दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
७ जून
जन्मदिवस : शिक्षणाचे पुरस्कर्ते व सामाजिक कार्यकर्ते डॉ. भाऊ दाजी लाड (१८२२), चित्रकार पॉल गोगँ (१८४८), एस्किमोंचा अभ्यास करणारा मानववंशशास्त्रज्ञ नड रासमुसेन (१८७९), अभिनेत्री जेसिका टँडी (१९०९), लेखिका सुमती पायगावकर (१९१०), समीक्षक व लेखक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष (१९१३), लेखक भा. द. खेर (१९१७), सिनेदिग्दर्शक जेम्स आयव्हरी (१९२८), अभिनेता लिआम नीसन (१९५२), नोबेलविजेता लेखक ओरहान पामुक (१९५२), रॉक/पॉपगायक प्रिन्स (१९५८), टेनिसपटू महेश भूपती (१९७४), अॅना कुर्निकोवा (१९८१)
मृत्युदिवस : समाजसुधारक विचारवंत गोपाळ गणेश आगरकर (१८९५), संगणकशास्त्रज्ञ अॅलन ट्य़ुरिंग (१९५४), क्रांतिकारक आशुतोष काली (१९६५), शिल्पकार जाँ आर्प (१९६६), लेखक इ. एम. फॉर्स्टर (१९७०), लेखक हेन्री मिलर (१९८०), संशोधक व समीक्षक डॉ. स. गं. मालशे (१९९२), बालसाहित्यिक व चरित्रकार गोपीनाथ तळवलकर (२०००), नर्तक नटराज रामकृष्ण (२०११), सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका मेहरुन्निसा दलवाई (२०१७)
---
स्वातंत्र्यदिन: नॉर्वे
१७४२ - गणितज्ञ गोल्डबाकने नंबर थिअरीतले आपले विख्यात 'गोल्डबाक कन्जेक्चर' सादर केले.
१७९१ - शनिवारवाड्याला पहिली आग लागली.
१८६२ - अमेरिका व ब्रिटनने गुलामांचा व्यापार स्थगित करण्याचे ठरवले.
१८९३ - द. आफ्रिकेतील आगगाडीत तिकीट काढून पहिल्या वर्गात बसलेल्या गांधींजींना वंशभेदाचा कायदा मोडल्याबद्दल गाडीबाहेर काढले गेले. या घटनेतून त्यांना सविनय कायदेभंगाची प्रेरणा मिळाली.
१९४९ - सिक्कीम येथील राजाच्या विनंतीनुसार भारताने सिक्कीमचा कारभार हाती घेतला व त्याला घटक राज्याचा दर्जा दिला.
१९६५ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार विवाहित दांपत्याने गर्भनिरोधक साधने वापरणे कायदेशीर झाले.
१९७१ - "Fuck the Draft" लिहिलेले जॅकेट घातल्याबद्दल पॉल कोहेनवर दाखल खटल्यात त्याला झालेली शिक्षा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क अबाधित राखत रद्दबातल ठरवली.
१९७५ - पहिल्या क्रिकेट वर्ल्ड कपला इंग्लंडमध्ये सुरुवात.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
साउथइन्डिज्ज
साउथ इन्डि योग्य वाटते. फुरसतीत नन्तर टंकतो.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
काय टंकणार रे फुरसतटंक्या
काय टंकणार रे फुरसतटंक्या आत्ताच साङ्ग काय ते
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
श्श्श्श्शी!
ंमी जुलै महिन्यापासून इथेच पुण्यात आहे. काही दिवसांतच परत चाललेय. तुम्हाला हे **आत्त्ता** सुचतय आणि नेमकी मी गेल्यावरची तारीख ठरवताय
आता पुढच्या कट्ट्याला सगळे कलकत्त्याला या. फॅर ए प्रॉपर "कलकट्टा", हाहाहा! तिथल्या महाराष्ट्र मंडळाचं गेस्ट हाउस बर्यापैकी स्वस्त न् मस्त आहे.
अरेरे
मला नाही येता येणार. आता काय? करा मज्जा. खा कबाब आणि खा बिर्याणी.
राधिका
कट्टा पुण्यात आहे म्हण्टाहेत हो!
कबाब??? बिर्याणी??????
शिक्रण, मटारउसळ वगैरे भाईकाकांनी१ घालून दिलेले संकेत विसरलात वाट्टं?
........................................................................
१ आणखी कोण?
मला वाटलं
आतापर्यंत संकेत बदलले असतील.
