असॉल्ट आणि सेक्शुअल असॉल्ट - परिप्रेक्ष्य
लैंगिकता फक्त योनी/शिस्नापुरती मर्यादित नसते. -- मास्टर्स आणि जॉन्सन.
'मास्टर्स आणि जॉन्सन' चं म्हणण काय आहे हे लक्षात आलं नाही, थोडं विस्तारून सांगता येईल काय?
स्त्रियांवर होणार्या अत्याचारांमधे विनयभंग किंवा लैंगिक गुन्ह्यांमध्ये शारिरीक हिंसाचार हा इतर शारिरीक हिंसाचाराप्रमाणेच असतो, टक लावून पहाणे, शेरेबाजी करण्यामध्ये शारिरीक कृतीचे संकेत असतात त्यामुळे तोही एकप्रकारे हिंसाचारच समजला जावा, पण ह्या संदर्भात लैंगिक भावनेला महत्त्व येण्याचे कारण सांस्कृतिक असावे काय? येथील सदस्य ह्याबद्दल नक्की कसा विचार करतात हे कळावे हा हेतू आहे.
(या धाग्यातून चर्चा वेगळी काढली आहे. सदस्य मी आणि ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी धाग्यात आणि/किंवा प्रतिसादांमधून भर घालावी.)
समजलं
वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या कृती आणि शब्दांमधून लैंगिक सुख मिळतं, सगळ्यांसाठी एकाच प्रकारचा साचा बनवता येत नाही.
थोडक्यात थोडसं मानसिक, थोडसं शारिरीक आणि थोडसं सांस्कृतिक(?) आहे, ह्यातल्या सुख देण्याशी संबंधित भावना दुखावल्या म्हणजेच सेक्शुअल असॉल्ट असे म्हणता यावे काय? ह्याला फिजिकल असॉल्टपेक्षा वेगळं मानण्यामागे नक्की काय कारण असावं?
ह्या माझ्या विधानावर एकंदर सर्वच सदस्यांचं मत जाणून घ्यायला आवडेल, तेंव्हा वेगळा धागा बनविता येईल काय ह्या तीन प्रतिसादांचा?
सेक्श्युअल असॉल्ट हा माझ्या
सेक्श्युअल असॉल्ट हा माझ्या मते क्लिअर "लैंगिक गुन्हाच" असतो. अन तो "रिसिव्हीग एन्ड" ला असलेल्या व्यवस्थित कळतो. मी आतापर्यंत फक्त एकदा शारीरीक गुन्ह्यास "रिसिव्हर" म्हणून सामोरी गेले आहे याचे कारण पहीला शारीरीक गुन्हा घटल्यानंतर I made it sure nail & tooth, it won't happen with me again. अर्थात शाब्दिक गुन्हे २-३ पाहीले/ऐकले आहेत.
(१) छातीस स्पर्श (यात सांस्कृतिक काय आहे, या गुन्ह्यास क्लिअर कट लैंगिक परिमाण आहे.)
(२) जवळून जाताना छातीबद्दल अचकट विचकट बोलणे (क्लिअर कट लैंगिक परिमाण आहे.)
(३) आपली रिक्षा फडक्याने पुसत असताना, अचानक मुलगी पाहून, रिक्षा स्ट्रॅटेजिकली (!) जागी अन मुलीकडे पहात हसत रिक्षा पुसू लागणे. हे मला सांगता येत नाही. पण हे सेक्श्युअलच होते.
(४) मुलगी रात्री एकटी उभी आहे हे पाहून, लाज न बाळगता , जरा आडोशाला हस्तमैथुन सुरु करणे. (क्लिअर कट लैंगिक परिमाण आहे.)
आपल्या समाजात लैंगिकतेचा
आपल्या समाजात लैंगिकतेचा नैतिकतेशी थेट संबंध आहे.कुठल्या लैंगिक वर्तनाला तुम्ही अनैतिक म्हणणार? हे देखील सापेक्ष आहे. मला सापेक्ष म्हणताना व्यक्तिसापेक्ष, समाज सापेक्ष,कालसापेक्ष,स्थलसापेक्ष,संस्कारसापेक्ष असे सर्व सापेक्षांची सरमिसळ अभिप्रेत आहे. व्यक्तिगत आयुष्य व सार्वजनिक आयुष्य यातील सीमारेषा आपल्याकडे अस्पष्ट आहे. या सीमारेषेवर जर लैंगिकतेचा प्रश्न उपस्थित झाला तर तो संवेदनशील बनतो. त्याचे राजकारण होउ शकते. एखाद्या संघटनेतील पदाधिकारी वा राजकीय पक्षातील कार्यकर्ता यांच्या खाजगी जीवनातील अशा प्रश्नचिन्हांकित लैंगिक वर्तनाचे राजकीय/सामाजिक भांडवल कुणी केले तर त्याचे राजकीय /सार्वजनिक जीवन संपुष्टात येउ शकते.काही लोक पक्ष/ संघटना अडचणीत येउ नये म्हणुन स्वतःहून आपल्या पदाचा राजीनामा देतात तर काही लोक हा आपल्या अस्तित्वाचा लढा आहे असे समजून तांत्रिक मुद्द्यांवर लढत राहतात. थोडक्यात समाजातील लैंगिकता व नैतिकता यांचा तिढा हा असाच न सुटणारा आहे. दोन्हीचा संबंध हा शेवटी आपल्या मेंदुशी आहे.
