Skip to main content

छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ३ : 'पाहणार्‍याची रोजनिशी' आणि त्या रोजनिशीतला एक क्षण

प्रत्येकाच्या रोजनिशीत असे अनेक क्षण असतात जे सुखाच्या, दुखा:च्या, नैराश्याच्या किंवा उमेदीच्या भावना जागवतात किंवा एखादा क्षण, त्यातले घटक आजुबाजुच्या परिस्थितीबद्दल बरच काही सांगुन जातात आणि आपल्याला ते चटकन भावतं किंवा जाणवतं. ह्या क्षणांची रेंज मोठी आहे, अगदी आपल्या जवळच्या माणसाच्या निरागस हसण्याचा तो क्षण किंवा आपल्या रोजच्या कामाला जाण्याच्या प्रवासातला एखादा भावनेला हात घालणारा क्षण, कोणाला रोजनिशीतलं काय भावेल कोणी सांगावं पण चला आपण सगळे एकमेकांना सांगुयात...

आणि रोजनिशीतले क्षण टिपताना तो भारीचा कॅमेरा जवळ असायला पाहिजे असं नाही तर मोबाईलवरच्या साध्या कॅमेरात टिपलेले क्षणही खुप प्रांजळ असु शकतात, आणि २० दिवसात निदान १ क्षण तरी इथल्या प्रत्येकाला टिपता यावेत, तेंव्हा हा धागा शतकी करुयात बरे. ;)

काही अशाच क्षणांची ही एक झलक-

टिप - छायाचित्रे नेटवरुन उचलली आहेत, प्रताधिकार कायद्याचा भंग होत असल्यास चित्रे इथून काढून टाकावयाची असल्यास संपादकांनी कळवावे.

नियमः
१. केवळ स्वतः काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
२. स्पर्धाबाह्य अशी कितीही चित्रे देण्यास हरकत नसेलच मात्र त्यासाठी किमान एक चित्र स्पर्धेसाठी द्यावे लागेल.
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परीक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व परीक्षक असे चालू राहील.)
४. आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट १८ ऑगस्ट रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. १९ ऑगस्ट रोजी निकाल घोषित होईल व विजेती व्यक्ती पुढील विषय देईल.
५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिप्पण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठरावीकच निकष लावावेत असे, बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे, इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाची व्यक्ती आव्हान देईल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले, तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच विजेता/विजेती घोषित करणे बंधनकारक आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.

स्पर्धा का इतर?

ऋषिकेश Wed, 30/07/2014 - 16:15

वाहव्वा! विषय आव्हानात्मक + प्रत्येकाला सहभागी होता येईल असा वाटतोय.
संभाव्य शतकी धाग्याला हा पहिला विना चित्र प्रतिसाद खरंतर गालबोटच म्हणावे लागेल, पण तुर्तास त्यानेच सुरवात करण्यावाचून गत्यंतर नाही.

............सा… Wed, 30/07/2014 - 16:58

In reply to by ऋषिकेश

नाही ऋ, विनाचित्र प्रतिसादही खूप मजा येते वाचायला. बाकी आव्हानाबद्दल बोलायचं तर खूपच "डाऊन टू अर्थ" अन खरच सर्वांना सहभागी होता येईल असं आव्हान आहे.

रुची Wed, 30/07/2014 - 23:14

म्हटलं तर सोपा पण म्हटलं तर अगदी आव्हानात्मक वाटला, बरेच प्रतिसाद येतील अशी अपेक्षा आहे. विषयाशी संलग्न दिलेले फोटोही खूप आवडले.

मुळापासून Thu, 31/07/2014 - 03:01

या धाग्याचा प्रकार चुकलाय बहुतेक. पूर्वीचे धागे कलादालन प्रकारात होते, त्यामुळे ते एकत्र दिसत आहेत पण हा धागा त्यात दिसत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 31/07/2014 - 04:05

१. मॉडेल आणि म्यूझियम

कॅनन इओएस टी३, ५५-२५० मिमी, १/५०० से., f/5, ISO 200. जिंप वापरून चित्र कातरून, कृष्णधवल करून कॉण्ट्रास्ट वाढवला आहे.

