Skip to main content

पोळीचा चिवडा

पोळीचा चिवडा

साहित्य-
५ पोळ्यांचा चुरा, २ चमचे तेल, एक छोटा चमचा मोहरी, एक छोटा चमचा जिरे, हळद, कढीपत्ता, मूठभर शेंगदाणे, बारीक कापलेला कांदा, बारीक कापलेला टमाटा, बारीक कापलेल्या २-३ हिरव्या मिरच्या, चवीपुरते मीठ, सजावटीसाठी कोथिंबीर.

कृती-
सर्वात प्रथम कढईत २ चमचे तेल घ्यावे. तेल तापल्यावर त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, शेंगदाणे, मिरच्या, कांदा, टमाटा घालून फोडणी द्यावी. नंतर त्यात पोळ्यांचा चुरा आणि मीठ घालून चांगले परतून घ्यावे. कढईवर झाकण ठेऊन २ मिनिटे शिजू द्यावे. पोळ्यांच्या चिवड्यात सजावटी साठी कोथिंबीर घालावी.

अशाप्रकारे तुमचा पोळ्यांचा चिवडा तयार आहे.

आवड/नावड

अभ्या.. Sat, 02/12/2017 - 15:37

ओ वॉव,
कसलं भारी,
ह्या पोळ्या कुठे मिळतात?

अभ्या.. Sat, 02/12/2017 - 22:14

In reply to by 'न'वी बाजू

मला कुणी प्रश्न न विचारणे अपेक्षित होते, येनीवे उत्तर मात्र "लक्ष्मीनारायण चिवडेवाल्यापाशी" असे मिळाले असते तरी चालले असते.

अबापट Sat, 02/12/2017 - 20:33

In reply to by अभ्या..

अभ्या , पोळ्या मी कुरियर करतो . कालच इम्पोर्ट केल्या आहेत . पण त्या आधी तू मला फोडणीची भेळ आणि फोडणीच्या गुलाबजाम ची रेसिपी पाठव ... तरच ..

'न'वी बाजू Sat, 02/12/2017 - 21:43

In reply to by अबापट

'...मैं तुम्हें आज़ादी दूँगा|' - नेताजी सुभाषचंद्र बोस.

अर्थात, तुम्ही मला तडकाश्रीखंड (अर्थात, लसणाची फोडणी घातलेले श्रीखंड) आणि मटणाची कोशिंबीरशिकरण यांची रेसिपी पाठवा, मी तुम्हाला (इकडूनतिकडून आणून) फोडणीची भेळ आणि फोडणीच्या गुलाबजामाची रेसिपी पाठवतो. हाय काय नि नाय काय.

- (आज़ादीचेरेशिप्यांचे अडतदुकान खोलून बसलेला) 'न'वी बाजू.

'न'वी बाजू Sun, 03/12/2017 - 00:32

In reply to by अभ्या..

फोडणीच्या केकचीही कल्पना तशी वाईट नाही. केकही एवीतेवी शिळाच आहे, नि तसेही 'ब्रेड मिळत नसेल तर केक खा' असे मारी आंत्वानेतबाई म्हणून गेलेलीच आहे. ('चटणीभाकर मिळत नसेल तर शिरापुरी खा' असा त्याचा (पाठ्यपुस्तकमंडळप्रणीत) मराठी तर्जुमा रूढ आहे, परंतु आपण चटणीभाकरीऐवजी पोळी चालवून घेऊ. तुमच्यासाठी काहीही. काय म्हणता?)

'न'वी बाजू Sun, 03/12/2017 - 04:00

In reply to by आदूबाळ

फोडणीसाठी (बोले तो, 'सीझनिंग'साठी) टिपिकली कुकिंग वाइन वापरली असावी, नाही? ;-)

(बोले तो, बचकभर मीठ मिसळलेली?)

रोचक कॉन्सेप्ट! (मराठी पुस्तकातूनच येऊ शकेल, अशी.)

तिरशिंगराव Sat, 02/12/2017 - 21:21

आमच्याकडे याला फोपो = फोडणीची पोळी म्हणतात, कारण ती चिवड्याएवढी कडक होत नाही.

'न'वी बाजू Sat, 02/12/2017 - 23:49

अर्थात, या निमित्ताने आमच्या (इतरत्र प्रकाशित झालेल्या) उकडलेल्या अंड्यांच्या रेशिपीचाही सर्वांनी आस्वाद घ्यावा, म्हणतो मी.

(आमची रेशिपीही प्रस्तुत चिवड्यातल्या पोळीइतकीच शिळी आहे.)

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 04/12/2017 - 02:07

In reply to by 'न'वी बाजू

इन्स्टंट काॅफीची पाकृ हवी. अंड्याशिवाय कशी करावी, याचाही पर्याय लिहा.

गौराक्का Tue, 05/12/2017 - 12:06

In reply to by 'न'वी बाजू

उकडलेल्या अंड्यांसाठी आठ मिंटाचा फॉर्म्युला वापरून पहा. मोजून आठ मिनीटं अंड पाण्यात मध्यम आचेवर उकडायचं. आतला बलक मऊ शिजतो, पिठूळ नाही होत.

चिमणराव Sun, 03/12/2017 - 05:34

या पारंपरिक*१ पदार्थातून ऐसीकरांना आडून सुचवायचे आहे का?

*१-पोर्तृगिजांचे शेंगदाणेसोडून बाकी वापरलेले पदार्थ इथलेच आहेत. गव्हाऐवजी तसाच एक सातु होता भरतवर्षात.

मनीषा Sun, 03/12/2017 - 11:41

तुप आणि गुळ घालून केलेले पोळीचे लाडु पण छान होतात.
सोळा सोमवारच्या उद्यापनाला, गाकर करून, नंतर ते बारीक कुस्करून त्या चुऱ्याचे लाडु प्रसाद म्हणुन देतात.

आणि शिळ्या पोळ्या ( ताज्या वापरल्या तरी चालतात ) वापरून आणि उपलब्ध असलेल्या म्हणजे फ्रिज मधे पडून असलेल्या भाज्या वापरून फ्रॅन्कीज पण करता येतात.

नुसती दुध, गुळ आणि (कुस्करलेली) पोळी पण छान लागते.

शिळ्या पोळीचे अनंत उपयोग ......