नक्की काय बदल झाला आहे?

आज एका मित्राने इमेलमधून एक व्हीडीओ पाठवला. इमेलचं शीर्षक - 'स्टुडीओत आलेला पाहुणा'. स्टुडिओ मुंबईत, गजबजलेल्या ठिकाणी आहे. आणि पाहुणा म्हणजे एक लांबलचक साप. दोनेक मिनीटांच्या व्हीडीओमध्ये सापाची वळवळ आहे. मुद्दाम सांगण्यासारखं असं की पार्श्वभूमीला लोकांचे उत्तेजित आवाज, मराठी, इंग्लिश, हिंदीमधले संवाद कानावर येत होते. बोलणं साधारण साप पाहून गंमत वाटली, आनंद झाला, मजा वाटली, असं. किंवा मानवी भावनांचं आरोपण सापाच्या हालचालींवर केलेलं. दोन-तीन मिनीटांमध्ये चार-सहा फ्लॅश सापावर पडलेले दिसले.
हे सगळे संवाद आजूबाजूच्या लोकांचे आहेत, स्टुडीओत भेटायला आलेल्या लोकांचे नाहीत, असं मित्र म्हणाला. म्हणजे, संवेदनशील कलाकाराचे मित्रमैत्रिणी असे निवडक लोक नाहीत.

साधारण १५-२० वर्षांपूर्वीच्या सापांबद्दल असणाऱ्या माझ्या आठवणी वेगळ्या आहेत. ठाण्याला आमच्या इमारत, अंगणात साप दिसले की लोकं लाठ्या-काठ्या घेऊन जमा व्हायचे. यथास्थित साप मारला जायचा. (साप मारणारे आपले पपू फार हिरो आहेत असं या हिरोंच्या मुलांना वाटत असे.) तो साप विषारी का बिनविषारी अशी काहीही चर्चा होत नसे. झालीच तर तो साप किती मोठा आहे, पावसाळ्यात साप येतात, "बरं झालं बाई तो दिसला आणि वेळेत मारला" अशा प्रकारची असे. साप मेल्यानंतरतरी त्याच्या जवळ जाऊन निरीक्षण केलं असंही काही आठवत नाही.

मला वाटतं की सर्पमित्र लोकांचं हे यश आहे. पहिला प्रसंग घडला तसं बऱ्याच जास्त प्रमाणात होत असेल तर अर्थात. सापांबद्दल जरा जास्त जागृती निर्माण झाली आहे असं दिसतं. आपल्याला उपद्रव न देणाऱ्या, निदान पशूंना तरी न मारण्याइतपत समज मोबाईल, इंटरनेटधारी वर्गामध्ये आली असावी. सध्या पशूंना मारत नाहीयेत, पुढे कदाचित परधर्मातल्या, परजातीच्या, वेगळ्या लैंगिक जाणीवा असणाऱ्यांप्रती सहानुभूती बाळगली जाईल असा काहीसा भाबडा विचार माझ्या मनात आला. काल त्यांनी साप न मारणं हे सर्पमित्रांचं यश असेल तर मग तथाकथित भाकड चर्चासुद्धा खरंतर भाकड नसतील. पिढी बदलेल, एकेकाळी साप मारणारे हिरो आता वयोवृद्ध झाले आहेत, तशा जाणीवा बदलतील.

पण जरा बरं होताना दिसतंय म्हणून त्यामागचं कारण रोमँटिकच असेल असंही नाही. एकूणच बघेगिरी वाढणं, साप पाहिला याची जाहिरात करता येणं म्हणून फोटो, व्हीडीओ काढणं असंही असेल. त्याबद्दल तुमची काय मतं आहेत? एक सापाचा अनुभव झाला, असे (स्त्रीवाद, नास्तिकता, धर्म, गोध्रा प्रकरण असे 'नेहेमीचे यशस्वी कलाकार' सोडून इतर) काही उदाहरणं आठवतात का?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (3 votes)

दिसला की हाण ही सेहवाग स्टाईल सोडून आता लोक सर्पमित्र वगैरेंना बोलवतात- हे ऐकून बरं वाटलं.
साप मारणे हे स्किल ह्या पिढीकडे नसावं ह्याला दुमत. कोकणातून वगैरे आलेले जुने हुंबयकर आरामात सापाशी झुंज घेऊ शकत असावेत असा अंदाज आहे. त्या मानाने मुंबईतच वाढलेल्या पब्लिकला साप मारायचा कॉन्फिडन्स फारसा नसावा, जाणकार ह्यावर प्रकाश टाकू शकतील काय?
पण मुख्य मुद्दा राहिला -स्टूडिओत साप? कस्लं भारी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किस्सा आणि त्यासंबंधीचं प्रकट चिंतन आवडलं. "The arc of the moral universe is long, but it bends towards justice.” हे मार्टिन ल्युथर किंग ज्यु. यांचं प्रसिद्ध विधान आठवलं.

मला पटकन आठवणारं उदाहरण म्हणजे अमेरिकन लोकमत आणि पर्यायाने राजकारणाच्या संदर्भात घडून येत असलेले बदल. एकेकाळी ज्या सामाजिक मुद्द्यांच्या आधारे रिपब्लिकन पक्षाने निवडणुका जिंकल्या (निक्सन, रेगन, धाकले बुश), तेच मुद्दे आता एकविसाव्या शतकात त्यांना जाचक ठरत आहेत. वानगीदाखल स्त्रियांचे हक्क आणि समलिंगी विवाह यांचं उदाहरण घेता येईल.

