाउंट आताच उघडलय.
दरवेळी स्विच मारला की नवनवीन ब्यांकेत खाते उघडणे भाग पडते.
भरपूर ऑप्शन्स आहेत मजकडे. असो.
तर्काबद्दल आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तुच म्हणालास 'मला शक्यतो आधार कार्डाशी काही संलग्न करायचे नाहिये; निदान ब्यांक खाते तरी. अगदि नाइलाजच झाल तर गोष्ट वेगळी.' म्हणुन एक पर्याय सुचवला.

बादवे पगार अकाउंट मधे पगार जमा होण बंद झालं की काही दिवसांनी/महिन्यानी/वर्षाँनी तो नॉर्मल अकाउंट बनतो असं ऐकलय. खखोदेजा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> मला शक्यतो आधार कार्डाशी काही संलग्न करायचे नाहिये; निदान ब्यांक खाते तरी. <<

सिलिंडर बाजारभावानं विकत घेण्याची तयारी असेल तर मग काहीच अडचण येऊ नये. पुणे जिल्हा हा अशा 'डायरेक्ट ट्रान्स्फर' योजनांसाठी पथदर्शक म्हणून निवडला गेला आहे. त्यानुसार आता काही वितरकांकडे ही योजना कार्यान्वित झाली आहे आणि इतरांकडे होते आहे. माझ्या ओळखीत काही जणांकडे सकाळी सिलिंडर पोचला आणि संध्याकाळी बँक खात्यात रक्कम जमा झाली असे प्रसंग घडले आहेत.

ह्या संदर्भात पुणे जिल्ह्याच्या कलेक्टरांकडून आलेलं विधान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

प्र का टा आ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तीन लिटरचं इन्स्टंट गीझर,इलेक्ट्रिक्वालं बशिवलं.
स्मिथ, बजाज हे आघाडीचे ब्रँड आहेत असं कळलं.
दोन्हीही चांगलेच आहेत;उन्नीस-बीस चा किंमत आणि
दर्जात्मक फरक दोन्हिंत असेल असे मार्केटम्धील गप्पांतून व शेजार्‍यांकडून गप्पांतून जाणवले.
.
.
आधार क्रमांक अजून ग्यासवाल्याकडं रजिष्टर केलेला नव्हता.
तरीही शिलिंडर आणलं. घरपोच डिलिव्हरी + शिलिंडरची किंमत अशी ४३९ रुपये किंमत पावतीवर होती.
वेळेची निकड बघून साडेचारशे रुपये द्यावे लागले.
ग्यासवाल्याकडे यु आय डी नंबर रजिष्टर करण्यासाठी भन्नाट झुंबड उडालेली दिसली.
.
.
माहिती दिल्याबद्दल , सर्वांचे आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वरचे गॅस - आधार कार्ड- बँक खाते बद्द्लचे प्रतिसाद वाचले त्यातून असे वाटले की आधार कार्डाशी कोणत्याही बँकेचे खाते संलग्न करता येते आणि गॅस स्बसिडीसाठी ते चालते. पुण्यात (भारतगॅस) असं कळलं की फक्त महाराष्ट्र बँकेचे खाते गॅसवाल्याना चालते. इतर चालत नाहीत. माझ्या बाबतीत आधार कार्डाशी एका दुसर्‍या बँकेचे खाते संलग्न केलेले आहे-ते चालणार नाही. हे बरोबर आहे का? की वेगवेगळ्या भागात/गॅसवाल्यांचे वेगळे नियम आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असे काही ब्म्धन असल्याचे ऐकण्यात आलेले नाही.
आले तर सर्विस प्रोवायडर विरुद्ध शक्य तितकी बोंबाबोंब करेन.
(मी कुठे खाते सुरु ठेवावे ह्यावरही बंधने आणणे म्हणजे जरा जास्तच होत आहे. पगारी खात्यासाठी हे बंधन मी रोजगाराच्या कराराच्या वेळीच स्वीकारलेले असते.
इथे ते मागाहून जोडण्यात येत आहे. नवीन खाते उघडणे आणि ग्यासवाला सेवादात बदलणे ह्यापैकी कमी त्रासदायक जे काम असेल ते मी करेन.
शक्यतो गॅसवालाच बदलेन.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

