मतदान - "एक" कर्तव्य!

(लेख विभागातला हा माझा ऐसीवर पहिलाच प्रयत्न आहे, त्यामुळे जरा सांभाळून घ्या [सहन करा Blum 3 ])

मतदान आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये राजकीय पक्षांनी जेवढी जाहिरात बाजी केली अनेक माध्यमांच्या सहाय्याने त्यालाच जणू आव्हान देत मतदारांनीही शक्य त्या माध्यमांवर (व्हॉट्स अ‍ॅप, ट्विटर, फेसबु़क ..) जाहिरातबाजी करून गेल्या प्रत्येक गुरूवारी उच्छाद मांडला होता. शेवटी संपली मतदान प्रक्रिया (महाराष्ट्रात पुरती) आणि हायसं वाटलं Smile

मतदान करायलाच हवं, ते न करण्याला समर्थन नाहीच आणि ज्यांनी केलं त्यांचा आदर आहेच. पण जेव्हा एखादी व्यक्ती मतदान केल्याचं अभिमानाने सांगते, त्याचं तत्सम माध्यमांवर प्रदर्शन करते किंवा कोणी मतदान केलं नसेल तर त्याच्यावर डाफरते तेव्हा अश्या व्यक्ती ने हा ही विचार करायला हवा की केवळ एक मतदान केल्याने आपली कर्तव्य संपतात का? लगेच तुम्ही सुजाण, परिपूर्ण आणि जबाबदार नागरिक झालात का?

रोजच्या जीवनात देखील एक समाजाचा भाग आणि आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली बरीच कर्तव्य असतात. शेवटी लोकशाही असली तरी आपण समाजात राहतो आणि ह्या समाजाचे काही नियम आहेत ते पाळायला हवेतच, तेही आपलं कर्तव्यच नाही का? एक दिवस मतदान करायचं आणि मग उरलेल्या ३६४ दिवसांमधे वाट्टेल तो बेजबाबदारपणा दाखवायचा ह्याला काय अर्थ आहे. हे म्हणजे कार चालवतांना सिग्नल पाळायचे नाहीत, लायसन्स ठेवायचं नाही पण कारच्या मागे "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" असं एक स्टीकर लावायचं आणि अश्या चुका बघायला/निस्तरायला आहे दुसरं कोणी "समर्थ" म्हणून बिनधास्त आहे ते चालू ठेवायचं अश्यातला प्रकार आहे.

मतदान करणं हे तुमच्या अनेक कर्तव्यांपैकी "एक" कर्तव्य आहे, आणि ते तुम्ही पार पाडलं असेल तर तुमचं अभिनंदन आणि अभिमान देखील, पण हे मतदान करण्याला तुम्ही पात्र आहात कारण तुम्ही त्या समाजाचे भाग आहात आणि त्याच समाजाची इतरही कर्तव्ये आहेत त्याकडे दुर्लक्ष करून नक्कीच चालणार नाही. मतदान करून जसं आपण आपलं भविष्य ठरवतो तसंच आपल्या रोजच्या कृतीतून आपण आपल्या भविष्यातील पिढी पुढे एक नवा आदर्श ठेवतो, ते आपलं अनुकरण करत असतील तर आपली जबाबदारी मतदानापुरतीच मर्यादित नाहीये. आपलं एक मतदान कदाचित आपल्याला हवा असलेला नेता वा पक्ष निवडून देण्यास मदत करेल आणि जो आपल्या समाजाच्या सुधारणेचं नेतृत्व करेल, पण आपण रोजच्या सामाजिक जबाबदारार्‍यांमधे कर्तव्यदक्षता दाखवली तर आपणच एक जबाबदार आणि आदर्श समाज निर्माण करू शकू. आणि भविष्यातला नेता अश्याच सशक्त समाजातून येणार असेल तर नेमकं कोणाला मत द्यावं ही द्विधा अवस्था ही राहणार नाही. शेवटी निवडून दिलेल्या नेत्याने समाज घडवण्यापेक्षा आपण म्हणजे ह्या समाजानेच होणार्‍या नेत्याला आधी घडवायला हवं, नाही का? Smile

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

शेवटी निवडून दिलेल्या नेत्याने समाज घडवण्यापेक्षा आपण म्हणजे ह्या समाजानेच होणार्‍या नेत्याला आधी घडवायला हवं, नाही का?

