Skip to main content

छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १ : आये कुछ अब्र

अद्याप 'आषाढस्य प्रथम दिवसे'ला काही काळ असला तरी शब्दशः त्याचे ढग 'आखाडी' जमू लागले आहेत.

आपापल्या मनःस्थितीप्रमाणे मग त्यात पर्युत्सुक विकलतेची भावना कुणाला जाणवेल तर कुणाला 'घर माझे चंद्रमौळी'ची संसारी आठवण होईल ('इन बारिशों से दोस्ती अच्छी नहीं फराज, कच्चा तेरा मकान है कुछ तो खयाल कर'). 'पिकांत केसर ओले'च्या शृंगारिक नवेपणापासून ते कृतकृत्य सूर्यास्तापर्यंत ढगांचं रूपक अनेकदा चपखलपणे वापरण्यात आलेलं आहे.

त्यातलाच एक मूड दर्शवणारी ही गझल हाच या आव्हानाचा मुख्य विषयः

नियमः

१. केवळ स्वतः काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.

२. स्पर्धाबाह्य अशी कितीही चित्रे देण्यास हरकत नसेलच मात्र त्यासाठी किमान एक चित्र स्पर्धेसाठी द्यावे लागेल.

३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परीक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व परीक्षक असे चालू राहील.)

४. आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट ४ जुलै रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. ५ जुलै रोजी निकाल घोषित होईल व विजेती व्यक्ती पुढील विषय देईल.

५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिप्पण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.

६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठरावीकच निकष लावावेत असे, बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे, इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाची व्यक्ती आव्हान देईल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले, तरी अपेक्षा जरूर आहे.

७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच विजेता/विजेती घोषित करणे बंधनकारक आहे.

८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.

९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.

१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.

स्पर्धा का इतर?

गब्बर सिंग Fri, 13/06/2014 - 13:04

उसके बाद आने दो जो अजाब आये....

बाम-ए-मीना से माहताब उतरे
दस्त-ए-साकी मे आफ्ताब आये
.
.

--------------------------

गुलाम अली नी सुद्धा म्हंटली आहे ही....

चिंतातुर जंतू Fri, 13/06/2014 - 13:11

नवीन आव्हानाची कल्पना आणि नंदननं दिलेलं पहिलं आव्हान आवडलं.

ऋषिकेश Fri, 13/06/2014 - 13:21

उत्तम आव्हान आहे. छत्री दुरूस्तीला टाकली पाहिजेच्या आठवणी घरून करून दिल्या जात आहेत. यावर यएत्या १०-१५ दिवसांत चित्रे नक्की काढता येतील.

मस्त विषय!

राजेश घासकडवी Sun, 15/06/2014 - 09:51

आजच्या तरुण पिढीकडे स्वतःचे कॅमेरे असतात, झालंच तर स्मार्टफोनमध्येही कॅमेरे असतात. आम्हाला हे मिळालं नाही. याची खंत वाटतेच. पण हा विषय पाहिल्यावर ती उफाळून आली.

रतनगडला हायकिंगसाठी गेलो होतो. दुपारी-संध्याकाळी पोचलो. तिथल्या गुहेत मुक्काम ठोकला. सरपण गोळा करून, त्यावर मॅगी शिजवून, मॅगीच्या मसाल्याच्याच पाकिटांचा भांडी घासायचा स्क्रबर म्हणून वापर करून, दमून डाराडूर झोपलो. सकाळी उठलो तेव्हाचं दृश्य अविस्मरणीय होतं. गुहेच्या बाहेर पडणारी पायवाट सोडली तर त्याखालचा सगळा परिसर ढगांनी व्यापून टाकला होता. खाली जग नव्हतंच, नुसतेच ढग. जुन्या हिंदी सिनेमांत स्वर्ग दाखवण्यासाठी देवांच्या पायाखाली धुराचे ढग ढग दाखवत तसे. सर्व अस्तित्वापासून आम्ही आठ जण एकटे, सगळ्याच्या वर. जमीन नाही, क्षितिज नाही. फक्त आकाश आणि खाली ढग. परतीची वाट धुसर होत संपलेली. हे डोळ्याने टिपलेलं आहे. इतक्या वर्षांनंतरसुद्धा नुसतं आठवून अंगावर काटा उभा रहावा इतकं ते दृश्य मनात भिनलेलं आहे.

आता आकाश डोक्यावर भरून येतं. तेव्हा ते पायाखाली भरून आलं होतं. तो स्वर्ग होता. आता जमिनीवर आहोत.