भलतीकडचा प्रतिसाद इथे पडला म्हणून प्रकाटाआ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आज २७ नोव्हेंबर.
२४ तारखेला मंडईत ५०रुपये किलो कांदे सांगितले. ते आणले नाहित. इतरत्र हातगाडीवाल्यांडेही तोच भाव दिसला.
२५ तारखेला मंडईजवळच एक ऑटो का गाडी काहीतरी येउन विशिष्ट वेळेत स्वस्त दराने भाजी विक्री होत असल्याचे कळले.
स्वतः शेतकरीच येउन अशी भाजी विकत असल्याचे पूर्वीच्या एरियातील अनुभवाने ठाउक होते; ह्या भागातही तसेच असल्याची आयडीआ नव्हती.
ठरल्यावेळी ते गाडी आली. ५० रुपयात २ किलो कांदे २५ तारखेस आणले.
.
२६ तारखेला त्याच ठिकाणी त्याच गाडीवाल्याकडून ३० रुपयात दोन किलो कांदे मिळाले.
.
हे स्वस्त कांदे " आमच्या शेतातले कांदे आहेत" ह्या संवादानंतर जे डोळ्यासमोर येतात तसेच आहेत.
चवीला झक्कास. ताजे. पण आकाराने लहान.
ग्रामीण व निमशहरी भागात इलुसा कांदा बिंदास बुक्कीने फोडून खायची पद्धत आहे ना, त्यासाठी लागतो, तसाच हा कांदा आहे.
मंडईतील कांदे मोठाले होते. चव तितकीशी क्लिक नाही झाली मला मोठ्या कांद्याची.
.
.
ऐसीकर गब्बर सिंग सारख्या विचारांच्या रेट्याने काही काळातच लहान कांदे मार्केट फोर्सेस च्या प्रवाहात नामशेष होणारेत म्हणतात.(वॉलमार्ट स्टाइल धूर्त विक्री ष्टाइलमुळे)
मिळताहेत तोपर्यंत हादडून घ्यावेत असा विचार होता.
.
.
कोथ्रुडात सहजानंद जवळसुद्धा अशी गाडी येइ. सिम्हगड रोड आणि वारजे नाक्यासही थेट शेतकरी विकत असत.
थेट शेतकर्‍याकडे पैसा जात अस्लयाने मीही फारसा भाव करत नाही. त्यांच्याबद्दल थोडा सॉफ्ट कॉर्नर आहे ना मनात.
.
.
पण हे कायदेशीर आहे की नाही माहित नाही.
शेतकर्‍यांनी कृषी उत्पन्न बाजर समिती वगैरे मार्फतच धान्य, फळे, भाजीपाला विकला पाहिजे असे काही बंधन आहे की काय असे गंगाधर मुट्यांचे मिपा-मिमराठीवरील लेखन वाचून वाटते.
.
.
तर सांगायचे इतकेच की कांदा ५०रुपये किलोपासून ते थेट १५रुपये किलोपर्यंत येण्याचा प्रवास केवळ ४८ तासाच्या आत दिसला.दोन दिवसाहून कमी वेळेत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कांदा लहान आहे की मोठा त्यावर चव निगडीत नसावी. आकार कांद्याच्या जातीवर अवलंबून असतो. चवीसाठी कांदा किती निवला आहे हे महत्त्वाचे आहे. कच्चा कांदा किंवा ओला कांदा किंवा पिकला कांदा चवीत डावा ठरतो.

कच्चा कांदा अधिक तीव्र वासाचा असतो. (आकाराने कसाही असु शकतो)
ओला कांदा दिसायला चकचकीत वैग्रे असतो, रंगही छान असतो पण चिरताना भयंकर पाणी येते व चवीला पुचाट - पाणचट निघतो. (आकार साधारणतः मध्यम)
पिकला कांदा - उतरलेला कांदा अर्थातच चव/वास/कांद्याने जी एक सुक्ष्म कीकबसते त्याच्या अभावाचा असतो (आकार कसाही असु अवलं)

निवलेला कांदा ओळखावा कसा: बाहेरील साल पूर्ण वाळलेली, ती हाताने सहज बाजूला होणारी, आतील सालही कोरडी, त्याच्या आतील साल हिरवी/लाल नसावी. कांद्याला अतीउग्र वास नसावा
एकदा सवय झाली की चकाकी टेक्शचर कडे बघुनच लक्षात येईल

