Skip to main content

अशक्य हेडलाइन्स - १

वर्तमानपत्रात आलेल्या ज्या हेडलाइन्स वाचून हसू येते त्यांना इथे संकलित करु शकता. एखाद्या बातमीत वर्णन केलेली विनोदी घटना देखील शेअर करू शकता.

टीप: पॉलिटिकल हेडलाइन्स शक्यतो टाळाव्यात. हलका-फुलका धागा आहे.

अनु राव Wed, 13/04/2016 - 17:54

एखादे उदाहरण द्या की प्रणव सेठ. मला एकतर फ्रष्ट्रेशन तरी येते किंवा हसु येते. फ्रष्ट्रेशनयुक्त हसु कधी येते?

ग्रेटथिंकर Wed, 13/04/2016 - 18:45

एकदा नवाकाळ मध्ये हेडलाइन होती" कालच्या जोरदार वादळात तीनशे वक्ष उन्मळून पडले" .स्पेलींग मिश्टेकमुळे होत्याचा नव्हता अर्थ निघाला.

धर्मराजमुटके Wed, 13/04/2016 - 19:42

In reply to by ग्रेटथिंकर

ह्यात अशक्य हेडलाईन ती काय ?
अहो जिथे जोरदार वादळात वृक्ष उन्मळून पडू शकतात तिथे तीनशे वक्ष उन्मळून पडणे अशक्य खचितच नसावे.
तुम्ही खाडीलकरांच्या अलंकारीक भाषेला नीट जाणलेले दिसत नाही. "कालच्या जोरदार वादळात दिडशे माणसे पडली" असे त्यांना म्हणायचे होते.

काय म्हणता ?

-प्रणव- Wed, 13/04/2016 - 19:57

In reply to by आदूबाळ

डिटेल्स तर अजूनच भारी आहेत!

रविवारी सायंकाळी जमातीतील ५५ कुटुंबीयांनी कापूस संशोधन केंदासमोर एकत्र येऊन आपल्या घरातील टीव्ही फोडून टाकले

कापूस संशोधन केंद्रच का बरं निवडलं :)

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 14/04/2016 - 01:17

In reply to by -प्रणव-

कापसावर टीव्ही आपटला तर फुटतो का, याबद्दल टीव्ही आणि/किंवा कापूस कंपन्यांना संशोधन करायचं असेल. (कापूस कंपन्या? बरं, बरं!)

अरविंद कोल्हटकर Thu, 14/04/2016 - 01:51

सातारा गावात आमच्या शाळेच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर भिंतभर रंगवलेली एक जाहिरात होती, ती वाचून आम्ही येताजाता हसत असू.

'पर्गोलॅक्स - गोड जुलाबाच्या गोळ्या.'

एका रसवंतीगृहावरची - उसाचा रस - पाटी.

'देशबंधूंनो विचार करा - चहापेक्षा रस बरा!'

अनुप ढेरे Thu, 14/04/2016 - 09:33

In reply to by अरविंद कोल्हटकर

'उषाचा रस' असं लिहिलेल्या पाटीचा फटू व्हाट्सापावर फिरत होता काही महिन्यांपूर्वी.