मी Tue, 17/06/2014 - 15:43

In reply to by राजेश घासकडवी

शिर्षक वाचुन अशाच काहीश्या अनुभवाचे स्मरण झाले होते, चित्र आहे माउंट ग्रेलॉकवरचे, मस्त पाऊस पडला होता, चित्रातल्या तळ्यावर धुकं जमलं होतं एवढं की खाली पाणी आहे हे लक्षातच येत नव्हतं, पण त्यावेळचे चित्र सापडत नाही त्यामुळे थोड्यावेळानंतरचा पण मुळ गझलेला जागणारे चित्र इथे डकवतो आहे.

@नंदन - गझल आणि विषय अफलातून आहे. @ऋषिकेश - संकल्पना उत्तम आहे.

धनंजय Tue, 17/06/2014 - 20:41

बाम-ए-मीना से आफ़ताब* उतरे
Newark

कॅमेरा : सॅमसंग मोबाइल SPH-L710
केंद्र : ३.७ मिमि
छिद्र : २.६
उघडीप : १/४० सेकंद
आयएसओ : १००

चित्र कातरले आहे, आणि आणि ~ १/४० (~१/६ x १/६) कमी ठिपक्यांत योजले आहे.

(*होय, ठाऊक आहे)

मुळापासून Wed, 18/06/2014 - 11:50

धुक्यात लपत चाललेल्या हिरवळीचा माग तू काय काढशील वेड्या?
आलिंगनात विरघळलेल्या जीवांचा स्वतःला तरी थांग लागतो का?

प्रतिमेची माहिती:
स्थळ: स्मोकी माउन्टन राष्ट्रीय उद्यान
कॅमेरा: Pentax K-x
भिंग: Pentax ५०-३०० मि. मि.

व्यवस्थापकः width="" height="" हटवले आहे.

मुळापासून Thu, 19/06/2014 - 10:35

चित्र स्पर्धेकरिता नाही.

स्थळः क्लिव्ह्लंड, ओहायो.
पार्श्वभूमीला उगवत्या सूर्याचा लालिमा घेउन आळस झटकून जाग्या होणार्या इमारतींना टिपायचा प्रयत्न केला होता एका सकाळी. आकाशात ढग होते हा निव्वळ चांगला योगायोग!

रोचना Thu, 19/06/2014 - 14:03

"Murmuring out of its myriad leaves, 20
Down from its lofty top, rising two hundred feet high,
Out of its stalwart trunk and limbs—out of its foot-thick bark,
That chant of the seasons and time—chant, not of the past only, but the future." इथून

मी Thu, 19/06/2014 - 14:30

गडद जांभळं भरलं आभाळ
मृगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ
खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ - ना.धों. महानोर.

............सा… Thu, 19/06/2014 - 17:11

In reply to by मी

उफ्फ!! निव्वळ निव्वळ क्लासिक!!!मी असेच फोटो ऐसी अन मिपावरुन डेस्क्टॉपवर लावते. मग कोणीना कोणी छान आहे म्हणतच मग अभिमानाने सांगते "This is countryside of India." :)

ऋषिकेश Thu, 19/06/2014 - 17:08

In reply to by मी

अहा! छानच! फारच आवडला फोटो.

जरा पोस्ट प्रोसेसिंग करून बघा ना.. व्हाईट नॉईज/बॅलन्स अ‍ॅडजस्ट करून. पावसाळ्याचा ताजेपणाही दिसला तर क्या कहने!

मुळापासून Thu, 19/06/2014 - 20:18

In reply to by मी

अतिशय सुंदर!

लहानपणी ST बसने गावी जाताना खिडकीच्या गजांआडून अशी पावसाळी गंमत बघायला छान वाटायचं. नकळत लहानपणाची आठवण जागी करुन दिल्याबद्दल धन्यवाद!

धनंजय Thu, 19/06/2014 - 21:07

foggy_morning_2

धुकट सकाळ
***
किती बर्फ पडला पहाटे बघितले
कि वातावरण स्तब्ध नि:शब्द होते
सुटीच्या सकाळी असावे तसे हे
पहा गप्प रस्ते रिकामे रिकामे
*
धुरांड्यांवरून आकृती या धुराच्या
अकल्पित जशी गूढ पिशाच्चे असावीत
नि मागे धुक्याच्या कुणी गुप्त छद्मी
असेल का? विचारून शहारलो मनात मी
***

मिसळपाव संकेतस्थळावर पूर्वप्रसिद्धी

मुळापासून Sun, 29/06/2014 - 03:14

एकही ढग नसलेल्या आभाळाला "निरभ्र" म्हणतात...
मग स्वच्छ शुभ्र ढगांनी नटलेल्या आभाळाला "सुरभ्र" का म्ह्णू नये?

