Skip to main content

अनवट मराठी शब्द, वाक्प्रचार, संदर्भ

गविंनी काढलेला इंग्रजी शब्दांसाठी धागा वाचला. माझी समस्या उलट आहे, म्हणून हा मिरर धागा काढतेय - मराठीतले काही खास शब्द, जे इंग्रजी माध्यमात शिकलेल्यांच्या परिचयात फार उशीरा येतात, असे एकमेकांना सांगणार्‍यांसाठी. त्यांनी म्हटल्यासारखेच शब्दांपेक्षा शब्द समूह, वाक्प्रचार आणि कोलोक्वियल भाषा इडियमॅटिक लेखनात कशी वापरावी हा प्रश्न नेहमी मला पडतो. मराठी दहावीपर्यंत शिकले असले, आणि बोलता-वाचता चांगले येत असले तरी अलिकडेच सीरियस मराठी लेखनाला सुरुवात केली. त्याची अजून सवय व्हावी, सारखं सारखं शब्दकोशाकडे न धावता लिहीता यावं अशी खूप इच्छा आहे, आणि ऐसीवर पडीक राहून गेल्या दोन तीन वर्षांत बरीच सुधारणा झाली आहे. पण पारिभाषिक शब्दकोशही ठराविक विषयांवर भर देतात - कोलोकियल शब्दछटांचा सुरस अनुवाद नसतोच.

उदा: flag-waving patriots हे मराठीत इडियमॅटिकली कसे म्हणायचे? फॉर दॅट मॅटर इडियमॅटिकली चा चांगला मराठी शब्द काय आहे?
मराठीतली समाजशास्त्रीय परिभाषा इंग्रजीतून थेट अनुवाद करून तयार झाली आहे, आणि बोजड वाटते. अर्थपूर्ण, पण सुरस मराठीत लिहीणे जमायला पाहिजे.
irredeemable (इथे "मदतीच्या पलिकडे" अभिप्रेत आहे, पण शब्दकोशात बँकिंग शब्दावलीचे चेक रिडीम करण्याचे पर्याय दिसतात)
compromising position / in flagrante delicto (याचा अर्थ फ्रेंच/लॅटिन धागा-धुरंधर नंदन सांगेल)
cultural transmission (पिढ्यांपिढ्या सांस्कृतिक ज्ञानाला पास ऑन करणे)
kiss of death

असे बरेच आहेत, दुसर्‍यांनी ही भर टाकावी...

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

रोचना Wed, 22/04/2015 - 11:12

In reply to by अरविंद कोल्हटकर

मेटाहिस्टरी आणि हिस्टोरिऑग्रफी शब्द कधी कधी अदलून-बदलून वापरली जातात. पण त्यांच्यात फरक असा, की हिस्टोरिऑग्रफी इतिहासलेखनपद्धतीवर (मेथोडोलॉजिकल) भर देतो. बॅटमॅन ने म्हटल्याप्रमाणे हिस्टोरिऑग्रफी:
1) एखाद्या भौगोलिक, कालिक विषयाची हिस्टोरिऑग्रफी असू शकतो (ठसे, चर्चा, स्रोतांचे प्रकार, वाद, एकूण तर्क),
२) खुद्द लेखनपद्धतीची शिकवण असू शकतो (तर्क कसा मांडायचा, स्रोतांना कसं वाचायचं, त्यातून उपयुक्त माहिती कशी शोधायची, माहिती आणि तर्कात नेमका फरक काय, तळटीपा कधी व कशा द्यायच्या) आणि
३) तात्त्विक मुद्द्यांवर आधारित इतिहासलेखनाच्या विविध पद्धती असू शकतात (न्यू कल्चरल हिस्टरी, आनाल्स, मार्क्सवादी इतिहासपद्धती, माइक्रोहिस्टरी, लिटररी हिस्टॉरिसिसम, सबॉल्टर्न स्टडीज, सोशल हिस्टरी). तात्त्विक मुद्द्यांवर आधारित इतिहासलेखनचर्चेला फिलॉसॉफी ऑफ हिस्टरी (इतिहासलेखनमीमांसा म्हणता येईल) देखील म्हणतात - यात ऐतिहासिकतेवर, ऐतिहासिक जाणीवेवर, स्रोतांच्या शक्यता आणि मर्यादांवर, स्मृती/इतिहास द्वंद्वावर वगैरे भौतिक पेक्षा तात्त्विक भर असतो (उदा. हेगेल चे फिलॉसॉफी ऑफ हिस्टरी)

मेटाहिस्टरी हा एका ठराविक पुस्तकाचं नाव आहे खरं. पण इतिहासलेखनाच्या मुळाशी असलेल्या काही साहित्यिक स्ट्रक्चरचा उलगडा करायच्या अर्थाने त्यात मेटाचा वापर केला आहे - an overarching, and underlying structure that is present in, and informs a body of scholarship.

नंदन Tue, 21/04/2015 - 12:11

'परि' हा प्रत्यय इंग्रजीतल्या मेटाच्या अभिप्रेत अर्थाच्या (एखाद्या गोष्टीला बाहेरून वेढून, तिच्याकडेच निर्देश करण्याचा भाव) अधिक जवळ जातो, असं वाटतं.

पण समस्या अशी आहे, की साधारण याच अर्थाचे जवळपास अर्धा डझनवारी प्रत्यय (अधि-, बृहत्-, पर/पार/परि-, बाह्य-, उत्-, प्र) वेगवेगळ्या संदर्भात आपण वापरतच असतो. त्यांच्या निरनिराळ्या शक्यतांचा पल्ला बराच मोठा असल्याने ते सरसकट 'मेटा'करता वापरता येणार नाहीत.