२. तयारी

कॅनन इओएस टी३, ५५-२५० मिमी, १/८० से., f/14, ISO 200. जिंप वापरून चित्र कातरून, कॉण्ट्रास्ट वाढवला आहे.

मी Thu, 31/07/2014 - 23:09

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

दोन्ही चित्रं आवडली, पहिल्यात होम आणि होमलेसचं मिश्रण जमलं आहे, तर दुसर्‍यात टेस्ट मॅटर आणि म्हातारीचा मेकअप अगदी एकमेकाला पुरक आहेत. :) मस्त क्षण. दुसर्‍या फोटोचं कदाचित वेगळ्या प्रकारे संस्करण जमलं असतं असं वाटलं, मी प्रयत्न करून बघेन.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 01/08/2014 - 05:43

In reply to by मी

बऱ्यापैकी पिकलेली, केसही विरळ झालेली आजी हौसेने मेकप करते आहे, एका बाजूला फॅशनसाठी महत्त्वाचे असणारे कपडे हँगरवरून गायब झाले आहेत आणि दुसऱ्या बाजूला करकचून बांधलेलं कुलूप/लॅच - टापटीप असण्याची OCD म्हणावी का काय - यातली गंमत मला भावली. त्या गोंधळात भर घालायला (रिकाम्या हँगर्सच्याच बाजूला) मॅकडीचा पेला - मॅकडी हे काही उच्चभ्रू समजलं जात नाही - हा सगळा पसारा गंमतीशीर वाटला. तरीही या चित्रात आजीचा चेहेरा पुरेसा रोखठोक आलेला नाही; आजीचे बाकीचे फोटो पाहून असं वाटलं.

माझं लक्ष त्या 'टेस्ट मॅटर्स'कडे खरंतर गेलंच नव्हतं. ते ही या गोंधळात भर घालणारं म्हणून आवडलं.

नंदन Thu, 31/07/2014 - 11:51

१. सकाळ

Fort

२. दुपार

Nebraska

३. चहा

Merwan

४. कॉफी

Starbucks

चौथे चित्र स्पर्धेसाठी नाही. मोबाईल फोनच्या कॅमेर्‍याने टिपलेली (आणि इन्स्टाग्रामने संस्करण केलेली) चित्रं ह्या धाग्यासाठी अधिक अनुरूप वाटली.

मी Thu, 31/07/2014 - 23:19

In reply to by नंदन

पहिली तिन्ही आवडली दुसरं खास आहे एकदम, चौथ्यामधे माणूस हवा होता असं वाटून गेलं.

अस्वल Thu, 31/07/2014 - 23:46

In reply to by नंदन

मोबाईल फोनच्या कॅमेर्‍याने टिपलेली (आणि इन्स्टाग्रामने संस्करण केलेली) चित्रं ह्या धाग्यासाठी अधिक अनुरूप वाटली.

येकदम कसं बर्रोबर्र बोल्लात!
मोबाइल फोन किंवा इन्स्टाग्रामच्या फिल्टरने चित्राला एक rawness येतो, हे खरंतर त्यांचं कमीपण(दुसरा शब्द limitation साठी?) आहे.
पण त्यामु़ळे पकडलेले क्षण जास्त जिवंत आणि ठाशीव वाटतात जे पण स्पर्धेच्या विषयासाठी ते वरदानच ठरलंय.

स्पा Thu, 31/07/2014 - 12:02

निकॉन च्या Digicam ने हा फोटो घेतल्याने ह्याचे डीटेल मज पामारापाशी नाहीत
डायरेक्ट जेपेग सेव केलेली आहे

२.

व्यवस्थापकः
१. width="" height="" हे ट्याग्ज आकड्यांशिवाय देणे टाळावे
२. या टॅग्जमध्ये रोमन आकडे द्यावेत.

