तुमची सगळ्यात नावडती गाणी कोणती ?
Clearing the throat - हिंदी चित्रपटांनी एक गाण्यांची झकास परंपरा व ठेवा दिलेला आहे. मराठी चित्रपटांनी सुद्धा. सर्वात पहिले हिंदी पार्श्वगायक म्हणून कुंदनलाल सैगल यांचे नाव घेतले जाते. खरंखोटं विश्वेश्वरच जाणे. पण त्यानंतर अनेक लोक आले आणि त्यांनी मस्त मस्त गाणी दिली. यात लता, आशा, रफी, किशोर, मन्ना डे, मुकेश, तलत, सुधा मल्होत्रा, कमल बारोट, मिनु, शैलेंद्र सिंग, महेंद्रकपूर, सुमन कल्याणपूर वगैरे मंडळी होती. नंतर साधना सरगम, कविता कृष्णमूर्ती, आलिशा चिनॉय, सुनिधी वगैरे मंडळी आली. समांतर पणे गझला कव्वाल्यांचा जमाना चालू होताच. संगीताच्या या यशा मागे संगीतकार पण होतेच. अनिल बिस्वास, सज्जाद, खेमचंद, वगैरेंपासून (किंवा त्याहीआधी पंकज मलिक असावेत) आज रहमान, शंकर महादेवन वगैरेंपर्यंत गाडी येऊन ठेपलेली आहे. अधे मधे शिवकुमार शर्मा वगैरेंनी सुद्धा संगीत दिग्दर्शनाचे प्रयोग केले होते.
.
पण मूळ विषय नावडत्या गाण्यांचा आहे. आजतागायत हिंदी व मराठी चित्रपटांनी व गायकांनी व संगीतकारांनी आपल्याला अक्षरशः लक्षावधी गाणी दिलेली आहेत. सगळ्यांना सगळीच ऐकायला मिळतातच असे नाही. वेळ नसतो, तेवढी आवड नसते, शोधायचा प्रयत्न करूनही सापडत नाहीत वगैरे कारणांमुळे. पण काही गाणी अशी असतात की जी अजिबात म्हंजे अजिबात आवडत नाहीत. म्हंजे गाणं लागलं रे लागलं की टेप, रेडिओ, ट्रांझिस्टर, युट्युब बंद करायची इच्छा अनावर होते. काही गाणी अगदीच डोक्यात जातात. गायकाला/गायिकेला शिव्या द्याव्याश्या वाटतात. अर्थातच अनेकदा यामागे संगीतकाराची चूक असू शकते पण तरीही गायक्/गायिकेस दोष दिला जाऊ शकतो. माझ्या मातोश्रींना हिंदी व मराठी गाण्यांची अतिशय आवड होती. तसेच सुगम संगीत, नाट्यगीते वगैरे. पण काही गाणी अजिबात आवडायची नाहीत. उदा. "जिवलगा राहिले रे दूर घर माझे". हे गाणं लागलं की मातोश्री तावातावाने उठायच्या आणि रेडिओ बंद करून टाकायच्या. आमचे एक मामाश्री सुद्धा संगीताचे शौकीन. पण ते "गाडीवान दादा" हे गाणं लागलं की - "अरे, कोण आहे रे तिकडे, ते आधी बंद कर" असं फर्मान सोडायचे. व हे मामाश्री ज्येष्ठतम असल्यामुळे त्या फर्मानावर ताबडतोब "अमल" केला जायचा. तुझे आहे तुजपाशी मधले काकाजी देवासकर आठवा. त्यांचे ही असेच. "वाश्या, ती रेडिओ वरची ठुमरी बेसूर होऊन राहिलिये. रेडिओ बंद कर आधी" असं फर्मान सोडलं आणि वाश्याने त्याबरहुकूम.....
.