(आमच्या इथेल्या रविवार बाजारात लहान कांदे गेले तीन आठवडे बाजारात आहेत. पण फक्त गेल्या आठवड्यातले निवलेले होते. त्याआधीचे कच्चे होते)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तुमचे म्हणणे करेक्ट असू शकते. (निवलेले कांदे,पिकलेले कांदे वगैरे)

"हापूस आंबा साला गोड असतो. त्याच्या सारखी गोडी आणि चव इतरत्र विरळाच. तोतापुरी छान, पण निव्वळ खोबर्‍यासारखा सपक लागतो. गोडी त्यात नाहिच." हे माझे विधान.
"कैरी कच्ची असताना आंबट असते. तिचा आंबा बनू लागला की आंबटपण कमी होउन, गोडवा वाढीस लागतो" हे तुमचे विधान.
आपली चर्चा काहिशी अशी चालली आहे. तुम्ही म्हणताय ते बरोबर असू शकते; पण त्याच वेळी लहान आणि मोठे कांदे ह्या दोन वेगळ्या जातीही असू शकतात.
(आंबेमोहोर आणि इंद्रायणी ह्या तांदळापेक्षा टिपिकल बासमती लांबसडक असतो,मोठा असतो. )
.
.
शेतीतील जाणकार माहिती देतील काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मी प्रतिसादात बरेच अध्यारूत सोडले असे दिस्तेय! Smile

मला म्हणायचे होते निव्वळ "लहान" कांदा चवीला चांगला असतो म्हणून नेहमी घेत जाऊ नका तो निवला आहे की नाही तेही बघा. बाकी प्रत्येकाच्या घडलेल्या चवीप्रमाणे कोणाला कोणती जात आवडावी यावर काहीच मत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अध्याहृत हा खरा शब्द आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ऋ लृ प्रमाणे हृ हे व्यंजन बाराखडीत असायला हवे ना.
ते का नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वरिजिनल संस्कृतची बरीचशी मशिनरी "होऊ दे खर्च, व्याक्रण आहे घरचं" करत मराठीनं घेतली खरी. त्यात ऋ, लृ हे स्वर आहेत. हृ म्हणजे ह् + ऋ असे जोडाक्षर आहे. त्यामुळे ते बाराखडीत नाही.

स्वर व्यंजनांची आधुनिक कल्पना आणि जुनी कल्पना मोस्टलि अंमळ वेगळी आहे. आज पाहू गेले तर कदाचित ऋ, लृ स्वर होणारही नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्वर म्हणजे ज्यात घशातला आवाज बिना-अडथळा बाहेर पडतो ते अ-आ-इ.
व्यंजन म्हणजे ज्यात घशातल्या आवाजाला अडथळा आणून वेगवेगळे आवाज निघतात ते. म्हणजे प उच्चारताना ओठ बंद करून अडथळा आणला जातो. त म्हणताना जीभ दातांना लावून अडथळा आणला जातो.

बरोबर ना?
शास्त्रीय गायक आ-आ मध्ये का गातात याचे स्पष्टीकरण म्हणून एका कार्यक्रमात ऐकले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पूर्णतः तसे नसावे. कारण कंठव्य मूळाक्षरे (क, ख, ग, घ आणि ङ (? उच्चार ठाऊक नाही Wink )) हेदेखिल विनाअडथळा उच्चारता येतात, असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अडथळा या ना त्या प्रकारे होतोच. स्वरांचा अडथळा आणि व्यंजनांचा अडथळा यात मेन फरक म्हणजे स्वरांमध्ये जीभ वरती टेकत नै. अँड व्हेन आय से जीभ टेकत नै, जिभेचे टोक अ‍ॅज वेल अ‍ॅज मागचा भाग त्यात अंतर्भूत आहे. क ते ङ हे वर्ण उच्चारताना जिभेचा मागचा भाग वरती टेकवला जातो. जिभेचे टोक कुठे पिच्चरमध्ये नसल्याने तो अडथळा वाटतो इतकेच. वरच्या जबड्याची एक जागा निवडा, तिथे जिभेचे टोक किंवा मागचा भाग लावा आणि उच्चारा असे क ते म वर्णांचे उच्चाराचा फंडा आहे. जिभेचे टोक लवचिक असल्याने दातांपासून ते पार मागेपर्यंत टेकवता येते, जिभेचा मागचा भाग मात्र तितका हलवता येत नसल्याने तो एकाच ठिकाणी टच करता येऊ शकतो. त्यामुळे मागच्या टोकाने उच्चारलेले वर्ण म्हणजे क ते ङ तर टोक कुठेतरी लावून उच्चारलेले वर्ण म्हणजे च ते म.