लोकप्रियता घसरलेल्या धाकट्या बुशने २००४ साली सांस्कृतिक मुद्द्यांचा बागुलबुवा उभा करून पुन्हा निवडणूक जिंकण्यात यश मिळवलं. २००८ सालच्या निवडणुकीत अगदी डेमोक्रॅटिक पक्षाच्या दोन्ही प्रमुख उमेदवारांनी (ओबामा आणि हिलरी) समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास नकार दिला होता. पण हळूहळू बदलत्या जनमताची दखल घेणं राजकारण्यांना भाग पडू लागलं आहे. २०१०-११ साली ओबामाने समलिंगी विवाहाला उघड पाठिंबा दर्शवणं (तेही चुरशीची निवडणूक जवळ येऊन ठेपली असताना) आणि त्यापाठोपाठ रिपब्लिकन पक्षाच्या चार सिनेटर्सनीही री ओढणं (त्यात पेलिनकाकूंच्या अलास्काचीही सिनेटर आली), हा त्याचाच भाग झाला. अगदी 'फॉक्स न्यूज'सारख्या बायस्ड् वृत्तसंस्थेलाही बहुसंख्य अमेरिकन्स समलिंगी विवाहाच्या विरोधात नाहीत, असं मान्य करावं लागलं.

२०१० आणि २०१२ साली ओबामाची लोकप्रियता ओहोटीला लागली असतानाही टी पार्टीच्या विदुषकी उमेदवारांमुळे रिपब्लिकन पक्षाला सिनेटमध्ये बहुमत मिळवता आले नाही. 'लेजिटिमेट रेप'फेम टॉड एकिन्स (मिझुरी), बलात्कारातून जर गर्भधारणा झालीच तर ती देवाची देणगी समजावी असं सुनावणारा रिचर्ड मर्डॉक (इंडियाना) आणि 'मी चेटकीण नाही' अशी अ‍ॅड झळकवणारी ख्रिस्टीन ऑडनेल (डेलावेअर) हे त्यातलेच काही मेरूमणी. (विस्तारभयास्तव येथेच थांबतो Lol

याची दखल घेऊन रिपब्लिकन पक्षाने आपल्या उमेदवारांसाठी चक्क 'स्त्रियांशी बोलावं कसं?' याचं ट्रेनिंग सुरू केलं आणि स्त्रियांशी संबंधित अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका सौम्य करण्याचा (किंवा त्याबदल मौन बाळगण्याचा) प्रयत्न केला. ज्या कार्ल रोवने २००४ साली सांस्कृतिक मुद्दे ऐरणीवर आणून बुशला ओहायोसारखं महत्त्वाचं राज्य मिळवून दिलं, त्याच कार्ल रोवच्या क्रॉसरोड जीपीएसला आज बदलत्या जनमतापुढे नमून सामोपचारी भूमिका घेणं भाग पडलं आहे:

या लेखातून:

A new ad blitz from Karl Rove’s Crossroads GPS nicely captures the emerging dynamic. Colorado GOP Senate candidate Cory Gardner has been treated to the most direct and sustained assault over Personhood of any GOP candidate, and a new Crossroads ad appears designed to defend Gardner against it with an appeal to female voters. Yet the ad does this only by changing the subject.

'मीडियन व्होटर थेअरम्' ह्या संकल्पनेद्वारे यामागचं कारण शोधता येईल. १९८० च्या तुलनेत आजचा सर्वसामान्य मतदार हा अधिक शिकलेला आणि सामाजिकदृष्ट्या अधिक उदारमतवादी आहे. वाढत्या अल्पसंख्याक लोकसंख्येला (कृष्णवर्णीय, हिस्पॅनिक, आशियाई) हिशोबातून वगळलं तरीही, हे विधान कायम राहतं. या सुशिक्षित मध्यमवर्गाने प्रतिगामी सामाजिक धोरणांना कंटाळून रिपब्लिकन पक्षाकडे पाठ फिरवल्यामुळे हळूहळू आणि लहान प्रमाणात का होईना, पण त्या पक्षात घडू लागलेले बदल हे सुचिन्हच म्हणता येईल. ते जर कायम राहिले तर, युरोपच्या धर्तीवर कन्झर्व्हेटिव्ह आणि लिबरल पक्षांमध्ये सामाजिक बाबींवर बव्हंशी एकमत आणि आर्थिक बाबींत मतभिन्नता अशी राजकीय व्यवस्था कदाचित अमेरिकेतही अस्तित्वात येईल! (I have a dream... Lol

१. When Ronald Reagan was elected president in 1980, white voters without a college degree made up 65 percent of the electorate; by 2012, that number had dropped to 36 percent. (संदर्भ)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण जरा बरं होताना दिसतंय म्हणून त्यामागचं कारण रोमँटिकच असेल असंही नाही. एकूणच बघेगिरी वाढणं, साप पाहिला याची जाहिरात करता येणं म्हणून फोटो, व्हीडीओ काढणं असंही असेल.

हे कारण असण्याची शक्यता कमी वाटते. बोले तो, व्हीडियो काढणे हाच जर फ्याक्टर असता, आणि वृत्तीत फरक नसता, तर साप ठेचून मारतानाचा व्हीडियो (ब्याकग्राउण्डमधील बघ्यांच्या कमेंटांसहित) जरूर काढला असता.

पूर्वीच्या काळी नाही का, मारलेल्या वाघाच्या मृतदेहावर पाय ठेवून फोटो काढत, अगदी तस्सा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विषय आवडला. पण तुम्ही दिलेल्या उदाहरणामध्ये सापांबद्दल प्रेम असू शकतं तस अस्वल म्हणतं तसं फट्टूपणाही त्यातला भाग असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मला सापांविषयी शत्रुत्व वाटत नाही. त्यांच्याविषयी काही अभद्र, भीतीदायक अवाजवी भावना मनात नाहीत.

शेताडीच्या जमिनीतच घरे बांधली जातात अशा भौगोलिक प्रदेशात अनेक वर्षे राहताना घराच्या खाली पोकळीत मोठी धामण नेहमी वसतीलाच असायची तरी तिच्याकडे दुर्लक्षच केले.