अनेकदा एखादं गाणं का आवडत नाही याचं खरंतर काही विशिष्ट कारण नसतं. तुम्हाला ते निव्वळ भिक्कार वाटतं. एखाद्याला एखादा गायक/गायिका आवडत असेल पण त्याची काही गाणी आवडत नाहीत. माझ्या एका रूम पार्टनर ला मदनमोहन आवडायचे पण त्यांची लैला मजनू चित्रपटातली गाणी अजिबात आवडली नव्हती. एखाद्याला एखादा संगीतकार/गायिका/गायक फार आवडत नसतो पण त्याचं एखादं गाणंच आवडतं. एखाद्याचं उलटं असतं. संगीतकाराचं/गायकाचं एक गाणं सोडून बाकी सगळी आवडतात. मला तलत चं "अश्कोंने जो पाया है" अजिबात आवडत नाही. पण बाकीचा तलत अतिप्रिय. माझ्या ओळखीच्या दोन मुलींना लता मंगेशकर फारशी आवडत नाही. पण त्यातल्या एकीला "ओ सजना बरखा बहार आयी" फार आवडतं. काहींना एखादा संगीतकार अजिबात आवडत नाही. माझ्या एका मित्राला आरडी बर्मन अजिबात आवडायचा नाही. पण त्याला जगजित, रफी, किशोर आवडायचे. त्याला आरडी चं पहिलं गाणं "घर आजा घिर आयी बदरा सावरिया" आधी ऐकवलं. म्हंटलं आवडलं का ? म्हणाला हो आवडलं. नंतर सांगितलं - संगीतकार आरडी. म्हंटला वा.
.
पूर्वी बिनाका, आपकी पसंद, हमेशा जवां गीत, चित्रहार, छायागीत, रंगोली, पुराने फिल्मोंका संगीत (सिलोन), जयमाला, आपली आवड, भूले बिसरे गीत, बेला के फूल असे डझनभर कार्यक्रम व्हायचे. आकाशवाणी, विविधभारती(हा आकाशवाणीचा च भाग होता), सिलोन, व दूरदर्शन हे मुख्य कंटेंट सर्व्हर्स होते. बाकीचे असतीलही. या सगळ्या कार्यक्रमांत काही गाणी अगदी "दत्तक" घेतल्यासारखी लावली जायची. "जो वादा किया वो निभाना पडेगा", "दूर रहकर न करो बात करीब आ जाओ", "दिल का खिलौना हाए टूट गया", "गाता रहे मेरा दिल", "रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना", "तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा नही", "जरा सामने तो आओ छलिये", "मन डोले मेरा तन डोले", "होटो मे ऐसी बात मै दबा के चली आयी", "मिलो न तुम तो हम घबराए" ही व अशी अनेक गाणी अक्षरश: वीट येईपर्यंत ऐकलेली आहेत. गाणी गोड आहेत ओ ... पण कितीवेळा ऐकायची ती ? दर आठवड्यातून एकदा ? मग त्यातली मजा निघून जाणार नैका ?
.
.
तर माझी नावडती गाणी -
१) तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक है तुमको - गाणं गोड आहे. सुधा मल्होत्रांनी मस्त गायलंय. मुकेशने सुद्धा. पण माझा राग साहिर वर आहे. ती प्रेम व्यक्त करत्ये ... आणि हा तिला लेक्चर झाडतोय. काय डोक्याला त्रास आहे यार.
२) प्रीतीचं झुळझूळ पाणी - अगदी भिकार, तिडीक यावी असं गाणं
३) नही नही कोई तुमसा हसीन (स्वर्ग नरक) - हे निपोंचं एकदम आवडतं. पण मला अजिबात आवडत नाही. अर्थात तसं मी निपोंना कधीही सांगितलं नाही हा भाग वेगळा.
४) गाता रहे मेरा दिल - वीट आला त्याचा
५) जरा सामने तो आओ छलिये - का कोण जाणे पण मला हे गाणं सहन होत नाही.
६) दिल का खिलौना हाए टूट गया - वीट आला
७) बिंदिया चमकेगी - भंकस गाणं आहे
८) ढल गया दिन ढल गई शाम ... जाने दो जाना है - अगदी भिकार गाणं.
९) मिलो न तुम तो हम घबराए
--
तुमची सर्वात नावडती गाणी कोणती ? - हिंदी वा मराठी
--
.
.
.
.
हे गाणं न आवडण्यामागे एक
हे गाणं न आवडण्यामागे एक वैयक्तिक कारण आहे.
