Skip to main content

चडफडकरांची चडफड

(मूळ प्रकाशन: "माहेर" दिवाळी अंक २०२०)

सायंकाळची वेळ होती. तिरपे सोनेरी सूर्यकिरण सारे माळरान उजळून टाकत होते. पक्ष्यांची सुस्वर किलबिल चालू होती.

गुहेबाहेरचा खडक सरकवून लांबनाक आत गेला. छोटूच्या ग्राफिटीकडे क्षणभर बघून तो स्वतःशीच हसला, आणि मग कोपऱ्यातील विस्तवाजवळ जाऊन काहीतरी शोधू लागला. तिथे सापडले ते पाहून (खरंतर सापडले नाही ते न पाहिल्यामुळे) त्याचा पारा चढला, आणि तो रागाने म्हणाला,
"बटरटरखभदरघरचरठब?"

लांबनाकच्या भाषेत क्रियापदं, शब्दयोगी अव्ययं, विभक्तीप्रत्यय, अगदी "अ"शिवाय इतर स्वर यांचा अद्याप शोध लागला नव्हता. पण त्याच्या बोलण्याचा मतितार्थ असा होता:

ललित लेखनाचा प्रकार

चल रे भोपळ्या टुणूक टुणूक

मिसेस कोठारींना सॅनिटोरियमचा अगदी कंटाळा आला होता. म्हणजे मेडिटेशन, फिश स्पा वगैरे त्यांना आवडायचं. पण ग्लुटेन फ्री, डेअरी फ्री जेवण किती दिवस खायचं? शेवटी त्यांनी सॅनिटोरियममधून चार दिवस सुट्टी घेऊन जवळच राहणाऱ्या लेकीकडे जाऊन राहायचा निर्णय घेतला.

माॅर्निंग वाॅकमध्ये खंड पडू नये म्हणून चालतच जायचं असं मिसेस कोठारींनी ठरवलं. आणि एका प्रसन्न पहाटे, तहानलाडू भूकलाडू वगैरे न घेता, त्यांनी मार्गक्रमण केले.

शरद ऋतू होता. हवेत किंचित गारवा होता. मिसेस कोठारी जंगलातल्या पायवाटेवरून झपाझप चालत होत्या. अचानक पानांची सळसळ झाली, आणि एक धूर्त कोल्हा त्यांच्यासमोर अवतीर्ण झाला.

ललित लेखनाचा प्रकार

दिवाळी* = वैताग

जयंत्या (विशेषतः हयात असलेल्यांच्या), मयंत्या, anniversaries (मराठी शब्द माहिती नाही), वर्धापनदिन, "थर्टीफर्स्ट" आणि कुठलेही सणवार इत्यादींचा मला फार वैताग येतो.

कोणत्याही "प्रथे"कडे मी जरा संशयानेच पाहतो. प्रथा जितकी जुनी, तितका माझा संशय ज्यास्त. याचे कारण ती प्रथा आजच्या काळात निरर्थक असण्याची - किंबहुना घातक असण्याची - शक्यताच ज्यास्त.

सोबत

रोरावत्या रूटीनाचे
यंत्र अखंड घुमते
जुन्या व्रणावर रोज
नवी जखम करते

अनावर त्या रेट्यात
पिचलेल्या माझ्यासाठी
वाटेवरच्या झाडाची
सोबत वाटते मोठी

त्याचा मायाळू विस्तार
घाले हिरवी फुंकर
रंगीबेरंगी पाखरू
झुले उंच फांदीवर

इवल्याश्या कंठातून
किती तरल लकेरी
हाक आभाळाची येता
झेपावते दिगंतरी

वेटिंग फॉर गोदो

भाऊ हा शिस्तीचा पक्का होता. सकाळी सहा वाजता उठणार म्हणजे उठणार. आजही तो बरोबर सहा वाजता उठला. सकाळी महत्वाचे काम म्हणजे बागेला पाणी द्यायचे. पाणी दिले नाही तर झाडे कोमेजून जाउन माना टाकायची, त्याच्याकडे आशेने बघत रहायची. त्याला मग त्यांची दया यायची.
बंगल्याच्या आजूबाजूची ही आटोपशीर बाग छोट्या मालकांनी स्वतःच्या हातांनी लावलेली होती. त्याबागेत काय नव्हते? डबल मोगरा, अबोली, जाई जुई, निरनिराळ्या जातीचे गुलाब. आणि हो एकाच वेलीवर पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची फुले देणारी बोगनवेल! जशी फुलझाडे होती तशी रानटी झाडे पण होती. भाऊ एकदा रान साफ करायला गेला. तर छोट्या मालकांनी त्याला आडवल.