रोचना Tue, 21/04/2015 - 12:46

In reply to by नंदन

क्योंकि यह संस्कृत भाषा पहलेसेही बहुत मेटा है! :-)
मला अधि ठीक वाटतो. अधिचर्चा (metadiscourse) अधिभाषा, अधि-इतिहास, हे काही मेटा-अमुकतमुक पेक्षा कृत्रिम नाही वाटत.

"So I just saw this film about these people making a movie, and the movie they were making was about the film industry..." "Dude, that's so meta.

मेघना, मेटा चा स्लँग वापर बृहत् द्वारे का नाही होऊ शकत - "माहितेका, मी हा सिनेमा पहिला, त्यात लोक सिनेमा बनवत होते, आणि तो सिनेमा सुद्धा सिनेमावरच होता..." - लेका, हे भलतंच बृहत् वगैरे आहे, गप आता, डोकं फुटेल माझं."

वजनदार शब्दाचा मुद्दामहून हलका-फुलका वापर: मेटाचा सुद्धा आणि बृहत् चा ही. पण बृहत् चा एकाकी वापर केला तरी अर्थ कळतो (मोठ्या आवाक्याचं काहीतरी), जो अधि वापरून होईलच असं वाटत नाही.

YMMV!

बॅटमॅन Tue, 21/04/2015 - 12:56

In reply to by रोचना

लेका, हे भलतंच बृहत् वगैरे आहे, गप आता, डोकं फुटेल माझं.

मेटाकुटीला येणे हा वाक्प्रचार अशा वेळी अगदी चपखल वाटतो. (त्या गार्टरच्या बकलासारखा?)

मेघना भुस्कुटे Tue, 21/04/2015 - 13:20

In reply to by रोचना

मेघना, मेटा चा स्लँग वापर बृहत् द्वारे का नाही होऊ शकत - "माहितेका, मी हा सिनेमा पहिला, त्यात लोक सिनेमा बनवत होते, आणि तो सिनेमा सुद्धा सिनेमावरच होता..." - लेका, हे भलतंच बृहत् वगैरे आहे, गप आता, डोकं फुटेल माझं."
वजनदार शब्दाचा मुद्दामहून हलका-फुलका वापर: मेटाचा सुद्धा आणि बृहत् चा ही. पण बृहत् चा एकाकी वापर केला तरी अर्थ कळतो (मोठ्या आवाक्याचं काहीतरी), जो अधि वापरून होईलच असं वाटत नाही.

मान्य.
एकूण ही चर्चा आता 'बाहेरची' झाली! ;-)

बॅटमॅन Tue, 21/04/2015 - 12:30

मेटा साठी अधि हा प्रत्यय पुरेसा मराठी नाहीये हा सोवळेपणा अस्थानी वाटतो. मराठीत या प्रत्ययाची गरज पडेल असं लिखाण झालंय ते सर्व संस्कृत शब्द घेऊनच. त्यामुळे वेगळ्या प्रत्ययाची गरज पडली नाही.

अगदी त्या जर्मानिक फ्यामिलीतल्या इंग्रजीनेही ग्रेकोलॅटिन शब्द भारंभार घेतलेच ना? मग मराठीने संस्कृत शब्द उचलणे हे मराठीच्या कमकुवतपणाचे लक्षण का मानावे? और वैसेभी, देशभाषा आणि कॉस्मोपॉलिटन भाषा यांमध्ये हा फरक कायम राहणारच आहे त्याला इलाज नाही.

बॅटमॅन Tue, 21/04/2015 - 12:48

In reply to by मेघना भुस्कुटे

पाहिले. :)

एक टिप्पणी करतो फक्तः चपखल प्रतिशब्द इ. शोधणं ठीकच आहे, पण जिथे वैचारिक क्षेत्रातले प्रतिशब्द पाहिजे असतील तिथे देशभाषा तितक्या पुर्‍या पडतील असं वाटत नाही. देशभाषा आणि कॉस्मोपॉलिटन भाषा यांच्या वापराचा इतिहासच काहीसा असा आहे की देशभाषा ओन्ली गुड फॉर फीलिंग & नॉट फॉर विचार इन जण्रल असा एक मुद्दा शेल्डन पोलॉक मांडतो. विचारांती तो पटतोही.

मेघना भुस्कुटे Tue, 21/04/2015 - 12:52

In reply to by बॅटमॅन

होय. म्हणूनच काही ठिकाणी 'अधिविदा'ला पर्याय नसेल, हे मला पटतं आहेच. पण सगळीकडे तोच तो शब्द वापरण्याचं काही कारण नाही. कधीकधी ध्यानीमनी नसताना एखादा चपखल समांतर देशी शब्द / शब्दसमूह मिळून जातो. त्यासाठी खटाटोप.

बॅटमॅन Tue, 21/04/2015 - 12:56

In reply to by मेघना भुस्कुटे

ध्यानीमनी नसताना एखादा चपखल समांतर देशी शब्द / शब्दसमूह मिळून जातो. त्यासाठी खटाटोप.

सहमत.

नंदन Tue, 21/04/2015 - 12:56

In reply to by बॅटमॅन

देशभाषा ओन्ली गुड फॉर फीलिंग & नॉट फॉर विचार इन जण्रल असा एक मुद्दा शेल्डन पोलॉक मांडतो.

