बारसे
खवचटखानांच्या सदस्यभरती योजना धाग्यावरील पहिल्याच प्रतिसादावरून हा धागा काढायची कल्पना आली आहे.
इथे वावरणार्यांनी स्वतःस काय म्हणवावे?
हा चर्चेचा प्रस्ताव आहे.
तिथे गविंनी अय्याकर सुचविले आहे.
मी 'अक्षराईट्स' सुचवितो आहे.
तुमच्या सूचना काय?
जय मराठी
अक्षरकर म्हटल्यावर कोणीतरी प्रौढ मनुष्य येतो डोळ्यासमोर. आमच्या लहानपणी अंतरकर म्हणून वैद्य होते, त्यांच्या नावाशी असलेल्या साधर्म्यामुळे असेल कदाचित. ते भयंकर तापट होते. कपाळावर सतत आठ्या. बोलताना कायम 'मी सांगतोय इतका कंठशोष करून, पण लोकांना ऐकायला नको' असा स्वर. सतत रागावलेले काही लोक चिडून चिडून सडपातळ होतात तसे हाडकुळे. चांगलं गुळगुळीत टक्कल, आणि मुंबईच्या उन्हाळ्यात थंड वाटावं म्हणून डोक्यावर कांदा ठेवत कायम. तर सांगायचा मुद्दा काय अक्षरकर नको.
अक्षरी ठीक वाटतं. त्याला नंबरी सारखा फील आहे. (ये दुनिया एक नंबरी, तो हम दस नंबरी वगैरे वगैरे)
ग्रामीणीकरण करून 'येश्या' किंवा 'अक्ष्या' असंदेखील काहीतरी म्हणता येईल. मग संस्थळाची ओळख म्हणून 'म्या अक्ष्या' अशा टोप्या छापून वाटता येतील.
नुसतंच 'ऐसीकर' आवडलं मला. म्हणजे त्यातून ए, आवाज नाय पायजे, ऐसी करून ठेवीन ना... वगैरे अर्थछटा येतात.
हो. मग आता काय करायचं? ती पण
हो. मग आता काय करायचं?
ती पण तिच्या नवर्या व सासर्याप्रमाणे 'कजरा रे कजरा रे' म्हणून आमच्या-तुमच्या नातवंडा पतवंडाच्या जमान्यात नाचताना दिसेल.
आणि तिला जेव्हा मुलगी/मुलगा होईल तेव्हा पुन्हा एकदा कुणीतरी ढमुकला मुलगी/मुलगा झाला असं म्हणेल.
आणि तेव्हाही काय करायचं?
अक्षराईटस मस्त आहे.
अक्षराईटस मस्त आहे.
बीजेआईटस वरून घेतलात ना? दोन्ही एकारान्ती :) बीजे आणि अक्षरे