राधिका
इथली मंडळी भेटणार म्हणजे
इथली मंडळी भेटणार म्हणजे 'आवाज' होणार, फर्गसन रस्त्यावर रुपालीमधे माफक दरात बराच आवाज करता येतो, ते मध्यवर्तीपण आहे, तेंव्हा त्याकडे लक्ष वेधु इच्छितो.
वेळेबद्दलचा टॉलरन्स कसा आहे?
वेळेबद्दलचा टॉलरन्स कसा आहे? दोनेक तास काढता आले तर उत्तम.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मेघना असताना फक्त दोनेक
मेघना असताना फक्त दोनेक तास?
गेट वेल सून, मामू!
बिपिन कार्यकर्ते
ऐसा क्या?? मंग तं हाटेल
ऐसा क्या?? मंग तं हाटेल विसरायलाच पायजे बिका सर.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
काय हो, मी काय आख्खा
काय हो, मी काय आख्खा मुदपाकखाना रिचवणारेय का हो हाटेलात? करा, गरीब मुलगी भेटलीय, करा तिची टवाळी.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
हाहाहा! तसं नाही गं! बोलणं
हाहाहा! तसं नाही गं! बोलणं संपणारे का दोनेक तासात असं म्हणाच्चं होतं!
बिपिन कार्यकर्ते
किँवा जंम रस्तावरच सुरभी?
किँवा जंम रस्तावरच सुरभी? शबरी? थालीपिठ, भाकरी पिठलंची थाळी मिळते ना तिथे? कोणी एवढ्यात गेलय का या ठिकाणी?
पण रुपाली काय किँवा सुरभी, शबरी काय तिन्हीकडे छोटे टेबल आहेत वाटत. आणि वेळेचा आवाजाचा टॉलरंस माहीत नाही...
ICC टेक टॉवरच छतावरच रेस्टॉरंट कसंय?
पण रुपाली काय किँवा सुरभी,
रुपाली आणि आम्रपालीच्यामधे रुपालीचाच एक मोठा भाग आहे, फर्गसन रोडवर वेळेचा आणि आवाजाचा टॉलरन्स बराच आहे, जास्त झालाच तर सांगणारेही आहेतच.
टेक नव्हे ट्रेड, ते 'शांत' डिनरसाठी उपयुक्त असल्याचे मत आहे.
अरे हो, पुण्याच्या कट्ट्याला
अरे हो, पुण्याच्या कट्ट्याला माझीही हजेरी असेल हे सांगायचं राहिलंच. मुंबईला कट्टा होत असेल तर तिथेही हजर राहीन. (पण फिल्म फेस्टिवलच्या नंतर.)
पाठिंबा
पुण्याच्या कट्ट्याला आमचा बाहेरून पाठिंबा आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मग राजेश मुंबईत येतील तेव्हा
मग राजेश मुंबईत येतील तेव्हा एक वेगळा कट्टा होउद्यात तुमचा. पुणे फिल्म फेस्टीवलचे काही चित्रपट पण दाखवले जाणारच आहेत तिकडे
मेघनाने मात्र कल्टी नै मारायची बर का पुण्याच्या कट्ट्याला...
2 छे छे, अज्याबात टांग देणार
2
छे छे, अज्याबात टांग देणार नै, जमल्यास दोन्ही कट्ट्यांना हजेरी.. (दात काढत)
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
काय ठरलं मग?? अजुन काही
काय ठरलं मग?? अजुन काही पर्याय?? शक्यतो विद्यापीठ, डेक्कन, कोथरुड भागातील... त्याच दिवशी कोणी मुंबईहुन प्रवास वगैरे करणार नसेल तर ब्रंचचा पण पर्याय ठीक आहे. ब्रंचला जास्त गर्दी नसावी म्हणुन आरामात गप्पा मारता येतील.
!
च्यायला! या तर जवळजवळ हिरण्यकश्यपूच्या अटी झाल्या!
उदर
कट्टा उदरविदारक होणार हे नक्की.
ठरवायचं पुणेकरांनीच आहे.
ठरवायचं पुणेकरांनीच आहे. तारीख पक्की आहे फक्त. मला पूर्ण दिवस हाताशी आहे. मी पुण्यातच मुक्काम करणार आहे. कुठेही चालेल...
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
विष्णू जी की रसोइ
अजून एक ठिकाण सुचलं आहे कट्ट्याला "विष्णू जी की रसोइ". नळ स्टॉपला असल्यानं ऐन शहरी भागात आहे. पोचणं सोपं आहे.
