कोर्ट
(ज्यांनी अजून हा चित्रपट पहिला नसेल त्यांनी आपल्या जबाबदारीवर पुढील उतारा वाचावा. )
(मी पहिल्यांदाच चित्रपटाबद्दल लिहित आहे. तेव्हा चूभूद्याघ्या)
काही दिवसांपूर्वी बीफोर सनराईज पाहत होतो. त्यातील नायक नायिकेला एका मालिकेची कल्पना सांगतो. जगभरातून ३६५ लोकांना निवडायचे आणि त्यांचा एक दिवस, त्या दिवसामध्ये ते कसे जगतात, काय करतात हे २४ तासासाठी शूट करायचे आणि दाखवायचे. यावरती नायिका पण हसते कारण आयुष्यातील त्याच कंटाळवाण्या, दैनंदिन गोष्टी परत पाहणे म्हणजे कठीण आहे.
हाच प्रकार कुणीतरी करावा अशी माझी अपेक्षा नाही परंतु अश्याच प्रकारचा प्रयत्न एखाद्या व्यवस्थेला किंवा संस्थेला चित्रित करण्याचा व्हावा असे मला वाटायचे.
कोर्ट या चित्रपटाने न्यायालयात कामकाज कसे चालत असेल हे हुबेहूब साकारण्याचा प्रयत्न केला आहे. बऱ्याच चित्रपटातून जी न्यायालये समोर आली त्यामध्ये भाषणबाजी, वकिलांचे तारखा घेण्यासाठी आजारी पडणे वगैरे वगैरे पाहायला मिळाली. पण कोर्ट याबाबतीत वेगळा आहे. इथे एकतर सत्र न्यायालय आहे आणि मोठ्याच्या मोठ्या चेंबर मध्ये खूप लोक फक्त हीच केस ऐकायला बसले आहेत असे नाही. त्यामुळे लोकांच्या दैनंदिन जीवनाच्या अगदी जवळ जाणारं हे न्यायालय आहे.
चित्रपटाची कथा एक लोकशाहीर नारायण कांबळे यांच्या भोवती फिरते. त्यांनी गायलेल्या एका गाण्यामुळे वासुदेव पवार यांनी आत्महत्या केली असा आरोप ठेवून पोलिस त्यांना अटक करतात. कोर्टात बऱ्याच तारखानंतर नारायण कांबळे यांना जामीन दिला जातो. नंतर त्यांना दुसऱ्याच कायद्याखाली परत अटक केली जाते आणि तो मुद्दा परत त्याच न्यायाधीशांसमोर येतो. पुढची तारीख देऊन कोर्टाला महिनाभराची सुट्टी पडते.एका अर्थाने इथेच चित्रपट संपतो (चित्रपट इथे संपवला असते तरी चालले असते, पण अजून काही सीन्स न्यायाधीशांच्या संदर्भात घडतात आणि मग चित्रपट संपतो.)
चित्रपट जसा जसा पुढे जातो तसे सरकारी वकील आणि बचाव पक्षाचे वकील यांचे वैयक्तिक आयुष्य दाखवले जाते. सरकारी वकील एका मध्यम वर्गीय घरातून आल्या आहेत तर बचाव पक्षाचे वकील एका श्रीमंत घरातून आले आहेत. त्यांच्या आवडीनिवडी यामध्येही खूप फरक आहे. सरकारी पक्षाचे वकील नाटक पाहायला जातात जे मराठी - अमराठी वादावरती आहे तर बचावपक्षाचे वकील एका बार मध्ये जाऊन परदेशी सहलींवर आपल्या मित्रांशी चर्चा करतात. तिथे बसून ते एक पोर्तुगीज गाणेही ऐकतात. दोघेजण आपापल्या घरच्यांसोबत जेवायला बाहेर कुठे कुठे जातात यावरही एक सीन आहे. एका बंदी आणलेल्या पुस्तकाच्या बाजूने बचावपक्षाचे वकील बोलतात तर दुसऱ्या दिवशी त्यांना लोकांच्या रागाला सामोरे जावे लागते. अश्या विविध गोष्टी दाखवत चित्रपट पुढे सरकतो. या गोष्टी objectively दाखवल्या गेल्या आहेत. त्यावरती कसलेही समालोचन चित्रपटात नाही. जो प्रेक्षक चित्रपट पाहतो आहे त्याने स्वतः त्याचा अर्थ लावणे अपेक्षित आहे.
चित्रपटातील पात्रांची निवड अतिशय उत्तम आहे आणि वास्तवाच्या जवळ जाणारी आहे. चित्रपटाचे छायाचित्रण उत्कृष्ट आहे विशेषतः रुंद आणि बर्याच वेळ चालणाऱ्या फ्रेम्स. पहिल्या काही सीन्स मध्ये एवढा वेळ चालणारी एकच फ्रेम पाहून वैताग येऊ शकतो पण पुढे पुढे त्याची सवय होते.