शंका आणि खुलासा
(१) छातीस स्पर्श (यात सांस्कृतिक काय आहे, या गुन्ह्यास क्लिअर कट लैंगिक परिमाण आहे.)
(२) जवळून जाताना छातीबद्दल अचकट विचकट बोलणे (क्लिअर कट लैंगिक परिमाण आहे.)
(३) आपली रिक्षा फडक्याने पुसत असताना, अचानक मुलगी पाहून, रिक्षा स्ट्रॅटेजिकली (!) जागी अन मुलीकडे पहात हसत रिक्षा पुसू लागणे. हे मला सांगता येत नाही. पण हे सेक्श्युअलच होते.
(४) मुलगी रात्री एकटी उभी आहे हे पाहून, लाज न बाळगता , जरा आडोशाला हस्तमैथुन सुरु करणे. (क्लिअर कट लैंगिक परिमाण आहे.)
@अपर्णा - हाताबद्दल/डोक्याबद्दल अचकट,विचकट बोलल्यास तो लैंगिक गुन्हा ठरेल काय? अमुक एका अवयवाबाबत हीन बोलण्याला लैंगिक 'गुन्हा' का ठरवले जाते? मारहाणीची धमकी देणे आणि शाब्दिक छेड काढणे एकाच गुन्ह्यात का समाविष्ट होऊ शकत नाही? लैंगिक अवयवांबाबतच एवढे वेगळेपण बाळगण्याचे कारण काय असावे?
आपल्या समाजात लैंगिकतेचा नैतिकतेशी थेट संबंध आहे.कुठल्या लैंगिक वर्तनाला तुम्ही अनैतिक म्हणणार? हे देखील सापेक्ष आहे. मला सापेक्ष म्हणताना व्यक्तिसापेक्ष, समाज सापेक्ष,कालसापेक्ष,स्थलसापेक्ष,संस्कारसापेक्ष असे सर्व सापेक्षांची सरमिसळ अभिप्रेत आहे.
@प्रकाश घाटपांडे - धन्यवाद, मला ह्याच प्रकारे वैयक्तिक मत जाणून घ्यायचे होते.
@स्त्रीवादी, @पुरुषवादी, @पुरोगामी, @भांडवलशाहीवादी, @'कला'वाले @बागप्रेमी @वाग्प्रेमी @आस्तिक @नास्तिक @अॅग्नॉस्टिक @नुस्तेचठिक @मिष्टर सहमते @ठ्ठोवाले @रोचके @इग्नोरे - कृपया धाग्यातल्या विषयाबद्दल आपलं प्रामाणिक मत जरूर नोंदवा.
ह्या संदर्भात लैंगिक भावनेला
ह्या संदर्भात लैंगिक भावनेला महत्त्व येण्याचे कारण सांस्कृतिक असावे काय?
मुळात कोणत्या कृतीला गुन्हा मानावे व कोणात्या नाही हेच मुळात केवळ संस्कृती नाही तर स्थल-काल-व्यक्ती सापेक्ष असते. त्यापुढे जाऊन गुन्ह्याचा लैगिंकतेशी जोडलेला संबंध अर्थातच संस्कृती-स्थल-काल-व्यक्ती सापेक्ष असतो.
परस्त्रीकडे टक लाऊन पाहणे हे भारतात काही भागात सध्या लैंगिक गुन्हा समजला जात असेल, मात्र वेश्येकडे टक लाऊन बघण्याला तर अनेकांच्या लेखी गुन्हाच समजला जात नसावे. पुरूषाने लिंग दाखवणे अनेकदा लैगिंक समजले जाते. पण तो नियम दिगंबर साधुंसाठी समाज शिथिल करतो. भुतानमध्ये घरादारांवर लिंगाचे व्यवस्थित चित्रण असते तर भारतात शिवलिंगाची पुजा होते. अशी बरीच उदा देता येतील.