माझ्या कॉलेजमध्ये एक मुलगी दर वर्षी कॉलेजातील स्पर्धेत (ते ही सेमी फायनललाच) हेच गाणं गायची. तिची आणि इलेक्ट्रॉनिक्समधल्या तिच्याच गाण्याच्या क्लास मधील दुसरी मुलगी नेहमी सेमी फायनलला हेच्च गाणे गायच्या आणि फायनलला आलटून पालटून जायच्या. त्यांचं काय ऑब्सेशन होतं त्यांनाच माहित (त्या दोघींना कोयलिया सिसटर्स म्हटले जायचे ;) ). पण दरवर्षी त्या स्पर्धांमध्ये ते गाणं ऐकून या गाण्याचा नॉशिया बसला आहे.
===
असेच पुरुषांच्या आवाजातले दर काँपिटिशनला ऐकू येणरे - आणि म्हणूनच नॉशिया बसलेले गाणे म्हणजे "ए अजनबी, तु भी कभी..." वात आणला होता या गाण्याने! जो उठायचा तो हे गाणे गायचा! कानांवर रेप!
अजून काही गाणी
१) शहर की लडकी
२) हाय हुपु (की हुकु?) हाय हुपु हाय हाय, ये लडकी मेरे सामने मेरा दिल लिये जाय जाय
३) जहर हैक्के प्यार है तेरा चुम्मा
४) फूलों सा चेहेरा तेरा कलियों सी मुस्कान है (यात व्यंकटेशची मिशी आणि करिश्मा कपूरच्या भुवया एकाच मापाच्या आहेत)
५) शादी तुझ ही से हो मेरी चही शादी के दिन मर जाऊं
६) कहां राजा भोज कहां गंगू तेली
७) ये काली काली आखें (हे गाणं एवढा वेळ झाला कोणाच्या डोक्यात कसं आलं नाही, कळत नाही)
८) इलू इलू (किंबहुना सौदागर सिनेमातली सगळीच गाणी)
'कभी अलविदा ना कहना' हे गाणं
'कभी अलविदा ना कहना' हे गाणं असंच डॉक्यात जातं. कोणत्याही कार्यक्रमात आपल्या जोडीदाराला उद्देशून काही गा असं फर्मावल्यावर, लोक उठून हे गाणं सुरू करत आणि अगदी नको नको होई. का बा तुझं हे गीत याद रख्खायचं कुणी, ऐसी क्या खास बात है तुम्हारे गीत में, असा चिडकट प्रश्न डोक्यात तत्काळ येईल, असं ते लाचार गाणं.
डोक्यात जाऊन बाहेर आलेलं
डोक्यात जाऊन बाहेर आलेलं गाणं
"आ लौट के आजा मेरे मीत, तुझे मेरे गीत, बुलाते हय"
सुतकी चालीमुळे डोक्यात जायचं.
एक सिनियर होता. त्याने रीतसर ऑडिशन वगैरे देऊन ग्यादरिंगमध्ये हे गाणं गाण्यासाठी शिरकाव करून घेतला. त्या वर्षी ग्यादरिंग अभूतपूर्व सडाऊ झालं. आता त्यात रंग भरणे ही त्याला स्वतःची जबाबदारी वाटली किंवा तो आधीच ठरवून आला होता की काय नकळे, पण त्याने या गाण्याच्या यमकाच्या जागी "टोंय" हा शब्द घालून (आणि सजेस्टिव्ह हावभाव करत) संपूर्ण गाणं म्हटलं.
"आ लौट के आजा मेरे टोंय, तुझे मेरे टोंय, बुलाते है. मेरा सुना पडा है टोंयटोंय, तुझे मेरे टोंय..." वगैरे.
आत्तापर्यंत उल्लेखिलेली,
आत्तापर्यंत उल्लेखिलेली, माझ्या यादीतही बसणारी नावडती गाणी:
तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक है तुमको - यात मुकेश मध्येच "जिंदगी सिर्फ मोहब्बत नहीं" करत करत "कुछ और भी" ला स्वरावरून घसरतो, त्या क्षणाच्या भयापेक्षेत हे गाणं ऐकवत नाही.
लताचं "आपकी नजरोंने समझा प्यार के काबिल मुझे" डोक्यात जातं.
तलत चं "ऐ मेरे दिल कहीं और चल" - "ऐ मेरे सुर कहीं और चल" असायला हवं होतं.