एकंदरीत एका कोर्ट केस च्या निमित्ताने समाज, न्यायव्यवस्था, सरकारी व्यवस्था यावरती भाष्य करण्याचे काम हा चित्रपट करतो.कुठल्या समीक्षकाने काय म्हटलंय किंवा आपले मित्र मैत्रिणी काय म्हणताहेत यावरती न जाता आपण स्वतः जाऊन एकदा अनुभव घ्यावा असा हा चित्रपट आहे!
ता.क.: काल मी हा चित्रपट कलकत्त्यात पाहिला. जेव्हा जायचे ठरवले तेव्हा वाटले कि पूर्ण थीएटर मध्ये आपण एकटेच असू आणि तसे असेल तर शो रद्द तर नाही होणार ना अशी शंका चाटून गेली. परंतु तसे काही झाले नाही. थीएटर छोटेच होते पण चित्रपट पाहायला साधारण ३० जण तरी हजर होते. हे चित्र पाहून खूप समाधान वाटले. चित्रपट संपला तेव्हा अगदी टाळ्याही पडल्या.
समीक्षेचा विषय निवडा
ता.क.: काल मी हा चित्रपट
ता.क.: काल मी हा चित्रपट कलकत्त्यात पाहिला. जेव्हा जायचे ठरवले तेव्हा वाटले कि पूर्ण थीएटर मध्ये आपण एकटेच असू आणि तसे असेल तर शो रद्द तर नाही होणार ना अशी शंका चाटून गेली. परंतु तसे काही झाले नाही. थीएटर छोटेच होते पण चित्रपट पाहायला साधारण ३० जण तरी हजर होते. हे चित्र पाहून खूप समाधान वाटले. चित्रपट संपला तेव्हा अगदी टाळ्याही पडल्या.
आं? कुठे? मी लिस्टिंग्स पाहिले तेव्हा फक्त लांब नागेरबाजार जवळ कुठेतरी एक शो होता. दक्षिणेत कुठेतरी लागलाय का? मला पहायला आवडेल.
दक्षिणेत कुठेतरी लागलाय का?
दक्षिणेत कुठेतरी लागलाय का? मला पहायला आवडेल.
अत्यंत अवांतर शंका. मुंबईप्रमाणे कोलकात्यातही उत्तरेपेक्षा दक्षिण भारी /महाग / एलिट आणि पूर्वेपेक्षा पश्चिम भारी /महाग / एलिट असा संकेत आहे का? किंवा उलट काही दिशाधारित मान्यता आहेत का? चेन्नईविषयी अशीच कोणाला माहिती आहे का?
http://drishtiad.blogspot.com
http://drishtiad.blogspot.com/2015/04/blog-post_17.html हा लेखदेखील चांगला आहे.
मन१ बहुत पहुंचा हुवा क्वेश्चन
मन१ बहुत पहुंचा हुवा क्वेश्चन मार्क हय.
अगदी अगदी.
काय तो मनोबाचा उद्वेग!
काय वर्णावा त्यांचा विषाद!!
तसं हे मानवतेचं नशीब कि मनोबा आजयुगात आहेत, एक १०००-२००० वर्षांपूर्वी ते असते तर कध्द्धी मंजे कध्धीच विज्ञान विकसित झालं नसतं याची गॅरंटी. या ब्रह्मांडातले इतके विरोधाभास ते इतक्या समपर्कपणे पुढे आणतात कि हे विश्व अचल, अढळ, सुसूत्र नियमांनी चालते अशी विज्ञान विकासाला आवश्यक पूरक, प्राथमिक भावना कुणाचीच त्यांचे प्रश्न ऐकून होऊ शकली नसती! खुंटलं असतं सगळं!!
कोर्ट
कालच 'कोर्ट' खूप काळानी चित्रपटात पाहील. गेल्या एका वर्षात मला जसं उमगलं, बहुतेक तसच चैतन्य ताम्हणेला दिसलं असं वाटतय. कोर्टाव्यतिरिक्त इतर गोष्टींवर केलेलं ह्या चित्रपटातलं भाष्य वस्तुस्थितीपासून जराही दूर वाटत नाही.
जवळ जवळ रोजच 'कोर्ट' अनुभवल्यावर डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणायचे ते गाणं आठवतं 'हे असे आहे परंतु हे असे असणार नाही......' पण कृती शून्य.
भारतीय दंडविधान आणि भारतीय घटना ह्या पेपरमध्ये जे ज्ञान वाटलं ते पण आठवलं......
Justice delayed is justice denied.
Audi alteram partem - nobody should be condemned unheard.
Freedom of everybody is paramount - Constitution of India
Bail, no jail - Late Justice V. R. Krishan Iyer
Everybody is presumed to be innocent unless proven guilty.
Fundamental Right to Life under Article 21 of the Constitution of India does not include filthy and unhygienic life.
and much more ........
इतकंच वाटतं जसा शिक्षणाच्या आयच्चा घो, तसा न्यायाच्या होण्यापासून आपण अजूनही टाळू शकतो.