पहिल्याच प्रयत्नात षट्कार!

चळवळींच्या बाबतीत एका व्यक्तीमागे लोक जात नाहित तर, नेता ती चळवळ निवडते असे म्हटले जाते.
संसदीय लोकशाहीत तर हे प्रत्यक्ष होते.

मतदान केलेले कधीही चांगले, पण प्रसंगी मतदान न करताही/न करूनही इतर अनेक प्रकारे समाजात कार्य करत राहणे तितकेच किंबहुना अधिकच आदरणीयच आहे.

मतदान केले म्हणजेच आपल्याला हव्वं ते बोलायचा-करायचा अधिकार मिळतो असे अजिबात नाहिये. मतदान न करताही चांगली कामे करणारे काही परिचितह्त नुसते मतदान करून कैतरी ग्रेट केल्याच्या थाटात बाकी काहिहि न करता फिरणार्‍यांपेक्षा मला अधिक जबाबदार नागरीक वाटतात.

अर्थात, मतदानही करत नाही, इतरही समाजाला काही उपयोग होईल याचा प्रयत्न नाही, सजगता नाही ती निर्माण होण्याची शक्यताही नाही असेही जीव पाहिले आहेतच! Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लिहीत रहा.
चर्चा वाचतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ज्जे बात!

अगदी मनातलं!

- (सामाजिक) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत.

एक निरिक्षण-

मतदारांनीही शक्य त्या माध्यमांवर (व्हॉट्स अ‍ॅप, ट्विटर, फेसबु़क ..) जाहिरातबाजी करून गेल्या प्रत्येक गुरूवारी उच्छाद मांडला होता.

९०त जन्माला आलेली पिढी ही सर्वार्थाने आधिपे़क्षा वेगळी आहे. जागतिकीकरण हे त्यांच्यासाठी अधोरेखित वास्तव आहे. हा वर्ग पहिल्यांदाच लोकसभा मतदान करतोय. नवीन मतदार पिढी ही twitter, facebook किंवा तत्सम पदार्थांचा कुठ्ल्याही संदर्भात चपखल वापर करते. तो त्यांच्या मते एक सहजानुभव आहे. थोडंफार डोक्यात जातं खरं, पण यामुळे चिकार फायदाच होतो. तेव्हा एकदा सहन करायला हरकत नसावी!

बाकी गोष्टी ( ३६५*४ + ३६४) दिवस करायला हव्यातच. पण तो उरलेला एक (मतदानाचा) दिवस झोपून काढायचा नाही- हेदेखील लोकांना सांगावं लागतंय. तेव्हा तिथून सुरुवात आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी गोष्टी ( ३६५*४ + ३६४) दिवस करायला हव्यातच. पण तो उरलेला एक (मतदानाचा) दिवस झोपून काढायचा नाही...

लीप इयर विसरलात काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नजर बाकी बारीक हो तुमची.
अमेरिकन दिस्तेय.. J)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिकन दिस्तेय.. J)

नाही. (भूतपूर्व) पुणेरी.

(गिव क्रेडिट व्हेअर क्रेडिट इज़ ड्यू.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मद्दान एक कर्तव्य तरी आहेच. त्या निमित्ताने शासनव्यवस्थेत भाग घ्यायची जी कै संधी मिळते तिचा लाभ घेणे शक्य असूनही जे घेत नैत त्यांना गवर्मेण एट ऑल बद्दल बोलायचा नैतिक अधिकार नाही असे मत आहे. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरुण जोशी मद्दान करत नाहित असे जाहिर सांगत आहेत.
त्यांची ह्याबद्दलची प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक आहोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

२६ तारखेपासून उत्सुकता रोखून धरावी लागली बद्दल क्षमस्व.
१. मतदान मी करत नाही.
२. करा, करा म्हणून ज्या जाहिराती होतात, सल्ले येतात, ते मला बलात्कारचे प्रयत्न जसे असतात तसे वाटतात.
३.