पण घरात / कार्यालयात साप आला तर ही केस वेगळी होते. शक्यतो त्या सापाला जिवंतपणे दूर नेऊन कुठेतरी वस्तीपासून दूर सोडणे हा सर्वोत्तम उपाय आहे. पण सदरहू जागी किंवा जवळच सर्प पकडणारे तज्ञ प्रशिक्षित लोक नसल्यास किंवा तसे सर्पमित्र फोन करुन बोलावून काही तासांनी येणार असल्यास आणि तेवढा वेळ सापाला अधिक अवघड आणि जोखमीच्या ठिकाणी घुसण्याची संधी मिळणार असल्यास त्याला ठार मारणेच इष्ट ठरते असे माझे मत. साप विषारी की बिनविषारी याचे ज्ञान असणे आणि त्याचा प्रसार होणे उत्तमच. पण नाग वगैरे सोडल्यास काही साप विषारी असूनही बिनविषारी सापासारखे दिसू शकतात. हिरव्या रंगाची एक सर्पजात विषारी अन दुसरी बिनविषारी असू शकते. बर्‍याचदा सापाच्या अंगोपांगाचे नीट दर्शन मिळणे आणि त्यावरील खुणा, नक्षी यांचे अ‍ॅनालिसिस गचपणीच्या जागी शक्य नसते. शिवाय साप बिनविषारी असला तरी बिनचावरा नसतो. त्याने चावा घेतला की मरण नसले तरी वेदना होतातच.

साप चावल्यावर बहुतांश वेळा खरचटल्याप्रमाणे फराटे उमटतात. त्यात पुढचे दोन विषदंत, मागचे साधे दात अशी नक्षी उमटवण्याच्या दृष्टीने साप चावत नाहीत. तेव्हा असे आडाखे बर्‍याचदा नुसते पुस्तकीच ठरतात.

शेवटी घरात किंवा ऑफिसात शिरलेला साप पकडून जंगलात सोडणे हे तो मारण्यापेक्षा बरेच अवघड असते. अशा वेळी सर्पमित्राची उपलब्धता काही मिनिटांत होत नसल्यास त्याला मारले तर त्यात मला काही गैर वाटत नाही. भले वाईट वाटले तरी.. गैर वाटत नाही.

माझ्याच स्पेसीजचा असलेला मनुष्यप्राणी, त्याला असलेला तातडीचा पोटेन्शियली जीवघेणा उपद्रव आणि एकूण निसर्गाच्या संतुलनाला एका सापाच्या मरणाने लागणारा धक्का यात तारतम्य करण्याबाबत मला फार विचार करण्याची गरज वाटत नाही.

जंगलात जाऊन वाटेत साप आला म्हणून मारणे हे नि:संशय दुरित आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा साप घरांबाहेर, झाडावर लटकलेला होता.
'आयुका'मध्ये एक सर्पमित्र होता, आता तो समोरच्या 'एनसीआरए'मध्ये असतो. 'आयुका'मध्ये एकदा साप आला होता तेव्हा याला तिथे पोहोचायला उशीर होणार होता. म्हणून जवळजवळ तासभर या सापावर बरेच लोक पाळत ठेवून होते, रिअलिटी शो म्हणावा अशी वर्णनं पुढे महिनाभर लोकांना पुरली. सगळ्यांना एवढा वेळ काढता येणार नाही, हे खरंय.

गव्हाणी घुबडाच्या घराची सफर सगळ्यांना करवून आणणाऱ्या गविंचा धागा, हे मला अपेक्षित असणाऱ्या उदाहरणांपैकी आणखी एक चपखल उदाहरण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

होय तो घुबडाचा धागा फार छान होता.
__________
हा धागा आवडला आहे. सुचल्यास लिहीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@ माझ्याच स्पेसीजचा असलेला मनुष्यप्राणी, त्याला असलेला तातडीचा पोटेन्शियली जीवघेणा उपद्रव आणि एकूण निसर्गाच्या संतुलनाला एका सापाच्या मरणाने लागणारा धक्का यात तारतम्य करण्याबाबत मला फार विचार करण्याची गरज वाटत नाही.

जंगलात जाऊन वाटेत साप आला म्हणून मारणे हे नि:संशय दुरित आहे. >>

अगदी असेच म्हणतो. मी पुर्वी घरी आलेले २ साप मारले आहेत. किडके असवेत; पण विषारी-बिनविषारी याचा विचार न करता मारले. आणी मला ते योग्यच वाटते. भारतात वैद्यकीय सुविधा अशा किती सुधारल्या आहेत? का रिस्क घ्यायची उगाच?
या बातमीनुसार भारतात दर वर्षी स्नेकबाईट्सने मरणार्‍यांची संख्या ४६ हजार आहे. नंतर उपचारा केल्यापेक्षा सावधानता महत्वाची नाही का?
घरी साप दिसला की भूतदया वगैरेचा विचार न करता ठेचावा त्याला हेच उत्तम.

बाकी त्या स्टूडीओबद्दल-
तिथे हे व्हिडिओ काढणारे रहाणार नाहीएत. तेच जर एखाद्याचे घर असेल की जिथे लहान मुले, म्हातारी माणसे किंवा अपंग व्यक्ती आहेत, तिथे असा व्हिडिओ काढावा की सरळ मारुन टाकावे सापाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या स्टुडिओत मी कधी गेले नाही. व्हीडिओ पाहून, आजूबाजूला घरंही असावीत, त्या घरांमधलेच लोक साप बघायला बाहेर आले असावेत, त्यांतल्या काही लोकांनी फ्लॅश मारून फोटो काढले, असा माझा समज झाला. तो गैरसमजही असेल; कदाचित येणारे जाणारेही थबकले असतील.