दीड एक वर्षापूर्वी जाणे झाले होते. सुमारे दोन्शे अडीचशे दर्दोइ खर्च होता.(आता निश्चितच वाढला असावा.)
"शाही थाली" असते ना थाट्-बाट, दुर्वांकुर, सुकांता, मयुर व्हेज वगैरे; थोडीफार त्याच धर्तीवर. पण एक मोठा फरक आहे.
"विष्णू जी की रसोइ " हे विस्तीर्ण लॉनवर , हिरवळीवर पसरलं आहे.
तिथं लॉनच्या काही भागात खुर्च्या टेब्लं टाकली आहेत. ज्यांना हवं ते त्यावर बसून आरामात खाउ शकतात.
ज्यांना फिरत चुरडणं आवडतं ते चालत बोलत बुफे स्टाइल खाउ शकतात.
बुफेमध्ये स्टार्टर्स, सूप वगैरे होतेच. शेवटी डेझर्ट म्हणून मोगाचा हलवा वगैरेही होते.
एका कोपर्यात चुलीवरचा स्वयंपाक बनत असतो भाजी-भाकरी पोळी वगैरे. ज्याल हवय त्यानं तो जाउन आणायचा.
शिवाय लॉनच्या मध्येच एक थालिपीठाचा स्टॉलसदृश प्रकार असतो.
उत्तर भारतीय पनीरच्या भाज्या वगैरे त्यांना तितक्याशा जमल्या नव्हत्या. मराठी आयटम्स जमले होते.
पण वातावरण एकूणच गप्पा टप्पा करण्यासाठी छान वाटले.
(थाट बाट ला किंवा अगदि आउथ इंडिजलाही तुम्ही बसलात की आअसपास वेटर घोंघावू लागतील, काय हवे नको ते वआढतील. तुम्हाला बसून रहावे लागेल.
सगळे लक्ष खाण्याकडेच राहील. गप्पा मारण्याच्या हिशेबाने हा निगेटिव्ह पॉइण्ट आहे. )
थोडक्यात, सुकांता-थाट बाट ही बैठी ठिकाणे व चोखी धानीचा शाही थाट असलेलं ग्रामीण राजस्थानी शाही बाज ह्यांच्या बरोबर मधलं हे ठिकाण आहे.
इथे चालत-बोलत खाता पिता येइल. ज्यांना बसून निवांत गप्पा मारायच्या आहेत, ते निवांत गप्पाही मारु शकतील.
अरुण जोशी आलेच तर त्यांच्याशी प्रत्यक्षात तावातावाने वाद घालायलाही मोकळे पटांगण, लॉन आहे.
बघा.विचार करा.
(निव्वळ खाण्यापुरती वैयक्तिक आवड विचारली तर मी स्वतः साउथ इंडिजच पसंत करीन्.मला भात्-इडल्या ढीगभर खाण्यात काहीही संकोच वाटत नाही.
आलु प्राठे -पनीर आवडतात, तसेच बिशिबिळे राइस व चित्रान्नही मनापासून आवडते.पण सर्वच जण तितके पिव्वर साउथ इंडियन वातावरण पसंत करतील
की नाही ह्याबद्दल शंका आहे. शिवाय तिथे बंद ए सी मध्ये "बसून खाणे" हा प्रकार आहे.
मोकळ्या आभाळातला गोरज मुहूर्तावर लागलेल्या लग्नातल्या बुफेचा इफेक्ट तिथे नाही.
अन्नाची बाजू साउथ इंडिजची सरस आहे; पण इतर बाबतीत विष्णू जी की रसोइ सुयोग्य वाटते. )
.
.
अॅमानोरा मधील "व्हिलेज" हे अजून एक ठिकाण सुचवून टेह्वतो. चारेकशे रुपये दरडोइ खर्च आल्ता आम्हाला.
अर्थात ते फ्यामिला घेउन जाण्यासाठी ठीक आहे. कट्ट्यासाठी नको.(सायंकाळी साडे सात वगैरे नंतर जोरजोरात ढोल बडविणे सुरु होते, माहौल निर्मितीसाठी.