मतदान करून जसं आपण आपलं भविष्य ठरवतो

यावर तसा माझा विश्वासच नाही. मला हवे तशी राज्यपद्धती नाही. घटना नाही. पक्ष नाहीत. उमेदवार नाहीत (म्हणजे त्यांच्यावर शंका न घेता, कोणता आरोप न करता, वो भाते नही असे म्हणायचे आहे). चांगले मेनिफेस्टो नाहीत.
४. इतके तंत्रज्ञान उपलब्ध असताना, रडकी का असेना, पद्धत नीट राबवली जात नाही. ५४३ च जागा का? ५ वर्षेच का? २ अँग्लो ईंडियन फुकटच का? लक्षद्व्वीपच्या ४० हजार लोकांचा एक खासदार नि गाजियाबादच्या ३० लाख लोकांचाही एक?
५. पण असला तरी या "आपण" मधे कोणाकोणाला घ्यायचं हे मला कळत नाही. म्हणजे मी कोणा कोणाच्या भल्यासाठी मतदान करायचं? एकट्याच्या? कुटुंबाच्या? कि कशाच्या? कि कशाच्या?
६.ते कळले तरी माझ्या कल्याणाची काळजी घेण्यासाठी मलाच 'काही राजकीय कृत्य' करावे लागेल अशी सामाजिक परिस्थिती नाही असे माझे मत आहे. जे कोणी मत देत आहेत त्यांना माझी काळजी आहे अशी माझी पक्की खात्री आहे.
७. एका पक्षाला, इ मत दिल्याने आपण दुसर्‍या पक्षांना, त्यांच्या काही सपोर्टरना दुखावतो असे मला वाटते. मला असं 'निष्कारण' कुणाला दुखावलेलं आवडत नाही.
८. कधी कधी मला असेही वाटते कि ज्यांना 'आपले राज्यकर्ते' हवे आहेत, जास्त गरज आहे, त्यांना प्राधान्य द्यावे. अनुपस्थित राहून मतदानात आरक्षण करावे.
९. आदर्श, क्षम राज्यकर्ते, नाही म्हटले तरी किमान डिसेंट लोक, त्यांच्यावर प्रेम असणारी जनता, तात्विक, वैचारिक पातळीवरचा विरोध, असा माहौल असता तर विचार केला असता.
१०. देशाच्या भल्यासाठी पक्षांची वेगवेगळी प्राधान्ये असणे, काही प्राधान्ये सामान्य असणे, त्यांच्यावरचा जोर वेगवेगळा असणे असा प्रचार इष्ट. जिथे टोकाची विपरित मते आहेत, तिथे त्यांचे समर्थन करणारे डिटेलिंग हवे. असेही काही नाही.
११. 'हिटलर' आणि 'बुजगावणे' गंमत म्हणून म्हणायचे असेल काय लक्ष देणार?
१२. राज्यकर्त्यांची विरुद्ध मतं असणं, त्यांच्यात व्यक्तिगतही स्वार्थ असणं याला माझं काही इतकसं म्हणणं नाही. पण लोकशाहीमधे लोकयुद्ध सुरु होते. लोकांचे कितीतरी आधारांवर कितीतरी प्रकारचे गट बनतात नि ते एक युद्ध लढू लागतात. मला अशा युद्धात भाग घ्यायची किंचितही इच्छा नसते. जिथे अधिकतर लोकांमधे केवळ पक्षांबाबत प्राधान्यांचा क्रम वेगळा असतो नि कोणत्या पक्षाचा द्वेष नसतो अशा वातावरणात मला माझे प्राधान्य इतरांच्या मदतीने, अधिकच्या माहितीने अजून रिफाईन करून, वेळ मिळेल तसा, प्राधान्यक्रम शक्य तितका नीट करून अगदी आनंदाने नि आवर्जून मत द्यायला आवडेल. पण जिथे शिक्षितांत व अशिक्षितांत, पक्षांचाच काय त्यांच्या मतदारांचा देखिल, खूप (आकडा सांगता येणार नाही, पण नक्कीच ५०% पेक्षा जास्त), विरोधी पक्षाकडूंन आणि मतदारांकडून द्वेष होतो, तिथे लोकशाहीमुळे समाज दुभंगत जातो. म्हणूनही मी मतदान करत नाही.
१३. आता हे सगळं तात्विक झालं. वास्तविक असं वागून चालणार नाही. पण माझे नाव पुण्याच्या नि गुरगावच्या दोन्ही यादीत आहे (हाच गुन्हा आहे. माझ्या अपरोक्ष फोटो देऊन लोक नाव घालू शकतात). तिथे मतदान द्यायचा मला 'तितका' अधिकार नाही. दोन्हीकडे नाव मागे घेण्यासाठी ऑनलाईन ट्राय करत आहे. एकदा राहतो तिथला मतदार झालो कि लोकांना जबरदस्तीने मुंज करावी लागते तसे मतदान करीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