हा देशभाषांचा अधिक्षेप आहे! ;)

adam Tue, 21/04/2015 - 13:31

अधिविदा शब्द नको असेल तर पितृविदा हा शब्द सोयीस्कर ठरावा.
पितृ सुद्धा संस्कृत असला तरी मराठीमध्ये अधि ह्या प्रत्ययापेक्षा तो अधिक प्रचलित आहे.
किंवा उगम, मूळ , बीज हे शब्द प्रिफिक्स म्हणून वापरावेत असे सुचवतो.
उदा :- उगमविदा किंवा मूळविदा किंवा बीजविदा म्हंजे मेटाडेटा.
मला स्वतःला बीजविदा किंवा पितृविदा हे अधिक योग्य वाटताहेत.
पहिल्यांदाच ऐकत असल्यानं सुरुवातीस वेगळे वाटतील; पण सवय होउन रुळतील असे वाटते.
.
.
नैतर .....
एक भन्नाट आयडिया.
मेटाफोटो ह्या शब्दाचा अर्थ काय होतो ?
फोटोचा फोटो!
'फोटोचा फोटो' ह्या शब्दसमूहाबद्दल आपण 'चा-फोटो' किंवा 'चाफोटो' हा शब्दप्रयोग रुढ केला तर ?
ह्याठिकाणी 'चा' ह्या शब्दाच्या आधी 'फोटो' हा शब्द अध्याहृत आहे.
उदा :-
चाविदा, चाफोटो, चाइतिहास,चासिनेमा
.
.
'चा' हा प्रत्यय म्हंजेच 'मेटा' ह्या शब्दाचे अस्तित्व.
शिवाय 'चा' विभक्ति प्रत्यय हा १००% मराठमोळा!

अजो१२३ Tue, 21/04/2015 - 13:27

कणभौतिकशास्त्राला यद्वत कोणत्या एकजिनसी प्राधिकणापासून सर्वद्रव्यभवन झाले आहे हे उमगत नाही वा मूलतः असा प्राधिकण असावाच कि नाही उमगत नाही तद्वत काहीसे शब्दांमागील संकल्पनांचे झालेले असणे संभव आहे. मूळात व्यक्तिगणिक मांडावयाच्या मनसोत्पन्न संकल्पना समानच असाव्यात काय? आणि असल्यास एकाधिक मूलभूत संकल्पनांचा समुच्चय जो एकाच शब्दाने अभिव्यक्त होतो त्या एकत्रीकरणात व्यक्तिगणिक उणेअधिक होत असावे काय? या शिवाय प्रत्येक मूलभूत संकल्पनेचे जे गुणधर्म आहेत त्यांचे देखिल मूल्य कमिअधिक करण्याचे स्वातंत्र्य मानवी चेतनासंस्थेस असावे. याने प्रकटीकरण करावयाच्या बाबीच्या अमापनीय अनंत छटा राहून जात असाव्यात काय? मग यापुढे जाऊन अन्यभाषिकांशी संवाद करताना, जिथे मूलभूत संकल्पनांचे स्वरुपच भिन्न असू शकते, वा त्यांच्या एकत्रीकरणाची परियोजना भिन्न असू शकते वा त्यांच्या गुणधर्माच्या मूल्याच्या चयनाची प्रक्रिया भिन्न असू शकते तिथे समानार्थी संज्ञा शोधणे सयुक्तिक असावे काय?
-----------------------------------------------------------------------------------------------------------
सदर अर्थघन प्रतिसाद टिंकूतैच्या आणि त्यांचेसोबत ऐसीवरील प्रतिसादांचे सहवाचन करणारांच्या चरणी सादर समर्पण करण्यात येत आहे.

तिरशिंगराव Tue, 21/04/2015 - 17:23

In reply to by नितिन थत्ते

रसायनशास्त्रांत 'मेटा' चा अर्थ एखाद्या ग्रुपची रिलेटिव्ह पोझिशन दाखवण्यासाठी वापरतात. उदा.- ऑर्थो(२), मेटा(३) वा पॅरा(४) डायनायट्रोबेंझिन. किंवा मेटा क्लोरो- अ‍ॅनिलिन वगैरे.
त्यामुळे कित्येक दिवस, मला मेटाडोर या वाहनाचा दरवाजा मध्यभागी असतो, म्हणून तसे नांव आहे असे वाटायचे.

बॅटमॅन Tue, 21/04/2015 - 17:48

In reply to by तिरशिंगराव

ऑर्थो(२), मेटा(३) वा पॅरा(४)

अकरावी-बारावीतल्या ऑरगॅनिक केमिस्ट्रीनंतर हे शब्द पहिल्यांदाच ऐकले अन अं.ह. झालो.

गवि Tue, 21/04/2015 - 14:10

In reply to by मेघना भुस्कुटे

seasoning - फोडणी

thaw - बर्फाळ वस्तू वापरण्याची प्रथा नसल्याने मूळ भाषेत थेट शब्द असणं अवघड आहे. वितळवणे - पण उष्णता देऊनच असे नव्हे.

blanch - नरमवणे (!?)

toss - पाखडणे, .... उफणणे (?! नॉट एक्झॅक्टली)

ऋषिकेश Tue, 21/04/2015 - 14:19

In reply to by मेघना भुस्कुटे

"सिझनिंग केलं" ला "चविष्ट/सुवासिक/सुरस केलं" हे चालेल काय?

थॉ करणे - सामान्य तापमानाला आणणे किंवा 'गुठळ्यामोड' तापमानाला आणणे ;)

ब्लांच करणे - उकळी काढणे?

