Skip to main content

(मूत्रविसर्जनातल्या अडचणी)

आज एक धक्कादायक माहिती मिळाली. भारतात मोठ्या प्रमाणावर दांपत्यांना उघड्यावर सहज मूत्रविसर्जन करू शकणारी अपत्य हवी आहेत. पण तशी निवड करायला बंदी आहे.

'द सेकंड सेक्स'मध्ये सिमोन दी बोव्हार म्हणते की मुली मूत्रविसर्जन करतात तेव्हा त्यांचा पार्श्वभाग उघडा पडतो त्यामुळे त्यांच्या चारचौघात मूत्रविसर्जन करण्यावर बंधनं येतात. याचा अर्थ फक्त शिस्न असणाऱ्या मनुष्यांनाच शरम न वाटता उघड्यावर मूत्र‌विसर्जन करता येतं. भारतात उघड्यावर मूत्रविसर्जन करण्यास मनाई नाहीच. आपल्या अपत्याने संपूर्ण देश फिरावा, जिथे मूत्रविसर्जनाची चांगली सोय नाही त्याचा व्यवस्थित अभ्यास करावा असं अनेक सुजाण नागरिकांना वाटतं. पण त्यांना अभ्यास करत असतानाही स्वतःला उघड्यावर मूत्रविसर्जन करण्यात अडचणी याव्यात असं कोणत्याही पालकांना वाटणार नाही असा अंदाज आहे.

आज जगभर विविध समस्यांचा अंदाज घेण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. पण त्या समस्या सुटूच नयेत अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.

सरकार आमच्यासाठी आहे की समस्या सोडवण्याच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या एनजीओजसाठी?

नंदन Thu, 24/07/2014 - 06:23

आज जगभर विविध समस्यांचा अंदाज घेण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. पण त्या समस्या सुटूच नयेत अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.

खालील दुव्यातला व्हिडिओ आपल्या जबाबदारीवर पहावा. काहींना तो अश्लील, अस्वस्थ करणारा वाटू शकेल.

येथे एक उपाय सुचवलेला आहे.

नगरीनिरंजन Thu, 24/07/2014 - 20:36

In reply to by माहितगारमराठी

नेम धरुन "पाण्याची" धार मारुन या वाळूच्या माकडांची मुंडकी तोडायला मजा येईल असा दुष्ट प्रथमलिंगी विचार मनात येऊन गेला. खोटं कशाला बोला?
:D

प्रकाश घाटपांडे Thu, 24/07/2014 - 12:37

आम्ही शाळेत असताना काही मूत्रविशारदांची मूत्रविसर्जनाची स्पर्धा असायची. किंचित उताराव एक काडीने रेषा ओढून प्रत्येकाने त्याच लाईनीत मुतायचे. ज्याचा जास्त लांब जाईन तो भारी. डावखराच्या बाब्याचा मूत लई लांब जायचा.

ऋषिकेश Thu, 24/07/2014 - 13:07

In reply to by प्रकाश घाटपांडे

:)
आम्ही तर ऐनवेळी रिसोर्सेसचा अभाव नको, नी दूरवर प्रोजेक्शनही धड व्हावे म्हणून मधल्यासुट्टीच्या आधीच्या तासाला बरेच पाणीही पिऊन घेत असु ;)

नंदन Thu, 24/07/2014 - 13:24

In reply to by प्रकाश घाटपांडे

'Love in the time of cholera' मधला हा उतारा आठवला.

He was the first man that Fermina Daza heard urinate. She heard him on their wedding night, while she lay prostrate with seasickness in the stateroom on the ship that was carrying them to France, and the sound of his stallion's stream seemed so potent, so replete with authority, that it increased her terror of the devastation to come. That memory often returned to her as the years weakened the stream, for she never could resign herself to his wetting the rim of the toilet bowl each time he used it. Dr. Urbino tried to convince her, with arguments readily understandable to anyone who wished to understand them, that the mishap was not repeated every day through carelessness on his part, as she insisted, but because of organic reasons: as a young man his stream was so defined and so direct that when he was at school he won contests for marksmanship in filling bottles, but with the ravages of age it was not only decreasing, it was also becoming oblique and scattered, and had at last turned into a fantastic fountain, impossible to control despite his many efforts to direct it. He would say: "The toilet must have been invented by someone who knew nothing about men." He contributed to domestic peace with a quotidian act that was more humiliating than humble: he wiped the rim of the bowl with toilet paper each time he used it.

नंदन Thu, 24/07/2014 - 13:35

In reply to by बॅटमॅन

प्रोजेक्टाईल मोशन आणि प्याराबोला इ.इ. आठवून हहपुवा झाली (लोळून हसत)

:)

शब्दशः देखील पॅरॅबल, पॅराबोला आणि बॅलिस्टिक हे जोडलेले आहेतच.