रोचना Thu, 31/07/2014 - 14:14

In reply to by स्पा

अतिशय सुंदर! पहिलं चित्रं खूपच आवडलं. कुठे टिपलं? चित्रातील निरनिराळ्या "रेघा" - म्हातार्‍याचा उघडा पाय, फांद्या, सावल्या, दाराच्या आणि भिंतीच्या लाइनी - मस्त एकत्र आल्या आहेत.

मुळापासून Thu, 31/07/2014 - 21:53

In reply to by स्पा

"रंगात येणारा म्हातारा" असे काहीसे शीर्षक ठेवू शकता तुम्ही पहिल्या फोटोला! :)

असो. विनोदाची बाजू सोडल्यास… पहिला फोटो खरंच अप्रतिम आहे!

मी Thu, 31/07/2014 - 23:35

In reply to by स्पा

पहिलं चित्र इतर म्हणत आहेत त्याप्रमाणे छानच जमलयं, त्यात एचडिआर परिणामही मस्त जमला आहे, लाल/केशरी/निळ्या रंगांनंतर मागचे रंगहीन झाड, आवार, म्हातारा ही रचना खास टिपली आहे. दुसर्‍या चित्रात मात्र गोल्डन रूलला धक्का देत विषयाला चौकटीच्या मध्यावर देण्याचं काही प्रयोजन आहे काय? त्यात रंगही चालले असते असं वाटलं.

धनंजय Thu, 31/07/2014 - 22:14

Chicago_cloud_gate
(शिकागोमधील "मिलेनियम पार्क, क्लाऊड गेट"पाशी)
कॅमेरा : Samsung SM-G900P
केंद्र : ४.८ मिमि
झडप : ?
छिद्र : एफ/२२

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 01/08/2014 - 04:57

In reply to by धनंजय

यातली कुठली एक वस्तू नजर वेधून घेत नाही. तोच उद्देश आहे का? मला समजलं नाही.

............सा… Fri, 01/08/2014 - 18:17

In reply to by धनंजय

मो-ह-क!!!
मला तरी ही माणसं त्या आरस्पानी जलाशयात (आरसा) उमललेल्या कमळांसारखी वाटली.
माझं आवडतं चित्र आहे हे. (१०/१०)

धनंजय Mon, 04/08/2014 - 21:50

In reply to by 'न'वी बाजू

पिंजर्‍यात बंदिस्त रानमाणसाचा दृष्टिपथ साथाररणपणे कॅमेर्‍याच्या दृष्टिपथासारखाच असावा.

कॅमेरा->रानमाणूस->गजापलिकडील पिले
असे तीन जवळजवळ* एकरेषीय होते. (*जवळजवळच, म्हणून मधील रानमाणूस चित्रात दिसत नाही.)

ऋषिकेश Tue, 05/08/2014 - 09:16

In reply to by धनंजय

माझा त्या गुलाबी टोपीमुळे रसभंग होतो आहे. शिवाय त्यामुळे फोटो कसा घेतला असेल याचा अंदाज येऊन (प्रत्यक्ष रानमानवाच्या नजरेतून बघतोय) ही मजाही जाते आहे असे वाटले. :(

धनंजय Thu, 31/07/2014 - 22:24

Hollywood_wedding
पूर्व पश्चिम जोडणी (हॉलिवुड, कॅलिफोर्निया)
कॅमेरा : Samsung
केंद्र : ३.७ मिमि
झडप : १/४१
छिद्र : एफ/२.६

मी Thu, 31/07/2014 - 23:40

धनंजयने टिपलेले क्षण फार मार्मिक आणि बोलके आहेत, मला तो समुपदेशनाकरिता फोन वाला फोटो फारच आवडला, आणि एवढ्या लोकांना गोल्डन गेटवर एकदम समुपदेशनाची काय गरज पडावी असा विचार डोक्यात आला :)

मुळापासून Fri, 01/08/2014 - 06:50

१. मी मोठी झाले!