टॉस करणे - याला टॉस करणेच म्हणावे. असा प्रकार भारतीय /मराठी पाकृमध्ये करत नसल्याने बळंच पर्यायी शब्द नको. सोवळ्यांनी पांढरा ठसा वाचु नये: (रोचक अवांतरः अनिलिंङ हा एक दोन व्यक्तींमधील शरीरसंबंधाचा प्रकार (ज्याला अ‍ॅनस-टु-ओरल सेक्स म्हणतात). आम्रिकेतल्या जेलमध्ये कैदी आपापसातल्या भांडणात शिक्षा म्हणून हा प्रकार काही वेळा करायला लावतात त्याला "टॉसिंग सलाड" किंवा "ही टॉस्ड सलाड" अशा प्रकारचे स्लँग वापरले जाते. ;) अशावेळी जे 'टॉसिंग' वापरले जाते त्या अर्थाने मराठी प्रतिशब्द भिरभिरवणे ;)करता येईल का :P)

धनंजय Wed, 22/04/2015 - 02:33

In reply to by ऋषिकेश

वर रोचना यांच्या "बृहत्" वरून उगाच "बृहती" शब्द आठवला. येथे पांढऱ्या ठशात अंशतः तो आला. (बृहती शब्द आयुर्वेदाबाबत एका मराठी पुस्तकात वाचला होया.)

रोचना Tue, 21/04/2015 - 15:00

In reply to by मेघना भुस्कुटे

कुठल्या पाककृतीचा अनुवाद करतीयेस?

सीझनिंग - चवीला/ चवीसाठी "त्यात चवीला काळी मिरी शेवटी ताजी कुटून घालावी." (season with fresh ground black pepper at the end) "त्या ऑमलेट मधे ताज्या चाइव्ज ने चव येते (that omelette is seasoned with fresh chives)
थॉ - एकाच शब्दाऐवजी "बर्फात गोठले असल्यास वितळवून घेणे" बरे वाटते. पुढे जागा अथवा गरज असल्यास कसे डीफ्रॉस्ट करायचे हे सांगता येईल.
ब्लांच करणे - "बदामांना क्षणभर उकळत्या पाण्यात बुडवून लगेच गार पाण्यात टाकावे, सालं लगेच निघतात."
टॉस - कठीण आहे. मिसळणे, मिसळून घेणे, कुठलेच बसत नाही.

अमुक Tue, 21/04/2015 - 15:32

In reply to by मेघना भुस्कुटे

toss - हिंदळणे, आंदुळणें/आंदोळणें, हेलकावणें (ते सलाद चांगलं हिंदळून घे रे जरा !)
blanch - अर्धवट उकडून घेणे
thaw - नरम होणे/करणे. (गोठल्यामुळे आलेला दडदडीतपणा (ताठा) नाहिसा होणे या अर्थी 'वरमणे' वापरायला हरकत नाही ;) )
season - बळंच वापरायचं असल्यास 'चव चढवणे' असे वापरता येईल. एरवी मराठीत आपण सविस्तार सांगतो. आल्याचा वास लाव. हिरव्या मिरचीचं वाटण लाव. खोबरं भुरभुरंव, इ.

मेघना भुस्कुटे Tue, 21/04/2015 - 17:00

@गवि
नाही हो, फोडणी कशी काय? तिखटमीठ घालणे, वरून मसाले भुरभुरवणे, एखादा मसाला वाटून 'लावणे'... हे ठीक. पण फोडणी? नाही पटत. पाखडणे मात्र मस्त आहे! फक्त त्या क्रियापदात काहीतरी नकोसा पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया अंतर्भूत आहे. इथे तर काही बाहेर सांडू न देण्यातच सगळी गंमत.

@रोचना
नाही गं, मेट्यास जाऊनयेऊन कंटाळले, म्हणून बरेच दिवसांपासून पडलेले प्रश्न विचारून घेतले झालं! तुझी सगळी भाषांतरं पटली. या सगळ्या संज्ञा संस्कृतिबाह्य असल्यामुळे त्यांची भाषांतरं करताना प्रतिशब्द मिळणे नाही. ओढून ताणून केलीच तर त्यात गंमत नाही.

@ऋ
सामान्य तापमानाला आणणे परफेक्ट आहे. ’गुठळ्यामोड’ मात्र उगाच! ब्लांचमध्ये उकळी अभिप्रेत आहे का? उकळत्या पाण्यातून थेट बर्फगार पाण्यात पदार्थ नेण्याची क्रिया?

@अमुक
आंदुळणे नाही बा. माझ्या डोळ्यांसमोर एका गोजिरवाण्या बदकाच्या पिल्लाला कढईत आंदुळणारा टॉम आला! आंदुळणे आणि बाळं यांच्यात घनिष्ट लागेबांधे आहेत. हिंदळणे ठीक. पण तो मुद्दाम केलेला. हेलकावण्यात तर स्पष्टच द्रव पदार्थाचं सूचन आहे.
वरमणे - हम्म!
बाकी सीझनिंगबद्दल मान्य. निदान मराठी स्वैपाकात तरी वरून कोरडं काही शिवरायची (!) / भुरभुरवण्याची पद्धत नाही. असलीच तर ती शोभेसाठी. चवीसाठी नव्हे. चवीसाठी ’वाटून लावणे’ हेचं खरं.

मेघना भुस्कुटे Tue, 21/04/2015 - 21:38

In reply to by अमुक

ओह, मला नव्हता हा माहीत. हा चोख प्रतिशब्द आहे की मग. पण मी वापरलेला कधी ऐकलासुद्धा नाही. त्यामुळे मला वापरायला जड जाईल जरा.

रोचना Wed, 22/04/2015 - 10:42

In reply to by मेघना भुस्कुटे

आज पासून मी रोज हिंदळलेल्या कच्च्या भाज्या खाणार आहे. किंबहुना, tossed salad लाच "हिंदळी" शब्द कसा वाटतो? (tongue firmly in cheek - याला चपखल शब्दप्रयोग कोणी सांगेलच या आशेने)

मेघना भुस्कुटे Wed, 22/04/2015 - 11:52

In reply to by रोचना

tongue in cheek - याचंच भाषांतर करून ’गालातल्या गालात हसत’ तयार केलाय की काय, अशी आता मला शंका येतेय. (मराठीत शब्दाचा जन्मकाळ - निदान अनमानधपक्याने तरी - देईल, असा कोश आहे का?)

