Skip to main content

कसं काय पाटील, बरं हाय का? - विडम्बन

सोशल मिडीयाचा वापर करून काँग्रेसची बदनामी केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल - इती सतेज पाटील, गृहराज्य मंत्री. त्याला माझं उत्तर!

कसं काय पाटील, बरं हाय का?
आज काय वाचलं ते खरं हाय का?

आवं लकवावालं तुमी
आवं चकवावालं तुमी
आवं घड्याळवालं तुमी
आवं हातवालं तुमी

सांगा, आज काय वाचलंय ते खरं हाय का?

काल म्हनं तुमी दिल्लीला ग्येला
दिग्गीच्या तालमीत तयार होवून आला
सोशल मिडियाची कशी, वाट लावलीत अशी
आता काय शिलकी ऱ्हायलंय का?

सांगा, आज काय वाचलंय ते खरं हाय का?

आता म्हनं तुमी, कायदाच क्येला
फेसबुक, ट्विटरवरी घातलात घाला
सरकारवरती टीका, तुरुंगात फ्येका
आनिबानीचं दिस परत आनलंय का?

सांगा, आज काय वाचलंय ते खरं हाय का?

कसं काय पाटील, बरं हाय का?
आज काय वाचलं ते खरं हाय का?

Shefali Vaidya

आडकित्ता Wed, 09/10/2013 - 00:07

In reply to by अजो१२३

इडंबन बिडंबन नाय जमायचं. फार्तर गृहराज्यमंत्र्यांच्या पीए ना ऐ.अ. चे अकाउंट उघडून देतो. ;) ज्यांच्या नावाने पत्र लिवलंय थितं पोचिवनार्‍या पोष्टमनाचा दर्जा आमास्नी द्या हवा तं. आमची काय छाती ओ प्रहसनं आन विडंबनं लिवायची? त्ये काम जालिय बालकांनीच करावे ;)
आमाला येका प्रश्नाच्या उत्तरादाखल अल्लग धागं बी खोल्ता येईनात राव!

बॅटमॅन Tue, 08/10/2013 - 14:39

पण एक सांगा, हे गुन्हा दाखल करणं, छळ करणं फार आधीपासूनच चालू आहे नैका? शिवसेना-मनसे, सीपीएम, काँग्रेस, बीजेपी, इ. या सर्व पक्षाच्या लोकांनी किमान एकदातरी असे केलेच आहे. सतेज पाटलांचे वक्तव्य काय वेगळे आहे?

नितिन थत्ते Wed, 09/10/2013 - 09:32

पूर्वी एकदा तहलकाने भाजप अध्यक्षांची लाच घेतानाचा व्हिडो काढला म्हणून तहलकाच्या मागे पोलीस, इन्कमटॅक्स वगैरेचा ससेमिरा लावला गेल्याचं अंधुक आठवतंय ब्वॉ. अर्थात पब्लिक मेमरी शॉर्ट असते असं कायतरीसुद्धा म्हणतात.