आता इथेही स्पर्श, घोष, ईषत्स्पर्श वैग्रे भानगडी आहेत. स्पर्श म्हणजे कसे की गळ्यातली हवा गोळा होते जिभेमागे, आणि जणू घंटा वाजवल्याच्या थाटात जीभ जबड्यावर आघात करते, सेकंदभरासाठी टच करते आणि पुढे येते. तो स्पर्श सेकंदभराचा पण वेल डिफाईन्ड असतो. य, श, ष, स वैग्रेंची केस तशी नाही. तेव्हा हवा ब्लॉक न होता कंटिन्युअसलि बाहेरच पडत असते, जिभेच्या पोझिशनप्रमाणे उच्चार बदलतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मग कोणताही स्वर असणार नाही अ/आ म्हणतानाही तोंडाच्या पोकळीचे आकार वेगवेगळे करून घशातील आवाजाला वेगवेगळ्या प्रमाणात अडथळा निर्माण केला जातो.
शिवाय अं, औ, ऐ वगैरे स्वरात तर अडथळाअ स्पष्ट जाणवतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मॉडर्न कल्पना साधारण अशी आहे खरी. जर जिभेचा अडथळा कुठल्याही प्रकारे ती वर टेकवण्यातून तर ते व्यंजन, नैतर स्वर. ऋ आणि लृ इथे बसतील असे वाटत नाही.

(व्याक्रण नीट शिकायला लागतंय Sad )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्वर व्यंजनांची आधुनिक कल्पना आणि जुनी कल्पना मोस्टलि अंमळ वेगळी आहे. आज पाहू गेले तर कदाचित ऋ, लृ स्वर होणारही नाहीत.

जुनी कन्सेप्ट काय होती? अंमळ जाणून घ्यायला आवडेल. काहीतरी इंटरेस्टिंग* दिसतय.
पूर्वी कचटतप अशी अयदी पाणिनी ची नव्हती असे ऐकले आहे.
त्याचे नियम पहिल्यांदा स्म्धी-विग्रह संदर्भात ऐकले तर विचित्र वाटले.
अच अल लट लुट असे काय काय नियम होते.
म्हंजे त्याने सरळ त्या त्या अक्षराम्ची ज्म्त्रीच दिली होती.
क्चटतप हे त्याच्या काळातले रुप नव्हे असे वाटते.
माहिती द्या. पाहिजे तर वेगळा धागा काढा.
.
.
*"रोचक" हा शब्द टाळायचा होता, म्हणून आंग्ल शब्दाचा आधार घ्यावा लागला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

धन्यु!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पुचाट = नपुंसक,
पोचट शेंग = आत बिया नसलेली अथवा अत्यंत अशक्त बिया असलेली शेंग
पांचट/पाणचट = पाणी जास्त असलेली बेचव चव

हे अर्थ बरोबर आहेत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुचाट चा अर्थ जण्रल "निष्प्रभ", पानीकम, इ.इ. छापाचा आहे. नपुंसक म्हणून विशेषरीत्या हा शब्द वापरल्याचे पाहिले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गावरान ज्वारीचेही एक भन्नाट केंद्र सापडले आहे औरंगाबादेत.
त्यांची ज्वारी पिवळी धम्मक नसते. काहीशी लालसर असते.
अर्थातच पारंपरिक पद्धतीने पिकवल्याने बरीच महागही असते.
(इथे काही लोकांना ज्वारी पिवळी नसते ; तो हायब्रिडिकरणाचा
आणि आधुनिकीकरणाचा परिणाम आहे हे पटतच नाहिये.
त्यांना आणून ते दाणे दाखवायाचे प्रॉमिस केले आहे.)
त्या ज्वारीच्या पीठास स्वतःची अशी एक चव असते.
नुसतीच खाल्ली तरी मस्त लागते.
(सोबत लोणी किम्वा ठेचा कींवा कांदा असल्यास दुग्धशर्करा योग.)
त्या चवीवर जीव कुर्बान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

