छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ७ : धर्म
धर्म
भारतातला आणि समस्त अंतर्जालावारचा सर्वात संवेदनशिल विषय
पब्लिक लय तुटून पडतंय राव.
पण फोटोग्राफी किंवा कुठलीही कला हि कुठल्याच धर्माची नसते, त्यामुळे तिच्या नजरेतून हे विविध धर्म बघण्यातली मजा वेगळीच असेल
सो लेट्स स्टार्ट :)
नियमः
१. केवळ स्वतः काढलेली जास्तीत जास्त ४ छायाचित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करावीत. मात्र विषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
२. स्पर्धाबाह्य अशी कितीही चित्रे देण्यास हरकत नसेलच, मात्र त्यासाठी किमान एक चित्र स्पर्धेसाठी द्यावे लागेल. अन्यथा दिलेल्या चित्रांपैकी कोणतेही एक चित्र परिक्षक स्पर्धेसाठी म्हणून गृहित धरतील
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परीक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व परीक्षक असे चालू राहील.)
४. आज सुरू होणार्या स्पर्धेचा शेवट २१ जानेवारी २०१५ रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. त्यानंतर लवकरच निकाल घोषित होईल व विजेती व्यक्ती पुढील विषय देईल.
५. या आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिप्पण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठरावीकच निकष लावावेत असे, बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे, इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाची व्यक्ती आव्हान देईल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले, तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा शक्यतो एकच विजेता/विजेती घोषित करणे अपेक्षित आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.
व्यवस्थापकः सदर धाग्यावर छायाचित्राव्यतिरिक्त इतर विषयांवर फारशी चर्चा करू नये. समांतर चर्चेसाठी वेगळा धागा काढावा वा मनातले प्रश्न/विचार यातील ताज्या धाग्यावरही विचार मांडता येतील.
स्पर्धा का इतर?
धर्म आणि मिसळ
प्लान करून, लवकर उठून एका सकाळी मुंब्रादेवी ला गेलो तेव्हा काढलेले हे काही फोटो… "धर्म" या विषयावर कुठला फोटो द्यावा हा विचार करत असताना ही सकाळ आठवली आणि गरजेपेक्षा थोडे जास्तच फोटो शेअर करण्याचा मोह आवरला नाही. ती सकाळ "रम्य" वगैरे होती असे नाही, पण हवेत मुंबईच्या मानाने थोडा अधिक गारवा होता आणि, सूर्यकिरणे अगदीच सोनेरी नसली तरी असह्य पण नव्हती. मुंब्रा गावाला लागूनच देवीचा डोंगर आहे, आणि व्यवस्थित पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या चढताना आम्ही मागे वळून पाहिलं तर सूर्य आरामात वर येत होता, कसलीही घाई न करता… घरांमधून ऑफिस ला जाणाऱ्यांची लगबग चालू असणार असं वाटत होतं… मुंब्रा स्टेशन स्वच्छता कर्मचार्यांच्या खराट्यांनी स्वतःचं अंग नेटकं करून घेत होतं आणि "स्टेशन" च्या धर्माला जागून, लोकांच्या लाथाबुक्क्या खायला सज्ज होत होतं. गावातल्या मशिदीतून एक धर्म लाउड स्पीकर वरून आमच्यापर्यंत पोचत होता आणि एक धर्म डोंगरावर आम्ही पायऱ्या चढून येण्याची वाट बघत होता. या सहलीची सांगता आम्ही ठाण्याला जाऊन "मामलेदारांची मिसळ" खाऊन केली. नव्या गावात गेलो की तिथल्या मिसळी खाणे हा आमचा धर्म आहे. ठाण्याला "मामलेदारांची", डोंबिवली मध्ये "मुनमुनची", पुण्यात "काटाकिर्र" (बेडेकरांची आवडली नाही… गोड मिसळ म्हणजे ब्लास्फेमी!), धुळ्याला कुठेतरी मिसळीच्या नावाखाली पाव बुडवून खाल्लेले लाल रंगाचे तिखट तेल, औरंगाबाद ला N२ मध्ये "शिवा" मध्ये खाल्लेली भजे आणि पोहे बुडवलेली गरमागरम मिसळ (आणि तितकाच उत्तम चहा), आणि कोल्हापूरच्या फडतरे यांची "शास्त्रशुद्ध" मिसळ… अहाहा… अहाहा… श्या… मिसळीची आठवण म्हणजे अमेरिकेतला स्वतःचा (खूप दिवसांनी मिळालेला, ऑफिस चे काम न करण्याचा) वीकेंड खराब करून घेणे… असो…
१. खांद्याला डबा अडकवून हात वर करून लोकलचा धर्म पाळणारे लोक, आणि विजेच्या तारांमधून डोंगरावर दिसणारे मुंब्रादेवीचे मंदिर (स्पर्धेसाठी नाही)
२. स्वच्छ होऊन गलिच्छ होण्यासाठी सज्ज झालेले मुंब्रा स्टेशन (स्पर्धेसाठी नाही)
३. मुंबईचं धुकं, सोनेरी किरणं, आवाजी मशीद आणि रया गेलेल्या छतांच्या खाली चाललेली अदृश्य लगबग (स्पर्धेसाठी आहे)
४. "लोकांना ऑफिस मध्ये वेळेवर पोचवणे" हा धर्म पाळण्यासाठी उलट्या दिशेने रिकाम्या पोटी धावणारी लोकल (स्पर्धेसाठी नाही)
५. मामलेदारांची मिसळ (स्पर्धेसाठी नाही)
मिसळीत 'एवढं' आवडण्यासारखे
मिसळीत 'एवढं' आवडण्यासारखे काय आहे म्हंतेय.