जरा सामने तो आओ छलिये - [का कोण जाणे पण मला हे गाणं सहन होत नाही - गब्बर]. हो, मलाही.
मिलो न तुम तो हम घबराए - याचं कारण प्रिया राजवंश आणि राजकुमार!
शब्बीरकुमारचं :"तेरी मेहरबानियाँ तेरी कदरदानियाँ" (यातच जॅकी श्रॉफ आणि तो काळा कुत्रा आहेत, ना?)
'शीशा हो या दिल हो ...' कुठेतरी लताबाईंच्या आवाजात एक कर्कश्श, अभी-तो-मैं-जवान-हूं चा अट्टाहास जाणवू लागला. बहुतेक याच काळात, अशा गाण्यातून. या नंतर काही अपवाद वगळता त्यांची गाणी आवडत नाहीत. खासकरून "एक दूजे के लिये" तली "किंचाळगाणी" (काय जबरदस्त शब्द आहे हा!). "मेरे नसीब में", "चल सन्यासी मंदिर में", सगळीच.
गाइड मधलं "गाता रहे मेरा दिल" ठीक आहे, पण मला "आज फिर जीने की तमन्ना" तेवढं आवडत नाही.
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या - अगदी अगदी!!! मला "मालवून टाक दीप" खूप आवडतं, पण मधे "दूर दूर तारकात" आवाज जाऊ लागला की धडकीच भरते; "तरुण आहे रात्र अजुनी" मधे आशाबाईंचा "बघ तुला पुसतो...............च आहे" बद्दलही तसेच. "रुके रुके से कदम" तार सप्तकात गेलं की खरंच "बेकरार" व्हायला होतं
आशाबाईंचा नया दौर मधल्या काही गाण्यांमधला गोग्गोड चढा स्वर - "मांग के साथ तुम्हारा", उफ्फ!
फारएण्ड, मला रफीच्या त्या सगळ्या गाण्यांची चिडचिड होते - सध्या धाकट्या मुलाला ईवनिंग इन पॅरिस च्या गाण्यांचं वेड लागलंय, आणि आसमान से आया फरिश्ता बरोबर "दीवानेका नाम तो पूछो" अंगाईगीत म्हणून म्हणावे लागत आहे. खूप त्रास होतो. पण मला शम्मीपेक्षा जॉय मुखर्जीवर चित्रित गाण्यांची जास्त चिडचिड होते.
निंदिया से जागी बहार - येस्स! "नूरी! नूरी!!" याच सदरातलं.
नितिन मुकेश, सधना सरगम वगैरे नव्वदोत्तर भानगडीत मी पडतच नाहीये.
सेम विथ महेंद्र कपूर आणि "ओ ओ ओ ओ ओ ओ ओ " देशभक्तीपर ओरडणे....
अच्छा सिल्ला दिया आणि इतर
अच्छा सिल्ला दिया तूने मेरे प्यार का यार नेही लूट लिया घर यार का..
बिचारा किशनकुमार ! आणि सोनू निगम नवा होता तेव्हा त्याच्यावरचा रफीचा प्रभाव गेला नव्हता.
वीट येऊन शेवटी हे गाणं टाळ डोक्यात मृदुंगांच्या आवाजात भजनी ठेक्यावर म्हणायचा विकृत आनंद होऊ लागला. म्हणजे -
अरे अच्छा सिला दियाहा तुने धिन्ना-धिं-धि-ना तिंन्ना-तिंतिना
यार नेही लूट लिया धिं-तां-क धिं-तां-क धिंतिं - धिन्ना धिं धिं ना तिंन्ना तिंतिना....
--
दिले चीर के देख तेरा ही नाम होगा
--
आशिक़ी चित्रपटातल्या गाण्यांत समीरचे सगळे शब्द डोक्यात जातात. नुसत्या 'जान' शब्दावरच किती गाणी पाडलीत या समीरबाबाने कुणास ठाऊक!
जाने जिगर जानेमन....गाण्यात पुन्हा पुढे जानम जानेजाँ जानम जाने जहाँ.... वगैरे
नि नदीम श्रवणने व्हायलीन्स घासून घासून खळवटून काढलीत.