नाहीतर मग - ’मिश्कीलपणे’ / ’मिश्कील’ चालेल का?

गवि Wed, 22/04/2015 - 12:03

In reply to by मेघना भुस्कुटे

टंग इन चीक म्हणजे फक्त "गालातल्या गालात हसत" इतका निरुपद्रवी अर्थ नसावा मराठीत. महाराष्ट्रात तरी गालात जीभ (घोळवत )ठेवून एखाद्या स्त्रीपुढे नुसते उभे राहिले तरी विनयभंगासहित अन्य चार्पाच कलमे त्या पुरुषावर दाखल व्हावीत असा अंदाज आहे.

'न'वी बाजू Wed, 22/04/2015 - 15:16

In reply to by मेघना भुस्कुटे

"मैं भी मुँह में ज़बान रखता हूँ,
काश पूछो कि मुद्द'आ क्या है|"

(चूभूद्याघ्या.)

रोचना Wed, 22/04/2015 - 15:29

In reply to by मेघना भुस्कुटे

"टंग इन चीक" चा अर्थ "वरवर खरे वाटणारे, पण गंमत म्हणून केलेले खोटे, अतिशयोक्त, उपरोधक विधान" असा होतो. त्यामुळे मिश्किलपणे फिट्ट वाटतो.

मिसळपाव Tue, 21/04/2015 - 20:34

In reply to by मेघना भुस्कुटे

अरे वा वा, म्हणजे तू काय आता "...उर्फ सुगरणीचा सल्ला" असं एक झकाssssस सदर मागे लिहिलं होतंस त्यात भर घालणारेस का काय?

त्याच्या सगळ्या भागांच्या लिंका देशील का?

मिसळपाव Tue, 21/04/2015 - 21:45

In reply to by मेघना भुस्कुटे

तुझा हा ब्लॉग माहितीच नव्हता - धन्यवाद! उद्या-परवा जरा वेळ आहे तेव्हा तासाभारची सोय केलीस माझी. तू पोह्यांचं ईतकं छान वर्णन केलं होतंस त्यात की नुसतं वाचूनच माझा जीव ठंडावला होता. देव तुजां भला करो गे बाय!!

मिसळपाव Wed, 22/04/2015 - 19:33

In reply to by मेघना भुस्कुटे

पाहिलंत? पाहिलंत?? संस्कार लपत नाहित हो! :-)

या ब्लॉगमधे पोहे मिळाले! पण तू 'उर्फ सुगरणीचा सल्ला' हि मालिका लिहिली होतीस ती कुठाय? (थेट बटाटयाच्या चाळितल्या 'पण नवली मुग्गी कुथाय?' च्या चालीवर).

मेघना भुस्कुटे Wed, 22/04/2015 - 21:09

In reply to by मिसळपाव

:) त्या मालिकेत लिहिलेले सगळे भाग तिथे चढवले आहेत. शिवाय सहब्लॉगराचे लेखही आहेत. फक्त त्या ब्लॉगवर शीर्षकं निराळी आहेत, इतकंच.

मिसळपाव Wed, 22/04/2015 - 22:11

In reply to by मेघना भुस्कुटे

येस. मी पोह्यांनंतर मिसळीकडे वळलो तेव्हा हा प्रकार लक्षात आला! पण म्हणजे सगळे भाग आहेत, गुड. थोडी निराशा झाली कारण "अजून एक फराळी चिवड्याचा पॅक आहे" असं वाटून दोन दिवस चिवडा चापावा आणि परत एकदा बशी भरून घेताना हाच शेवटचा पॅक आहे हा शोध लागावा तसं थोडंसं झालं :p


तू चकली करण्याबद्दल लिहिलयंस. मुळात मला मी बायकोला मदत करायला लागल्यावर साक्षात्कार झाला की अगदी चारच जणं घरातली धरली तरी त्याना सकाळ-संध्याकाळ करून घालायला काय काय कटकटी असतात! आणि आता फार जाणवतं की आपण शाळा/कॉलेजात असताना आईला कधीही ईतकी/अशी मदत केली नाही. :( आईने डबे भरभरून चिवडा/चकल्या/लाडू करायचे, सणासुदीला पक्वान्नं करायची आणि आपण ती फस्त करायची या पलीकडे माझं डोकं कधी चाललं नाही याचं आता वैषम्य वाटतं. असो.

आदूबाळ Wed, 22/04/2015 - 22:24

In reply to by मिसळपाव

माझ्या आज्जीची नेमकी हीच तक्रार होती! "मुलं बायकोला घरकामात मदत करायला पुढेपुढे करतात, पण आईला मात्र कधी विचारलं/त नाहीत..." तिच्या धुसफुस करण्याच्या अनेक प्वाइंटांपैकी हे एक होतं.

राही Tue, 21/04/2015 - 21:46

टॉस या क्रियेसाठी मराठीत 'आसडणे' हा शब्द रूढ आहे. काही भाज्या, विशेषतः उसळी,यात थेट पाणी घालण्याऐवजी फोडणीत त्या आसडून आसडून परतून घेतल्या तर जास्त चांगल्या लागतात. 'उसळ' हा शब्द सुद्धा 'उसळणे'वरून आला असावा.

अमुक Tue, 21/04/2015 - 23:54

In reply to by राही

आसडणे हा शब्द माहीत आहे परंतु तो 'टॉस' या अर्थी कमी नि अचानक खेचणे (जर्क) वा हिसकावणे या अर्थी वापरला जातो अशी समजूत होती. किंबहुना तो हासडणे / हसडणे हाच असावा असा संशय आहे (उदा. जीभ हासडून काढेन).
आसडीचा तांदूळ हा प्रकार ऐकला आहे. त्यात तांदूळ अनेकवार धोपटण्याची क्रिया असते असे ऐकून आहे. त्यात कितपत तथ्य आहे ते माहीत नाही.