प्रतिमेची माहिती:
स्थळ: ताहो सरोवर, कॅलिफोर्निया.
कॅमेरा: Pentax K-x
भिंग: Pentax १८-५५ मि. मि.

अमुक Sun, 29/06/2014 - 09:27

मेघेर ओपोर मेघ जोमेछे
आँधार कोरे आशे
आमाय कॅनो बोशिये राखो
अ‍ॅका द्वारेर पाशे

...रवींद्रनाथ ठाकूर

स्वैर अनुवाद :
घनांच्या पल्याड घनगर्दी
दाटे काळोख कासाविशी
सोयरे मागे बुडून जाती
मी एकाकी उंबर्‍यापाशी

Camera: NIKON COOLPIX L120
ISO: 80
Exposure: 1/400 sec
Aperture: 16.0
Focal Length: 71.2mm
Flash Used: No

अमुक Sun, 29/06/2014 - 09:31

सायंकाळी घन एखादा मोरपिसार्‍यांपरी डवरतां
पसरायाची घरावरी माझ्याच सावली
कळले नव्हते सनई ऐकून दुखायचे का
आतून डोळे त्या दिवशीच्या संध्याकाळी

..आरती प्रभू

Camera: NIKON COOLPIX L120
ISO: 400
Exposure: 1/60 sec
Aperture: 4.5
Focal Length: 18.6mm
Flash Used: No

रोचना Mon, 30/06/2014 - 10:53

In reply to by अमुक

सगळे फोटो आवडले. रवींद्रनाथांच्या ढगांवर ढीगभर कविता आहेत - आणि किती वेगवेगळ्या!
मेघेर कोले रोद हेशेछे हे लहान मुलांचं आनंदी गाणं (दुव्यावर आशा भोसले नी गायलेले आहे),
मेघ बोलेछे जाबो जाबो हे गंभीर, परमात्माशी विलीन होण्याची इच्छा व्यक्त करणारं,
मेघेरा चोले चोले जाय हे प्रकृतीच्या अनंत खेळावर..

नंदन Tue, 01/07/2014 - 04:16

आत्तापर्यंत आलेली सारीच छायाचित्रं आवडली. राहिलेल्या चार दिवसांत अशाच अधिक छायाचित्रांची अपेक्षा आहे.

* * *

सध्या मिशेल फुकोचं 'This is not a pipe' हे छोटेखानी पुस्तक वाचतो आहे. एखादी गोष्ट आणि तिच्याकडे निर्देश करणारा शब्द यांच्यातलं घट्ट नातं आपण बर्‍याचदा गृहीत धरून चालतो, पण त्यातल्या निरनिराळ्या छटांकडे लक्ष वेधण्याचं काम Magritte, पॉल क्ली सारख्या सरिअलिस्ट कलाकारांनी केलं. (त्याबद्दल येथे अधिक वाचता येईल.) त्यांच्या काही कलाकृतींवर भाष्य करणार्‍या ह्या पुस्तकातली दोन चित्रं पाहून ह्या थीमची आठवण झाली.

१. Personnage marchant vers l'horizon
[क्षितिजाच्या दिशेने चालणारा माणूस. चित्रातील फ्रेंच शब्दांचा अर्थ (क्लॉकवाईज) - ढग, घोडा, आरामखुर्ची, बंदुक.]

२. La Bataille de l'Argonne

नंदन Thu, 10/07/2014 - 12:13

निकाल जाहीर करण्यात केलेल्या दिरंगाईबद्दल दिलगीर आहे. आलेल्या प्रतिसादांतले सारेच फोटो आवडले. त्यातून एकच एक निवडणं तसं कठीणच गेलं. (परीक्षकांच्या ठेवणीतल्या 'क्लिशे'तलं हे वाक्य असलं तरी खरं आहे.) रोचना आणि अमुक यांची छायाचित्रं आणि निवडलेल्या अतिशय समर्पक ओळी, धनंजय यांचा त्याच गझलेतल्या पुढील ओळींना चपखल असा फोटो आणि 'मी' व 'मुळापासून' यांचे नेमका मूड टिपणारे फोटो यातून निवडलेले हे तीन क्रमांक -

३. लोहगडाचा पायथा - 'मी'

फोटो फारच आवडला. निवडलेल्या ओळींतल्या बिलोरी भोवळीचे आणि खाचरांतल्या पाण्यांच्या तुकड्यांतले प्रतिमासाधर्म्यही विलक्षण. मात्र थोडे अधिक पोस्ट-प्रोसेसिंग (चित्राची खालची आणि उजवीकडची कडा जागेचा संदर्भ कायम ठेवून कातरणे किंवा ते निष्पर्ण झाड वेगळ्या रीतीने चित्रात येईल असा प्रयत्न करणे इ.) चालले असते.

