Skip to main content

या अशा उद्विग्न वेळी

एकही कविता आताशा
काळजाला भिडत नाही
शब्द मोहक विभ्रमांनी
भ्रमित आता करीत नाही

कोरडा असतो किनारा
लाट फुटते मत्त तरिही
जखम होते खोलवर पण
रक्त आता येत नाही

प्रार्थनांचे मंत्र निष्प्रभ,
बीजअक्षर श्रांतलेले
भंगलेल्या देवतांना
आळवूनी भ्रष्टलेले

मार्गदर्शी ध्रुव अन्
सप्तर्षी आता लोपलेले
दीपस्तंभांचे दिवेही
भासती मंदावलेले

या अशा उद्विग्न वेळी
दाटुनी येते मनी
विफलता, जी रोज उरते
रोमरोमा व्यापुनी

एक आशा तेवते या घनतमी रात्रंदिनी
शृंखला पायातल्या तुटतील कधितरी गंजुनी

एका लोककथेचा जन्म !

वातावरणात अजून उकाडा हुता. दोन-तीन डाव हजरी लावून पाऊस गायब झाल्ता. वर आभाळात ढगांची दाटी हुयाची, तळ्यात कळपानं निवांत फिरणाऱ्या बदकांगत ढग सरकत ऱ्हायचे. गावात शेताच्या कामांना जोर आला हुता, नांगरणीसाठी माणसांची धांदल उडाली हुती. समदं घरदार कामाला जुपलं हुतं. सूर्य खालतीकडं कलला, न भितीशेजारी चटई हातरून पडलेल्या म्हातारीला आपसूकच जाग आली. पडल्या पडल्या तिनं डोळं किलकिलं करून म्होरच्या भितीवर लावलेल्या फोटोकडं बघितलं. तिज्या डाव्या डोळ्यात फूल पडलेलं, उजव्या डोळ्यान जवळचं दिसायचं नाय. नाय म्हणलं तरी आता म्हातारी नव्वदीला टेकलेली, पाठीत वायची वाकलेली पर खाऊन पिऊन धड हुती.

ललित लेखनाचा प्रकार

श्री कोरोना विजय कथामृत (३) - मार्च २०२१

Taxonomy upgrade extras

ऐका महाराजा आपल्या कोरोनाविजयाची कथा... जे हेत्ते काळाचे ठायी..

श्री कोरोनाविजय कथामृत (२) - फेब्रुवारी २०२१

Taxonomy upgrade extras

ऐका महाराजा आपल्या कोरोनाविजयाची कथा... जे हेत्ते काळाचे ठायी..

'मोगँबो का भतीजा हूं, आया हूं तो कुछ तो लेके जाऊंगा'

पूर्वार्ध -

अमेरिकेत आल्यावर मुद्दामहून भारतीय लोकांशी ओळख काढण्याची मला गरज नव्हती. मुलं नसली आणि देवाधर्मावर विश्वास नसला की गरजा आपसूक खूपच कमी होतात. पण साला कोव्हिडचा फेरा आला. तोवर मी फक्त बाहेर बागकाम करायचे, पण आता घरातली झाडंही गोळा केली. त्या पाठोपाठ स्थानिक फेसबुक ग्रूप आले. मग तिथे भारतीयही आले.

ललित लेखनाचा प्रकार

श्री कोरोनाविजय कथामृत (१) - जानेवारी २०२१

Taxonomy upgrade extras

ऐका महाराजा आपल्या कोरोनाविजयाची कथा.. जे हेत्ते काळाचे ठायी..

गीली पुच्ची (देवनागरी शीर्षकामुळे गोंधळात पडू नका)

"अजीब दास्तान्स" नामक चार कथांच्या मोटेतली ही एक फिल्म आहे. केवळ तीस मिनिटात ही छोटी फिल्म मोठा कॅन्व्हास दाखवते. भारती आणि प्रिया ह्या दोन बायांची गोष्ट. भारतीकडे रूप, जात, लैंगिक ओळख, एकलेपणा, आर्थिक वंचना या सगळ्यांची वजाबाकी होऊन उरलेली बुद्धी, कष्टाळूपणा आणि लढाऊपणा यांची शिल्लक आहे. तर प्रियाकडे खाऊन पिऊन सुखी कुटुंब, सवर्णता, शिक्षण आणि रूप असूनही काहीश्या निर्बुद्ध निरागसतेमुळे वाट्याला आलेली दया, पुरुषी आपुलकी, गृहित धरले जाणे आणि आयुष्याविषयी दुखरा संभ्रम आहे.

समीक्षेचा विषय निवडा

'mental Health Day' रजा घेउन काढलेल्या नोटस

काल गिल्ट फ्री , मानसिक-आरोग्य दिवस रजा घेतली. म्हणजे अशी काही कॅटेगरी आमच्या ऑफिसात आहे असे नव्हे तर आपल्यालाच तशी कॅटेगरी स्वांताय सुखाय या हेतूस्तव बनवावी लागते. तर काल मी पहीले म्हणजे सकाळी तासभर चालून फिरुन आले. चालताना, आर्ट् ऑफ लिव्हींगच्या रिशी नित्यप्रज्ञा यांचे काही व्हिडीओज ऐकले. एकदम छान सुरुवात झाली दिवसाची. व्हिडीओ ऐकण्यात व्यतीत केलेला हा वेळ मला फार बहुमूल्य वाटला. घरी आल्यावरती मी ऐकलेल्या भागांच्या काही नोटस काढल्या. कॉलेजपासूनच नोट काढण्यात मास्टरी होती माझी. विषयाच्या सविस्तर आणि सारभूत नोटस काढायच्या, मराठीत टिपणे म्हणतात त्याला. ती टिपणे खाली शेअर करते आहे.

ललित लेखनाचा प्रकार

गोष्ट सांगा गणित शिकवा .... ७

13 मे रोजी दु. 12:31 वा. पुण्यात तुमची सावली "गायब" होईल! Fake news? खाली लिंक्स आणि सविस्तर माहिती दिली आहे.
...

**************************
आत्ता पर्यंत: अंतराळात भ्रमण करून ज्ञानाच्या सीमा वाढवण्याच्या मोहिमेवर टीम पुणेला आय आर एस आर्यभट्टवर कॅप्टन नेमोंनी सहकारी म्हणून स्वीकारलं होतं. सध्या त्रिकोणी ग्रहावर... एरेटॉसथिनिस काका...

ललित लेखनाचा प्रकार

लसविषयक शंकानिरसन आणि चर्चा (भाग २)

लस, त्याचे दोन डोस, त्यातील गॅप याविषयी बऱ्याच शंका, confusion जनमानसात आहे. ते दूर करण्यासाठी.