घरात, ऑफिसात आलेला साप मारावा का न मारावा असा प्रश्न बहुदा माझ्या दिशेने आला असावा. त्याबद्दल मला फारसं मत नाही. मारून सुरक्षित वाटलं तर मारावा आणि सर्पमित्रांना हाक मारावीशी वाटली तर तसं करावं. एकेकाळी कोणीच सर्पमित्र माहित नसत, हाक मारली जात नसे, आणि साप मारला जत असे. ते दृष्य बदलत आहे, दिसला साप की ठेचा यात थोडा बदल होतोय असं वाटलं. आणि त्या निमित्ताने काही विचार झाला.

---

मला सापाचे फार अनुभव नाहीत. एकदा आजोळी जात होते, पावसामुळे रस्ता वाहून गेला होता म्हणून बस गावापर्यंत जाणार नव्हती. शेवटचे दोनेक किमी चालत जायला लागलं. चालताना शेजारी काहीतरी सळसळलं. तर साधारण दहा सेमी व्यास आणि दीडेक मीटर लांब साप शेजारी गवतातून सळसळत जाताना दिसला. त्याचा रंग कोणता हे पण दिसलं नाही. साधारण आकार काय तो फक्त लक्षात आला.

अमेरिकेत काही ठिकाणी (प्रचंड विषारी) खुळखुळे साप आहेत, अशा ठिकाणी गेले होते. तिथल्या अधिकाऱ्यांना सापाबद्दल विचारलं तर त्यांच्या मते, आपल्या पावलांच्या आवाजामुळे साप घाबरून पळून जातात आणि अंधार असला तरीही घाबरायचं कारण नाही.

शहरांमध्ये अडचण होते की साप आपल्या आवारातून दुसऱ्यांच्या आवारात गेला तर तिथे मारला जाण्याची किंवा उपद्रव ठरण्याची शक्यता. हुसकून देण्यापेक्षा पकडून तो योग्य ठिकाणी सोडलेला बरा. पण शहरी सेटपमध्ये, जिथे गवत, पालापाचोळा नाही तिथे अचानक साप समोर येऊन चावा घेण्याची भीती मला वाटत नाही. सायकलवरून न उतरता ती फुटपाथवर चढवताना, किंवा घट्ट प्लग सॉकेटमधून काढताना त्यापेक्षा बरीच जास्त भीती वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सायकलवरून न उतरता ती फुटपाथवर चढवताना, किंवा घट्ट प्लग सॉकेटमधून काढताना त्यापेक्षा बरीच जास्त भीती वाटते.

अशा वेळेस फुटपाथमित्रांना किंवा सॉकेटयारांना हाक मारावी, असा विचार कधी करून पाहिला आहेत काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पारंपारिक वर्तनः
१. गावात शेतकर्‍यांना कोणता साप विषारी आहे नि कोणता नाही हे माहित असते. गावात इतके साप असतात कि शेतकर्‍यांना खूप सर्पज्ञान असते.
२. जास्तीत जास्त साप बिनविषारी असतात. ते शेतातले पिके खाणारे उंदिर खातात. म्हणून शेतकरी कधीही शेतात अशा सापांना मारत नाहीत.
३. पण शेतात विषारी सापांना (त्यातली त्यात आवाज आल्यावर लपून न बसता चवताळणार्‍या सापांना)शेतकरी मारतात.
४. शेतात आणि आजूबाजूच्या पडिक पाळथळ भागांत इतके साप असतात कि विचारता सोय नाही. गावातले शेतकरी स्वतःला सर्पमित्र म्हणत नसले तरी सर्पमित्र असतात.
५. गावातले मात्र सारेच साप शेतकरी, लोक मारतात. मुलांना, गुरांना सापाचे भयंकर भय, इ असते, त्यांच्या अस्तित्वाने धोका असतो.
६. गावातले, शेतांतले सगळे निघालेले साप सर्पोद्यानात घालणे असंभव, अनिष्ट, विचित्र असावे.
७. काही जातीत मारलेल्या सापाला ब्राह्मण म्हणून जाळतात.
---------------
लोक हळूहळू तालुक्यांत जाऊ लागले तेव्हा ज्ञान कमी आणि भय ज्यादा हा प्रकार झाला. आता मेट्रोत सापच निघत नाहीत, म्हणून चूकूनमाकून निघाला तर कुतुहल हाच फॅक्टर मोठा असतो. या लोकांत (अदिती म्हणते तसा सकारात्मक) बदल झाला आहे असं तेव्हाच म्हणता येईल जेव्हा काही विषारी सर्पांमुळे (व भयामुळे) लोक मरत असतील तरीही शेष लोक उदात्त भावना दाखवणे चालू ठेवतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मल ना "तारुण्यामागे धावणारा" समाज बदलून म्हातार्‍यांनाही व्यवस्थित म्हणजे ड्यु ग्लॅमर देणारा समाज पहायला आवडेल. वय वाढतय तसतसे, आताशा असेच विचार बळावत आहेत Wink
म्हणजे म्हातार्‍यांनी काय वातीच वळायच्या का च्यायला Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे म्हातार्‍यांनी काय वातीच वळायच्या का च्यायला

Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरच. डाय लावायलाच हवा का? टक्कल हे वाईटच का? क्रो फीट वाईटच असतात का? तुम्ही हसरे आहात्/होता, हसलात याचं ती खूणच नाही का? अँटाय-एजिंग क्रीम किती खपतात!
_________
तारुण्य ग्लॅमरस आहेच पण स्वतःची निगा घ्याल, पौष्टिक आहार अन व्यायाम असेल तर वार्धक्यातही फार फार सुंदर दिसतात लोक. किंबहुना चेहेर्‍यावर एक कॅरॅक्टर येते, जे पूर्वी फक्त सुंदर फीचर्स असतात त्याची जागा अनुभवी सतेज डोळे अन हास्य घेते. आत्मविश्वासात कमालीचा फरक पडतो. एक आश्वासक, अन आत्मविश्वासपूर्ण व्यक्तीमत्व तयार होते. चार पावसाळे पाहील्याने लगेच डगमगायला होत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अँटाय-एजिंग क्रीम किती खपतात!