उदा. जाने जिगर जानेमन - तुधुधु धुत्तुदू
मुझको हैं तेरी क़सम... यापुढे गाणे संपतानाचे व्हायलीन्स ४:४५ पासून पुढे ऐका.
https://www.youtube.com/watch?v=2MIr6GuycTI .
जानम - की गेलीच व्हायलीन्स वर तीव्र स्वरात - जानेजाँ - व्हायलीन्स आनखी वर, जानम - अरे ! पुन्हा तीच व्हायलीन्स् ...जाने जहाँ...तेच तेच तेचतेच.. शेवटी वर गेलेली व्हायलीन्स सगळी पंचर झाल्याप्रमाणे खाली येतात तेव्हा गाणे संपते.
--------
सूर तेच छेडिता गीत उमटले नवे
आज लाभले सखी सौख्य जे मला हवे
इतरही वाईटच पण त्या जे मुळे गाणे थेट समाप्त.
----
ओ.पी. नय्यर यांच्या अनेक गाण्यांत, ज्यात गाण्याच्या पहिल्या ओळी उडत्या चालीत वा पाश्चात्य सुरावटींशी साधर्म्य दाखवणार्या पण कडवे सुरू करताना त्या पाश्चात्य सुरावटींतून एखादी ढोलकी आणून गाणं हिन्दुस्थानी असल्याचा साक्षात्कार करून दिला जाई, ती ढोलकी नि ते चालीचे भारतीयीकरण अत्यंत नावडते.
उदा. बाबुजी धीरे चलना, प्यार में ज़रा सँभलना
-----
ऐका सत्यनारायणाची कथा - एका प्रदीर्घ प्रवासात भल्तेच धार्मिक असलेले डायवर रिपीट मोडवर लावून होते.
-----
ग्रॅन्डफिनाले:
गणपतीत ऑर्चेस्ट्रात कायम बडवलं जाणारं -
ले गयीइइ दिल्मेराआ मन्चलीइइ
खलीवल्लीखलीवल्लीखलीवल्ली
नो प्रॉब्लम!!
ओ.पी. नय्यर यांच्या अनेक
ओ.पी. नय्यर यांच्या अनेक गाण्यांत, ज्यात गाण्याच्या पहिल्या ओळी उडत्या चालीत वा पाश्चात्य सुरावटींशी साधर्म्य दाखवणार्या पण कडवे सुरू करताना त्या पाश्चात्य सुरावटींतून एखादी ढोलकी आणून गाणं हिन्दुस्थानी असल्याचा साक्षात्कार करून दिला जाई, ती ढोलकी नि ते चालीचे भारतीयीकरण अत्यंत नावडते.
उदा. बाबुजी धीरे चलना, प्यार में ज़रा सँभलना
ओपी खूप जुने झाले. जतिन-ललितनी फना सिनेमात ते 'चंदा चमके' की कायशाश्या गाण्यात सुरुवातीलाच ढोलकी आणि इलेक्ट्रिक गिटारचा आवाज असा काही एकत्र केलाय की मस्तकात तिडीक जाते. हे म्हणजे बासुंदीत लोणचं घालून पिण्यातला प्रकार आहे. आणि त्यात शेवटी कोरसमध्ये 'वल्ले वल्ले'?? हे म्हणजे बासुंदी अधिक लोणचं अधिक थोडं चिंचगुळाचं वरण असं काँबिनेशन आहे. वाद्यमेळाच्या दृष्टीने इतकं वाईट गाणं मी आजतागायत ऐकलेलं नाही. अर्थात प्रत्येक गाण्यात पंजाबी ढंगाची ढोलकी वापरली नाही तर बहुतेक जतिन-ललितना त्यांच्या बायका जेवू घालत नसाव्यात.
जल्ला तुमाला आवाडता काय!
इतकी चांगली, प्रसिद्ध , सुंदरसुंदर गाणी तुम्हाला आवडत नाहीत तर जल्ला तुम्हाला आवाडता काय?
हे म्हणजे सामान्यांना आवडणारी गाणी '- तुम तो ठहरे परदेसी, चिक मोत्यांची माळ(चिक म्हणजे लहान का?), मालवून टाक दीप आशा, लता, रफी, बेताबची गाणी , पोपटाची गाणी, शांताबाई असं काही - काही तुम्हाला आवडत नाही म्हणता !