तांत्रिक माहिती:
कॅमेरा: Pentax K-x
भिंग: ५५-३०० मि. मि.
उघडझाप: १/८० से.
छिद्र: f/५.६
-------------------------------------------------------------------------------------
२. वाढता कॉवबॉय

तांत्रिक माहिती:
कॅमेरा: Pentax K-x
भिंग: ५५-३०० मि. मि.
उघडझाप: १/२०० से.
छिद्र: f/५.८
-------------------------------------------------------------------------------------
३. नजर… खेळ…

कॅमेरा: Pentax K-x
भिंग: ५५-३०० मि. मि.
उघडझाप: १/१६० से.
छिद्र: f/५.६
-------------------------------------------------------------------------------------
४. रुसुबाई

कॅमेरा: Pentax K-x
भिंग: ५५-३०० मि. मि.
उघडझाप: १/१२५ से.
छिद्र: f/५.८
-------------------------------------------------------------------------------------
५. फुगलेलं प्रेम विकून थकलेला जीव…

तांत्रिक माहिती:
कॅमेरा: Canon Powershot १२०x
उघडझाप: १/८ से.
छिद्र: f/३.५
-------------------------------------------------------------------------------------
टीप: शेवटचा फोटो सोडून बाकी सर्व फोटोंवर गिम्प आणि Pentax च्या "RAW File Processing" software वापरून संस्करण केले आहे.

मी Fri, 01/08/2014 - 21:35

In reply to by मुळापासून

दुसरा, तिसरा आणि चौथा मस्त आहेत, विशेषतः रुसुबाई फारच आवडली. ३०० एम.एमला फोटो काढूनही नॉइज फार नाही हे विशेष, ट्रायपॉड वापरला असावा.

मुळापासून Fri, 01/08/2014 - 21:57

In reply to by मी

Tripod वापरला नाही. ५५-३०० रेंज असली तरी प्रत्येक फोटोमध्ये वापरलेली focal लेंग्थ कमी आहे आणि बरेच फोटो दिवसा ढवळ्या काढले आहेत त्यामुळे कदाचित noise कमी असेल.

मुळापासून Fri, 01/08/2014 - 23:44

In reply to by मी

तुमचं बरोबर आहे. उगाच तुम्हाला चुकीचं उत्तर दिलं मी. यापुढे फोकल लेंग्थ ची योग्य माहिती पण देत जाईन.

उदय. Fri, 08/08/2014 - 07:21

In reply to by रोचना

हा फोटो बघून जुन्या आठवणी मनात आल्या. माझा मित्र रास्ता पेठेत अपोलोजवळ राहायचा. त्याच्याकडे गेलो की हमखास कैलास डेरीला १ चक्कर होत असे. ग्लासातले दूध पिऊन झाल्यावर, दुधाच्या मिशा पुसायला मजा येत असे. तिथेच जवळ १ दुकान होते, जिथे एक म्हातारेसे गृहस्थ ५० पैशात की १ रुपयात एल.पी. रेकॉर्डवर जुनी गाणी, नाट्यसंगीत वगैरे ऐकवायचे. असे दुकान आहे का तिथे अजून? (काही वर्षांपूर्वी पुण्याला जायचा योग आला तेव्हा पुण्याची वाईट अवस्था बघून वाईट वाटले. मी पुणेकर नसून सुद्धा. हल्ली पूर्वीचे पुणे राहिले नाही, असे कोणी पुणेकर हळहळले, तर आश्चर्य वाटणार नाही. उलट तुमच्या दु:खात मी पण सहभागी आहे.)

मी Fri, 01/08/2014 - 21:42

In reply to by राधिका

फारच सुंदर फोटो आहे, आकाश, शांत समुद्र, लाटा, आणि किनार्‍यावरच्या वाळूच्या रेघा ह्यातून मस्त पॅटर्न तयार झाला आहे, त्यात ते निरागस दोघे :)