हे अँटाय-एजिंग क्रीम लावून वेळीच सुरकुत्या न पडलेल्या म्हाताऱ्या फारच भयानक दिसतात. मला वाटतं वृद्ध झालेल्या पण वृद्धांसारखं दिसण्याची इच्छा नसणाऱ्या अशा महाभागांबद्दल शांता शेळक्यांनी एक छान लेख लिहिला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद पूर्ण करायचा होता , खाली केला आहे -

आता कोणी म्हणेल तुम्ही करु नका. पण असं एकटी लढाई जमते का? नोकरीमध्ये वय लपवावसं वाटतंच कारण न जाणो कोणी त्या बाबीवर भेदभाव केला तर? म्हणून केशकलप लावला जातो. आता हे पटतं काही रंग विशिष्ठ वयातच सूट होतात..... पण तसंही असायची गरज नाही खरं तर अगदीच थिल्लर कपडे घालू नयेत पण वय झालं की हौस काय मारुन टाकायची का?

अ‍ॅम आय रँन्टींग? Sad

____________
@अतिशहाणा - ते बोटॉक्स केलेले लोक खरच भीषण दिसतात
___________
<स्पष्टवक्तेपणाचा मोड ऑन> अन कदाचित करीअरमध्ये ज्यों कि त्यों राहील्याने, पदोन्नत्ती न झाल्याने ही साधार भीती असेल माझी, की तरुण व्यक्ती मागे टाकेल Sad वेळेवर एकेक पायरी चढून वर गेलेल्या लोकांना ही भीती नसेलही :(<स्पष्टवक्तेपणाचा मोड ऑफ>

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत आहे. आधीच्या तुलनेत सध्याचा समाज फारच तारुण्य-ड्रिव्हन आहे. ३० इज द न्यू २०, ४० इज द न्यू ३०, इ.इ. पाहिलं तर इतका दांडगा हव्यास कसला आहे ते समजत नाही. वय कितीही असलं तरी आनंदात राहणे हे मेन आहे. एका वयानंतर तरुणपणीसारखी दंगामस्ती नै करता येत हे सत्यच आहे. त्याचं भयानक टेन्शन काय येतं लोकांना काय माहिती. म्हातार्‍यांनीही आनंदी रहायचं म्हणजे तरुणांसारखं रहायचं असं सुप्त प्रिस्क्रिप्शन असल्यागत दिसतं खरं.

(संभाव्य प्रतिसाद- बॅटमॅन, *****, तुझं वय किती???)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी सकाळी मॅकडोनाल्ड मध्ये जाऊन कॉफी पित पेपर वाचते - ते रुटीन आहे. इतका मस्त रिटायर्ड लोकांचा एक ग्रुप असतो. ४-५ पुरुष आहेत, १-२ जण खरच देखणे आहेत - ६०-६५ चं वय असेल. पण त्यांच्या गप्पा अन हसणं ऐकताना इतकं मस्त वाटतं. आपल्या दुनियेत असतात, रोज भेटतात. खरं तर विशिष्ठ वयानंतर "let down the hair" खूप होतं, आपण सेटल झालेले असतो, मुलं मार्गी लागलेली असतत. पण अर्थात त्याकरता तरुणपणी व्वस्थित नियोजन करणं फार महत्त्वाचं आहे .... फार फार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधीच्या तुलनेत सध्याचा समाज फारच तारुण्य-ड्रिव्हन आहे.