हुच्चभ्रू कुठले!
मग तुम्हाला आशिकी-१/२, मैने प्यार किया, हम आपके है कोन, चांदनी मधली गाणी अज्जिबातच आवडत नसणार.
सहगल, मल्लिक, के सी दे वगैरे अवांतर
मला फक्त आठ-दहा प्राचीन हिंदी सिनेमागाणी माहीत आहेत. पण ती सर्व आवडतात. म्हणजे आवडली म्हणून माहितीत राहिली. चले पवन की चाल, पनघट पे कन्हय्या आता है, बाबुल मोरा, इक बंगला बने न्यारा, प्रीतम आन मिलो, अंबुवा की डारी डारी चली पवन मतवाली. (यात दर दर दर दरदा अश्या अर्थहीन शब्दांचा हिंदी सिनेमागाण्यात प्रथम वापर केलेला आहे) वगैरे. पण हा धागा नावडत्या गाण्यांविषयी आहे ना!
होय
तुम्हाला आशिकी-१/२, मैने प्यार किया, हम आपके है कोन, चांदनी मधली गाणी अज्जिबातच आवडत नसणार. >>> बहुतांश नाहीच आवडत. एकतर एस पी बालसुब्रह्मण्यम डोक्यात जातो. असेल तो साउथ चा दिग्गज पण त्याची हिन्दी गाणी बोअर आहेत. चाँदनी मधला विनोद राठोड तर विचारूच नका. किशोर च्या आवाजातील चांगले भाग वगळून उरलेला आवाज कॉपी केल्या सारखा गातो तो टायटल साँग मधे. लगी आज सावन की पूर्वी आवडत असे. आता ते ही बोअर होते.
के एल सैगल आवडतो किंवा आवडत नाही या दोन्हीच्या पलीकडे काहीतरी आहे. म्हणजे एकदम जुने आपल्याला न झेपणारे काहीतरी :)
मेघना "रोज रोज आंखो तले" मधील
मेघना "रोज रोज आंखो तले" मधील मंदाकिनीला घोडतोंडी नटी म्हणतेय मग ती श्वेता शेट्टीला जी खरच ..... असो!
https://www.youtube.com/watch?v=oiq_KkEshSg
मै देखनी की चीज हूं।
श्वेता शेट्टी आणि इला अरुणला नावं ठेवायचं काम नाही. लता-आशा आणि अशा सगळ्या गोग्गोड आवाजांच्या उंच पट्टी बायांपासून सुटका करून द्यायला सुरुवात करून देणाऱ्यांत ह्या दोघी होत्या हे विसरता येत नाही. शिवाय 'दीवाने तो दीवाने है' ह्या गाण्यांत बाईने माज केलेला दाखवलेला आहे. गाण्याच्या सांगितीक मूल्यापेक्षा लैंगिकता मिरवणारी बाई दाखवण्यामुळे मला हे गाणं आवडतं. सिनेमात जिथे सबमिसीव्ह बायका कशा थोर असं दाखवण्याची परंपरा अजूनही बऱ्यापैकी पाळली जाते तिथे म्युझिक व्हीडीओ हा स्वस्त मार्ग वापरून बायकाही जाड्याभरड्या आवाजांच्या असतात, डँबिस असतात, लैंगिकता ही घाबरण्याची गोष्ट समजण्यापेक्षा स्वतःच्या हातात ताबा घेण्याची गोष्ट आहे आणि पुरुषांचंही भरपूर वस्तूकरण हे सगळं दाखवणारे व्हीडीओज मला आवडतात; गेल्या काही वर्षांत आणखी जास्त आवडायला लागले आहेत. श्वेता शेट्टीचं दुसरं गाणं 'मै देखनी की चीज हूं' हे गाणंही त्याच लायनीतलं.
बाकी त्या काळातली 'परी हूं मै', किंवा वरवर टॉमबॉय दिसणारी फाल्गुनी पाठक, मिलिंद सोमण नावाची चीज दाखवूनही आलिशा चिनॉय वगैरे सगळ्या बौर्य!
असंच एक दुसरं गाणं - तू चीज बडी है मस्त मस्त.