अस्वल Fri, 01/08/2014 - 22:28

एक प्रसंग आठवला.
फारा वर्षांपूर्वी नेसरीला (प्रतापराव गुजर) गेलो होतो, तेव्हा एस.टी स्टँडवर बसची वाट पहाताना बाजूला एक लिंबूसोड्याचं दुकान दिसलं.
तिथे मालक बहुधा बाहेर गेला असावा, कारण सूत्र एका १०-१२ वर्षाच्या मुलाच्या आणि त्याच्या मित्राच्या हाती होती. तिथला सोडा "गोटी-सोडा" होता.
जेव्हा जेव्हा एखादं गिर्‍हाइक सोडा मागायला यायचं, तेव्हा त्या गोटी-सोडयाची बाटली उघडण्याच्या कल्पेनेनेच ती मुलं खूष व्हायची. अजूनही लक्षात आहेत ते त्यांचे आनंदी चेहेरे आणि प्रत्यक्ष सोडा फुटतानाचा तो आवाज ऐकून त्यांनी चोरून एकमेकांकडे फेकलेल्या स्माय्ल्या!
कॅमेरा तेवढा नव्हता :(

मी Mon, 04/08/2014 - 21:23

मी टिपलेले काही क्षण -

कृपया ह्या प्रतिसादाला उपप्रतिसाद देऊ नये, अजून काही छायाचित्रे मी डकावणार आहे.

मिसळपाव Sat, 02/08/2014 - 22:24

मी (जवळजवळ) रोज चालायला जातो. माझ्या नेहेमीच्या मार्गावरचा हा फोटो. पहाटे सडकून पाउस झाला आणि अजून ढगाळ आहे. बाजुच्या झर्‍याचा आवाज भरून काढा! कधी हलकासा पाउस झाला तर झरा शांत असतो पण पानांवरचे थेंब टपटपत असतात आणि त्या मंद आवाजाची साथ असते. पक्षी गात असतात - कधी साद / प्रतिसादाची जुगलबंदि तर कधी समूह-गान! हपिसात प्रोजेक्ट सुरू करायचा असला तर माझंच लक्ष नसतं कारण या पाउण तासात प्रोजेक्टची आखणी चालू असते डोक्यात! किंवा बरेच दिवसानी ऐकलेल्या किशोरीताईंच्या लकेरी घोळत असतात, नाहितर गवाणकरांचं पुस्तक वाचलेलं असतं नुकतंच त्यामुळे 'वस्त्रहरण'ची कॅसेट वाजत असते. क्वचित असाहि दिवस असतो की विचारांचं मोहोळ शांत असतं. मी एक-दोनदा जप करायचा प्रयत्न केला पण कधी वेगळ्या ट्रॅकवर गाडी गेली कळलंच नाहि! त्यामुळे आता ठरवलंय की परत अशी निर्विचार अवस्था जाणवली की पाय न वाजवता हळूच निघून जायचं.....असो. तर हा माझ्या रोजनिशीतला अमूल्य क्षण.

सेल-फोनने काढलाय. या एव्ह्ढ्या भरघोस माहितीशिवाय अजून टेक्निकल डीटेल नाहिये :-)

व्यवस्थापकः height="" असा ट्याग टाळावा, शिवाय टॅगमधील आकडे रोमन अक्षरात लिहावेत ही विनंती.

मिसळपाव Tue, 05/08/2014 - 17:02

In reply to by मिसळपाव

व्यवस्थापकः height="" असा ट्याग टाळावा...

FAQ मधल्या या धाग्यात पायरी ७ मधे "टीप: लांबी किंवा रूंदी पैकी एकच मोजमाप दिलंत तर फोटो skew होत नाही." म्हंटलंय म्हणून मी फक्त width="400" दिलं. तुम्हा दोघांपैकी कोण बरोबर आहे?

......टॅगमधील आकडे रोमन अक्षरात लिहावेत ही विनंती.

नाहि कळलं हे. म्हणजे वरती ४०० आकडा वापरला तो? ..... नाहि पण आज एक एप्रिलपण नाहिये त्यामुळे चेष्टा नसावी हि :-)


पत्त्यातल्या 'चॅलेंज' डाव खेळलायत का कधी? त्यातल्याप्रमाणे सांगायचं तर 'तुमच्या दोन विनंत्यांवर माझी हि एक विनंती'! धागा एडीट करण्याऐवजी प्रतिसाद दिलेला बरा - विशेषतः अशा सूचना द्यायच्या असतील तेव्हा. धाग्यातले पुढचे फोटो बघायला स्क्रोल करताना इथे पान थांबलं म्हणून लक्षात आलं नाहितर पुढेच गेलो असतो.