ललित लेखनाचा प्रकार

डॉक्टर ननवरे यांचे अजिबो-गरीब टाईम मशीन

डॉक्टर ननवरे यांचे अजिबो-गरीब टाईम मशीन
Statutory Warning
Throughout this book(story), the author sometimes attempts to use humor to explain certain concepts in a light-hearted manner. However, the author is not professional comedian, and thus cannot assure the desired effect. Be assured, however, that the author does not intend to offend any dead, alive, zombie, or otherwise undecided cats in superposed status
Exploring Quantum Physics Through Hands-On Projects

ललित लेखनाचा प्रकार

सरदार उधम: एकमेव संकीर्ण स्वातंत्र्यपूर्व एकाकी लढा

ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित झालेला सरदार उधम हा चित्रपट नक्कीच न चुकवण्यासारखा आहे. शुजित सरकारचे दिग्दर्शन आणि विकी कौशलचा अभिनय अफाट आहे. एकूण स्वातंत्र्य मिळण्याआधीची पार्श्वभूमी ज्या पद्धतीने उभी केलीय त्याला तोड नाही. हा नसिनेमा आजच्या काळात महत्त्वाचे विधान करतो. सध्याचा काळ हा श्रेयवादासाठी आसुसलेल्या पक्षांचा, त्यांच्या बगलबच्च्यांचा आहे. हा सिनेमा भारतीय स्वातंत्र्य लढ्याची जी गोष्ट सांगतो ती फार महत्त्वाची आहे. सरदार उधम यांचा एकाकी लढा, सूडाची भावना आणि त्यामागची कारणमीमांसा जबरदस्त कन्व्हीक्शनने मांडलेली आहे.

समीक्षेचा विषय निवडा

कुणी गांजा घ्या, कुणी चरस घ्या

कुणी गांजा घ्या, कुणी चरस घ्या 
या रे येड्यांनो, या रे या 
झिंगलेला हा आनंद घ्या 
हर्बल तंबाखूचा सुंगंध घ्या

मनात फुलवी कडक चांदण्या, नबाब रे बरळतो
महाराष्ट्राचे भाग्य उद्याचे मुठीत नाचवितो 
गंजेकसांना का हुंगुन रे दहशत हा भरतो 
हर्बलफुलाचा  महाविकास घ्या 
वसुलीआघाडीचा सुहास घ्या 

चार दिशांचे चौखूर सुंदर आघाडीचे पाळणी 
मंत्र्यांचे मुखकमल हे डुलत्या तुरुंगसदनी 
बरळा बोंबला फुरोगाम्याला जो जो ग गाउनी 
युगायुगाचा अंमल घ्या,
नवक्रांतीचा हा आरंभ घ्या 

गणिताच्या निमित्ताने – भाग ११

जोडीजोडीने संशोधन करतानाचे अनुबंध, आणि संयुक्त प्रवेशपरीक्षेच्या (IIT JEE) उणे गुणांकनाची अंमलबजावणी – प्राध्यापक बालमोहन लिमये यांच्या साप्ताहिक लेखमालेतील पुढील भाग.

ललित लेखनाचा प्रकार

भारत माता की जय!!!

पुर्वीच्या काळी फक्त आणि फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोनच दिवशी राष्ट्राभिमान वगैरेंची जाणीव होत असे. मग सार्वभौम देशाचा सजग नागरिक म्हणून झेंडावंदन करून आल्यानंतर देशासाठी आगळं वेगळं कर्तव्य पार पाडल्यासारखे वाटायचं. मात्र आता अशी राष्ट्रभक्ती दाखवण्याची वेळ दैनंदिन व्यवहारात आली आहे. नोटबंदीनंतर बँकेच्या रांगेत तासनतास उभे राहून वीररसयुक्त देशभक्ती नँशनल ड्युटी केल्यासारखी वाटत होती. पण सरकारने दयाळू लोकांना असा फिल रोजच्या जगण्यात दिला. हल्ली तर दरवेळी पेट्रोल भरताना क्रांतिकारी कार्य केल्याचा अभिमान वाटतो.