Skip to main content

काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १९: १९ सप्टेंबर २०२१

आज सोसायटीची मिटींग असल्यामुळे टॅक्सी उशीरा काढली.

त्यात अनंत चतुर्दशी असल्यामुळे मुंबईत बऱ्यापैकी सामसूम होती.

गव्हर्नमेंट कॉलनीतून चार यु. पी. चे मासेवाले घेतले.

आता यु. पी. चे मासेवाले कोळणींइतकेच एफिशियंटली मासे विकतात.

आणि त्यात यु. पी. चे मासेवाले, कोळणी किंवा आमच्या आई-बायकोसारखं मासेखाऊ पब्लीक ह्या कोणालाच प्रॉब्लेम नाहीये.

सो फालतू गोष्टींबद्दल रायता फैलावणाऱ्या लोकांनी शांतीलालचा पकडावा हेच बरं.

त्यांना दानाबंदर (मस्जिद बंदर) ला सोडायचं होतं.

त्यांतला एक फंटर त्याची माशाची रिकामी टोपली घेऊन पुढेच बसला.

ललित लेखनाचा प्रकार

ऐसीवरील गणितज्ञांस (आणि गणिताविषयी आस्था असणाऱ्यांस) पत्र

स. न. वि. वि.

गणितासंबंधी दर्जेदार लिखाण ऐसी वर होत आहे. त्या क्षेत्रातील काही मूलभूत प्रश्नांबद्दल तुमची मते जाणून घ्यायला आवडेल.

प्रश्न १: गणित हे मानवजातीस सापडलेले (डिस्कव्हर्ड) आहे, की ते मानवजातीने निर्मिलेले (इन्व्हेंटेड) आहे?

प्रश्न २: गणित निसर्गास इतक्या चपखलपणे लागू का पडत असावे? अर्थात, निसर्गाचे पुस्तक गणिताच्या भाषेत का लिहिलेले आहे?

ललित लेखनाचा प्रकार

हिजाब घालणारी बिकिनीतील मुलगी...

एकदा एका जाहिराती साठी स्पर्धेचे आयोजन केले होते. जाहिरात एका घरगुती वापरणाऱ्या वस्तुची करायची होती त्यासाठी जो चांगल्या जाहिरातीची संकल्पना मांडेल त्याला बक्षिस देऊन तीची चित्रीकरणासाठी निवड होणार होती. ठरल्याप्रमाणे पुण्या मुंबईतील जाहिरात कंपन्यांनी झुंबड केली स्पर्धेत. कारण सर्वाधिक इंटेलिजंट कंटेट पुण्या मुंबईतूनच तयार होतो असा त्यांचा फुकाचा अतिआत्मविश्वास आहे. मग इतर भागातील जाहिरात कंपनीच्या प्रतिनिधींना तुच्छतेने वागवणे वगैरे बाष्कळ प्रकार तिथे झाले. शंंभरहून अधिक संकल्पनांची एन्ट्री झाली. सगळ्यांनी आपापल्या बुद्धीमत्तेचा पिट्टा पाडून एकेक संकल्पना मांडली होती.

कॉलनीतल्या शाळेत शिकवले न जाणारे काही विषय

कॉलनीतल्या सगळ्या सुस्थित काका-काकूंनी आपल्या मुलांना आणि नातवंडांना शाळेत काय शिकवलं जातं, आणि काळानुसार काय शिकवलं पाहिजे याची यादी केली. ती पुढीलप्रमाणे -

१. निबंधलेखन - कमीतकमी शब्दांत स्वतःबद्दल अधिकाधिक माहिती पुरवणे. आपल्या मनःस्थितीबद्दल लोकांना अधिकाधिक उत्सुकता वाटायला लावणे. आपण काल काय जेवलो होतो, यातूनही आपली आर्थिक आणि मानसिक परिस्थिती लोकांना समजली पाहिजे. एक चित्र, हजार शब्द जुनं झालं. आता एक शब्द लाख शब्द, हे मुलांना समजलं पाहिजे.

अंतर

तुझ्या माझ्यातलं अबोल अंतर 
प्रेम-रुसव्यापार क्षितिजाकडे जाणारं 
ते न मापता चालत राहण्याची 
रुजवात केली होतीस तू जाताना 

पोक्त शहाणपण वागवताना
खट्याळ आठवणी जागवताना 
गमतीनी खळाळून हसताना 
कधी नकळत डोळे पुसताना 

तुझं जवळ नसणं लपेटून 
आपल्याच कोषात राहताना 
भोवतालच्या जगाची लगबग 
निवांत अलिप्तपणे पाहताना 

अचानक भेटायला येतो समुद्र 
अथांग, तुझ्यापर्यंत नेणारा 
माझ्यासाठी तिथवर यायचा 
शब्द दिला आहेस निरोप घेताना..

शेजारच्या काकू ठरल्या 'संध्यानंद - पर्सन ऑफ द ईअर'

मराठी संकेतस्थळांच्या जीवघेण्या बुलेटीन बोर्ड स्पर्धेत सतत पंधरा पंधरवडे स्थान मिळाल्याने शेजारच्या काकूंना मानाचा 'संध्यानंद पर्सन ऑफ द ईअर' हा पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख एक लाख डोजकॉईन्स, सन्मानचिन्ह आणि पुणेरी पैठणी असे ह्या पुरस्काराचे स्वरुप आहे. काकूंना हा पुरस्कार लवकरच पॉलो अ‍ॅल्टो ग्रामपंचायत कार्यालयात श्री. अभिजीत बिचकूले ह्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. आपल्याला पुरस्कार जाहीर झाला आहे ह्याची काल संध्याकाळपर्यंत काकूंना कुठल्याही प्रकारची कल्पना नव्हती.

गणिताच्या निमित्ताने – भाग १० [फर्माचे विधान]

फर्माचे विधान सिद्ध करण्यासाठी जगभरातले गणितज्ञ तीनशेहून अधिक वर्षे झगडत होते. त्यामागचा चित्तथरारक घटनाक्रम – प्राध्यापक बालमोहन लिमये यांच्या साप्ताहिक लेखमालेतील पुढील भाग.

ललित लेखनाचा प्रकार

आभाळाच्या फळ्यावर

धूमकेतूच्या खडूने
आभाळाच्या फळ्यावर
काहीबाही लिहीण्याची
होता ऊर्मी अनावर

चांदण्यांच्या ठिणग्यांची
घेतो मदत जराशी
चित्रलिपी सजविण्या
लिहीतो मी जी आकाशी

रात्र होते जशी दाट
तशा काही अनवट
मिथ्यकथा नक्षत्रांच्या
उजळती माझी वाट

झळाळते तेजोमेघ
गूढ कृष्णविवरांशी
बोलताना, जोडतो मी
नाळ आकाशगंगेशी

भेट विराटाशी थेट
माझ्या नक्षत्रभाषेची
रोमरोमातून तिच्या
रुणझुण ये सूक्ष्माची

लागे उगवतीपाशी
जेव्हा उषेची चाहूल
माझ्या नक्षत्रभाषेची
फिकटते चंद्रभूल

"पुण्यातील कोजागिरी"

चंद्र चंद्र जाणा/ असे मोठा मंत्र
काय त्याचे तंत्र / ओळखावे
चंद्र-दर्शनाने / वेड ते वाढते
डोक्यात चढते/ ब्रम्ह-रूप
गच्चीवर जमू / आम्ही ब्रह्ममत्त
सतरंजी फक्त / एक पुरे
पुण्यामाजी जाला / सण तो महान
स्कॉचची तहान / दुधावरी