Skip to main content

बारसे

खवचटखानांच्या सदस्यभरती योजना धाग्यावरील पहिल्याच प्रतिसादावरून हा धागा काढायची कल्पना आली आहे.

इथे वावरणार्‍यांनी स्वतःस काय म्हणवावे?
हा चर्चेचा प्रस्ताव आहे.

तिथे गविंनी अय्याकर सुचविले आहे.
मी 'अक्षराईट्स' सुचवितो आहे.

तुमच्या सूचना काय?

............सा… Wed, 16/11/2011 - 19:52

अक्षराईटस मस्त आहे.
बीजेआईटस वरून घेतलात ना? दोन्ही एकारान्ती :) बीजे आणि अक्षरे

आडकित्ता Wed, 16/11/2011 - 20:48

In reply to by राजेश घासकडवी

यक्काच झटक्यात बाकी सग्ळे आंग्ठेभाद्दर हैत हे बी सांगलं जातया ;)
साक्षर ब्येस!

स्मिता. Wed, 16/11/2011 - 20:48

In reply to by संगणकस्नेही

हे नाव सगळ्यात साजेसं आहे.
पण तरी त्याचा किस पाडायचा झालाच तर कोणी शब्दशः एक्स-मिपाकर नाहिये. सगळे आहेत अजून तिकडे ;)

1234 Wed, 16/11/2011 - 20:00

अक्षराईट,अक्षरीयन काय? मराठीत शब्द नाहीत काय?

अक्षरकर नाहीतर अक्षरी नाहीतर ऐसाक्षरी कसं छान मराठमोळं वाटतं!

अहो तो गडबडा लोळणारा एक्स मिपाकरसाठी आहे.

राजेश घासकडवी Wed, 16/11/2011 - 22:49

In reply to by 1234

अक्षरकर म्हटल्यावर कोणीतरी प्रौढ मनुष्य येतो डोळ्यासमोर. आमच्या लहानपणी अंतरकर म्हणून वैद्य होते, त्यांच्या नावाशी असलेल्या साधर्म्यामुळे असेल कदाचित. ते भयंकर तापट होते. कपाळावर सतत आठ्या. बोलताना कायम 'मी सांगतोय इतका कंठशोष करून, पण लोकांना ऐकायला नको' असा स्वर. सतत रागावलेले काही लोक चिडून चिडून सडपातळ होतात तसे हाडकुळे. चांगलं गुळगुळीत टक्कल, आणि मुंबईच्या उन्हाळ्यात थंड वाटावं म्हणून डोक्यावर कांदा ठेवत कायम. तर सांगायचा मुद्दा काय अक्षरकर नको.

अक्षरी ठीक वाटतं. त्याला नंबरी सारखा फील आहे. (ये दुनिया एक नंबरी, तो हम दस नंबरी वगैरे वगैरे)

ग्रामीणीकरण करून 'येश्या' किंवा 'अक्ष्या' असंदेखील काहीतरी म्हणता येईल. मग संस्थळाची ओळख म्हणून 'म्या अक्ष्या' अशा टोप्या छापून वाटता येतील.

नुसतंच 'ऐसीकर' आवडलं मला. म्हणजे त्यातून ए, आवाज नाय पायजे, ऐसी करून ठेवीन ना... वगैरे अर्थछटा येतात.

आडकित्ता Wed, 16/11/2011 - 23:14

प्रकाश पडेल
अन पडल्याचा आवाज येईल, त्यांणी मतदाण करावे.

हितं. आम्ही 'रसिक' आहोत.
रसिक अन रसिका :P

बघा जम्तंय का?

ता.क. : माझ्या एका छान मैत्रिणिचं नांव रसिका होतं.. रच्याकने.

यशवंत कुलकर्णी Thu, 17/11/2011 - 00:43

In reply to by आडकित्ता

ता.क. : माझ्या एका छान मैत्रिणिचं नांव रसिका होतं.. रच्याकने.

छान म्हणजे नेमकं काय ते जरा सांगा.
सुपारीच्या दोन कातऱ्या करू नका.
अवघड व्हायचं.

यशवंत कुलकर्णी Wed, 16/11/2011 - 23:14

ऐसीअक्षरे वाल्यांसाठी असं कुठलंही नाव ठरवून रुजवता येणार नाही.
सुचवलेल्या नावापैकी एकही नाव अपील करत नाही.
कदाचित पुढे चालून आपोआपच एखादे नाव रूढ होईल.... तोपर्यंत घाई नको.

आडकित्ता Thu, 17/11/2011 - 00:15

In reply to by यशवंत कुलकर्णी

बरं.
तुम्चा मते कोन्तं होनार रुड? ह्ये तर टाय्पा की राव?
अग्दी ऐसिवाले पन चालन..
पन डोक्सं चाल्वा कीं? उग्ग टाईम्प्लीज घ्येऊन्शान थिक्डं पलून जाउ नगा ;;)

यशवंत कुलकर्णी Thu, 17/11/2011 - 00:17

In reply to by आडकित्ता

अहो सायबा.. आमचं मत काही जगाविरहीत नाही..
पण सुचवलेलं एकही नाव अपील होत नाही हे आधीच सांगितलं आहे...
बाकी "ऐसी अक्षरे" आपल्याला पसंत पडेल.
आणि एखादं वेगळं नाव रूळलंच पुढं तर ते ही.