संक्षिप्त
वरील प्रतिसादाचे किम्वा चर्चेचे एकूणच संक्षिप्तीकरण करायचे झाल्यास पुढील वाक्य सारांश म्हणता यावे काय ?
गुन्हा हा फक्त कृतीवरून ठरत नाही, तर कृतीमागील उद्दीष्टावरूनही ठरतो.
उदा :-
१.नग्न साधू स्त्रियांना बघून उत्तेजित झालेत, म्हणून नागडे फिरताहेत, असे नव्हे.
२.दुसर्याच बाईचा हात हातात घेतो डॉक्टरसुद्धा, पण तो नाडी तपासत असेल तर ते चालते.
३.पाण्यात बुडणार्या माणसाला प्रथमोपचार म्हणून ओठाला ओठ दाबून दिलेली ट्रीटमेंट चालते.
सध्या वेळ कमी अहए. विचार केल्यास अधिक उदाहरणे शोधता यावीत.
हे वरवरचे झाले. मुळात सामाजिक
हे वरवरचे झाले. मुळात सामाजिक नियम तितके सुलभ नसतात. निव्वळ उद्देश पुरेसा नसतो
-- अरबस्तानात साधुचे उद्देश कितीही पाक असले तरी त्याला तसे फिरता येणार नाही.
-- नाडी तपासण्याच्या निमित्तानेही परपुरूषाने हात लाऊ नये असे समजणार्या काही संस्कृती आहेत
-- स्त्रियांना अशी ट्रीटमेंट पुरूषांनी द्यावी का? याविषयी देशोदेशी मते बदलतात. जसे आपल्याकडे स्त्री गुन्हेगारांना अटक करायला अनेकदा स्त्री पोलिस असावा लागतो.
समाज ज्या लैंगिक वर्तनाला
समाज ज्या लैंगिक वर्तनाला गुन्हा समजतो अशा कोणत्या वर्तनाला तुम्ही गुन्हा समजत नाही?
भारतीय घटनेच्या मते समलैंगिक संबंध ठेवणे गुन्हा आहे, मी तसे समजत नाही.
काही समाजात स्वहस्तमैथूनाला गुन्हा समजला जातो, मी तसे समजत नाही.
काही समाजाच्या मते स्त्रियांनी हस्तमैथून करणे गुन्हा आहे, मी तसे समजत नाही.
यादी बरीच मोठी आहे.
आणि ज्या लैंगिक वर्तनाला तुम्ही गुन्हा समजता त्याला शारिरीक हिंसाचाराशी निगडीत गुन्ह्यापेक्षा वेगळा का मानता?
कारण माझ्यावर तसे कंडिशनिंग आहे व गुन्ह्याची तीव्रता समजण्यासाठी असे वर्गीकरण मला सोयीचे वाटते
कोअलो पाब्लोच्या आल्केमिस्ट मधील एका पात्राच्या मते तर सगळे गुन्हे हे एक प्रकारची चोरीच असतात म्हणून प्रत्येकाला चोरी समजून एकच ठोक प्रतिसाद (शिक्षा वगैरे) देता येत नाही - मला देणे अयोग्य वाटते. त्यासाठी हे वर्गीकरण!
धन्यवाद
कारण माझ्यावर तसे कंडिशनिंग आहे
धन्यवाद, गुन्ह्यामागे देत आहात ते कंडिशनिंगचे समर्थन योग्य आहे काय? योनिशुचिता पण कंडिशनिंगच आहे न?
व गुन्ह्याची तीव्रता समजण्यासाठी असे वर्गीकरण मला सोयीचे वाटते
लैंगिक गुन्ह्याची तीव्रता कमी जास्त वाटणेपण कंडिशनिंगचा भाग आहे काय? कि त्यामागे एखादी वैचारिक भुमिका आहे?
समजले नाही
परस्त्रीकडे टक लाऊन पाहणे हे भारतात काही भागात सध्या लैंगिक गुन्हा समजला जात असेल, मात्र वेश्येकडे टक लाऊन बघण्याला तर अनेकांच्या लेखी गुन्हाच समजला जात नसावे.
वेश्येकडे टक लाऊन बघण्याला भारतात कुठे गुन्हा समजला जातो?
पुरूषाने लिंग दाखवणे अनेकदा लैगिंक समजले जाते. पण तो नियम दिगंबर साधुंसाठी समाज शिथिल करतो.
सार्वजनिक नग्नतेला बंदी आहे, दिगंबर साधुंच्या नग्नतेने स्त्रिया ऑफेन्ड होणार नाहीत असे म्हणायचे आहे काय? निदान इथल्या स्त्रियांचे ह्यावरचे मत समजेल काय?