त्यामुळे तिथे गप्पा नाही होउ शकणार. फ्यामिली वाल्यांनी एकदा टृआय करुन पाहण्यास हरकत नसावी.)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
अरुण जोशी आलेच तर त्यांच्याशी
सुखी राहा. मी येणार नाहीय. अगदी त्यानंतर एक-दीड महिन्यांनी माझ्या पुतण्यांची मूंज आणि माझ्या स्वतःच्या घराची वास्तूशांती आहे, तिलाही मी जात नाहीय.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
तुम्ही या हो! आम्ही तरीहि
तुम्ही या हो! आम्ही तरीहि सुखी राहून दाखवू
तसही वास्तुशांत/मूंज वगैरे उपद्व्यापांपेक्षा हे नक्कीच अधिक रंजक असेल
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
+१ (मार्मिक मार्मिक मार्मिक)
मला माझ्याच धाग्यावर श्रेणी देता यीना, म्हणून.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
अतिअवांतर
"वास्तुकशांत" नामक पाठभेदाची आठवण होऊन भडभडून आले.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हा रसोई पर्यायपण चांगला
हा रसोई पर्यायपण चांगला वाटतोय.
मी विचार केलेला की रुपाली किँवा कर्वेपुतळाच्या शितल मधे १० वाजता भेटायच. ब्रेकफास्ट आयटम ११पर्यँत देतच असतील. मग तिथेच चहा कॉफी घेत गप्पा मारायच्या १पर्यँत. हवा असेल तर लंच घ्यायचा नैतर कल्टी किँवा दुसरीकडे कुठे जाउन गप्पा हाणायच्या ज्याला जसे जमेल तसे...
रूपाली पकाऊ वाटलेलं. त्याहून
रूपाली पकाऊ वाटलेलं. त्याहून वाडेश्वर नाही का चालणार? तिथे जरा हलचल होती. आणि 'शीतल'मधली टेबलं अंमळ लहानच नाहीयेत का? प्ल्यान आवडलाय. फक्त 'शीतल'पेक्षा वाडेश्वर आणि मग रसोईबिसोई जसा नि जेव्हा मूड बनेल तेव्हा. की हे फारच होतंय?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
चालेल की वाडेश्वरपण मी इतकी
चालेल की वाडेश्वरपण मी इतकी वर्ष पुण्यात आहे पण रुपालीत एकदाच गेलेय. आणि वैशालीत २ ३दा. मलापण नै आवडत त्या जागा. पण दुसरा पर्याय कोणी सुचवलाच नै ना :-(. आणि मला वाटल १० म्हणजे पहाटे पहाटेपण वाटु शकेल काही जणांना. म्हणुन मग जास्त प्रवास करावा लागु नये म्हणुन शितल सुचवल.
रूपाली पकाऊ??????
या रेटने उद्या ताजमहाल१ भिकार म्हणाल!
निषेध! निषेध!! त्रिवार निषेध!!!
- (कोणे एके काळी 'रूपाली'वर जगलेला) 'न'वी बाजू.
=======================================================================================================
१ बोले तो, आगरा फेम. गेटवेसमोरचा नव्हे, आणि अटलाण्टिक शिट्टीचा नव्हेच नव्हे.
या रेटने उद्या ताजमहाल१ भिकार
ते सुद्धा चालेल एकवेळ, पण रुपाली रेस्तारां भिकार?
भिकार माहीत नाही पण..
ते अत्यंत नीरस हॉटेल आहे. बहुतांश गिर्हाईके काय करणार वर्षानुवर्षाचा शिरस्ता आहे ना.. यावे लागते असा चेहरा ठेऊन येतात, त्याच त्या गप्पा तितपतच इंटरेस्टने मारतात. पण मला तिथले काही पदार्थ आवडतातही.. असो..
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
माझं मत 'रसोई'ला. मलाही साउथ
माझं मत 'रसोई'ला. मलाही साउथ इंडियन लई आवडतं. पण ते परत कधीतरी. विलेज नको. तिथे अगदीच लग्नी वातावरण असतं, माझं डोकं उठतं.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
रुपाली/वाडेश्वर/गुडलक/बालगंधर
रुपाली/वाडेश्वर/गुडलक/बालगंधर्वचा कॅफेटेरिआ/स.प.महाविद्यालयाच्या मागच्या बाजुला/गेलाबाजार तळ्यातला गणपती/पर्वती ह्या जागा छोट्या-मोठ्या कट्ट्याच्या आहेत, अर्थात गिळणे महत्त्वाचे असल्यास त्याहिशोबाने भेटू शकताच त्यासाठी मग ती विष्णूजी कि रसोई नामक अमराठी खानावळ ठीक आहे.
चतु:शृंगी आणि पुणे विद्यापीठ
चतु:शृंगी आणि आरामात गप्पा मारत हिंडण्यासाठी, अधून मधून चाय -कॉफी ढोसण्यासाठी योग्य पुणे विद्यापीठाचे विस्तीर्ण आवार विसरलात?