जवारीचे चिकार प्रकार आहेत. मी बहुधा सारे चाखून पाहिले असावेत. १०-१२ तरी आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

माहिती द्याल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तसेच बाजरीचे. एरवी बाजरीच्या पिकाला तब्बल पाच महिने लागतात, पण त्या बाजरीची चव अहाहहाहाहाहा.. काय वर्णावी म्हाराजा! आशी आस्तेय!
पाचेक वर्षांपूर्वी वारूगडावर पहिल्यांदा ही बाजरीची हाकर खाल्ली होती (आठवा : दोन धनगर - झैरात म्हणा हवं तर ; ) ), तेव्हा पासून ही धान्य नॉन-हायब्रीड रुपातही खाऊन बघायची आवडच लागली आहे. वेळ/चान्स मिळताच अशी ज्वारी/बाजरी/नाचणी वगैरे मिळवत असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अपेक्षित आश्चर्य सामोरे आले!
आता येताना रस्त्यात मंडई लागली.
तिथे कांद्याचा भाव ४० रुपये किलो!
तीनेक किलो घेतो म्हटले तरी पै सुद्धा कमी केली नाही.
किंवा माझ्या चेहर्‍यावरून "ह्या: ह्याला काय तीन किलो परवडतात" असे वाटले किंवा अगदि त्याउलट
" हा गबर पैसेवाला दिसतो. खरं तर ह्याला दोनेकशे रुपये किलो सांगितले असते तरी ह्यानं पाच्-सात किलो घेतले असते.
आता निदान भाव अजून कमी करायला नको. " असे वाटले ते ठाउक नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

एक सुचवणी.
या धाग्याच नाव 'ऐसीला विचारा: घरगुती प्रश्न - भाग १' असे कर. तो दुसरा अमेरीकन जमातीवाला धागा त्याच नाव 'ऐसीला विचारा: जनरल प्रश्न - भाग १'. मग अरुणजोशीँच्या दोन्ही धाग्यांची नाव 'ऐसीला विचारा: विज्ञान/तांत्रिक प्रश्न - भाग १,२'. मला वाटत मन्दारच्या विमानविषयीच्या धागा वेगळाच राहुदेत. तिथुन हारुन शेख यांचा प्रतिसाद अरुणजोशीँच्या धाग्यावर हलवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुचवणी आवडली. जर धागाकर्त्यांना योग्य वाटली तर त्यांनी स्वयंसंपादनाने बदल करावे हे अधिक योग्य

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

थोड्याफार फरकाने ते केले.
घरगुती व जनरल दोन्ही एकाच धाग्यात टाले; भाग१ , भाग २.
मालिका तरी किती सुरु करणार असे कुणाला वातू नये, म्हणून घरगुती व जनरल ह्या दोन वेगळ्या ठेवल्या नाहित.
एकत्र मालिका बनवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मी काढलेल्या धाग्यांत कोणताही रँडम विचार लिहायची सोय असावी असा माझा विचार आहे. तो प्रश्नच असावा असे नाही आणि विज्ञानाचाच असावा असे तर मुळीच नाही. ज्याच्या फार चर्चा अपेक्षित नाही, वेगळा धागा अति वाटेल अशा गोष्टी तिथे लिहायच्या अशी आयडीआ आहे.

उदा. आज 'ट्रॅफिक' विषयावरच्या विविध साधनांची ब्रोचर्स पाहत होतो. ते पाहताना सहज विचार आला कि स्वतःला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, इ समजणार्‍या अशा कंपन्यांत काम करणार्‍या माझ्यासारख्या लोकांची खरी जात केव्हाच लोहार, सुतार, गाडीवान, अशी झाली आहे.इथे यावर मोठी चर्चा अभिप्रेत नाही. आशय विस्तृत करून मांडायची इच्छा, इ नाही. (डोळा मारत) ही सिरिज एकट्याने जिवंत ठेऊ शकतो असा आत्मविश्वास आहे.

घरगुती प्रश्न हे किचकट असले (बायकोचे नाव, सिलिंडर, इ) तर प्रत्येकाचा धागा वेगळा असावा (किंवा नंतर करता येइल). ऐसीवर घरगुती प्रश्नांची बरीच लड लागणार असेल आणि ते थोडक्यात निपटावता येणार असतील तर घरगुती प्रश्नांच्या धाग्याला (सिरिजला) अर्थ आहे असे मला वाटते.