भुतानमध्ये घरादारांवर लिंगाचे व्यवस्थित चित्रण असते तर भारतात शिवलिंगाची पुजा होते. अशी बरीच उदा देता येतील.
तुम्ही दिलेली उदाहरणे सांस्कृतिक आहेत, त्यामुळे ठराविक लैंगिकतेने व्यक्त होण्याला गुन्हा मानणे सांस्कृतिक असावे काय?
हे सर्व महत्वाचं आहेच, पण ते
हे सर्व महत्वाचं आहेच, पण ते सर्व क्षणभर बाजूला ठेवू..
मी एक प्रश्न विचारतो.
विविध प्रकारचे कपडे (फॅशन)(मी उत्तान, तोकडे कपडे किंवा कोणतेही सजेस्टिव्ह शब्द वापरु इच्छित नाही), मेकअप, अलंकार इत्यादिपैकी एक किंवा अनेक गोष्टी ज्या स्वतःला आवडतात (आणि अर्थातच आपण त्यात सुंदर, आकर्षक, खुलून दिसतो अशी आपली समजूत असते) त्या करुन बाहेर निघताना आपण इतर पुरुषांना दिसणार हे अगदी साहजिक आहे हे मान्य असेलच असे गृहीत धरुन खालील प्रश्नः
आता पुरुषांनी तुमच्याकडे पाहणे / बोलणे / वागणे याबाबत आदर्श अपेक्षा काय आहे?
थोडक्यात विचारण्याचा प्रयत्न केला आहे. याचा अश्लील क्रिया (वरील काही प्रतिसादात असलेल्या उघड घृणास्पद क्रिया) या गोष्टीचा संबंध नाही. केवळ पाहणे / चेहरा, नजर आणि संवाद यातून प्रतिक्रिया देणे याविषयी प्रश्न आहे.
इतरांनी ते पाहू नये किंवा त्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करावे असे वाटते का ?
सुंदर वाटल्यास पुरुष कलीग्जनी तसे स्पष्ट आणि सरळ शब्दात म्हणावे का?
नीटनेटके, टापटीप, आकर्षक राहिल्याबद्दल इतरांची दाद यावी अशी अपेक्षा असते का?
माझं मतः मी जे काय करते ते
माझं मतः
मी जे काय करते ते माझ्यासाठी असतं, दुस-यांना दाखवण्यासाठी नसतं. (मी ब-याच वेळा गबाळीसुद्धा राहते कारण मला आवरायचा कंटाळा येतो) नीटनेटकी राहिले तर मला छान वाटते म्हणून, गबाळी राहिले तर मला कंटाळा आला म्हणून! यात इतरांसाठी काहीही नसते, अर्थात म्हणून त्यांना काही मत असणार नाही असे नाही.
तेव्हा, इतरांना (यात स्त्री, पुरूष दोन्ही आले - मी वेगळी ट्रिटमेंट देत नाही) आवडले असल्यास त्यांनी जर ते मला तसे चांगल्या शब्दात सांगितले तर मी आभार मानते.
कधी ब-याच लोकांना मी यापेक्षा बरी दिसू शकते असे वाटून ते मला मनापासून सल्ले देतात (अगं तू केस ना जरा वेगळे काप, हा रंग नाही विषेष खास दिसत तुला त्यापेक्षा दुसरा घाल ना - तो जास्त छान दिसतो वगैरे वगैरे) मी तेही आस्थेने ऐकून घेते, योग्य वाटल्यास करते, नाहीतर दुस-या कानाने सोडून देते.
या उप्पर सौजन्यपूर्ण भाषा/हावभाव सोडून आलेल्या कोणत्याही कौतुक वा टिकेला मी दुर्लक्ष/फटकावणे इत्यादी जसे अॅप्लिकेबल असेल तसे उत्तर देते.
बेसिकली मी कोणाच्या गोष्टीत ढवळाढवळ करत नसेन तर त्यांनी माझ्या गोष्टीत करू नये ही अपेक्षा असते!
-आपण सुंदर दिसण्याचा प्रयत्न
-आपण सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतो ते फक्त स्वतःसाठीच. इतरांनी पहावं म्हणून नव्हे असं कितीजणांना / जणींना वाटतं?
-सुंदर दिसत असल्याबद्दलची कॉमेंट किंवा अधिक सुंदर दिसण्याबाबतची सूचना सरळ सामान्य शब्दात पुरुषाकडून आलेली कितीजणींना मनापासून आवडेल ?(उघड आनंद, केवळ मनातला नव्हे)
-ही कॉमेंट कोणाकडून यावी यावर काही फरक पडेल का? (पुरुष कलीग, देखणा बॉस, --- . समजा तुमचा नेहमीचा रिक्षावाला म्हणाला की मॅडम आप को ये ड्रेस बहुत अच्छी दिखती है.. किंवा लिपस्टिक अच्छी नही लगती.. तर?)
