Part १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
===================================================
ब्रिटिशांनी एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धात बहुतांश भारत जिंकून घेतल्यानंतर भारतातला अंमल स्थिरावू लागला होता. त्या काळात ब्रिटिशांनी संस्थानांशी करारमदार केले होते. पण क्षुल्लक कारणावरून ते मोडीत काढायचे प्रकार लॉर्ड डलहौसीने केले. त्यातून असंतोष निर्माण होऊन १८५७ चे बंड उद्भवले.
ते बंड ब्रिटिशांनी मोडून काढले. १८५८ मध्ये ब्रिटनच्या सरकारने भारताचा ताबा ईस्ट इंडिया कंपनीकडून स्वतःकडे घेतला. त्या वेळी राणीने जाहीरनामा काढून प्रजाजनांना आणि संस्थानिकांना आश्वासने दिली.
त्यानंतर कोणत्या काळात ब्रिटिशांना असे वाटले असेल की आता आपले भारतावरचे राज्य चांगलेच सुरक्षित झालेले आहे?
इतिहासात डोकावले तर १८६२ मध्ये मुंबईच्या किल्ल्याच्या भिंती पाडण्यात आल्या असे दिसते.
१८८५ मधल्या काँग्रेस स्थापनेच्या काळात तरी ब्रिटिशांना उठाव वगैरे होण्याची भीती वाटत नसावी असे दिसते.