अमुक Wed, 22/04/2015 - 09:10

In reply to by बॅटमॅन

बरोबर. ही प्रक्रिया काय असते काही कल्पना ?

आज सकाळीसकाळीच अचानक 'हातसडीचे' आठवले नि प्रतिसाद सुधारायला आलो तर तुम्ही आधी येऊन पोहोचलेले :).

ऋषिकेश Wed, 22/04/2015 - 09:50

In reply to by अमुक

तादूळ सडण्यासाठी - झोडपणीसाठी एक दंडगोलाकार लांबलचक शिळा असते. त्यावर अनेक मजूर भाताच्या ओंब्या घेऊन झोडपणी करतात. त्यामुळ तांदूळ वेगळा होण्यात मदत होते.

बाजारात मिळतो तो मशीनवर विलग केलेल्या तांदुळावरील लेअर नष्ट होतो.

--

उरण-पेण-पनवेल या भागांत जुनी कौलारू घरे होती तेव्हा अनेक घरांसमोर असे दगड, उळख वगैरे गोष्टी अंगणार असत. आमच्या जीआयजोंचे ते गडकिल्ले असत ;)

राही Wed, 22/04/2015 - 16:50

In reply to by ऋषिकेश

धान्य सडणे म्हणजे झोडपणे नव्हे. झोडपणी(threshing) होते ती ओंबी/लोंबीपासून भातगोटे वेगळे करण्यासाठी. एकदा भात मिळालें की त्याचे टरफल काढून टाकून तांदूळ बनवावे लागतात. यासाठी दोन क्रिया असतात, एक सडणे आणि दुसरी भरडणे. भल्यामोठ्या लाकडी जात्यातून भरडणी होते. हलक्या मुसळाचे हलके घाव उखळीतल्या भातावर मारले की त्याला भाताच्या बाबतीत सडणे म्हणतात आणि भाताशिवाय अन्य धान्यांसाठी कांडणे म्हणतात.(अलीकडे कांडणेच म्हणतात. त्यातूनही देशावर साळी कांडणे आणि कोंकणात भात सडणे असा सूक्ष्म भेद करता येईल.)याने भातगोट्याचे वरवरचे टरफल निघून येते आणि लालसर असा तांदूळ मिळतो. हा हाताने सडलेला म्हणजे हातसडीचा असतो.यामध्ये फक्त outer husk निघून येते.सालालगतचा पोषक थर दाण्याला चिकटून रहातो. म्हणून हा तांदूळ जाडाभरडा वाटला तरी पौष्टिक असतो.पण आता मानवी श्रमाने काढलेले दाणे चवीला मानवत नाहीत, मानवी श्रम महाग पडतात आणि उत्पादनही कमी मिळते म्हणून सरळ milling करतात. याने तूस निघते पण कोंडाही निघून तांदूळ सत्त्वहीन होतो. पण दिसायला शुभ्र चकचकीत आणि बारीक होतो.
आसडणे, हासडणे आणि सडणेचा फारसा संबंध दिसत नाही. हां, आता सडलेले तांदूळ आसडावे म्हणजे हलकेच पाखडावे लागतात.
जीभ हासडणे(उपटणे, खेचणे) आणि शिव्या हासडणे(फेकणे,तोंडावर आपटवणे)यामध्ये हासडणेचे वेगळे अर्थ दिसतात असे वाटते.

धनंजय Fri, 24/04/2015 - 02:12

In reply to by शुचि.

उत्तर अमेरिकेत थंड प्रदेशांतील पाणथळ भागांत wild rice नावाचे धान्य/वनस्पतीचे बी मिळते. बी लांबट असते, पण तांदूळ प्रजातीशी काहीही संबंध नाही.

शुचि. Fri, 24/04/2015 - 23:30

In reply to by धनंजय

अरे बापरे हे माहीत नव्हते. धन्यवाद धनंजय.
___
अनेकदा चिकन-वाईल्ड राइस सूप प्याले आहे. तो वाइल्ड राइस मला बेचव व भातासारखाच लागला.

धनंजय Sat, 25/04/2015 - 22:01

In reply to by शुचि.

सॅलेडमध्ये खाऊन बघण्यासारखे धान्य आहे, म्हणजे वेगळी चव आणि पोत लक्षात येण्यास बरे.

(नीट शिजवल्यानंतर हे धान्य भातापेक्षा पुष्कळ टचटचीत लागते. म्हणजे अपेक्षा योग्य असेल तर "टचटचीत" वगैरे कोणी म्हणणार नाही, पण मऊ भाताची अपेक्षा असल्यास... )

फायबर, प्रथिने, व्हिटामिने वगैरे भरपूर असलेले हे धान्य आहे. चविष्टही. परंतु अन्य धान्यांच्या तुलनेने किलोचा दर बराच महाग आहे.

बॅटमॅन Sat, 25/04/2015 - 11:30

In reply to by अजो१२३

नेटवर पाहिलाय याचा फोटो, चवीला कशी लागते? आणि टेक्श्चर, फील वगैरे नेहमीच्या भाताच्या तुलनेत कसा आहे?

धनंजय Sat, 25/04/2015 - 21:47

In reply to by अजो१२३

आग्नेय आशियाई मालाच्या दुकानांत हा जांभळा (काळा) तांदूळ मिळतो. गोडसर, चविष्ट लागतो.