७. एका पक्षाला, इ मत दिल्याने आपण दुसर्‍या पक्षांना, त्यांच्या काही सपोर्टरना दुखावतो असे मला वाटते. मला असं 'निष्कारण' कुणाला दुखावलेलं आवडत नाही.

लै भारी! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही कोणत्या हापिसात काम करता ?
तुम्ही कधी बॉस झालात तर कुणालाच प्रमोशन/पदोन्नती देणार नाही का ?
ज्यांना पदोन्नती देत आहोत, ती व्यक्ती सोडून इतर लोक निष्कारण दुखावले जातील असे आपणास वाटते का ?

तुम्ही दुकानातून खरेदी करताना काय विचार करता ?
एखाद्या दुकानातून खरेदी करणं म्हणजे इतर दुकानांना दिलेला नकार असतो, बरोबर का ?
मग खरेदी कशी करता ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तुम्ही कोणत्या हापिसात काम करता ?
---क्ष

तुम्ही कधी बॉस झालात तर कुणालाच प्रमोशन/पदोन्नती देणार नाही का ?
--- मी अलरेडी बॉस आहे नि बर्‍याच जणांनी प्रमोशन दिले आहे.

ज्यांना पदोन्नती देत आहोत, ती व्यक्ती सोडून इतर लोक निष्कारण दुखावले जातील असे आपणास वाटते का ?
---निष्कारण नाहीच. कराराने मान्य केलेली पद्धत आहे प्रमोशनची.

तुम्ही दुकानातून खरेदी करताना काय विचार करता ?
---दुकानदारीण किती सुंदर आहे, लाघवी आहे, इ

एखाद्या दुकानातून खरेदी करणं म्हणजे इतर दुकानांना दिलेला नकार असतो, बरोबर का ?
----आमचा विरोध नकाराला नाही, दुखवण्याला आहे.

मग खरेदी कशी करता ?
----मालाची किंमत देऊन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

शक्य असूनही करत नाहित हे टाकल्याने असहमती बोथट झाली आहे. तरी असहमती आहे (ती असलीच पाहिजे Wink )

निवडलेले गव्हर्नमेंट हे नुसते त्या पक्षाला मतदान केलेल्यांचे नसते, तर प्रत्येक पक्षाला मतदान केलेल्याचे तसेच मतदान न केलेल्यांचेही असते. अतएव मतदान न केलेल्यांवरही त्या सरकारच्या निर्णयांचा तितकाच परिणाम होत असतो. तेव्हा त्यांना सरकारबद्दल बोलायचा (नैतिक वगैरे कसाही) अधिकार आहे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छान लेख. अजून लिहीत रहा.