श्वेता शेट्टीचं दुसरं गाणं 'मै देखनी की चीज हूं' हे गाणंही त्याच लायनीतलं
चीज म्हंजे वस्तू. यात स्त्रीने स्वतःचे वस्तूकरण केलेले आहे.
हे गाणं तुम्हाला आवडतं ?? काय ओ अदिती बाई ? फेमिनिझम चा रस्ता सोडलात काय ?
असंच एक दुसरं गाणं - तू चीज बडी है मस्त मस्त. - यात सुद्धा तो तिला "तू चीज बडी है मस्त मस्त" म्हणतो आणि ती म्हैस आनंदाने नाचत्ये. २२ वर्षं झाली या गाण्याला. विश्वास ही नही होता. डोक्यात जाणारं गाणं आहे हे वे सां न ल.
मिर्ची लागली का?
चीज म्हंजे वस्तू. यात स्त्रीने स्वतःचे वस्तूकरण केलेले आहे.
तर मग? तुझ को मिर्ची लगी तो मै क्या करू? :प
थोडक्यात, मुक्त बाईने स्वतःला चीज, चीजी, बूर्ज्वा, उन्मुक्त, बुद्धीमती किंवा काहीही म्हणावं/म्हणवून घ्यावं हा तिचा प्रश्न आहे. इतरांनी तिला तिच्या परवानगीशिवाय नावं ठेवू नयेत. एखाद्या स्त्रीला इतरांनी चीज म्हणणं हे नावं ठेवणं आहे का गौरवीकरण आहे हे त्या बाईवर अवलंबून आहे. पण जेव्हा बायकांचा उल्लेख फक्त बिनडोक चीज किंवा सबमिसिव्ह वस्तू असाच होतो तेव्हा तो ट्रेंड - एकेक, सुटा प्रयोग नव्हे - आक्षेपार्ह ठरतो. असा ट्रेंड चालू आहे, भरपूर खपतो आहे हे दिसत असतानाही 'दीवाने तो दीवाने है' म्हणणारी, पुरुषांचं भरपूर वस्तुकरण करून वर त्यांनाच उल्लू बनवणारी श्वेता शेट्टी मला आवडते.
सर्दट ,शेंबुडल्या उषा मंगेशकर..............
दोनशेच्यावर प्रतिक्रिया येऊनही कुणी सर्दट ,शेंबुडल्या उषा मंगेशकर चा उल्लेखही केला नाही त्यामुळे अपार खिन्नता आली आहे."मै तो आरती उतारू रे संतोषी माता की" हे गाण एके काळी जळी,स्थळी ,काष्ठी पाषाणी ऐकू यायचे या डिप्रेसिंग गाण्याने आत्महत्येचे विचार मनात उसळू लागायचे.उषा मंगेशकरचे शेंबुडले स्वरयंत्र निकामी कसे करता येईल हा एकच विचार मेंदू कुरतडत असे.हेलनला पापक्षालनासाठी मुंगळा गाण्यावर नृत्य करावे लागले. असतं एकेकाचं नशीब ! सुलताssssना अशी किंकाळी फोडून उषाबाई जेंव्हा सुलताना सुलताना मेरा नाम है सुलताना , मेरे हुस्नी का अंदाज है "नसताना " (मस्ताना) असे गायला लागल्या की मिथुन तिथून नाहीसा व्हायचा !
मजेशीर विषय आणि अतिशय मनोरंजक चर्चा ! गब्बरसिंगचे आभार .
बजेट बॉलीवूड
सुलताssssना अशी किंकाळी फोडून उषाबाई जेंव्हा सुलताना सुलताना मेरा नाम है सुलताना , मेरे हुस्नी का अंदाज है "नसताना " (मस्ताना) असे गायला लागल्या की मिथुन तिथून नाहीसा व्हायचा !
तराना हा बोलून-चालून बजेट बॉलीवूड पिक्चर!
मिथून (गरीबांचा जीतेन्द्र), रंजीता (गरीबांची श्रीदेवी) आणि गाणी गायला उषा (गरीबांची लता)!!
@उसंतसखू, उषा मंगेशकरांची
@उसंतसखू, उषा मंगेशकरांची काही मराठी गाणी वीट येईपर्यंत लावायचे हे सांगली आकाशवाणी वाले - "खेळ कुणाला दैवाचा कळला", "काय बाई सांगू" ही त्यातली एकदोन.
