कसं काय पाटील, बरं हाय का? - विडम्बन
सोशल मिडीयाचा वापर करून काँग्रेसची बदनामी केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल - इती सतेज पाटील, गृहराज्य मंत्री. त्याला माझं उत्तर!
कसं काय पाटील, बरं हाय का?
आज काय वाचलं ते खरं हाय का?
आवं लकवावालं तुमी
आवं चकवावालं तुमी
आवं घड्याळवालं तुमी
आवं हातवालं तुमी
सांगा, आज काय वाचलंय ते खरं हाय का?
काल म्हनं तुमी दिल्लीला ग्येला
दिग्गीच्या तालमीत तयार होवून आला
सोशल मिडियाची कशी, वाट लावलीत अशी
आता काय शिलकी ऱ्हायलंय का?
सांगा, आज काय वाचलंय ते खरं हाय का?
आता म्हनं तुमी, कायदाच क्येला
फेसबुक, ट्विटरवरी घातलात घाला
सरकारवरती टीका, तुरुंगात फ्येका
आनिबानीचं दिस परत आनलंय का?
सांगा, आज काय वाचलंय ते खरं हाय का?
कसं काय पाटील, बरं हाय का?
आज काय वाचलं ते खरं हाय का?
Shefali Vaidya
जोशीसाहेब,
इडंबन बिडंबन नाय जमायचं. फार्तर गृहराज्यमंत्र्यांच्या पीए ना ऐ.अ. चे अकाउंट उघडून देतो. ;) ज्यांच्या नावाने पत्र लिवलंय थितं पोचिवनार्या पोष्टमनाचा दर्जा आमास्नी द्या हवा तं. आमची काय छाती ओ प्रहसनं आन विडंबनं लिवायची? त्ये काम जालिय बालकांनीच करावे ;)
आमाला येका प्रश्नाच्या उत्तरादाखल अल्लग धागं बी खोल्ता येईनात राव!
याला प्रत्युत्तर म्हणून
याला प्रत्युत्तर म्हणून आडकित्ता यांच्या महाविडंबनाच्या प्रतिक्षेत.