सध्याच्या काळात बॅकलॉग खूप असतो. तो भरून काढण्यासाठी ज्या वयात तुम्ही ते काम करायला हवं होतं त्या वयाची मानसिकता ठेवणं आवश्यक आहे.
१. लहानपण सारं गृहपाठ करण्यात जातं. मग मस्तसोक्त हुंदडा केव्हा? लग्नापूर्वी, रात्री, दिवसभर नोकरी केल्यानंतर.
२. मुले अगोदर १६-१८ वर्षे वय असताना होत. आता ३५ वयाला होताहेत. मग तेव्हा ३५ मधे १८ चा जोष आणावा लागणार.
३. दिवसभर नोकरी. सुट्ट्या सगळ्या कामासाठी, सासरी, माहेरी जायला. वर्षातून एक ७ दिवसांचा हॉलिडे. ( भारतात हे ही नशीबवंतांना). मग सारी खुन्नस रिटायर झाल्यावर.
४. लोकांना आपल्या रसांचा स्वाद घेण्यासाठी वेळ नाही. टेस्टचा टी-२० झाला आहे. शिवाय सोयीच्या प्रत्येक साधनाची खरेदी, कस्टमायजेशन, मेंटेनन्स, ऑपरेशन, अपडेशन, डिस्पोजल यांत प्रचंड वेळ लागतो. उपयोजनाचाही लोचा आहेच. मंजे कार असली तरी मला ९५% वेळ ऑफिसला लांबलचक जायला वापरावी लागते. अस्संच फिरत चंदीगडला जावं म्हटलं तर मोठा योग यावा लागतो. ईथेही मग जेव्हा "माणूस मोकळा झाला" तेव्हा त्याला बॅकलॉगच्या पूर्तीसाठी तरुण बनावं लागतं.
५. ज्या वयात आपल्या ज्या गरजा आहेत त्या पुढे ढकलल्याने माणूस तरुण कसा होतो?
६. आता माझा मुलगा ७ वर्षाचा असताना (२ रीला) मी जे ५-६-७-८ वीला असताना शिकायचो ते शिकत आहे? त्याच्यावर म्हातारपण लादलं जात नाहीये का? मला दुसरी भाषा पाचवीला चालू झाली. त्याला बालवाडीला. ज्ञान, बुद्धी हाच तारुण्याचा सुचक मानला तर आजची पिढी लवकर म्हातारी होत आहे.
७. अगोदर लोक चालत, पाणी भरत इ इ. आता कोणतंच काम नसल्याने त्यातले काही लोक जिमला जातात. पण जास्तीत जास्त लोक जात नाहीत. शरीराने देखिल जमाना लवकर म्हातारा होत चालला आहे. यांना तरुण कसं म्हणणार?
८. मानसिकतेत देखिल तेच आहे. लवकर यश मिळवणे, लवकर पदाने मोठे होणे, स्पर्धेत टिकून राहणे, इ इ महत्त्वाचे आहे. हे नाही झाले तर तुम्ही मागे राहता. एकदा तुम्ही असे मोठे माणूस झाला कि गांभीर्य व्यक्तित्वाचा भाग बनतो. पांचटपणा, चूका, थातूरमातूरपणा, देशप्रेम, चार्-आठ प्रकारच्या अस्मिता, २-३ प्रकारची तत्त्वज्ञाने, विचारवाद, तीव्र संवेदनशीलता, इ इ म्हणजे तारुण्य. सापेक्षता, प्रत्येक गोष्ट आपल्या जागी योग्य असते, इ इ विचार म्हातारपणाची लक्षणे आहेत. आजची पिढी " पाकिस्तानचे सैनिक त्यांच्या देशासाठी लढतात. भारताचे सैनिक भारतासाठी लढतात." असे विधान करतात. त्यात भारताच्या बाजूने जी डीफॉल्ट टिल्ट असायला हवी ती नाही. हे तत्त्वज्ञान चूक नाही, पण ते वेळे अगोदर आले नाही पाहिजे.
--------------------
(मी नेहमी प्रचंड प्रतिगामी आणि जुन्या, ग्रामीण, पारंपारिक काळाचे समर्थन करणारे लेखन करतो. विधाने वाटली तर विनोदी माना पण त्यात ऑफेन्स आहे असे निष्कारण शोधून काढू नका.)
----------------------
कधी कधी मला आजची तरुण पिढी भयावह रित्या मॅच्यूअर झाली आहे असे वाटते. आणि तरुणांच्या पेक्षा मोठी पिढी तर ज्ञानाने आणि तत्त्वज्ञानाने सॅच्यूरेट झाली आहे. बदल असंभव. तरुण असणे वेगळे, दिसणे वेगळे, दाखवणे वेगळे. बरेच लोक तारुण्य दाखवण्याचा प्रयत्न करतात नि त्यांना माहित असते आपण किती वयाचे आहोत. ज्ञानाच्या इंमेन्स एक्स्पोजरमुळे तारुण्यसुलभ अज्ञान, त्यातले सुख, भाबडेपणा, सहजता शहरांत तरी नष्ट होताना दिसत आहे. देव माणसाला लहानाचं मोठं करतो, असं मोठं होण्यात एक मजा असते. याची गरज नसती तर प्राणी थेट "मोठेच व बुद्धिमानच" उत्पन्न व्हावेत अशी उत्क्रांत झाले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सगळच काही पटलं नाही, पण आवडलं.
ज्या लायनीवर स्वतंत्र विचार करताय, ते आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

रोचक प्रतिसाद. तुमचे मुद्दे स्वतंत्ररीत्या ग्राह्य आहेतच, पण माझा मुद्दा अंमळ वेगळा होता.

तारुण्य-ड्रिव्हन म्हणजे समाजावर तारुण्याशी असोशिएटेड मूल्यांचा प्रभाव जास्ती असणे. सिलॅबस वाढणे, लग्ने उशिरा करणे (म्हणजे सेक्स न करणे असे नाही हेवेसांनल), यांचा इथे रिलेव्हन्स नै वाटत. जुन्या काळी तरुणांनी म्हातार्‍यांशी जुळवून घेणे अपेक्षित असे, तर अलीकडे उलटे झालेय इतकेच म्हणायचे आहे. जेरोण्टोक्रसी कमी होऊ पाहतेय हे माझ्या मते चांगलेच आहे - पण त्यात वृद्धांवर अन्याय तर होत नाही ना अशी शंका मात्र येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जुन्या काळी तरुणांनी म्हातार्‍यांशी जुळवून घेणे अपेक्षित असे.

बाकी प्रतिसाद मान्य आहे.
-----------------------
या विधानात पुन्हा जुन्या जमान्यावर भाष्य आहे म्हणून लिहित आहे. जेरेंटोक्रॅसी आजही आहे. उलट ती आज अधिकच दृढमूल झाली आहे. ती घरात कमी झाली आहे नि ऑफिसमधे प्रचंडच वाढली आहे. "कालामानाप्रमाणे शहाणा आणि मृदू झालेला जुना आजोबा आणि नातू", व "जवान आक्रस्ताळा बाप व मुलगा" (तसेच इतर नाती) हा जो अगोदर प्रकार होता त्यापेक्षा भयावह प्रकार ऑफिसात आहे. डेडलाईन, कामाचा दर्जा आणि काम किती हे आजकाल तरुण पिढीला हे म्हातारे लोक निर्ममपणे राबवून घेतात. त्यांना बापाचा व आजोबाचा सॉफ्ट अँगल नाही. शेवटी सगळं तुझंच नि तुझ्यासाठीच (पण योग्य काय ते मला माहित) असा पूर्वी त्यांचा अ‍ॅंगल असे. आता शेवटी सगळं कंपनीचंच, तू फक्त तूझं काम कर इतका दुष्ट भाव या म्हातार्‍यांचा असतो.
-------------------
घरच्या म्हातार्‍यांच्या जागी ऑफिसचे म्हातारे घातले तर जेरोंटोक्रॅसी नष्ट होत नाही. बापाची सोडून बॉसची मनधरणी करायला चालू केले म्हणजे "जूळवून घेणे" कमी होत नाही. सामाजिक संस्था आपण जितक्या जास्त किचकट करू तितकी जेरोंटोक्रॅसी घट्ट होणार. त्यांना नॅचरल अ‍ॅडव्हांटेज आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