म्हंजे क्षची मिसळ खाल्ली, यकडे मिसळ खायला जाऊ, इकडे परदेशात अबकडंची मिसळ फारफार मिस करतो भारतवारीत नक्की खाणार, वगैरे सांगण्यासारखं 'इतकं काही' मलातरी वाटत नाही मिसळीत.
"खा खा! मटारची उसळ खा!! केळीचं शिकरण खा!!!" टैप वाटतं ;-)
जे जिथे मिळत नाही तेच मिस
जे जिथे मिळत नाही तेच मिस करणार ना? आता आहे परदेशात, आणि आवडते मिसळ, तर मिस करू नये का? आणि क्ष ची मिसळ खाणे किंवा, य चा वडापाव खाणे, किंवा ख ची साबुदाणा उसळ खाणे… हा सगळा खाद्यसंस्कृतीचा भाग आहे… तुम्ही फिरायला जाता तेव्हा, "अबकड किल्ल्यात काय आहे बघण्यासारखं? एकावर एक ठेवलेले दगड तर कुठेही दिसतात" असं म्हणता का? किंवा… "ताजमहालात काय ठेवलंय एवढं? संगमरवरी फरशा तर आमच्या घरात पण आहेत" असं म्हणता का? (म्हणतही असाल… मी काही तुम्हाला प्रत्यक्ष ओळखत नाही… )
ज्याप्रमाणे नव्या गावी गेल्यावर तिथली प्रेक्षणीय स्थळं बघावीशी वाटतात त्याप्रमाणे नव्या गावी तिथे कुठे खायला चांगलं मिळतं हे बघितलं (आणि त्याबद्दल लिहिलं) तर त्यात वावगं काय आहे? आणि मिसळप्रेमी लोक शोधत असतील मिसळीसाठी प्रसिद्ध ठिकाणं… यात एवढा "snobbish" किंवा "elitist" प्रश्न पडण्यासारखं काय आहे? तुम्ही जे वाचलं त्यात तुम्हाला काहीतरी झोंबलं, म्हणून असे प्रश्न पडतायत का? परदेशाचा उल्लेख केला म्हणजे मी लोकांना, "बघा हो मी किनई परदेशात आहे" असं म्हणून हिणवतोय असं तुम्हाला वाटलं का? आहे मी परदेशात, आणि आली मला आठवण… जे मनापासून वाटलं ते लिहिलं… लिहिताना हातचं काही राखून नाही ठेवलं… ज्यांना फोटो मध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी त्यावर चर्चा करावी, ज्यांना मिसळीत इंटरेस्ट आहे त्यांनी त्यावर करावी (धाग्यास जे अनुकूल असेल ते!). पण असले snobbish प्रश्न तुम्ही धाग्यावर पाडता… असो… मला कल्पना आहे की माझी पोस्त थोडीफार विषयाला धरून असली तरी विषयांतर जास्त होतंय… यापुढे मिसळीसंबंधी एकही प्रतिसादावर मी तरी काही बोलणार नाही… तुमचे चालू द्या…
तुमचा इन जनरल विचारलेला
तुमचा इन जनरल विचारलेला "rhetorical" प्रश्न अर्थहीन होता म्हणून एवढं बोलावं लागलं मला… (तुम्ही वापरलेला शब्द मला वापरायचा नाही)… बाकी एका धर्माचे लोक दुसर्या धर्माच्या लोकांना कसं हिणवतात याचं मिसळ न खाणारे लोक मिसळ खाणार्यांना कसे हिणवतात, किंवा परदेशात नसलेले लोक परदेशात असलेल्यांना कसे हिणवतात याचं प्रात्यक्षिक च झालं की इथे… चला… म्हणजे विषयांतराचं पाप तरी कुणाच्या माथी येणार नाही.
नाही!
मिसळीच कौतूक फक्त तुम्हालाच आहे का? की परदेशात फक्त तुम्हीच आहात?
नाही.
तुम्ही ज्याला 'परदेशात' म्हणता१, तिथे मीही आहे. आणि मिसळीचे कौतुक मलाही आहे.
तर मग तुमचा मुद्दा नेमका काय होता म्हणालात?
..........
१ माझ्या पर्स्पेक्टिवानुसार मी स्वदेशस्थितच आहे, पण ते एक असो बापडे.
निर्णय
विषय थोडासा कठीण होता कि काय त्यामुळे जास्त प्रवेशिका आल्या नाहीत :)
धर्म म्हटल्यावर एकदम फिलिंग येईल अशी प्रवेशिका वाटली ती
मुळापासून यांची.
एकदम गोल्डन सकाळ, मशीद दिसतेय, धुके दाटलेले आहे, कधीही बांग ऐकू येईल, इतका लाइव फोटो आलाय
सो माझ्यामते विनर इस
शक्यतो घरगुती गणेशोत्सवाचे
शक्यतो घरगुती गणेशोत्सवाचे फोटो नकोत, किंवा उत्सवांचे (म्हणजे हटके असतील तर देता येतील, पण बरेच सोपे काम आहे ते) :)