ऋषिकेश Wed, 22/04/2015 - 17:20

In reply to by राही

मला झोडपणे नी सडणे सेमच वाटे (ओंबीपासून दाणे वेगळे/मोकळे करणे). त्यानंतर थेट भरडणे बघितलेय. भरडणे वेगळे हे माहित होते.
हे उखळात घालून सडताना कधी बघितले नव्हते. वर म्हटल्याप्रमाणे त्या दगडाच्याच नाजुला मोठी उखळ असायची खरी. पण आम्हाला त्या वयात, याचा उपयोग मसाले कुटायला असेल असा स्वतःच समज करून घेतलेला. शिवाय तेथल्या काही बायका सांडगे मिरच्यांत भरायचा कुटाणा त्या उखणात करताना बघितल्याने तेच डोक्यात फिट्ट आहे.

तुमचे ह्या माहितीबद्दल अनेक आभार!

एकुणातच हा धाग चांगलाच बहरलाय! :)

अरविंद कोल्हटकर Wed, 22/04/2015 - 19:39

In reply to by ऋषिकेश

'मुद्राराक्षस' नाटकाच्या प्रस्तावनेमध्ये सूत्रधार त्याच्या घरात चाललेल्या काही समारंभाच्या तयारीचे वर्णन करीत आहे. तो म्हणतो:

वहति जलमियं पिनष्टि गन्धान्
इयमियमुद्ग्रथते स्रजो विचित्रा:।
मुसलमिदमियं च पातकाले
मुहुरनुयाति कलेन हुंकृतेन॥

एक (सेविका) पाणी भरत आहे, एक गन्ध उगाळत आहे, एक चित्रविचित्र माळा गुंफत आहे, आणखी एक सेविका मुसळ खाली पडत असतांना त्याच्याबरोबर 'हुं हुं' असे आवाज करीत आहे.

आजहि कांडप करणार्‍या स्त्रिया 'हुं हुं' असा आवाज मुसळाबरोबर करतात हे पाहिले आहे.

बॅटमॅन Thu, 23/04/2015 - 01:09

In reply to by अरविंद कोल्हटकर

वृत्त कुठले?

वहति जलमियं पिनष्टि गन्धान् - न-न-र-य.
इयमियमुद्ग्रथते स्रजो विचित्रा:। - न-ज-ज-र-ग.
मुसलमिदमियं च पातकाले - न-न-र-य.
मुहुरनुयाति कलेन हुंकृतेन॥ - न-ज-ज-र-ग.

अर्धसमवृत्त तर दिसतेच आहे, पण कुठले? पुष्पिताग्रा? द मोस्ट फेमस अर्धसमवृत्त?

गूगल केल्यावर दिसले. पुष्पिताग्राच आहे.

अरविंद कोल्हटकर Thu, 23/04/2015 - 02:06

In reply to by बॅटमॅन

पुष्पिताग्रेचे अजून एक उदाहरण - हे उत्तरामचरितातीलः

अनियतरुदितस्मितं विराजत्-
कतिपयकोमलदन्तकुड्मलाग्रम्।
वदनकमलकं शिशोः स्मरामि
स्खलदसमंजसमुग्धजल्पितं ते॥

(कारणाशिवाय हसू आणि कारणाशिवाय रडू, दाताच्या काही कळ्या, बोबडे आणि असमंजस बोलणे अशांमुळे गोड वाटणारे तुझे मुख मला आठवते.)

हे झाले माझे अतिगद्य भाषान्तर. ह्याचेच नवनीतकार परशुरामपंततात्या गोडबोले ह्यांचे थोडक्या शब्दातले कवितेत भाषान्तरः

बाई माझे लाडके सिताबाई
बालपणिचे कवतूक वदू काही|
तुझे जेव्हा मी पाहतसे मूख
काय मजला ते होय वदू सूख||

बॅटमॅन Thu, 23/04/2015 - 10:44

In reply to by अरविंद कोल्हटकर

धन्यवाद. परशुरामतात्यांचे भाषांतर गोड आहे - यद्यपि काही मालमसाला गाळलेला आहे.

बादवे त्यांचे भाषांतर दिंडी वृत्तात आहे ना?

आणि त्यांची इतर ग्रंथसंपदा कुठली आहे? ती कुठे मिळेल? मला नवनीताचे संपादनच माहितीये फक्त.

(आणि वृत्तदर्पण- सुदैवाने त्याची एक हार्ड कॉपी माझ्याकडे आहे. :) )

"हे वेचे बहुयत्नें मेळविले परशुरामतात्याने
ज्यानें त्यानें अवलोकावे, पावावी शीघ्र रसिकता त्याने". :)

राही Wed, 22/04/2015 - 17:19

tactical यासाठी धोरणीपणे किंवा मुत्सद्दीपणे हे योग्य वाटतात.
saute साठी (कमी तेलात)भराभर परतणे असा शब्द समूह वापरावा लागेल. stir साठी ढवळणे.
शिवाय कढईत (जास्त तेलात) तळणे, कढईत (तळणीपेक्षा कमी तेलात)करचळणे, तव्यावर भाजणे,शेगडीत शेकणे, हुलसणे, हुलपवणे, आच देणे, धुरी देणे असे अनेक शब्द (ऐकले)आहेत.

बॅटमॅन Thu, 23/04/2015 - 01:32

In reply to by टिन

माफ करा पण सवतीशी संबंधित वाटतोय. झालंच तर चवताळण्याचा आसामी उच्चारही वाटतोय. शिवाय हा कधीही ऐकलेला नाही तेही एक आहेच.