-रंगाने गोरी असलेली ऑफिसमधली मुलगी त्या रंगावर अत्यंत उठून दिसणारा लालचुटूक झुळझुळीत टॉप घालून आली आणि मी अत्यंत आकर्षित झालो तर माझी नजर कशा प्रकारे ठेवावी ?
-चोरटी, थेट भिडवून, रोखून, निरागसपणाचा आव आणून, अधूनमधून तिचे लक्ष नसताना पाहून घेणे, त्या दिशेलाच न पाहणे, तिच्याशी बोलताना छताकडे पाहणे, नजरेत आपल्याला वाटलेले आकर्षण अजिबात दिसू न देणे.
- तिला कॉम्प्लिमेंट द्यावी की नाही? दिली तर कोणते शब्द सर्वमान्य ठरतील ? "हा ड्रेस तुला खूप छान दिसतोय." की "तुझ्या गोरेपणामुळे हा लाल ड्रेस म्हणजे एकदम कातील" "तू नेहमी लाल कपडे घालत जा"
काय योग्य ठरावे? की असे आकर्षण वाटणेच मुळात चूक, असंस्कृत इ इ.
ज्याच्याबद्दल तुम्हाला
ज्याच्याबद्दल तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची त्याला अवघडल्यासारखे वाटणार नाही अशी प्रतिक्रिया निदान त्या माणसासमोर द्या. अपरोक्ष काय काशी घालायची ती घाला!
"अवघडल्यासारखे वाटणार नाही" - हे व्यक्ती सापेक्ष बदलते त्यामुळे तो अंदाज घ्यावा.
जर ओफिस मधला एखादा हॅन्ड्सम हिरो विशेष झक्पक आला असेल तर आम्हीपण चांगल्या ओळखीचा असल्यास "आज कोणासाठी हे खास?" असं त्याला विचारतो. जर ओळखीचा नसेल तर तो आजूबाजूला नसताना "आज हा माझा" इत्यादी जोक करून सुद्धा खिदळतो. पण ते तेवढ्यापुरते असते दोन्ही केस मध्ये मी त्या व्यक्तीच्या "पर्सनल स्पेस" ला छेद्ले नाहीये.
बाकी "काय योग्य ठरावे? की असे आकर्षण वाटणेच मुळात चूक, असंस्कृत इ इ." असले प्रश्न विचारजंती चर्चेसाठी फारच उद्बोधक वगैरे (शब्दासाठी हाबार्स : बॅटू) आहेत.
बाकी "काय योग्य ठरावे? की असे
बाकी "काय योग्य ठरावे? की असे आकर्षण वाटणेच मुळात चूक, असंस्कृत इ इ." असले प्रश्न विचारजंती चर्चेसाठी फारच उद्बोधक वगैरे (शब्दासाठी हाबार्स : बॅटू) आहेत.
एकूणएक चर्चा या विचारजंतीच असतात. उगीच सिलेक्टिव्ह भागाला विचारजंती लेबलवण्यात अर्थ नाही.
तसेच पाहिले तर मग जगात देअर इज नथिंग टु डिस्कस. (यूजी कृष्णमूर्तींच्या "देअर इज नथिंग टु अंडरस्टँड" वरुन उधार)
हा एक तुमचा मूळ प्रतिसाद आणि
आणि त्या विषयावर एक वेगळा लेख आदितीने लिहील्यावर मग त्या लेखावर तुमचा खालील प्रतिसाद होता.
खिक्क..
ब-याच जणांनी बराच आणि ब-याच वेळा विचार केलेला दिसतोय एकूण.. प्रतिसादात जाणवले होतेच पण असे काहीतरी आल्याशिवाय राहूच शकणार नाही हेही तीव्र जाणवत होते.. म्हणून वाट पाहातच होतो..
हास्यास्पद असलेल्या आणि सरळ उत्तर देण्याइतपतही योग्यतेच्या नसलेल्या चिक्कार मनोरंजक आदि टाईपच्या प्रश्नावर बरेच काही उगवून आले की..
छानच..
गविकाका रागावो मत, बोलो मेरा क्या चुक्या?
हास्यास्पद असलेल्या आणि सरळ
हास्यास्पद असलेल्या आणि सरळ उत्तर देण्याइतपतही योग्यतेच्या नसलेल्या चिक्कार मनोरंजक आदि टाईपच्या प्रश्नावर
चुक्या इतनाईच की उप्पर मैने क्वोट किया हुयेला मेरे ओरिजिनल प्रष्णों का वर्णन मेरा नही है बल्कि उस प्रश्ण को औरोंसे उस धागे पे जो वागणूक मिळी उसका वर्णन है.