पण आमचं म्हणणं काहीही असलं तरी परिचालकांच्या शब्दांपलिकडे आम्ही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ओके Smile माझा विचार बातमी, चित्रपट, संगीत, खाणे सारखी धाग्यांची मालिका बनवावी असा होता. एकाच माणसाने पुढचे भाग काढायला हवे असे नाही. १०० प्रतिसाद झाले की नवा भाग. सगळे 'ऐसीला विचारा' च असेल (मी म्हणतायत तसे लेखनप्रकार केल्यास उत्तम) पण थोड व्यवस्थित पार्टिशन्स केलेल. नंतर शोधायला किँवा नवीन माणसाला देखील समजण्यास सोपे झाले असते. तुमच्या धाग्यात विज्ञान विषयी प्रश्न जास्त आलेत. हा एक घरगुती/डोमेस्टिसीटी चा धागा आणि मग एक जनरल रँडम धागा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"ऐसीला विचारा" हा लेखन-प्रकार असावा, शिर्षकात नको असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन तीन दिवस डाव्या पायाची टाच दुखत आहे. आज अशक्य झाले आहे.चार पावले चालणे अशक्य. गेल्या महिन्यात उजव्या पायाची दुखत होती. तेव्हा कसा बसा स्पोर्टस मेडिसीन च्या डॉक्टर कडे गेलो होतो. टेंडिनायटीस असे काहीतरि सांगितले. त्यानी फक्त व्यायाम दिला. तो केल्यावर ४-५ दिवसात बरी झाली. व्यायाम चालूच ठेवायला सांगितला आहे. त्यानंतर हिमाचल टूर केली. आल्यावर २-३ दिवसांनी आता हा त्रास चालू झाला. डोक्यात कळ जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

टाचेसाठी silicone gel insoles वापरा असे सुचवितो. बाकी वैद्यकीय सल्ला घ्याच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेल्या दोन तीन वर्षात हा त्रास अधून मधून उदभवू लागला आहे. मागच्या वेळी असेच आठ दिवस ग्रस्त होतो. त्यावेळी मला फॅमिली डॉक्टरांनी tendocare ही टॅब्लेट दिली होती. तरी आठ दिवस खाल्ले. सध्या ती घेतो आहेच. पण स्पोर्ट मेडीसीन च्या स्पेशालिस्ट नी औषधे कशी काय दिली नाहीत याचे आश्चर्य वाटले. मला तर ट्रिपला जायचे होते तेव्हा. पण सुदैवाने ते बरे झाले होते. वेदना झाल्या की परमेश्वर आठवतो बुवा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

डॉ चिपळूणकर ह्यांचा त्यातल्या त्यात बरा अनुभव आहे. ते ही स्पोर्ट्स फिजिसिस्ट आहेत.
मी पन्नास एक ठिकाणी दाखवूनही काहीही उपयोग होत नव्हता.
बरे होणे दूरची गोष्ट आहे; रोगाचे निदानही होत नव्हते.
ते ह्या डॉक्टरानं एका झटक्यात केले.
नंतर एक्स रे काढावयास सांगितला, पण ते फक्त औपचारिकता म्हणून.
अचूक निदान आधीच झाले होते.
समस्येचे निदान झाल्याने त्यांना मनातल्या मनात दंडवत घातला.
तुमचे डॉ कोणते ? त्यांचे नाव्-गाव्-पत्ता द्या की.
कोथरुडमध्ये सहजानंदपाशी एक मॅडम आहेत ; त्या तर नव्हेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

डॉ. हिमांशु वझे. कोथरुड कर्वे पुतळ्याजवळ कन्सल्टिंग आहे. ते डॉ राजीव शारंगपाणी यांचे शिष्य आहेत. हे ऑर्थोपेडिक लोक पहिल्या मजल्यावर कसा काय दवाखाना ठेवतात? लिफ्ट पण चालू नसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

अचानक वजनात वाढ किंवा वारंवार वापराने झिज हि दोन कारणे प्रामुख्याने टाचेवर प्रथम घाला घालतात, त्यामुळे व्यायाम आणि चप्पल-बदल अनिवार्य ठरते असा अनुभव आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0