टिन Thu, 23/04/2015 - 01:56

In reply to by बॅटमॅन

मीही हा शब्द मायबोलीवर पहिल्यांदा वाचला. सीकेपी स्पेशल आहे (म्हणे). पण इथे एकदम फिट्ट वाटला. इथे बघ

बॅटमॅन Thu, 23/04/2015 - 01:59

In reply to by टिन

नाऊ दॅट आय थिंक अबौट इट, saute या शब्दाच्या उच्चाराचेच बेमालूम मराठीकरण नसेल कशावरून असा प्रश्न सतावतो आहे.

'न'वी बाजू Sat, 25/04/2015 - 17:38

In reply to by बॅटमॅन

माफ करा पण सवतीशी संबंधित वाटतोय

.

बोले तो, नवरा???

नाहीतर मग, सवतीशी संबंध आणखी कोणा(कोणा)चा असणार? (किमानपक्षी, नसावा अशी आशा, नाही का?)

मेघना भुस्कुटे Thu, 23/04/2015 - 12:16

candid photograph ला काय म्हणता येईल? 'candid'चं काय करता येईल ते सुचतच नाहीय. सगळे इंग्रजीच प्रतिशब्द आठवताहेत. नॅचरल, कॅज्युअल... 'उत्स्फूर्त' चालेल काय?

बॅटमॅन Thu, 23/04/2015 - 12:23

In reply to by मेघना भुस्कुटे

उत्स्फूर्त साठी स्पाँटॅनिअस हा शब्द जास्त योग्य आहे. कँडिड या शब्दाची अर्थच्छटा वेगळी आहे- स्पष्टपणे एखाद्या बाबीचा उलगडा करणे इ.इ.

===================

ऑन सेकंड थॉट, यादृच्छिक कसं वाटतंय? त्याला रँडमनेसची छटा आहे हे मान्य करूनही दुसरा शब्द आठवेना. हां अर्थात पुरेसा ओवळा नाही हा एक आक्षेप असू शकतो.

मेघना भुस्कुटे Thu, 23/04/2015 - 12:33

In reply to by बॅटमॅन

इथे मान्य. पण एकुणात ही 'उलट'तपासणी (मराठी शब्दाला इंग्रजी शब्द मिळाल्यास नि तो वेगळा असल्यास नापाशी) मला तितकी अचूक वाटत नाही. कारण त्या त्या शब्दाच्या दोन्ही भाषांमधल्या एका छटेत साम्य असलं, तरी इतर छटा निराळा भाव व्यक्त करणार्‍या असू शकतात. उदाहरण आठवलं की लिहीन.

'यादृच्छिक'? मला त्याचा अर्थच ठाऊक नाही. रँडम, ना? अहं. रँडममधे एक निष्काळजी छटा आहे. सोवळे-ओवळेपणाचं एक आहेच!

बॅटमॅन Thu, 23/04/2015 - 12:39

In reply to by मेघना भुस्कुटे

अवश्य लिहा.

बाकी यादृच्छिक म्हणजे नॉट एग्झॅक्टलि रँडम- मोर लाईक निसर्गतः, आपोआप घडणार्‍या गोष्टी.

बाकी अलीकडे असे वाटतेय की भारंभार इंग्लिश शब्द आहे तसे मराठीत कोंबून घ्यावेत. त्याने काही फार नुकसान होणार नाही. यादवोत्तरकालीन मराठीतला अरबीफारसी शब्दांचा भरणा पाहता, ते शब्द आणि त्या व्याकरणच्छटा जशा पचवल्या तसेच इंग्लिशचेही होईल- नव्हे, होणारच आहे. फक्त हे पचवून मराठीचं वेगळेपणही उठून दिसलं पाहिजे इतकंच.

ऋषिकेश Thu, 23/04/2015 - 12:54

In reply to by मेघना भुस्कुटे

जमून आलेले / जमून गेलेले (छाया)चित्र
अर्थात हे फक्त कँडिड कलाकृतीपुरते.

---
अन्यथा कँडिड म्हणजे सुस्पष्टता, थेटपणा ना?

अजो१२३ Thu, 23/04/2015 - 14:33

In reply to by ऋषिकेश

अन्यथा कँडिड म्हणजे सुस्पष्टता, थेटपणा ना?

कँडीड मंजे थेटपणा पण तो ऐसीय थेटपणा नव्हे. मनात कोणते किल्मिष नसताना सहजपणे सगळे सत्य समोरच्यास कमित कमी दु:ख होइल, विचित्र वाटेल असे सांगणे.
--------------------------------------
उदा. प्राजंळपणे सांगतो, अजो तुम्हाला तुमच्या प्रतिसादांची धार* कमी करणे आवश्यक आहे.
------------------
(*संख्या आणि तीव्रता दोन्हीपैकी कोणताही अर्थ)

गवि Thu, 23/04/2015 - 13:25

In reply to by मेघना भुस्कुटे

candid photograph ला काय म्हणता येईल?

खूप जुने, नीट मेंटेन न केलेले फोटो बुरसटतात. तस्मात बुरशी लागलेला फोटो असं ढोबळपणे म्हणता येईल.

रोचना Thu, 23/04/2015 - 13:58

In reply to by मेघना भुस्कुटे

मला उत्स्फूर्त चांगला वाटतो, कारण फोटोच्या संदर्भात कँडिडचा अर्थ स्पाँटेनियसच्या जवळ जाणाराच आहे. staged photograph versus candid photograph: काही पूर्वतयारी न करता घेतलेला फोटो.

ऋषिकेश Thu, 23/04/2015 - 14:08

In reply to by मेघना भुस्कुटे

जुळवून आणलेला विरुद्ध जमून गेलेला (Staged vs. candid)
उत्फुर्तता हा फोटोग्राफरचा गुण झाला - फोटोचा नाही.
त्याच्या उत्फुर्तपणामुळे जमून आलेला फोटो - Candid phtograph with his spontanious click