... Wed, 16/11/2011 - 23:55

काही पर्याय

१)अक्षरेप्रेमी

२]अक्षरेस्नेही

३]अक्षरेकर्मी

४]अक्षरेधर्मी

५]अक्षरयात्री

Nile Thu, 17/11/2011 - 00:02

कशाला हवीत मेली ती लेबलं अन शॉर्टफॉर्म्स? काम करा लेको, चाल्लेत बारसं करायला... बाकी बारसं झालंच तर पेढे की बरफी जे काय असेल ते द्यायला विसरू नका.

यशवंत कुलकर्णी Thu, 17/11/2011 - 01:03

In reply to by ............सा…

हो. मग आता काय करायचं?
ती पण तिच्या नवर्‍या व सासर्‍याप्रमाणे 'कजरा रे कजरा रे' म्हणून आमच्या-तुमच्या नातवंडा पतवंडाच्या जमान्यात नाचताना दिसेल.
आणि तिला जेव्हा मुलगी/मुलगा होईल तेव्हा पुन्हा एकदा कुणीतरी ढमुकला मुलगी/मुलगा झाला असं म्हणेल.
आणि तेव्हाही काय करायचं?

अनामिक Thu, 17/11/2011 - 01:49

In reply to by शिल्पा बडवे

तुम्ही प्रतिसाद दिला म्हणजे तुम्हीपण ह्यात सामील आहात.
बरं, आता सांगा बघू तुम्ही आज काय काय मोलाची कामे केलीत ते?

यशवंत कुलकर्णी Thu, 17/11/2011 - 01:55

In reply to by अनामिक

बरं, आता सांगा बघू तुम्ही आज काय काय मोलाची कामे केलीत ते?

अहो, असं काय करताय अनामिक! आत्ताच झापलं नाही सगळ्यांना वेळ वाया घालवत असल्याबद्दल.
तेच त्यांचं नेहमीचं मोलाचं काम आहे.

अनामिक Thu, 17/11/2011 - 02:35

In reply to by Nile

म्हणजे नाव श्रेणी आणि अडणाव दाते असं म्हणायचंय का रे नायल्या?
हा प्रतिसाद यावा आणि श्रेणी सुविधा असू नये ह्याला विरोधाभास म्हणावा काय?

नगरीनिरंजन Thu, 17/11/2011 - 08:07

अक्षरमेळी/अक्षरमेळकरी
ऐसीवासी
अक्षरी (नगरीला जुळतं म्हणून आवडलं.)
अक्षरेबहाद्दर (अंगठेबहाद्दर असतात तसे)
अक्षरशहा
ऐअरमेकर
बाकी नंतर...

विनायक प्रभू Thu, 17/11/2011 - 12:05

आयझॅक्स बरोबर राहील.
aisaks

मन Thu, 17/11/2011 - 13:04

हे वरच्या प्रतिसादातलं नाव आवडलं.
"वारकरी" पण म्हणवून घेता येइल. नित्य दिवशी किंवा अनियमितपणे ऐसी अक्सह्रे ची वारी करणारे ग्यानबाचे वारकरी.
"अक्षरकारी"(साक्षात्कारी च्या लायनीवर) सुद्धा म्हणता येइल.

बाजीप्रभू देशपांडा Thu, 17/11/2011 - 13:38

थांबा, आधी माझ्या घोड्यावर मांड ठोकून पोबारा करण्याची पोझ घेऊ द्या.
हं, आता मी नाव सुचवतो"

अय्याश
?

पळा!!!!!

बाजीप्रभू देशपांडा Thu, 17/11/2011 - 14:03

In reply to by आडकित्ता

चुकून घेतलंय हो हे नाव.
इथल्या प्रशासकांकडून नाव बदलुन घेण्याचा हुकूम सुटण्याची वाट पहातोय.
:)

विनायक प्रभू Thu, 17/11/2011 - 15:35

aisaks
आय्झॅक्स

विनायक प्रभू Thu, 17/11/2011 - 15:40

आय्झॅक्स
aisaks

चिंतातुर जंतू Thu, 17/11/2011 - 17:24

'ऐ' आणि 'अ' ही दोन आद्याक्षरं किंवा 'कर' वगैरे प्रत्यय वापरण्यापेक्षा जरा वेगळा पायंडा पाडत ऐरेगैरे का म्हणू नये? ;-)

मी Thu, 17/11/2011 - 18:10

टोपणनाव - 'साक्षर'

वाक्यात उपयोग(!!)

१. ते लोक 'साक्षर' आहेत.
२. 'साक्षरांच्या' नादी लागू नका.
३. काय तुम्ही 'साक्षर' आहात?
४. लै 'साक्षर' पायले भौ!
५. तुमी एकलेच 'साक्षर' अन बाकी समदे निरक्षर का भौ?

एक साक्षर -
मी

1234 Thu, 17/11/2011 - 20:00

अक्षरबाज,

बाकी बाजींचे ऐयाश आवडले बुवा.

प्रियाली Thu, 17/11/2011 - 20:55

ऐसीमधला A आणि अक्षरेमधला Ak घेऊन AAk = "आक छू!" असे का म्हणू नये?

आडकित्ता Thu, 17/11/2011 - 21:00

In reply to by प्रियाली

ऐशच्या पोरीला फिट्ट बसेल नांव. "आक्छू" ;)
पण 'क' वरून निघालंय म्हणतात ना?

प्रियाली Thu, 17/11/2011 - 21:05

In reply to by आडकित्ता

लहान मुलांना शिकवतात ना "कावळा उड, चिमणी उड" तसं तिला

काक छू म्हणायचं.

नंदा प्रधान Fri, 18/11/2011 - 11:09

मेळेकरी - म्हणजे ऐअमि च्या मेळ्याला जाणारे. मेळेकरी म्हणजे मिसळपावची तर्री सोडून आलेले अक्षर मिळवणारे मेळेकरी.