मेरा म्हणणा उस वक्त भी पोप्कोर्न खाने के वास्ते नही था.. लेकिन उसको मनोरंजक हास्यास्पद वगैरा बोलके अनुल्लेख से मारा गया और फिर भी उनमेंसे कईयोंके मन में उसकी बोच खदखदती रही ऐसा लगा और वरिजिनल जगह किसीने भी क्लियर प्रतिवाद न करते हुये अनुल्लेख से मारे हुये तथाकथित फालतू विधानोंकी वजह से अन्य कही पूरा लेख लिखा जायेगा ये अपेक्षा थी और वह सच हुई..
सीधा उत्तर मिला नहीच.. तभीभी और अभीभी..
संशय क्या.. मेरेको पक्की
संशय क्या.. मेरेको पक्की खात्री है.
अब इस हिंदी में आवरने जैसा क्या है? एक भारतीय होने के नाते हमारी मान हिंदी के मानसे ऊंची है. इसलिये हिंदी में पत्राचार जरुरी है.
इन नवी बाजू का कुछ समजता नही.. जब देखो अतिशयोक्ती, जब देखो अतिशयोक्ती..
छे.. मैं तो बुचकळे में पड जाता हूं.
मूळच्या बेळगावच्या असलेल्या
मूळच्या बेळगावच्या असलेल्या एका मित्राकडून "धन्यवाद गळू" आणि "एन्जॉय माडी" ह्या दोनच वाक्यप्रयोगांची माहिती आणि ते कुठे वापरायचे याची जुजुबी माहिती झाली असल्याने सदर प्रतिसाद डोक्यावरून गेला आहे. असो.
या जन्मी मी मराठी, हिंदी आणि मोडके तोडके इंग्रजी या भाषांच्या ज्ञानावर समाधानी आहे, बाकी भाषा पुढील जन्मी शिकू!
पण तरीही तुम्ही म्हटलं आहे तर काहीतरी उद्बोधक, रोचक इत्यादी असेल!
शिवाय अर्थ मराठी मध्ये समजावून सांगितल्यास मंडळ आपले आभारी राहील.
याची उत्तरे व्यक्तीसापेक्ष
याची उत्तरे व्यक्तीसापेक्ष असतील असे वाटते. माझ्यापुरती माझी उत्तरे:
-आपण सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतो ते फक्त स्वतःसाठीच. इतरांनी पहावं म्हणून नव्हे असं कितीजणांना / जणींना वाटतं?
कितीजणांना माहिती नाही.
मी सुंदर दिसण्याचा प्रयत्न करत नाही. कपडे किती कंफर्टेबल आहेत व मला किती आवडताहेत (मला कसे दिसतील याचा विचार न करता) मी निवडतो. इतरांना काय वाटते तो त्यांचा प्रश्न!
-सुंदर दिसत असल्याबद्दलची कॉमेंट किंवा अधिक सुंदर दिसण्याबाबतची सूचना सरळ सामान्य शब्दात पुरुषाकडून आलेली कितीजणींना मनापासून आवडेल ?(उघड आनंद, केवळ मनातला नव्हे)
मला अशी कमेंट पुरूषांकडून आली तरी आवडते.
-ही कॉमेंट कोणाकडून यावी यावर काही फरक पडेल का? (पुरुष कलीग, देखणा बॉस, --- . समजा तुमचा नेहमीचा रिक्षावाला म्हणाला की मॅडम आप को ये ड्रेस बहुत अच्छी दिखती है.. किंवा लिपस्टिक अच्छी नही लगती.. तर?)
जर मला कोणी मॅडम म्हणाले तर मला फरक पडेल, बाकी कोण म्हणतंय त्याने फरक पडणार नाही
-रंगाने गोरी असलेली ऑफिसमधली मुलगी त्या रंगावर अत्यंत उठून दिसणारा लालचुटूक झुळझुळीत टॉप घालून आली आणि मी अत्यंत आकर्षित झालो तर माझी नजर कशा प्रकारे ठेवावी ?
-चोरटी, थेट भिडवून, रोखून, निरागसपणाचा आव आणून, अधूनमधून तिचे लक्ष नसताना पाहून घेणे, त्या दिशेलाच न पाहणे, तिच्याशी बोलताना छताकडे पाहणे, नजरेत आपल्याला वाटलेले आकर्षण अजिबात दिसू न देणे.
पुन्हा कशी असावी माहिती नाही. कशी नसावी हे सांगता येईल.
तिच्याशी जराही परिचय असल्यास मी तिला स्पष्टपणे काँप्लिमेंट देतो.