ऋषिकेश Tue, 05/08/2014 - 17:13

In reply to by मिसळपाव

धाग्यातील पायरीचं बघतो, काही बदल आवश्यक वाटला तर करतो

आधी वरील चित्रात देवनागरीत ४०० लिहिलं होतं तर हाईटमधील अवतरण चिन्हात काहीच नव्हतं. व्यवस्थापकीय अधिकारात ते मी ठिक केल्याने तुम्हाला आता नीट दिसतंय.

जर विवक्षित हाईट अथवा विड्थ द्यायची नसेल तर तो टॅग काढूनच टाकावा आणि द्यायची असल्यास आकडा रोमन अक्षरात उदा. 400 असा द्यावा.

बाकी वेगळे प्रतिसाद देत बसलो तर धाग्यावर हेच प्रतिसाद अनेक होतील ;)

मुळापासून Sun, 03/08/2014 - 10:45

या पोस्टमध्ये दिलेले फोटो "रोजनिशी" मधले नसले तरी कॅंंडिड म्हणावेत असे आहेत. काहीही staged केलेलं नसून जे क्षण मला त्यावेळी भावले, ते टिपण्याचा माफक प्रयत्न केला आहे.

१. बाप

तांत्रिक माहिती:
कॅमेरा: Pentax K-x
भिंग: ५५-३०० मि. मि.
उघडझाप: १/२५० से.
छिद्र: f/८
फोकल लेंग्थ: १९० मि. मि.

------------------------------------------------------------------------------------------------

२. लग्नाचा फोटू

तांत्रिक माहिती:
कॅमेरा: Pentax K-x
भिंग: ५५-३०० मि. मि.
अधिक माहिती उपलब्ध नाही.

------------------------------------------------------------------------------------------------

३. The Spell of Innocence (मला योग्य मराठी शीर्षक सुचले नाही.)

तांत्रिक माहिती:
कॅमेरा: Pentax K-x
भिंग: ५५-३०० मि. मि.
उघडझाप: १/१६० से.
छिद्र: f/५.६
फोकल लेंग्थ: २३० मि. मि.

Nile Mon, 04/08/2014 - 08:07

१.

१/१६०, ५५ मिमि, निकॉन डी५१०० (क्रॉप्ड)

२.
१/५००, २८ मिमि, निकॉन डी५१०० (मोनोक्रोम मोड)

चित्रावर क्लिक केल्यास मोठ्या आकारात पाहता येईल.

बॅटमॅन Mon, 04/08/2014 - 17:54

In reply to by Nile

गायमुलगा बाकी आवडला. तुफान ढिशक्यांव ढिशक्यांव, जीन प्यांटा अन हॅटा अन टोकदार बुटं आणि ते विशिष्ट अ‍ॅक्सेंटातले विंग्रजी असलेल्या वेष्टर्नपिच्चरांची आठवण येऊन डॉळे पाणावले. पाहतो आता एखादा.

मी Mon, 04/08/2014 - 21:21

In reply to by Nile

दुसरा फोटो पानभर करून पाहिल्यावर मस्त वाटला, नुसत्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर हा शेरीफ झकास वाटला असता असे वाटले, जरा संस्करण करून बघेन.

मी Tue, 05/08/2014 - 15:57

इथे सातत्याने प्रतिसादशील असलेल्या सदस्यांना विनंती कि आव्हानात भाग घेतला नाही तरी निदान मोबाईल/इन्स्टाग्रामवरचे छायाचित्र इथे देऊन समस्त ऐसीकरांना तुमच्या रोजनिशीचा क्षण पहाण्याची संधी द्यावी.

चटकन आठवणारे सदस्य - बॅटमन, मन, अमुक, मेघना, सारीका, अनुप, अदुबाळ, चिंतातूर जंतु, राजेश, टिंकरबेल, अरुण जोशी, ऋषिकेश, नगरीनिरंजन, रुची, रोचना.