खेळ कुणाला दैवाचा कळला - लागलं की माझा खून खौलत असे.
--
सुलताना वरून आठवलं ....
निसुलताना रे प्यार का मौसम आया - हे एक डोक्यात जाणारं गाणं. पडद्यावर शशीकपूर आहे. पण ऐकताना असह्य होतं.
खेळ कुणाला दैवाचा कळला -
खेळ कुणाला दैवाचा कळला - लागलं की माझा खून खौलत असे.
नुसतं असं नाही
खेळ कुणाला दैवाचा कळला...
ट्या-ट्या-ट्या-ट्याँव
मी असो
हा असो
तो असो
कुणी असो..
दैवलेख ना कधी कुणा टळला
(पुन्हा)ट्या-ट्या-ट्या-ट्याँव
निसुलताना रे प्यार का मौसम आया
काळजीपूर्वक ऐकलं तर हे एक वेगळ्याच प्रकारचं गाणं आहे.तसा हा सिनेमा खूपच प्रायोगिक आहे.उदा.भारतभूषणच्या तोंडी किशोर कुमार (तुम बिन जाउ कहां...)या गाण्याचं बंगाली वर्जन (किशोरच्याच आवाजात ) आहे. ते अधिक सुंदर आहे...ए दिन पाखी उडे..जेबे जे आकाशे
खडूस विविधभारतीवाले या गाण्याची फर्माईश आली की मुद्दाम रफीच्या किंगर्या आवाजातलं(शशी कपूरच्या तोंडी)असलेलं व्हर्जन लावतात.
माझे उलटे होते
ऐकायला आवडते मला पण पडद्यावर सादरीकरण अगदी साफ निराशा करणारे आहे. काहीतरी कॉलेज पिकनिक मधे एकमेकांवर नाच किंवा काहीतरी दाखवून कुरघोडी करताना म्हंटल्यासारखे. एखाद्या हिमालयातील पार्श्वभूमीवर असलेले टीपिकल प्रेमगीत म्हणून सादर केले असेल असे वाटले होते. त्यात शशी कपूर चा तो सेन्टर ऑफ ग्रॅव्हिटी/मास जे काय असेल ते अंगभर फिरत असल्यासारखा नाच. आशा पारेख च्या डान्स पोजेस ही पिकनिक ला ऑड वाटतात.
निसुलताना
उलट निसुलताना रे हे गाणे मला ऐकायला फार आवडते. दोन वेगवेगळ्या टेंपोमधली आणखी दोन गाणी मला आठवतात आणि आवडतात. १)नैन द्वार से मन में वोह आये तन में आग लगाये..हाय रे कोई छलिया छल के जाये. (सावन). २) रुक्मिणीनारायण दोघे गरुडाच्या पाठी, नवरानवरीच्या बांधा पदराला गाठी.(बाळा जो जो रे.)
आणखी काही नावडती
वाट संपता संपेना
जिवाच्या सखीला किती हांक मारु, कुठे साद घालू
यातल्या कुठे साद घालू, या ओळीवर हमखास हंसायचो, आम्ही मित्र.
घनतमी शुक्र बघ राज्य करी
बैठ जा बैठ गयी खडी हो जा खडी हो गयी
झिमझिम झरती या अप्रतिम चालीवर , 'श्रावण' या जागेवरचे सुमनताईंचे खिंकाळणे. (ओरिजिनल जागा, मी स्वतः दशरथ पुजारींच्या तोंडून ऐकली आहे)
पंकज भकास, मनहर भकास, अनुप खलबत्ता यांची कुठलीही गाणी.
उषा खन्ना आणि तत्सम दुसर्या दर्जाचे,यांना संगीतकार का म्हणावे, हा लहानपणापासून पडलेला प्रश्न.
महेंद्र कपूरच्या कुठल्याही गाण्यांत, त्याचा आवाज आपल्याला चिकटायला येतो आहे, असे वाटते.
समजा एखाद्या आधुनिक स्त्रीला
In reply to समजा एखाद्या आधुनिक स्त्रीला by बॅटमॅन
मान्य.
अशी अनेक गाणी असतील ज्यात स्त्रिया सबमिसिव्ह भावनांचा अॅव्हलँच ...