अपरिचित असल्यास मी तिच्याकडे नजर रोखून बघत नाही किंवा मग तिच्याशी परिचय करून घेतो आणि मग काँप्लिमेंट देतो. मला आजवर कोणीही मारलेले नाही
- तिला कॉम्प्लिमेंट द्यावी की नाही? दिली तर कोणते शब्द सर्वमान्य ठरतील ? "हा ड्रेस तुला खूप छान दिसतोय." की "तुझ्या गोरेपणामुळे हा लाल ड्रेस म्हणजे एकदम कातील" "तू नेहमी लाल कपडे घालत जा"
वो तो हरेक का अंदाज है! प्रत्येकाचा डिफरंशिएटर तिथेच तर असतो ;) ;)
प्रतिसादकांचे मत बदलणे
प्रतिसादकांचे मत बदलणे अपेक्षित किंवा स्वीकारार्ह नाही?
मग चर्चा कसली, ते नुसते डेटा कलेक्शन होईल की..
तसे नाही, तुम्ही विचारत असलेल्या प्रश्नांमुळे विचारांची दिशा बदलत असल्यास(जसे सविता ह्यांचे झालेले असावे असे दिसते) ते मला अपेक्षित नाही. मी अमुक एक दिशा न देता, विषयावर सदस्याचे काय विचार आहेत हे जाणुन घ्यायचा प्रयत्न मुळ धाग्यात करत आहे.
तुमच्या मूळ प्रश्नाच्या
तुमच्या मूळ प्रश्नाच्या अनुषंगाने:
एका पुरुषाला आडवेळी, आडवळणावर अडवून त्याला चोप देऊन त्याचे घड्याळ, पाकीट, मोबाईल इत्यादि काढून घेणे यामधे शारिरीक हल्ला लुटण्याच्या हेतूने केलेला आहे. तो त्या पुरुषासाठी ट्रॉमॅटिक आहे. कारण मार खाल्ल्याच्या शारिरीक आणि मानसिक वेदना काहीकाळ त्रास देत राहतात. पण त्यापायी तो उध्वस्त होत नाही कारण पाकीट, घड्याळ, मोबाईल हे काहीकाळाने पुन्हा रिप्लेनिश होऊ शकतात आणि या घटनेचे आयुष्यभरासाठी खोल घाव राहात नाहीत.
पण इन गिव्हन कंडिशन्स ऑफ टेंपरेचर अँड प्रेशर, एका स्त्रीला वरीलप्रमाणेच आडवेळी, आडवळणावर अडवून तिच्याकडून "लुटण्या"च्या गोष्टींमधे उपरोक्त वस्तूंपेक्षा अत्यंत वेगळी आणि अॅडिशनल गोष्ट उपलब्ध असते ती म्हणजे तिची "अब्रू". नुसता हिंसक शारिरीक हल्ला आणि लैंगिक दृष्टिकोनातून केलेला हल्ला यात असलेला फरक अर्थातच या "अब्रू" (शील, इज्जत) संकल्पनेने प्रचंड मोठा ठरतो.
याला मुख्य कारण म्हणजे अब्रू नावाची एक लुटणीय गोष्ट आहे, आणि ती एकदा "लुटली" गेली की ती परत येत नाही आणि आयुष्यभरासाठी स्त्रीवर फुली बनून बसते ही रुढ असलेली समजूत. त्यामुळे या दोन प्रकारच्या हिंसक हल्ल्यांमधे हा मोठा फरक पडतो.
अश्या हल्ल्याचे घाव विसरुन जा असं सांगणं फार सोपं, पण आजुबाजूच्या जगात तसं होऊ दिलं जात नाही हे मूळ कारण आहे या बाबतीत असलेल्या फरकाचं.
धन्यवाद
सोदाहरण स्पष्टीकरणासाठी धन्यवाद.
याला मुख्य कारण म्हणजे अब्रू नावाची एक लुटणीय गोष्ट आहे, आणि ती एकदा "लुटली" गेली की ती परत येत नाही आणि आयुष्यभरासाठी स्त्रीवर फुली बनून बसते ही रुढ असलेली समजूत. त्यामुळे या दोन प्रकारच्या हिंसक हल्ल्यांमधे हा मोठा फरक पडतो.
अश्या हल्ल्याचे घाव विसरुन जा असं सांगणं फार सोपं, पण आजुबाजूच्या जगात तसं होऊ दिलं जात नाही हे मूळ कारण आहे या बाबतीत असलेल्या फरकाचं.