लेखाचं शीर्षक वाचलं तेव्हा अवतरण चिन्हं चुकीच्या शब्दाभोवती पडली आहेत का असा प्रश्न पडला होता, पण लेख वाचून तो दूर झाला. सार्वजनिक जीवनात इतरही अनेक गोष्टी पाळण्यासारख्या आहेत, ज्या पाळल्या जात नाहीत. मतदानाबाबत मात्र 'मी हे कर्तव्य पाळलं' असं जाहीर करण्यासाठीचा पुरावा मिळतो. 'मी आज सर्व लाल सिग्नलला थांबलो' याचा मिरवण्याजोगा पुरावा मिळत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मतदानाबाबत मात्र 'मी हे कर्तव्य पाळलं' असं जाहीर करण्यासाठीचा पुरावा मिळतो. 'मी आज सर्व लाल सिग्नलला थांबलो' याचा मिरवण्याजोगा पुरावा मिळत नाही.

अमेरिकेत (किमानपक्षी जॉर्जियात तरी) ज्याप्रमाणे मतदान केल्यावर ष्टिकर मिळतो, तद्वत, लाल सिग्नल तोडल्यावर जेणेंकरून मामा निळ्या दिव्यांच्या गाडीतून मागे लागून तिकीट (मराठीतः 'चलान') देतो, त्याऐवजी, लाल सिग्नलला गाडी थांबवली, तर पोलिसाने आपली मशारनिल्हे निळ्या दिव्यांची गाडी मागे आणून, मशारनिल्हे निळे दिवे 'साग्रसंगीत' ('टिऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ!') लावून, लाल सिग्नलला गाडी थांबविणार्‍यास हटकून त्याचा जागच्याजागी सत्कार करून त्याला ष्टिकर दिले पाहिजे. म्हणजे बघा लाल सिग्नलला थांबणार्‍यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते की नाही ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मशारनिल्हे निळे दिवे 'साग्रसंगीत' ('टिऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ!') लावून,

उग्गीच ती तुतारीची टोन आठवली- टिऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ टिऊ ट्यू ट्यू टू टू टुउउउउ!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दिखाऊगिरीचा जमाना आहे. निदान मतदान केल्याच्या फोटो टाकण्याच्या आकर्षणापायी लोक मतदानाला जायला लागले आणि मतदानाचा टक्का वाढला तर नुकसान काही नाही.

बाकी सगळ्या ढकलेल्या जोक्स आणि फोटोचा पाउस पडतोय त्यात आले दोन चार निळ्या शाईच्या बोटांची चित्रे... तर जाऊ दे म्हणते मी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

पूर्वी आमच्या लहानपणी सर्कारी फ्यामिली प्ल्यानिंग क्याम्पेन जेव्हा जोरात होती, तेव्हा फेसबुक नव्हते, हे कीत्ती कीऽत्ती चांगले होते, असा विचार मनात आल्याने तूर्तास बालपणीच्या आठवणींनी गहिवरून येत आहे.

(तेव्हा फक्त सर्कारी जाहिरातींचे वन्वे ट्राफिक असे. आजच्यासारखी 'पार्टिसिपेटरी डेमॉक्रसी' नव्हती. पण प्रकार परिणामकारक होता. त्यातल्या त्या 'लाऽऽऽल त्रिकोण, लाऽऽऽल त्रिकोण, लाऽलाल त्रिकोऽऽऽऽऽऽण!!!' या जाहिरातीचा आमच्या बालमनावर इतका भक्कम परिणाम झालेला होता, की पुढे मोठेपणी अमेरिकेत आल्यावर ड्रायविंग शिकतेवेळी त्या ट्राफिकसाइनी पाठ करताना नि पुढे गाडी चालवतानासुद्धा ती 'यील्ड' साइन पाहून आम्हांस नेमका 'लाल त्रिकोण' आठवे. आणि 'दोन मुलांत अंतर ठेवावे' हा संदेश तर लहानपणी शाळेत कवायतीच्या तासाससुद्धा आठवे.)

रम्य ते बालपण!

-------------------------------------------------------------------------------------------------

लाल त्रिकोणाचा संदेश आणि 'यील्ड', हे दोन संदेश साधारणतः विरुद्धार्थी आहेत, या विसंगतीबाबत मात्र त्यानंतरही बहुत काळापर्यंत टाळक्यात प्रकाश पडला नव्हता. किंबहुना, फॉर द रेकॉर्ड, ही बाब आत्ताच दोन मिनिटांपूर्वी लक्षात आली. असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0