Skip to main content

सरकार

दानोळीचे दादासाहेब गायकवाड सरकार हे मोठं प्रस्थ होतं. वतनदारी संपुष्टात आली असली तरी गायकवाड सरकार गावाचे राजाच असल्यासारखे होते. फक्त सरकारांनाच नव्हे तर सगळ्या गावालाच तसे वाटत होते. गावातल्या पेठेच्या एका टोकाला सरकारवाडा होता. म्हणायला एका टोकाला, पण खरं तर गावातच. वाड्यासामोर मारुतीचं देऊळ होतं, चावडी होती, ग्रामपंचायतीचं ऑफिस होतं. वाड्याच्या पुढे उजव्या हाताला बारा महीने पाणी असणारी स्वामी विहीर होती. सरकारवाड्याचा लाकडी दरवाजा मोठा आणि तेलपाणी करून चांगला निगा राखलेला होता.

अमेरिकेतील रोचक डोलांडफाईल्स पर्व आणि ममदानीच्या निमित्ताने

झोहरान ममदानी निवडून आल्यामुळे त्यामुळे इथल्या काही भांडवलशाहीप्रेमी लोकांना अतीव दुःख झालय. (त्यांना काय प्रॉब्लेम आहे कळत नाही. ममदानीने न्यूयॉर्क विकून टाकले तरी इकडे काय फरक पडणारे? इथे पुणे शहर विकून खाणे सुरु आहे त्याबद्दल निवांत आहेत लोक). पुण्यातले एक नवदेशभक्त फेसबुक विचारवंत आहेत त्यांनी तर ममदानीला जी रोमांचक विशेषणे बहाल केली आहेत ती वाचून कुतुहूल जागृत झाले की बुआ कोण आहे हा नरपुंगव ? ( मला एकदा एकाच वेळी 'कम्युनिष्ठ आणि इस्लामी जिहादीष्ठ' असे दोन्ही वगैरे असणारी लोकं बघायची आहेत)

जीव देऊन वतन मिळवलं! - प्रा. सुमीत गुहा

मराठी जगतानं ब्रिटिशपूर्वकालीन भारतातल्या दैनंदिन जीवनाची माहिती देणारी कागदपत्रं मोठ्या प्रमाणावर मागे ठेवली आहेत. अशा कागदपत्रांमधून सामान्य लोकांचं आयुष्य दाखवणारी एक कथा.

साफल्य

कविता : ती शिकवता येईलही कदाचित, पण खरे सांगायचे तर ती जगावी ! जोखावी, अनुभवावी , गुंतून जावे तिच्यात. पाझरु द्यावे आतवर तिला आणि देउन टाकावी मुभा, आयुष्य बदलायची!

बुंदीचे रंगीत लाडू, की रंगीत बुंदीचे लाडू? : एक 'खेडवळ' पाककृती

खेडेगावातल्या लग्नाची ऐट वेगळीच. मला नेहमी खेड्यातली मोकळी बुंदी आठवते. आम्ही पोरं खरं तर ती मोकळी, रंगीबेरंगी बुंदी खायला म्हणूनच लग्नांना जायचो.

फटका हुकला नसता तर?

योगायोगानं गोष्टी घडून येतात, आणि आपण त्याचा बरेचदा विचारही करत नाही. राजाराम महाराजांच्या प्रवासाच्या निमित्तानं या योगायोगांचा घेतलेला आढावा.

वारी.....

ओढ तुझ्या भेटीची,
आज लागली या मनाला..
चरणी तुझ्या लीन व्हाया,
निघालो पंढरपुरा....

प्रत्येक श्वासात माझ्या,
तुझ्याच नामाचा गंध दरवळतोय..
टाळ-मृदंगाच्या निनादात,
जणू तूच आम्हा नाचवतोय...

डोळ्यांसमोर फक्त तुझीच छाया,
तुझीच मूर्ती जडली आहे..
पाऊल-पाऊल चालताना,
अवघ्यात पंढरी घडली आहे...

ओठांवरी ह्या नित्य अभंग,
‘पांडुरंग पांडुरंग’ जपण्यासाठी..
आसुसलेत हे डोळे माझे,
सावळे रूप पाहण्यासाठी...

आठवणींच्या विश्वात

आठवणींच्या विश्वात
आज हरवून जावेसे वाटते,
हरवलेल्या त्या क्षणांना
आज नव्याने भेटावेसे वाटते...

आयुष्यातले ते क्षण
कसे निसटले कळलेच नाही,
निसटलेल्या त्या क्षणांच्या
आठवणी कधी झाल्या कळलेच नाही...

आज वाटते पुन्हा,
त्या क्षणांत जावे
जे काही जगायचे राहिले
ते आज जगून घ्यावे...

सुखदुःखाच्या त्या प्रवाहात
आज स्वताला विसरून जावे,
हरवलेल्या त्या क्षणांना
आज पुन्हा नव्याने शोधावे...

का कळेना आज वाटते
पुन्हा आठवणींमध्ये रमावे,
आठवणींच्या वाटेवरूनी
आठवणींच्या विश्वात जावे...

वैदिक काळात: स्त्रियांची शैक्षणिक आणि राजनीतिक स्थिति

ब्रिटिश येण्यापूर्वी आपल्या देशात स्त्रियांना आणि शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, असा प्रचार ब्रिटिशांनी आणि स्वतंत्रता प्राप्तीनंतर ब्रिटिशधार्जिण्या सरकारी तंत्रानेही सतत केला. त्यामागे समाजाला विभाजित करण्याचा राजकीय उद्देशही होता. पण सत्य कितीही लपविले तरी लपून राहत नाही. आज एआयच्या काळात जुने संदर्भ शोधणे अधिक कठीण नाही. मीही त्याची मदत घेऊन वैदिक काळातील स्त्रियांची शैक्षणिक स्थितीबाबत वेदातील उल्लेख शोधले.