म्हणजे ठराविक लैंगिक वर्तनाला हिंसाचारापेक्षा वेगळा गुन्हा समजणे हि सामाजिक/सांस्कृतिक जडणघडणीतून आलेली भुमिका आहे हे तुमचं मतं आहे असे समजता येईल काय? हि एक भुमिका समाजातल्या मोठ्या गटाची आहे आणि ह्या भुमिकेमुळेच स्त्रियांवर बंधने लादली गेली आहेत.
पण काही लोकांच्या मते* अब्रू(योनीशुचिता?) हि समाजाने लादलेली बाब आहे, त्याचे घाव वगैरे जन्मभर सोसणे गैर आहे, अशा लोकांच्या मते असेही म्हणता यावे काय - अब्रू(योनीशुचिता?) समाजाने लादलेली बाब आहे आणि त्याचा शारिरीक हिंसाचारापेक्षा वेगळा बाऊ करणे गैर आहे? लैंगिक गुन्ह्यांनाही वेगळे न मानता शारिरीक हिंसाचाराशी निगडीत गुन्हेच म्हणावे?
*काही लोकांच्या मते - बलात्काराशी संबंधीत धाग्यांवर अशा आशयाचे प्रतिसाद वाचलेले आहेत.
अब्रू(योनीशुचिता?) समाजाने
अब्रू(योनीशुचिता?) समाजाने लादलेली बाब आहे आणि त्याचा शारिरीक हिंसाचारापेक्षा वेगळा बाऊ करणे गैर आहे
हो माझेही असेच मत आहे, पण हे मत मी मांडणे वेगळे आणि प्रत्यक्ष प्रसंग घडलेल्या स्त्रीने तिच्या तोपर्यंतच्या मानसिक कंडिशनिंगला झुगारुन तसे मानणे वेगळे. ते फार कठीण असणार. त्यामुळे असे मत बाळगणे म्हणजे भाट्याच्या खाडीत बुडणार्या दालद्यास विश्वेश्वराच्या घाटीवर उभे राहून कुराण वाचून दाखवण्यापैकी आहे.
स्वतःच्या मुलींमधे असा विश्वास जागृत करणं, आपल्या स्वतःच्या कंडिशनिंगलाही तोडून, कठीण असलं तरी तितकंच आपल्या हातात आहे.
खुलासा
हो माझेही असेच मत आहे, पण हे मत मी मांडणे वेगळे आणि प्रत्यक्ष प्रसंग घडलेल्या स्त्रीने तिच्या तोपर्यंतच्या मानसिक कंडिशनिंगला झुगारुन तसे मानणे वेगळे. ते फार कठीण असणार. त्यामुळे असे मत बाळगणे म्हणजे भाट्याच्या खाडीत बुडणार्या दालद्यास विश्वेश्वराच्या घाटीवर उभे राहून कुराण वाचून दाखवण्यापैकी आहे.
मान्य, सध्यातरी निदान आपल्याला काय वाटते, आपले विचार तेवढे स्पष्ट आहेत किंवा नाही हे तपासू शकतो म्हणून ह्या धाग्याच प्रपंच मग तो तुम्हाला काठावरुन कुराण वाचुन दाखवण्यासारखा वाटला तर माझा त्याला नाईलाज आहे.
सगळ्यांचेच विचार तुमच्याएवढे किंवा घाटपांडेंच्या एवढे स्पष्ट असतील असे नाही, निदान मेघनाने तसे प्रामाणिकपणे सांगितले आहे.
स्वतःच्या मुलींमधे असा विश्वास जागृत करणं, आपल्या स्वतःच्या कंडिशनिंगलाही तोडून, कठीण असलं तरी तितकंच आपल्या हातात आहे.
ह्याउप्पर जर आपण लैंगिक आणि शारिरीक अत्याचारामधे फरक करत नसाल तर लैंगिक अत्याचारांना वेगळे मानून अधिक महत्त्व देणे थांबवणार असे त्यामधे इम्प्लाईड असते असे आपल्या विधानावरुन वाटते.
खरंतर मूळ पुस्तकच
खरंतर मूळ पुस्तकच वाचण्यासारखं आहे. त्यातला उतारा काढून टंकायलाही आवडलं असतं, पण पुस्तक आता हातात नाही. सध्या स्मरणातून -
लैंगिकता, लैंगिक सुख, लैंगिक भावना या फक्त योनी आणि शिस्नापुरत्या मर्यादित नसतात. जिथे बऱ्याच जास्त चेतापेशींची टोकं असतात आणि स्पर्शाने लैंगिक सुखाची भावना होते ते सगळंच लैंगिकतेमध्ये मोजावं लागेल. लैंगिकदृष्ट्या सुखदायक बोलणंसुद्धा. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या कृती आणि शब्दांमधून लैंगिक सुख मिळतं, सगळ्यांसाठी एकाच प्रकारचा साचा बनवता येत नाही.