२. Song of the Redwood Tree - रोचना
१. मेघेर ओपोर मेघ जोमेछे - अमुक

दोन्ही छायाचित्रं सुरेख आहेत आणि सोबत निवडलेल्या ओळी चपखल. मात्र थीमच्या मूडशी अधिक जुळते असल्याने (आणि तांत्रिक माहिती दिल्याने) अमुक ह्यांच्या फोटोस किंचित झुकतं माप दिलं गेलं. अमुक यांचे अभिनंदन आणि पुढील आव्हानासाठी विषय देण्याची त्यांना विनंती.

अवांतर - मेघेर पोरे मेघ जोमेछे रवीन्द्रसंगीतातः

मुळापासून Fri, 11/07/2014 - 00:13

In reply to by नंदन

मी नवा सदस्य आहे आणि पहिल्यांदाच सहभागी झाल्याने मजा आली. पुढील विषयांची वाट बघत आहे.

अमुक Thu, 10/07/2014 - 16:35

धन्यवाद.

यावेळी विचार करून नवे आव्हान देण्याइतपत वेळ नाही आहे आणि दिले तरी त्यानुसार येणार्‍या चित्रांना न्याय देऊन निकाल देण्याइतपत वेळ मिळेल की नाही सांगता येत नाही.*
त्यामुळे परी़क्षकांचा मान राखून (स्पर्धकांच्या ठेवणीतल्या 'क्लिशे'तलं हे वाक्य असलं तरी खरं आहे.) रोचना यांना विनंती करतो की त्यांनी पुढील आव्हान द्यावे.

* इसी होने न होने, मिलने न मिलने के बीच में माया का समुद्र हैं - रामप्रशाद दशरथप्रशाद शर्मा :)

रोचना Fri, 11/07/2014 - 13:00

In reply to by अमुक

हाय राम, शर्माजी, बहुत शुक्रिया, लेकिन आपने मुझे किस मुसीबत में डाला! एक मुद्दत से इस प्रतियोगिता में मेरा दूसरा नंबर आता रहा है, जिससे मैं बेहद खुश रही हूं, सब तारीफ करते हैं लेकिन अगले पर्व के विषय को चुनने की जिम्मेदारी नहीं रहती, बस तसवीरें खींचते जाओ!
अब थोडा सोचना पडेगा, थोडा वक्त दीजिए | (ड खाली नुक्ता आणि ए ची मात्रा, आणि क/त चे जोडाक्षर + नुक्ता एकत्र येण्यासाठी कसे टंकायचे?)

नंदन Fri, 11/07/2014 - 13:15

In reply to by रोचना

हलन्त अक्षर + कॅपिटल K = त्या अक्षराखालील नुक्ता.
वक्त़ या शब्दात तितकासा नीट उमटत नाही. कदाचित अजून निराळा मार्ग असावा.

बॅटमॅन Fri, 11/07/2014 - 13:17

In reply to by नंदन

क्यापिटल 'ज़े' डज़ द जॉब भेरी ओएल.

हा खास मराठी माध्यमातला, शुद्ध तुपातला उच्चार आहे. आम्हीही शिकताना असेच शिकलो अन कैक वर्षे हाच उच्चार बरोबर आहे अशी समजूत बाळगून होतो. नंतर निराकरण जाहले.

बॅटमॅन Fri, 11/07/2014 - 13:23

In reply to by नंदन

च्यायला =)) हा नंदन एक नंबरचा कोटीबाज आहे. _/\_

मैं हूँ कोटीबाज..नंदनवा..कोटीबाज कोटीबाज कोटीबाज कोटीबाज कोटीबाज कोटीबाज कोटीबाज कोटीबाज...

चिंतातुर जंतू Fri, 11/07/2014 - 14:11

In reply to by रोचना

>> अब थोडा सोचना पडेगा, थोडा वक्त दीजिए |

रोचना ह्यांच्या बागकाम धाग्यावर आलेलं फोटोंचं पीक पाहून हा विषय सुचवतो :

(ह. घ्या.)

रोचना Fri, 11/07/2014 - 14:40

In reply to by चिंतातुर जंतू

हाहाहा - मला तो विषय सुचला होता, बरं का! फक्त "फूल" की "भुंगा" द्यावं हे ठरलं नव्हतं. आता जाऊ दे, दुसरंच काहीतरी निवडते.