या विधानात पुन्हा जुन्या जमान्यावर भाष्य आहे म्हणून लिहित आहे. जेरेंटोक्रॅसी आजही आहे. उलट ती आज अधिकच दृढमूल झाली आहे. ती घरात कमी झाली आहे नि ऑफिसमधे प्रचंडच वाढली आहे. "कालामानाप्रमाणे शहाणा आणि मृदू झालेला जुना आजोबा आणि नातू", व "जवान आक्रस्ताळा बाप व मुलगा" (तसेच इतर नाती) हा जो अगोदर प्रकार होता त्यापेक्षा भयावह प्रकार ऑफिसात आहे. डेडलाईन, कामाचा दर्जा आणि काम किती हे आजकाल तरुण पिढीला हे म्हातारे लोक निर्ममपणे राबवून घेतात. त्यांना बापाचा व आजोबाचा सॉफ्ट अँगल नाही. शेवटी सगळं तुझंच नि तुझ्यासाठीच (पण योग्य काय ते मला माहित) असा पूर्वी त्यांचा अ‍ॅंगल असे. आता शेवटी सगळं कंपनीचंच, तू फक्त तूझं काम कर इतका दुष्ट भाव या म्हातार्‍यांचा असतो.
-------------------
घरच्या म्हातार्‍यांच्या जागी ऑफिसचे म्हातारे घातले तर जेरोंटोक्रॅसी नष्ट होत नाही. बापाची सोडून बॉसची मनधरणी करायला चालू केले म्हणजे "जूळवून घेणे" कमी होत नाही. सामाजिक संस्था आपण जितक्या जास्त किचकट करू तितकी जेरोंटोक्रॅसी घट्ट होणार. त्यांना नॅचरल अ‍ॅडव्हांटेज आहे.

माझे येथील कोणतेही लेखन संदर्भ लेखन म्हणून वापरू नये. असे लेखन प्रमाण म्हणून वापरता येईल अशी कोणतीही काळजी मी लेखन करताना घेत नाही. (यात व्याकरण आणि भाषाशुद्धी देखिल समाविष्ट आहे.)

अ‍ॅपल-ऑरेंजची तुलना करण्यात अर्थ नाही (जरी त्यात मजा असली तरीही) . जुन्या काळीही जेरोंटोक्रसी प्रचंड होती. आज ती तितकी वाढलेली नाही, उलट जरा कमीच झालीये. अन उगीच नव्या जमान्याला झोडायचे म्हणून असे उदा. द्यायचे असेल तर मग हेही लक्षात घ्यावे, की बॉस तरणा असला म्हणजे तो अधिक मवाळ असे आजिबात नस्ते. जुन्या काळी कुटुंबात काय नि गावात काय, जी हॉरिबल जेरोंटोक्रसी चालायची तिच्यापेक्षा आजची व्हर्जन कधीही परवडली, किमान पैसा तरी मिळतो. जुन्या काळी तर पैसा नाही काहीच नाही. हूं की चूं करायची मुभा नसे तरुणांना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बाप किंवा आजा ऊठसूट बदलता येत नाही.
बॉस/कंपनी बदलणे शक्य आहे. (तुलनेने चांगल्या/सॉफ्ट जागी जाता येणे शक्य आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बॉस/कंपनी बदलणे शक्य आहे. (तुलनेने चांगल्या/सॉफ्ट जागी जाता येणे शक्य आहे.)

This would not change the "net gerontocracy" in the society. The bad boss or company will still be in need of employees and the new set of employees will keep on suffering from the system. This does not give any comparative advantage to the new system. There would a change only if there is adequate bargaining power with the employees.
------------------------------------
The bargaing powers of sons and daughters of a family and employees of a company is a different subject matter.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नवा काळ -विरुद्ध जुना काळ ह्या आवडत्या ठेसनावर गाडी आलीच.
चालु द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

The new social systems should not be sold as better ones under the facade of technological progress. Technological progress is happening since time immortal. If not technological, evolutionary progress is happening since before that. Both of them are contributing to or trying to contribute to human happiness. But declaring new times as better times without much thought going into comparison is precipicious. And refuting all that from old times as ignoble is more so.
--------------------
This is a very simple argument.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लोकापवादाच्या भयाने घाबरायचे असते त्याच धर्तीवर अजोपवादाच्या भयाने मी तुमचे मुद्दे मान्य करतो.
"समाज व्यवस्था, जुनी-नवी, चांगली-वाईट" ह्याबद्दल अजो जे काही ह्या धाग्यावर बोलतील त्याला माझी बाय डिफॉल्ट सहमती समजावी.
किंवा निदान मी त्यांच्या विरोधात नाही; ह्याची नोंद करावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

प्रतिसाद आवडला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

And, lampooning new times simply to point fingers at the people who allegedly do the same for the old times is as stupid as the act which is purportedly more stupid according to Ajo. But it is interesting to note that he never considers both acts to be equally stupid while claiming to be neutral.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

while claiming to be neutral.

असं नाही हो. मी स्पष्टपणे प्रतिवादी भूमिका मांडतो. आय अ‍ॅम नॉट न्यूट्रल. बाकी भूमिका सगळेच मांडतात. अप्रतोधिनित पक्षाचे म्हणणे देखिल मांडले जावे, इतकेच. तुम्ही सगळे जुन्या काळाचे अव्वाच्या सव्वा समर्थन करू लागलात तर मला कदाचित उलट भूमिका घ्यावी लागेल.
---------------
जुन्या काळातील सामाजिक संस्था माणसाच्या "एकूण" गरजांपैकी किती गरजा समर्थपणे पेलत होत्या याबद्दल आपल्यात थोडाफार फरक आहे. फार नाही, नसावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आय अ‍ॅम नॉट न्यूट्रल.