तुमेहे सुचविलेली ठिकाणे आणि वाडेश्वर-रुपाली ह्यांनाही माझी हरकत नाहीच.
वाडेश्वर असेल तर मी इथूनच माझ्यापुरती ऑर्डर देउ शकतो. मला तिथले काय आवडते ते मला ठाउक आहे.
होतय काय, की ठिकाणांच्या सुचवण्या येताहेत, व कुठल्यावरही सहमती होउ लागली की हरेक जण अजूनच नवीन ठिकाणे सुचवताहेत.( त्यात मीही आलो.)
मागील काही दिवसात ह्या धाग्यावर लिहिले नव्हते. आता पुन्हा इथून विश्रांती घेत आहे.
तुमचं काय ठरेल ते इथे घोषित करा म्हणजे झालं.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
वाडेश्वर असेल तर मी इथूनच
इथे कोणी ऑर्डर घेतं काय, गेलाबाजार इथे 'ऑर्डर' तरी असते का? अहो चर्चा करायला दमड्या पडतायत काय?
मी काहीच ठरवणार नाहीय. अशा
मी काहीच ठरवणार नाहीय. अशा सुचवण्या करतच राहण्यापेक्षा आपण असं करू: ऋषिकेश, मन आणि अस्मि या तिघांची एक समिती स्थापू आणि त्यांच्यावरच निर्णय सोपवू.
मला वरीलपैकी कुठलेही पर्याय चालणार आहेत. कट्टा मात्र झालाच पाहिजे, इतकाच एक अतिमहत्त्वाचा मुद्दा. बाकी सगळं... ठीकच.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
माझी पुण्यातील स्थळांची
माझी पुण्यातील स्थळांची माहिती (रादर अज्ञान) जमेस धरता बॅट्याचेही नाव सुचवेन. किंबहुना माझ्याऐवजी बॅट्या समितीत योग्य आहे:)
१. मनोबाने वर सुचवलेली विष्णू/शंकर का कोणाची तरी रसोई
२. साऊथ इंडीज ला जेवण आणि मग युनिव्हर्सिटीच्या क्यांपसात गप्पा हे दोन पर्याय रोचक वाटत आहेत.
बालगंधर्वचा कॅफेटेरीया: इथे मागे पुस्तकविश्व जोरात असताना तेथील सक्रिय असे ५-७ जण जमलो होतो. श्रामो होतेच, शिवाय मिहिर, वेदश्री होते. मनीषही होता. आणि कोण होते / होते का पटकन आठत नाहीये. पण गप्पा हाच उद्देश असेल तर तासन् तास इथे घालवता येतील. मात्र खाणे थातूरमातूर असल्याने याला निवडता येणार नाही असे वाटते.
धमकी:शेवटी क्काही म्हंजे क्काहीच ठरलं नाही तर माझ्या घरी यावे लागेल! कितीही जणांसाठी कमीतकमी कष्टात पोटभरीची अशी पावभाजी करून चारेन ((फुडप्रोससर हा मानवजातीला केवढा आधार आहे! ). पाव भाजायचे काम (पाव भाजणे आवश्यक आहे असे ठरल्यास) डिव्हाईड करू ;). उच्चासनावर बसायची सोय ८-९ जणांची होईल बाकीच्यांना भार्तीय बैठक. अर्थातच वेळेचे बंधन नाही!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
धमकी बद्दल अवांतर: कधी ट्राय
धमकी बद्दल अवांतर: कधी ट्राय नाही केली, पण पाव भाजायची एक सोपी आयडीआ वाचलेली. पुर्ण लादी आडवी कापायची, मधे लोणी लावायच आणी मावेत गरम करायच.
मस्त आयड्या!
मी 'विळी' संप्रदायातील असल्याने आधीच सुर्या/सुरे चालवायला जमत नाही. त्यात अख्खी लादी म्हंजे फारच स्कीलफुल प्रकरण होईल माझ्यासाठी
पण तुम्ही घरी आलात कधी तर प्रात्यक्षिक करून घेईन म्हंटो
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मी काय म्हंटो, गिळणे सोडूनही
मी काय म्हंटो, गिळणे सोडूनही लै गप्पा होतीलच, नै का? तस्मात सौथ इंडिजमध्ये गिळू अन अन्यत्र कुठेही फिरू
(लै दिवसांत गेलो नै हो तिकडे, ग्रमग्रम आप्पम अन कै करी स्ट्यू वडायची लै इच्छा आहे.)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हॉटेल नंतर पर्वतीवर जा. आय
हॉटेल नंतर पर्वतीवर जा. आय मिस पर्वती
पाने