(येथून)
mid-13c., parabol, modern form from early 14c., "saying or story in which something is expressed in terms of something else," from Old French parable "parable, parabolic style in writing" (13c.), from Latin parabola "comparison," from Greek parabole "a comparison, parable," literally "a throwing beside," hence "a juxtaposition," from para- "alongside" (see para- (1)) + bole "a throwing, casting, beam, ray," related to ballein "to throw" (see ballistics).

इस्पीकचा एक्का Sat, 26/07/2014 - 22:54

In reply to by बॅटमॅन

अरेबिकमध्ये 'मूत्र' ला 'बोल' असा शब्द आहे... त्याचाही या सगळ्याशी काही संबध असेल काय ? :)

त्यावरून प्यारा'बोला' चा अर्थ लावणे म्हणजे जरा जास्तच ताणल्यासारखे होईल... म्हणून नको ;)

बॅटमॅन Sun, 27/07/2014 - 14:41

In reply to by इस्पीकचा एक्का

सरजी- सर्वप्रथम नमस्कार :) केफ हाल?

बाकी बोलचा अर्थ इतका 'बोल'का आहे हे माहिती नव्हतं, आता कैक शब्दांचे अर्थ आमूलाग्र बदलतील यात शंका नाही, उदा. बोलपट, बोलके डोळे, बोल राधा बोल, इ.इ.इ. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

नगरीनिरंजन Thu, 24/07/2014 - 20:49

In reply to by नंदन

उतारा तर रोचक आहेच पण एवढाली पुस्तके वाचून उतारेच्या उतारे आठवण्याइतकी नंदन यांच्या बुद्धीची 'धार' जास्त रोचक आहे.

नंदन Thu, 24/07/2014 - 23:01

In reply to by बॅटमॅन

नशीब शार्प शूटर नाही म्हणालास ;)
बाकी ह्या वेगळ्या पण इंटिमेट निरीक्षणामुळे उतारा लक्षात राहिला होता. बाकी गूगलाय नमः।

बॅटमॅन Thu, 24/07/2014 - 13:35

In reply to by नंदन

धन्यवाद. पॅराबोला आणि पॅरॅबल हे निगडित आहेत हे ठौक नव्हते. बाकी बॅलिस्टिकचे रूट मात्र लॅटिनमधील बॅलिस्टा असे आहे बहुधा.

साती Thu, 24/07/2014 - 13:37

In reply to by साती

डिटेलमध्ये शास्त्रिय माहिती लिहिते.
सध्या अधिक माहितीसाठी अमिरखानचा 'मूत्रविसर्जन' शब्दाला ग्लॅमर मिळवून देणारा 'थ्री इडियट' नावाचा सिनेमा पहा.

सुनील Thu, 24/07/2014 - 13:50

In reply to by साती

साती, नाही, म्हणजे तुम्ही लिहाच. आम्ही वाचू.

परंतु, सदर धाग्यात मूत्रविसर्जन हे निव्वळ निमित्तमात्र आहे. मूळ विषय वेगळाच आहे!!
(शोधा म्हणजे सापडेल!)

साती Thu, 24/07/2014 - 14:01

In reply to by सुनील

अहो, हे वरचे दोन माझ्याच तिथल्या दोन प्रतिसादांचे विडंबन आहे.
श्या:
:)

अजो१२३ Thu, 24/07/2014 - 19:32

In reply to by ग्रेटथिंकर

असं काय नाय. त्यांच्या आत्मचरित्रात त्यांच्या जीवनातल्या कोणत्याही कितीही अल्प काळाच्या वर्णनाचं पोटेंशियल इतकंच डेडली आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 24/07/2014 - 18:36

In reply to by साती

साती तुम्ही जुन्या जाणत्या आंजावाचक आहात. सवडीनुसार लिहाच. तोपर्यंत मी तुम्ही दिलेला होमवर्क करते.

............सा… Thu, 24/07/2014 - 18:48

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हाहाहा खरय गोल गोल फिरणं खूप झालय आता कोणीतरी मस्त फटाका मौजमजा धागा काढा :)
किंवा ऑन सेकंड थॉट आहेत त्या धाग्यांवरही मौजमजा करु यात की. :)
________
दर वेळेला शॉपिंग करते तेव्हा असच बाय डिफॉल्ट गुन्हेगारी वाटतं..... आहेत ते कपडे वापरा, शॉपिंग शॉपिंग करु नका!!! तसं आहेत ते धागे नीट वापरा.

गिरिधर Sat, 26/07/2014 - 02:38

उतार्य्याचे तायतल वाचुन मला वात्ले कि हा बालाजि ताम्बेचा लेख असावा...!