एकदा असे म्हटले की काय पायजे ते बोलायचे लैसन्स मिळते असा समज असेल तर- हॅ हॅ हॅ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुम्ही केलेले जुन्या काळाचे अतिसिम्प्लिफाईड चित्रण हा सहेतुक आणि तर्कदुष्ट प्रकार आहे. सिलेक्टिव्ह रीडिंगचे उत्कृष्ट उदा. म्हणून याकडे बघता यावे. याच्याकडे निर्देश केला की 'ते लोक कसे जुन्या काळाला शिव्या घालतात, म्हणून मी नव्या काळाला शिव्या घालणार' या चिखलफेकीच्या चढाओढीशिवाय काहीच हाती लागत नाही. जुन्या काळाला सरसकट शिव्या घालणारे लोक मूर्ख असतील म्हणून विरुद्ध टोकाचा मूर्खपणा करणे इतके अवश्य आहे काय, याचा विचार अशा वेळेस कर्तव्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जनरली जुन्या काळाचं प्रतिनिधित्व कोणी करत नाही म्हणून मी करतो.
----------------
नव्या जमान्यात बरंच काही चांगलं आहे ते मला मान्य आहे.
---------------
जुन्या फडताळातलं उसकून भसाभसा डस्टबिनमधे घालणे चालू असताना, मी उचलून ते काय आहे ते पाहतो.
------------------------
एक रेघ मारून काळाचे जुना आणि नवा असे दोन भाग करता येत नाहीत, हा आवडतो तो नाही असं सांगता येत नाही. प्रत्येक गोष्तीची डितेल यादी बनवून मग सांगता यावं.
-----------------------
नव्या व्यवस्था आपल्या करताना जुन्या व्यवस्थांची कोणती मेरीट्स त्यांच्यात नाहीत हे पाहणे गरजेचे आहे. ते मी करतो. (नव्यात काय चांगले हे सगळेच पाहतात.)
--------------------------
माझा व्यक्तिगत जुन्या व्यवस्थेशी संबंध आल्यामुळे वैयक्तिक सहानुभूती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

माझा व्यक्तिगत जुन्या व्यवस्थेशी संबंध आल्यामुळे वैयक्तिक सहानुभूती आहे.

तुम्ही सोडून कैक लोकांचा आलाय आणि तेही खेड्यात वाढलेले आहेत. पण अशी अवास्तव सहानुभूती ते जुन्या काळाबद्दल दाखवत नसल्यामुळे, जुन्या काळाबद्दलचे शहरी लोकांना शिव्या घालणारे तुमचे मूल्यमापन वैयक्तिकच नव्हे तर बायस्ड देखील आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या लेखात आधुनिक सर्पमित्र आणि परंपरागत सर्पमित्र समाजात किती असत, ते कसे वागत, इ इ करेक्त पर्स्पेक्टीवमधे ठेवणे आवश्यक आहे. बदल सकारात्मक आहे कि नाही याबद्दलचे माझे विवेचन मी मांडले आहे. ते चूक असू शकते हे मान्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हुश्श्!
मला अजोंचे मुळ मत ढोबळ पातळीवर बर्‍यापैकी योग्य वाटल्याने सकाळपासून अस्वस्थ होतो.

ते चूक असू शकते हे मान्य आहे.

ते आता त्यांना चुक असु शकेल असे वाटु लागल्याने आता हुश्श वाटले आहे Wink

अजो, हे खरोखरच पूर्णपणे हलके घ्यावे ही विनंती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला अजोंचे मुळ मत ढोबळ पातळीवर बर्‍यापैकी योग्य वाटल्याने सकाळपासून अस्वस्थ होतो.

ऋषिकेशीय प्रवृत्तीमुळे दुसर्‍या कुणाला काय वाटेल हा वेगळाच विषय. तरी स्वतःस अस्वस्थ वाटल्यास कल्जि घेने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझ्या सहीत देखिल तेच लिहिले आहे. पण 'चूक असू शकते' हे अजूनच थेट झाले.
-------
तज्ञ लोकांची अभ्यासपूर्ण मते असतात. माझ्यासारख्यांची कच्ची असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अरेच्या! बहुतांश मुद्द्यांवर (चक्क) ढोबळ सहमती आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बीएसई मध्ये झालेलं अर्णव गोस्वामीचं भाषण बघत होतो. "नक्की काय बदल झाला आहे" हाच विषय दिला असल्यासारखा बोलला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आत्ता ऐकते आहे. आवडतोय. एकदम मस्त वाटतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

४० ६० १०० wattचे पिवळे बल्ब खूप कमी झालेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अन हा बदल चांगला आहे. लहानपणापासून तो रंग तद्दन हागरा आहे असे ठाम मत असल्याने त्याबद्दल लै तिटकारा होता आणि आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुम्ही लहानपणापासून बाजरीच्या भाकऱ्या ज़रा कमीच खालेल्या दिसतात Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कमी खाल्ल्यात हे खरे. पण पिवळ्यापिवळ्यातही फरक असतो हो. वरणभातही पिवळाच अन... असो.

पण हा तिटकारा लहानपणापासून आहे हे खरे. त्याला इलाज नाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला तो प्रकाश अति डिप्रेसींग वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत. शिवाय कपल विथ धिस इमेज, इट शुड हॅव बीन ब्यान्ड लाँग अगो. गुड रिडन्स!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कपल???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आय मीन 'कपल धिस डिप्रेसिंग सेन्सेशन विथ दि वन अरायझिंग औटॉफ दि पर्सेप्शन ऑफ कलर'.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

येस्स खरय Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0